शिव्यांची माहिती हवी..;)

राम राम मंडळी,

मराठी व हिंदी 'बोलीभाषा' हा आमच्या अभ्यासाचा विषय आहे. कुठलीही बोलीभाषा म्हटली की 'शिव्या' हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे असा आमचा समज आहे. दोनचार सणसणीत शिव्यांशिवाय कुठल्याही बोलीभाषेला शोभा नाही असा आमचा दृढविश्वास आहे.

या संदर्भात आम्हाला काही प्रश्न पडले आहेत ते विचारत आहोत. आपल्यापैकी कुणी त्यांची उत्तरे दिल्यास आम्ही त्या व्यक्तिचे आभारी राहू.

१) 'शिवी' ह्या शब्दाचा उगम काय?
२) 'शिवी' हा शब्द मराठी आहे की फारसी, की आणखी काही?
३) जगातली पहिली शिवी कुठल्या भाषेतून दिली गेली असेल? त्याचा साधारण काळ कुठला असेल?
४) अमूक अमूक शब्दाला 'शिवी' असं म्हणतात हे कुणी ठरवलं असेल?
५) आमच्या शिरुभाऊंच्या, किंवा जयवंत दळवींच्या काही लेखनात शिव्या सापडतात. पण हा अलिकडचा काळ झाला. पहिली शिवी असलेलं साहित्य कुठल्या भाषेत प्रसिद्ध झालं असेल? आणि त्या साहित्याच्या सन्माननीय लेखकाचे नांव कुणाला माहिती आहे का?
६) 'शिवी' हा बोलीभाषेला लाभलेला एक बहुमोल अलंकार आहे असं आपल्याला वाटतं का?

इत्यादी, इत्यादी, इत्यादी...

मंडळी, आहेत की नाही वरील प्रश्न उत्सुकता वाढवणारे? मग देताय ना त्याची उत्तरं आपापल्या परिने? ;)

आपला,
(शिवराळ!) तात्या.

मिसळपाव डॉट कॉमवर व्याकरण आणि शुद्धलेखनाला अवास्तव महत्व दिले जाणार नाही. शुद्धिचिकित्सक हा प्रकार मिसळपाव डॉट कॉमवर नसेल! ;)

Comments

शिवी

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा परिस्थितीत बेडा पार करण्यासाठी शिवीचा वापर होतो.
प्रकाश घाटपांडे

शिव्या

मराठी व हिंदीसोबत इंग्रजी, तमिळ व कन्नडामधील शिव्यांची माहिती दिली तर चालेल का?

(इंग्रजी, तमिळ व कन्नडाप्रेमी) योगेशयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

अवश्य!

मराठी व हिंदीसोबत इंग्रजी, तमिळ व कन्नडामधील शिव्यांची माहिती दिली तर चालेल का?

स्वागत आहे! ;)

आपला,
(कानडी) तात्या.

नक्की दे!

योगेश, प्लीज प्लीज कानडी शिव्यांची आणि अपशब्दांची माहिती दे.
लग्न होऊन इतकी वर्षे झाली पण नवरा जेव्हा मला "यम्मी" म्हणायचा तेव्हा त्या शब्दाचा इंग्रजी अर्थ समजून मी मनातल्या मनात खूश व्हायचे. परवा सासू-सासर्‍यांसमोर म्हणाला तेव्हा सगळे खो खो हसू लागले. मला वाटलं नवरा इतक्या प्रेमाने सगळ्यांसमोर म्हणतोय म्हणून सगळे हसतायत. मग मी जरा आणखीच लाजल्यासारजखं केलं.
मग हसू आवरत वन्संनी सांगितलं यम्मी म्हणजे म्हैस!
मी चक्क म्हैस म्हटल्यावर लाजून चूर वैगेरे वैगेरे होत होते.:):)

(मला कानडी शिकवायला नवरा एवढे आढेवेढे का घेतो हे त्यादिवशी कळले.)
साती.

माकडाच्या हाती शॅम्पेन/शीव

"बायकोवर कितीही प्रेम केलं तरी माणसाची आईवर अधिक माया असते. त्यामुळेच सगळ्या भाषांत आईवरून शिव्या आढळतात, पण बायकोवरून नाही." - असा 'माकडाच्या हाती शॅम्पेन' या नाटकात एक संवाद आहे. तो या चर्चेच्या संदर्भात कदाचित माहितीपूर्ण ठरावा :)

प्र. क्र. १ बद्दल - प्रमाणभाषेच्या 'शिवे'बाहेर सतत ठेवले गेल्याने 'शिवी' हा शब्द आला असावा काय? :D

असो. शिव्यांचा उगम कदाचित संस्कृतीच्या उगमाबरोबरच झाला असावा. म्हणजे, गुहेत राहत असताना एखाद्याला/चा राग आला तर कुणाचा जीव घेणे हे पूर्वीच्या टोळ्यांत निषेधार्ह मानले जात नसावे. पण मग सुसंस्कृतपणाबरोबरच दुसर्‍याचा जीव घेणे हे चुकीचे ठरवले गेले असावे, आणि मग राग व्यक्त करण्याचे एक साधन म्हणून शिव्यांचा उगम झाला असावा. म्हणजे 'शिव्या देणे शिष्टसंमत' इथपासून 'चारचौघांत शिव्या देणे अयोग्य' असे मानण्यापर्यंत आपला प्रवास झाला आहे, असे मानायला हरकत नसावी.

वेगळा मुद्दा..

प्रमाणभाषेच्या 'शिवे'बाहेर सतत ठेवले गेल्याने 'शिवी' हा शब्द आला असावा काय? :D

नंदन, प्रमाणभाषेचा विषय काढून तू जरा वेगळ्याच मुद्द्याला हात घातला आहेस. ही 'प्रमाणभाषा' कोण ठरवतात? आणि तसे ठरवायचे अधिकार या डुढ्ढाचार्यांना कुणी दिले??

च्यामारी, या प्रमाणभाषावाल्यांची ऐशीतैशी! ;)

मी एखादं साधं सरळ वाक्य लिहिलं तर ते प्रमाण भाषेत बसतं, आणि त्याच अर्थाचं वाक्य एखाद्या झुंजार शिवीची फोडणी देऊन लिहिलं तर ते म्हणे प्रमाणभाषेत बसत नाही! हा काय चावटपणा आहे? ;)

आपला,
तात्या वाळिंबे.

बाय द वे नंदन, तुझं ते प्रमाणभाषा वगैरे सगळं नेऊन घाल की रे तिकडे! मामलेदाराची मिसळ खायला ठाण्यात पुन्हा केव्हा येतोस तेवढं बोल. दोन दोन प्लेटी झणझणीत मिसळ खाऊ आणि वरती गार गार ताक पिऊ! ;) पैशे वाटल्यास मी देईन, पण तू नक्की ये! ;)

प्रमाणभाषा

वरील प्रतिसादात खालील बदल करून वाचून पाहा.
प्रमाणभाषा - शास्त्रीय संगीत
वाक्य - काव्य
त्याच अर्थाचं - (त्याच अर्थाचं नव्हे! तर)तेच काव्य
झुंझार - 'झंकार' वाली
शिव्यांची फोडणी - रिमिक्स चाल
तात्या वाळिंबे - (कुमार) तो
मामलेदाराची मिसळ - मामलेदाराची मिसळ :)
पैशे मी देईन, - पैसे तात्या देतील ;)

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

बरं बुवा! ;)

वरील प्रतिसादात खालील बदल करून वाचून पाहा.

