दारू...एक दृष्टांत

उपक्रमात सध्या दारूपायी भांडणे होत आहेत.. सध्याचे एक ताजे वाक्य होते:

शेवटी दारू आणि व्यसन वाईटच.

त्यावरून एक पाहीलेली घटना आठवली, ती वरील वाक्याला केवळ प्रतिसाद म्हणून न देता चर्चेच्या रूपाने सुरू करतो. आपल्याला काय वाटते ते जरूर लिहा!

बॉस्टनमधील एका विश्व विद्यालयात एक भारतीय मुलांचा सांस्कृतीक कार्यक्रम चालू होता (दोन दिवसांचे संमेलनच होते). त्यातील एका उपकार्यक्रमाला एक स्वामीजी आले होते. नाव असेच काहीतरी *आनंद होते (मला वटते सर्वगतानंद अथवा तदात्मानंद पण १५ वर्षांपुर्वीची घटना असल्याने नी टसे आठवत नाही, आणि चुकीचे नाव सांगायला नको म्हणून लिहीत नाही).तर् ते असो.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रश्नोत्तरच्या वेळात एका अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या वीस-एक वर्षाच्या तरूणाने (थोडासा खोचकपणानेच) स्वामिजींना प्रश्न विचारला, "स्वामीजी , दारू पिणे चांगले की वाईट?"

असे वाटले, आता स्वामिजी बिचारे काय म्हणणार? ते तर दारू पित नाहीत... पण स्वामिजींनी शांतपणे अशा अर्थाचे उत्तर दिले, "दारू पिणे चांगले का वाईट हा प्रश्न नाही , चांगले काय नाही तर"कशाचीही नशा चढणे" (something on this line, "it's not the issue if conuming alcohol is good or bad, what is bad is intoxication") . माणसाला (मुख्यत्वे मनुष्य स्वभावाला आणि त्यामुळे इतरांना) मारक काय असते तर ते "कशाचीही नशा चढणे".

पुढचे पारायण माझे:-)

तात्पर्यः कुठलेही काम अथवा क्रिया करताना माणसाने ते मन लावून करावे (वी) पण त्याचा दुरूपयोग न होता उचीत उपयोग होण्यासाठी आणि स्वतःस त्याचा त्रास होऊ न देता "आत्मोद्धारासाठी" म्हणून त्या कार्याची "नशा चढणार नाही "याची काळजी घ्यावी.

चांगली गोष्ट करताना पण अशी नशा चढते आणि माणसं, सात्वीक असला तरी अहंकारापोटी स्वतःच्या कार्यपद्धती आणि कार्याबद्दल अतिरेकी होयला लागतात आणि त्यामुळे चांगल्या कार्याचा नाश तरी होतो अथवा चुकीची फळे मिळू लागतात. इतिहासाची पाने चाळली तर महाभारतापासून ते अर्वाचीन भारतापर्यंत (आणि अर्थातच जगात इतरत्रही) अशी बरीच महान व्यक्तिमत्वे दिसतील ज्यांना असे स्वतःच्या कार्याच्या नशेने पछाडले आणि परीणामी चुकीची फळे त्यांना आणि इतरांना भोगावी लागली. पण तो आत्ता (जुन्या कुरापती काढायचा हा) विषय नाही ...

असे थोरांचे होते तर तुम्ही आम्ही कोण लागून गेलो!

Comments

दारू वाईटच!

वा छानच आहे दृष्टांत! आवडला.
आपले कोणत्याही कार्याची नशा यावरचे विवेचनही आवडले.
एकुणच आपले लेखन गुंडोपंताना आवडते आहे! अजून येवू देत!

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

दारुची आणि कशाचीही

कशाचीही नशा वाईटच.आपले मुद्दे पटले.
पण 'इतर कशाचीही' आणि 'दारु, ग्रास,सिगारेट , विडी, तंबाखू, गांजा, एल् एस् डी, कोकेन इ.' या दोन नशाप्रकारात मोठा फरक दुसर्‍या प्रकाराने होणारे गंभीर शारीरीक परीणाम हा आहे त्यामुळे त्यातल्या त्यात निवडीत पहिल्या प्रकारच्या नशेचे पारडे जड असावे असे वाटते.

