अमेरिकन संसदेत मंत्रघोष घुमला, पण...

Maharashtra Times

अमेरिकन संसदेत मंत्रघोष घुमला, पण...

[ Friday, July 13, 2007 11:05:01 am]
वॉशिंग्टन

अमेरिकन संसदेचे गुरुवारी सुरु झालेले अधिवेशन भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचे होते. कारण या अधिवेशनाची सुरुवात झाली ती वेदातील पवित्र मंत्रोच्चाराने. अमेरिकन संसदीय इतिहासात अशी मंत्रोच्चाराने अधिवेशनाची सुरुवात होण्याची ही पहिलीच वेळ. पण या ऐतिहासिक घटनेवर काही अमेरिकन ख्रिश्चन संघटनांनी आक्षेप घेतला आणि निषेधही नोंदविला.

Priest with Senate Majority Leader
The Hindu priest with Senate Majority Leader Senator Harry Reid, who facilitated the historic opportunity. Photo: http://specials.rediff.com/news/2007/jul/13slide3.htm

भगवे वस्त्र, रामनामाचे उपवस्त्र, मस्तकावर गंध, गळ्यात रुदामळा अशा भारतीय अध्यात्मिक वेशात रंजन झेद या गुरुजींनी वेदमंत्रांचे पठण करून गुरुवारी अमेरिकन संसदेच्या अधिवेशनाचा आरंभ केला. पण प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या खिश्चन आंदोलकांनी त्याविरोधात घोषणा करत निषेध नोंदविला.

येशू हा एकच परमेश्वर असताना अन्य कोणाची पूजा कशासाठी अशा आशयाच्या घोषणा ते गॅलरीमधून देत होते. पण या घोषणा फार वेळ चालल्या नाहीत. अखेर त्या आंदोलकांना अटक करण्यात आली आणि वेदमंत्राने अधिवेशनाला प्रारंभ झाला.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.

Comments

अशा मंत्रघोषाचे प्रयोजन काय होते?

अमेरिका हा तसा येशुवादीच देश आहे.

भारतीय अध्यात्मानी / विचार प्रवाहानी मोहीनी मात्र नक्कीच घातली आहे.
महेशयोगी आणी गुरुदेव यांनी अमेरीकेत मोठेच काम करून ठेवले आहे.
या शिवाय काहे प्रमाणात वेद (नि त्याचा अर्थही) पश्चिमेत पोहोचवला आहे.
त्यांच्या ट्रांसइंडेंटल ध्यानाची चांगलीच क्रेझ आहे!!!

मात्र अशा मंत्रघोषाचे प्रयोजन संसदेत काय होते हे मला कळले नाही?

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर नि त्यातले 'आमच्याशी असणारे साम्य' पाहुन गुंडोपंत चकित आहेत!!!!)

गुंड्या ही व्यक्ती नाही वृत्ती आहे. निंदकाला फक्त शेजारीच नाही तर अगदी आग्रहाने पेइंग गेस्ट बनवण्याचा बाणा म्हणजे गुंड्या.
प्रत्येक मराठी माणसा

प्रयोजन

अमेरिका हा सर्वधर्मसमभाव मानणारा (निधर्मी नाही) आणि या अर्थाने सेक्यूलर देश आहे. बहुसंख्य लोक ख्रिश्चन जरी असले तरी "राष्ट्र" म्हणून येथे धर्म नाही. जेंव्हा पासून चर्च हा प्रकार चालू झाला (सिझर नंतर/च्या सुमारास) तेंव्हा पासून चर्च ही एक राज्याच्या/राजाच्या वरची आणि कायद्याच्या बाहेरची संस्था झाली. हे अर्थातच जास्त करून व्हॅटीकनला लागू होते. म्हणून ब्रिटीशांनी स्वतःची राजमान्य चर्च संस्था चालू केली ज्याला प्रोटेस्टंट म्हणतात. त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन अमेरिकेने घटनेने मान्य केले की "church is separate than State" but not "god is sparate than State". याचा अर्थ असा की आपल्याहूनही कुठलीतरी मोठी शक्ती विश्वात आहे जीला आपण देव मानतो. प्रत्येकाचे त्याबद्दलचे विचार वेगळे असले तरी.