बरं बुवा! ;) पाहतो...!

तात्या सध्या काहीही वाचत नाहीये! ;)

माहितीची देवाण घेवाण

शिव्यांचा मोठा संग्रह या लेखात व प्रतिसादांत मिळू शकेल.

धन्यवाद,

सदर चर्चाविषयाला अत्यंत समर्पक असा दुवा इथे दिल्यामुळे आम्ही आपले आभारी आहोत! ;)

परंतु या दुव्यात फक्त शिव्यांचाच साठा वाचावयास मिळतो. या चर्चेत आम्ही काही प्रश्न उपस्थित केले आहेत त्याची उत्तरं देणारा दुवा कुठे सापडल्यास तोही अवश्य द्यावा ही विनंती..

धन्यवाद..

आपला,
मगनलाल वेलणकर.

हुच्चा

नानु हुच्चु हुडगु - तू वेडा मुलगा आहेस.

ही एक सुसंस्कृत कन्नडा शिवी.

- (पुणेकर) योगेश

अवांतरः तात्या, मुंगारु मळे (पहिला पाऊस) या सध्या तुफान लोकप्रिय असलेल्या कन्नडा चित्रपटातील एका गाण्याचा दुवा देतो, त्याचे रसग्रहण कराल काय?

http://www.youtube.com/?v=gDTQJs6LbHMयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

आयला! ;)

योगेश,

आयला! त्या गाण्यातली ती नटी कोण रे? पावसामुळे लय भारी दिसते बॉस! आपण तर साला खल्लास..

आता कसलं रसग्रहण करतोस नी कसलं काय! ;)

आपला,
(पाऊसवेडा!) तात्या.

नटीची व इतर "माहिती"

त्या नटीचे संजना गांधी आहे.

(गांधीजीभक्त!) योगेश

हा पिच्चर पण लई भारी आहे. नुसता पाऊसच पाऊस. शिवाय जोग धबधबा पण.
दुसरं गाणं पण सही आहे. त्याचं पण रसग्रहण करुन कोणते राग वापरलेत ते आम्हाला सांगा. ttp://www.youtube.com/watch?v=vLd4ChiNpYE&mode=related&search=येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

सही..

त्या नटीचे संजना गांधी आहे.

(गांधीजीभक्त!) योगेश

योगेश, तुझं 'गांधिजीभक्त' हे आपल्याला जाम आवडलं!

पण आता काळजी घे. आता काही नेभळट (की नेळभट?) निधर्मी तुझ्यावर घसरतील! ;)

आपला,
तात्या गोडसे.

चूक

नानु म्हणजे "मी".
नीनु म्हणजे "तू".

हुच्च

जी एंच्या कथांत बर्‍याचदा दिसतो. त्यांचे कानडीशी काही नाते होते काय?
यात 'नानू' म्हणजे 'तु' आहे का? आणि चार शब्दांच्या मराठी वाक्याला तीन शब्दी कन्नड वाक्य कसे? म्हणजे 'मुडुगु' हे 'मुलगा आहेस' ला आहे का?
(जिज्ञासू)अनु

हुच्च् आणि जीए

जीए धारवाडला राहत होते त्यामुळे त्यांच्या कथांमध्ये हुच्च, हुडुक, तंगी, अक्का, किट्टु, चिक्कप्पा हे कन्नड शब्द वारंवार आले असावेत.
नानु = मी. नीनु = तू

वरती मी वेडा मुलगा आहे असे वाचावे. टायपो झाली :(येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मराठी शिव्या, हे घ्या.

मजकूर संपादित. आपले लेखन सभ्यतेच्या आणि सार्वजनिक संस्थळावरील सर्वमान्य संकेतांचे पालन करणारे असेल याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.

कोंडके साहेब,

आम्ही फक्त शिव्यांविषयी माहिती विचारली होती. शिव्या विचारल्या नव्हत्या.

तात्या.

पचतील का?

मजकूर संपादित. आपले लेखन सभ्यतेच्या आणि सार्वजनिक संस्थळावरील सर्वमान्य संकेतांचे पालन करणारे असेल याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.

या तर आम्हाला पण माहित आहेत.
याना (च) शिव्या का म्हणायचं?

मला असं वाटतं की असा कोणताही शब्द शिवी असतो ज्या तून समोरच्या माणसाचा उपमर्द (मर्द आणी उप - मर्द वा काय शब्द आहे ;) ) किंवा अपमान करण्याचा प्रयत्न होतो.
त्या साठी एखाद्याला 'महाराज' म्हंटलं तरी पुरे असते.
इथे महत्व शब्दछटे बरोबर वेळेला पण आहे.

आपला
गुंडोपंत

~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!
म्हणजे काय?
म्हणजे 'वय वर्षे १८ अधिक' अशा समूहा चे वावडे उपक्रमाला का असावे बरं? ~

सकाळी उठून

ही चर्चा पाहिल्यावर मनातल्या मनात मी किती शिव्या मोजल्या असाव्यात, परंतु माहिती हवी ना.... घ्या!

शिवी म्हणजे दुसर्‍या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजानिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही शिव्या या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. शिव्या या धर्मावरून, जातीवरून, व्यवसायावरून, शारीरिक आणि मानसिक व्यंगावरून, जनावरांवरुन देता येतात. प्रियजनांवरून, लैंगिकतेवरून व विशेषत: या दोहोंच्या एकत्रीकरणातून दिलेल्या शिव्या सर्वात जास्त अपमानकारक समजल्या जातात.

जगात पहिली शिवी कोणी दिली वगैरे सारखे प्नश्न गूगलवर शोधून मिळतात का पहावे, निदान लेखिकेला फारशी माहिती नाही.

नंदनने विचारलेला प्रश्न
प्र. क्र. १ बद्दल - प्रमाणभाषेच्या 'शिवे'बाहेर सतत ठेवले गेल्याने 'शिवी' हा शब्द आला असावा काय? :D
आवडला.

संत साहित्यात तुकाराममहाराजांनी शिव्यांचा वापर केल्याचे सांगितले जाते.

येथे टिचकी मारून २४७८ वी ओवी पाहा. तुकाराम गाथेत अधिकही शिव्या येतात, त्यांची माहिती हवी असल्यास कृपया गाथा वाचावी.

तुकाराम महाराज करायचे मग आम्हीही करू असे जर एखाद्या उपक्रमीचे मत पडले तर नम्रपणे सांगावेसे वाटते की आपण त्यांच्या पासंगालाही पुरणारे नाहीत. यालाच एखाद्याचा अपमान आणि पर्यायाने शिवी म्हणत असतील तर क्षमस्व!

