त्या मोरयाची कृपा

कांही वर्षांपूर्वीची गोष्ट.त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा.साठे आमचे विभाग प्रमुख होते.ते समयदक्ष होते. वेळापत्रकानुसार असलेले आपले सर्व तास ते नियमितपणे घेत.त्यामुळे ते विद्यार्थिप्रिय होते.
एका सोमवारी कॉलेजात आल्या आल्या बातमी समजली की प्रा.साठे यांना गंभीर अपघात झाला असून ते रुग्णालयात आहेत. आणखी समजले की काल संकष्टी होती.प्रत्येक संकष्टीला चिंचवडच्या मोरया गणपतीला जाण्याचा प्रा.साठे यांचा क्रम होता. त्याप्रमाणे काल दर्शन घेऊन परत येत होते.तेव्हा त्यांच्या स्कूटरला समोरून येणार्‍या ट्रकची (का टेंपोची) धडक बसली. ते दूर जाऊन पडले. कमरेला फ्रॅक्चर झाले.
आमच्या विभागातील आम्हां दोन प्राध्यापकांना पहिली दोन लेक्चरें नव्हती.आम्ही जवळच असलेल्या रुग्णालयात गेलो.एका हाताला मनगटापासून काखेपर्यंत बॅण्डेज,प्लॅस्टर घातलेला एक पाय दोरी बांधून वर केलेला. बॅंडेजच्या पट्ट्य़ांवर पट्ट्या बांधलेल्या कमरेखाली उशांची चळत लावलेली. अशा अवस्थेत असलेले साठेसर आमच्याकडे पाहून क्षीणपणे हसले. त्यांची ती शोचनीय स्थिती पाहून मन हेलावले. अपघातासंबंधी बोलताना ते म्हणाले,
"माझी काहीच चूक नव्हती हो! काय सांगू तुम्हाला? सगळे अचानक घडले. ट्रकच्या रूपात अंगावर रोंरावत येणारा साक्षात मृत्यू मी काल पाहिला. क्षणभर वाटले आता संपले सगळे! वाचण्याची आशाच दिसत नव्हती. स्कूटरवरून दूर उडालो. पडलो तिथे शेजारीच मोठा दगड होता. त्यावर डोके आपटते तर कपाळमोक्षच झाला असता. थोडक्यात वाचलो. ही केवळ त्या मोरयाची कृपा."
शेवटचे वाक्य ऐकून मी स्तंभित झालो. वाटले केवढी ही श्रद्धा!
"सर ,तुम्ही लौकर बरे होऊन कॉलेजला यायला लागाल आणि वर्गावर जाऊन ताससुद्धा ध्यायला लागाल. काही दिवस सक्तीची विश्रांती आहे".असे काही धीराचे औपचारिक शब्द बोललो. प्रा.साठे पुन्हा क्षीण करुण मुद्रेने हसले.त्यांची परिस्थिती गंभीर दिसत होती.आम्ही दोघे परतलो.
नंतर आम्हा दोघांचे त्या प्रसंगाविषयी बोलणे झाले. शेवटी मी विचारले."वाचलो ही त्या मोरयाची कृपा असे प्रा.साठे म्हणतात ते तुम्हाला पटते का?"
"तुम्हीच पाहाना! किती गंभीर अपघात होता.जवळच्या दगडावर डोके आपटले नाही म्हणून वाचले.थोडक्यात बचावले."
"ते तर खरेच.पण ही त्या मोरयाची कृपा?"
"हो.मला तसेच वाटते.मरता मरता वाचले त्याचे दुसरे कोणते स्पष्टीकरण देता येईल?इतक्या जवळ असलेल्या दगडावर डोके आपटले नाही त्याचे अन्य कारण काय?"
""समजा डोके दगडावर आपटले असते. तर ते आपटण्याचे जे कारण तेच न आपटण्याचे कारण."
"दोघांचे कारण एकच? हे तुमचे तर्कशास्त्र अजब दिसते."
"हो.एकच स्पष्टीकरण.योगायोग,यदृच्छा.आपण वाहन चालवतो तेव्हा कित्येक संभाव्य वाटणारे अपघात केवळ योगायोगाने टळल्याचा अनुभव येतो.त्या प्रत्येक वेळी देवाची कृपा कारणीभूत असते का?"
"टळलेल्या संभाव्य घटनेविषयी मी म्हणत नाही.तो योगायोग असू शकतो.पण अगदी जीवावर बेतणार्‍या अपघातातून वाचल्यावर देवाच्या कृपेचा प्रत्यय येणे स्वाभाविक आहे."
"आपल्या भक्ताच्या अपघाताविषयी मोरयाला नेमके कधी कळले असेल? टक्कर होण्यापूर्वी की झाली त्या क्षणीच? कारण धडक तर बसलीच. डोके दगडावर आपटणार नाही एवढे मोरयाने पाहिले असे म्हणायचे का?"
"मला काही म्हणायचे नाही. मी एवढा विचार करीत नाही. देव सर्वज्ञ आहे. पुढे काय होणार ते सर्व त्याला आधी कळत असणार."
"हो ना? मग मोरयाने हा अपघात घडू कसा दिला? आपल्या भक्ताला पूर्णपणे वाचविणे देवाला अशक्य होते काय? जीव वाचला हे खरे ,पण आता अंथरुणाला खिळून आहेत. न चुकता प्रत्येक संकष्टीला श्रद्धापूर्वक मोरयादर्शन घेणारे हे निष्ठावंत भक्त किती यातना भोगत आहेत! ही त्या मोरयाची कृपा का?"
"देवाला अशक्य असे काही नाही.पण त्याची करणी अतर्क्य असते. देवाने असे का केले याचे कारण आपल्याला समजणार नाही."
"असे म्हणणे ही माझ्या मते पळवाट आहे . मुळात असत्य गृहीतक खरे मानायचे. मग त्याच्याशी विसंगत गोष्टी घडू लागल्या की आकाशाकडे डोळे लावून ’हे प्रभो विभो अगाध किती तव करणी।’ असे म्हणायचे."
"तुम्हांला नेमके काय सुचवायचे आहे ते मला समजत नाही."
"ते असूं द्या सर. आपण एका प्रसंगाचा विचार करू. काल्पनिक आहे पण अवास्तव नाही. समजा एका बसमध्ये चाळीस प्रवासी आहेत. त्यांत तीस आस्तिक असून दहा नास्तिक आहेत. दोन वेगळे गट आहेत असे नव्हे. आस्तिक-नास्तिक बसमध्ये कसेही विखरून बसले आहेत."
"तुम्हाला हे कसे समजले? तुम्ही त्या सर्वांकडून प्रश्नावली भरून घेतली होती काय?"
"अहो सर,ही काल्पनिक घटना आहे असे मी प्रारंभीच सांगितले.तसेच समजा असेही म्हणालो."
"बरे बरे! पुढे काय ते सांगा."
"दुर्दैवाने त्या बसला अपघात झाला.त्यात दहा जण मृत्युमुखी पडले.दहाजण गंभीर जखमी झाले.तर वीस जणांना कांहीच लागले नाही. हे वीस जण पूर्णपणे वाचले ही देवाची कृपा समजायची ना?"
"होय. ज्या अपघातात दहाजण दगावले. दहाजण गंभीर जखमी झाले, त्यात वीस जणांना काहीच लागले नाही ही देवाची कृपा नाहीतर काय?"
" हे वीस जण श्रद्धाळू देवभक्तच असतील असे तुम्हाला वाटते का? नास्तिकांवर देवाची कृपा होण्याचे काहीच कारण दिसत नाही."
"देव नि:पक्षपाती असतो. कुणाला वाचवताना हा आस्तिक का नास्तिक असा भेदभाव देव करीत नाही."
" भेदभाव नाही? एकाच बसमधले दहाजण निवर्तले. दहा जखमी झाले. तर वीसजण पूर्णतया वाचले. म्हणजे भेदभाव झालाच ना?"
""काय ते प्रत्येकाच्या नशिबाप्रमाणे घडले."
"प्रत्येकाचे दैव? मग देवाच्या कृपेचा प्रश्न कुठे येतो? या विचारसरणीत एकवाक्यता, तर्कसंगत सुसंगतता काही दिसत नाही."
"तुम्ही काहीतरीच प्रश्न विचारता.ईश्वरी लीला अगाध असते हेही तुम्हांला पटत नाही. मग असे काहीतरी सांगावे लागते."
"तसे नव्हे सर.तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. अनुभवी आहात. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात तुमचा हातखंडा आहे. म्हणून शंका विचारल्या. त्या विचारल्याविना मला राहावतच नाही."
"एकतर तुमची देवावर श्रद्धा नाही. अध्यात्माचे काही वाचन नाही. अभ्यास नाही. उपासना, ध्यानधारणा काही नाही. तुमच्याशी या विषयावर चर्चा करण्यात काही अर्थ आहे असे मला वाटत नाही."
"ठीक आहे सर.निघतो मी. आपला अधिक वेळ घेत नाही."...त्यांच्या केबिनमधून बाहेर पडलो.आपुला संवाद आपणाशी सुरू झाला.
"साक्षात् मृत्यू समोर दिसत होता, तरी साठेसरांचा जीव वाचला ही मोरयाची कृपा असेल का?"
"छे: ! भक्ताला देव संकटातून वाचवतो हे केवळ काल्पनिक पुराण कथांत असते. वास्तवात नसते. अपघातात कुणाचा जीव कधी वाचतो तो यदृच्छया. देवाच्या कृपेने नव्हे. देवदर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या वाहनाला अपघात होऊन कांहीजण मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या अनेकदा येतात. अपघात होणे-न होणे याच्याशी वाहनात कोण प्रवासी आहेत याचा काही संबंध असूंच शकत नाही. अपघात देव घडवत नाही. अपघातातून देव वाचवत नाही. हेच तर्कसंगत दिसते."
" समजा या संकष्टीला प्रा.साठे चिंचवडच्या मोरयाला गेले नसते तर अपघात झाला नसता का?"
"निश्चितपणे झाला नसता.ते मुंबई-पुणे मार्गावर गेले नसते तर हा अपघात होण्याचा संभव नव्हता."
"ते घरी असते तरी जवळपास कुठेतरी गणेशदर्शनाला गेले असते. तिथे कदाचित याहीपेक्षा अधिक भयानक अपघात घडला असता."
""असे आपले नुसते म्हणता येईल. पण तसे घडण्याची संभवनीयता अगदीच कमी वाटते."
" म्हणजे असा निष्कर्ष निघतो की--जीव वाचला ही त्या मोरयाची कृपा--यात काही तथ्य नाही. उलट प्रत्येक संकष्टीला चिंचवडच्या मोरयादर्शनाचे व्रत अपघाताला कारणीभूत ठरले.तसे व्रत अंगीकारले नसते तर आज अशा अवस्थेत रुग्णालयात पडून राहावे लागले नसते."
" होय. मला वाटते हेच सत्य आहे.प्रत्येक संकष्टीला चिंचवडच्या मोरयाचे दर्शन घ्यायचे हे व्रताचरण या गंभीर अपघाताला कारणीभूत ठरले यात संशय नाही. म्हणूनच --थोडक्यात वाचलो ही त्या मोरयाची कृपा--अशी प्रा.साठे यांची प्रतिक्रिया ऐकून स्तंभित झालो होतो."

