मुलांसाठी मराठी संकेतस्थळ ?

ह्या चर्चाप्रस्तावाची पार्श्वभूमी सांगतो.

गेल्या उन्हाळ्यात मी आणि माझ्या पत्नीने आमच्या मुलांना मराठी देवनागरीतून लिहायला आणि वाचायला शिकवली. ती एक कोड लँग्वेज (:-) म्हणून त्यांनी उन्हाळाभर वापरली देखील. पण एक वर्षानंतर त्यांना ती आठवत असेल की नाही, ह्याची शंकाच आहे. पण त्यांना फनब्रेन.कॉम वरचे रोमन न्यूमरल्स बरोबर आठवतात, वर्षभरापूर्वी वाचल्यानंतरही !

घरातली सगळी लहान मुलांची मराठी पुस्तके गेल्या उन्हाळ्यातच त्यांनी वाचून काढली. त्यानंतर गेले वर्ष मराठी वाचायला मिळाले नाही. लिहिण्याची संधी तर आणखीच कमी !

त्यांना देवनागरी लक्षात राहावी, सतत वाचन आणि लिखाण देवनागरीत व्हावे, ह्यासाठी काय करावे, ह्याचा विचार "ऑफ अँड ऑन" करत असतानाच काल गुंडोपंतांनी म्हटले: "मुलांसाठी मराठी संकेतस्थळ काढले तर कसे ?"

आर्किमिडीजला टबातून "युरेका, युरेका" म्हणत नागडा बाहेर पळताना कसे वाटले असेल, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला. (गुंडोपंतांशी बोलताना आम्ही पूर्ण कपडे घातले होते, हे येथे, का कुणास ठाऊक, नमूद करावेसे वाटते ;-)

आम्हाला आता एक नवीन प्रकल्पाची दिशा ठरवण्याची प्रेरणा झालेली आहे. पण हल्लीच्या ८ ते १४ वयोगटातल्या मुलांना काय आवडते, हे अचूक कळण्याइतका आमचा सँपल साईझ जास्त नाही (दोनच ;-)

आम्ही ही कल्पना एका अनुभवसमृद्ध उपक्रमी मित्राला (व्यनितून) बोलून दाखवली. त्यांचे उत्तर असे:

आपण लहान मुलांसाठी जे संकेतस्थळ काढणार आहात ते कोणत्या भाषेत आहे? मराठी असेल तर ते चालण्याची अजिबात शक्यता नाही.कारण माझ्या घरच्या अनुभवावरून सांगतो की हल्लीच्या पिढीला महाजालावर मराठीत काही वाचण्याची खास आवड नाही. मराठी वृत्तपत्र आणि खास गाजलेली पूस्तके ह्या व्यतिरिक्त कुणी जास्त काही वाचण्याच्या भानगडीत पडत नाहीत!दूरदर्शनच्या असंख्य वाहिन्या,त्यावरील कार्टून्स ह्यामधे ही मुले इतकी गुंतलेली आहेत की विचारायची देखिल सोय नाही.
तरीही आपल्या संकल्पाला माझ्या शुभेच्छा!

त्यांना मी उत्तर पाठवले ते असे:

मला एक मान्य आहे की मराठी मुले कार्टून्स च्या आहारी गेलेली आहेत.
पण मला इथे काय चित्र दिसते, सांगतो.
दर शनिवारी सकाळी नऊ वाजता ५०-१०० मैल ड्राईव्ह करून मुलांना महाराष्ट्र मंडळाच्या बालविहाराला घेऊन जाणारे पालक मला दिसतात. मराठी नाटकात आपल्या मुलांना काम करण्याची संधी मिळावी, म्हणून धडपडणारे पालक दिसतात. गाण्याच्या क्लासला, नाचाच्या क्लासला स्वतःचा वेळ आणी पैसे खर्च घालून मुलांना नेणे-आणणे करणार्‍या मराठी आया दिसतात. गेल्या उन्हाळ्यात मी आणि बायकोने मुलांना देवनागरी लिपी लिहायला आणि वाचायला शिकवली. पण एका वर्षात कार्टी (अत्यंत प्रेमानेच म्हणतोय) विसरली. त्यांना नवनवीन गोष्टी वाचायला मिळाव्यात ह्या स्वार्थापोटी हे संकेतस्थळ उघडण्याचा विचार आहे.
टार्गेट ऑडियन्स हा भारतातली मराठी मुले नाहीत, तर अमेरिकेतली मराठी मुले आहेत :-)

असे सगळे लिहून देखील, ह्या संकेतस्थळाचे स्वरूप कसे असावे, ह्याबद्दलचे अनेक प्रश्न मनात आहेत अजूनही.

तुम्हाला काय वाटते ?

असे संकेतस्थळ तयार व्हावे का ? असे संकेतस्थळ तयार केले, तर त्याचे स्वरूप कसे असावे ?