तपासले! ;)

जगात पहिली शिवी कोणी दिली वगैरे सारखे प्नश्न गूगलवर शोधून मिळतात का पहावे,

तिथे तपासले पण काहीच माहिती मिळाली नाही. म्हटलं, इथे एकापेक्षा एक रथी महारथी माहीतगार लोकं आहेत, तेव्हा इथे विचारून पाहवे! ;)

ही चर्चा पाहिल्यावर मनातल्या मनात मी किती शिव्या मोजल्या असाव्यात,

मनातल्या मनात आपण किती शिव्या मोजल्या असाव्यात हे आम्हालाही माहीत नाही, परंतु त्या कुणाला मोजल्या असाव्यात याचा मात्र चर्चाप्रस्तावक या नात्याने आम्हाला थोडाफार अंदाज आला आहे! ;)

असो..! (चूभूद्याघ्या!)

बोलीभाषेविषयी काही मूलभूत माहिती मिळवायची म्हणजे काही वेळेला शिव्याही खायची तयारी ठेवली पाहिजे हे आता आम्हास कळून चुकले आहे ! ;)

आपला,
(लोकांनी मनांत आणि जनांत दिलेल्या शिव्या पचवलेला!) तात्या.

विकिपिडियावर..

जगात पहिली शिवी कोणी दिली वगैरे सारखे प्नश्न गूगलवर शोधून मिळतात का पहावे,

अरे हां! अद्याप आम्ही विकिपिडियावर तपासले नाही. तिथे एकदा तपासून पाहावे असे म्हणतो आहोत! च्यामारी ते विकिपिडिया तपासायचं राहीलंच की! ;)

आम्ही विकीला विसरूनच गेलो होतो. आता मध्येच बरं आठवलं! ;)

चला! आता कुणी विकिपिडियावरचा दुवा द्यायच्या आत आपण तिथे विकीवर जाऊन तपासून पाहिलं पाहिजे! ;) नाहीतर कुणीतरी मनातल्या मनात शिव्या देत, 'धत तेरीकी, हा घ्या विकीवरचा दुवा!' असं म्हणायचा! ;)
(स्वगत!)

आपला,
(बेसावध!) तात्या.

तात्या सध्या काहीही वाचत नाहीये! ;)

घ्या

मूळ दुवा तुम्ही शोधालच पण ही चर्चा देखील वाचा!

~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे! ~~

अरे देवा!

हेच बाकी होतं. :)
चला आता चर्चेकर्‍यांची नावं वाचून त्यांना इतका माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल धन्यवादही द्या. ;-)

असो. सदर लेखावर खडा पहारा आहे याची नोंद घ्यावी.

पायांचा फोटो!

'तो' देवा,

अरे तुझ्या पायांचा फोटो काढून स्कॅन करून त्याची जयपीजी फाईल मला पाठव रे बाबा! त्याची फ्रेम माझ्या घरात लावणार आहे! ;)

धन्य आहे बाबा तुझी आणि तुझ्या विकिपिडियाच्या वाचनाची! ;)

'तो' ने संत तात्याबांना विकीवरचे दुवे देऊन देऊन पुरते हैराण करून सोडले! ;)

शिवी

पु.ल. देशपांड्यांच्या "रावसाहेब" या व्य़क्तिचित्रात शिव्यांचा वेधक , मनोरंजक उल्लेख आहे, व्याकरणातील पालुपद, नाम, सर्वनाम, विषेशण, क्रियाविषेशण, क्रियापद,अव्यय,विभक्ति, अलंकार इ. मध्ये शिव्या चपखल बसतात. तात्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या शिव्या या देखिल ओव्या वाटाव्यात इतक्या स्वच्छंदीपणे, निर्मळ मनातून आलेल्या असतात. देहबोलीतून देखिल शिव्या बाहेर पडतात. प्रेम व कौतुक व्यक्त करण्यासाठी देखिल शिव्या वापरतात. कोणीतरी "घाण" म्हणत असत त्यालाच कोणीतरी "च्छान" म्हणत असतं.
प्रकाश घाटपांडे

संस्कृतपणा आणि शिव्या!

तात्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या शिव्या या देखिल ओव्या वाटाव्यात इतक्या स्वच्छंदीपणे, निर्मळ मनातून आलेल्या असतात.

क्या बात है..

धन्यवाद घाटपांडे साहेब!

अहो माणसाला शिव्यांच्या माध्यमातून सुद्धा सुंदर बोलता येते. अशी काही माणसं मी कोकणात बघितली आहेत. मुंबईतही बघितली आहेत.एखाद्याने प्रेमाने दिलेली शिवीदेखील काळजाला हात घालते हो! पण हे जेव्हा काही लोकांना समजेल तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने सुसंस्कृत झालो असं माझं वैयक्तिक मत आहे.

आणि अहो शिव्यासुद्धा देता आल्या पाहिजेत! त्याकरता देखील धारिष्ट्य लागतं.

'आम्ही सुसंस्कृत आहोत', किंवा 'सुसंस्कृत माणसं शिव्या देत नाहीत', किंवा 'शिव्या देणे हे सुसंस्कृत माणसाचे लक्षण नाही' अश्या गप्पा मारणारी सगळीच नव्हेत, पण बरीचशी माणसं प्रत्यक्षात किती असंस्कृत असतात याचा खूप अनुभव मी घेतला आहे. किंबहुना याच मंडळींनी 'सुसंस्कृत' हा शब्द अत्यंत स्वस्त करून ठेवला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे!

च्यामारी, ह्यांच्यापेक्षा आमच्यासारखे काही शिवराळ असंस्कृत बरे! चार सणसणीत शिव्या देऊन मोकळे होतात. आतल्या आत कुढत तरी बसत नाहीत!

असो!

आपला,
(असंस्कृत!) तात्या.

अपशब्द कोष

या नावाचे एक पुस्तक काही काळापूर्वी प्रसिद्ध् झाल्याचे ऐकले आहे. कोणा पुणेकराला विचारून पहा मिळतेय् का सध्या? त्यात कदाचित आवश्यक माहिती मिळू शकेल, असं वाटतं.

शिव्या अन ओव्या.

तात्याच्या तोंडातून बाहेर पडलेल्या शिव्या या देखिल ओव्या वाटाव्यात इतक्या स्वच्छंदीपणे, निर्मळ मनातून आलेल्या असतात.
सहमत.

तात्या,चर्चेचा प्रस्ताव वाचून, शिव्यांचा लोकसाहित्यात अभ्यास करता येइल,का ?असा प्रश्न एका मराठीच्या विद्वानाला विचारला,जरा रागावला,पण संशोधन होऊ शकते या विषयावर.माझा लाडका तुक्या, माफ करा संत तुकारामांनी किती शिव्या दिल्या त्यांच्या अभंगातून.संपादित होऊ नये म्हणून ते अभंग देत नाही.त्यांना काही माहित एकविसाव्या शतकात माझे अभंग माहितीच्या ध्येय धोरणात बसणार नाहीत म्हणून नाहीतर आणखी त्यांच्या अभंगातून शिव्या वाढल्या असत्या..असो.;) शिव्यांचे कूळ शोधले पाहिजे.मराठी साहित्यातील कविता,कथा,कादंब-यातील शिव्यांचा चिकित्सक अभ्यास असा संशोधनाचा विषय होऊ शकतो.मराठी दलित-ग्रामीण साहित्यात कितीतरी संदर्भ सापडतील.

