आधी कळस मग पाया

Stephen Covey यांनी आपल्या Seven Habits of Highly Effective People या पुस्तकांत कोणत्या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून आयुष्य जगल्यास त्यांतून आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळेल हे सांगतांना एक mental exercise करून खालील प्रश्नांची उत्तरे शोधायला सांगितली आहेत.
१) आपले निधन झाल्यावर आपल्या मागे लोक आपल्याबद्दल काय बोलतील असे आपल्याला वाटते?
२) त्याच प्रसंगी लोकांनी आपल्याबद्दल काय बोललेले आपल्याला आवडेल?

या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांवरून आयुष्याची फेरआखणी कशी करावी याबद्दल लेखकाने मार्गदर्शन केले आहे. त्यांतील काही ठळक सूचना खालीलप्रमाणे आहेत.
अ) आयुष्यांत ज्या भूमिका पार पाडायच्या आहेत त्यांची यादी करा. (उदा. पति/पत्नी, पिता/माता, सहाध्यायी, कार्यालयीन कर्मचारी, मित्र, एक नागरिक, एक स्वतंत्र व्यक्ति, इ.)
ब) प्रत्येक भूमिकेंतील स्वतःचे ध्येय निश्चित करा. त्यासाठी प्रश्न क्रमांक २ चे उत्तर विचारांत घ्या.
क) 'अ' व 'ब' वरून आपल्या आयुष्याचे एक संविधान तयार करा. त्याला Stephen Covey यांनी 'Mission Statement' असे म्हंटले आहे. त्याचे मधूनमधून पुनरावलोकन करून त्यांत योग्य त्या दुरुस्त्या करा व त्याला अंतिम स्वरूप द्या.
ड) कोणत्याही परिस्थितींत प्राधान्यक्रम Mission Statement च्या आधारे ठरवा.

शेवटी Stephen Covey यांचे उपरोल्लेखित पुस्तक प्रत्येकाने जरूर वाचावे असे मी सांगू इच्छितो.

Comments

आधी पाया...

अ)ब)क)ड) संदर्भाने आणि Stephen Covey यांचे पूस्तक न वाचता माझे मत असे आहे की,सामान्य माणूस काही करो अथवा न करो,मोठा माणूस कितीही कर्तुत्वान असला तरी लोक कूणाच्याही निधनानंतर ,अनूक्रमे खालील उद्गार काढतात.
१)चांगला माणूस होता.
२)चांगल्या माणसांना देव फार लवकर नेतो.(जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ना माहित नाही 'तो' सध्या काय वाचतो आहे.

आपल्याला काय आवडेल?

आपल्याला आपल्याबद्दल इतरांनी (म्हणजे आपल्या भूमिकांच्या अनुषंगाने ज्यांच्याशी आपला संबंध येतो अशांनी) कोणत्याही मृत व्यक्तीबद्दल सर्वसाधारण बोलले जाते तसे बोललेले आवडेल की काही हृद्य आठवणी सांगून आपण कसे आदर्श व लोकोत्तर होतो ते सांगितलेले आवडेल? (प्रश्न २ चे स्पष्टीकरण)

Stephen Covey चे पुस्तक स्वतःचा चारित्र्यविकास कसा घडवून आणावा व नेतृत्वगुण अंगी बाणवून Effective Person कसे व्हावे याविषयी आहे.

रामदास उक्ती

आपण सुचवलेले पुस्तक छान आहे. आपण लिहीलेल्या पुस्तकातील विशिष्ठ भागाबद्दल रामदासांच्या खालील ओळी आठवल्या:

मरावे परी किर्ती रूपी उरावे

विकास

करून बघा

आपण Stephen Covey चे Seven Habits ......वाचलेले दिसते.

पुस्तकांत सांगितल्याप्रमाणे मी माझे Mission Statement तयार केले आहे , त्याला लिखित स्वरूप दिले आहे व मधून मधून मी ते नजरेखलून घालीत असतो. माझा असा अनुभव आहे की एकदा लिखित स्वरूप दिल्यावर त्यांत बदल करून तडजोड करू नये असे वाटते. त्याचबरोबर आपल्याकडून त्याचे उल्लंघन होऊ नये असेही तीव्रतेने वाटते.

आपण आपले Mission Statement बनवले आहे का? नसल्यास जरूर बनवा व लिखित स्वरूपांतील Mission Statement च्या प्रभावाचा अनुभव घ्या.

त्यावरून आठवले .......

मिशन स्टेट्मेंट् जनरेटर् पाहिला. त्यावरून शरू रांगणेकरांच्या "इन् द वडर् लँड् ऑफ् इंडियन् मॅनेजर्स" या पुस्तकाची आठवण झाली.

स्टीफन कोण लागून गेला आहे??

या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांवरून आयुष्याची फेरआखणी कशी करावी याबद्दल लेखकाने मार्गदर्शन केले आहे. त्यांतील काही ठळक सूचना खालीलप्रमाणे आहेत.

आम्ही कसं जगायचं हे सांगणारा Stephen Covey कोण लागून गेला आहे?? आम्ही आमच्याच मस्तीत जगू! आम्ही कोणतीही कृती आम्हाला वाटते म्हणूनच करू. आमच्याकरता काय भलं अन् काय वाईट हे आमचं आम्ही ठरवू!

१) आपले निधन झाल्यावर आपल्या मागे लोक आपल्याबद्दल काय बोलतील असे आपल्याला वाटते?

काही का बोलेनात! आप मेला जग बुडाला. साला बातईच खतम!

त्याच प्रसंगी लोकांनी आपल्याबद्दल काय बोललेले आपल्याला आवडेल?

काहीही बोललेले आवडेल!

आपला,
(आपल्याच मस्तीत जगणारा!) तात्या.

काही जीवाभावाची माणसं..

काही माणसांचा स्वभावच असा असतो,पहा त्यांना निसर्गाची देनच असते, सतत हसमूखराय.कोणत्याही सामाजिक कार्यात सतत उत्साहाने सहभागी.त्यांना वेळ कमी पडतो.स्वत:ची असंख्य कामे बाजूला सारून सतत अडलेल्या नडलेल्या माणसांना मदत करतो.असा माणूस काही दिवस दिसला नाही की,आपण कारण नसतांना त्याची चोकशी करतो. बरं नाही का ? वैगरे. ह्या माणसांची जातच वेगळी असते.यांना कशा कशाचे बंधने नसतात.ते अगदी स्वैर पणाने हवेच्या झूळूकेप्रमाणे वहात असतात,ती माणसं. सतत आजूबाजूला वावरत असतात.आणि मग कधीतरी, आत्ता तर भेटला....आत्त्ताच तर येथून गेला...आत्ताच तर त्याच्याशी बोललो....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
 
^ वर