लेखनविषय: दुवे:

Comments

हेहेहे

हा नियम सर्व संत, बापू, जी, जोतिषी, वैद्य् (होमिओपाथ, आयुर्वेद) ह्यांनादेखिल लागू पडेल. :)

हेहेहे! निरुपद्रवी संत, बापू, जी, जोतिषी, वैद्य (होमिओपाथ, आयुर्वेद) यांच्यावर "माझा" आक्षेप नाही. :प्

बाकी, बाधित होण्याचा प्रश्नच उरत नाही हे खरेच भयानक वाक्य आहे. ;-) इतकी ग्यारंटी मी देऊ नये तेव्हा वाक्य हलकेच घ्यावे

तसे स्वातंत्र्य मिळणार नाही

निरुपद्रवी भावनांना तर्क लावल्यास भावनास्वातंत्र्य बाधित होइल असे वाटते. ;)

साठेंना माठे म्हणण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे. साठेंना मोरयाला जाण्यापासून अडविले तरच साठेंचे स्वातंत्र बाधित होईल, त्यांच्यावर टीका झाल्याने त्यांचे काही स्वातंत्र्य बाधित होत असेल तर होवो.

तसेच

तुम्हाला टिका करण्याचे स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे साठेंना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असल्यास टिका अस्थानी ठरु शकते, टिका करु शकताच.

फरक

साठेंना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे

आहेच!

भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असल्यास टिका अस्थानी ठरु शकते, टिका करु शकताच.

अमान्य. टीकेला तुमच्या पार्टीने रासलीला संबोधिले आहे. टीकेचा तार्किक प्रतिवाद न जमल्यास तिला विरोध दर्शवू नये.
----
बाकी, या प्रकरणात साठेंना (आणि इतरांनाही) साठेंच्या भावनेचा उपद्रवच होणार आहे. 'मोरया संरक्षण करतो' या श्रद्धेमुळे ते अधिक गाफील राहून असुरक्षित वाहनचालन करणार आहेत; त्याचा रस्त्यावरील इतरांनाही उपद्रव शक्य आहे.

फरक

अमान्य. टीकेला तुमच्या पार्टीने रासलीला संबोधिले आहे. टीकेचा तार्किक प्रतिवाद न जमल्यास तिला विरोध दर्शवू नये.

रासलीला मान्यवर व्यक्तिने केल्यास उच्च् मानली जाते. ;)

बाकी, या प्रकरणात साठेंना (आणि इतरांनाही) साठेंच्या भावनेचा उपद्रवच होणार आहे. 'मोरया संरक्षण करतो' या श्रद्धेमुळे ते अधिक गाफील राहून असुरक्षित वाहनचालन करणार आहेत; त्याचा रस्त्यावरील इतरांनाही उपद्रव शक्य आहे

हे तर यदृच्छेमुळे पण घडू शकते, प्रस्तुत लेखात यदृच्छेचे समर्थन आहे, त्यास तुमची सहमती कशी?

स्पष्टीकरण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
काही गैरसमज निर्माण झाला आहे का? संवादात बोलणे कुणाचे ते नाव न लिहिल्यामुळे संभ्रम आहे का? यात तीन व्यक्ती आहेतः प्रा.साठे आणि त्यांना रुग्णालयात भेटायला गेलेले आम्ही दोघे.प्रा.साठ्यांशी बोलणे झाले तेव्हा त्यांचे (साठे यांचे) शेवटचे वाक्य" थोडक्यात वाचलो ही त्या मोरयाची कृपा." नंतरचे सर्व संवाद आम्हा दोघांचे कॉलेज मध्ये झालेले आहेत.त्यात साठे यांचा सहभाग अर्थातच नाही."वाचलो ती त्या मोरयाची कृपा असे साठे सर म्हणतात ते तुम्हाला पटते का?'' असे त्या सहकार्‍याला विचारले आहे.

माझा समज

"हो.एकच स्पष्टीकरण.योगायोग,यदृच्छा.आपण वाहन चालवतो तेव्हा कित्येक संभाव्य वाटणारे अपघात केवळ योगायोगाने टळल्याचा अनुभव येतो.त्या प्रत्येक वेळी देवाची कृपा कारणीभूत असते का?"

हे मत बहुदा प्रो. साठे ह्यांचे नसावे असे समजुन मी तो प्रतिसाद लिहिला होता. अर्थात ह्या मताशी तुम्ही सहमत आहात असे गृहित धरुन.

प्रति

रासलीला मान्यवर व्यक्तिने केल्यास उच्च् मानली जाते. ;)

प्रस्तुत लेख रासलीला असल्याचा आरोप अमान्य आहे.

हे तर यदृच्छेमुळे पण घडू शकते

असे काहीही प्रतिपादन लेखात नाही. 'अपघात होऊनही इजा होईलच असे नाही, कधीकधे यदृच्छेने संरक्षणही होऊ शकते' या ज्ञानामुळे वाहनचालक गाफील राहण्याची शक्यता नाही. 'मोरया नेहमीच संरक्षण करेल/करतो' असे साठेंचे मत होते/आहे आणि त्यामुळे मात्र ते बेदरकार बनण्याची शक्यता आहे.

खुलासा.

हे तर यदृच्छेमुळे पण घडू शकते

असे काहीही प्रतिपादन लेखात नाही. 'अपघात होऊनही इजा होईलच असे नाही, कधीकधे यदृच्छेने संरक्षणही होऊ शकते' या ज्ञानामुळे वाहनचालक गाफील राहण्याची शक्यता नाही. 'मोरया नेहमीच संरक्षण करेल/करतो' असे साठेंचे मत होते/आहे आणि त्यामुळे मात्र ते बेदरकार बनण्याची शक्यता आहे.

लेखातिल वाक्य- "हो.एकच स्पष्टीकरण.योगायोग,यदृच्छा.आपण वाहन चालवतो तेव्हा कित्येक संभाव्य वाटणारे अपघात केवळ योगायोगाने टळल्याचा अनुभव येतो.त्या प्रत्येक वेळी देवाची कृपा कारणीभूत असते का?" ते मी फार गंभीरपणे घेत नाही, यदृच्छेमुळे कारणमिमांसा न केल्यास गाडीतिल दोष(असल्यास) लक्षात येणार नाही व पुढिल वेळेस अपघात होउच शकतो ह्याअर्थी यदृच्छा आणि मोरया सारखेच.

नव्हे!

आळश्यांचा राजा यांच्या मते अपघात घडण्यास मोरया कारणीभूत नसतो, केवळ टाळण्याच्या घटनांमध्येच तो सहभागी असतो.

काहीही

माझे इथे नाव घेतलेले आहे म्हणून. आपले घोडे दामटण्यासाठी दुसर्‍याच्या तोंडात आपले शब्द कशासाठी? उद्धृत करा.