अवांतर;) आमची एक मैत्रीण नामदेव ढसाळांच्या गोलपीठा काव्यसंग्रहातील कविता महिलांनी शिकविणे म्हणजे कठीण काम आहे असे म्हणते,तो काय कविता संग्रह आहे का ? तो तर शिव्यांचा संग्रह आहे म्हणते.मी ही म्हणतो हो ना..! विचारा कारण... स्टाफ मधे त्या एकच जरा दिसायला,अन बोलायला ब-या आहेत;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे साहेब,

तात्या,चर्चेचा प्रस्ताव वाचून, शिव्यांचा लोकसाहित्यात अभ्यास करता येइल,का ?असा प्रश्न एका मराठीच्या विद्वानाला विचारला,जरा रागावला,

नुसताच रागावला नसेल तर त्याने मनातल्या मनात शिव्याही दिल्या असतील! बहुधा तो सुसंस्कृत वगैरे असावा त्यामुळे त्या बापड्याने मनातल्या मनात शिव्या दिल्या असतील! ;)

शिव्या द्यायच्या पण मनातल्या मनात, आणि 'मनातल्या मनात शिव्या दिल्या' हे मात्र उघडपणे सांगायचं, अशी हल्लीची सुसंस्कृतपणाच्या कायद्याची एक वेगळीच पळवाट निघाली आहे बरं का! ;)

मनातल्या मनात शिव्या देऊन वर पुन्हा संस्कृतीच्या गप्पा मारायला मंडळी मोकळी! ;)

किंबहुना मनातल्या मनात शिव्या देणे हे सोकॉल्ड सुसंस्कृतपणाच्या व्याख्येत बसत असेल, पण उघड उघड शिव्या देणे हे मात्र बसत नसेल! ;) असो असो..!

शिव्या वाईट, पण उत्तम शिव्या कुठे वाचावयास मिळतील याचे दुवे मात्र तोंडपाठ! ;)

वाह रे दुनिया! तेरा जवाब नही!

माझा लाडका तुक्या, माफ करा संत तुकारामांनी

तुकोबांसारख्या महान संतकवीला 'माझा लाडका तुक्या' असं संबोधन वापरल्याबद्दल वेळीच माफी मागितलीत हे मात्र बरं केलंत बिरुटे साहेब!

हे संबोधन जरी काळजाला कितीही हात घालणारं असलं तरी तुकोबांसारख्या महान संतकवीला 'माझा लाडका तुक्या' असं संबोधणे हे बहुधा उपक्रमाच्या आणि एकंदरीतच सुसंस्कृतपणाच्या व्याख्येत बसत नसेल/नसावं! ;)

महाराज, हे माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीचं केन्द्र आहे म्हटलं! इथे फक्त माहिती द्यायची आणि मोकळं व्हायचं. माहिती ही केवळ एक निर्जीव वस्तू आहे. ती भावना ओळखत नाही. एकवेळ जनाबाईचं निर्जीव जातं तिच्या ओव्या ओळखेल पण उपक्रम सुरू असलेला ब्राउजर 'माझा लाडका तुक्या' तले जीव लावणारे शब्द नाही ओळखणार!

असो!

संत तुकारामांनी किती शिव्या दिल्या त्यांच्या अभंगातून.संपादित होऊ नये म्हणून ते अभंग देत नाही.त्यांना काही माहित एकविसाव्या शतकात माझे अभंग माहितीच्या ध्येय धोरणात बसणार नाहीत म्हणून नाहीतर आणखी त्यांच्या अभंगातून शिव्या वाढल्या असत्या..असो.;)

हा हा हा! माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीच्या ध्येयधोरणांची सहीच करून टाकली आहे! ;)

ता क - 'करून टाकणे' हा शिव्यांच्या दुनियेतला वाक्प्रचार आहे का? कृपया व्याकरण तज्ज्ञांनी खुलासा करावा! अरे हो, पण शिव्यांच्या दुनियेचं व्याकरणच वेगळं, त्यामुळे बहुधा आम्हाला 'वेगळे व्याकरणतज्ज्ञ' शोधावे लागतील! वो उनकेही बसकी बात है! ;)

शिव्यांचे कूळ शोधले पाहिजे.मराठी साहित्यातील कविता,कथा,कादंब-यातील शिव्यांचा चिकित्सक अभ्यास असा संशोधनाचा विषय होऊ शकतो.मराठी दलित-ग्रामीण साहित्यात कितीतरी संदर्भ सापडतील.

पूर्णतः सहमत आहे.

अहो पण नुसता शिव्यांवरील चर्चाविषय (तोही बिनशिव्यांचा बरं का!) वाचून काही सुसंस्कृत मंडळी मनातल्या मनात शिव्या देऊ लागतात तिथे शिव्यांचं कूळ ते काय शोधणार कप्पाळ?! ;)

नायतर एरवी जळ्ळं 'ळ' कुठून आला, कसा आला, तो तमिळमध्ये आहे का अन् संस्कृतात आहे का याच्यावर मारे पांडित्यपूर्णे चर्चा करत बसतील, पण एखाद्या साध्या शिवीचे मूळ काय, उगम स्थान काय, ती कुठून आली, इत्यादी विषयांवर चर्चा करायची म्हटली तर अंगावर पाल पडल्यासारखे करतील! ;)

छ्या बिरुटेसाहेब! ही सुसंस्कृत लोकांची दुनिया किती बेगडी अन् दिखाऊ आहे! आपली साला या दुनियेत गिनतीच होत नाही हे एकप्रकारे बरं आहे असंच म्हणायचं!

मी ही म्हणतो हो ना..! विचारा कारण... स्टाफ मधे त्या एकच जरा दिसायला,अन बोलायला ब-या आहेत;)

आयला बिरुटेसाहेब! अशी भानगड आहे होय! बाकी तुमची पण कमाल आहे हो! ;)
थांबा, आता काकूंकडे तुमची चांगली चहाडीच करतो! ;))

आपला,
(असंस्कृत चहाडखोर!) तात्या नाडगौडा!

ता क - चहाडखोर, चुगलखोर या शिव्या आहेत का? 'ळ' या अक्षरावर किस पाडणार्‍या मंडळींनी कृपया खुलासा करावा. तिथे किस पाडण्याकरता 'ळ' हे अवघं एकच अक्षर होतं. इथे भिंतीवरच्या मोठ्या पालींसारखे 'चहाडखोर' आणि 'चुगलखोर' असे चांगले पाच अक्षरी सणसणीत शब्द आहेत. तेव्हा होऊन जाऊ द्या! ;)

तोंडावर ताबा

नुसताच रागावला नसेल तर त्याने मनातल्या मनात शिव्याही दिल्या असतील! बहुधा तो सुसंस्कृत वगैरे असावा त्यामुळे त्या बापड्याने मनातल्या मनात शिव्या दिल्या असतील!