ह्यावर खूप सुसंबद्ध प्रतिसाद येतील अशी आशा आहे. माझा विरस करू नका :-)

वाढवू

तर अमेरिकेतलीच नाही तर जगभर मराठी मुले पसरली आहेत. आणी अजूनही पसरतील. त्यांना ही याचा निश्चित उपयोग होईल ही आशा आहे.

या साईटमधून त्यांचे नेटवर्किंगही साधावे असे होवू शकेल का?

भाषा 'पुर्ण मराठी' न ठेवता 'मिंग्लिश' असावी का?

आपला
गुंडोपंत

त्यांनाच ठरवू द्यावे

गुंडोपंत,

भाषा कोणती असावी हे ठरवणारी मुलेच असावी. आपण फक्त एक करायचे की ह्या संकेतस्थळावर इंग्रजीत टंकन करणे कठीण करायचे, म्हणजे आपसूक देवनागरीत टंकन करतील मुले. तसे चालेल ना ? मिंग्लिश मध्ये केले टंकन तरी देवनागरी लिपी वाचण्याची लिहिण्याची सवय होईलच.

- युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

नेटवर्किंग

गुंडोपंत,

आपल्या प्रतिसादातल्या "नेटवर्किंगच्या आयडियात" खूपच दम आहे. ह्या वयातील मुलांना पीयर प्रेशर खूप असते. त्यामुळे एका भाषेत बोलणार्‍या, एका लिपीत लिहू शकणार्‍या जगभर विखुरलेल्या मुलांशी नेटवर्किंग झाले, तर ह्या "प्राचीन" बोलीत बोलणारी, लिहिणारी आपल्यासारखीच इतर मुले आहेत, हे पीयर प्रेशर त्यांना उपयुक्त ठरेल, असे वाटते.

(ता. क. मी मुले असा शब्द "मुले आणि मुली" ह्यासाठी वापरतोय, हे कृपया लक्षात घ्या. धन्यवाद.)

- युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

काय गुंडोपंत...

तीन तीन प्रतिसाद ! हा काय प्रकार आहे? रात्री नीट लागली ना झोप?

प्रतिसाद चुकुन तीन वेळा झाला आहे

प्रतिसाद चुकुन तीन वेळा झाला आहे... कसा काय काही कळत नाही!?
मला तर एकदाच सांगायचे आहे... परत म्हणाल तीनतीनदा तेच ते सांगताय... ;)

स्वप्न आणि सत्य

युयुत्सु, हिच कल्पना आम्ही काहि काळापुर्वी गणित या विषयला धरून बोललो होते तेंव्हा तो थट्टेचा विषय झाला होता. अर्थात आम्हाला वाईट वाटले नाही कारण अशा प्रत्येक प्रकल्पाची सुरवात थट्टेतुन अथवा नकार घंटेतुन होते याची आम्हाला पुर्ण जाणीव आहे.
हि कल्पना उत्तम आहे यात वाद नाहीच. मुद्दा एवढाच आहे कि जे काही असावे ते नक्कि कसे असावे? त्याचा प्रसार/प्रचार कसा करावा? होणारे हे संस्थ हे नव्या संस्थसाठी मार्गदर्शक असावे इत्यादी... असे अनेक विचार आहेत. मला वाटत कि आपण टप्प्या टप्प्यात आणि नियंत्रीत चर्चा करू. आमचा तुम्हाला सक्रिय पाठिंबा राहिल...




मराठीत लिहा. वापरा.

चालेल

मला वाटत कि आपण टप्प्या टप्प्यात आणि नियंत्रीत चर्चा करू.

चालेल. टप्पे ठरवूयात. पहिल्या टप्प्यात आपण ह्या संकेतस्थळावर एकमेकांत संवादाची सोय असावी का, ह्या विषयी चर्चा करूयात. दुसर्‍या टप्प्यात ह्या संस्थवर लेखन आमंत्रित असेल, की अनाहूत ह्याचा विचार. तिसर्‍या टप्प्यात ह्या संकेतस्थळाचा खर्च दानातून होईल, की जाहिरातींतून ह्याची चर्चा.

पण आपण मारे टप्पेबिप्पे ठरवले, तर ते विचारी सदस्यांवर अविश्वास दाखवल्यासारखे होईल, त्यामुळे सदस्यांना कुठल्या टप्प्याविषयी बोलायचे आहे, ते त्यांनाच ठरवू दिले तर कसे ?

बाय द वे. गणितावरच्या संस्थविषयी थट्टा नव्हती केली. आपला गैरसमज झाला आहे. आम्ही उपक्रमावर शालेय गणित शिकवण्याच्या कल्पनेची थट्टा केली होती. शालेय गणितासाठी नवीन संस्थ उघडण्याच्या विचारात असाल, तर आमचा सक्रिय पाठिंबा आपल्याला राहील, ह्याची खात्री बाळगावी.