खुलासा

....त्यामुळे त्यातल्या त्यात निवडीत पहिल्या प्रकारच्या नशेचे पारडे जड असावे असे वाटते.

मी हे लिहीत असताना कुठल्याही नशेचे अजिबातच समर्थन करत नव्हतो अथवा दारू (किंवा तत्सम इतर उत्तेजके/अंमली पदार्थ) यांना आणि इतर गोष्टींना (विशेष करून चांगल्या कार्याला) समान मानत नव्हतो.

कदाची त काही म्हणतच असलो तर ते इतकेच की ज्याला/जीला ज्याची नशा चढते त्याला/तीला त्या नशेचा कालांतराने त्रास होऊ शकतो. दारू पिऊन पण इतरांना खच्ची करणारे असतात आणि न पिऊन पण स्वतः खच्ची होणारे असतात. दोन्हीचे कारण / मूळ अखेर मानसीकतेत आणि स्वत:ला कोण कसे त्यामुळे "intoxicate" करून घेत आहे यात आहेत, इतकेच.

धन्यवाद

दारु

तात्पर्यः कुठलेही काम अथवा क्रिया करताना माणसाने ते मन लावून करावे (वी) पण त्याचा दुरूपयोग न होता उचीत उपयोग होण्यासाठी आणि स्वतःस त्याचा त्रास होऊ न देता "आत्मोद्धारासाठी" म्हणून त्या कार्याची "नशा चढणार नाही "याची काळजी घ्यावी.

भेदक वाक्य आहे हे... दिवसभराच्या कमाईचे स्वतःचे आणि बायकोचेही सगळे पैसे हिसकावून घेवून ते हातभट्टीच्या बाटलीमध्ये बुडवून अखंड गालिप्रदान सोहळा साजरा करणार्‍यांच्या नशेची तुलना ही कामाच्या नशेशी होत आहे हे पाहून प्रसन्न वाटले.

यावरुन आठवले या सदरातः
प्रश्नः माणूस व डुक्कर यात फरक काय आहे?
उत्तरः दारु प्यायलेले डुक्कर माणसासारखे वागत नाही.
(ह.घ्या. )

पटले!

दारु प्यायलेले डुक्कर माणसासारखे वागत नाही.

उत्तर एकदम पटले! बाकी आपल्या प्रतिसादासंदर्भात माझी भुमीका थोडी अजून स्पष्ट करयला मी त्याच्या वरच खुलासा प्रतिसाद "अनू' यांना केला आहे.

धन्यवाद

दारुला विरोध करण्याची नशा

गांधीजींच्या बाबतीत असे म्हणतात की त्यांच्या गरीबीच्या साध्या गरजा पूर्ण करणे (शेळीचे दूध, फळे, खजूर वगैरे) बरेच महागडे होते. सुनीता देशपांडे यांनी शंकरराव देव आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खर्चिक साधेपणाचे असेच किस्से लिहिले आहेत. दारुची नशा वाईट की दारुला विरोध करण्याची नशा वाईट हे सांगणे अवघड होईल. एकंदरीत नशा वाईट यावर बाकी एकमत व्हावे!
सन्जोप राव

सहमत

कोणत्याही गोष्टीला विरोध केल्याने किंवा त्यावर बंदी आणल्याने ती गोष्ट नष्ट होत नाही. दारुच्या अतिप्राशनाचे होणारे दुष्परिणाम, शरीरस्वास्थ्याची होणारी हेळसांड, दारुमुळे कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्यातील वाढणारे ताणतणाव याविषयी अवेअरनेस वाढीस लागल्यावर तिचे प्राशन मर्यादित व आनंदी राहील असे वाटते.

यावरुन,
प्रेम, स्फूर्ती, खोकला व बीअर या गोष्टी दाबून ठेवता येत नाहीत. जितका विरोध करु तितक्या उफाळून वर येतात असा हॉस्टेलमधील तुळईवर लिहिलेला कुविचार आठवला

तेव्हढच म्हणायचे होते...