वरील नमनाला घडाभर तेलाचा अर्थ काय? तर अमेरिकेत प्रार्थनेने बर्‍याच कार्यक्रमांना सुरवात होते. त्यात जसे अमेरीकन् काँग्रेस, सिनेट आले तसेच राज्य आणि स्थानीक पातळीवरील लोकप्रैनिधी सभा पण आल्या. प्रार्थना आणि प्रतिज्ञा (ज्यात पण "one nation under god" असे म्हणले आहे "under one god" असे नाही) या सुरवातीला असतातच. यात ख्रिस्ती धर्माची प्रार्थना जेव्हढी नक्की असते तेव्हढीच ते ज्यू धर्माची पण नक्की करतात. इस्लामचीपण झालेली आहे आणि तशीच बौद्ध धर्माची (थोडक्यात एकेश्वरी रिलीजन्स). या वेळेस प्रथमच अशी हिंदू धर्मियांची प्रार्थना झाली आहे. या आधी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे जेंव्हा काँग्रेस आणि सिनेटच्या संयुक्त सभेसमोर भाषण झाले होते तेंव्हा पण अशी प्रसंगानुरूप म्हणून विशेष सभेपुढे प्रार्थना झाली होती. पण यावेळचे वैशिष्ठ्य असे की सिनेटच्या बहुमतवाल्या पक्षाच्या डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्यास तसे करावेसे वाटले म्हणून त्यांनी ते विरोध होत असूनही घडवून आणले. आणि ती प्रार्थना आपल्या तत्वज्ञानाला साजेशी ही सार्‍या विश्वासाठीची प्रार्थना असल्यामुळे ती इतरांपेक्षा नक्कीच वेगली ठरली आहे.

भारतीय अध्यात्मानी / विचार प्रवाहानी मोहीनी मात्र नक्कीच घातली आहे.

हिंदू धर्माचा (तत्वज्ञान या अर्थाने, रिलीजन या अर्थाने नव्हे)आणि योगसाधनेचा सर्वात पहीला प्रचार हा स्वामी विवेकानंदांनी केला. ती औपचारीक सुरवात झाली तो दिवस होता सप्टेंबर ११, १८९३. त्यानंतरही जेंव्हा अमेरीकेचे दरवाजे भारतीयांना जाणवतील इतके उघडले ते १९६०च्या दशकात. तेंव्हा पण हिंदूंना तितकेसे जवळ केले गेले नव्हते कारण एकेश्वर आणि अनेक इश्वर या तसे मुर्तीपूजा, इत्यादी सामान्यांना सांगीतले गेल्याने आणि चर्च संस्थेने तो फरक जोपासल्यामुळे. त्या काळी "योग साधनेला" चेटूक म्हणजे ब्लॅक मॅजीक असे संबोधीले जायचे. कुंक्ञ् लावलेल्या बायकांवर न्यूजर्सीत ह्ल्ले झाले आहेत. कालांतराने जसे भारतीय वाढत गेले तसे त्यांच्या लक्षात येऊ लागले. आता भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून जेंव्हा समोर येऊ लागले तेंव्हा त्याचा अजूनच सकारात्मक परीणाम घडला आहे.

तात्पर्य : ही सिनेटमधे झालेली प्रार्थना काय सांगते? आज भारत एक् समर्थ राष्ट्र होत आहे ज्यामुळे त्याच्या संस्कृतीला डोळस नजरेने बघण्याची इच्छाशक्ती अमेरिकन मानसात तयार होत आहे.

ऐतिहासिक गुलामगिरी.

भारताच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचे होते.