भाव

उणे ते माझे, अपश्रेय ते माझे, आणि उत्तम ते, श्रेय ते, इतरांचे, या भावाने श्रद्धाळू माणूस आपल्या बाबतीत घडणार्‍या वाईट गोष्टींची जबाबदारी स्वतःच्या कर्मांना देतो, तर चांगल्या गोष्टींचे श्रेय देवाला/ दैवाला/ गुरुला देतो. हा भाव आहे.

म्हणजे, इजाप्रद अपघातांचा दोष मोरयाला मिळणार नाही.

भाव

मोरयाला दोष न देणे हा भाव आहे. भाव. तिथे तर्क लावायचा नसतो. आपली सगळी वाट लागली तरी तुकाराम म्हणतात, बरे झाले देवा रांडापोरे गेली. तिथेही ते देवाला दोष देत नाहीत. हा भाव आहे. भक्ती आहे. इजाप्रद अपघातांचाच नव्हे, कसलाच दोष मोरयाला मिळाला नाही तरी नवल नाही. भक्तीच्या अनेक वाटा आहेत. देवाला दूषणे देऊन भक्ती करणारे पण लोक असतात. भक्तीचे क्षेत्र वेगळे आहे. तिथे हे असले तर्क लाऊन काही मिळत नाही. भक्तमंडळी मूर्ख आहेत हाच एक निष्कर्ष "तर्काने" काढता येऊ शकतो, जो (बहुदा) आपण काढलेला आहे. त्याला कुठल्या भक्ताची हरकतही नसते, कारण असल्या तर्कटांची त्याला पर्वा असती तर त्याने भक्ती केलीच नसती.

इसापनीतिमध्ये सिंह बोलतो. सिंह कसा बोलेल, कुठल्या भाषेत बोलेल असले प्रश्न तिथे विचारायचे नसतात. माझ्या विधानाचा तुम्ही लावलेला अर्थ हा तुमच्या कल्पनेचे अपत्य आहे. तुमच्या पद्धतीने बोलायचे म्हटले तर इसापला सिंहाच्या स्वरयंत्रणेचे ज्ञान नव्हते असे म्हणावे लागते. इसापने फसवणूक केलेली आहे असेही तुमच्या पद्धतीनुसार म्हणता येते.

धन्यवाद

इजाप्रद अपघातांचाच नव्हे, कसलाच दोष मोरयाला मिळाला नाही तरी नवल नाही.

"आणि म्हणूनच मोरयापेक्षा यदृच्छा निराळी आहे" इतकेच माझे या उपधाग्यात प्रतिपादन आहे.
योगायोग म्हणले की "रासलीला" आणि दैव/ कर्म म्हणले की "कॅरॅक्टर ढीला है" हा खरोखरीच न्याय आहे की नाही इतकाच मुद्दा या उपधाग्यात आहे.
वास्तव अपघातात इजा न होण्याबाबत मोरयाचे आभार मानण्याची तुलना काल्पनिकेत बोलणार्‍या सिंहाशी करणे गैरलागू आहे.

फरक

इसापनीति हे बालकथांचे पुस्तक आहे आणि बालकथांच्या प्रांतात बोलणारा सिंह किंवा उडणारा ससा वगैरे कल्पनांना कुणीच तर्क लावणार नाही कारण वाचक हा 'बालबुद्धी' आहे हे ग्राह्य धरले आहे. पण मोठे झाल्यावर मात्र 'सिंह बोलत नाही' हा उलगडा होणे महत्वाचे आहे. तेव्हाही भाव/ भक्ती म्हणत सिंह बोलतोच असा समज राहिल्यास त्याला मूर्ख म्हंटले नाही तरी बालबुद्धी म्हणणे अयोग्य नाही.

धन्यवाद

म्हणूनच तर मी असे प्रतिपादन केले आही की "साठेंवर टीका करणार्‍यांनी इसापावरही टीका करावी" ही मागणी गैरलागू आहे.

तांत्रिक गडबड

वरील प्रतिसाद तुम्हाला आहे असे दिसत असले तरी तो आळश्यांचा राजा ह्यांना दिलेला आहे. तांत्रिक गडबडीमुळे तो तुमच्या प्रतिसादाखाली उमटत आहे. दोनदा देऊन पाहिला तरी तसेच दिसत आहे.

मागणी आणि अपेक्षा

म्हणूनच तर मी असे प्रतिपादन केले आही की "साठेंवर टीका करणार्‍यांनी इसापावरही टीका करावी" ही मागणी गैरलागू आहे.

अशी काही मागणी नसून समान न्यायाची अपेक्षा आहे. समान न्याय लावता येत नसेल तर विचार विसंगत आहेत असे म्हणावे लागते.

होय

तो समान न्याय नसून अन्याय ठरेल. इसापनीती बालकथा, नीतीकथा, मनोरंजन, इ. साठी वापरले जाते. "अव त्वं माम्" हे विधान करताना "वास्तवात एक मोरया आहे आणि तो माझे अपघातात संरक्षण करेल" असा विश्वास असतो, अथर्वशीर्ष ही काल्पनिका मानली जात नाही.

बालकथा?

इसापनीति हे बालकथांचे पुस्तक आहे आणि बालकथांच्या प्रांतात बोलणारा सिंह किंवा उडणारा ससा वगैरे कल्पनांना कुणीच तर्क लावणार नाही कारण वाचक हा 'बालबुद्धी' आहे हे ग्राह्य धरले आहे.

इसापनीतिला रुपककथा असे म्हटले असतेत तरी समजू शकलो असतो. चक्क बालकथा! असो. याच न्यायाने, भुताखेतांच्या/ अतार्किक गूढ कथांचा वाचक हा बालबुद्धी आहे असे ग्राह्य धरले जात असेल, नाही?

होय

इसापनीति हे पुस्तक बालकथा विभागातच येते. त्यातल्या रंजक गोष्टींमधे बालिशपणा कमी असला तरी ते मोठ्यांचे साहित्य मला वाटत नाही. कुठल्याहीअ वाचनालयात त्याची वर्गवारी पाहावी. तत्वज्ञान ह्या विभागात कुणी इसापनीति ठेवणार नाही.

भुताखेतांच्या कथेतील सगळे संदर्भ सत्य म्हणून स्वीकारणारा त्यावर भाव/भक्ती असणारा वाचक हा बालबुद्धी आहे असे ग्राह्य धरायला हरकत नाही. काही वर्णन खोटे आहे ह्याची जाणिव ठेवुन निव्वळ मनोरंजनासाठी असे साहित्य वाचणारा वर्ग बालबुद्धी नाही.

गूढकथा किंवा भुताखेतांच्या कथा

गूढकथांची आवड असल्याने हा प्रतिसाद लिहित आहे. कृपया, आपल्या मतांवर धुरळा उडवण्याचा प्रयत्न आहे असे समजू नये.

याच न्यायाने, भुताखेतांच्या/ अतार्किक गूढ कथांचा वाचक हा बालबुद्धी आहे असे ग्राह्य धरले जात असेल, नाही?

नाही. वाचक बालबुद्धी नसतो. वाचल्यावर घाबरणाराही बालबुद्धी नसतो परंतु वाचून झाल्यावर त्यावर विश्वास ठेवून, ती भीती कायम बाळगून विविक्षित ठिकाणी जायला घाबरणारा, अपशकुन होईल याची भीती बाळगणारा, खुट्ट झालं की पाचावर धारण बसणारा एखादा वाचक असेल तर इतर त्याची गणना बालबुद्धीत करू शकतात.

याचप्रमाणे, पोथ्या पुराणे वाचून सावित्रीने अमुक व्रत केले म्हणून तुम्हीही करा तुम्हाला तमुक प्राप्त होईल असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवणाराही एखाद्याला बालबुद्धी वाटतो. पौराणिक कथा हा आपला ठेवा आहेत किंवा त्यातून तत्कालिन संस्कृतीची माहिती होण्यास मदत होते असे एखाद्याला वाटत असल्यास मी त्याला बालबुद्धी म्हणणार नाही.

इसापकथा मोठ्या माणसांनी वाचल्या म्हणून ते बालबुद्धी ठरत नसतात परंतु इसापकथा या लहानपणी (किंवा लहानपणापासून) वाचणे अपेक्षित असते. त्यांना बालकथाही म्हणता यावे आणि नितीकथाही.

फरक

इसापनीति हे बालकथांचे पुस्तक आहे आणि बालकथांच्या प्रांतात बोलणारा सिंह किंवा उडणारा ससा वगैरे कल्पनांना कुणीच तर्क लावणार नाही कारण वाचक हा 'बालबुद्धी' आहे हे ग्राह्य धरले आहे. पण मोठे झाल्यावर मात्र 'सिंह बोलत नाही' हा उलगडा होणे महत्वाचे आहे. तेव्हाही भाव/ भक्ती म्हणत सिंह बोलतोच असा समज राहिल्यास त्याला मूर्ख म्हंटले नाही तरी बालबुद्धी म्हणणे अयोग्य नाही.

मग..

आळश्यांचा राजा यांच्या मते अपघात घडण्यास मोरया कारणीभूत नसतो, केवळ टाळण्याच्या घटनांमध्येच तो सहभागी असतो.