एकंदरीत नशा वाईट यावर बाकी एकमत व्हावे!

मला एव्ह्ढेच ही चर्चा चालू करताना म्हणायचे होते. पण विषय अपेक्षेप्रमाणे सोयीस्कररीत्या नशे पेक्षा दारूकडेच जास्त वळला!

बाकी गांधीजी, सुनीताबाई, शंकरराव देव अथवा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वर उल्लेखलेल्या व्यक्तिगत सवयींनी त्यांना अथवा इतरांना त्रास दिला असेल असे वाटत नाही. "गांधी" चित्रपटाला भारतसरकारची काही लाख डॉलर्स (का असेच काहीतरी) आर्थिक मदत होती. त्यावेळे आर्. के. लक्ष्मणचे व्यंगचित्र पाहील्याचे आठवते: त्यात तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी रिचर्ड ऍटनबरोला म्हणत असतात (आणि बिचारा कॉमन मॅन डोकावून ऐकत असतो), "अजून काही लाख डॉलर्स खर्च करावे लागले तरी चालतील पण गांधीजींचा साधे पणा नीट दिसला पाहीजे."

त्याच पद्धतीचे अजून एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे औंध संस्थानाचे राजे पंत प्रतिनिधी यांचे सूर्य नमस्काराचे वेड. त्यावर "साष्टांग नमस्कार" हे अत्र्यांनी नाटक रचले होते आणि ते पाहताना पंतप्रतिनिधी खो खो हसले होते.

यावरुन आठवले

पुण्यातील चतु:श्रुंगी टेकडीवर आमचे ( पोलिस बिनतारी विभागाचे) एक् पुनर्प्रक्षेपण केंद्र आहे. तेथे काही वर्षांपुर्वी ची घटना. १९८६)पत्र्याच्या टपरीत आमचे स्टेशन, तेथे एक अतिरिक्त पिल्लू कुत्रा आश्रयास आला. ( विकि नावाचा एक होताच्) त्याला आम्ही शिध्यातील एक ब्रेड चा तुकडा दारुत बुडवून दिला. तो खाईना. मग बळजबरी करुन त्याला खायला घातला. नंतर नंतर तो खाउ लागला. पुढे पुढे तर तो साधा तुकडा टाकला तर खाईना . दारुत बुडवून टाकला तरच खायला लागला. मोकळ्या हवेत मस्त भेलकांडत जाउ लागला.
प्रकाश घाटपांडे ( आता स्वे,नि.)

आधार

असे थोरांचे होते तर तुम्ही आम्ही कोण लागून गेलो!

हाच आधार बर्‍याच दारुड्यांना ( स्वारी सोशल ड्रिंकर्स ना) दिलासा देतो. पुढे समर्थनासाठी युक्तिवाद ठरतो.
प्रकाश घाटपांडे

अगदी

खरे आहे. लोकमान्य टिळक सुपारी खात होते तेव्हा अडकित्त्यांचा धंदा जोरदार होत होता म्हणे.

चांगुलपणा

Too Good is Too bad अति चांगुलपणा देखिल वाईटच. उपयुक्तता मूल्य जसे आवश्यक आहे तसे प्रसंगी उपद्रवमूल्य देखिल आवश्यक आहे. दारु पिल्यावर माणूस नकळत खरे बोलतो असे म्हणतात, नार्को ऍनालिसिस याच तत्वावर आधारले आहे.
प्रकाश घाटपांडे

अनर्थ

दारु पिल्यावर माणूस नकळत खरे बोलतो असे म्हणतात

ध चा मा करण्यात आपले लोक प्रवीण आहेत.
नेहमी खरे बोलावे चा अर्थ नेहमी दारु प्यावी असा काढतील.

लुफ्त..

आमचं उर्दू तसं बेताचंच आहे, पण एक शेर आठवतो..

'लुफ्त मै क्या कहू तुझसे जाहिद,
हाय कंबख्त तुने पीही नही!'

