मराठी अनुवादकांसाठी

नमस्कार मंडळी,

साहित्याचा अनुवाद, तांत्रिक भाषांतर, यंत्रसिद्ध भाषांतर (मशीन ट्रान्स्लेशन) अशा विविध विषयांत रस असलेल्या व्यावसायिक व हौशी अनुवादकांना एकत्र आणून त्यांच्यात अनुवादविषयक विचारांचे आदानप्रदान घडवून आणावे या उद्देशाने https://groups.google.com/forum/?hl=en&fromgroups#!forum/marathi-anuwadak हा गुगलग्रुप निर्माण करण्यात आला आहे. हा कट्टा आंतरजालावर असल्याने, सदस्यांना फारसा वेळ व श्रम खर्च न करता इतर अनुवादकांपर्यंत पोहोचता येईल व त्यांच्यातील चर्चेला गती प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.

या कट्ट्यावर पुढील स्वरूपाची पत्रे पाठवता येतील-
१. अडलेल्या शब्दांची/वाक्यांची भाषांतरे सुचवण्याची विनंती.
२. स्रोत संहितेतले न कळलेले शब्द, सांस्कृतिक संदर्भ यांचे अर्थ वा यांबद्दल अधिक माहिती पाठवण्याची विनंती.
३. अनुवादकांसाठीच्या कार्यशाळा, अनुवादकांनी चालवलेल्या अनुदिनी, अनुवादासंबंधीची पुस्तके, शब्दकोश यांबद्दलची माहिती.
४. अनुवादप्रक्रियेचा एखादा पैलू, अनुवादनातील एखादी विशिष्ट समस्या (उदा. विशेष नामांचे भाषांतर वा लिप्यंतर) यांविषयीचे विचार व त्यावर अधिक चर्चा करण्याचे आवाहन.
५. एखाद्या प्रकाशित अनुवादाचे परीक्षण वा त्यावरील मते.

अनुवादासारख्या रोचक विषयावर आपल्याकडे बोलण्यासारखे खूप असेल हे नक्की. त्यामुळे मराठी अनुवादकांच्या या इ-कट्ट्यावर सर्वांचे स्वागत आहे. येथे सदस्यत्व घेण्यासाठी जीमेल आयडीने लॉग इन करून https://groups.google.com/forum/?hl=en&fromgroups#!forum/marathi-anuwadak या दुव्यावर जावे व "Apply to join group" यावर टिचकी मारावी.

धन्यवाद.

Comments

भारतीय लेखिका मालिका

राधिका, मला काही कट्ट्यावर जाता आले नाही.
भारतीय लेखिका मालिकेतील पुढील संचातील पुस्तकांची अनुवादासाठी निवड मी नुकतीच पूर्ण केली आहे.
पहिल्या संचात ३ व दुसर्‍या संचात ११ पुस्तके मराठीत आणली आहेत. एकूण ४० पुस्तके करायची आहेत.
मनोविकास प्रकाशनासाठी मी हा प्रकल्प करते आहे.
तुमचे हे आवाहन वाचल्यानंतर वाटले की यातून कदाचित काही नवे, चांगले अनुवादक मिळू शकतील.
आत्ताही माझ्या परीने मी जे अनुवादक शोधले आहेत, त्यांतले ३ नवे आहेत.
नव्या संचात प्रामुख्याने आत्मपर लेखन ( आत्मचरित्र, आठवणी, पत्रव्यवहार, अनुभव कथन इ.) आणि कादंबरी हे दोन फॉर्म निवडले आहेत.
ज्यांना रस असेल, त्यांना माझ्या kavita.mahajan2008@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधण्यास सांग.

 
^ वर