(आ.रा. ह्यांनी) किंवा आजुन कोणी मोरया अपघात घडण्यास कारणीभूत असतो असे म्हंणल्यास यदृच्छा आणि मोरया सारखेच अशी सहमती ह्या लेखाच्या संदर्भात असेल काय?

कारणमीमांसा

अगदी उद्बोधक असा संवादात बांधलेला लेख. आवडला हे तर सांगितले पाहिजेच, शिवाय शेवटी जे तात्पर्य खुद्द लेखकानीच काढले आहे "प्रत्येक संकष्टीला चिंचवडच्या मोरयाचे दर्शन घ्यायचे हे व्रताचरण या गंभीर अपघाताला कारणीभूत ठरले यात संशय नाही" ~ इथे फक्त चिंचवडच्या जागी राज्यातील त्या त्या जिल्ह्यातील अशा 'खूप जागृत' समजल्या जाणार्‍या बाप्पांचे नाव घातले की झाले.

लग्न होऊन केवळ १५ च दिवस झाले आहेत आणि स्वतःला नेक्स्ट टॉम क्रूझ समजत असणार्‍या इथल्या एका पंचविशीतील नवरोबांनी घरात कुणालाही कल्पना न देता नववधूला लग्नात सासर्‍याकडून मिळालेल्या मोटारसायकलवरून गणपतीपुळेला नेले, अर्थात मोरयाच्या दर्शनासाठी म्हणून. येताना आंब्याच्या अलिकडे उडविले ट्रकने, दोघेही जागीच गतप्राण, झाले त्याचे 'मिशन इम्पॉसिबल'. इकडे कोल्हापुरात घरी कुणालाच पत्ता नाही. मोबाईल्सही नेले नव्हते, मुद्दाम. शेवटी खिशातील लायसन्सवरून पोलिसांनी पत्ते शोधले. काय आणि कसले आशीर्वाद दिले या नव्या जोडप्याला त्या पुळ्याच्या गणपतीने ? मग कुणीतरी म्हणायचे त्यानी व्रत पाळले नसणार, घरी न सांगता गेले, नव्या नवरीने असे बाहेर पडायचे नसते इ. इ. तर्क इथेही लढविले गेलेचे. शेवटी काय, मृत्यू येणारच असेल तर संकष्टीचा गणेशच काय पण खुद्द जो कोणी सुप्रीम देव असेल तोही ते टाळू शकणार नाही.

(त्यातही संताप येण्यासारखी - नंतर घडलेली घटना - बाब म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या जोडप्याच्या दोन्ही घरातील ज्येष्ठांनी परत एक खास गाडी काढून गणपतीपुळ्याला जाऊन यथासांग 'गणेश शांती' केली. कारण विचारता, "इथून पुढेतरी त्याचा कोप आमच्यावर नको म्हणून." गणपतीबाप्पा विघ्नहर्ता समजला जातो, तशी आरतीही होते, मग तो 'कोपतो' म्हणजे काय ? हे विचारण्यात अर्थ नसतो.)

अशा घटनांची कारणमीमांसा करताना वा दुसरी बाजू मांडताना वरील लेखातील एक प्राध्यापक म्हणतात "एकतर तुमची देवावर श्रद्धा नाही. अध्यात्माचे काही वाचन नाही. अभ्यास नाही. उपासना, ध्यानधारणा काही नाही." ~ याला काहीही अर्थ नाही, असेच म्हणतो.

अशोक पाटील

नतमस्तक

प्रा. साठे यान्च्या श्रद्धेपुढे नतमस्तक.
(कर्तव्यपरायणता, कार्यक्षमता आणि समाजाभिमुखता (विद्यार्थीप्रियता) यात टोकाची श्रद्धादेखील आड येत नाही हे ही त्यान्च्या उदाहरणावरून सहज सिद्ध व्हावे).

भक्तजीवनात प्रारब्धानुसार बरे/ वाईट, शुभ/ अशुभ घडतच असते. तसे असूनही ईश्वरी कृपेची प्रचिती येते हे तो नाकारत नाही. एकही विपरीत प्रसन्ग माझ्या जीवनात घडणार नाही असे आश्वासन मिळाले तरच भक्ती करेन अशा सौदेबाजीच्या पद्धतीने भक्ती होऊच शकत नाही. अध्यात्म'शास्त्रात्' सकाम भक्तीतून निष्काम भक्तीकडे होणारा प्रवास आणि भक्ताच्या आर्त, चिद्न्यासू, अर्थार्थी, द्न्यानी या पायर्या उगाच का दिलेल्या आहेत? असो.

भ्रामक शब्दज्ञान

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१/प्रा.साठे कालान्तराने हिंडण्या-फिरण्या इतपत बरे झाले. वाहन चालविणे शक्य नव्हते. पण कॉलेजमधे रिक्षाने येत.थोडे लंगडत लंगडत वर्गात जाऊन तास घेत.शिकविण्याची आवड होती.
.
२/ आर्त,जिज्ञासू,अर्थार्थी,ज्ञानी या भक्ताच्या पायर्‍या म्हणजे केवळ भ्रामक शब्दज्ञान आहे.या ज्ञानाने काहीही साध्य होत नाही.केवळ मानसिक समाधान मिळू शकेल.बाकी उपलब्धी शून्य.समाजहिताच्या,प्रगतीच्या दृष्टीने निरुपयोगी.वैज्ञानिक ज्ञान हेच खरे उपयुक्त ज्ञान.

हम्म

पूर्णवादाची तत्वे नीट समजावून घेतल्यावर वैज्ञानिक ज्ञान विरूध्द अध्यात्मिक प्रज्ञान अशी काल्पनिक लढाई लावणे, ती लढवणे आणि दोन्ही बाजून्चे एकान्गी विचार पटवून घेणे आता शक्य होईल असे वाटत नाही. दोन्ही एकत्र गुण्यागोविन्दाने राहू शकतात आणि तसे होतही आलेले आहे इतकेच म्हणेन. असो.

पूर्णवादाबद्दल

पूर्णवादाबद्दल काही लिहू शकलात तर उत्तम् होईल.आपल्या प्रतिसादाचा अधिक संदर्भ लागेल. व विज्ञानवाद्यांचे जे विचार आपणास एकांगी वाटतात
ते का वाटतात ह्याचीही इतरांस जाणीव होइल.

...पूर्णवादाची तत्वे नीट समजावून घेतल्यावर
ह्यावरून आपण पूर्णवादाबद्दल काही अधिक माहिती देउ शकता असे वाटते. येथील सर्वांनाच ते माहित असेल असे नाही.

--मनोबा

२ पैसे

आळश्यांचा राजा, प्रियाली, अशोक पाटील् ह्यांच्याशी सहमत.

माझे २ पैसे - यदृच्छा किंवा मोरया ही दोन्हीही कारणे एकच आहेत, फक्त मोरयाचा उदोउदो अपघात टळण्यासाठी करणे गैर आहे.

यदृच्छा

यदृच्छा आणि मोरया एकच कसे? यदृच्छेचे दर्शन घ्यायला कुणी चिंचवडला जात नाही.

प्रति:

यदृच्छा आणि मोरया एकच कसे? यदृच्छेचे दर्शन घ्यायला कुणी चिंचवडला जात नाही.

घडणार्‍या वाईट गोष्टींचे कारण न तपासता यदृच्छा असे सांगता येते तर त्याचे नाव मोरया ठेवायला काय हरकत आहे? ह्या कारणासाठी त्याचा उदोउदो करु नये हे मी सांगितले आहेच.

गरज नाही

यदृच्छा असे सांगता येते तर त्याचे नाव मोरया ठेवायला काय हरकत आहे?

यदॄच्छेलाच मोरया समजायचे असेल तर मोरया ह्या संकल्पनेची गरज काय? दुसरे म्हणजे साठे किंवा इतर भाविकांना मोरया म्हणजे निव्वळ यदृच्छा हे अमान्य आहे, त्यामुळे उगीच मातीला पेढा म्हणण्याचे कारण काय?

बॅक इन् फॉर्म

यनावाला बॅक इन् फॉर्म!
या विषयावर त्यांच्या इतके सरळ तरीही रोचक व सोपुआ भाषेत लिहु शकणारा दुसरा उपक्रमी माझ्या पाहण्यात नाही.

लेखातील मतितार्थाशी अर्थातच सहमत आहे

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

भावना, तर्क, उद्देश, इत्यादि

या वाक्याच्या उत्तरार्धाशी असहमती आहे. भावनेच्या आहारी जाऊन माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो असे अनेकदा दिसते. तर्क आणि विज्ञान यांनी भावनेच्या क्षेत्रात अवश्य लुडबूड करावी. अशी लुडबुड केल्यानेच अंधश्रद्धेला पायबंद होऊ शकेल. लुडबुड करणे याचा अर्थ एखाद्याला दुखावणे, त्याचा अपमान करणे असा होत नाही. वरील लेख मला यासाठीच आवडला कारण येथे प्रा. साठ्यांना अतिशय शांतपणे आणि संयत शब्दांत त्यांच्या मित्राने समजावण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती पद्धत मला पटते.