काहीतरीच काय ?(म.टा.ने तरी अशा ऐतिहासिक बातम्या का द्याव्यात)
भगवे वस्त्र, रामनामाचे उपवस्त्र, मस्तकावर गंध, गळ्यात रुदामळा अशा भारतीय अध्यात्मिक वेशात.
भारतीयांची टिंगल कर-यासाठी वरील अलंकार वापरले जातात.
वेदमंत्राने अधिवेशनाला प्रारंभ झाला.
अशा प्रकारच्या पवित्र मंत्राने त्यांची दादागिरी कमी होणार आहे का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच काही सगळे नाही

भारतीयांची टिंगल कर-यासाठी वरील अलंकार वापरले जातात.

भगव्या वस्त्रे वगैरेच्या बाबतीत दोन विरुद्ध म्हणी भारतीयांना समान लागू होतातः पिकते तिथे विकत नाही आणि अती झाल अनं हसू आलं. पण त्याला मानणारे लोक आहेत आणि त्याचा योग्य अर्थ समजणारे देखील आहेत.

अशा प्रकारच्या पवित्र मंत्राने त्यांची दादागिरी कमी होणार आहे का ?

माझ्या आधीच्या प्रतिसादा मधे म्हणल्याप्रमाणे १८९३ पासून ते २००७ इतका काळ हा हिंदू धर्म आणि पर्यायाने हिंदू धर्मीयांना आपलेसे करण्यात गेला. बरं अजून एक् म्हणजे, जेंव्हा आपण हिंदू धर्मीय म्हणतो तेंव्हा भारतीयच नसतात तर् भारतीय वंशाचे कॅरेबिअन्स पण असतात. असे की ज्यांच्या काही पिढ्यांपुर्वीच्या पूर्वजांना ब्रिटीशांनी फसवून तिथे नेले आणि मजूर म्हणून राबवले. पण त्यांनी जेव्हढी संस्कृती चांगल्या अर्थाने टिकवली आहे तेव्हढी कधी कधी वाटते की आपण पण टिकवत नाही की पाळत नाही.

अमेरीकेची दादागिरी कमी झाली नाही तरी त्यात भारतीयांचे स्थान आणि महत्व वाढणे हे अमेरीकेला आणि भारताला चांगलेच आहे. शेवटी आजचे जग हे खूप जवळ आलेले आणि परस्परावलंबी आहे. त्यात आपले भारत/भारतीय म्हणून स्थान लहान न राहणे हे महत्वाचे आहे. अशी प्रार्थना वगैरे होण हे त्या अर्थाने काही अंशी महत्वाचे/उपयुक्त (complementary) आहे इतकेच. त्याचा उदो उदो करायची गरज नाही. पण त्याची दुर्लक्ष न करता ओळख ठेवणे (acknowledgement) तितकेच गरजेचे आहे.

ओहो!

ओहो,

जेंव्हा आपण हिंदू धर्मीय म्हणतो तेंव्हा भारतीयच नसतात तर् भारतीय वंशाचे कॅरेबिअन्स पण असतात.

कॅरेबिअन्स हे नवीनच कळले... फिलिपाईन्स, मलेशिया माहीत होते.

या विषयी अजुन काही माहीती देवू शकाल का?

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर नि त्यातले 'आमच्याशी असणारे साम्य' पाहुन गुंडोपंत चकित आहेत!!!!)

गुंड्या ही व्यक्ती नाही वृत्ती आहे. निंदकाला फक्त शेजारीच नाही तर अगदी आग्रहाने पेइंग गेस्ट बनवण्याचा बाणा म्हणजे गुंड्या.

आभार

विकास,

बातमीच्या दुव्यासाठी आभार! आपल्या प्रतिसादांमधून अमेरिकेबद्दल नवीन माहिती कळली. त्यासाठी विशेष आभार! यावर अधिक वाचायला आवडेल.

स्नेहांकित,
शैलेश

दामकृपा

येशू हा एकच परमेश्वर असताना अन्य कोणाची पूजा कशासाठी अशा आशयाच्या घोषणा ते गॅलरीमधून देत होते. पण या घोषणा फार वेळ चालल्या नाहीत. अखेर त्या आंदोलकांना अटक करण्यात आली आणि वेदमंत्राने अधिवेशनाला प्रारंभ झाला.