- युयुत्सु

--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

छान

तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे.
पण आपण मारे टप्पेबिप्पे ठरवले, तर ते विचारी सदस्यांवर अविश्वास दाखवल्यासारखे होईल, त्यामुळे सदस्यांना कुठल्या टप्प्याविषयी बोलायचे आहे, ते त्यांनाच ठरवू दिले तर कसे ?
सध्या तरी आपण हि चर्चा नियंत्रीत ठेवण्याचा प्रयत्न करून. बाकि जुने विषय न उकरून काढता सध्या शालेय गणितासाठी नवीन संस्थ उघडण्याच्या विचारात असाल, तर आमचा सक्रिय पाठिंबा आपल्याला राहील, ह्याची खात्री बाळगावी. याचा जास्त विचार करतो. कदाचित या मुलांच्या संस्थ पासून याला जास्त प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल.




मराठीत लिहा. वापरा.

नक्कीच

मुलांच्या संस्थवर शालेय गणितालाही स्थान नक्कीच असेल, असे वाटते.
परंतु त्यापेक्षाही अधिक, म्हणजे आपला इतिहास, आपली भाषा, आपली लिपी ह्यांना अधिक प्राधान्य असावे असे मला सध्या तरी वाटते आहे.
माझा जो टार्गेट आडियन्स आहे (म्हणजे प्रस्तावात लिहिल्याप्रमाणे, आपली भाषा, आणि त्यातून स्रवणारी आपली संस्कृती, आणि ती प्रिय असणारी, भारताव्यतिरीक्त इतर देशांतील मुले, आणि त्याहूनही महत्वाचे, त्यांचे पालक) त्यांना मराठीतून शालेय गणितापेक्षाही इतिहास, मराठी भाषा, देवनागरी लिपी, भारतीय संस्कृती, ह्यात जास्त रस आहे, असे वाटते.

- युयुत्सु

--
मुलांच्या संकेतस्थळावर २४ पाईंटचा फॉण्ट असावा का ?

सहमत...

या संस्थवर जर काही विषेश विषयांवर लेखनाच्या स्पर्धा घेतल्या ज्यामध्ये मराठी हाताने लिहिणे (हस्त लिखित स्कॅन करून पाठवणे) अनिवार्य ठेवले तर कसे? तसेच चर्चा विषय ज्यामध्ये जगभर पसरलेल्या मराठी मुलांना तसेच भारतातल्या मराठी मुलांना विचारांची तसेच येथे कसे आहे आणि तेथे कसे आहे याची देवाण घेवाण करता येइल. तसेच अशा देवाण घेवाण करण्यामुळे एक प्रकारची आपल्या देशा बद्दलची तसेच नवे काहितरी आत्मसात करण्याची ओढ राहील. आपले काय मत आहे?

मुलांच्या संकेतस्थळावर २४ पाईंटचा फॉण्ट असावा का ? मला वाटते हे मुलेच ठरवू देत.

संस्थचे नाव काय असावे?




मराठीत लिहा. वापरा.

मस्त !!

सांगलीच्या ज्ञानदीप फाऊंडेशनने (रानडे काकांनी) अशी स्पर्धा (मराठीतून विज्ञानाविषयी लिहिण्याची) ठेवली होती. त्याला खूपच यश मिळाले, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा स्पर्धा व्हाव्यात, हे नक्कीच !
धन्यवाद.

- युयुत्सु

(ता. क. देवनागरी लिपी वगैरे असे तांत्रिकदृष्ट्या बरोबर लिहिण्याऐवजी, आपले "मराठी हाताने लिहिलेले" आवडले.)
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

प्रमोदकाका

आम्ही ही कल्पना एका अनुभवसमृद्ध उपक्रमी मित्राला (व्यनितून) बोलून दाखवली

सदर मित्राने त्याचे नाव वापरण्याची परवानगी आम्हाला दिलेली आहे. त्यांचे नाव प्रमोदकाका. (ते उपक्रमावर ज्या टोपणनावाने वावरत आहेत, त्याचा अर्थ त्यांच्या आम्हाला असलेल्या परिचयाविरुद्ध आहे. त्यामुळे आम्ही ते टोपणनाव कधीही वापरणार नाही.)

असो, विषयांतराबद्दल क्षमस्व. कृपया आपले प्रतिसाद मूळ चर्चेच्या विषयाशी संबंधित असावेत, ही माफक अपेक्षा.

- युयुत्सु

--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

उत्तम

कल्पना आहे. एवढंच नाही, तर ती काळाची गरज आहे असेदेखील म्हणता येईल. येथील स्थानिक महाराष्ट्र मंडळात काम करताना - 'आता तुम्ही भारतातून आलेली मंडळी काय कराल तेच. आमची मुलं याबाबत (मराठी कार्यक्रम वगैरे) काही करतील असं वाटत नाही' या स्वरुपाच्या प्रतिक्रिया बर्‍याचदा ऐकायला मिळाल्या. त्यामुळे असा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

[लॉस एंजेलिस का सॅन होजे, आता नक्की आठवत नाही; पण त्या शहरातील एका बाईंनी मुलांनी मराठी शिकावे यासाठी काही खेळणी/प्रॉडक्ट्स तयार केली होती, आणि त्यांचा कक्ष (स्टॉल) आमच्या कार्यक्रमात लावला होता हे आठवते.]

