गांधीजींचं पेन

एक माहिती. नुकतीच समजलेली.

साधारणत: 1932 साली महात्मा गांधी विश्रांतीसाठी महाबळेश्‍वर, पाचगणी येथे काही दिवस राहीले होते. त्या मुक्कामात एक घटना घडली. गांधीजींचे आवडते फाऊंटन पेन हरवले. त्यावर त्यांचे नावही कोरलेले होते. ते पेन परत मिळविण्यासाठी त्यांनी मग वृत्तपत्रांत जाहिरातही दिली आणि पेन सापडून देणाऱ्यास त्याकाळी 200 रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.

आवडती आणि भावना जोडलेली वस्तू हरविल्यानंतर गांधीजींसारखा व्यवहारकुशल मनुष्यही हतबल होऊन जाहिरात देण्याचा मार्ग पत्करतो असे सुप्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांनी एका लेखात लिहीले. अशा लेखांचा संग्रह नुकताच वाचण्यात आला. आपल्याला नव्यानेच समजलेली ही माहिती उपक्रमींना सांगण्याचा मोह आवरला नाही म्हणून हा लेखन प्रपंच.

आपल्याकडे अशी काही दुर्मिळ माहिती असेल तर जरूर कळवावी.

------------------------------------

पुढील आठवड्यात गांधीजींचे "ते" पेन शोधण्यासाठी पंकज जोशींनी महाबळेश्‍वरला दौरा आयोजित केला आहे.

Comments

छत्री

चिमणरावांच्या छत्रीची आठवण झाली..

गांधींनी सगळ्या शिष्यांना आयुष्यभर भावनावर नियंत्रण ठेवण्याची शिकवण दिली..याची ही आठवण झाली.

छान माहिती दिलीत..

(अजून छत्री हरवल्याच्या दु:खात असलेला) अभिजित

विस्मय

पेनाची माहिती आश्चर्यकारक आहे.
आपला
(चकित) वासुदेव

पुढील आठवड्यात गांधीजींचे "ते" पेन शोधण्यासाठी पंकज जोशींनी महाबळेश्‍वरला दौरा आयोजित केला आहे.
हे कसे काय शक्य होईल बरे? काही योजना आहे का? की गमतीने तसे लिहिले आहे?
आपला
(संभ्रमित) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

असेच..

पुढील आठवड्यात गांधीजींचे "ते" पेन शोधण्यासाठी पंकज जोशींनी महाबळेश्‍वरला दौरा आयोजित केला आहे

पुढे काय झाले ते नक्की कळवा.. आम्हाला उत्सुकता आहे.

गांधीजी आणि रेल्वे

गांधीजींनी कलकत्त्याला अधिवेशनासाठी जायला सीट वर सामान टाकण्यासाठी (जागा धरण्यासाठी )हमालाला पैसे दिले होते.गाडी सुटण्याच्या बेतात होती.

प्रकाश घाटपांडे

 
^ वर