खरं आहे! अहो शिव्या सगळेच देतात पण तोंडावर ताबा प्रत्येकाच्याच नसतो. ताबा किंवा कंट्रोल हे बहुधा मनुष्यालाच जमते, जनावरांना नाही.

शिव्या द्यायच्या पण मनातल्या मनात, आणि 'मनातल्या मनात शिव्या दिल्या' हे मात्र उघडपणे सांगायचं, अशी हल्लीची सुसंस्कृतपणाच्या कायद्याची एक वेगळीच पळवाट निघाली आहे बरं का!

ही पळवाट नाही बरं! सार्वजनिक शिष्टाचार पाळण्याची पद्धत आहे म्हणे.

शिव्या वाईट, पण उत्तम शिव्या कुठे वाचावयास मिळतील याचे दुवे मात्र तोंडपाठ! ;)

म्हणजे काय? :) शिव्या कोणत्या? त्या का देतात लोक इ. इ. वर फुकट उहापोह न करत बसता शोधाशोध करून लेख लिहिला तर दुवे माहित नसणार का?

होतं असं! सुसभ्य भाषेतही लोक इतरांचा अपमान करू शकतात आणि काहीजण त्याला शिवीगाळ म्हणतात. प्रत्येकाच्या शिव्यांच्या विदागाराची तीव्रता देखील कमीअधिक असू शकते पण शिवी येत नाही (मनात ;) ) असा माणूस नाही सापडायचा.

असो. माझ्याकडून आपल्या माहितीपूर्ण चर्चेवर शिवीगाळ झाली असल्यास माफ करा बरं का! ;-)

शिवी

खरं आहे! अहो शिव्या सगळेच देतात पण तोंडावर ताबा प्रत्येकाच्याच नसतो. ताबा किंवा कंट्रोल हे बहुधा मनुष्यालाच जमते, जनावरांना नाही.

मनुष्येतर प्राण्यांमध्ये पण शिव्या देण्याची प्रथा आहे. ती भाषा फक्त आपल्याला समजत॑ नाही, पण कुत्र्यांच्या भांडणात ते एकमेकांना शिव्या देतात हे समजतं. देह बोली व भुंकणे या वरून ते एकमेकांना शिव्या देतात हे लक्षात येते.

प्रकाश घाटपांडे

शिवी - व्युत्पत्ती

"शिव" या शब्दावरुन शिवी निर्माण झाला असावा.शंकर कोपिष्ट एखाद्याला थेट भस्म करण्याआगोदर त्याच्या तोंडातून काही अपशब्द बाहेर पडत असतील त्याला शिवी असे संबोधले गेले असावे.
(व्युत्पत्तीकार)प्रकाश घाटपांडे

शिव्यांवरून आठवले!

माझ्या लहानपणी आम्ही ज्या वाडीत राहायचो तिथे मिश्र वस्ती होती. आम्हाला घरातील कडक शिस्तीमुळे शिव्या शिकणे आणि देणे अतिशय कठीण होते;पण त्याच वेळी वाडीत खेळताना इतरांकडून दिल्या गेलेल्या शिव्यांचे नकळतपणे ग्रहण करता करता त्या आपोआप तोंडातही बसल्या आणि वेळप्रसंगी त्यासाठी घरचा खरपूस मारही खाल्लेला आठवतो.
एका सुट्टीत मामाकडे गेलो होतो तेव्हा त्याच्या मुलाला शिव्या शिकवल्याचेही आठवते. त्यांच्या घराच्या मागेच तुतीचे झाड होते आणि त्यावर लागलेल्या लालजर्द तुत्या तोंडाला पाणी आणत होत्या. तेव्हा चार तुत्यांमागे एक शिवी शिकवणे असा केलेला सौदाही आठवतोय.
आजही मला भरपूर शिव्या येतात. मात्र त्या जिथे चालू शकतात तिथेच त्याचा वापर कटाक्षाने करतो.एरवी चुकूनही तोंडात शिवी येत नाही हे विशेष!प्रत्येक गोष्टीची एक जागा असते.उगीच नको तिथे नको ते बोलणे हे मात्र पटत नाही.अन्यथा शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमधे रॅप अथवा पॉप गायल्यासारखे होईल.

काही विचार

अशा गंभीर विषयावर लिहिण्याची इच्छा मला बर्‍याच काळापासून होती. तशी संधी आणून दिल्याबद्दल चर्चाप्रस्तावकांचे व उपक्रमरावांचे आभार.
(पण प्रस्तावकांचा मूळ इरादा विनोदनिर्मितीचा असला व त्यांचा खालील लिखाणामुळे विरस होत असल्यास आगाऊ क्षमायाचना करतो.)
सावधगिरीची सूचना: अतिशय संवेदनाक्षम/नाजुक वाचकांना कदाचित खालील लेख अप्रियभावनाकारक वाटू शकेल, त्यांनी तो न वाचला तर बरे.
[तात्यांच्या प्रश्नांची उत्तरे मला ज्ञात नाहीत त्यामुळे यात ती मिळणार नाहीत हेही स्पष्ट करतो.]

