अण्णांचे आंदोलन: काही प्रश्न
गेल्या काही दिवसांपासून टीम अण्णा आणि सरकार व काँग्रेस ह्यांच्यात रंगलेला रिऍलिट शो आता फारच रोचक स्थितीत येऊन पोचला आहे. काही दिवसांपूर्वी ७९ वर्षांच्या पंतप्रधानांना 'तुम्ही कोणत्या तोंडाने १५ ऑगस्टला झेंडा फडकविणार आहात' असा थेट सवाल अण्णा हजारेंनी विचारला. ( बाळ ठाकरेंनी अण्णांना 'वाकड्या तोंडाचा गांधी' असे हिणवले होते, हे येथे उगाच आठवले. ) हे ऐकल्यावर काँग्रेसवालेही भडकले. आणि मनीष तिवारींनी अण्णांसाठी 'तुम' आणि 'तुम्हारा' ही सर्वनामे वापरली. ( 'रंज की जब गुफ़्तगू होने लगी | आपसे तुमसे तू होने लगी |' )
ह्यापूर्वीही अण्णांनी सिब्बल आणि इतर सहभागी मंत्र्यांविरुद्ध पत्रके आणि पत्रे वाटली होती असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तर हे सरकार उद्दाम झाले आहे. आणिबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, वगैरे वगैरे टिप्पण्या टीम अण्णांकडून येत आहेतच. तर अण्णाच्या आंदोलना फॅसिस्ट शक्तींचे समर्थन आहे आणि अण्णांची मागणीही फॅसिस्ट आहे असे काहींचे म्हणणे आहे.
अण्णांच्या चमूने जन लोकपाल विधेयक तयार केले आहे. सरकारच्या लोकपाल विधेयक भ्रष्टाचाराला आळा घालण्याऐवजी भ्रष्टाचाराला मदत करणारे आहे असे अण्णांचे म्हणणे आहे. आणि आमचे जन लोकपाल विधेयकच ह्या देशासाठी योग्य आहे असे अण्णा समर्थकांचे म्हणणे आहे.
हे सगळे नाटक चालू असताना काही प्रश्न पडतात:
१. अण्णा ह्यांचे लोकपाल विधेयक संसदेत पास न होता लागू करता येण्यासारखे आहे का?
२. 'मी म्हणतो तसे मी म्हणतो तेच विधेयक पास व्हायला' हवे ही मागणी योग्य आहे का?
३. सर्व पक्षांशी संवाद साधून पुढे सरकायला हवे का? सरकता येणार नाही का?
४. ह्या सगळ्या आंदोलनाचे टार्गेट काँग्रेस सरकार आहे असे दिसते आहे. भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष धुतल्या तांदळाचा आहे का?
चर्चा व्हावी.
Comments
अण्णांचे आंदोलन
वरील चार प्रश्नांमध्ये माझाहि एक टाकतो.
इराणमध्ये केवळ धर्मज्ञांनी संमत केलेला कोणी अयातोल्लाह लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अध्यक्षाच्या आणि सर्व न्यायसंस्थेच्या आणि सैन्याच्या डोक्यावर बसलेला असतो. पण ते इराण आहे तेथे काहीहि होऊ शकते. आपणहि जर काही खास शिंगे असलेल्या चार 'टाळक्यांनी' निवडलेल्या कोणा 'दूधसे धुला हुआ' प्रकारच्याला लोकशाही मार्गाने सत्तेवर असलेल्यांच्या डोक्यावर बसवणार असलो तर मग आपली लोकशाही कोठे गेली असे विचारावेसे वाटेल. का ह्यापुढे आपण इराणला आदर्श मानून चालणार आहोत?