प्रस्तुत उदाहरणात साठेंनी भावनेच्या आहारी जाऊन स्वत:चे काय नुकसान करुन घेतले आहे? ते भावनेच्या आहारी गेल्यामुळे अपघात झाला आहे का? तसे वाटत असेल तर हे हास्यास्पद तर्कशास्त्र आहे. ते गणपतीच्या दर्शनाला गेले नसते तर अपघात झाला नसता हा तर्काधारीत निष्कर्ष आहे काय? त्या अपघाताचा, ज्या ठिकाणी तो अपघात झाला, आणि ते त्या ठिकाणी “कशासाठी” गेले होते याचा काय संबंध? (हे म्हणजे असे म्हणण्यासारखे आहे, की त्या ठिकाणी ते दुसरे एखादे “इहवादी” काम करायला गेले असते तर अपघात झाला नसता.) माझ्या मते साठेंची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी भावात्मक आहे, भक्तीयुक्त आहे. त्यांना काही समजत नाही असे मानून आपले तर्कशास्त्र त्यांच्यावर लादणे याला मी लुडबुड म्हणतो. बौद्धिक अहंकार म्हणतो.

एखादी निरुपद्रवी वाटणारी जखम आणि भावना कधी उपद्रवी ठरेल याचा भरवसा देता येत नाही. (हे जसे जखमेबाबत खरे आहे तसेच भावनेबाबतही) तेव्हा प्रयत्न करण्यासाठी (किंवा प्रीकॉशन घेण्यासाठी) एखाद्याला ना करू नये. खाली अशोक पाटील यांनी दिलेले एक उदाहरण असेच आहे. एखाद्या आस्तिकाने "देवाची कृपा" असे सतत निरुपद्रवी वाक्य म्हणणे हे एखाद्या नास्तिकाला उपद्रवी वाटू शकते. (जसे, हा कसला देव, हा तर दगड असे नास्तिकाने म्हटले की आस्तिकांच्या भावना दुखावतात तसेच.) निरुपद्रवी आणि उपद्रवी वाटणे हे या उदाहरणात वैयक्तिक ठरावे. अर्थातच, भावना दुखावल्याने माणूस डोके बंद करून घेतो आणि आडमुठा बनतो असा अनुभव असल्याने लेखातील समजावण्याची पद्धत मला आवडली हे मी आधीच नमूद केले आहे.

प्रश्न “देवाला नाकारल्याने भावना दुखावल्याचा” नाही. नास्तिकाने देव नाकारल्याने आस्तिकाच्या भावना दुखावतात म्हणून तसे नास्तिकाने करु नये असे मी म्हणत नाही. आपापली मते आहेत. मांडायला काय हरकत आहे? परंतु एखादा भक्त मनुष्य स्वत:च्या आयुष्याकडे एका विशिष्ट दृष्टीकोणातून बघत असतो, त्यामागे त्याचे काही चिंतन असेल असे न समजता, असे गृहीत धरायचे की हा माणूस अविचारी आहे, भावनेच्या आहारी गेलेला आहे, त्याला त्यातून “जागे” करायला हवे. हा प्रकार तार्किक नाही. हाही भावनेच्या आहारी जाण्याचाच एक प्रकार आहे. आपण शहाणे आहोत, आणि “हे असले लोक” मूर्ख आहेत या भावनेच्या आहारी जाण्याचा हा एक प्रकार आहे.

* योग्य आणि तार्किक गोष्टींची लुडबुड ही समाजाला नेहमीच उपयुक्त ठरली आहे. सती प्रतिबंधक कायदा जोरजबरदस्तीने राबवला नसता तर.... :-)

सती च्या उदाहरणासाठी तार्किक लुडबुडीची उपयुक्तता मान्य आहे. “नेहमीच” शब्दप्रयोग अमान्य आहे. जिथे जिथे फसवणूक आहे, शोषण आहे, तिथे तिथे अवश्य लुडबुड व्हावी. सतीप्रथेमध्ये केवळ भावना कधीच नव्हती. शोषण, अन्याय, अत्याचार, क्रौर्य, असत्य, आणि बरेच काही होते/ आहे. तार्किक लुडबुड “नेहेमीच” उपयुक्त होते असे म्हणायचे असेल तर सगळे संतसाहित्य कचऱ्याच्या पेटीत टाकावे लागेल. (अर्थात तसेही काही मंडळींचे मत असू शकतेच. कुणाचे तसे मत असल्याने किमान माझ्या तरी भावना दुखावत नाहीत. मनोरंजनच होते.) सती प्रतिबंधक कायद्याचे पुरस्कर्ते राजा राममोहन राय हे इहवादी नव्हते, निर्गुण निराकार (आणि तर्काचा कसलाही आधार नसलेला) ईश्वर मानत होते, त्याचा प्रसारही करत होते. हा कायदा ज्या इंग्रज मंडळींनी केला ती मंडळीही बाय डिफॉल्ट इहवादी नव्हती, म्हणजे, काहीजण असतीलही, परंतु एकंदर इंग्रज समाज हा ख्रिस्ती धर्म मानणारा असाच होता. तेंव्हा अन्यायी आणि शोषक प्रथांना तार्किक लुडबुड करुन विरोध करण्यासाठी “देव नाही”, “जरा विचार करा” वगैरे पद्धती वापरली पाहिजे असे मुळीच नाही. उलट ही पद्धत कुचकामी आहे, निरुपयोगी आहे. यात बौद्धिक अहंकाराचा वास येत असल्याने ऐकणारा माणूस आडमुठा होण्याची शक्यता आहे. राजा राममोहन राय यांना यश मिळण्याचे कारण ते इहवादी नव्हते, हेच होय. धर्मग्रंथांचाच आणि वेदांचाच आधार घेऊन त्यांनी जाचक आणि मूर्ख प्रथा बंद पाडल्या. यनावालांचा हेतु टिंगलीचा नाही असे मला वाटते, म्हणून प्रतिसाद टंकतो आहे. ज्यांना टिंगल करायची आहे, ते करोत बापडे. आणि त्यांना जर असे वाटत असेल, की आपण अशी टिंगल करुन फार मोठे कार्य करत आहोत, तर तसेही त्यांना वाटो.

आता थोडे दुय्यम मुद्दे - म्हणजे "वैयक्तिक" वगैरे आहेत म्हणून उडले तरी चालतील असे -

मूळ लेखात प्रो. साठ्यांचा गैरसमज आहे. तेथे तो तर्काने सोडवायचा प्रयत्न त्यांच्या मित्राने केला तर काय चुकले? तेथे "लुडबूड करण्याचे कारण नाही" असा आज्ञार्थी शब्दप्रयोग का यावा?

यात काय आज्ञार्थी आहे हे मला समजले नाही. “लुडबुड करण्याचे कारण नाही” हे माझे मत आहे. समजा आज्ञार्थी आहे, तरी त्यात आक्षेपार्ह काय आहे? उर्मट सह्या आक्षेपार्ह वाटत नाहीत, त्यावर आक्षेप घेतल्यास प्रतिसाद उडतात. “साठेंना माठे म्हणण्याचे आम्हाला स्वातंत्र्य आहे” अशा वाक्यरचना आक्षेपार्ह वाटत नाहीत. “आमच्या पोटात दुखते” असल्या वाक्यरचना चालतात. आणि आमचे मत व्यक्त केले की त्यावर एवढा धुरळा उडावा!

"हस्तक्षेप अस्थायी वाटू शकतो" असे लिहावे असे मी आ.रा. ह्याना सुचवितो.

चांगली सुचवणी आहे. माझी हरकत नाही. परंतु मी काही असभ्य लिहीले आहे असे मला मुळीच वाटत नाही. तसा उद्देशही नाही. आणि ते कुणा व्यक्तीच्या रोखानेही नाही. आज्ञार्थी तर मुळीच नाही. "तुम्ही लुडबुड करु नका" हे झाले आज्ञार्थी. "तुम्ही लुडबुड करु नये" याला व्याकरणात काय म्हणतात ते आत्ता आठवत नाही, पण आज्ञार्थी नक्कीच नाही. मी तर म्हणतोय की "तर्काने भावनेच्या क्षेत्रात लुडबुड करु नये". आता यात मी कुणाला काय आज्ञा केली?

'आम्ही' असे मानतो की भावनांनी नियंत्रित वर्तणूक हीन असते आणि भावनांवर तर्काचे वर्चस्व ठेवणे हे मानवाचे कर्तव्य आहे. ते न पाळणार्‍यांना/न पाळू शकणार्‍यांना पूर्ण समान मानणे, पूर्ण समान अधिकार देणे मला पटत नाही (टिंगलीचा/टीकेचा अधिकार मिळावा असे यनावाला, धम्मकलाडू, वैद्य यांनाही वाटते असा माझा अंदाज आहे).

यनावाला यांना टिंगल करायची आहे असे मला वाटत नाही. त्यांचा उद्देश आणि अभिव्यक्ती सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून असतात. बाकी आपली आपली मते आणि ती मते व्यक्त करण्याच्या पद्धती आहेतच.

