वडा पाव - एक चांगला प्रयत्न

हमारे जमाने के दाम मे... अशा जाहिरातीने स्वतःकडे वृद्धाना आणि खेळणी देउन मुलांना मॅकडोनाल्डच्या शर्यतीत आमचे घोडे कुठे तरी निदान दिसते तरी आहे. धीरज गुप्ता आणि रीटा गुप्ता या उच्चशिक्षीत जोडप्याने आपला वडा-पाव जागतिक बनवायचा विडा (वडा) उचलेला आहे. जंबो वडा-पाव हे आता नावारुपाला आलेले त्यांच्या श्रमांचे फळ. आपल्याला काय वाटतं? वडापाव जगभर खाल्ला जावा का? वडा पावचे हे स्वरूप तुम्हाला कसे वाटते? आपली उत्पादने जास्त चांगल्या दर्जाची बनवल्यास त्याला जागतिक बाजारपेठ मिळु शकते असे आपल्याला वाटते का?

मला तरी यांचा अभिमान वाटतो. आपल्याला या बद्दल काय वाटते?

Comments

मस्त

चांगली बातमी आहे. माझ्यासारख्या वडा-पावसाठी तरसणार्‍या भारतीयांसाठी तर पर्वणी.
युरोपमध्ये इंग्लंडमध्ये भारतीय पदार्थ बरेच लोकप्रिय आहेत. स्कॉटलंडमध्ये तर जवळपास प्रत्येक रस्त्याला एक भारतीय हाटेल दिसत असे. साहेबाच्या जिभेला करीची चटक लावून आपण माफक का होइना, सूड उगवला आहे :)
तरीही आपल्याला सुधारणेला भरपूर वाव आहे. चिनी पदार्थ/हाटेल जशी सर्व ठिकाणी दिसतात तसेच भारतीय पदार्थांचे व्हायला काहीच हरकत नाही. उत्पादनाचा दर्जा वाढवणे, त्याचबरोबर प्रोफेशनल मार्केटिंग यांची जास्त गरज आहे असे वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

वा!

वाडापावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची गुप्ता दांपत्याची योजना उत्तम आहे. सध्या यांच्या शाखा कुठे कुठे आहेत?
आपला
(यज्ञकर्मी) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

मुंबई

सध्या मुंबईमध्ये आहेत. लवकरच पुण्यात सुरू होणार आहेत असे ऐकले आहे. लेखात दिलेल्या दुव्यावर आणखी माहिती मिळेल.

मराठीत लिहा. वापरा.

मिसळीचाही प्रसार आणि प्रचार!

गुप्ता दांपत्याचा उपक्रम चांगला आहे, वडापावचे दरही वाजवी वाटत आहेत. फक्त चव कशी असते हे एकदा खाऊन पाहिले पहिजे!

गुप्त दांपत्याने वडापावासोबतच मिसळीचाही असाच प्रसार आणि प्रचार सर्व जगभर करावा असे वाटते! ;)

सदर माहितीबद्दल चाणक्यरावांचे धन्यवाद!

तात्या.

सहमत

गुप्त दांपत्याने वडापावासोबतच मिसळीचाही असाच प्रसार आणि प्रचार सर्व जगभर करावा असे वाटते!
सहमत...

मराठीत लिहा. वापरा.

माझ मत................

मला तरी यांचा अभिमान वाटतो. आपल्याला या बद्दल काय वाटते?
मला तर काहीच वाटत नाही. यात चर्चा करण्यासारख काय आहे.
असे जर मराठी माणसाने केले असते तर अभिमान वाटला असता.
आपला
कॉ. विकि

हा हा

मला तर काहीच वाटत नाही. यात चर्चा करण्यासारख काय आहे.
मग प्रतिसाद कशाला टाकला? उगाच? मराठी पदार्थ महत्वाचा नाही का? आम्हाला मराठी महत्वाचे आहे. माफ करा पण आपला विचार संकुचित वाटतो.

मराठीत लिहा. वापरा.

वडापाव

विकिसाहेब...

समर्थांनी "मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा" असे सांगितले नाही का?

वडापाव विकतात म्हटल्यावर ते बी आपले मराठी बांधवच आहेत.

मग. मागा गुप्तारावसाहेबांकडे मराठीतून वडापाव, देतील तुम्हालाबी.

जय महाराष्ट्र! जय वडापाव!! जय मिसळपाव!!!येथे लिहिण्यापूर्वी मी वडापाव खातो.

दिल्ली अजून् बरीच दूर दिसतेयं..

