गीतमेघदूत ..१


II स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी प्रसन्न II


राम राम मंडळी,

पितळी तांब्याकडून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत! :)

कविकुलगुरू कालिदास दिनानिमित्त रविवार दि १५ जुलै, २००७ रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे 'आषाढस्य प्रथम दिवसे' हा कालिदासाच्या मेघदूतातील काही निवडक रचनांवर आधारित कार्यक्रम आम्ही सादर केला. सदर कार्यक्रमासंबंधीची माहिती मी या आधी इथेही लिहिली होती. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे, परमेश्वरी कृपेमुळे व अण्णांच्या आशीर्वादामुळे आमचा कार्यक्रम अतिशय सुरेख झाला असं सदर कार्यक्रमाला उपस्थित अनेक सभ्य, सुसंस्कृत रसिकवराचं मत पडलं! :) कार्यक्रमाला संस्कृत क्षेत्रातील, तसेच ठाण्यातील शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर आजीमाजी शिक्षकगण उपस्थित होते. या सर्व मंडळींचे मी निर्मितीप्रमुख या नात्याने मनापासून आभार मानतो.

कालिदासमहाराजांच्या मेघदूतातील श्लोकांना मी हिंदुस्थानी रागसंगीतावर आधारीत स्वरबद्ध केले, किराण्या घराण्यातील तरूण पिढीच्या गायिका वरदा गोडबोले यांनी त्याचे गायन केले, भरतनाट्यम नृत्यांगना निलिमा कढे यांनी त्याचे अभिनय, भावमुद्रारुपात सादरीकरण केले. मूळ संकल्पना 'झाला वेदान्त' संस्कृत पंडिता अदिती जमखंडिकर यांची असून मी संगीताखेरीज संपूर्ण कार्यक्रमाचे निर्मितीप्रमुख म्हणूनही काम पाहिले. धनश्री लेले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत रसाळ शैलीत निवेदन केले.

सर्व कलाकारांची थोडक्यात ओळख, आणि कालिदाससाहेबांच्या मेघदूततील पहिल्या श्लोकाचा दुवा देऊन आम्ही हा भाग येथेच संपवतो..

वरदा गोडबोले - या हिंदुस्थानी घराणेसंगीतातील किराणा घराण्यातील तरूण पिढीतल्या एक अतिशय चांगल्या दर्जाच्या गायिका आहेत व त्यांची सांगितिक कारकीर्द अत्यंत उज्वल आहे याबाबत आम्हाला खात्री आहे! आजपर्यंत वरदाने भारतात अनेक ठिकाणी आपली कला सादर केली असून अनेक बक्षिसं आणि शिष्यवृत्या तिच्या खात्यावर जमा आहेत. यामधील 'स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्ती' चा विशेषत्वाने उलेख मला इथे करावासा वाटतो! :) साला आमचा कोकणी स्वभाव मेल्याशिवाय बदलायचा नाही! :) असो..

संगीत साधनेसोबतच वरदाला संस्कृत विषयात मुंबई विद्यापिठाच्या कला पदवी परिक्षेतील सुवर्णपदक प्राप्त झाले आहे त्यामुळे तिला संस्कृत विषयातही अर्थातच अतिशय उत्तम गती आहे. कालिदाच्या मेघदूतातील श्लोकांचे संस्कृतातील उच्चार तिने अत्यंत चोख आणि समजून केले आहेत ही मला विशेष कौतुकाची बाब वाटते. संस्कृत भाषेतील काव्य गाताना योग्य उच्चार करणे तसे अवघड असते व त्याकरता विशेष काळजी घ्यावी लागते असे मला वाटते. वरदाने ही कामगिरी उतम बजावली आहे यात वादच नाही. माझ्याकडून रागावर आधारित चाली शिकताना वरदामधील एक अतिशय प्रामाणिक विद्यार्थिनी मला दिसली. मी सांगितल्याप्रमाणे स्वरावरील ठेहराव, रागस्वरूप सांभाळणारी नेटकी आलापी, इत्यादी गोष्टी तिने अतिशय उत्तम रितीने सांभाळून सादर केल्या आहेत याचा अनुभव आपल्याला ऐकताना यावा!

अदिती जमखंडिकर - हा कार्यक्रम सादर करण्यामागची मूळ संकल्पना संस्कृत पंडिता अदिती जमखंडिकर यांची होती. अदितीताई संस्कृत भाषेच्या प्रसार आणि प्रचाराच्या कामात सतत कार्यरत असतात. मुंबई विद्यापिठाची 'झाला वेदान्त' ही पदवी त्यांना प्राप्त झाली आहे. गीतापठण, गीता प्रश्नोत्तरी स्पर्धा, रामरक्षापठण, संस्कृत संभाषणवर्ग, असे अनेक कार्यक्रम त्या सार्वजनिक स्वरुपात पार पाडत असतात. ह्या सर्व गोष्टी त्या स्वतःचा वेळ, पैसा खर्चून निरपेक्षपणे सतत करत असतात ही गोष्ट मला विशेष वाटते. सदर कार्यक्रमाच्या तयारीच्या दरम्यान, 'तात्या, चाली कुठपर्यंत आल्या? असा धमकीवजा प्रश्न आमच्या अदितीताईने मला अनेकदा विचारून हैराण करून सोडले आहे! :) असो, ताईच्या हक्काने त्यांनी माझ्या पाठीवर मारलेल्या प्रेमळ धपाट्यांचा मी सदैव ऋणीच राहीन! :)