दुसरे महत्त्वाचे म्हणजे, कितीही चांगले संकेतस्थळ (माहिती आणि मनोरंजनाचा योग्य मिलाफ असणारे) तयार केले, तरी जोवर मुलांना स्वतः त्याला भेट द्यावीशी वाटत नाही, तोवर त्याचा उद्देश सफल होणार नाही. या संकेतस्थळात त्यामुळे पालकांसाठीही एक विभाग असावा - ज्यात मुलांना मराठीची गोडी कशी लावता येईल याबद्दल मार्गदर्शन असावे. कॅलिफोर्निया, पूर्व किनारा, टेक्सस वगळले तर जिथे मराठी भाषक अगदीच कमी आहेत, अशा ठिकाणी पालकांचे काम अधिकच कठीण आहे. हे संकेतस्थळ मग त्यांना मार्गदर्शक ठरू शकेल.

या कामात शक्य होईल तेवढी मदत मी करेन. अनेक उपक्रमीही यात हातभार लावतील, याची खात्री वाटते.

ऑन द डॉट

या संकेतस्थळात त्यामुळे पालकांसाठीही एक विभाग असावा - ज्यात मुलांना मराठीची गोडी कशी लावता येईल याबद्दल मार्गदर्शन असावे.

परफेक्ट !!!

ह्याविषयी अधिक विषयांतर न करता, एक हल्लीचा अनुभव सांगतो. सलील कुळकर्णी आणि संदीप खरे ह्यांचा काव्यगायनाचा कार्यक्रम अमेरिकेत सर्वत्र (सप्टेंबर- ऑक्टोबर २००७) करायचा आम्ही सध्या प्रय्त्न करतोय. (सॅन डियेगो ममं ला हवा असल्यास मला कळव, नंदन). त्यात न्यूयॉर्क, न्यू जर्सी, शिकागो, अटलांटा, डॅलस, आणि बे एरिया, एवढ्याचा कार्यक्रमांत संयोजकांना त्यांच्या संयोजनाला लगणारा खर्च वसूल करण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी म्हणजे, इंडियानापोलिस, कॅन्सस सिटी, सेण्ट लुईस वगैरे ठिकाणी मराठी समुदाय इतका नाही, की एक कार्यक्रम आर्थिक दृष्ट्या यशस्वी ठरू शकेल. पण ह्या ठिकाणी (इतर ठिकाणच्या किंमतीतच) इण्टरनेट उपलब्ध आहे. त्यामुळे सॅन होजे वरून उपक्रम वाचायला जितका खर्च होतो, तितकाच रॉजर्स आर्कान्सॉ वरून. विश्वजाल इज अ लेव्हलर !!!!

- युयुत्सु

--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

काय असावे

संकेतस्थळाच्या मजकूराची सुरुवात बालकथा, रामायण/महाभारतातल्या मुलाना झेपतील अशा मनोरंजक कथा,भारतातील/चीन/जपान/रशियातील/युरोप अमेरिकेतील प्रसिद्ध आणि रंजक लोककथा याने करता येईल.(असे वाटते.)
शिवाय या संकेतस्थळावर चित्रे असा एक वेगळा विभाग ठेवता येईल जिथे त्यानी काढलेली चित्रे स्कॅन करुन त्याना टाकता येतील.(काढलेले/आंतरजालावरचे फोटो नव्हेत..)
सोप्या भाषेत सोपी मराठी कोडी ठेवता येतील.
(हे सर्व 'मी करणार आहे/मला सहज जमेल' असा दावा मी केलेला नाही.बालसाहित्य सरस लिहू शकणारी व तसे प्रयोग केलेली अनेक मंडळी शोधल्यास सापडू शकतील.)

बस, असेच !!!

उत्कृष्ट प्रतिसाद. मुद्दे टिपून घेतलेले आहेत. विशेषतः इंग्रजीतल्या कथा मराठीतून वाचायला मिळाल्यास, लिपी, भाषा, आणि संकल्पना ह्यातील फक्त दोनच व्हेरिएबल्स बदलतील, तिसरा म्हणजे "संकल्पना" हा व्हेरिएबल स्थिर असेल. अन्यथा ह्या मुलांना तीनही व्हेरिएबल्स बदलले तर खूप कठीण जाते, असा अनुभव आहे.