टिंगल वगैरे...

प्रस्तुत उदाहरणात साठेंनी भावनेच्या आहारी जाऊन स्वत:चे काय नुकसान करुन घेतले आहे? ते भावनेच्या आहारी गेल्यामुळे अपघात झाला आहे का?

त्यांनी स्वतःचे नुकसान करेपर्यंत इतरांनी थांबावे असे काही आहे का? प्रोऍक्टिव होऊन एखाद्याने तर्काचा आधार घेऊन त्यांना समजावले तर बिघडले कुठे? जर नास्तिक मित्राला आस्तिक मित्राचे म्हणणे पटत नसेल तर नुकसान होईपर्यंत थांबण्यात किंवा भावनेच्या आहारी जाऊ देण्यापर्यंत थांबण्यात काहीच अर्थ नाही. त्याने जमेल तसे आणि जमेल तेव्हा प्रबोधन करावे. अर्थात, प्रबोधन करणे म्हणजे एखाद्याला सतत त्रास देऊन जेरीस आणणे मलाही पटत नाही.

तार्किक लुडबुड “नेहेमीच” उपयुक्त होते असे म्हणायचे असेल तर सगळे संतसाहित्य कचऱ्याच्या पेटीत टाकावे लागेल. (अर्थात तसेही काही मंडळींचे मत असू शकतेच. कुणाचे तसे मत असल्याने किमान माझ्या तरी भावना दुखावत नाहीत. मनोरंजनच होते.)

हा विपर्यास झाला. तार्किक लुडबुड केल्याने सर्वच भावनिक गोष्टींचा कचरा होतो हे भयाण गृहितक वाटले. कदाचित लुडबुड केल्याने काय घ्यावे आणि काय सोडून द्यावे हे ठरवता येऊ शकेल. सगळे संतसाहित्य अर्थातच कचर्‍यात टाकण्याजोगे नव्हे पण काही संत आणि पंत काव्य कचर्‍यात टाकण्याजोगे असू शकते यावर असहमती नसावी असे मानते.

परंतु एखादा भक्त मनुष्य स्वत:च्या आयुष्याकडे एका विशिष्ट दृष्टीकोणातून बघत असतो, त्यामागे त्याचे काही चिंतन असेल असे न समजता, असे गृहीत धरायचे की हा माणूस अविचारी आहे, भावनेच्या आहारी गेलेला आहे, त्याला त्यातून “जागे” करायला हवे. हा प्रकार तार्किक नाही.

नास्तिकाला सदर मनुष्य अविचारी वाटणे मला मान्य आहे. त्यातून त्याला जागे करायला हवे ही त्याची इच्छाही मला मान्य आहे. ती कशापद्धतीने मांडली आहे हे महत्त्वाचे आहे. वरील लेखात कोठेही अविचारी सूर नाही आणि आक्षेपार्ह असेही काही नाही.

जिथे जिथे फसवणूक आहे, शोषण आहे, तिथे तिथे अवश्य लुडबुड व्हावी.

फसवणूक किंवा शोषण होईपर्यंत थांबावे असे वाटते का? एखाद्याची तसे थांबण्याची इच्छा नसेल तर त्याला लुडबुड का म्हणावे?

सती प्रतिबंधक कायद्याचे पुरस्कर्ते राजा राममोहन राय हे इहवादी नव्हते, निर्गुण निराकार (आणि तर्काचा कसलाही आधार नसलेला) ईश्वर मानत होते, त्याचा प्रसारही करत होते. हा कायदा ज्या इंग्रज मंडळींनी केला ती मंडळीही बाय डिफॉल्ट इहवादी नव्हती, म्हणजे, काहीजण असतीलही, परंतु एकंदर इंग्रज समाज हा ख्रिस्ती धर्म मानणारा असाच होता. तेंव्हा अन्यायी आणि शोषक प्रथांना तार्किक लुडबुड करुन विरोध करण्यासाठी “देव नाही”, “जरा विचार करा” वगैरे पद्धती वापरली पाहिजे असे मुळीच नाही. उलट ही पद्धत कुचकामी आहे, निरुपयोगी आहे. यात बौद्धिक अहंकाराचा वास येत असल्याने ऐकणारा माणूस आडमुठा होण्याची शक्यता आहे. राजा राममोहन राय यांना यश मिळण्याचे कारण ते इहवादी नव्हते, हेच होय. धर्मग्रंथांचाच आणि वेदांचाच आधार घेऊन त्यांनी जाचक आणि मूर्ख प्रथा बंद पाडल्या. यनावालांचा हेतु टिंगलीचा नाही असे मला वाटते, म्हणून प्रतिसाद टंकतो आहे.

हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही पण परिच्छेदाशी असहमती नाही. तरीही, "क्ष" ही सुधारक व्यक्ती १०० वर्षापूर्वी इहवाद मानत होती किंवा देवाची पूजा करत होती म्हणून आजचे नास्तिक खोटे ठरतात की त्यांनी सती प्रथा बंद पाडणार्‍यांचे कौतुक करू नये असे म्हणायचे आहे? सती प्रथा हे केवळ उदाहरण आहे. तेथे तर्क चालवताना देव असणे नसणे ही पायरी नसून कदाचित "बाईला जिवंत मारून ती नवर्‍या बरोबर स्वर्गात जाणे वगैरे होत नाही" किंवा "हा मनुष्यवध आणि गुन्हा आहे" हे तार्किक दृष्ट्या पटवून देता येत असेलही.

ज्यांना टिंगल करायची आहे, ते करोत बापडे. आणि त्यांना जर असे वाटत असेल, की आपण अशी टिंगल करुन फार मोठे कार्य करत आहोत, तर तसेही त्यांना वाटो.

माझ्या कोणत्याही प्रतिसादात टिंगल केल्याचे मला आढळत नाही. वरील वाक्य माझ्या उद्धृताला धरून लिहिल्याने हे टिंगलीचे गौडबंगाल आ. रा. यांनी स्पष्ट करावे. या चर्चेत टिंगलीला मी विरोधच केल्याचे दिसेल. (अर्थातच, याचा अर्थ मी कधीच टिंगल करणार नाही असा नाही) तरीही, टिंगल करणे हे मोठे कार्य आहे असे वाटायलाच पाहिजे असे नाही. एखाद्या माणसाला समजवण्यात काही अर्थ नाही हे समजते तेव्हा अनेकदा माणसे टिंगल करतात. (उदा. जांभळे सोने आणि त्रिकोणी पृथ्वी) मी त्यांना दोष देणार नाही.

समजा आज्ञार्थी आहे, तरी त्यात आक्षेपार्ह काय आहे? उर्मट सह्या आक्षेपार्ह वाटत नाहीत, त्यावर आक्षेप घेतल्यास प्रतिसाद उडतात. “साठेंना माठे म्हणण्याचे आम्हाला स्वातंत्र्य आहे” अशा वाक्यरचना आक्षेपार्ह वाटत नाहीत. “आमच्या पोटात दुखते” असल्या वाक्यरचना चालतात. आणि आमचे मत व्यक्त केले की त्यावर एवढा धुरळा उडावा!

आक्षेपार्ह काय आहे (खरे म्हणजे असहमती कशाबद्दल आहे ) हे अनेक प्रतिसादांतून सांगितले आहे. पुन्हा सांगण्याची गरज वाटत नाही. उर्मट सह्या हा या चर्चेचा भाग नाही. त्या इतर चर्चा आणि लेखातही तशाच असतात आणि त्या व्यक्ती बघून प्रकट होत नसतात. एकट्या धम्मकलाडूंचीच सही उर्मट आहे असे नाही; उपक्रमावर याहीपेक्षा आक्षेपार्ह सह्या आहेत. तसेच, जेव्हा धम्मकलाडू* एखाद्याची वाहवा करतात किंवा सहमतीचा प्रतिसाद देतात तेव्हाही ती सही त्यांच्या प्रतिसादात असतेच. या सहीवरील आपले प्रतिसाद या चर्चेतून उडाले असतील तर नवल नाही. एखाद्याने आपल्या चर्चेशी संबंधित विधानावर प्रश्न केला असता त्याच्या सहीवर घसरून विषयांतर करण्याचे काही कारण दिसत नाही. तुम्हाला सही आक्षेपार्ह वाटली हे मला मान्य आहे. पण मग सदर उहापोह आपल्याला त्या व्यक्तीशी खरडवहीतून करता येईल किंबहुना आपण तो अवश्य करावा. कोणाला त्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. बाकीची वाक्ये उर्मट असली तरी चर्चेच्या संबंधातीलच आहेत. वाक्य उर्मट आहे म्हणून उडवले जात नसावे.

इतरांच्या मतावर धुरळा उडाला नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तसा धुरळा उडवायला तुम्ही मोकळे आहात. साठेंना माठे का म्हणू नये हे तुम्ही संबंधितांना पटवून देऊ शकता. जर तसे करायचे नसेल माझ्या वाक्यावर धुरळा का उडाला आणि इतरांच्या का नाही हा प्रश्न अनावश्यक वाटतो.