निलिमा कढे - निलिमा कढे ही भरतनाट्यम शैलीतली एक उत्तम कलाकार आहे. गेली अनेक वर्षे ती पुण्याच्या सुचेता भिडे चाफेकर यांच्याकडे भरतनाट्यमचे शिक्षण घेत आहे. एक कलाकार म्हणून, एक गुरू म्हणून सुचेता भिडे चाफेकर हे निश्चितच एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी सवडीने एखादा स्वतंत्र लेख मी लिहिणारच आहे. मेघदूतातील श्लोकांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ, अन्वयार्थ लक्षात घेऊन निलिमाने त्यानुसार फार सुरेख भाव मुद्राभिनय केला आहे. याकरता अर्थातच तिला सुचेताताईंचे उत्तम मार्गदर्शन मिळाले आहे.

उत्तम नृत्यकलेसोबतच, निलिमा एक उत्तम चित्रकारही आहे आणि ठाणा आर्ट स्कूल या संस्थेची ती प्राचार्या आहे. गेली अनेक वर्षे अपार मेहनतीने तिने ही शिक्षणसंस्था ठाण्यात नावारुपाला आणली आहे, मोठी केली आहे. असो, 'निलिमा आणि तिचं ठाणा आर्ट स्कूल' हा सगळा प्रवास मी गेली अनेक वर्षे फार जवळून पहात असून तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

धनश्री लेले - रसाळ शैलीतले अभ्यासपूर्ण निवेदन हे धनश्रीचं वैशिष्ठ्य म्हणता येईल. धनश्री मुंबई विद्यापिठातून संस्कृत विषय घेऊन एम ए झाली असून त्यात तिला सुवर्णपदक मिळाले आहे. शालेय जीवनात राज्यस्तरीय गीता पाठांतर सर्धेत तिने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम बक्षिस मिळवले! संस्कृत साहित्याबरोबरच मराठी काव्य, संतसाहित्य या विषयांचा तिचा दांडगा व्यासंग आहे. मनाचे सौंदर्य, गुरू - एक संकल्पना, भर्तृहरिची नितिशतके या विषयावर तिने अनेक ठिकाणी उत्तमोतम व्याख्याने दिली आहेत. ती स्वतः उतम काव्यही करते. तिच्या काही कोजागिरीसंदर्भातील, होळीसंदर्भातील बंदिशींना मी रागदारी संगीतात बद्ध केले असून आम्ही मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर येथील काही ठिकाणी त्याचे कार्यक्रमही सादर केले आहेत. त्याविषयी विस्तृतपणे सवडीने केव्हातरी लिहीनच. पण शिंची भांडणांपायी काही चांगलंचुंगलं लिहायला फारशी सवडच मिळत नाही! आणि माझ्यासारख्या कोकण्याला संगीत, साहित्य यापेक्षा भांडणात अन् कोर्टकचेर्‍यातच जास्त इंटरेष्ट! :)

असो..

तात्या अभ्यंकर -असो असो! चाली ऐकून आपणच ठरवा काय ते! यांचा संगीताचा थोडाफार अभ्यास असून मराठी संकेतस्थळावरील चालकांची आणि मालकांची गेली काही वर्षे ते नस्ती अन् फुक्कटची डोकेदुखी ठरले आहेत. असो, त्यांच्याविषयी भरभरून लिहिण्यासारखं फारसं काही नाही! :) कार्यक्रमाच्या सुरवातीला अदिती जमखंडिकर आमच्याबद्दल दोन कौतुकाचे शब्द बोलल्या आहेत ते आपल्याला इथे पाहता येईल.

अदितीताईचे अनेक आभार..:)

कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त:
शापेनास्तड्ग्मितहिमा वर्षभोग्येण भर्तु: ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्त्रानपुण्योदकेषु
स्त्रिग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥१॥

मंडळी हा मेघदूतातील हा पहिला श्लोक. हा हातात पडल्यापडल्या मला यमनकल्याणच सुचला! मंडळी, मी काय सांगू आपल्या यमनकल्याणची महती! आपल्या रागसंगीतात एकापेक्षा एक उत्तमोत्तम राग आहेत. परंतु आमचा यमन हा या सगळ्यांचा राजा आहे, मुकुटमणी आहे! अत्यंत हळवा आणि प्रसन्न राग.यमन गावा तर आमच्या अण्णांनी, हिराबाईंनी! एकदा इंदुरातील एका सांध्यकालीन मैफलीत अण्णांनी जसा यमन जमवला तसा यमन पुन्हा कधीही ऐकला नाही! असो..