- युयुत्सु

(संबंधितः माझी मुलगी झी टीव्ही वरची "रावण" ही मालिका नियमीतपणे बघते. अर्थातच त्याच्या खाली इंग्रजीत "सबटायटल्स" असतात म्हणून :-( पण परवा टिव्होचे पॉझ बटण दाबून डिक्शनरी घेऊन आली. सबटायटल्स मधल्या कुठल्या तरी कठीण शब्दाचा अर्थ बघायला. ह्या सबटायटल्स करणार्‍यांनी "अर्थ थोडाफार बदलला तरी चालेल, पण मुलांना कळतील असे शब्द वापरावे", अशी भूमिका का घेऊ नये?)

--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

चिंटू

चिंटू या संस्थवर असण्या बद्दल काय मत आहे? तसेच जागतिक बाल समाचार?
मला वाटत कि मराठी मुलांना ग्लोबल आणि आत्मविश्वासपुर्ण बनवायला हे संस्थ नक्किच एक मैलाचा दगड ठरेल.




मराठीत लिहा. वापरा.

मस्त

आत्ताच "टाईम फॉर किड्स" ह्या टाईम मॅगेझिनने मुलांसाठी सुरू केलेल्या नियतकालिकाचे जुने अंक चाळत होतो.
उत्कृष्ट आहेत. मराठीत असे काहीतरी असावे, ह्याची उबळ आली आहे.

- युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

चिंटू

चिंटू ह्या संस्थ वर नक्की असावा. चिंटूच्या निर्मात्यांनी सकाळशी एक्स्क्लुझिव्ह कॉण्ट्रॅक्ट केलेला आहे का ?
तसे असल्यास मुलांना "अपील" होणारी इतर व्यंगचित्रे कोणती ?
ह्या संस्थवर बालगीते असावीत का ?
(वरील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, बालगीतांचे एक संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी ह्यांचे कार्यक्रम आम्ही सप्टेंबर मध्ये अमेरिकेत आयोजित करतोय. त्यांच्याशी ह्याविषयी बोलून ठरवता येईल.)

- युयुत्सु

--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

चिंटूचे

चिंटूच्या निर्मात्यांशी संपर्क साधावा लागेल. बघु जमत का ते...




मराठीत लिहा. वापरा.

धन्यवाद..

सदर संकेतस्थळ उघडण्याची तारीख आपण व्यनितून ठरवूच. अर्थातच एक तरी व्यक्ती भारतातून अशा प्रकारच्या (म्हणजे चिंटूच्या निर्मात्यांशी बोलायच्या, वगैरे) घडामोडी सांभाळायला आवश्यक आहे, असे वाटते.

दानातून अथवा जहिरातीतून, ह्या संकेतस्थळाला लागणार निधी गोळा करावा, असे म्हटलेले आहेच. त्यात "वर्गणी" हादेखील पर्याय अंतर्भूत करावा. आताच अशा (इंग्रजीतल्या) संकेतस्थळांच्या फेरफटक्यात असे लक्षात आलेले आहे, की सदस्यांकडून वर्गणी घेणारी स्थळे, अधिक कार्यप्रवण असतात.

अमेरिकेत राहणार्‍यांना प्रति मुलाला वर्षाला १० डॉलर, आणि भारतात राहणार्‍याला प्रतिवर्ष ३०० रुपये, अशी वर्गणी ठेवली, तर हे संस्थ चालवण्याचा खर्च सोडून बालवाङ्मयकारांना काहीतरी मानधन आपण देऊ शकू का ?

- (सहमतीने प्रेरित) युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

हो

हो, मला सुद्धा हे पटते. त्यात भर म्हणून विचारतो. जर असे काही दानत या सदराखाली घेतल्यास, पालकांना आयकत करात सवलतीसाठी काही करता आले तर त्याला जास्त आर्थिक पप्रोत्साहन मिळेल असे वाटते, तसेच पालक सुद्धा ते खुशीने देतील.




मराठीत लिहा. वापरा.

त्यासाठी

त्यासाठी सदर स्थळ माझ्या आगामी विनालाभ संस्थेमार्फत चालवावे लागेल.
तीन महिने तरी लागतील ती संस्था स्थापण्याला.
चालेल ?

- युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

हरकत नाही

वेळ लागयला आणि चालायला काहीच हरकत नाही. फक्त आपण नक्कि काय करणार आहोत हे आपल्यालाच पक्के असणे गरजेचे आहे. तसेच सगळ्या कायदेशीर बाबी, भविष्यातील विचार आणि वाटचाल याचा सुद्धा विचार हवा...




मराठीत लिहा. वापरा.

सहमत

कायदेशीर बाबींची जबाबदारी मी घेतली.

अर्थातच सदस्य होणार्‍या प्रत्येक मुलाचे वय "व्हेरिफाय" करण्याची शक्यता अजीबात नाही. पण समजा अशा सदस्य असलेल्या मुलाने "प्रौढासारखे" वर्तन केले, तर त्याच्या पालकसदस्यांना हाणणे, ह्याव्यतिरीक्त चालकांच्या हातात काय उरते ?

