स्वातंत्र्योत्तर साठ वर्षे

भारताला स्वातंत्र्य मिळून आता साठ वर्षे होत आहेत. साठ वर्षे हा प्रदीर्घ कालावधी आहे. या कालात विविध क्षेत्रात अनेक आमूलाग्र बदल झाले, काही गोष्टी तश्याच राहिल्या, काही चांगल्या तर काही वाइट घटना घडल्या, काही गोष्टींतून आपण धडा घेतला तर कित्येकदा अश्या प्रसंगातून शिकण्यात आपण कमी पडलो.

याबाबत स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर खालील क्षेत्रात काय उलथापालथी झाल्या, काय उल्लेखनीय घडले, कोणत्या अविस्मरणीय घटना घडल्या याविषयी कृपया आपली मते व्यक्त करावीत.

  • राजकारण - राष्ट्रीय आणि परराष्ट्रीय राजकारणात झालेल्या महत्त्वपूर्ण घटना, निर्णय, पंचशील धोरण, शीतयुद्ध, युद्धे, सिमला करार, आणीबाणी, आघाडी सरकारे इ. इ. इ.
  • समाजकारण - समाजाचे बदलते स्वरूप, महत्त्वाचे सामाजिक निर्णय, जागतिकीकरणाचा परिणाम इ. इ.
  • अर्थकारण - महत्त्वाचे आर्थिक निर्णय, धोरणे, राष्ट्रीयीकरण, जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था इ. इ.
  • विज्ञान, तंत्रज्ञान - विज्ञानात प्रगती, मैलाचे दगड इ. इ.

वरील मुद्दे केवळ उदाहरणादाखल दिले आहेत, याशिवाय इतर क्षेत्रांविषयीही आपल्याला काय वाटते ते लिहावे.

विषयाचा आवाका फारच मोठा आहे तरी वेळ काढून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपापल्या नजरेने आपल्या स्वातंत्र्योत्तर इतिहासाचा मागोवा घेण्यास काय हरकत आहे?

Comments

हम्म् !

बराच मोठा विषय !
स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली. याची झळ आपल्याला सर्वांना बसते अशी माझी धारणा आहे.
अशी प्रांतरचना हा दुर्दैवी निर्णय आहे असे माझे मत.
(हा प्रतिसाद सुसंबद्ध असावा अशी आशा करतो.)
-- (इअतर भाषीयांच्या भाषिक दुराभिमानाने आणि फुटिरतेमुळे व्यथित) लिखाळ.

यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीने बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहिये :)

भाषावार प्रांतरचनेमुळे

खरे आहे. लोकसंख्येमध्ये निम्याहून कमी असलेल्या हिंदी भाषकांच्या भाषिक दुराभिमानामुळे इतर सर्व भाषकांना आजकाल अतिशय त्रास होत आहे.

-- (त्रासलेला) आजानुकर्ण

______


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

रोख

अजानुकर्ण महोदय,
आपल्या प्रतिसादाचा रोख लक्षात आला नाही. पण आपण मला सहमत असाल असे वाटते.
बंगाली, तेलगु आणि मल्याळी लोक विशेषतः स्वतःचे किल्ले बांधून आणि आपल्याच लोकांना पांठिबा देत फिरताना आढळतात. परदेशात आल्यावरसुद्धा त्यांना त्यांचे भाषिक अति जवळचे असतात. हिंदी येत नाही त्यामुळे इंग्रजीमध्ये संवाद साधा असे ते आपल्याला सांगू शकतात (इंग्रजी तरी कुठे येत असते म्हणा !).याला अनुसरुन मी माझा प्रतिसाद दिला होता. हे सर्व भाषावार प्रांतरचनेचे फलित आहे असे मला वाटते.
--लिखाळ.

यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)

त्यात काही चुकीचे नाही

हिंदी येत नाही त्यामुळे इंग्रजीमध्ये संवाद साधा असे ते आपल्याला सांगू शकतात

यामध्ये काही चुकीचे आहे असे व्यक्तिशः मला वाटत नाही. माझे स्वतःचे शिक्षण दहावीपर्यंत मराठी माध्यमातून झाले. शिवाय बारावीपर्यंत इंग्रजीसोबत मराठी हीच एक भाषा शिकलो. माझे बहुतांश मित्र मराठी बोलणारेच होते. मानगुटीवर बसून पाचवी ते आठवी असे तीन वर्षे हिंदीचे शिक्षण आम्हाला देण्यात आले तेव्हा आम्हाला हिंदी शिकवणार्‍या शिक्षकांचे हिंदीही "हमारे रक्तमें हिंदीच भीना है" वगैरे टाईपचे होते. पुढे हिंदीपेक्षा संस्कृतला चांगले गुण मिळतात म्हणून संस्कृत घेतले. माझ्या गावातील मुस्लिमही भयंकर स्वरुपाचे हिंदी बोलत (उसकूच सांगना वगैरे प्रकार!) . मी जे काही तोडकेमोडके हिंदी शिकलो ते पुण्यात आल्यावर दुकानदारांशी बोलताना! शिवाय हिंदी चित्रपटांपेक्षा इंग्रजी चित्रपट पाहणे मला आवडायचे त्यामुळे मला स्वतःला हिंदी समजत असले तरी व्यवस्थित सोडा पण दुसर्‍याला समजेल इतपतही बोलता येत नाही.

आजही मला मौल्यवान ग्राहक समजून कर्ज देण्यासाठी दूरध्वनी करणार्‍या बाईने "यह कर्ज आसान किश्तोंमे" वगैरे म्हटले की मला किश्त म्हणजे व्याज की हप्ता हे कळत नाही.

त्यामुळे स्वतःचा पोपट करुन घेण्यापेक्षा दोघांनाही समजेल अशा इंग्रजीत संभाषण साधावे असे वाटले तर वावगे काय?

ही गोष्ट महाराष्ट्रात राहून माझी आहे. तमिळ, तेलुगू, बंगाली, मल्याळम या भाषाभिमानी लोकांची गत अधिकच बिकट असणार.

हिंदुस्तान सरकारने प्रत्येकाला हिंदी आलेच पाहिजे असा फतवा काढला आहे का? की हिंदी हे रुपयाप्रमाणे भारतात कुठेही चालेल असे चलनी नाणे आहे? (शिवाय तुम्ही दिलेले उदाहरण परदेशातील आहे.)

परदेशात आल्यावरसुद्धा त्यांना त्यांचे भाषिक अति जवळचे असतात.
अवांतरः पुण्यात आल्यावर आम्हीही गावाकडचे कुनी भेटते का हे शोधत होतो. ;)

______

फुटिरता

तुमचे म्हणणे काही प्रसंगी पटण्यासारखे आहे पण भाषा भिन्नत्वाची झळ राष्ट्रीय एकात्मतेला बसू नये अशी काळजी सर्वांनी घ्यावी असे वाटते. (वा ! काय वाक्य पडले :) तर भाषा वेगळी आहे म्हणून आपलाच गट करुन बसणे इत्यादी वाईट. तसेच बरेच भारतीय जर हिंदी बोलत असतील तर थोडे हिंदी यावे असे वाटते. (तुमचा हिंदी भाषकांची संख्या हा मुद्दा लक्षात घेउनही हे म्हणण्याचे धाडस करित आहे.) अनेकदा असे होते की "तुम्ही भारतीय असुनही एक मेकांशी इंग्रजीत बोलता आहात याचे नवल वाटते" अशी टिप्पणी परदेशातील लोकांकडून ऐकली की आपण सर्व जण कोणत्याच एका भारतीय भाषेत कसे बोलू शकत नाही याचे वाईट वाटते. पण आता मुद्दा भाषावार प्रांतरचनेला सोडून जात असल्याने थांबतो.
--लिखाळ.

यंदा श्रावण पाळावा म्हणतो ! त्याला साखळीला बांधावे की पिंजर्‍यात ठेवावे याचा निर्णय होत नाहीये :)

भारतीय भाषा

त्यांना इंग्रजी ही भाषाही आता पुरेशी भारतीय आहे असे सांगावे. ;) नाहीतरी नागालँड या भारतातील एका राज्याची व भारत सरकारचीही ती अधिकृत व्यवहाराची भाषा आहेच. :)

असो. आता पुरे.

ज्या इंग्रजी भाषेने आम्हाला पोटापाण्याला लावले ती मावसभाषा आम्हाला मातृभाषेइतकीच प्रिय आहे. (काय वाक्य पडले!)

यावर ऐकलेला एक उपाय

तर भाषा वेगळी आहे म्हणून आपलाच गट करुन बसणे इत्यादी वाईट

भाषेच्या बाबतीत भांडणे होणार, विशेष करून बहुभाषीक राष्ट्रात (त्या अर्थाने भारत कदाचीत एकमेव राष्ट्र असेल) - यावर भाषावारप्रांतरचनेच्या वेळेस की जेंव्हा हिंदी ही राष्ट्रभाषा करायचे ठरले आणि त्यामुळे विरोध, फुटीरता होऊ शकते हे जाणवू लागले तेंव्हा रा.स्व.संघाकडून उपाय सुचवला गेल्याचे ऐकले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, राष्ट्रभाषा हिंदी हे ठिक आहे, पण बहूभाषीक राष्ट्र पहाता प्रतयेक व्यक्तीस स्वतःच्या मातृभाषेव्यतिरिक्त (अथवा राज्यभाषेव्यतिरिक्त) अजून एक भारतीय भाषा शिकण्याचे बंधन करावे/प्रोत्साहन करावे. हा उपाय १००% व्यावहारीक होता असे वाटत नाही पण त्यातून आत्मीयता आणि आपल्याच पण इतर भाषीक लोकांबद्दल एकमेकांना आपसूक जवळीक वाटू लागू शकते, असे वाटते. अर्थात हा उपाय १९५० च्या दशकातला होता. आता वेगळेच विचार करावे लागतील पण तरीही कुठेतरी एकमेकांच्या भाषांची तोंडओळख असावी असे वाटते.

अतिशय महत्वाचा मुद्दा :

सामाजिक समरसता अजून ही अशक्य गोष्ट वाटते, अजून ही ६० वर्षा नंतर जातपात ही समाजामध्ये आहे त्याचा दूर उपयोग केला जातो हे चिंताजनक आहे. समाजामध्ये काहीतरी कमी आहे हे सतत जाणवत राहते हे आपले दुर्भाग्य.

१. राज्यघटनेप्रमाणे आरक्षण हे संपावयास हवे होते (१४.८.०७ आजच पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने ह्याचा उल्लेख केला हे विषेश)

२. शिक्षा / शिक्षण सर्वांसाठी हे अजून ही साध्य झाले नाही.

३. समाज हा भ्रष्ट्राचार एक नियम असावा असे पाळत आहे. रक्षातंत्रामध्ये देखील घुसखोरी प्रबळ दावेदार आहे हे खेदाचे ( आजच १४ ऑगस्ट ०८ रोजीची बातमी नटवर सिंह ह्यांच्या पावण्याला काही कोटी रक्कम मिळाली होती ब्लास्टिक मिसाईल खरेदी करण्याच्या व्यवहारामध्ये हे सीबीआय ने न्यायालयात कबूल केले आहे)

४. कायदा व सुरक्षा हा एक खेळ असावा अशी शंका येत आहे हे देशाचे दुर्भाग्य. ( उदा, आजच इंडिया टिव्ही वर रात्री ११.०० एक व्हिडीओ चित्रण दाखवले गेले ज्यामध्ये उत्तर प्रदेश पोलिस एका अपराधीवर जेव्हा तो शरणागती पत्करल्या नंतर ही गोळ्या (५-८) मारुन त्याला ठार केले व नंतर त्याच्या हाती एक पिस्तूल दिले गेले तसेच दारुगोळा त्याच्या खिश्यामध्ये भरला गेला. चर्चा करु ह्यावर)