सदर चित्रफितीमध्ये वरदाने सुरवातीची यमनातली आलापी किती सुरेख आणि प्रसन्न केली आहे पाहा. शापेनास्तड्ग्मितहिमा वर्षभोग्येण भर्तु: या शब्दांवरील निलिमाचा नृत्याभिनय पाहा.

जनकतनयास्त्रानपुण्योदकेषु! ओहोहो, कालिदासशेठ काय सुरेख लिहून गेले आहेत! जनकतनया सीतेने केलेल्या स्नानाचा इथे संदर्भ आहे. मंडळी, कालिदासाचे 'स्नानपुण्योदकेषु' हे शब्द मला इतके सुरेख आणि लोभसवाणे वाटले की तिथे अवचितपणे आमच्या शुद्धमध्यमाने प्रवेश केला आणि यमनचा यमनकल्याण झाला! :) मंडळी, आपल्या साहित्यात एकेक महाकाव्य आहे असं म्हणतात. मी इतकंच म्हणेन की आपल्या रागसंगीतातील एकेक राग हीदेखील स्वतंत्र महाकाव्येच आहेत!

स्त्रिग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु

ओहोहो खल्लास! रामगिरीपर्वताच्या संदर्भातली ही ओळ मला अत्यंत भावली! हा कालिदास लय भारी कवी आहे बॉस! आपण तर साला याच्या प्रेमातच पडलो आहे! :)

असो.. मंडळी, कश्चित् कान्ताविरहगुरुणा हा श्लोक खाली पाहा आणि आवडला का ते सांगा..

क्रमश...

आपला,
(कालिदासाचा संगीतकार)
--तात्या अभ्यंकर.

मंडळी,

आज गुरुपौर्णिमा. आमचा संपूर्ण कार्यक्रम मी व्यक्तिशः माझ्या खालील तीन मानसगुरूंना समर्पित करत आहे आणि त्यांना वंदन करत आहे!

आपला,
(ष्टेजवरचा पितळी तांब्या!) तात्या.

:)

Comments

साधुः साधुः

मंडळी हा मेघदूतातील हा पहिला श्लोक. हा हातात पडल्यापडल्या मला यमनकल्याणच सुचला!

अगदी बरोबर!

मेघदूताच्या सुरुवातीला यमनकल्याण (अथवा यमन) अनिवार्य आहे! तो नसता तर सर्वच "फेल" गेले असते. आणि तो आहे म्हणजे नक्कीच सगळं चांगलं झालं असणार . . .

अभिनंदन.

मला गाणं येत नाही. पण मला वाटतं पुढे असं झालं असावं:

तस्मिन्नद्रौ . . . मारुबिहाग
तस्य:स्थित्वा . . . बिहाग
प्रत्यासन्ने . . . पुन्हा यमन
धूमज्योति: . . . केदार

आणि हा श्लोकच अहीरभैरवात "लिहिलेला" आहे असं मला सतत वाटतं:

उत्संगे वा मलिनवसने सौम्य निक्षिप्य वीणां
मद्गोत्राङ्कं विरचितपदं गेयमुद्गातुकामा ।
तन्त्रीमार्द्रां नयनसलिलैः सारयित्वा कथं चिद्
भूयो भूयः स्वयमपि कृतां मूर्च्छनां विस्मरन्ती ॥

जगन्नाथबुवा,

मला गाणं येत नाही. पण मला वाटतं पुढे असं झालं असावं:

तस्मिन्नद्रौ . . . मारुबिहाग
तस्य:स्थित्वा . . . बिहाग
प्रत्यासन्ने . . . पुन्हा यमन
धूमज्योति: . . . केदार

तस्मिन्नद्रौ.. हा मारुबिहाग नाही. हा मी बराचसा हंसध्वनीत बांधलाय, पण पूर्ण हंसध्वनीही म्हणता येणार नाही. असो..

तस्य:स्थित्वा . .
प्रत्यासन्ने . . .

हे श्लोक आम्ही घेतलेले नाहीत.

धूमज्योति: . . . केदार

अगदी बरोब्बर! :) परंतु पहिल्या दोन ओळीतच केदार आहे, नंतरच्या दोन ओळीत मी बसंतचा प्रयोग केला आहे. नंतरच्या दोन ओळींचा माहोल मला बसंतचा वाटला.

आणि हा श्लोकच अहीरभैरवात "लिहिलेला" आहे असं मला सतत वाटतं:

उत्संगे वा मलिनवसने सौम्य निक्षिप्य वीणां
मद्गोत्राङ्कं विरचितपदं गेयमुद्गातुकामा ।
तन्त्रीमार्द्रां नयनसलिलैः सारयित्वा कथं चिद्
भूयो भूयः स्वयमपि कृतां मूर्च्छनां विस्मरन्ती ॥

जगन्नाथा, तुला सुचलेला अहीरभैरव हा राग अतिशय सुंदर आहे यात वादच नाही, परंतु मला वरील ओळींकरता कौशीकानडा अधिक योग्य वाटला. असो..