असा विचार मनात येऊनच वर्गणीधारक सदस्य असावेत, अशी भावना निर्माण झाली. म्हणजे आपल्या आई वडिलांचा क्रेडिट कार्ड क्रमांक संकेतस्थळचालकांच्या हातात आहे, आणि त्यावर ते चालक गुन्ह्याचे शुल्काधारण करू शकतात ही भावना.

- (सर्व मुद्दे अद्याप विचाराधीन) युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

हे मुद्दे

हे मुद्दे सुद्धा महत्वाचे आहेतच. सदस्यत्व देताना पालकांचा इ-पत्ता तसेच संपर्काचे सर्व मुद्दे असणे गरजेचे आहे. हे संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे फार गरचे आहे. मला वाटत याचा जर SWOT Analysis केला तर तो पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरेल. काय म्हणता?




मराठीत लिहा. वापरा.

बरोबर

हे संकेतस्थळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणे फार गरचे आहे

अगदी बरोबर.
ह्यात इतर संकेतस्थळांवरून इतर कुठेही नेणार्‍या जहिराती नसाव्यात.
म्हणजे गूगलसारख्या संकेतस्थळांच्या जाहिराती न ठेवता (ज्यावर आपला काहीही कण्ट्रोल नाही), मुलांसाठी उपयुक्त म्हण्जे डिस्ने, निक ज्युनियर, फनब्रेन अशाच जाहिराती फारफार तर असू शकतात.

- युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

हो..

आणि काही भारतीय सुद्धा...




मराठीत लिहा. वापरा.

चॅरिटी कमिशनर!

जर असे काही दानत या सदराखाली घेतल्यास, पालकांना आयकत करात सवलतीसाठी काही करता आले तर त्याला जास्त आर्थिक पप्रोत्साहन मिळेल असे वाटते, तसेच पालक सुद्धा ते खुशीने देतील.

त्याकरता सदर संस्थळ चॅरिटी कमिशनर कडे नोंदणीकृत असावे लागते.

त्याचप्रमाणे,

१) ह्या संकेतस्थळाचा जुरिसडिक्शन काय? म्हणजे त्याप्रमाणे कुठल्या चॅरिटी कमिशनरच्या कार्यालयात अर्ज करावा लागेल हे कळेल.
२) हे संस्थळ हे खाजगी न्यास असेल की सार्वजनिक? ते चॅरिटी कमिशनरला कळवायला लागेल. ३) संस्थळ चालकांच्या सभा, त्याची मिनिटस् व लेखा यासर्व गोष्टी जवळजवळ तीन वर्षांकरता चॅरिटी कमिशनरला दाखवायला लागतील त्यानंतरच सेक्शन ८० जी वरील 'दानत' ही आयकर सवलत मिळेल असे वाटते!

आपला,
(सचीव!) तात्या.

धन्यवाद

माहितीबद्दल धन्यवाद.
येथे देखील अशा प्रकारची सव्यापसव्ये करावी लागतातच.
पण ती पुढची पायरी झाली.
प्रस्ताव विचाराधीन आहेच.

- युयुत्सु

--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

चिंटू

चिंटू च्या संस्थ. वर कळते की रोजचा चिंटू फुकट मिळवायला संपर्क साधता येतो. म्हणजे यातून असे वाटते:
१. चिंटूचा फुकट(योग्य तो ऋणनिर्देश करुनच) वापर केल्यास त्यांची ना नसावी.
२. मेलद्वारे रोजचा चिंटू म्हणजे त्यानी आर एस एस फीड टाकले असावे.
३. जर काही तंत्रज्ञान वापरुन रोज चिंटूचे फीड वापरुन हा ताजा चिंटू आपोआप(मानवी मदतीशिवाय) रोज बालविहारावर येईल असे काही करता आले तर? मराठीब्लॉग्स डॉट नेट वाले तसंच काहीतरी करतात ना?

फीड

ही तर मस्तच कल्पना आहे. म्हणजे चिंटू राहील त्यांच्याच स्थळावर. पण आपण आर एस एस फीड घेऊन त्याला बालविहारावर दाखवू शकू.
ह्यातून असे अनेक चिंटू निर्माण व्हावे, ह्यासाठी काय करावे ?

- युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

अर्थात

'आम्ही तुमच्या आर एस एस फीड' चा वापर करतो आहोत याबद्दल चारुहास पंडित व प्रभाकर वाडेकर यांची परवानगी मिळाली तरच.

नक्कीच

सदर संकेतस्थळ भावी पीढीवर संस्कार करण्याच्या दृष्टिकोणातून बनवण्याचा विचार असताना, कुणाचेही साहित्य ढापणे तिथे अर्थातच नसावे. त्यावर अवतीर्ण होणारे सर्व साहित्य प्रताधिकार कायद्याचे अवलंबन करणारे असावे. नाही का ?

- युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

वा वा!