अमेरिकेचे तत्त्व हे "पैसा हा एकच परमेश्वर आहे असे आहे"...

बाय द वे, श्रीमंत तीर्थक्षेत्रे अधिक जागृत असतात असे एकंदरीत दिसते.. उदा. शिर्डी, तिरुपती आणि अमितजींमुळे सध्या फॉर्ममध्ये आलेला सिद्धीविनायक.
देवांनाही मर्त्य मानवाप्रमाणे दामकृपेचे आकर्षण असते की कसे याबद्दल अध्यात्मिक उपक्रमी आमच्या अधर्मी टाळक्यात प्रकाश पाडू शकतील का? पैशे दिले तरच देव प्रसन्न होईल वगैरे अशी प्रीपेड आणि पोस्टपेड भक्तीसेवा मस्तच ना.

बरोबर आणि मला वाटते ते!

अमेरिकेचे तत्त्व हे "पैसा हा एकच परमेश्वर आहे असे आहे"...

अमेरिका त्यांच्या तत्वात "पैसा" आहे हे सरळ सांगते बाकीचे सांगत नाहीत हाच काय तो फरक. (यात अमेरिकेची मी काही बाजू घेत नाही पण मला खरेच असे वाटते की ते ताकाला जाऊन भांडे लपवत नाहीत. कदाचीत जो फरक राष्ट्रीय पातळीवर मराठी आणि गुजराथी/मारवाडी यांच्यात असेल तोच जागतीक पातळीवर अमेरिका आणि अमेरिकेतरांमधे असेल्).

मात्र एक सांगतो, अमेरिकेत जेव्हढे मनापासून "दान" देणारे आहेत तसे स्वातंतत्र्योत्तर भारतात कमी कमी होत गेलेत. मी फक्त बिल गेटस, वॉरेन बफेट म्हणत नाही तर सामान्य सुद्धा. -हा भाग विषयांतराच्या भितीमुळे इथेच थांबतो.

देवांनाही मर्त्य मानवाप्रमाणे दामकृपेचे आकर्षण असते की कसे याबद्दल अध्यात्मिक उपक्रमी आमच्या अधर्मी टाळक्यात प्रकाश पाडू शकतील का?

मी अध्यात्मीक नाही पण व्यावहारीक दृष्ट्या एव्हढे म्हणू शकतो की वेगवेगळ्या वाक्यांमधे आपल्याकडे जे सांगीतले गेले आहे ते असे:

महाभारत युद्धाच्या सुरवातीस मला वाटते द्रोण का कृपाचार्यांच्या तोंडी वाक्य आहे (ते कौरवांच्या बाजूने का लढतात याचे कारण देण्या साठी): "अर्थस्य पुरूषो: दासः" - पुरूष हा पैशाचा अथवा त्याहूनही अधीक आपल्या "डिझायर्स"चा दास असतो. (अर्थ म्हणजे केवळ पैसा हा अर्थ नाही आणि योग्य मराठी शब्द तात्काळ सुचला नाही म्हणून इंग्रजी प्रयोग!)

संस्कृत वचनः "धर्मो रक्षती रक्षीतः" - जो (स्व) धर्माचे रक्षण कर्तो, त्याचे (स्व)धर्म रक्षण करतो.

संत नामदेवः यांच्याशी तर साक्षात विठ्ठल बोलायचा असे म्हणतात, पण ते एकदा चिडून विठोबाला म्हणाले होते की , "घ्यावे तैसा द्यावे ऐसा अससी उदार.." आणि त्यात पुढे त्याला ते "कृपण" म्हणजे कंजूष म्हणतात.

शिर्डी, तिरुपती आणि अमितजींमुळे सध्या फॉर्ममध्ये आलेला सिद्धीविनायक.