आमचं मत विचाराल तर प्रमाणात प्यायली, केवळ् एक गंमत, मजा म्हणून प्यायली तर दारू, तंबाखू वाईट नाही. अट फक्त एकच की आपला दारूवर कंट्रोल हवा, दारुचा आपल्यावर नव्हे! :)

ज्याला हे जमत नसेल त्याने तिच्या वाटेला जाऊ नये!

पण एखाद दोन पेग पिऊन यमन किंवा पुरिया गायला जी मजा येते तशी मजा न पिता मात्र येत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे!

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्यसनापायी कुणाची लुबाडणूक, फसवणूक होता कामा नये. दारु पिऊन बायको-मुलांना मारझोड करणे, त्यांच्या आयुष्याची माती करणे हा माझ्या मते अक्षम्य गुन्हा आहे!

असो,

आपला,
(चिमुटभर सातारी तंबाखूचा आणि छानश्या विदेशी मद्याच्या दोन पेगस् चा प्रेमी!) तात्या.

हे मान्य!

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्यसनापायी कुणाची लुबाडणूक, फसवणूक होता कामा नये.
मान्य!
शिवाय दुसर्‍याला त्रासही होता कामा नये!
(किंवा ज्याला त्रास होत असेल, त्याला सामील करुन घेता यावे ;) )
आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायला नको?)

मान्य...

दारूवर कंट्रोल हवा, दारुचा आपल्यावर नव्हे!

प्रत्येक व्यसनी माणसाचा आपला व्यसनावर पूर्ण ताबा आहे असा दावा असतो. आपण काय पाहिजे तेव्हा दारु/सिगरेट/तंबाखू/वगैरे सोडू असा त्याचा ठाम विश्वास असतो. व्यसनी माणसाला तो व्यसनी आहे हे पटवून देणे हेच सर्वात अवघड काम असते.

खरंय रे!

व्यसनी माणसाला तो व्यसनी आहे हे पटवून देणे हेच सर्वात अवघड काम असते.

अगदी सत्य आहे. बरेचदा हे कळल्यावर खूप उशीर झालेला असतो.
कृपया ए ए ए चे तत्वे येथे देवू शकतोस का? किवा तत्वे नि तुझ्या मुक्तांगणाच्या अनुभवावरही एक वेगळा लेख लिहिलास तरी चालेल!
(म्हणजे तू 'पाहिलेले अनुभव' रे बाबा... हाणायचास मला धरून! ;) )

गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

एक विचार..

असाही एक विचार काही वेळेला मनात येतो की दारू वगैरे पिणार्‍या माणसाने लग्नकार्य वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नये. उगाच बायको-मुलांना नस्ता मन्स्ताप का द्या?

आपला,
(मागे कोणतेही पाश नसलेला एकटा जीव सदाशिव!) तात्या.

एक झकास ओळ.

संसारा उद्ध्वस्त करी दारु....
मित्रहो संसार नका करु..

- आजानुकर्ण

अगदी बरोबर..

संसारा उद्ध्वस्त करी दारु....
मित्रहो संसार नका करु..

अगदी बरोब्बर बोललात बघा कर्णराव. आम्ही हेच ब्रीद पाळले आहे! :)

आपला,
(कुणालाही उत्तरदायी नसलेला!) तात्या.

बाय द वे, एकदा केव्हातरी बसुयात!

गायला हो!!! :)

तुम्हाला आमच्या किराण्याच्या शुद्धकल्याणची एखादी लहानशी सफर घडवतो! :)

'हो तुम बीन कौन खबरिया ले मोरी' मधल्या आमच्या अण्णांच्या काही खास जागा ऐकवतो. बघा तरी ऐकून कसं वाटतंय ते..

आपला,
तात्याभैय्या देवासकर, इंदौर! :)

आपल्या सुचनेची दखल...