अभिप्रायाबद्दल आभार..

तात्या.

ता क - ईश्वरीने म्हटल्याप्रमाणे या लेखाला स्वतंत्र प्रतिसाद देता येत नाहीयेत, परंतु उपप्रतिसाद मात्र देता येत आहेत..

अ प्र ति म

काव्य-संगीत-नृत्य यांचा मिलाफ सुरेख जमून आलाय, तात्या. आभार मानण्याचा औपचारिकपणा करत नाही, पण श्लोकाचा व्हिडिओ पाहून छान वाटलं.

वा क्या बात है !

कार्यक्रमाचा निर्माताच सदाबहार असल्याने,कार्यक्रम बहारदारच होणार.
बाय द वे आपलाही अस्साच एखादा स्वतंत्र गायनाचा कार्यक्रम ऐकवा आणि दाखवाही.

अवांतर ;) आपला परिचय करुन देताना मंचावर वावरताना आपली अदा खासच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसचं कसचं

आपला परिचय करुन देताना मंचावर वावरताना आपली अदा खासच.

कसचं कसचं
(तात्याच्या मनातलं बोललो)
प्रकाश घाटपांडे

बिरुटेशेठ, ही घ्या आमची झलक! :)

बाय द वे आपलाही अस्साच एखादा स्वतंत्र गायनाचा कार्यक्रम ऐकवा आणि दाखवाही.

बिरुटेशेठ, खास आपल्या आग्रहाखातर आमच्या एका लेकडेमोच्या कार्यक्रमाची झलक येथे देत आहे. चित्तपावन कट्ट्याच्या ठाण्यातील एका कार्यक्रमातील हे चित्रण आहे. मुंबईपुण्यातील जवळजवळ चारशे साडेचारशे चित्तपावन तरूणतरूणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. च्यामारी कालेजातून नुकतीच बाहेर पडलेली आणि नोकर्‍याउद्योग करणारी (त्यातली अर्धीअधिक संगणक क्षेत्रातील सॉफ्टवेअर विन्जिनियर वगैरे) सगळी यंग मंडळी! चामारी म्हटलं यांच्यापुढे आपला निभाव लागेल न लागेल! :)

पण तसं काही झालं नाही. मंडळींनी आमच्या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. बिहाग रागाने आमची बाजू सांभाळून घेतली!

बिरुटेसाहेब, आम्ही कुणी मोठे गवई नाही. गाणं आम्हाला फारसं येत नाही. लेकडेमोपुरतंच येतं. परंतु आम्ही हिंदुस्थानी रागसंगीताचे प्रसारक आणि प्रचारक आहोत, त्यामुळे जिथे संधी मिळेल तिथे आम्ही आपल्या रागसंगीताबदल लिहितो, बोलतो, थोडंसं गातो आणि लोकांना आपल्या रागसंगीताची गोडी लावायचा प्रयत्न करतो. आम्ही येथे बिहाग रागावर थोडंसं बोललो आणि गायलो आहोत! तुम्हालाही आवडलं का ते सांगा! :)

तात्या.

वा तात्या!!!

झकास.. :))

झलक आवडली!!!... :)

ते पाणीच होतं बरं का! :)

आम्ही या लेकडेमोच्या दरम्यान मध्येच भांड्यातून जे काही प्यायलो ते पाणीच होतं बरं का! नाहीतर लेको नसत्या शंका घ्याल आणि स्टेजवर व्यसनाधीनता वगैरे बरी नव्हे म्हणून ऊर बडवाल! :))

तात्या.

हा हा :)

पितळी तांब्याने फुलपात्रातून पाणी प्यायले ;)

वा तात्या ! वा !


गायनाची झलक आवडली,अन त्याच्याबरोबर गातांनाच्या काही अदाही.

बाकी कलाकार तो कलाकारच. आपण हिंदुस्थानी रागसंगीताचे प्रसारक आणि प्रचारक असल्यामुळे,आणि संगीत देहातच असल्यामुळे, आपण आवड असेल त्याचा तर प्रश्नच नाही,पण आवड नसेल त्यालाही गायनाची गोडी लावणारा एक उमदा कलाकार आपल्यात आहे, इतकेच आम्ही म्हणतो.आपलं गायन मनापासुन आवडले !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार..

आमच्या ध्वनिफितीला दाद देणार्‍या आजानुकर्ण, बिरुटेशेठचे मनापासून आभार..

खरडीतून दाद देणार्‍या प्रियालीचेही आभार...

तात्या.

--
येत्या शनिवारी/रविवारी संत तात्याबांचा मुक्काम पुण्यात आहे. तेथे ते त्यांच्या काही मनोगती आणि उपक्रमी मित्रमंडळींची भेट घेणार आहेत..

अगंबाई अरेच्चा!