-------------------------------------------------------------------
शिव्यांचा मूळ हेतू मनातील द्वेषभावाला अभिव्यक्ती देणे किंवा दुसर्‍याला अपमानित करून त्याच्या भावना दुखावणे हा असावा. पण माझ्या पाहण्याप्रमाणे शिव्यांमध्ये बरेचसे कल्पनादारिद्र्य दिसते किंवा निदान कल्पनासमृद्धीचा अभाव दिसतो.
(मराठीतील) शिव्यांचे अर्थाप्रमाणे वर्गीकरण करायचे झाल्यास
१. अरे वेश्यापुत्रा - "***च्या" या फॉर्मॅटमधील सर्व शिव्या. संख्येचा विचार करता याच बहुसंख्य आहेत. "च्या" च्या आधी येणारा शब्द, त्याचा अर्थ नेहमीच स्पष्टपणे लागत नसला तरी, बहुतेक वेश्या किंवा अतिविषयासक्त स्त्री किंवा (दुराचारी) विधवा या अर्थाने येत असावा.
२. अरे मातृसंबंधिता/भगिनीसंबंधिता - या शिव्या मराठीत फार कमी आहेत, ज्या (विशेषतः मुंबईतील) मराठी लोक वापरतात त्या बहुधा हिंदीतून आयात केलेल्या व जशाच्या तश्या (म्ह. भाषांतर न करता) वापरल्या जातात. मला माहिती असलेली या प्रकारची एक मराठी शिवी आहे ती आईच्या संदर्भात आहे. बहिणीच्या संदर्भात मराठीत शिवी बहुधा नाही.
३. अरे मध्यस्था/दलाला - येथे मध्यस्थ/दलाल म्हणण्यामागे अशी सूचना आहे की तो पुरुष आपल्या कुटुंबातील किंवा नात्यातील कोणा स्त्रीच्या देहविक्रयकर्मासाठी मध्यस्थाची भूमिका करतो आहे. उर्दूतील हरामखोर (हरामाचे खाणारा - धर्मात निषिद्ध मानल्या जाणार्‍या मार्गाने उदरनिर्वाह करणारा) या शिवीमध्येही तीच सूचना आहे, आता मराठी लोकांना ही शिवी वाटत नाही हा भाग वेगळा. या शिवीचे जे दोन पर्याय प्रचारात आहेत त्यातील एक पर्याय बहुधा स्त्रियाच अधिक वेळा वापरतात. दुसरा अधिक प्रचलित पर्याय पुरुष किंवा स्त्रिया दोघेही वापरतात.
४. अरे अक्करमाशा - ही शिवी किंवा या अर्थाच्या शिव्या आता मराठीत प्रचलित नाहीत. हिचा वापर इंग्रजीत अधिक होतो. महाभारतकाळापासून आपल्याकडे कानीन/क्षेत्रज पुत्राला औरस पुत्राइतकाच अधिकार असे त्यामुळे यात आपल्या मते शिवी मानण्याजोगे काही नसावे. उर्दूतील हरामझादा ही याच अर्थाची शिवी मराठी लोकांना (कदाचित) तिचा अर्थ न कळल्याने शिवी वाटत नाही. मुस्लिमांना ही शिवी वाटते त्यामागे धार्मिक भाग असावा.
५. अरे लैंगिकभिक्षुका - अशा अर्थाची ही एकच शिवी आहे असे वाटते. विषयेच्छा भागवण्यासाठी(सुद्धा) जो पैसा खर्च करू इच्छीत नाही, त्यासाठीही भीक मागतो, त्याला ही शिवी देत असावेत.
६. अरे भेकडा - या अर्थाच्या या शिवीवजा शब्दाला शिवी मानावे की नाही यात शंका वाटते. किंबहुना केवळ नावे ठेवणे किंवा दोष दाखवणे याला शिवी म्हणत नाहीत.
७. तुझ्या मातेशी *** ह्याचा संबंध लावला - अशा शिव्या कोल्हापूर भागात जास्त दिसायच्या. याचे लघुरूप मात्र आजकाल सर्वत्र (स्त्रियांच्याही तोंडी) प्रचलित आहे.
{हे सोडल्यास "अमुक ठिकाणी जा", इ. वाक्यरूपी अपशब्द आहेत त्यांना शिव्या मानावे किंवा नाही हे कळत नाही. सर्वच अपशब्दांना शिव्या कसे म्हणता येईल?}
वरील प्रकार सोडून मला तरी मराठीत शिव्या सापडल्या नाहीत. मालवणी किंवा कोकणी शिव्या फार भयंकर असतात असे नुसते ऐकले आहे, पण त्याची उदाहरणे मला माहीत नाहीत, याबाबतीत प्रस्तावकांसारख्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे. येथे शक्य नसल्यास त्यांनी त्यांच्या अनुदिनीवर सविस्तर लिहिले तरी आम्ही ते वाचू.

आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे वरील बहुतेक सर्व शिव्या पुरुषांनाच दिल्या जातात. कदाचित फक्त पुरुषच अशा फालतू गोष्टींनी चिडून अनावर होऊन काहीबाही प्रतिक्रिया देत असतील की ज्यायोगे शिवी देणार्‍याचे समाधान होईल, त्याचा हेतू साध्य होईल.
स्त्रियांना अगे वेश्यापुत्री एवढ्या एकाच अर्थाची शिवी दिलेली ऐकलेली आहे. कदाचित त्यांच्या वर शिव्यांचा वरील अपेक्षित परिणाम फारसा होत नसावा.

स्त्रियांची गोष्टच वेगळी आहे असे वाटते. स्त्रिया ह्या (शिव्या न वापरता) दुसर्‍यांची उणीदुणी काढून त्यांना घालून पाडून बोलण्यात बहुधा पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक निष्णात असतात, म्हणून त्यांना शिव्यांची गरज भासत नसावी किंवा त्यापेक्षा इतर अर्थपूर्ण शब्द अधिक लागत/झोंबत असावेत. किंवा त्यांची कल्पनाशक्ती इतकी तरल असेल की शिव्यांसारख्या अत्यंत मर्यादित अर्थ असलेल्या शब्दप्रयोगांनी त्यांचे समाधान होत नसावे / त्यांना ते निरर्थक वाटत असतील.

एकूण शिव्यामध्ये एकसुरीपणा अधिक असतो व काही काळाने नाविन्य न उरल्यामुळे त्यांचा कंटाळा येण्याची शक्यता वाटते. मी एका प्रसंगी एका मुलाला दुसर्‍याला शिव्या शिकवताना पाहिलेले आहे त्या अनुभवावरून हे सांगतो आहे. असेच एकदा एकच गृहस्थ अखंडित अर्धा तास शिव्या देताना ऐकले आहे, त्यातही हेच दिसले.
त्यातल्या त्यात कदाचित त्या शब्दांपेक्षा त्यामागचा त्वेषच अधिक प्रभावी ठरत असेल असे वाटते.

वरील सर्व स्वतःच्या मर्यादित अनुभवावरून लिहिले आहे. इतरांच्या अनुभवांची भर पडून आमचे या विषयातले ज्ञान वाढावे हीच इच्छा व अपेक्षा आहे.

(उपक्रमराव, शक्यतो असभ्यपणा येऊ न देता लिहिण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे, याउप्पर संस्थळधोरणाशी विसंगत वाटल्यास आपण काढून टाकालच, ते शिरोधार्य आहे.)

- दिगम्भा

क्या बात है! सुंदर प्रतिसाद...

दिगम्भाशेठ,

हा विषय अत्यंत गंभीरतेने घेऊन आपण त्यावर सविस्तर भाष्य केले आहे हे खरोखरंच कौतुकास्पद आहे. एकंदरीतच आपला प्रतिसाद आम्हाला अतिशय आवडला व त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो. आपल्या प्रतिसादावरून आपण सदर चर्चाविषयावर सखोल चिंतन केले आहे हीच बाब दिसून येते.

'शिव्या चांगल्या की वाईट?' हा वेगळा मुद्दा झाला परंतु 'शिव्या' हा बोलीभाषेचा एक महत्वाचा भाग आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे त्यावर चर्चा, विचारविनिमय, विचारांची देवाणघेवाण ही झालीच पाहिजे असे आमचे मत आहे.

आमच्या मते हा प्रतिसाद उपक्रमरावांनी येथे राहू देण्यास काहीच हरकत नसावी. परंतु काळजी नसावी. कारण त्यांनी तसे केल्यास आपला प्रतिसाद आणि त्याला हे आम्ही लिहीत असलेले उत्तर आम्ही कॉपीपेस्ट करून आमच्या चावडीवर चिकटवणार आहोत. त्यामुळे ते वाचकांपर्यंत अवश्य पोहोचेल याची खात्री असू द्यावी! यापुढे आमचा जो प्रतिसाद उपक्रमावरून उडवला जाईल असे आम्हाला वाटेल तो प्रतिसाद त्याच्या संदर्भासह यापुढे आम्ही आमच्या चावडीवर चिकटवण्याची नवी प्रथा सुरू करणार आहोत! ;)

म्हणजे आमच्या काही फॅन्सची निराशा न होता त्यांना तो वाचता येईल! ;)

ज्या ठिकाणाहून आपला प्रतिसाद उडवला गेला असेल त्या ठिकाणी फक्त

'उपक्रमाच्या ध्येयधोरणामध्ये आमचा प्रतिसाद न बसल्यामुळे उपक्रमरावांनी तो येथून उडवला आहे. आम्ही उपक्रमरावांच्या या कृतीचा मनःपूर्वक आदर करतो. इच्छुक वाचकांनी संबंधित लेख/प्रतिसाद आणि त्याला दिलेला आमचा प्रतिसाद/उपप्रतिसाद 'येथे' वाचावा!'