गीतेत एक चांगले वचन आहे, मराठीत सांगतो," जे जे आचरीतो श्रेष्ठ, ते ते ची दुसरे जन | तो मान्य करतो ते ते, लोक चालवतात, ते |" शेवटी आपण कुणाला आपल्या आयुष्यात श्रेष्ठ म्हणजे आदर्श समजावे हे व्यक्तिगत आहे. दुर्दैवाने अमिताभला तसे आदर्श समजणारे लोक आहेत. त्याचा फक्त सिद्धीविनायक घेतला तर एकवेळ हरकत नाही (जरी तशी गरज नसली तरी), पण त्याचा म्हातारचळ मात्र "आचरण्याजोगा" नक्कीच नाही!

सामान्य माणसानी स्वतःसाठीचा आदर्श हा जबाबदारीने ठरवावा आणि नक्कल करण्यासाठी म्हणून नाही. तसेच जे श्रेष्ठ असतात त्यांनी पण जाणीव ठेवून स्वतःचा आदर्श तयार करावा. यासंदर्भात म्हणून वरील गीतेच्या ओळीं सांगीतल्यानंतर, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो:
जे जे आचरीतो श्रेष्ठ, ते ते ची दुसरे जन | तो मान्य करतो ते ते, लोक चालवतात, ते
करावे मिळवावेसे नसे काही जरी मज | तिन्ही लोकी तरी पार्था कर्मी मी वागतोची की ||
मी ची कर्मी न वागेन जरी आळस झाडून, सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग |
सोडीन मी जरी कर्म, नष्ट होतील लोक हे, होईन संकरद्वारा मीची घातास कारण || (३-२१, २२)

दुर्दैवाने सामान्य माणूस त्यातले सोपे आणि सोयीस्कर घेतो आणि गीतेचे पूजन करत बसतो. आजकाल ज्यांना समाजात मान आहे (अमिताभ सारखे) ते स्वतःच्या बाहेर बघून वर म्हणलेली जबाबदारीची जाणीव न जाणून म्हातारचळ (विशेष करून ज्या गोष्टींचे तो त्याच्या सदध्याच्या चित्रपटात उदात्तीकरण करतो त्या) नाहीतर अजून कसला तरी चळ करत बसतात.

धन्यवाद

सुंदर आणि संयमित शब्दात शंकानिरसन केल्याबद्दल विकासरावांचा आभारी आहे.

- आजानुकर्ण

वेदमंत्र इंग्रजीत?

असे वाचले/ऐकले आहे की सिनेटमध्ये जो वेदमंत्रांचा घोष झाला असे म्हणतात तो सर्व भाषांतररूपाने म्हणजे इंग्रजीतूनच झाला कारण इंग्रजी सोडून इतर कोणत्याही भाषेत धार्मिक क्रिया झालेल्या तिथे चालणार नव्हत्या / चालल्या नसत्या.
हे जर सत्य असेल तर प्रत्यक्ष वेदमंत्रांचा घोष तेथे झालाच नाही की काय?
ज्यांनी तो मंत्रघोष स्वतः (दूरदर्शनावर अथवा अन्यथा) ऐकला त्यांनी यातील सत्यासत्याचा खुलासा केल्यास बरे.

- दिगम्भा

बरोबर आहे

अवांतरः अमेरिकेत "राष्ट्रीय भाषा" हा प्रकार नाही पण व्यावहारीक भाषा ही "इंग्रजी" आहे.

वेदमंत्रांचे इंग्रजी भाषांतर करून म्हणले गेले. ते गायत्री मंत्र आणि "अस्तो सत् गमय" वगैरे होते. जरी रुढार्थाने आपण म्हण्ता त्याप्रमाणे वेदपठण झाले नसले तरी ते 'हिंदूंचे" मंत्र आहेत असे सांगीतले गेले आणि तसा त्यांना मान दिला गेला. सर्व एकेश्वरवादी धर्मांमधे हिंदू धर्माला कायम सापत्न वागणूक कळत-नकळत दिली जाते ती राजकीय पातळीवर अमेरिकेसारख्या देशाने विरोध न जुमानता धुडकावून लावली हे त्याचे महत्व.

 
^ वर