नुकतीच 'आषाढस्य प्रथम दिवसे' या मेघदूतातील श्लोकांना आम्ही चाली दिलेल्या कार्यक्रमाची व्हीसीडी आमच्या हाती आलेली आहे. त्यातले काही दृकश्राव्य तुकडे कापून, ते जालावर चढवून आम्ही त्याबद्दल इथे लिहिणार होतो. पण आता मनात असा विचार येतो की का उगाच आपल्या चाली लोकांना ऐकवा? कारण आम्हास जी काही कणभर विद्या मिळालेली आहे ती त्या उश्या फेकणार्‍या अण्णांमुळेच मिळाली आहे असे आम्ही मानतो! आणि इथे तर अनेक मंडळी बाह्या सरसावून त्यांच्या उश्या फेकण्यावर, आणि श्रोत्यांकडे पाठ करून बसण्यावरच लिहीण्यात मग्न असून त्यातच धन्यता मानत आहेत!

असो..

आमच्या चाली आणि आमचा कार्यक्रम आमच्यापाशीच राहू द्यावा असं वाटतं! तो उगाच येथील उपक्रमावरील मंडळींना ऐकवू नये असं वाटायला लागलं आहे. कारण आमचं जे काही आहे ते अण्णांचंच आहे, अण्णांमुळेच आहे. त्यांनीच ते आम्हाला गेली ६० वर्ष भरभरून दिलं आहे! आणि इथे उपक्रमावर तर आमच्या गुरुजींच्या सोकॉल्ड चुकांवरच भरभरून वाचयला मिळतं आहे!

विकासराव, आम्ही आपल्याला संबंधित दुवे व्य नि ने पाठवू. ज्यांना ज्यांना ऐकायची इच्छा असेल त्या सर्वांना आम्ही व्य नि ने दुवे पाठवू. परंतू त्याबाबत इथे काहीही जाहीर लिहिंण्यात आम्हाला स्वारस्य नाही!

आपला हा प्रतिसाद वाचून आपण खरोखर या विषयावर लिहिणार नाही की काय अशी भीती वाटू लागली होती, पण आपण ती निराधार ठरवलीत. आपण आपल्या या कार्यक्रमावर भरभरुन लिहिलेत, त्याची ध्वनीफीतही उपलब्ध करुन दिलीत, एवढेच नव्हे तर स्वतःचे (च) दुसरेही एक चित्रण दाखवलेत. वा, वा, फार बरे वाटले!
आपली फ्यान,
ऐहिक

प्रकाटाआ

:)

धन्यवाद गं बाई!

वा, वा, फार बरे वाटले!
आपली फ्यान,
ऐहिक

मी वाटच बघत होतो बघ तुझ्या प्रतिसादाची! तुझा प्रतिसाद आला आणि खूप बरे वाटले!

अगं नाहीतरी माझ्याशिवाय या आंतरजालीय जगतात तुझं दुसरं आहे तरी कोण? कारण तुला जेव्हा जेव्हा लेखणी उचलताना पाहतो तेव्हा तेव्हा ती बहुत करून माझ्याविषयीच तू उचललेली असतेस! :)

खरंच कित्ती कित्ती आभार मानू तुझे! माझ्या लेखनाचा, स्वभावविशेषाचा (विशेष करून माझ्यातल्या दोषांचा!:) इतका बारकाईने अभ्यास करून तू वेळोवेळी इथे, मनोगतावर आणि तुझ्या ब्लॉगावर लिहितेस याबद्दल मी तुझा शतशः आभारी आहे गं बाई! :)

बाय द वे, कुठे असतेस? काय करतेस? एकदा कळव तरी व्य नि ने! दुसरं काही नाही, निवांतपणे एकत्र बसून एखाद्या छानश्या हाटेलात घोट घोट कॉफी घेत गप्पा मारू! :)

तुझा,
तात्या.

अवांतर - विकासरावांना माझ्या कार्यक्रमाबद्दल इथे लिहिणार नाही असं म्हणूनसुद्धा त्याबद्दल मी इथे लिहिले याबद्दल तुला माझा सात्विक राग आलेला दिसतो आहे! चालायचंच! तात्याची वाहवा तर सगळेच करतात, परंतु खरा तात्या कित्ती कित्ती ढोंगी अन् मानभावी आहे हे तूच अगदी बरोब्बर ओळखलंस गं बाई! दे ट्टाळी.. :)

वड्याचे तेल वांग्यावर

कार्यक्रमाच्या वृत्त्त्तांतातही अण्णांच्या उशांची फेकाफेक आलीच. चालू द्या.
कार्यक्रमाचे वर्णन कळाले असे म्हणायला धजत नाही, पण सगळ्या ध्वनीफीती आवडल्या.
सन्जोप राव

तेवढं पुरेसं!

पण सगळ्या ध्वनीफीती आवडल्या.

अहो राव साहेब, आपल्याला ध्वनिफिती आवडल्या एवढंच आम्हाला पुरेसं आहे हो!

बाकी उश्यांबद्दलची अन् तांब्यांबद्दलची मतमतांतरं ही चालायचीच! तेव्हा त्याचं काही विशेष नाही! :)

आपला,
(उश्यातांबेवाला) तात्या.