घेऊन माझा प्रतिसाद मी काढून टाकत आहे. तसदीबद्दल क्षमस्व!
संपादकीय पुस्ती: परस्परांना किंवा इतर सदस्यांना उद्देशून व्यक्तिगत स्वरूपाच्या गप्पागोष्टी प्रतिसादातून करू नयेत. प्रतिसाद सार्वजनिक स्वरूपाचे राहतील याची कृपया सर्वांनी काळजी घ्यावी.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

मस्त

पण एखाद दोन पेग पिऊन यमन किंवा पुरिया गायला जी मजा येते तशी मजा न पिता मात्र येत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव आहे!

तात्या, हे एकदम झ्याक.

आमचं मत विचाराल तर प्रमाणात प्यायली, केवळ् एक गंमत, मजा म्हणून प्यायली तर दारू, तंबाखू वाईट नाही. अट फक्त एकच की आपला दारूवर कंट्रोल हवा, दारुचा आपल्यावर नव्हे!

हे मस्त

उर्दू

आपण केलेला शेर मध्ये थोडी सुधारणा सुचवण्याची हिंमत (उर्दू मध्ये जुर्रत !!) करतीये -
'लुत्फ-ए-मय तुझसे क्या कहूं जाहिद,
हाय कंबख्त तुने पीही नही!'

लुत्फ - आनंद
ए - चा
मय - दारू
जाहिद - धर्मगुरू (किंवा तत्सम काहितरी)

यावरून अजून एक शेर आठवला - "दर्दी" लोकांना वापरता येइल कुठेतरी

जाहिद शराब पिने दे मस्जिद में बैठके
वर्ना ऐसी जगह बता जहांपर खुदा न हो

------------ आदाब अर्ज है ----------------

धन्यवाद आवडाबाई..

आपण केलेला शेर मध्ये थोडी सुधारणा सुचवण्याची हिंमत (उर्दू मध्ये जुर्रत !!) करतीये -

जरूर! :)

'लुत्फ-ए-मय तुझसे क्या कहूं जाहिद,
हाय कंबख्त तुने पीही नही!'

धन्यवाद आवडाबाई. मला हा शेर नीटसा ठाऊक नव्हता. तू तो इथे दिल्याबद्दल तुझे आभार..

यावरून अजून एक शेर आठवला - "दर्दी" लोकांना वापरता येइल कुठेतरी

जाहिद शराब पिने दे मस्जिद में बैठके
वर्ना ऐसी जगह बता जहांपर खुदा न हो

क्या बात है! आदाब आवडाबाई..

तुझा फ्यॅन,
तात्या.

सहमत

आपण तात्यांशी सहमत. मजा म्हणून प्यायली तर दारू हे खर आहे.
आपला(निर्व्यसनी)
कॉ.विकि

जायफळ

व्यसनमुक्ति केंद्रात व्यसनी माणसाला आणल्या नंतर त्याला तल्लफ आल्यावर काहीच न मिळण्याची व्यवस्था असते. त्यातून दिखील एकाने मार्ग काढला तो म्हणजे कॉफी साठी आणलेली जायफळे लंपास करायचा. जेव्हा चहा कॉफी च्या हिशोबात वाढ झाली तेव्हा हे प्रकरण उघडकीला आले.

प्रकाश घाटपांडे

क्रिएटीव्ह्टी

कॉफी साठी आणलेली जायफळे लंपास करायचा.
माणूस गरजेमुळे जास्त क्रिएटीव्ह बनतो नाही का!

असे अनुभव आपण येथे जरूर लिहावेत अशी आग्रहाची विनंती मी आकर्णा प्रमाणे आपल्यालाही करतो आहे.

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर म्हणजे गुंडोपंतावरून उचलेले पात्र?!!!! मग असे करण्या आधी गुंड्याला सांगायलाहे नको?)