५. १४ ऑगस्ट च्यामध्य रात्री जेव्हा ZeeNews, NDTV, StarNews, India TV, Sun Tv तसेच ईतर ह्या दिवशी ६० वर्षापाठीमागे काय घडले होते ह्याचा माहीती पट दाखवत होते ठिक १२.०० वाजता राष्ट्रगीत वाजवले / दाखवले गेले त्या वेळी आपले आजतक वाले (सबसे तेज) बुढा मर गया (११.५० ते १२. १५/२० वाजता रात्री)ह्या चित्रपटाची नायिका राखी सावंत तथा अनूपम खेर व ओमपूरी ह्यांचा वेगळाच माहीतीपट तसेच चित्रपटातील अर्ध-नग्न छायाचित्रे दाखवत होता. हे आमचे मिडीया प्रभू!

६. आज सर्व विश्व आपल्या देशाकडे तरुणांचा देश ह्या नजरे ने पाहते त्या वेळी आपले काही तरुण रात्री दारु पी, आपली बाईक स्टंट दाखव, पोरी फिरवा व ह्यातून वेळ मिळालाच तर एखादा चित्रपट पहा ह्या शिवाय काहीच करत नाही आहे ह्याचे दुखः वाटते. (अनुभव फक्त दिल्ली व NCR चा आहे बाकीच्या भागात ही वेगळे चित्र नसावे उदा. पुणे कांड)

७. आज च्या घडीला ६०-६५ % अथवा ह्याच्या पेक्षा जास्त नेते हे वय ६५ पार आहेत, तरुण रक्ताला वावच नाही आहे आपल्या देशाच्या राजकारणामध्ये अशी शंका येते मला.

८. आज ही रस्तावर लहान मुले (वय ११ ते १५ आसपास) काम करताना दिसतात (गुरगांव , हरयाणा, सेक्टर ५ श्री पावभा़जी वाला गाडी च्यावर ५ मुले आहेत जी रोजगारीवर काम करतात व त्यांना महीन्याचे १०००.०० रु. मिळत असावेत, त्यागाडीच्या जवळच पोलिसांची गाडी रोज उभी असते पावभाजी खाण्यासाठी व ते त्यामुलांना शिव्यांचा भडिमार करत आपली ऑर्डर् सांगतात, गुंरगांव हे दिल्ली NCR मध्ये येते व दिल्ली पासून फक्त १५ किंमी दूर आहे ) बालरोजगार दोन वर्षामध्ये संपेल हा चुनाव वादा कोणीतरी केला होता ( आज ते मंत्री आहेत सरकारमध्ये )

येथे फक्त मी मला काय वाटते ह्या विषयी लिहले आहे तेव्हा कृपया विवाद नको.

धन्यवाद.

राज जैन
*********
मी सध्या स्वाक्षरी शोधत आहे सध्या मीळाली की येथे लिहीनच.

मला काय वाटते ह्या विषयी लिहले आहे तेव्हा कृपया विवाद नको.

आज जो गोंधळ दिसतो त्याचे कारण बोकाळलेला भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराचे मूळ निवडणूक प्रचार खर्चात व उमेदवारांच्या अति व शीघ्र श्रीमंत होण्याच्या हवासात. जर हे बदलायचे असेल तर किमान किंवा प्रथम निवडणूक प्रचार खर्च शून्य करा.

यावर सध्या चर्चा चालु आहे. जितके जास्त सहभागी होतील तितकी चर्चा जास्त अर्थपूर्ण होईल

स्वतंत्र महाराष्ट्र

साठ वर्षे पुर्ण आता जे काही आमचे हाल केंद्रातल्या भय्यांनी केले आहेत ते झाल्याबद्दल
महाराष्ट्र हे आता 'स्वतंत्र राष्ट्र' म्हणून जन्मास यावे असे गुंडोपंतांना वाटते...
आपल्याला काय वाटते?
कशी वाटते ही माझी स्फोटक कल्पना!?