मला कल्पना नक्कीच आवडली, त्यात थोडे नाविन्य आहे पण ती आज तरी अशाच ठिकाणी चालू आहे जीथे शिवसेनेमुळे अथवा पुर्वापार वडापाव विकणे चालू आहे. वडापाव जगभर गेला तर नक्कीच आनंद वाटेल पण अभारतीय विशेष करून पाश्चिमात्यांच्या चवी बदलणे (तिखटपणासाठी) आत्तातरी कठीण वाटते. अशक्य नक्कीच नाही. (आमच्या कडे आलेल्या एका ७-८ वर्षीय अमेरिकन मुलाने तळलेले छोटे सामोसे, हा हा करत खाल्ले - आवडतात म्हणून!)

आज बॉस्टनच्या जवळील एका गावात पावभाजीचा पाव, वडापाव तयार करणारे दुकान चांगले चालले आहे पण मुख्यत्वे वाढलेल्या भारतीय संख्येच्या जोरावर...

आणखीन एक

माझा पुर्वाश्रमीचा अमेरिकन सहकारी डॅरेने डेथ हा भारतीय मसालेदार खाणे स्वतः बनवून खातो.

मराठीत लिहा. वापरा.

वडापाव...

... ची ही सुविधा भारतात जागोजागी आहेच हो. त्यात ही भर चांगलीच आहे! पण एक क्षण मला वाटले की असा काही उद्योग परदेशात सुरू होतो आहे की काय? "देसी" काय पण "परदेसी"ही येतील या वडापावसाठी!!

(प्रत्येक क्षण युगासारखा वाटतो ह्या व्याख्येनुसार वडापाव खाऊन युगे लोटलेला) एकलव्य

अवांतर - पुण्यात कोणीतरी बाटलीमध्ये उसाचा रस द्यायला सुरुवात केली होती असे ऐकले होते!!

वडापाव आणि उसाचा रस

जंबोकिंगवाल्यांची व्यावसायिकता बघता परदेशात सुद्धा सुरू होइल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. वडापाव आम्हाला जगतीक बनवायचा आहे हे तर त्यांचे ब्रीदवाक्य आहे.

आता उसाचा रसः आपण ऐकलेले बरोबर आहे, आता वाचा.
टाकळी खातगाव (ता. नगर) येथील ज्ञानेश्वर यशवंत शिंदे या युवकाने पदवी घेऊन, नोकरीच्या शोधात न राहता चाकोरीबाहेर जाऊन नवीन व्यवसाय सुरू केला. त्यांनी उसाचा रस बंद बाटलीतून बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्याने, ग्राहक वर्षभर उसाच्या रसाचा आस्वाद घेऊ शकतील. ........

सविस्तर बातमी वाचा. (इ - सकाळ आणि उपक्रमावरच्या गुगलशोधच्या सहकार्यामुळे शक्य)

मराठीत लिहा. वापरा.

उसाच्या रसाची बाटली! ;)

टाकळी खातगाव (ता. नगर) येथील ज्ञानेश्वर यशवंत शिंदे या युवकाने पदवी घेऊन, नोकरीच्या शोधात न राहता चाकोरीबाहेर जाऊन नवीन व्यवसाय सुरू केला.

शिंदेसाहेबांचे कौतुक वाटते!

ग्राहक वर्षभर उसाच्या रसाचा आस्वाद घेऊ शकतील. ........

अहो पण एक शंका. उसाचा रस म्हणजे काही आंब्याचा रस नव्हे की जो ठराविक कालावधीतच मिळतो! तो तर तसाही वर्षभर गुर्‍हाळात मिळतच असतो की!

असो, एकदा केव्हातरी शिंदेसाहेबांनी बनवलेली उसाच्या रसाचीही एक फुल्ल बाटली पिऊन पाहिली पाहिजे! ;)

आपला,
(गुर्‍हाळी!) तात्या.

सुधारणा

जिथे गुळ बनतो ते गुर्‍हाळ. गुळ वर्षभर बनत नाही. त्यामुळे रस वर्षभर गुर्‍हाळात मिळतच नाही. आपल्याला कदाचित रसवंती गृह म्हणायचे असेल.

मराठीत लिहा. वापरा.

रसवंती गॄह हा च्यामारी शहरी शब्द

गावकडं आमी रस मिळतो त्येला गुर्हाळच म्हंतो. पन १२ म्हैने रस मिळत नाही.

आम्ही पानाच्या गादीला रसवंती गृह म्हंतो.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

दोस्ता

अरे दोस्ता, आमच्या पुण्यासारख्या शहरात सुद्धा लोकं त्याला गुर्‍हाळच म्हणतात. उसाचा रस काढणे हा गुळ बनवण्याच्या प्रकियेतला सर्वात महत्वाचा भाग होय. आता अनेकांनी रस तिथेच तयार होताना पाहिला असेल त्यामुळे शहरात जिथे रस मिळतो त्याला सुद्धा गुर्‍हाळच म्हणत असतील.