प्रतिष्ठा

"पुर्वी दारु पिणार्‍या माणसाला तो कर्तृत्ववान असला तरी समाजात प्रतिष्ठा नसे . आता त्याच्या दारु पिण्यालाही प्रतिष्ठा व ग्लॅमर मिळाले आहे. वास्तू शास्त्राचेही असेच झाले आहे..........."
(ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... पुस्तकातील फेंग शुई! वास्तुशास्त्राला चिनी चॅलेंज या प्रकरणातून उद्धृत)
[अवांतर- वाजवलीच का टिमकी? काहींच्या मनातील विचार ओळ्खणारा ]
प्रकाश घाटपांडे

दारुच्या दुष्परिणामांबद्दलची मिळालेली माहिती

मद्यपानाच्या दुष्परिणामांबद्दल मुक्तांगण संस्थेतून व इतर ठिकाणी मिळालेली माहिती खाली देत आहे.

१. मद्यपानामुळे केवळ मद्यपीच नव्हे तर समाजातील इतरांना धोका उत्पन्न होऊ शकतो. मद्यपान करुन वाहने चालवणे, मद्यपानानंतर तोल सुटलेल्या अवस्थेत मारहाण करणे, गोंधळ घालणे, हिंसात्मक वर्तन होऊ शकते.
व्यावसायिक:
अ. कार्यालयामध्ये अनुपस्थिती: निर्व्यसनी माणसापेक्षा मद्यपी हे आजारपणाच्या रजा घेण्याची शक्यता जास्त असते.
ब. कामाच्या ठिकाणी अपघातः मद्यपी काम करत असलेल्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता २५ टक्क्याहून अधिक. त्यापैकी ६० टक्के अपघात हे प्राणघातक.
क. कार्यक्षमता: मद्यपींच्या कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. सहकार्‍यांबरोबरचे त्यांचे वर्तन हे मित्रत्त्वाचे राहत नाही. आपल्यासोबत "बसणार्‍या" मित्रांच्या संगतीत रमण्याकडे कल उत्पन्न होतो.
कौटुंबिकः
अ. मद्यपींची आपल्या जोडीदाराशी, कुटुंबीयांशी आणि मुलाबाळांशी असलेली वर्तणूक ही अतिशय वाईट असते.
ब. गर्भवती स्त्रीने मद्यपान केल्यास http://en.wikipedia.org/wiki/FASD हा रोग नवजात अर्भकाला होण्याची शक्यता असते.
क. बालकाच्या व कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये भीती, उदासीनता, नैराश्य यासारख्या भावना वाढीस लागतात.
ड. घराबाहेर दारु पिण्याची सवय असल्यास कुटुंबीयांना पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही.

अशा प्रकारे मद्यपींच्या आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

याविषयी अधिक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीपत्रकांमध्ये मिळेल.
दुवा १.

दुवा २.

दुवा ३.

प्रतिसाद

कुठल्याही लेखात नुसता दारू हा शब्द दिसला की उपक्रमींचे झिंगलेले प्रतिसाद सुरू होतात. एखाद्या टीटोटलरलासुद्धा हे प्रतिसाद वाचून झिंगायला होईल. --वाचक्‍नवी

हा हा हा हा ))))))

कुठल्याही लेखात नुसता दारू हा शब्द दिसला की उपक्रमींचे झिंगलेले प्रतिसाद सुरू होतात. एखाद्या टीटोटलरलासुद्धा हे प्रतिसाद वाचून झिंगायला होईल.

हासुन राह्यलो,झोपुन्,आडं पडुन,लोळुन,या इनोदाला सा-या अंगानी हासुन राह्यलो.

तुहा

झिंगायला लागलेला.

निरीक्षण

कुठल्याही लेखात नुसता दारू हा शब्द दिसला की उपक्रमींचे झिंगलेले प्रतिसाद सुरू होतात

हे तुमचे निरीक्षण अगदी योग्य आहे. दारू पिणे ही एक 'कूल' प्रकारात मोडणारी गोष्ट झाली असल्याने संधी मिळेल तिथे "आम्ही दारू पितो बुवा" म्हणणे प्रतिष्ठेचे झाले असावे. मानसशास्त्राचा अभ्यास असणारे अधिक माहिती देऊ शकतील.