असो. या अवांतरावर अधिक उहापोह येथे नको असे वाटते. माझी खरडवही उघडी आहे.

परंतु मी काही असभ्य लिहीले आहे असे मला मुळीच वाटत नाही. तसा उद्देशही नाही. आणि ते कुणा व्यक्तीच्या रोखानेही नाही. आज्ञार्थी तर मुळीच नाही.

आपण असभ्य लिहिलेत असे कोणीही सुचवलेले नाही किंवा ते एखाद्या व्यक्तीच्या रोखाने आहे असेही कोणीही म्हटलेले नाही. त्यामुळे नसलेले विचार कृपया डोक्यात आणि चर्चेत आणू नका ही विनंती. वाक्य मला आज्ञार्थी वाटले कारण "कारण नाही" असे सांगून तुम्ही लोकांना त्या क्षेत्रात येण्यापासून रोखत आहात असे वाटले ज्याच्याशी मी असहमत आहे. ते आज्ञार्थी आहे असे वाटून माझा गैरसमज झाला असेल तर तो मला मान्य आहे पण ते तुमचे मत असेल आणि आज्ञार्थी वगैरे नसेल तरीही मी असहमतच आहे.

अवांतरः यनांच्या चर्चा शंभर नंबरी करायला आम्हा सर्वांना आवडते तेव्हा तुम्हाला टारगेट वगैरे केले आहे असे कृपया समजू नये. आपल्या मू़ळ वाक्यावर असहमती (आक्षेप नाही) नोंदवल्यावर पुढील चर्चा मी आणि आजूनकोणमी यांनी बहुधा एंजॉय केलेली आहे आणि रिटे आणि आजूनकोणमी यांची दोस्ती जुनी आहे. तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना टाइप..

* या वाक्यांवरून मी धम्मकलाडू यांची वकीली करते आहे असा गैरसमज करून घेऊ नये. जे सत्य आहे तेच मांडले आहे. याहून वेगळे सत्य एखाद्याकडे असेल तर माझ्या खरडवहीत अवश्य लिहावे.

खुलासा

टिंगलीसंदर्भात. आपल्याला उद्देशून ते नाही. आपल्या प्रतिसादातील उद्धृताला धरुन ते लिहील्याने आपला तसा समज झाला असल्यास माफ करावे. एकंदर या चर्चेतील प्रतिसाद पाहिल्यास हे स्पष्ट व्हावे. असो.

अवांतरावरील उहापोहाबाबत मला काहीही म्हणायचे नाही.

?

प्रस्तुत उदाहरणात साठेंनी भावनेच्या आहारी जाऊन स्वत:चे काय नुकसान करुन घेतले आहे?

'मोरयाने संरक्षण केले' या विधानाचे 'अपघातात आस्तिकांना यदृच्छेच्या आकडेवारीपेक्षा कमी वेळा इजा होते' असे वाचन न केल्यास ते निरर्थक विधान ठरेल. 'अपघातात आस्तिकांना यदृच्छेच्या आकडेवारीपेक्षा कमी वेळा इजा होते' असे मत बाळगणारी आस्तिक व्यक्ती बेदरकार वाहनचालन करून स्वतःचे नुकसान करून घेईल.

त्यांना काही समजत नाही असे मानून आपले तर्कशास्त्र त्यांच्यावर लादणे

लादले म्हणजे काय केले?

बौद्धिक अहंकार म्हणतो.

आरोप मान्य आहे.

जिथे जिथे फसवणूक आहे, शोषण आहे, तिथे तिथे अवश्य लुडबुड व्हावी.

"अनिरुद्ध बापूंमुळे शौचकूपात पाणीपुरवठा पूर्ववत झाला (तुमच्या शौचकूपास अखंड पाणीपुरवठा होण्याच्या शाश्वतीसाठी देणगी द्या)" ही फसवणूक नव्हे? "चिंचवडच्या मोरयामुळे संरक्षण होते" हे विधान फसवणूक नव्हे?

.. तर ही शनीची कृपा

जर हा अपघात प्रा. साठेंच्या साडेसातीच्या काळात घडला असेल तर आमचे मते त्याचे क्रेडिट मोरयाला देउ नये. ते शनीला द्यावे. कारण जर शनीची अवकृपा असती तर प्रा. साठेंवर काय भयंकर संकट ओढवले असते. होय !शनीने आपले उपद्रवमूल्य कमी करणे ही त्याची कृपाच मानली जाते.
प्रकाश घाटपांडे

प्रियाली यांना प्रतिसाद

फारच तिरपे तिरपे असल्याने इथे प्रतिसाद देतोय.

गूढकथांची आवड असल्याने हा प्रतिसाद लिहित आहे. कृपया, आपल्या मतांवर धुरळा उडवण्याचा प्रयत्न आहे असे समजू नये.

असा काही समज नाही. शिवाय मी ज्यावरचा उहापोह प्रकरण माझ्याकडून बंद केलेले आहे त्यावर पुन्हा मी बोलणार नाही. असो.

याच न्यायाने, भुताखेतांच्या/ अतार्किक गूढ कथांचा वाचक हा बालबुद्धी आहे असे ग्राह्य धरले जात असेल, नाही?

नाही. वाचक बालबुद्धी नसतो. वाचल्यावर घाबरणाराही बालबुद्धी नसतो परंतु वाचून झाल्यावर त्यावर विश्वास ठेवून, ती भीती कायम बाळगून विविक्षित ठिकाणी जायला घाबरणारा, अपशकुन होईल याची भीती बाळगणारा, खुट्ट झालं की पाचावर धारण बसणारा एखादा वाचक असेल तर इतर त्याची गणना बालबुद्धीत करू शकतात.

माझे मतही आपल्यासारखेच आहे. माझा प्रश्न इसापनीतीसंदर्भात समान न्याय लावण्यासाठी होता. बाकी, मोरयाला मानणारा प्रत्येकजण बालबुद्धी असेलच असे नाही. परंतु केवळ नमस्कार करण्यावर न थांबता मोरया आपले सदासर्वकाळ रक्षण करेल, त्याची अशांती वगैरे झाली तर आपले नुकसान करेल अशी भीती बाळगणारा एखादा श्रद्धाळू असेल, तर त्याची गणना भोळसट आणि मूर्ख अंधश्रद्धांमध्ये करु शकतात.

याचप्रमाणे, पोथ्या पुराणे वाचून सावित्रीने अमुक व्रत केले म्हणून तुम्हीही करा तुम्हाला तमुक प्राप्त होईल असल्या भाकडकथांवर विश्वास ठेवणाराही एखाद्याला बालबुद्धी वाटतो. पौराणिक कथा हा आपला ठेवा आहेत किंवा त्यातून तत्कालिन संस्कृतीची माहिती होण्यास मदत होते असे एखाद्याला वाटत असल्यास मी त्याला बालबुद्धी म्हणणार नाही.

वादच नाही. माझे मत मी अगदी याच शब्दांत काडीचाही बदल न करता व्यक्त करतो.

इसापकथा मोठ्या माणसांनी वाचल्या म्हणून ते बालबुद्धी ठरत नसतात परंतु इसापकथा या लहानपणी (किंवा लहानपणापासून) वाचणे अपेक्षित असते. त्यांना बालकथाही म्हणता यावे आणि नितीकथाही.

येस्स. कंसातील शब्द महत्वाचा. लहानपणापासून वाचणे अपेक्षित असते. मोठे झाल्यावर (किंवा आपण मोठे झालो असा समज झाल्यावर) वाचणे बंद करणे अपेक्षित नाही, कारण त्या नीतीकथा आहेत. केवळ वाचनालयात बालकथांमध्ये वर्गवारी केली म्हणून ते वाचणारा बालबुद्धी होत नसतो, हेच मला सांगायचे आहे.

आता अजून एक मुद्दा.

एखादी निरुपद्रवी वाटणारी जखम आणि भावना कधी उपद्रवी ठरेल याचा भरवसा देता येत नाही. (हे जसे जखमेबाबत खरे आहे तसेच भावनेबाबतही)

यात अजून एक भर घालू इच्छितो. जखमा झाल्या, भावना झाल्या, आता त्यात काल्पनिक भयकथा/ गूढकथाही घेऊयात. इथेच वरती आपण म्हटला आहात, की ".. परंतु वाचून झाल्यावर त्यावर विश्वास ठेवून, ती भीती कायम बाळगून विविक्षित ठिकाणी जायला घाबरणारा, अपशकुन होईल याची भीती बाळगणारा, खुट्ट झालं की पाचावर धारण बसणारा एखादा वाचक असेल तर ..." म्हणजे, अशा काल्पनिक कथांचाही एखाद्यावर असा उपद्रवी परिणाम होऊ शकतो. निरुपद्रवी वाटणारी एखादी भयकथा/ गूढकथा कधी उपद्रवी ठरेल याचा भरवसा देता येत नाही. त्यामुळे तर्काधारित विचारसरणीने असल्या भयकथा/ गूढकथांमधील खोटेपणावर सतत प्रहार करुन कल्पनेच्या जगात रमणार्‍या वाचकांना भानावर आणले पाहिजे.