मराठीत लिहा. वापरा.

मघई

(मघई जोडी हा ज्या शहरात पानाचा सर्वात खपणारा प्रकार आहे, तिथे आणखी अपेक्षादेखील काय करावी, म्हणा?) हे मात्र एकदम बरोबर्...
पुण्यात अलिकडे अत्यंत स्वच्छ, वातानुकुलीत पानाचे दुकान सुरू झाले आहे. पत्ता: पप्पु पान, बिबवेवाडी कोंढवा रस्ता, कुमार पार्कच्या समोर. येथे पानाचे अनेक प्रकार मिळतात. येथे सर्व लिंगांच्या व्यक्ति हौसेने येउन, पान विकत घेउन, पान खातात. चॉकलेट पान हि त्यांची खासियत..

मराठीत लिहा. वापरा.

करेक्ट.

जिथे गुळ बनतो ते गुर्‍हाळ. गुळ वर्षभर बनत नाही. त्यामुळे रस वर्षभर गुर्‍हाळात मिळतच नाही.

करेक्ट! आम्ही देशावरचे नसल्यामुळे आम्हाला या बद्दल विशेष माहिती नाही/नव्हती.

आपल्याला कदाचित रसवंती गृह म्हणायचे असेल.

बरोबर!

तात्या.

रस घेऊन...

... आणि चवीने वाचतो आहोत.

बातमी अतिशय आवडली... एका मित्राने याबद्दल कळविले होते, आपल्यासारख्या दुसर्‍या मित्राने नजरेसही आणून दिले. :)

आपल्या तत्परतेबद्दल आभार!

धन्यवाद

धन्यवाद

मराठीत लिहा. वापरा.

कोणतेही खाद्यपदार्थ मालिकेच्या मार्फत

खाद्यपदार्थ मालिकेच्या मार्फत विकण्यासाठी

कोणतेही खाद्यपदार्थ मालिकेच्या (मल्लीका नाही! ;) ) मार्फत विकण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींची पूर्तता आवश्यक वाटते. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती जाहिरात. (ही चवी पेक्षाही महत्वाची आहे.) तरीही काही प्र्माणात खालील गोष्टींचा परामर्श घेणे महत्वाचे आहे.
१. चवी चे मापदंड बनवणे - चव हे प्रत्येक माणसाला वेगवेगळी वाटत असते. (म्हणजे मला लागलेले तिखट तात्यांना तितके तिखट वाटेलच असे नाही.)
या साठी एकच मानक बनवावे लागेल.
२. तापमान - वडापावातली मुख्य वस्तू वडा. ही अतिशीत करून सदैव पुरवठा होऊ शकेल अशा रीतीने साठवावी लागेल. साठवणूक तापमान किमान उणे १८ अंश असले पाहिजे.
२.२ वडापाव ग्राहकाला देतांना तापमान ६५ अंश (च) असेल हे पाहणे.
२.३ अतिशीत मधून शीत मध्ये आणलेले पदार्थ ० अंश ते ४ अंश या दरम्यानच असले आणी ठेवले पाहिजेत.
३. साठवणूक शक्य नसल्यास जवळ्पास चे उत्पादक या (व पावाच्या )पुरवठ्या साठी बांधून घ्यावे लागतील.
४. तरबेज मनुष्यबळ - हा महत्वाचा भाग. मनुष्यबळ तरबेज करून त्यांना सदैवच ग्राहकाच्या समाधानासाठी तयार ठेवणे. यासाठी सतत आणी सतत प्रशिक्षण द्यावे लागेल.

ग्राहकाचे समाधान म्हणजे काय? (मॅक चे निकष)
४.० ग्राहक सदैव बरोबर असणार!
४.१. ग्राहक आल्यावर त्याचे 'हसतमुख' स्वागत
४.२ ग्राहक मागणीला 'तात्काळ' प्रतिसाद
४.३ अजून काही हवे आहे का? अशी पुरवणी प्रश्न विचारणे
(ग्राहक अनायसेच आत आलेला आहे, त्याने अजून घेतले तर अजून खप!)
४.४ योग्य पैसे घेऊन सुटे पैसे तयार देणे
४.५ सुट्या पैश्यांसाठी खळखळ न करणे
४.६ खाद्यपदार्थ व पैसे हातात देणे
४.७ हसतमुख निरोप

सगळे व्यवहार हसतमुख राहून चटपटीत होणे अतिशय महत्वाचे.
५. हे प्रशिक्षण सदैव ताजे रहावे आणी वापरात रहावे यासाठी एक खोटे ग्राहक पाठवून तपसणीची यंत्रणा राबवणे (ही यंत्रणा चालवणार्‍या इतर गॅप बस्टर सारख्या कंपन्या आहेत)