असा दुवा दिला की काम झाले! कशी आहे आइडिया?! ;)

अशा गंभीर विषयावर लिहिण्याची इच्छा मला बर्‍याच काळापासून होती. तशी संधी आणून दिल्याबद्दल चर्चाप्रस्तावकांचे व उपक्रमरावांचे आभार.

धन्यवाद दिगम्भाशेठ. हा गंभीर विषय आमच्याही मनात बर्‍याच दिवसांपासून घोळत होता! ;)

(पण प्रस्तावकांचा मूळ इरादा विनोदनिर्मितीचा असला व त्यांचा खालील लिखाणामुळे विरस होत असल्यास आगाऊ क्षमायाचना करतो.)

विनोदनिर्मिती? छे हो! काय भलतेच काय बोलताय दिगम्भाशेठ?
I am serious! ;))

सावधगिरीची सूचना: अतिशय संवेदनाक्षम/नाजुक वाचकांना कदाचित खालील लेख अप्रियभावनाकारक वाटू शकेल, त्यांनी तो न वाचला तर बरे.

ही सावधगिरीची आगाऊ सूचना दिलीत हे बरेच केलेत दिगम्भाशेठ. नाहीतर भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर शरीराप्रमाणेच मनालाही कुबड आलेली काही माणसे 'अश्लील अश्लील' म्हणून ओरडायला लागायची! ;)

पण माझ्या पाहण्याप्रमाणे शिव्यांमध्ये बरेचसे कल्पनादारिद्र्य दिसते किंवा निदान कल्पनासमृद्धीचा अभाव दिसतो.

काहीसा सहमत! परंतु सृजनशील, सर्जनशील शब्दप्रभूंनी शिव्यांत कल्पकता आणून शिव्यांचे भांडार समृद्ध केले पाहिजे असे आम्हाला वाटते. आणि तसे हळूहळू होईल याचीही आम्हाला खात्री आहे! कारण शेवटी कोणतीही भाषा शिकतांना आधी त्यातील शिव्या शिकाव्यात म्हणजे शिकणार्‍याची त्या भाषेच्या मुळशी ओळख होते व त्यामुळे भाषेवर प्रभूत्व मिळवण्यास मदत होते असे बुजुर्गांनी सांगितले आहे! (दादाजी बोलके के गये है! ;)

अरे वेश्यापुत्रा -
अरे मातृसंबंधिता/भगिनीसंबंधिता
अरे मध्यस्था/दलाला
अरे लैंगिकभिक्षुका
अगे वेश्यापुत्री

हा हा हा! क्या बात है दिगम्भाशेठ. शिव्यांचे सभ्य मराठीकरण (की मराठी सभ्यीकरण? ;)
अतिशय आवडले. 'लैंगिकभिक्षुका' तर खासच! ;)

मान गये भिडू...;)

मालवणी किंवा कोकणी शिव्या फार भयंकर असतात असे नुसते ऐकले आहे, पण त्याची उदाहरणे मला माहीत नाहीत, याबाबतीत प्रस्तावकांसारख्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन अपेक्षित आहे.

बस काय शेठ! अहो आपल्यासारख्या तज्ज्ञांना आम्ही काय मार्गदर्शन करणार? ;) आम्हीही अद्याप विद्यार्थीदशेतच आहोत! ;)

येथे शक्य नसल्यास त्यांनी त्यांच्या अनुदिनीवर सविस्तर लिहिले तरी आम्ही ते वाचू.

अवश्य लिहू! हल्ली शिव्यांविषयी आमच्या अनुदिनीचा संदर्भ दिला जातो. मराठी ब्लॉगचिश्वात शिव्यांच्या संदर्भाकरता आमची अनुदिनी चाळली जाते याचा आम्हाला अभिमान वाटतो! ;) आयुष्यात ओव्या कधीच जमल्या नाहीत, पण शिव्या मात्र थोड्याफार जमल्या हेही नसे थोडके!

स्त्रिया ह्या (शिव्या न वापरता) दुसर्‍यांची उणीदुणी काढून त्यांना घालून पाडून बोलण्यात बहुधा पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक निष्णात असतात, म्हणून त्यांना शिव्यांची गरज भासत नसावी किंवा त्यापेक्षा इतर अर्थपूर्ण शब्द अधिक लागत/झोंबत असावेत. किंवा त्यांची कल्पनाशक्ती इतकी तरल असेल की शिव्यांसारख्या अत्यंत मर्यादित अर्थ असलेल्या शब्दप्रयोगांनी त्यांचे समाधान होत नसावे / त्यांना ते निरर्थक वाटत असतील.

क्या बात है! वरील संपूर्ण उतार्‍याला आम्ही मनापासून दाद देतो! ;)

असो!

दिगम्भाशेठ, अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल पुनश्च एकदा आपले आभार!

आपला,
(शिवराळ) तात्या.

अप्रतिम लेख

इतक्या नाजुक विषयावर इतका साजुक लेख....मान गये उस्ताद.

प्रक्षिप्त

शिव्यांमध्ये प्रक्षिप्त भाग हा जास्त असतो. तुकारामाच्या अभंगात अशा प्रकारे घुसडलेला भाग जो मूळ कुठला आणि घुसडलेला कुठला हे समजणं कठीण! तुकारामाच्या अभंगात आलेल्या शिव्यासदृष शब्द हा तोच प्रकार असावा. पुणे व सातारा च्या दरम्यान बोरी नावाच्या गावात"बोरीचा बार" हा प्रथेचा एक प्रकार असा आहे त्यात त्या गावच्या व नदीच्या पलीकड्च्या गावच्या स्त्रीया नदीच्या काठावर येउन एकमेकींना शिव्या देतात. त्या गावांच्या प्रथेचा तो भाग आहे. ती प्रथा आता बंद केली. फक्त प्रतिकात्मक रित्या साजरी करतात.
प्रकाश घाटपांडे

वापीलिंपि!

अरे लैंगिकभिक्षुका???
असेच

वापीलिंपि!
ही शिवी एके काळी आमच्या मित्र (आणी मंडळीं )मध्ये प्रसिद्ध होती. ;)
आज आपल्या लेखामुळे आठवण झाली...

आपला
गुंडोपंत

"उपक्रमावर 'वय वर्ष १८ व अधिक' असाही एक समुह असावा याचे मी समर्थन करतो"

शिवीलिलामृत

अशा प्रतिसादातून "शिवीलिलामृत" असा ग्रंथ तयार व्हायला काहीच हरकत नसावी.
प्रकाश घाटपांडे

उत्तम कल्पना!