अवांतर - आज पुण्यात येतो आहे. आपण आणलेली चंची घेऊन जाईन म्हणतो! :)

असेच

म्हणतो

सुरेख

कालच उपक्रमातून (पार्कातून) फेरफटका मारताना यू ट्यूबवर हा कार्यक्रम पाहिला होता. संगीत-नृत्य-गायन यांचा अप्रतिम मिलाफ (त्यातले फारसे काही कळत नसतानाही) आवडला. आपल्या सर्वांचे अभिनंदन.

अवांतर: अदितीताई तात्यांची ओळख करून देत असताना "त्यांना संस्कृताची फारशी जाण नसतानाही...." असे काहीसे म्हणून गेल्यावर तात्यांच्या चेहर्‍यावर दिसणारी मिश्किल स्मितरेषा पाहण्यास विसरू नये. ;-)

छान!

कालच आपल्यामुळे या कार्य्क्रमाचा एक भाग पाहू शकलो आज अजून पहायला आणी नवीन माहीती वाचयाला आवडले. "संस्कृत येत नसून पण .." हे वाक्य ऐकताना "साउंड ऑफ म्युझिक" मधे जेंव्हा "मारीया" मुलांना 'डो, रे, मी ' , शिकवून शेवटी गाण्याच्या चालीतच उपदेश करते तो आठवला: "when you know the notes to sing, you can sing most anything". थोडक्यात आपल्याला "गाण्याच्या नोटस" माहीत आहेत त्याचा उपयोग कालीदासासाठी केलात त्याबद्दल अभिनंदन!

गुरूपौर्णिमेबद्दल एकनाथाप्रमाणे अनेक गूण देणार्‍या जगाला वंदन!

सही तात्या

झकास.

संगीत साधना, लेखन, अभ्यास, आस्वाद, कलासंयोजन, कामकाज, मित्रपरीवार, कोर्टकचेरी अन ऑनलाईन भांडणे. मानले तुम्हाला. (तांब्या, रौशनीसारखे विषयही आपण जाता जाता अगदी सहज हाताळता हे मात्र गंमतीशीर आहे! ;)

बाय द वे 'पितळी तांब्या' हा आयडी सहीच आहे! हा आयडी घेऊन आपण एका सुंदर कार्यक्रमाबद्दल इथे लिहिलेत यावरून कुठल्याही तांब्यापेक्षा वगैरे कला अधिक महत्वाची हेच आपण दाखवून दिले आहे! :)

तांब्या सोन्याचा असला काय किंवा पितळेचा असला काय, कलाकाराचे लहानमोठेपण हे रंगमंचावरच्या तांब्यावर ठरत नाही, तर संबंधित कलाकाराच्या कलेवरच ठरते हेच यातून दिसले! :)

आभार/उत्तरे..

अभिप्राय देणार्‍या सर्व मंडळींचे अनेक आभार..

व्य नि तून आणि खरडवहीतून अभिप्राय देणार्‍यांचेही अनेक आभार..

पुढील भाग लवकरच टाकतो..

मिलिंदा,

अण्णांच्या मैफिलीत त्यांच्या समोरचा पितळी तांब्या म्हणून उपस्थित असायला मला अत्यंत आवडले असते.
त्याबद्दल तुझा हेवा वाटतो.

अरे लेको तो तांब्याचा विषय पुरे करा आता! :) झाली एवढी मस्करी-कुस्करी, उखाळ्यापाखाळ्या पुरे झाल्या! :)

बाय द वे मिलिंदा, अण्णांच्या मैफलीत समोरचा तांब्या म्हणून बसलो नसलो तरी नेहरू सेंटर येथील एका कार्यक्रमात त्यांच्या मागे तानपुर्‍याच्या साथीला मात्र एकदा बसलो होतो हे माझं भाग्य! फोटू काढलेला आहे हो, दाखवीन तुला एकदा! :)

विकास,

"when you know the notes to sing, you can sing most anything".

Yes, Music is the universal language! :)

सहजराव,

संगीत साधना, लेखन, अभ्यास, आस्वाद, कलासंयोजन, कामकाज, मित्रपरीवार, कोर्टकचेरी अन ऑनलाईन भांडणे. मानले तुम्हाला.

हो पण भांडणांची मजा काही औरच! :)

असो, सर्व रसिक सभासदांचे पुनश्च एकदा आभार..

तात्या.

अतिशय सुरेख!

तात्या,

कार्यक्रम अतिशय सुरेख झालेला दिसतो आहे. श्लोकाची चाल, गायन, आणि अर्थानुरुप नृत्याभिनय या सगळ्या गोष्टी छान जमून आलेल्या आहेत. माझी ८० वर्षांची नथुआजी ठाण्यालाच असते. तिचाही मेघदूताचा बराच अभ्यास आहे बरं का तात्या! मला सांगायला आनंद वाटतो की राहूलचा आधार घेत तीदेखील या कार्यक्रमाला आली होती आणि कार्यक्रम पाहून तिला अतिशय आनंद झाला. तिला वयाच्या मानाने दिसतं कमी पण ऐकू मात्र अजून चांगलं येतं.