या शिवाय फ्रँचायसी मॅनेजमेंट, लॉजिस्टीक्स, फूड मॅनेजमेंट, फूड प्रोसेसींग, मॅन पॉवर मॅनेजमेंट, या विषयांवर काम करणे जरूरीचे राहील.
यावर शक्य झाल्यास लिहीन.
आपला
गुंडोपंत

खरच

गंमत सोडा, पण "फ्रँचायसी मॅनेजमेंट, लॉजिस्टीक्स, फूड मॅनेजमेंट, फूड प्रोसेसींग, मॅन पॉवर मॅनेजमेंट" ह्याविषयी नक्की लिहा. खरच लिहा....

मराठीत लिहा. वापरा.

धन्यवाद!

धन्यवाद!
आम्ही आनंदाने ही जबाबदारी स्विकारू!
आपला पहिला चेक आमच्या कडे पोचला की लगेच कामाला सुरुवात करत आहोत! ;)

असो, प्रतिसाद(लेख?) तुटक झालाय, त्यात खरं तर अजून अनेक मुद्दे यायला हवे होते. असो, वेळ मिळाल्यास नक्की टाकेन!

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

सर्व मुद्दे पटले

क्र. १ वर 'गोड,मध्यम, तिखट,तिखटजाळ' असे खाद्यदर्जे ठेवून त्यांची सूचना मेनूकार्डात देऊन(पिझ्झा वाले देतात तसे) हा तोडगा काढता येईल.

तिखटजाळ

हाहाहा!
पिझ्झावाल्यांचा तिखटजाळ म्हणजे मेनूत पदार्थाच्या नावाशेजारी दोन मिरच्यांचे चित्र असते आणि त्याची तिखटपातळी आमच्यात पाहुणे म्हणून आलेल्या पुणेरी शाळकरी मुलांसाठी 'तिखट' म्हणून जे केले जाते तशी असते. त्याला अर्थ नाही. पण आपला वडापाव मात्र खरोखर तिखटजाळ असेल आणी मेनूकार्डात 'वैधानिक इशारा: इट ऍट युवर ओन रिस्क' असा असेल.
(म्हणजे, मी वडापाव जॉईंट काढला तर असे असेल. आता गुप्ता आणी गुप्तीणबाई काय करतात पहायचे!)

एक सूचना

वडापावाच्या मेनूकार्डावर
१. सकाळी ५ वाजता
२. सकाळी ७ वाजता
३. सकाळी ८ वाजता

अशी घड्याळाची चित्रे छापावीत. अजितदादारावजी पवारसाहेब आनंदाने प्रायोजित करतील.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

सक्काळी किती वाजता उठावे लागेल

आमचा वडापाव हा गजराचे काम करतो. (मराठीत अलार्म)
अमुकतमुक वडापाव खाल्यावर किती वाजता उठावे लागते याची माहितीपूर्ण नोंद करावी.

माहितीपूर्ण हा शब्द उपक्रमाखेरीज इतरत्र वापरला तर चालेल ना?येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

वडापावाची मजा

ग्राहक म्हणजे काही ईक्ष्वाकू राजाचा वंशज नाही त्याचे हसतमुख स्वागत करायला. खायचे असेल तर खा नाही तर फुटा असे म्हणणार्‍या स्वाभिमानी मराठी मंडळींकडेच वडापाव चांगला मिळतो.

वडा जास्त झणझणीत की सुटे पैसे मागितल्यावर अपमान करणार्‍या दुकानदाराची प्रतिक्रिया जास्त झणझणीत याचा विचार करताना वडा जास्त चविष्ट लागतो असा वैयक्तिक अनुभव आहे.येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

श्रीकृष्ण

सहकारनगर व कोंढवा रस्त्याचा श्रीकृष्ण वडेवाला नेहमी शक्यतो राउंड फिगर होईल अशा संख्येतच वडे घ्यायला लावतो.(लावायचा. आता मारवाड्यांच्या संगतीमुळे सौजन्यपूर्ण बिघडला आहे.) वडे सुंदर असल्याने गिर्‍हाइकही जास्त खायला नाही म्हणत नाही.
म्हणजे, तुम्हाला चार वडे १ पाव घ्यायचा असेल तर तो पाच वडे दोन पाव देऊन तीस रु. पूर्ण करतो. कसले सुट्टे? कसला प्रश्न? हाय काय नि नाय काय?

प्रकाटाआ

प्रकाटाआ

मराठीत लिहा. वापरा.

एक प्रामाणिक शंका

जेव्हा वडापाव नव्हता तेव्हा आम्ही काय खात होतो?
--वाचक्नवी

 
^ वर