वा वा!
काय सुरेख विचार प्रवर्तक प्रतिसाद येत आहेत या चर्चेला.
खुपच मस्त वाटले
इतक्या लोकांना यात रस आहे हे पाहून.

चित्रांच्या इ-ग्यालरीची आयडिया मस्त आहे.

मात्र याच वेळी संस्थळावर भारतातली मुले हा विचार पण व्हायला पाहिजे.
कारण मुले जगात कुठेही असली तरी त्यांना आवडाणारे विषय हे बहुतेक वेळा सारखेच असतात. उदा. नेमो किवा श्रेक हे भारतातही तितकेच लोक(मुले)प्रिय आहेत जितके इतर जगात. (हे अगदीच उथळ उदा. आहे पण दुसरे सुचलेही नाही)

आपला

आनंदीत
गुडोपंत

बालविहार

बालविहार.कॉम ह्या संकेतस्थळाची नोंदणी मी आत्ताच केलेली आहे. ह्या संकेतस्थळाच्या संचालक मंडळावर चाणक्य, अनु, गुंडोपंत आणि नंदन ह्यांची नेमणूक त्यांच्या प्रतिसादांवर आधारित राहून केलेली आहे. (अर्थातच पाचवा संचालक, मी.) आणखी कुणाला सदर संकेतस्थळात रस असेल, तर मला कळवा.

- युयुत्सु

--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

संपादक मंडळ!

ह्या संकेतस्थळाच्या संचालक मंडळावर चाणक्य, अनु, गुंडोपंत आणि नंदन ह्यांची नेमणूक त्यांच्या प्रतिसादांवर आधारित राहून केलेली आहे.

छान! ;)

आणखी कुणाला सदर संकेतस्थळात रस असेल, तर मला कळवा.

आम्हाला या संस्थळावर येऊन मुलांचे लेखन, खास करून परकीय देशात राहणार्‍या, परंतु भारतीय वंशांच्या मुलांचे मराठी लेखन वाचण्यास नक्कीच रस असेल!

आपल्या संस्थळाला आमच्याही अनेकोत्तम शुभेच्छा!

तात्या.

आपण कुठे राहता...

संस्थचे मुख्य पृष्ठ उघडताच, आपण कुठे राहता हा प्रश्न विचारल्यास त्या नुसार संस्थची दिशा बदलायला मदत होईल. समजा, मी (येथे मी लहान मुलाच्या भुमिकेतुन बोलतो आहे) जर्मनी मध्ये राहतो, आणि मी जपानमध्ये राहतो आणि मी भारतात राहतो, त्यानुसार बालसुलभ कल्पनांचा विचार करून संस्थला दिशा दाखवता येईल. काहि गोष्टी सामायिक असतील तर भौगोलीक फरकामुळे काही वेगळे. तसेच याचा फायदा आंग्ल, मराठी आणि जिथे आहे तिथली भाषा यांची सांगड घालण्यास नक्कि मदत होइल. जसे कि जर एखादे मुल जर्मनीत मोठे होत असेल तर त्याला आंग्ल भाषा तितकिच दुरची असेल जितकी मराठी. थोडक्यात लहान मुलांना बहुभाषीक बनवण्यास मदत व्हावी हा मुळ हेतु....




मराठीत लिहा. वापरा.

इण्टरेस्टींग कन्सेप्ट

थोडक्यात लहान मुलांना बहुभाषीक बनवण्यास मदत व्हावी हा मुळ हेतु...

सुंदर !!!
हेतु आवडला !
पण ह्याचा अर्थ सगळ्या लिपींतून ह्या संकेतस्थळावर संवाद साधण्याची साधने द्यावी लागतील.
आणि त्यामुळे जे सोपे आहे, (रोमन लिपीत लिहिणे) तेच करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल असे नाही वाटत ?

- युयुत्सु

--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

लांबचा पल्ला

आपण म्हणता आहात तो खुपच लांबचा पल्ला ठरेल. निदान आत्ता तरी. मला वाटते कि जसे आपण येथे लेखन करताना काही समुदायाअंतर्गत करतो तसा काही प्रकार. या क्षणी विस्ताराने सांगणे जरा जमत नाहिये. संकल्पना जरा विस्तारता आली तर लिहिनच...




मराठीत लिहा. वापरा.

वेगळे संकेतस्थळ कशासाठी?

'उपक्रम' या संकेतस्थळाची पुनर्रचना केल्यास त्यातील काही भाग 'बालकांसाठी उपयुक्त' म्हणून बाजूला काढून ठेवता येईल. स्वप्नरंजन, रुसवे फुगवे, बालीशपणा हे बालसाहित्याला आवश्यक घटक इथल्या काही लेख, चर्चांमध्ये वगैरेही सापडतातच.
ऐहिक

अनुल्लेख

आपण सदर चर्चाप्रस्तावाचे शेवटचे वाक्य वाचलेले दिसत नाही.

- युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

वेगळे संकेतस्थळ कशासाठी?