अशा प्रतिसादातून "शिवीलिलामृत" असा ग्रंथ तयार व्हायला काहीच हरकत नसावी.

क्या बात है घाटपान्डेशेठ!

खरंच उत्तम कल्पना आहे..;)

संत तात्याबांच्या मनात सभ्य लोकांविषयी आदर आहे. पण सभ्यतेबद्दलची नसती अन् फुकटची 'ट्यॅव ट्यॅव' करणार्‍यांना ते वेळीच दोन शिव्या हासडणे पसंत करतात! ;)

फार मरगळ आली आहे हो उपक्रमाला... कुठे गेले आहेत सगळे?

"शिवीलिलामृत"
वा घाटपांडे साहेब एकदम झकास!

तात्याबा, नेहमीप्रमाणेच

पण सभ्यतेबद्दलची नसती अन् फुकटची 'ट्यॅव ट्यॅव' करणार्‍यांना

चपखल आहे! :)

पण तात्याबा आता हे "शिवीलिलामृत" पुरे करू या.
काही तरी येउ द्या बुवा...
फार मरगळ आली आहे हो उपक्रमाला... कुठे गेले आहेत सगळे?
की शिव्यांना घाबरून पळाले? ;)

मलाही काही सुचत नाहिये. :(

पण तात्या तुमच्या कडे असतील ना 'माहितीपुर्ण' विम्याचे किस्से. (ह. घ्या.) तुम्ही कसे कंव्हिंस करता, काय काय प्लान्स देता. का देता. भेटलेले नग!
तुमचा डिओ काय म्हणतो. त्याने तुम्हाला (आणी तुम्ही त्याला) ट्रेनिंग कसे दिले, नि त्यांचा मॅनिजर, तुमची ब्रँच... एल आय सी आणी इतर कंपन्यामधला मुख्य फरक. (हा खरं फार मोठा मुद्दा आहे.)
एल आय सी चे काम करता म्हणजे किती लोकांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत हो. (हे मी सिरियसली म्हणतोय कारण जेंव्हा एखाद्या घरात मुख्य माणसाचा मृत्यु होतो तेंव्हाच याचे महत्व कळते.)

असं खुप काही आहे तुमच्या कडे....
येउ द्या ना...
आपला
(इथेच पडिक असलेला)
गुंडोपंत

दुवे द्यायला विसरू नका.

गूंड्याभाऊ,
मनातला बोललात राव,च्यायला माझ्या सूट्ट्या संपत आल्या.पण मरगळ काही जाइना.आता तात्यांना इतका आग्रह धरला 'माहितीपुर्ण' विम्याचे किस्से. सांगायचा तर "दूवे" मात्र आठवणीने द्या म्हणावं. माहिती अन दूवे वाचून वाचून,तब्येत खराब झाली राव माझी ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुंड्याभाऊ आणि बिरुटेसाहेब,

गुंड्याभाऊ,

असं खुप काही आहे तुमच्या कडे....
येउ द्या ना...

अरे तशी मी भरपूर दुनियादारी केलेली आहे त्यामुळे माझ्याकडे लिहिण्यासारखं बरंच काही आहे. फक्त वेळेचे वांधे आहेत बाबा! जसा वेळ मिळेल तसे लेखन करीन. रौशनीचा दुसरा भाग आता ९० % लिहून झालाय. तो पुरा करून मायबोलीवर टाकतो. तिथे जाऊन अवश्य वाच.

बिरुटेसाहेब,

आता तात्यांना इतका आग्रह धरला 'माहितीपुर्ण' विम्याचे किस्से. सांगायचा तर "दूवे" मात्र आठवणीने द्या म्हणावं

यस सर!

माहिती अन दूवे वाचून वाचून,तब्येत खराब झाली राव माझी.

हा हा हा! अहो आता माहिती आणि विचाराच्या देवाणघेवाणीचंच हे संकेतस्थळ आहे म्हटल्यानंतर असं चालायचंच! कामाच्या रामरगाड्यात मला सध्या वेळ नाहीये म्हणून सध्या मिसळपाव डॉट कॉमचं काम थंडावलं आहे. एकदा का आपलं मिसळपाव डॉट कॉम सुरू झालं की तिथे यथेच्छ गोंधळ घालू! तुम्हाला मिसळपाव डॉट कॉमचा सभासदीय कार्यमंत्री करतो! ;)

तात्या.

हा हा हा!

माहिती अन दूवे वाचून वाचून,तब्येत खराब झाली राव माझी.

हा हा हा!
मान्य हो... अगदी मान्य बिरुटे साहेब!
पण आपण काय करणार? मला पण काही सुचत नाहिये. (दुसर्‍यांनी काय लिहावं हे बरं सुचतं रे तुला?)
फार तर 'मिनिट्स' ठेऊया माहितीचे नि दुव्यांचे... काय म्हणता? ;)

आपला
(सचिव)
गुंडोपंत
~ उपक्रम वयाने वाढावे ह्याचे मी समर्थन करतो!~

पहिली शिवी

पहिली शिवी जेव्हा ऍडम इव्ह् वर् संतापला तेंव्हा निघाली असावी असा माझा प्राथमिक अंदाज आहे. पुरूष हे स्त्रियांपेक्षा लवकर संतापतात त्यावरून माझं मत.

वरातीमागून...

उपक्रमात जरा उशीराच आलो आहे, आणि तोपर्यंत ह्या वाह्यात विषयावर लोकांनी सगळंच बोलून घेतलेलं पाहून मी (इथेच वाचलेल्या) ब-याच शिव्या मोजल्या....
पण विषय जरा जिव्हाळ्याचा असल्याने वाहत्या गटारात आपलाही कचरा टाकयचा मोह आवरत नाही...
साजुक तुपात बनवलेलं गोडं जेवण असलं, तरी ताटात चमचाभर खरडा (ओल्या मिरचीचा ठेचा) वाढला की जशी जेवायला मजा येते, तसंच २ कडक शिव्या हासडल्या की बोलल्यासारख वाटत..
तर त्या दृष्टीने शिव्यांना फार महत्त्व आहे.
विसोबांच्या प्रश्नांवरची माझी मतं -

१. व ४. तोंड बोलण्यासाठी शिवशिवत असताना जो शब्द बाहेर पडतो तो शिवी.
२. हा शब्द मराठीच असावा, कारण 'आजकल बच्चा लोग बहोत शिवी देते है' असं मी एका भैयाला म्हटलं पण त्याला काहीच कळलं नाही.
३. बहुतेक संस्कृत, कारण तीच सगळ्यात जुनी भाषा आहे. इ.स. पू. ३००० वर्षे.
५. मा. ना. :(
६. बोली भाषाच नव्हे तर अगदी साहित्यिक भाषेला शिव्यांशिवाय मजा नाही.

:)

शिव्यांचे मराठीकरण किंवा संस्कृतकरण इच्छुकांना या लेखात वाचता येईल.. :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर