एंटरप्राईज रेसोर्स प्लॅनिंग (इ आर पी) एक ओळख - २

तीन स्तरीय व्यवस्था

इ आर पी प्रणाल्या आजच्या घडीला इआरपी न मानता ए एस अशा मानल्या जाता म्हणजे एंटरप्राईज सॉफ्टवेअर.
पण हे घडण्यासाठी खूप काळ जावा लागला. सुरुवातीला साधारण १९६० च्या दशकात याची सुरुवात झाली. त्याकाळात काही उद्योग कच्चा मालाच्या साठवण व मोजणीसाठी (इन्व्हेंटरी कंट्रोल) काही प्रणाल्या वापरत असत. त्यातला नुसत्या मोजणी मोजणी शिवाय चा भाग वाढून जाऊन पुढे कच्च्या मालाच्या मागणी व्यवस्थापनही करता येऊ लागले. याला एम आर पी म्हणजेच मटेरियल रिसोर्स प्लॅनिंग असे नाव आले. यात सुधारणा वाढत गेल्या. मनुष्यबळ व कच्चा माल यांचे एकत्रीतपणे एकाच प्रणालीखाली व्यवस्थापन करणे शक्य होऊ लागले. या विभागाला एम आर पी २ असे नाव पडले. पुढे ही सगळीच खाती एकांत एक अशी व्यवस्थित पणे बोलू लागली. म्हणजेच याचे सीमलेस इंटिग्रेशन झाले.

या काळात दोन स्तरीय प्रणाली वापरली जायला लागली. म्हणजे एका सर्व्हर वर एक माहितीचे आगर तर वापरकर्ते वेगळ्या संगणकावर. यामुळे माहिती ठेवणे व बदलणे सोपे झाले.
तीन स्तरीय (थ्री टियर) हार्डवेअर प्रणाली
यात पुढे सुधारणा झाली आणी तीन स्तरीय (थ्री टियर) हार्डवेअर प्रणाली वापरली जायला लागली. म्हणजे माहितीचे आगर व वापरकर्ते यामध्ये ऍप्लिकेशन सर्व्हर लावण्यात आला. यामुळे माहितीची देवाण घेवाण करणे सुरळीत पणे व्हायला लागले. अर्थात यावर जास्त लोक काम करणे शक्य झाले. यात मुख्य फायदा असा झाला की वेगवेगळी अनेक माहितीची आगरे एकमेकांना जोडूनही काम करता येणे शक्य व्हायला लागले.

प्रणालीवर काम करणाऱ्याला वेगवेगळी प्रणाली उघडण्याची गरज राहिली नाही. एकाच पडद्यावर (ग्राफिक युझर इंटर्फेस) सगळे वेगवेगळे माहिती आगरे दिसणे सोपे झाले. असे ही माहिती भरणाऱ्याला ते सगळे समोर दिसणे उपयोगी नव्हते. शिवाय त्यांना सहजतेने वापरता येईल असाच ग्राफिक युझर इंटर्फेस देता येणेही शक्य झाले. म्हणजे आता माहिती भरणाऱ्यांना कोणतीही नवीन 'संगणकाला समजणारी भाषा' शिकण्याची गरज राहिली नाही. प्रणाली सर्व समावेशक नि सहजतेने वापरता येणारे झाल्याने त्याची उपयोगिता वाढली या कारणाने त्या त्या प्रणाल्यांची मागणीही वाढली. यात पिपलसॉफ्ट, ओरॅकल व एस ए पी अश्या अनेक कंपन्या २००० साला पर्यंत आघाडीवर होत्या. पुढे एस ए पी ने त्यात आर /३ ही नवीन प्रणाली जास्तीत जास्त प्रमाणात विकुन आघाडी घेतली.

-निनाद
(काही मुद्दे या लेखात परत आले आहेत, पण ते या वेळी हार्डवेअर या संदर्भात आहेत.)

Comments

हम्म

म्हणजे इ आर पी चा अर्थ एखाद्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळणार्‍या मोठ्या मॉल सारखा घेता येईल का?

नाही

मुळात कोणतीच प्रणाली आज पर्यंत ए. एस होउ शकलेली नाही. इ आर पी ने अनेक खात्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येइल एक वेळ.

मराठीत लिहा. वापरा.

कसे ते ही लिहा

आज त्यांना इ एस म्हणतात कारण आजच्या घडीला तुम्ही सॅप कडून एक प्रणाली घेतलीत तर ते तुमच्या उद्योगाच्या कार्य क्षेत्राचा पुर्ण विचार करून योग्य असे बिझिनेस मॉडेल सर्व उद्योगाला एका जी यु आय द्वारे नियंत्रीत करुन देवू शकतील. अर्थात जर संपुर्ण व्यवसाय नियंत्रणाची प्रणाली असेल तर त्याला एंटरप्राइज सिस्टीम असे संबोधले गेले/जाणार.
--------
आता हे कसे होत नाही ते लिहा. म्हणजे मुद्दा तुमचा कळेल.
-निनाद

हे नाही

माझे उत्पादन अजुन बाजारत आलेच नाहिये. ते अजुन बाल्यावास्थेत आहे. ते उत्पादनक्षम होण्यासाठी लागणारा सर्व विदा सॅप या घडीला एकत्र ठेवू शकत नाही.

