पुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे?

नमस्कार मित्रांनो,

तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात?
खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना?

तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?
अगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.

तर आपल्या आवडत्या बालभारतीने पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके पीडीएफ स्वरुपात आणि तेही सर्व माध्यमांतील (मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, इत्यादी) उपलब्ध करुन दिलेली आहेत. आहे की नाही मज्जा? :)

येथे टिचकवा आणि हवी ती शाळेतील पुस्तके उतरवून घ्या

या पानावर टेक्स्ट बुक लायब्ररी हा पर्याय आहे त्यावर टिचकवा आणि पीडीएफ फुकट उतरवून घ्या

मी सध्या आठवीचे बालभारती वाचतो आहे ;)

तुम्ही???

बालभारती

Comments

सही!!

मी गेल्याच चर्चेत म्हटले की लहान मुलांच्या वाचनाची पुस्तके मला हवी आहेत पण बालभारती मिळणार असेल तर अत्युत्तम. अतिशय आनंद झाला.

तुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात?
खूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना?

नाही तसे काही होत नाही कारण कविता फारशा आवडत नाहीत. ;-)

तुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे?

नाही पण माझ्या मुलीने खटपटीने देवनागरी वाचणे सुरु केले आहे. तिच्याकडे फारसे पर्याय नसल्याने ती आतापर्यंत माझी पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करत होती पण ते करताना पानभर वाचल्याने तिची दमछाक होते तेव्हा तिला वाचता येतील अशी पुस्तके हवी होती.

सागर, एका चांगल्या दुव्याबद्दल आभार.

धन्यवाद

उत्तम दुव्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान

मस्त!

तुमच्या दुव्यावरुन लगेच काही पुस्तके उतरवुन पाहिली. ८वी चे विज्ञानाचे पुस्तक चाळताना लक्षात आले की मांडणी बरीच आकर्षक केली आहे. चित्रे, रंगसंगती वगैरे मुलांना आवडेल अशी केली आहे. पण पूर्वी तांत्रिक संज्ञांसाठी मराठी शब्दांसोबत कंसामधे इंग्रजी शब्दही द्यायचे. ते का बंद केले समजले नाही. विज्ञान शाखेत पुढचे शिक्षण घेऊ इच्छिणार्‍यांसाठी ते फार महत्वाचे आहे.

ही माहिती इथे दिल्याबद्दल तुमचे अनेक आभार!

वा वा वा

ही तर शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तके आहेत - अत्युत्तम!

खूप चांगला उपक्रम

पुस्तके जालावर उपलब्ध करून देणे हा अगदी प्रशंसनीय उपक्रम आहे. सगळी पाठयपुस्तके जालावर उपलब्ध झाली तर मुलांची आणि पालकांची चांगली सोय होईल.

दुव्याबद्दल धन्यवाद.

 
^ वर