'उपक्रम' या संकेतस्थळाची पुनर्रचना केल्यास त्यातील काही भाग 'बालकांसाठी उपयुक्त' म्हणून बाजूला काढून ठेवता येईल. स्वप्नरंजन, रुसवे फुगवे, बालीशपणा हे बालसाहित्याला आवश्यक घटक इथल्या काही लेख, चर्चांमध्ये वगैरेही सापडतातच.
ऐहिक

वेगळे संकेतस्थळ कशासाठी?

'उपक्रम' या संकेतस्थळाची पुनर्रचना केल्यास त्यातील काही भाग 'बालकांसाठी उपयुक्त' म्हणून बाजूला काढून ठेवता येईल. स्वप्नरंजन, रुसवे फुगवे, बालीशपणा हे बालसाहित्याला आवश्यक घटक इथल्या काही लेख, चर्चांमध्ये वगैरेही सापडतातच.
ऐहिक

वेगळे संकेतस्थळ कशासाठी?

'उपक्रम' या संकेतस्थळाची पुनर्रचना केल्यास त्यातील काही भाग 'बालकांसाठी उपयुक्त' म्हणून बाजूला काढून ठेवता येईल. स्वप्नरंजन, रुसवे फुगवे, बालीशपणा हे बालसाहित्याला आवश्यक घटक इथल्या काही लेख, चर्चांमध्ये वगैरेही सापडतातच.
ऐहिक

बालसाहित्य

एकदा गोविंद तळवळकर हे म.टा. चे संपादक असताना कुठल्यातरी साहित्याला बालसाहित्य म्हणून हिणवले. त्यावर त्यानी बालसाहित्याला हिणवले म्हणून सर्वांनी टीकेचा भडिमार केला होता. चांगले बालसाहित्य चांगले नागरिक घडवण्याचे काम करते.

प्रकाश घाटपांडे

सुंदर कल्पना

कल्पना छान आहे. भाषेची गोडी लावण्यासाठी हे अगदी योग्य वय असते. यामध्ये गोष्टी, कविता, विज्ञानातील गमतीजमती, सृष्टीतील विविधता, विनोद असे अनेक भाग असू शकतील. खरडवही असल्यास मुलांना एकमेकांशी संपर्क साधण्यात मजा येईल. (पूर्वी पेनफ्रेंड होते तसे) रवींद्रनाथांनी मुलांना भाषा शिकवण्यासाठी हजारो बालगीते लिहीली होती, यात निसर्ग, फुलपाखरे, हिवाळा, पावसाळा इत्यादींबरोबर निसर्गाची बदलणारी रूपे अशा अनेक गोष्टींमधून मुलांना हसतखेळत भाषा शिकवली होती. मराठीत असे लिखाण फारसे नाही. आपल्यामध्ये बरेच उत्तम कवी आहेत, त्यांनी या दिशेने विचार केल्यास चांगले.

मुलांमध्ये उपजत अनेक गुण असतात. कुणाला चित्रकला, कुणाला संगीत. हे ओळखण्यासाठी काही केले तर पालकांनाही आपल्या मुलांना ह्यात गती आहे हे कळण्यास मदत होईल. ह्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे मुलांच्या कल्पनाशक्तीला पूर्ण स्वातंत्र्य असावे. कदाचित तुम्हाला काय करायला आवडते यासारख्या विषयांवर त्यांना लेखन करायला प्रवृत्त करता येइल.

ह्या आत्ता आठवलेल्या विस्कळीत कल्पना. पुढे जसे आठवेल तसे सांगतोच.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

दोन बाबी

१. मुलांना अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना सांगणे. आपले बाबा-आई आपल्यासाठी प्लेस्टेशन आणतात, ते किती पैशांचे, आणि ते पैसे येतात कुठून ? हे कळणे महत्वाचे. ह्याविषयी मराठीत कोण लिहिते ?

२. मुलांचे एकमेकांमधले खरडवहीतले संवाद त्यांच्या पालकांना कळावेत का ?

- युयुत्सु
--
माहितीपूर्ण लेखन जर मनोरंजक नसेल तर बर्‍याच लोकांना कंटाळा येतो. मनोरंजक लिहा !

राजीव तांबे

मराठीत आत्ता याघडीला मुलांसाठी लिहिणार्‍या मोजक्या लेखकांत 'राजीव तांबे' आहेत. 'बरं का, मुलांनो' छाप न लिहिता समजेल अशा सरळ भाषेत ते लिहितात. अर्थशास्त्राच्या संकल्पनेविषयी (मुलांना समजावण्यासाठी) त्यांनी काही लिहिले असल्यास माहीत नाही, पण ते यासाठी सर्वात योग्य ठरतील असं वाटतं.

राजीव तांबे

राजीव तांबे हे साधना साप्ताहिकात बाल साहित्य लिहितात. इथे शेवटी त्यांचे बालसाहित्य आहे.
प्रकाश घाटपांडे