प्रश्न ४ बद्दल बोलायचे तर उत्तर व्यंकटेशस्तोत्रात आहे - उडदामाजी काळेगोरे काय निवडावे निवडणारें, कुचलिया वृक्षाची फळे मधुर कोठोनी असतील? जेथे साक्षात् पक्षाध्यक्षच नोटा खणात कोंबतो, त्या पक्षाच्या साधनशुचितेवर काय बोलणार? एकलज्जां परित्यज्य सर्वत्र विजयी भवेत्!
जंतरमंतर आणि तेहेरीर चौक?
अण्णा हजारे आणि आयतोल्लाह खोमैनीतले साम्य फारच रोचक आहे.
काही जणांना जंतरमंतर आणि तेहेरीर चौकात साम्य दिसले. आणि पुढे तेहरीर चौकातल्या आंदोलनासारखे हे आंदोलन पुढे जावे अशी मनोमन इच्छाही त्यांनी व्यक्त केली. आता ह्याला काय म्हणायचे?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हम्म!
अण्णांचे विधेयक संसदेत पास न होता लागू होणार असेल तर हा प्रकार अतिशय धोकादायक वाटतो. असे होऊ नये. ज्या गोष्टी संसदेत चर्चेला ठेवायच्या आहेत त्या तेथेच जाव्यात. त्यासाठी पंतप्रधानांना टार्गेट करणे अनावश्यक आहे.
हेहेहे! असा आडमुठेपणा मीही घरात कधीतरी करते. तिथे माझ्यावाचून अडलेले असते ना पण घराबाहेर तसे करून चालत नाही असा अनुभव आहे.
सर्व पक्षांशी संवाद साधून पुढे सरकता येणे म्हणजे हिमालयाला एकट्याने धक्का देऊन सरकवायचा प्रयत्न करणे आहे. त्यापेक्षा सत्ताधारी पक्षाशी संवाद साधून पुढे सरकणे योग्य वाटते. सरकता येईल असेही वाटते.
टार्गेट सत्ताधारी पक्ष आहे असे वाटते. राजकारणात धुतल्या तांदळासारखे कोणी शिल्लक आहे का याची शंका वाटते. बाकी, गांधीवादी नेत्याच्या विरोधात गांधीवादी पक्ष आणि सहमतीत गांधीविरोधी पक्ष हे समीकरण मजेशीर आहे. ;-)
असो. काँग्रेस सरकारही हा प्रश्न यापेक्षा बर्या सामंजस्याने सोडवू शकले असते असे वाटते. जी काही रस्सीखेच सुरू आहे ती सर्वांनाच अशोभनीय आहे.
आणखी एक प्रश्नः
रामदेवबाबांसारखे यावेळेस अण्णांचे आंदोलन चिरडले तर काय होईल?
एक अवांतर प्रश्नः
अण्णांना झी टिव्हीच्या रिऍलिटी शो "सारेगामप"मध्ये पाहिले का?
खवळलेल्या पाण्यातली मासेमारी
नक्कीच. संघर्षाच्या भूमिकेतून फार चांगले होण्याची शक्यता फार कमी आहे. आणि भाजपा खवळलेल्या (की गढूळलेल्या?) पाण्यात जी मासेमारी करते आहे (फिशिंग इन ट्रबल्ड वोटर्ज़). त्यांना तर बहुधा आपल्या सर्व पापांचा सोयीस्करपणे संपूर्ण विसर पडलेला आहे.
बायदवे, ह्या बिलामुळे ६५ टक्के प्रश्न सुटतील आणि न सुटल्यास मी सिब्बल ह्यांच्याकडे पाणी भरीन असे अण्णांनी म्हटले आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
चर्चा
धम्मकलाडू यांच्याकडून या चर्चाप्रस्तावाची वाटच बघत होतो. तसा तो उशीराच आला. असो. देर आये, दुरुस्त आये...
