दिवंगत नेत्याची लेक

दिवंगत नेते प्रमोदजी महाजन यांच्या कन्येवर आलेली ही एक बातमी
आपली या बातमीवर काय काय मतं, प्रतिसाद आहेत हे सांगा. उत्स्फुर्त प्रतिसादाच्या प्रतिक्षेत उपक्रमावरील नवखा चोंबडा कोंबडा.

Comments

बातमी आणि मत

बातमी वाचली, पण काय मत द्यावं हे कळेना. एक समाधान नक्किच वाटत कि बातमी ज्यासंदर्भात दिली आहे तो संदर्भ चांगला वाटला. आता कन्ये मागे वलय आहे हा तिचा फायदा कि तोटा हे कळत नाही. चांगलं काम करणार्‍याला आपण पाठींबा द्यायला हवा. आता आम्ही अस म्हणलं कि येथे आम्हाला घराणेशाही चालते तर मग राहूल गांधी का नको? हा प्रश्न लगेच विचारला जातो. पण मग आम्ही तेच म्हणतो कि गांधींचा चालतो तर मग महाजनांची का नाही? असो, मी जसे नेहमी म्हणतो तसे हे न थांबणारे वाद आहेत. मुख्य मुद्दा एवढाच आहे कि तरूण आणि खरच लोकसेवा करण्याची तळमळ असणारे नेते हवे आहेत. आम्हाला जुने पुराणे, नेहरू-गांधीं घराण्याचा ढोंगी झेंडा घेणारे नको आहेत. आम्हाला भारताला बलशाली, सशक्त व्यवस्थापनाकडे, एका महासत्तेकडे आणि समृद्धतेच्या मार्गाने नेणारे नेते हवे आहेत. ते एका घराण्याचे आहेत म्हणून नको. ते कोणी ही आहेत. अनुभवा शिवाय यातले ज्ञान येणे अशक्य आहे. तेंव्हा आम्हाला तावून सुलाखून तयार झालेले नेते हवे आहेत. आत्ता तरी उत्स्फुर्तपणे एवढच मनात/लेखणीत येत आहे.

मराठीत लिहा. वापरा.
 
^ वर