जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे.

मंडळी, जालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक दीपज्योती २०११ हा आजच प्रकाशित करण्यात आलेला आहे... कथा, कविता, ललित-वैचारिक-तंत्रज्ञान-इतिहास विषयींचे लेख, अभिवाचन, काव्यवाचन, गझलगायन, छायाचित्रण इत्यादि साहित्याने नटलेल्या ह्या अंकाचा आस्वाद जरूर घ्या...आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवा ही विनंती.
सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Comments

अभिनंदन

अंकाची रचना रोचक वाटली पण मला साहित्य कसे वाचायचे ते कळले नाही. टिचकी कोणत्या दुव्यावर मारावी?

शुभेच्छा

आधी संपादकीय वर टिचकी मारा, मग मनाचे मानकरी वर टिचकी मारा, मग प्रवेश वर टिचकी मारा, मग खालच्या बाजूला लिन्का सापडतील....सोपा आहे ;)

@प्रमोद देव - अंकासाठी बरीच मेहनत घेतल्याचे जाणवते आहे, अंकासाठी धन्यवाद.तुम्हाला देखील शुभेच्छा.

ओक्के

ओक्के. आले लक्षात. प्रवेशचा दुवा मुख्यपृष्ठावर असायला हवा होता.

असो. अंकात बरेच लेख आहेत. सावकाश वाचेन म्हणते.

खरं आहे..पण...

अंकातल्या काही गोष्टी वाचकांनी आवर्जून पाहाव्या असे वाटत असल्यामुळे प्रवेशाची पद्धत मुद्दाम तशी ठेवलेय...एरवी सहसा कुणी संपादकीय किंवा श्रेयनामावली वाचायच्या भानगडीत पडत नाहीत.
अंकात काय कमी/जास्त आवडलं/नावडलं ते जरूर कळवा...त्याचा फायदा आम्हाला पुढच्या अंकाच्या वेळेस निश्चितच होईल.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अभिनंदन.....!!!

देव साहेब, तुम्हा जालकरी मंडळीचं सालं आपल्याला लैच कौतुक वाटतं.
अंक नेहमीप्रमाणे भारीच वाटतोय. वाचून तिकडेच प्रतिक्रिया कळवतो.

जालरंग प्रकाशनाचे संयोजक, दीपज्योतीचे संपादक,लेखक, कवींचे मनःपूर्वक अभिनंदन.

-दिलीप बिरुटे

अंकाची दखल...

घेतल्याबद्दल प्रियाली,आजूनकोणमी आणि दिलीपराव आपणा तिघांना मनःपूर्वक धन्यवाद!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

अभिनंदन

अंक प्रकाशित करण्यासाठी मेहनत घेतल्याचे जाणवते. सर्वांचे अभिनंदन.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

 
^ वर