मुलांसाठी मराठी संकेतस्थळ -२

कालची चर्चा -
देवनागरी मुलांच्या लक्षात राहावी, सतत वाचन आणि लिखाण देवनागरीत व्हावे, ह्यासाठी काय करावे, ह्याचा विचार "ऑफ अँड ऑन" करत असतानाच काल गुंडोपंतांनी म्हटले: "मुलांसाठी मराठी संकेतस्थळ काढले तर कसे ?"
असे संकेतस्थळ तयार व्हावे का ? असे संकेतस्थळ तयार केले, तर त्याचे स्वरूप कसे असावे ?

त्यावर प्रतिसाद -
कोलबेर, चाणक्य यांचे सविस्तर प्रतिसाद.
तात्यांचा टॅक्स विषयक प्रतिसाद,
मुलांना सोपे मराठी वाचता यावे; लिहिता यावे आणि बोलता यावे .* हे प्रमुख उद्दिष्ट असावे - यनावाला साहेब.
महाराष्ट्राबद्दलची माहिती सोप्या इंग्रजीत (किंवा समजेल त्या भाषेत) द्यावी. - तो

संकेतस्थळाच्या उपयुक्ततेची चांचणी - सपुर्ण उहापोह , ९ मुद्यांचा व्यवस्थीत प्रतिसाद - शैलेश

अजून एक जास्तीची ए़क्टीव्हीटी होऊन बसू नये पण साईटवर आनंदाने येणे व्हावे, संस्थळाचे स्वरूप दृक्-श्राव्य असावे. - प्रियाली

कायद्याचं पाहा - जीतेन१२

गाणी उतरवून घेता आली तर त्याचा नक्की उपयोग होईल. - एकलव्य
चाणक्य व युयुत्सु यांचे प्रायव्हसी व पालकांचा सहभाग यावर संवाद.

आता चर्चा पुढे चालू द्यावी -

Comments

बालविहारात काय सावे हे मुलांनीच ठरवावे!

बालविहारात काय सावे हे मुलांनीच ठरवले तर् कसे राहिल?
तिथे काय यावे काय येवू नये, पालकांना किती नियंत्रण असावे या सगळ्याचे नियंत्रण मुलांच्या हाती असले तरच ती खर्‍या अर्थाने मुलांची साईट असेल.
याचे फक्त तंत्र मोठ्यांनी द्यावे, पण प्रत्येक गोष्टीत काय असावे नि कसे असावे हे सांगु नये असे मला वाटते!

नाहितर त्याचे स्वरूप ऑन लाईन पाळ्णाघर असे होईल.

आपला
(बा.बु.)
गुंडोपंत

मुद्दा

मुद्दा योग्य आहे. पण.... लहानांना हाताला धरून चालवणे हे मोठ्याचे हि कर्तव्य नाही का? एकदा मुले व्यवस्थित चालू लागली कि मग फक्त सुचना देणे योग्य..

मराठीत लिहा. वापरा.

हो हो तेच

"याचे फक्त तंत्र मोठ्यांनी द्यावे " हा उल्लेख आहेच.
मुलेही हे छान चालवतील यात मला शंका नाहिये. फक्त कोणीतरी बाजूला लक्ष ठेवणारे असले म्हणजे झाले...

सहमत/छान कल्पना..

तिथे काय यावे काय येवू नये, पालकांना किती नियंत्रण असावे या सगळ्याचे नियंत्रण मुलांच्या हाती असले तरच ती खर्‍या अर्थाने मुलांची साईट असेल.

१००% सहमत आहे!

पण प्रत्येक गोष्टीत काय असावे नि कसे असावे हे सांगु नये असे मला वाटते!

मलाही वाटते!

नाहितर त्याचे स्वरूप ऑन लाईन पाळ्णाघर असे होईल.

वा! 'ऑनलाईन पाळणाघर?!' कल्पना छानच आहे! ;)

विनंती

उपक्रम पंतांना विनंती कि या चर्चा विषयाचा अंतर्भाव मराठी विश्वजाल तंत्रज्ञान समुदायात करावा..

मराठीत लिहा. वापरा.

अमेरिकेतील मराठी मुले

अमेरिकेतील मराठी मुले एवढेच मुख्य लक्ष्य येथे नसावे, कारण भारतातली मुले देखील यात रस घेतील. ह्या आधीच्या भागातील प्रश्नासंबंधातः खरडवही/ चॅट वगैरे सारख्या गोष्टी मुलांना नकोत (अगदी १४ वर्षाच्याही) असे मला वाटते. त्यावर तुमचा आणि पालकांचाही अधिकार रहाणार नाही - हल्लीची मुले आपल्यापेक्षा जास्त चतुर आहेत :(

त्यातही करायचे असेल तर तुम्ही webkinz पाहिले आहे का? तेथील तेथील पालकांसाठीचा हा दुवा पहा. त्यातील KinzChat Area हा प्रकार पहा. तो येथे कितपत शक्य आहे (पैसा, वेळ, तंत्रज्ञान या अर्थाने) हे मला माहिती नाही, पण चॅट वगैरेला एक पर्याय म्हणून याचा विचार करता येऊ शकतो.