आता हे सांगा. माझ्या उत्पादनाची रेखाचित्रे आणि त्रिमितीय विदा मी सॅप मध्ये कसा ठेवू? तो कसा पाहू आणि त्या त्रिमितीय विदा मध्ये मला सॅप वापरून बदल करता येइल का?

मराठीत लिहा. वापरा.

सर्वग्राही ई.आर. पी. साठी प्रयत्न

सॅप सारखी कंपनी रिसर्च , डेव्हलपमेंट ते सर्विसिंग/मार्केट फीडबॅक पर्यंत सर्व प्रणाली सांभाळणारे एकत्रित / समन्वयक सॉफ्टवेयर तयार करण्याच्या अगदी जवळ पोचलेली असणार किंवा ते तयार असून पुढील मेजर व्हर्जन अपग्रेडमध्ये देण्यासाठी चाचण्याही सुरू असतील असे वाटते.
कारण एकदा पायाभूत साचा तयार झाल्यावर मॉड्युलर डेव्हलपमेंट करून हे भाग त्याला जोडणे अवघड नाही. फारतर त्यासाठी त्यांना एखादी एंजिनियरिंग ग्राफिक्समधली लहान कंपनी विकत घ्यावी लागेल.
शिवाय आजमितीला आय.एस्.ओ. प्रमाणित व्यवस्थाप्रणाली ही सर्वग्राही मानली जात असल्याने तिच्यात असणार्‍या सर्व घटकांना सामावून घेणारे सॉफ्टवेयर अजून कोणी तयार केले नाही हे वाचून आश्चर्य वाटले. त्यामध्ये बरेच श्रम असले तरी संकल्पन ही महत्त्वाची पायरी फारशी अवघड नाही.

अवांतर - माझा माहिती तंत्रज्ञान व्यवसायाशी तसा थेट संबंध नाही. त्यामुळे माझी मते त्यात काम करणार्‍या जाणकारांना मूर्खपणाची वाटली तर खेद नाही. पण स्पष्टीकरण द्यावे.

योग्य!

आपण योग्य तो प्रतिसाद दिला आहेच.
शिवाय मला वाटते की सध्याची प्रणाली ही सर्व माहीतीच्या योग्य त्या स्वातंत्र्या बरोबरच कार्यावर नियंत्रण आणणे यासाठी बनवली गेली आहे. त्यामुळे येथे आपल्या बघण्याचा दृष्टीकोन निराळा आहे असेही वाटते.

काहीसा!

काहीसा मॉल सारखा अर्थ घेता येईल.
पण यात मॉल मधला माल म्हणजे माहीती आहे. आपली माहीती साठवण्याच्या आणी पुरवठ्याच्या पद्धती मागणीत आहेत असे पाहून अनेक ई आर पी व्हेंडर्स बाजारात उतरले होते. त्यातले काही बंद पडले. काही छोट्यांना मोठ्यानी गिळले. (जे डी एडवर्ड ला पीपल सॉफ्टने (हे बरोबर ना?) पीपल सॉफ्टला ओरॅकलने)आज हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच व्हेंडर्स उरले आहेत. त्यात सॅप चे नाव खुप मोठे आहे. (सॅप ला माय्क्रोसॉफ्ट गिळणार अशा बातम्या अधुन मधुन येत असतात.)

या सगळ्यात नंतर सर्व्हीस देणे यात खर्च होणारा मोठा भाग आहे. तो सॅप ने 'योग्य मॉडेलद्वारे' बसवला आणी ते टिकले आहेत.

-निनाद

ओळख आवडली.

पुढचे भागही येऊदेत. थोड्या विस्ताराने आले तरी चालेल.

कॉपीराईट

हो नक्कीच!
फक्त जसा वेळ मिळेल तसे पाठवतो.
मात्र आता पुढील सगळे जास्त तांत्रीक होते आहे. ते कसे बसवावे याचा विचार करतो आहे, जमले नाहीये. पण प्रयत्न करतो.

शिवाय एखाद्या वेळी प्रणाली चे स्नॅप शॉटस् टाकायच्या झाल्या तर कॉपीराईट चा भंग होईल की काय शीही भीती वाटते आहे. कुणी खुलासा करेल का यावर?

आपल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!
-निनाद

स्नॅपशॉटस्

इंटरनेटवर धुंडाळा, तिथले दुवे इथे द्या. अव्यावसायिक वापरासाठी अविशिष्ट स्नॅपशॉटस् ना हरकत नसावी.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

हे सोडा हो!

हे बाकीचे सोडा हो!

आज जे सगळी कडे खपते आहे ते बरोबर! जो जीत वोही सिकंदर!
मग इ एस म्हणा नाहीतर अजून काही. काय फरक पडतो?

तुमचे लेख बरे आहेत् हो. पण त्याही पेक्षा या क्षेत्रात नोकरी मिळवायला नक्की "काय शिकले पाहिजे नि काय केले पाहिजे" ते सांगा!

आपला
संगणकाशिक्षित
गुंडोपंत

सॅप

"काय शिकले पाहिजे नि काय केले पाहिजे"

सॅपचा कोर्स करा. ५०,००० ते ५-६ लाखाचा कोर्स असेल, ४-५ लाखापर्यंचतची (वार्षिक) नोकरी लाभेल.

अवांतर: अर्धवट माहिती पुरवल्याने माहितगार चवताळून पुढ्यात येतात.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

इ. आय. पी. काय आहे?

इ.आय. पी. हा ही यांचाच भाऊबंद आहे का?

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~
 
^ वर