तुम्हाला एक विनंती आहे. राहूलच्या बरोबर तुम्ही तिला एकदा भेटायला गेलात तर तिला खूप बरं वाटेल.

पुढच्या श्लोकांची आतुरतेने वाट पाहात आहे.

उपक्रमावर हा लेख आला आहे असं मला राहूलने सांगितलं म्हणून मुद्दामून आज बर्‍याच दिवसानी इथे ऑनलाईन आले. हल्ली वेळच मिळत नाही. एकदा दादरला तुम्ही 'श्रीरामचंद्र कृपालु भज मन' या गाण्याविषयी सप्रयोग बोलला होतात. ते दोघातिघांनी व्हिडियो शुट केल्याचं आठवतंय. तेही तुमच्याकडे असल्यास इथे द्या आणि त्याबद्दल लिहा ही विनंती. फारच सुरेख झाला होता तो कार्यक्रम!

तात्या, हे तुमचं 'तांब्या' प्रकरण बाकी गाजणार असं दिसतंय -:)

असो, उगाच वादविवादात आणि भांडणात तुम्ही लक्ष देऊ नये व तुमची सर्जनशीलता फुकट घालवू नये ही कळकळीची विनंती! तुमच्या ब्लॉगवर "स्मशानातल्या बेडखळ्यांचं" व्यक्तिचित्र वाचलं आणि अक्षरशः सुन्न व्हायला झालं! पण ते आता तिथे दिसत का नाही?

-- ईश्वरी.

आता इथे उपप्रतिसाद देता येतो आहे पण यनावालांच्या एका कोड्याला मला प्रतिसाद द्यायचा आहे तो आता देता येत नाही. उपप्रतिसादही देता येत नाही. प्रशासनाने या तांत्रिक अडचणीकडे लक्ष पुरवावे ही विनंती!

-- ईश्वरी.

असेच

म्हणतो तात्या तुम्ही कित्ती कित्ती ग्रेट आहात हो. मल तर काय लिहव तेच सुचत नाहिए

बाष्कळबुवा,

तात्या तुम्ही कित्ती कित्ती ग्रेट आहात हो.

असं म्हणता? बरं ठीक आहे... :)

मल तर काय लिहव तेच सुचत नाहिए

अहो मग नसतं लिहिलंत तरी चाललं असतं हो! :)

असो, तरीही 'तात्या तुम्ही कित्ती कित्ती ग्रेट आहात हो' हे लिहिल्याबद्दल तुमचे अनेक आभार...

'तात्या तुम्ही कित्ती कित्ती ग्रेट आहात हो' हा टोमणा बाकी छान वाटला! :)

आपला,
(ग्रेट!) तात्या.

स्मशानातले बेडखळे..

तुमच्या ब्लॉगवर "स्मशानातल्या बेडखळ्यांचं" व्यक्तिचित्र वाचलं आणि अक्षरशः सुन्न व्हायला झालं! पण ते आता तिथे दिसत का नाही?

माझ्या ब्लॉगवर बेडखळ्यांचं व्यक्तिचित्र वाचल्याबद्दल धन्यवाद, परंतु ते लिहून झाल्यावर अद्याप ते माझ्या मनासारखं उतरलं नाही असं मला वाटलं म्हणून मी ते सध्या काढून टाकलं आहे. बघुया, त्यात मला अपेक्षित असे काही फेरफार जर मी करू शकलो तर पुन्हा प्रकाशित करीन..

आपला,
('व्यक्तिचित्र' या साहित्यप्रकाराचा एक विद्यार्थी) तात्या.

स्वतंत्र प्रतिसाद

देता येत आहेत की नाही ते तपासतोय.

येतोय बहुतेक.

वा वा

वा वा..तात्या कमालच आहे तुमची. मानले तुम्हाला !
तुम्ही इतरांचे केलेले कौतूक आणि इतरांनी केलेले तुमचे कौतूक सार्थच आहे.

पुढचे भाग पाहण्यास उत्सुक आहे.
--(ढगोबा) लिखाळ.

त्यांनी दारुचा अर्धा पेला रिचवून भैरवी गायली आणि श्रोत्यांनी उरलेल्या अर्ध्या पेल्यावर चर्चा केली.

क्या बात है...

लिखाळराव, अभिप्रायाबद्दल धन्यवाद..

त्यांनी दारुचा अर्धा पेला रिचवून भैरवी गायली आणि श्रोत्यांनी उरलेल्या अर्ध्या पेल्यावर चर्चा केली.

क्या बात है, क्या बात है! अतिशय मार्मिक वाक्य!

लिखाळराव वरील वाक्याबद्दल मी तुम्हाला मनापासून दाद देतो. गाणारा अतिशय सुंदर गाऊन जातो आणि आपल्या चर्चेकरता उरतो तो मात्र फक्त दारुचा रिकामा ग्लास! आणि आपण त्यावरच अगदी भरभरून आणि तावातावाने चर्चा करण्यात धन्यता मानतो!