खुप झाले केंद्राचे पाय चाटणे!
हे कधीच न्याय देणार नाहीत आपल्याला.

आपला
गुंडोपंत

"गुंडोपंत महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असावे नि त्याचा ध्वज शिवरायांचा भगवा असावा याचे समर्थन करतात"

मराठी राष्ट्रपती

मराठी गृहमंत्री, मराठी कृषीमंत्री व इतर अनेक मराठी संत्री केंद्रात असूनही केंद्राचे पाय चाटावे लागतात हे आश्चर्यकारक आहे.

______


शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन केलेली आजानुकर्ण यांची माहितीपूर्ण अनुदिनी आता नवीन आकर्षक स्वरुपात. एकदा भेट देऊन शुद्धलेखनाची खात्री करा.

हो ना!

हो ना रे अजानुकर्णा..
चाटून चाटून पार जीभ वाळून झिजली रे माझी...

आपला
गुंडोपंत

महाराष्ट्र देशा...

राष्ट्रपतींच्या बरोबरीनेच पंतप्रधान व सारे मंत्री मराठी असलेल्या (होऊ घातलेल्या ?) महाराष्ट्र देशात पाय चाटायसाठी की खेचायसाठी यावरून दुफळी माजेल अशी भिती वाटते.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

दुर्दैवाने..

बर्‍याचदा शाहीर साबळ्यांनी केलेल्या मंत्रपुष्पातील ओळींचे विडंबन खरे असल्यासारखे वाटते:

घालीन आडवी टांग, पाडीन उताणा, असाच आमुचा मराठी बाणा

हा हा हा

घालीन आडवी टांग, पाडीन उताणा, असाच आमुचा मराठी बाणा

हे आवडले.. मस्त!!

मंत्रपुष्प??? - दुरुस्ती

मलावाटते त्याला प्राथना म्हणतात - मंत्रपुष्पाची आधीची

"घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहीन रूप तुझे"

च्या ऐवजी

"घालीन आडवी टांग, पाडीन उताणा, असाच आमुचा मराठी बाणा"

ह्म्मम्

टग्यादादा,
आता ह्यावरही, 'तुम्ही अतिशय बाळबोध चुका काढणारे लिबरल आहात' असे उत्तर आणि आले नाही म्हणजे मिळवली!!

बाळबोध..

आता ह्यावरही, 'तुम्ही अतिशय बाळबोध चुका काढणारे लिबरल आहात' असे उत्तर आणि आले नाही म्हणजे मिळवली!!

काळजी करू नका, "बाळबोध चुका काढणारे लिबरल" असे आमचे म्हणणे नाही तर "गरज नसलेल्या गोष्टींना बरोबर म्हणणारे हे बाळबोध लिबरल आहेत," असे फार तर असेल! (ह.घ्या.)

महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असावे नि त्याचा ध्वज शिवरायांचा..

गुंडोपंत असा विचार करत राहिले तर जितकी डोकी तितकी स्वतंत्र राष्ट्रे बनवावी लागतील

१९४७ चा ब्रिटीश माहीतीपट

भारताचे आणि पाकीस्तानचे काय होणार यावरून १९४७ चा ब्रिटीश माहीतीपट:

अफूची फुले

गदिमांची जोगिया मधून घेतलेली खालील कविता वाचा:

Page 1
Page2

धन्यवाद, राजकीय आढावा

सर्व प्रतिसाददात्यांचे आणि वाचकांचे आभार!

गेल्या ६० वर्षांतील राजकारणाशी संबंधित गोष्टींचा थोडक्यात आढावा इथे देत आहे. तपशीलांत काही चूक असल्यास कृपया निदर्शनास आणून द्यावी.

