"माय मराठी

नविन उपग्रह वाहिनीची घोषणा नोकतीच एका कार्यक्रमात चॅनेलचे सि.ई.ओ.श्री.मोहन गावडे यांनी
केली.आज प्रचलित असलेल्या इतर मराठी वाहिन्यं।च्या बरोबरीने संपुर्‍णपणे मराठी माणसं।ची असलेली हि
वाहिनी या बाबतीत आपण माझ्याकडुण जाणुन घेउ शकतां नवीन कार्यक्रम, कल्पना ,कार्यक्रमा बाबत
सुचना कळवा. काम सुरु करण्यापुर्वी च नवीन विचारांचा अंगिकार करता येईल.

वाट पाहतोय.

मला लिहा.

तपस्वी राणे.

Comments

आय डी इंग्रजी

माय मराठीचं व्हयीन ते व्हयीन,आगुदर् ते नावातुन् विंग्रजी काढा, मंग मी गप्पा हानीन् या इष्यावर.

पटते

इथे नावे तरी मराठी वापरावीत...

वैयक्तिक

नाव वेगळे दिसते आहे पण,
कुणी काय नाव नि 'कसे घ्यावे' हा वैयक्तिक प्रश्न आहे असे मला वाटते आहे.
शिवाय उपक्रमरावांनी ही सुविधा दिली आहे त्याअर्थी त्यांना काही हा प्रश्न नसावा!!

असेही लिपीने काय फरक पडतो आहे या संवादात हे कळले नाही?

आपला
गुंडोपंत

शुभेच्छा !

नमस्कार,
मराठीच्या विविध उपग्रह वाहिन्या सध्या अस्तित्वात आहेत.कार्यक्रमाबाबत नवीन काही जाणून घेण्याची तशी माझी उत्सूकता कमीच आहे,तसेच या वाहिनीचे कार्यक्रम,व सुचनांच्या बाबतीत या वाहिनीवरील कार्यक्रमांचा दर्जा पाहून यात काय असावे ठरविणे योग्य होईल असे वाटते.तो पर्यंत "माय मराठी"ला मराठी भाषिक म्हणून माझ्या हार्दिक शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा.

नव्या मराठी वाहिनीला शुभेच्छा.

रटाळ कौटुंबिक मालिकांवर त्याचा विशेष रोष आहे. त्यामुळे मराठी वाहिन्यांवर पाहण्यासारखे फारसे कार्यक्रम दिसत नाहीत. पूर्वी प्रभात नावाची (मराठी नाटकांना समर्पित?) वाहिनी होती. तशाच धर्तीवर मराठी नाटक (व्यावसायिक/प्रायोगिक), चित्रपट (विशेषतः नवे/समांतर), साहित्य/साहित्यिक, मराठी संगीत (जुने/नवे(?)) यावर भर दिलेला पाहायला आवडेल.

त्याला संकल्पना म्हणून घडलंय बिघडलंय,टी.आर.पी, संवाद, (आठवा) वाद-संवाद (दूरदर्शन) आवडले/आवडतात.

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

अरे वा!

नमस्कार,
आवडता विषय!
वाहिनी या बाबतीत आपण माझ्याकडुण जाणुन घेउ शकतां
आपले मन मोकळे आवाहन आवडले.
माझे प्रश्नः

  1. काय मुख्य ध्येय आहे वाहिनीचे?
  2. रेव्हेन्यु सोर्स साठी काय योजना आहेत?
  3. निव्वळ तोटा किंवा ना नफा ना तोटा तत्वावर किती काळ तग धरू शकेल?
  4. सॉफ्टवेअरची काय सोय आहे?
  5. वेगळा ठसा उमटवण्यासाठी काय साधने? योजना?
  6. सामान्य माणसाची आवड कशी शोधता आहात?
  7. साधारण कार्यपद्धती कशी असणार आहे?

आपला
गुंडोपंत

स्पृहणीय कल्पना

याच बरोबर तुमची थोडी ओळखही करून द्या. एखादा लेख टाका तुमच्या वाहिनीबद्दल.

स्टार मराठी

"मराठी माणसाचे नवे न्यूज चॅनल" अशा घोषवाक्याचा वापर करून स्टार ग्रुप एक नवीन मराठी चॅनल सुरु करत आहे.

यात न्यूज चॅनल नपुंसक आहे. खरंतर बरोबर आहे. पण भाषेत तसं नाही ना. चॅनल पुल्लिंगी आहे.

जनतेचं काय मत आहे?

इंग्रजीमधून येणार्या शब्दांची लिंगनिश्चिती

"यात न्यूज चॅनल नपुंसक ..."
असा लिंगनिश्चितीचा घोळ बर्याच शब्दांच्या बाबतीत होतो. उदा. पेन, स्लॅब, ट्रक इत्यादी. अशा टिकाणी शब्दाचे लिंग ठरवण्यासाठी काही निश्चित नियम आहे का?

आपली,
श्रीमंत गोपिकाबाई पेशवे

माय मराठी

माय मराठी अन बाप कोन मंग? हे मायबाप प्रेक्षकाला ( स्वारी आता दर्शक म्हंतात नाही का?) ठरवण्यासाठी एक खरडवही कायमस्परुपी ठेवावी.

प्रकाश घाटपांडे

ही कोणती वाहिनी?

तपस्वी, या प्रकटनामुळे काहीच समजले नाही. प्रकटन देऊन आपण पुढे काहीच माहिती दिली नाहीत.
हे श्री. मोहन गावडे कोण? (माझ्या घोर अज्ञानाबद्दल क्षमस्व!) ही वाहिनी कधी सुरू होणार आहे?
आपली त्या वाहिनीत काय भुमिका आहे? असे अनेक प्रश्न आहेत.
माहिती अपूर्ण आहे. सविस्तरपणे लिहावे.

शेअर्स

मराठी माणसांना शेअर्स बद्दल माहिती, शिकवणी देणारे कार्यक्रम असावेत. आज पर्यंतचा अनुभव असा आहे कि अनेकजण मराठी माणसांच्या या क्षेत्रातल्या अज्ञाना वा अल्प ज्ञानाचा फायदा घेउन काहीही सांगतात. आपल्या वाहिनीमध्ये असे काही आणल्यास ते एक वेगळेपण ठरेल तसेच मराठी माणसांना श्रीमंत होण्याचा सल्ला देणारे आपले व्यासपीठ मिळेल. कोणी सोम्या गोम्या सांगतोय म्हणून काहीही ऐकले जाणार नाही.

आपल्या नवीन वाहिनीला आमच्या शुभेच्छा.





मराठीत लिहा. वापरा.
 
^ वर