दिलीप सरदेसाईंना आदरांजली

माजी कसोटी क्रिकेटपटू श्री. दिलीप सरदेसाई याचे आज निधन झाल्याची बातमी वाचली. ६६ वर्षीय दिलीप सरदेसाईंचा जन्म १९४० साली गोव्याला झाला. क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात त्यांनी १९६१ साली कानपुर येथे इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्याने केली व अखेरचा सामना त्याच संघासोबत १९७२ साली दिल्ली येथे खेळाला.

फिरकी गोलंदाजी विरूद्धच्या भारताच्या सर्वोत्तम फलंदाजाला उपक्रमींची आदरांजली...

पल्लवी

लेखनविषय: दुवे:

Comments

विनम्र अभिवादन

फिरकी गोलंदाजीबरोबरच त्यांनी वेस्ट इंडीजमध्ये वेगवान गोलंदाजांविरुद्ध काढलेल्या ६४२ धावा आपल्याला विजय देऊन गेल्या..

परत एकदा विनम्र अभिवादन..

अभिजित

सुनील

सरदेसाई आणि सुनील गावस्कर ह्यांच्या वयात सुमारे १५ वर्षांचे अंतर होते. चूभूद्याघ्या. परंतु तरीही सुनीलने त्यांचा एकेरी उल्लेख करावा ह्यात त्यांची मैत्री लक्षात येईल
सुनील गावसकर आणि आपण यांत किती वर्षांचे अंतर आहे हो? (ह.घ्या.)
सन्जोप राव

दिलीप सरदेसाईना विनम्र श्रद्धांजली

गेल्या पिढीतील एक उत्कृष्ट फलंदाज श्री. दिलीप सरदेसाई यांना विनम्र श्रद्धांजली.

श्रद्धांजली!

माझ्या आवडत्या क्रिकेटपटूंपैकी दिलीप सरदेसाई हे एक होते.मी जेव्हांपासून क्रिकेटचे धावते समालोचन ऐकायला सुरुवात केली त्यावेळी भारतीय संघात खेळणार्‍या विजय मांजरेकर,,चंदू बोर्डे,बापू नाडकर्णी ह्यांच्यासारख्याच लोकप्रिय असणार्‍या मराठी खेळाडूंमधे दिलीप सरदेसाई हे एक अतिशय तंत्रशुद्ध असे फलंदाज होते.त्या काळात सरदेसाई-जयसिंहा ह्या जोडीने कैक वेळेला आघाडीची जोडी म्हणूनही उत्तम खेळ केलेला आहे.
त्यानंतर आलेल्या वाडेकर,सोलकर,गावसकर ह्यांच्याबरोबरीनेही खेळून त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ पेश केला होता(१९७१ चा विंडीज दौरा; सरदेसाई ६४२ धावा(एक द्विशतक आणि दोन शतके) आणि गावसकर ७७४ धावा(दोन द्विशतके आणि दोन शतके ))
अतिशय सरळ बॅटीने खेळणारा हा मुंबईकर एक खडूस खेळाडू(क्रिकेटच्या बाबतीत) आणि तितकाच स्पष्टवक्ता माणूस म्हणून प्रसिद्ध होता.
त्यांना माझीही विनम्र श्रद्धांजली.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

श्रद्धांजली

दिलीपरावांना श्रद्धांजली.

श्रद्धांजली.

दिलीप सरदेसाईना विनम्र श्रद्धांजली.

 
^ वर