काँग्रेस आणि प्रमुख विरोधीपक्ष हे दोन्हीही इतके मुजोर, उद्दाम आणि असंवेदनशील आहेत की 'भ्रष्टाचारा भ्रष्टच उत्तर' या पातळीवर उतरुन वैयक्तिक चिखलफेक करताना त्यांना त्यात काही चुकीचे वाटत नाही. आण्णांचे म्हणणे बरोबर की चूक हा एक मुद्दा, पण समाजाच्या 'हे असंच चालायचं... कोण काय करणार?' या निराश भूमिकेत हळूहळू का होईना बदल होतो आहे, हे मला आशादायक चित्र वाटते. एका फॅसिस्ट वृत्तीला उत्तर म्हणून दुसरी फॅसिस्ट वृत्ती हे बरोबर की चूक कुणास ठाऊक, पण काहीही करा, कुणी काही विचारणार नाही या समजाला जरी थोडा आळा बसला तरी बरेच आहे. 'ठंडा करके खाओ' हे आवडते तत्वज्ञान असलेल्या या देशात क्रांती झालीच तर ती अशी टप्प्याटप्यानेच होणार.
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है
....आशादायक...
<<आण्णांचे म्हणणे बरोबर की चूक हा एक मुद्दा, पण समाजाच्या 'हे असंच चालायचं... कोण काय करणार?' या निराश भूमिकेत हळूहळू का होईना बदल होतो आहे, हे मला आशादायक चित्र वाटते.>>
रेड (मॉर्गन फ़्रीमन ) The Shawshank Redemption मध्ये ऍडी (टीम रॉबिन्स))ला काय म्हणतो? Hope is dangerous thing!
.......
प्र्.का.टा.आ.
ठीक आहे
मध्यमवर्गीय समाजाच्या निराश भूमिकेत बदल होताना दिसतो आहे खरे. फेसबुक आणि इतरत्र एखादी मोठी क्रांती होऊ घातली आहे असे आशादायक चित्रही पाहणाऱ्याला दिसू शकण्यासारखे आहे. तर पाहणाऱ्याला ह्यात ऍनर्कीही दिसू शकण्यासारखी आहे. शेवटी विधेयक संसदेला संमत करायचे आहे की नाही? जन लोकपाल विधेयक पारित करून घेण्यासाठी अण्णांपाशी कुठली जादूची कांडी आहे? (थंड करून खाण्यात काँग्रेस पटाईत आहेच.)
ह्या आंदोलनाला प्रामुख्याने समर्थन देऊ करणाऱ्या मध्यमवर्गाला सांसदीय लोकशाहीची व्यवस्था मंजूर नाही का? गुजरातेत संदीप भट, राहुल शर्मा ह्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या आणि अण्णांचे समर्थन करणाऱ्या मोदींबाबत टीम अण्णाची काय भूमिका आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दोन पैसे
अण्णा हझारे यांच्याविषयी, त्यांच्या कामाविषयी आदर वाटतो. पण त्यांना अपेक्षित असलेली आदर्श समाज/राष्ट्राची कल्पना भंपक आहे, असे माझे मत आहे. याचा अर्थ त्यांनी त्या अपेक्षांचा पाठपुरावा करू नये असे नाही. असे आदर्शवादी लोक असावेत, तसेच त्यांची हेकेखोर आंदोलनेही. सरकार या संस्थेला आव्हान देणार्या गोष्टी असायलाच हव्यात.त्यांच्या आंदोनाला कितपत यश मिळते हे पाहणे रोचक ठरावे.*
*भ्रष्टाचार कमी व्हावा या आंदोलनाच्या व्यापक उद्देश्याशी सहमत असल्याने आधीचा किंचित कडवट प्रतिसाद प्रस्तुत सदस्यानेच बदललेला आहे.
क्रमांक २
२. 'मी म्हणतो तसे मी म्हणतो तेच विधेयक पास व्हायला' हवे ही मागणी योग्य आहे का?"
