ऐतिहासिक गोष्टी, भाग १, लोकहितवादी

लोकहितवादी (गोपाळ हरि देशमुख) ह्यांच्या 'ऐतिहासिक गोष्टी' ह्या जुन्या पुस्तकाच्या भाग १ ची प्रत मला उपलब्ध झाली ती मी http://www.archive.org/details/AitihasikGoshtii येथे नेऊन ठेवली आहे. जिज्ञासूंनी अवश्य पाहावी.

मराठेशाही प्रामुख्याने आणि अन्य बादशहा, इंग्रज इत्यादींच्या मनोरंजक गोष्टी येथे वाचावयास मिळतील. गोष्टीवेल्हाळ माणसांने गप्पा मारल्यासारखे पुस्तक आहे.

प्रत वाचण्यास थोडी खराब आहे कारण पुस्तक संपूर्ण सोडवून पानांचे scans घेणे शक्य नव्हते. पुस्तक अतिशय नाजूक स्थितीत असल्याने मधूनमधून थोडी पाने फाटलेलीहि आहेत तरीहि एकूण लिखाण समजण्यास काही अडचण नाही.

प्रत मुळात गो.भि.मेहेंदळे नावाच्या शाळकरी मुलाच्या संग्रहात होती असे दिसते कारण तिच्यामध्ये अनेक ठिकाणी शाळकरी मुलाची pencil scribbles दिसतात.

लेखनविषय: दुवे:

Comments

विश्वासार्हता?

प्रत चाळली. वाचण्यास कठीण आहे हे खरेच. तसेच या गोष्टींची विश्वासार्हता कळली नाही.

पान २३, प्रकरण ३४ वर लिहिले आहे की वसई सर केल्यावर दुसर्‍या दिवशी चिमाजीअप्पांचा मृत्यू झाला. ही गोष्ट खोटी असावी. वसईच्या विजयानंतर लवकरच चिमाजी अप्पांचा मृत्यू झाला पण लगेच दुसर्‍या दिवशी नक्कीच नाही पण अतिशयोक्ती सोडल्यास बाकीचे संदर्भ योग्य असल्यास कथा रोचक आहेत हे खरेच.

कोल्हटकरांना धन्यवाअ.

हा अधिकृत इतिहास नाही.

ह्या पुस्तकाकडे इतिहासाचे अधिकृत पुस्तक म्हणून पाहिले जाऊ नये. लोकहितवादी हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील इंग्रजी विद्या घेतलेल्यांपैकी एक होते. इनाम कमिशनमध्ये काही दिवस नोकरी केल्यामुळे तसेच पेशवाईच्या दिवसांपासून सरकारी कामे करण्याचा अनुभव असलेल्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीमुळे त्यांना बर्‍याच गोष्टी कानावरून गेलेल्या असणार. त्याचे संकलन म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले असावे, सीरियस इतिहास म्हणून नव्हे आणि त्याच दृष्टिकोणामधून मी ह्या पुस्तकाकडे पाहतो. मी त्या पुस्तकाचे वर्णन गोष्टीवेल्हाळ माणसाच्या गप्पा असे केले आहे ते ह्याचसाठी.

लोकहितवादींच्याबाबत न.र.फाटक ह्यांनी लिहिलेले एक त्रोटक चरित्रात्मक टिपण मला येथे मिळाले: http://www.vandemataram.com/biographies/patriots/deshmukh.htm

मस्त!

पुस्तक मस्त आहे. काही भाग चाळला. काळाच्या खिडकीत डोकावल्या सारखे वाटले. वाचायला चांगले वाटले. काही पाने वाचता येत नाहीत. पण आपला प्रयत्न स्तूत्य आहे, आवडला.
ही प्रत तुम्हास कशी उपलब्ध झाली?
-निनाद

दुसर्‍या बाजीरावाचा रंगेलपणा

दुसर्‍या बाजीरावाच्या रंगेलपणाविषयी या पूर्वी उपक्रमावर येथे चर्चा झाली होती. उपरोल्लेखित पुस्तकातही या गोष्टींचा समावेश आहे.

 
^ वर