बाकी दृक-श्राव्य माध्यमांतून मराठी अक्षर आणि साहित्य ओळख होणे सोपे जाईल. माझ्या मुलीला मराठी बोलता व्यवस्थित येते, पण सध्या मराठी अक्षर ओळख करून देते आहे (घरच्या घरी) पण देवनागरी लिहीताना ती खूप जास्त विचार करते असे लक्षात आले आहे. म्हणजे कसे लिहावे याबद्दल अनेक प्रश्न तिला असतात. त्यासाठी खरे तर एक फळा (whiteboard/ blackboard) असला तर असे अनेक छोटे धडे तयार करता येऊ शकतात असे वाटते.

परत हे सर्व अनेक मर्यादांमुळे कितपत शक्य आहे हे माहिती नाही. आणि काही मदत हवी असल्यास संस्थळ सुरू करताना जरूर विचारा. मला शक्य तेवढी मदत करीन.

चित्रा

संपूर्ण सहमत

खरडवही/ चॅट वगैरे सारख्या गोष्टी मुलांना नकोत (अगदी १४ वर्षाच्याही) असे मला वाटते. त्यावर तुमचा आणि पालकांचाही अधिकार रहाणार नाही - हल्लीची मुले आपल्यापेक्षा जास्त चतुर आहेत :(

सहमत आहे.

तसेच, भारतात मराठी भाषा सेकंड लँग्वेज म्हणून शिकवली तरी १० वर्षाच्या भारतातील मुलाची पातळी ही १० वर्षाच्या अमेरिकन भारतीय मुलाच्या पातळीशी मेळ खाणार नाही, या गोष्टीही विचारात घेतल्या पाहिजेत.

पण सध्या मराठी अक्षर ओळख करून देते आहे (घरच्या घरी) पण देवनागरी लिहीताना ती खूप जास्त विचार करते असे लक्षात आले आहे. म्हणजे कसे लिहावे याबद्दल अनेक प्रश्न तिला असतात.

लिहिताना काना, मात्रा, वेलांट्या, डोक्यावर रेघा - बरेचदा विनोदी प्रकारही होतो. अनुभव आहे. :( हे सर्व र्‍हस्व, दीर्घ, शुद्धलेखन न शिकवता. त्यामुळे वाटले तरी प्रकरण इतके सोपे नाही.

दृकश्राव्य माध्यम हाच मला चांगला उपाय वाटतो.

चर्चा

बालविहाराची कल्पना आवडली. मला तिथे लिहायला आवडेल! :-)

परदेशात मराठी लिहायला वाचायला शिकवणे इतके अवघड का वाटते ते कळले नाही. (मुलांचा काहीच अनुभव नाही तरी) इथल्या एका कानडी मुलाला त्याचे पालक एबीसीडीच्या बरोबरीने कानडी कखगसुद्धा शिकवतात असे दिसले. मुलाचे वय ३. तो आनंदाने त्या कानडी वेलांट्या ओळखतो. मराठी, किंबहुना देवनागरी अक्षरे शिकायला, ओळखायला अवघड जातात का?

याचे कारण

एका कानडी मुलाला त्याचे पालक एबीसीडीच्या बरोबरीने कानडी कखगसुद्धा शिकवतात असे दिसले. मुलाचे वय ३. तो आनंदाने त्या कानडी वेलांट्या ओळखतो.

शक्य आहे. मागे मनोगतावर जीवन जिज्ञासा यांनी लिहिलेल्या एका लेखात वयाच्या ६ व्या वर्षापर्यंत मुले दोन-तीन भाषा चटकन शिकू शकतात असे म्हटले आहे. (नेमके आठवत नाही, चू. भू. द्या. घ्या.) शिकवण्यातील सातत्य, मुलांची आवड, त्यांना मिळणारा वेळ इ. सर्वच कारणीभूत असावे.

देवनागरीशी याचा फारसा संबंध नसून लहान मुलांची मानसिकता आणि स्मरणशक्ती यांच्याशी हे सर्व निगडीत असावे असे वाटते. उदा. माझ्या ओळखीच्या एका मुलाला ४ थ्या वर्षी घरी शिकवल्याने गुणाकार भागाकार उत्तम येत असे. त्यानंतर शाळेत जायला लागल्यावर घरातला वेळ कमी झाला. शाळेतल्या ऍक्टिविटिज वाढल्या आणि शाळेत अंकओळखीपासून गणित सुरू झाले. आज सहाव्या वर्षी तो गुणाकार/ भागाकार विसरलेला आहे.

लहान मुले जितक्या लवकर शिकतात, ती विद्या वापरली नाही तर तितक्याच लवकर विसरतात असे वाटते.