स्वातंत्र्यप्राप्तीची चाहूल लागल्यापासूनच भारतात अंतर्गत राजकारणाची सुरूवात झाली. नेहरू-पटेल, पटेल-गांधी, नेहरू-राजेंद्र प्रसाद यांच्यात झालेला संघर्ष, मतभेद सर्वविदित आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीपश्चात नेहरूंची आणि तत्कालीन कॉंग्रेसची धोरणे दूरगामी परिणाम करणारी ठरली. राज्यांचे विलिनीकरण, भारतीय प्रौद्योगिकी संस्थानांची स्थापना, सामाजिक समतोल आणण्यासाठी 'अफर्मेटिव्ह ऍक्शन'ची अंमलबजावणी इ. चांगल्या गोष्टी झाल्या तर काश्मीर प्रश्न राष्ट्रसंघात नेणे, सामरिक सबलतेकडे झालेले दुर्लक्ष, आक्रमक शेजारी राष्ट्रांच्या कुटील उद्देशांकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष अश्या काही चुकाही झाल्या. नेहरूंच्या पश्चात शास्त्रीजींच्या रूपात निस्वार्थी, कर्तबगार आणि प्रसंगी कणखर नेतृत्व लाभले. तत्पश्चात इंदिरा गांधी यांची प्रदीर्घ कारकिर्द महत्त्वाची ठरली. प्रभावी आणि आक्रमक व्यक्तिमत्व, प्रसंगी कठोर आणि अवघड निर्णय घेण्याची क्षमता आणि धमक हे त्यांचे प्रमुख गुणविशेष सांगता येतील. इंदिरा गांधींनंतर भारतीय राजकारणाची दिशा बदलणारा काहीसा अस्थिर कालखंड सुरू झाला. अल्प बहुमत असणारी सरकारे, आघाडी सरकारे, अंतर्गत लाथाळ्या ह्या भारतीय राजकारणाच्या अविभाज्य भाग बनल्या. त्यातही नरसिंह रावांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय ठरली. भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक जीवनात अनेक अपरिवर्तनीय बदल या कालखंडात झाले. पुढे जवळपास पन्नास वर्षे अविरत सत्ता उपभोगणार्‍या कॉंग्रेस पक्षावर मोठ्या कालावधीसाठी (पाच वर्षे) सत्ता गमावण्याची वेळ आली. अटल बिहारी वाजपेयींच्या कालावधीतही अणुचाचणी, कारगिल, अधिक वेगाने आर्थिक प्रगती अश्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या.

या घटनांविषयी आपणांस काय वाटते?

आपला
(राजकीय) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

बापरे

या घटनांविषयी आपणांस काय वाटते?

भीती.

भीती कशाबद्दल?

वरील घटनांमध्ये असे भीतीदायक काय आहे?

आपला
(प्रश्नांकित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

या निमित्ताने

या वेळी बीबीसीवर हा संपूर्ण महिना भारत आणि पाकिस्तान यांच्यावर बरेच कार्यक्रम दाखवले जात आहेत. भारतातील राहणीमान कसे असते हे दाखवण्यासाठी आपल्या शाळा, कॉलेजे इतकेच नव्हे तर लिज्जत पापडसारखे उद्योगधंदे या सर्वांवर माहितीपट दाखवण्यात येत आहेत. बातम्यांमध्ये नेहेमी भारताचा उल्लेख इकॉनॉकमिक सुपर पॉवर असा केला जात आहे. शिवाय गेल्या साठ वर्षांमध्ये आपल्याकडे लोकशाही टिकून राहीली याचाही वारंवार उल्लेख केला जातो.
यावरून भारताची जगातील प्रतिमा बदलते आहे हे जाणवते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

महत्त्वपूर्ण निरीक्षण

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाला दिलेले महत्त्व आणि पाकीस्तानकडे केलेले व्यावहारिक दुर्लक्ष अगदी उघड असल्याचे जाणवले. पाकिस्तानी जिथे बहुसंख्येने आहेत उदा. इंग्लंड तिथल्या प्रसारमाध्यमांनीही असे करणे बदलत्या जागतिक समीकरणांचे निदर्शक आहे.
आपला
(निरीक्षक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

 
^ वर