काही मंडळी फक्त तेवढा ग्लास अथवा तांब्याच डोळ्यात साठवून मैफलीहून परततात, आणि काही मंडळी गाणं ऐकून, तृप्त होऊन परततात!

चालायचंच! दोघंही आपापल्या जागी बरोबर! :)

आपला,
(मदिराप्रेमी!) तात्या.

गीतमेघदूत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
संगीतातील रागांविषयी मी अनभिज्ञ आहे.
...श्री.तात्या यांची समर्पक चाल आणि सुरेल संगीत,वरदा गोडबोले यांचे स्पष्ट आणि शुद्ध संस्कृत शब्दोच्चार तसेच कर्णमधुर आवाज यांमुळे श्लोकाचे गायन सुश्राव्य झाले आहे.
.....नीलिमा कढे यांचा नृत्याविष्कार प्रेक्षणीय आहे. नृत्यातील पदन्यास आणि मुद्रासंकेतांचे अर्थ यांचे मला ज्ञान नाही.पण:
**मूठ मिटून अंगठा वर म्हणजे...स्वाधिकारात्प्रमत्तः |,
**केशकलापातून पाणी झटकल्याचा अभिनय म्हणजे...जनकतनयास्नानपुण्योदक |,
**हात आणि शरीर डोलवत वर पाहाणे म्हणजे... स्निग्धच्छायातरु |
इ.गोष्टी ढोबळ मानाने समजल्या. आता "वप्रक्रीडापरिणतगज " कसा दाखवतात याविषयी उत्सुकता आहे.
एकंदरीत तात्या आणि अन्य कलावंत यांनी मेघदूतातील पहिल्या श्लोकाला योग्य न्याय दिला असे माझे मत आहे.
(श्री.तात्या यांच्या विषयीचा व्यक्तिगत अभिप्राय त्यांच्या खरडवहीत)

धन्यवाद वालावलकरशेठ,

इ.गोष्टी ढोबळ मानाने समजल्या. आता "वप्रक्रीडापरिणतगज " कसा दाखवतात याविषयी उत्सुकता आहे.
एकंदरीत तात्या आणि अन्य कलावंत यांनी मेघदूतातील पहिल्या श्लोकाला योग्य न्याय दिला असे माझे मत आहे.

धन्यवाद वालावलकरशेठ!

(श्री.तात्या यांच्या विषयीचा व्यक्तिगत अभिप्राय त्यांच्या खरडवहीत)

वालावलकरशेठ, आमच्याविषयी आमच्या एका चाहत्याचा (की चाहतीचा?) अजून एक व्यक्तिगत अभिप्राय आपल्याला अगदी विस्तृतपणे येथे वाचावयास मिळेल! :) या ब्लॉगवर अन्य कोणतेही लेख नाहीत! खास फक्त आमचं कोडकौतुक (!) करण्याकरता हा ब्लॉग उघडण्यात आला आहे हे विशेषच नाही का? :)

-- तात्या.

नजाकत अली खॉ आणि कयामत अलि खॉ

नजाकत अली खॉ आणि कयामत अलि खॉ हे दोघे जुळे बंधू. अगदी एकाला झाकावे व दुसर्‍याला काढावे.दोघांची संगितातील जुगल बंदी म्हणजे आमच्या सारख्या(अज्ञ) लोकांना सुद्धा मेजवानीच. सुप्रसिद्ध डागर बंधू हे तज्ञ संगीतप्रेमी लोकांना माहित असतील. पण आम्हाला काय त्याचे? (कारण डागर बंधू हे संगीताशी संबंधीत आहेत एवढेच आमचे ज्ञान.) पण हे नजाकत अली खॉ आणि कयामत अलि खॉ मात्र एकदम फेमस अप्रसिद्ध ,एकाचे विलंबित बोल तर दुसर्‍याचे प्रलंबित बोल. एकाचा ख्याल तर दुसर्‍याचा खयाल. एकाचा ताल तर दुसर्‍याचा टाळ. एकाचा लोटा तर दुसर्‍याचा घोटा. हे सगळे काही मला पचनी पडेना. मग मी आमच्या तज्ञ (अल्पज्ञ) मित्राला विचारले कि हा काय प्रकार आहे? मग त्याने सांगितले कि यातील एक "किराणा" घराण्यातील आहे तर दुसरे "भुसार" घराण्यातील आहे. पण महेफिलित कोण कुठल्या घराण्याचा हे कुणालाच सांगता येत नाही. हा वाद जुना आहे . तू त्यात पडू नकोस. तेव्हापासून मला संगीतप्रेमी तज्ञांबद्द्ल असूया युक्त भीती , आणि भीतीयुक्त आदर वाटत आहे.

(प्रतिसादाच्या भीतीने थरथरणारा)
प्रकाश घाटपांडे

 
^ वर