चू. भू. द्या. घ्या.

कदाचित

लहान मुले जितक्या लवकर शिकतात, ती विद्या वापरली नाही तर तितक्याच लवकर विसरतात असे वाटते.

कदाचित बरोबर. माझी मुलगी तीन वर्षांची असताना "श्री गणेशाय नमः, आई, बाबा, आमची नावे, स्वतःचे नाव" वगैरे मराठीत लिहू शकायची. पण ते शिक्षण तिथेच थांबले. मधल्या काळात इतर गोष्टींमध्ये मन रमायला लागल्याने मराठीचा अभ्यास मागे पडला. त्यानंतर इंग्रजीत आधी नीट शिकली. ती गेल्या दोन वर्षांपासून इंग्रजीत बरीच जास्त लिहायला लागली, त्यामुळे आता मराठी लिहायला शिकताना वेलांट्या, काना मात्रा इत्यादी गोष्टी तिला "वेगळ्या" वाटतात आणि खूप प्रश्न असतात (इंग्रजीची स्पेलिंग्ज ती चुकत माकत बर्‍यापैकी बरोबर करते, पण अ ला काना आ वगैरे शिकताना तिला थोडे वेगळे वाटते. पण ती मराठी शिकताना खूप excited असते हेही नमूद करायला हवे :)

चित्रा

भावी वाचक

बालविहारचे भावी वाचक हे वाचतात का?

बालविहार आणि पालक

आत्ता पर्यंतचे एकुण प्रतिसाद वाचून एक मत बनत चालले आहे. ते म्हणजे, बालविहाराची गरज पाल्यांपेक्षा पालकांना जास्त वाटते आहे. त्यातसुद्धा, मुलांना मराठी शिकवावे कसे? हा प्रश्न पालकांना सोडवायला अवघड वाटतो आहे असे वाटते. माझे प्राथमिक मत असे आहे कि बालविहार मुलांना मराठीची गोडी वाढवण्यासाठी उपयोगी पडू शकतो तसेच, मराठी शिकण्यासाठी थोडा फार हातभार. भाषा शिकवणे ही कला आहे. मला वाटतं की पहिली गोडी ही पालकांनी तयार करणे हि पालकांची जबाबदारी आहे. लहानांना ही गोडी लागण्यासाठी काय करावे हि अपेक्षा बालविहार कडून आहे काय?
भाषा हा विषय सोडाच, लहानपणी भेटलेल्या कोणी दुरच्या नातलगां पैकी कोणी दिर्घकाळ भेटले नाहीतर त्यांच्या बद्दल आत्मियता राहते का? शेवटी, लिहीता हातवळा, गाता गळा आणि पिकवता मळा हेच खरेतर कोणतीही गोष्ट चांगली शिकण्याचे सुत्र आहे असे मनोमन वाटते.

मराठीत लिहा. वापरा.

जावे त्यांच्या वंशा

मला वाटतं की पहिली गोडी ही पालकांनी तयार करणे हि पालकांची जबाबदारी आहे. लहानांना ही गोडी लागण्यासाठी काय करावे हि अपेक्षा बालविहार कडून आहे काय?

होय की, पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. उंटावरून शेळ्या काय मी ही हाकतो.

बालविहाराची कल्पना आवडली, बालबुद्धीचे लोकही सदस्यत्व घेऊ शकतात का?

-राजीव.

थोडा फार हातभार...

... मला वाटते की बालविहारकडून थोडाफार हातभार लागावा इतकीच पालकांची अपेक्षा आहे. शेवटी जबाबदारी आणि इतर अनेक धडपडाट त्यांनाच करावयाचे आहेत याची स्पष्ट जाणीव बहुतेकांना आहे.

मुलांसाठी उपलब्ध असलेल्या इंग्रजी संकेतस्थळांच्या तुल्यबळ (तरीही प्रश्न तुलनेचा नाही!!) असे मायमराठीतील संकेतस्थळ असल्यास मायदेशापासून दूर असल्याची उणीव भरून निघावी अशी काहीशी अपेक्षा मला दिसते.

(बाल) एकलव्य

काय रे मिलिंदा,

च्यामारी तुझ्या त्या बालविहारात मी 'मधली सुट्टी संपादक' म्हणून मी येऊ का? शाळेत नसायची का आपल्याला मधली सुट्टी? ;)

तेवढाच जरा पोरांना इतर संपादकांच्या पोलिसगिरितून रिलिफ मिळेल! ;)

मला खात्री आहे की पोरं तात्यामामासोबत काही काळ फुल्टू टाईमपास, धमाल करतील! ;)

येऊ का बोल?

आपला,
तात्यामामा!

मरतांना जर यमाने विचारलंन की तात्या तुझी शेवटची इच्छा काय आहे तर मी अण्णांचा 'शुद्धकल्याण' आणि 'मिसळ' हे उत्तर देईन!
 
^ वर