- हे माझे मत नव्हे. माझा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी मी आपलेच एक उदाहरण दिले. माझ्या मते, देवळात जाणे पुढेमागे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे ठरेल, काही भरवसा नाही, असे म्हणणे योग्य नाही. तसे म्हणल्यास सगळ्या काल्पनिक कथांवरही असेच कोरडे ओढायला लागतील. एवढाच मुद्दा स्पष्ट करण्यासाठी इसापनीतीचे उदाहरण घेतलेले होते.

आशा आहे की माझा मुद्दा प्रियाली यांच्या ध्यानात आला असेल. (चर्चा मुख्य पटलावर असल्याने प्रियाली यांच्याखेरीज इतर विद्वान सदस्यांना टिप्पणी करण्यास हा प्रतिसाद खुला आहेच याची जाणीव मला आहे.)

आ.रांना उत्तरः अवश्य!

अशा काल्पनिक कथांचाही एखाद्यावर असा उपद्रवी परिणाम होऊ शकतो.

हो तर! याला काही गूढकथा हे एकमात्र प्रमाण नाही. सुपरमॅन हा चित्रपट पाहिल्यावर शर्टाला पाठीमागे टॉवेल लटकवून कपाटावरून उडी मारून हात मोडून घेणारे वीर आमच्या बिल्डींगमध्ये राहत. "एक दुजे केलिए" हा प्रेमपट पाहून आत्महत्या करणार्‍यांची संख्या लक्षणिय होती. दृकश्राव्य माध्यमाचा प्रेक्षक किंवा वाचक यांच्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो तेव्हा ज्यांची इच्छा आहे त्यांनी वाचकांचे आणि प्रेक्षकांचे प्रबोधन अवश्य करावे.

हे माझे मत नव्हे.

मला तुमची मते माहित आहेत पण मग तुम्हालाही माझी मते माहित हवीत. :-) ह. घ्या. (माहित नसतील किंवा आठवत नसतील तर हरकत नाही.)


पण तुम्ही मूळ मुद्याकडे त्रयस्थ नजरेनेही बघा. एखाद्या नास्तिकाला त्याच्यासमोर 'देवाची कृपा! साठे वाचले.' असे म्हणणार्‍या व्यक्तीबद्दल नाराजी वाटू शकते आणि तो त्याला तर्काधिष्ठित कारणे देऊन समाचार घेऊ शकतो. ही त्याची इच्छा झाली. त्याने असे करू नये असे म्हणता येत नाही. माझे सुरुवातीलाही असेच म्हणणे होते आणि आताही तेच (आणि बहुधा तेवढेच[?]) आहे.

तसे म्हणल्यास सगळ्या काल्पनिक कथांवरही असेच कोरडे ओढायला लागतील.

कथांना भाकड कथा म्हणून रिजेक्ट करता येते. यनांनी माझ्या परीक्षणाचे केले तसे पण सर्वसाधारण तर्काचा वापर करणारा मनुष्य कथांवर कोरडे ओढत नाही. ( त्या खरेच विकृत किंवा हानीकारक असतात तेव्हा तेही होते आणि अपवाद समीक्षकांचा. ते कोणत्याही कलाकृतीवर हवे तेवढे कोरडे ओढण्याचा हक्क असल्याचे समजतात. ;-)) त्यावर विश्वास ठेवणार्‍या वाचकांवर कोरडे अवश्य ओढायला हवेत!

ते इसापनितीमध्ये मला ओढू नका. ;-) गूढ आणि भूतकथा आल्या म्हणून मी त्यांच्या पाठिंब्यासाठी धावत आले आहे.
(भूतदयाळू)प्रियाली.

आळश्याचे सार

परंतु केवळ नमस्कार करण्यावर न थांबता मोरया आपले सदासर्वकाळ रक्षण करेल, त्याची अशांती वगैरे झाली तर आपले नुकसान करेल अशी भीती बाळगणारा एखादा श्रद्धाळू असेल, तर त्याची गणना भोळसट आणि मूर्ख अंधश्रद्धांमध्ये करु शकतात.

थोडक्यात श्री. साठे भोळसट आणि मूर्ख आहेत.

खुलासा व्हावा

आपण स्वतःला आळ्शी किंवा आळश्यांचा महाराजा म्हणवून घेत असाल, तर माझा त्यावर काही कॉपीराइट नसल्याने माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही. परंतु शंका म्हणून विचारतो, हे जे "सार" काढलेले आहेत, ते "मी (आळश्यांच्या राजाने) काढलेले आहे" असे आपण म्हणत आहात काय? की ते आपले (म्हणजे "सदस्य" यांचे) मत आहे? कृपया खुलासा व्हावा. धन्यवाद.

खुलासा

खुलासाः श्री साठे हे माठे आहेत हे - मूर्ख अंधश्रद्धाळू - या टिप्पणीवरून लक्षात येते. हे सार मी काढलेले आहे. आपणास सार काढता येत असते तर प्रतिसादाची एवढी भरताड आपण करत बसलाच नसतात असे वाटते.

धन्यवाद

हे सार मी काढलेले आहे.

धन्यवाद.

बाय द वे, आपण स्वतःला आळशी म्हणवता हे पाहून प्रजा भेटल्याचा अंमळ भास झाला. असो. आम्हांस सार काढता येते की नाही हा वेगळा विषय आहे, पण आपल्याला काढता येते ही आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन!

प्रजा? खुलासा व्हावा

आपण स्वतःला राजा म्हणवून घेत असाल, तर माझा त्यावर काही कॉपीराइट नसल्याने माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही. परंतु शंका म्हणून विचारतो, हे जे आपण प्रजा म्हणत आहात ते आपले मत आहे का? कृपया खुलासा व्हावा.

राजा आणि प्रजा अशी व्यवस्था भारतीय घटनेने १९५१ मध्येच निकालात काढली आहे. आपली भारतीय राज्यघटना आणि संविधान ही आपली ओळख आहे. त्यानुसार राजा आणि प्रजा हे नाते अंवैधानिक ठरते असे वाटते. कृपया खुलासा व्हावा.

अभिनंदन केल्याबद्दल आभारी आहे.

हा अवांतर प्रतिसाद येथे सध्या ठेवत आहे. या अवांतरावरील पुढील प्रतिसाद संपादित होतील. कृपया चर्चेशी संबंधित नसणार्‍या गप्पांसाठी खरडवहीचा वापर करावा.

आ. रा. यांना आणखी एक उत्तर

हे उत्तर नंतर सुचले म्हणून वेगळ्या प्रतिसादात देत आहे.

इथेच वरती आपण म्हटला आहात, की ".. परंतु वाचून झाल्यावर त्यावर विश्वास ठेवून, ती भीती कायम बाळगून विविक्षित ठिकाणी जायला घाबरणारा, अपशकुन होईल याची भीती बाळगणारा, खुट्ट झालं की पाचावर धारण बसणारा एखादा वाचक असेल तर ..." म्हणजे, अशा काल्पनिक कथांचाही एखाद्यावर असा उपद्रवी परिणाम होऊ शकतो. निरुपद्रवी वाटणारी एखादी भयकथा/ गूढकथा कधी उपद्रवी ठरेल याचा भरवसा देता येत नाही. त्यामुळे तर्काधारित विचारसरणीने असल्या भयकथा/ गूढकथांमधील खोटेपणावर सतत प्रहार करुन कल्पनेच्या जगात रमणार्‍या वाचकांना भानावर आणले पाहिजे.

याचे उत्तर "हो" असे आहेच परंतु माझा असा अनुभव आहे की शक्यतो ज्यांना अशा गोष्टी किंवा सिनेमा पाहून तात्पुरते घाबरायला होते किंवा गूढ/ भयाचे आकर्षण वाटते, ते पाहून आनंद होतो तेच लोक गूढकथा आणि भयकथांच्या वाटेला जातात. किंबहुना मी असा दावा* करू इच्छिते (शक्यता मांडू इच्छिते पेक्षा थोडं ठाम राहण्यासाठी दावा म्हणत आहे) की जे अशा कथा वाचून त्यांचा आनंद घेऊ शकतात त्या सर्वांना भुतेखेते काल्पनिक वाटतात किंवा भुतांचे जे अपेक्षित भय इतरांना वाटते ते वाटत नाही.

या उलट, भीती वाटते, रात्री झोप उडते म्हणून अशा गोष्टी किंवा चित्रपटांच्या वाटेला न जाणारे अनेक लोक आहेत. कदाचित, त्यांनाही भानावर आणणे गरजेचे ठरेल.

* वरील दावा करण्यासाठी मी पुरेश्या डेटाची हाताळणी केलेली नाही. मी संख्याशास्त्रीही नाही परंतु "द अदर्स"वर लिहिलेल्या लेखावर ज्या लोकांनी चित्रपट पाहावासा वाटतो किंवा पाहिला आहे अशा प्रतिक्रिया दिल्या त्यातील बहुतांश नास्तिक आहेत किंवा भुताखेतांची भीती बाळगणारे नाहीत असे वाटते. माझा दावा चुकीचाही असू शकेल पण मांडला इतकेच.

 
^ वर