ऐसीअक्षरे : नव्या संकेतस्थळाची घोषणा व हार्दिक निमंत्रण
नमस्कार.
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर 'ऐसी अक्षरे' नावाच्या नव्या मराठी संवादस्थळाची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
मराठीमधील लेखनातून, मग ते ललित असो की वैचारिक, माहितीपूर्ण असो किंवा खेळीमेळीच्या गप्पाटप्पा असोत - लेखकांचे व वाचकांचे जीवन काही अंशांनी समृद्ध करणे, हे 'ऐसी अक्षरे' चे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर आंतरजाल हे मराठी साहित्यनिर्मितीचे व वाचनाचे माध्यम म्हणून समृद्ध करणे हे त्याला पूरक उद्दिष्ट आहे. हे साधण्यासाठी लेखकांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला प्रोत्साहन, उत्तम लिखाणाची व लेखकांची विशेष नोंद, लिखाणाला श्रेणी देण्याची सुविधा देणे याद्वारे प्रयत्न केला जाईल. सदस्यांनी एकमेकांशी सुसंवाद साधण्याची क्षमता हे संकेतस्थळांचे बलस्थान आहे. त्याचा वापर करून घेण्यासाठी समधर्मी सदस्यांना हितगुज करण्याची संधी उपलब्ध असेल. नियमितपणे काही सांस्कृतिक कट्टे आयोजित करून त्यात आपापल्या क्षेत्रात मान्यवर ठरलेल्या व्यक्तींना बोलावण्याचा मानसही आहे. यातून पारंपारिक माध्यमे व आंतरजालीय माध्यम यांमधील दरी कमी होईल अशीही आशा आहे.
संकेतस्थळाचे अधिकृत उद्घाटन दिवाळीच्या दिवशी होईल. पण आत्ता या घडीला संस्थळ कार्यरत आहे. तिथे येऊन आपला आयडी राखून ठेवावा, व ह्या संकेतस्थळाच्या बाळरूपाविषयी तुमचे अभिप्राय, सूचना, अडचणी, प्रश्न अवश्य कळवा ही विनंती. तसेच आपण सर्वांनी आपुलकीने लेखन करून व उत्तम लेखनाला प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे हीदेखील मनापासूनची इच्छा.
Comments
संकेतस्थळाची लिंक
साईटची लिंक आहे http://www.aisiakshare.com/
साईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहेसाईटची लिंक आहे
सभासदत्व
सभासदत्व घेतले. आभार.
शुभेच्छा
'ऐसी अक्षरे' ह्या नव्या मराठी संकेतस्थळाला शुभेच्छा. मी सभासदत्व घेतलेले नाही. पण इतरांना सुचवले आहे. आभार.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
शुभेच्छा
शुभेच्छा! सदस्यत्व घेतले आहे.
शुभेच्छा!
'ऐसी अक्षरे' ह्या नव्या मराठी संकेतस्थळाला शुभेच्छा.
शुभेच्च्छा पण...
शुभेच्च्छा. पण नव्या संकेतस्थळावरही वानरसेना दाखल झालेली दिसतेय.
ऐसीअक्षरेला शुभेच्छा!
येऊ दे की वानरसेना. इथे निदान सुत्रं तरी वानरांच्या हातात नाहीत असे दिसते आहे. त्यामुळे वानरसेनेचा पाडाव करणे सोपे आहे.
शुभेच्छा
'ऐसी अक्षरे' ह्या नव्या मराठी संकेतस्थळाला शुभेच्छा. 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील आजी संपादक ज्या संकेतस्थळावरील माजी आहेत, त्यांनी पूर्वीच्या संकेतस्थळावरील संपादकांचा अडाणी मस्तवालपणा व निगरगट्ट निर्लज्जपणा तेथे आणू नये असे वाटते.
बाकी रंगसंगती छान वाटली. सजावटीमध्ये बटबटीतपणा टाळला आहे हे उल्लेखनीय. तेवढे ते उद्दीष्ट चे उद्दिष्ट करा.