आपला
(निरीक्षक) वासुदेव

यावरून आठवले - "आम्ही दारू पितो बुवा" हे "माझे खाद्यजीवन" मधील "आम्ही नॉनव्हेज खातो बुवा" असे म्हणण्यासारखेच वाटते. ज्यांनी हे वाचले असेल त्यांना मतितार्थ कळेलच. (हे गमतीने लिहिले आहे. कृपया गैरसमज नकोत.)

आपला
(असंबद्ध) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

:)

किंबहुना "आम्ही तसलं काही खात नाही"च्याच गर्भातून (कदाचित 'उतारा' म्हणून???) "

हा हा हा! टग्याराव, आपला उतारा आवडला...

आपला,
(उतरंडीला लागलेला) तात्या.

एक कथा..

दारूच्या संदर्भात आमच्या रावसाहेबांनी सांगितलेली एक कथा आठवते.

एक अत्यंत भला मनुष्य असतो. अगदी निर्व्यसनी, कधीही तंबाखुला, दारुला स्पर्श न केलेला. त्याची तब्येतदेखील अगदी उत्तम असते. त्याचे सर्व नातेवाईक, मित्रमंडळी मिळून त्याच्या घरी जमून त्याची साठी साजरी करत असतात. मोठा दिमाखदार सोहळा सुरू असतो. सरतेशेवटी त्याला त्याच्या ६० वर्षांच्या निकोप व उतम तब्येतीचं गुपित विचारण्यात येतं.

उत्तरादाखल तो भाषण करण्याकरता उभा राहतो आणि बोलू लागतो.

"मंडळी, मी कधीही तंबाखू खाल्ला नाही, दारू प्यायलो नाही, हेच माझ्या उत्तम तब्येतीचं गुपित आहे."

तेवढ्यात बाजुच्या खोलीतून जोरजोरात आरडाओरड आणि बोंबाबोंब ऐकू येते. अत्यंत स्पष्ट आणि कानठळ्या बसणारं ओरडणं वगैरे ऐकू येऊ लागतं. त्यामुळे सगळी लोकं चपापतात आणि गोंधळतात.

हे पाहून तो मनुष्य हसून म्हणतो, "अहो विशेष काही नाही मंडळी. माझे नव्वद वर्षांचे वडील बाजुच्या खोलीत दारू पिऊन तमाशा करताहेत. हे त्यांचे नित्याचेच आहे! आपण काळजी करू नका..

"हां तर काय सांगत होतो मी? हां, तर माझ्या सुंदर तब्येतीचं गुपित!"

:)

तात्या.

दारु अथवा ईतर मादक पेय

मग शंभरी कोणी पुर्ण केली असावी ?

हाहाहा !
छान विनोद आहे.

माझ्या मते दारु अथवा ईतर मादक पेय पदार्थ ह्याची लत असूच नये, पण गोंधळ तेव्हा होतो जेव्हा एखाध्या पत्रिकेमध्ये अथवा वर्तमान पत्रामध्ये आम्ही असे वाचतो की दारु अथवा ईतर मादक पेय ही शरीराला उपायकारक देखील असतात... ;) मग आमचा पोपट होतो असे... कारण सोमवारी दारु सोडलेली असे व त्या वाचनामुळे शनिवारची रात्र गाजवली जात असे !

पण गेली ३ वर्षे आम्ही ह्या मतावर आलो आहोत की दारु अथवा ईतर मादक पेय हे मानवाने वापरुच नये, प्रयत्न केला की सोडता येते, प्रथम प्रथम मित्रगण / समाज तुमच्या कडे विचित्र नजरेने पाहील ... अरे हा लेकाचा तर बाटल्या संपवायचा व दारु सोडली म्हणतो म्हणे ! नंतर नंतर मदत करु लागतील... व काही काळाने तुमच्या बद्दल आदराची भावना व्यक्त करतील.
कारण रोज रोज सोडली जाते (सकाळी सकाळी डोके दुखले की आज पासुन सोडली..... ;) ती दारु व कायमची सोडली जाते ती दुर्दशा (दारु पिल्यानंतर होणारी) !

साहिल
प्रथम प्रयत्न आहे सांभाळून घ्यावे ही विनंती.

 
^ वर