~ विचारार्थ ठेवलेल्या वरील ४ मुद्द्यांपैकी वरील क्रमांक २ हेच महत्वाचे आहे असे मला वाटते. आणि ही मागणी योग्य तर नाहीच पण सरकार कोणत्याही पक्षाचे असो, एखाद्या आंदोलनातील मागण्या वा मुद्दे ते जसेच्या तसे कदापिही 'विधेयक' रूपात आणणार नाही. शेवटी एक अब्ज+ लोकसंख्येचे हे शकट विधीवत निवडून गेलेले प्रतिनिधीच चालविणार आहेत हे लोकशाहीवर विश्वास ठेवणार्यानी लक्षात ठेवणे गरजेचे आहेच [निवडून गेलेले कोण आहेत, कसे आहेत, साव किती चोर किती....आदी मुद्दे इथे दुय्यम आहेत, शेवटी ते पार्लमेन्टमध्ये आहेत म्हणजे निर्णय तेच घेणार]. 'मी म्हणेन ती पूर्व' असे जर प्रत्येक आंदोलनकारी नेता म्हणू लागला आणि तशी एखाद्याची मागणी पूर्ण होत असलेली दिसू लागताच मग छोट्या मोठ्या राज्याराज्यातून 'अण्णा हजारे हायब्रीड पीक' येण्यास सुरुवात होईल आणि त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा या पिकाला गोंजारण्याचा एक कलमी कार्यक्रम राबविणे हा उद्योग बनेल....शिवाय विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसणारे हिरे तेच पीक राज्यात जोमाने कसे वाढेल हेच बघत बसणार.
'तुटेपर्यंत ताणू नये' असे जे वचन आहे तिचा विसर अण्णासारख्या ज्येष्ठांनी पडू देऊ नये इतपतच एक नागरिक या नात्याने म्हणेन.
आंदोलन
घटनात्मक दृष्ट्या संसदेला बाजूस सारून कायदा करताच येणार नाही. वटहुकूम काढला तरी सहा महिन्यात तो संसदेकडून पास करून घ्यावाच लागेल.
अण्णा तर आता लोकपाल विधेयक मागे घ्या म्हणत आहेत. म्हणजे १०% काही बदलण्याची शक्यता असेल ती ही संपली. त्यांचे ठोकपाल विधेयक संमत करण्यासाठी शेवटी संसदेलाच राजी करून घ्यायचं आहे.
बाकी दिल्लीकरांना अण्णांची ओळख आजची आहे. महाराष्ट्राला जुनी ओळख आहे. :-)
>>ह्या आंदोलनाला प्रामुख्याने समर्थन देऊ करणाऱ्या मध्यमवर्गाला सांसदीय लोकशाहीची व्यवस्था मंजूर नाही का?
ती तर कधीच नव्हती. भारतातला मध्यमवर्ग हा काही सामाजिक अभिसरणातून निर्माण झालेला नाही. तो परंपरागत प्रिव्हिलेज्ड क्लास आहे. त्याला लोकशाही कधीच मंजूर नसणार. त्याला हुकुमशाहीच हवी असणार. तीही त्यांचे हितसंबंध सांभाळेल अशी.
नितिन थत्ते
ह्याचा अर्थ
ह्याचा अर्थ ह्या आंदोलनाला मुस्लिमांचा, ओबीसींचा आणि अनुसूचित जातींचा फारसा पाठिंबा नाही असे म्हणता येईल का? असे असल्यास 'व्यापक जनसमर्थन' एकदा तपासून घ्यायला हवे. ज्या आंदोलनाला संघ आणि मोदी समर्थन देतात त्या आंदोलनाकडे मुस्लिम कसे बघतात हे बघायला हवे. घटनेत मूलभूत बदलांना आंबेडकरांच्या अनुयायांचे समर्थन मिळणे तसे कठीण आहे. आता मूलभूत बदल व्हायला हवेत वा नकोत हा वेगळा विषय. पण हे बिल पास करायचे म्हणजे.... असो.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मनमोहनांचे ढ्ढिम सरकार
( बाळ ठाकरेंनी अण्णांना 'वाकड्या तोंडाचा गांधी' असे हिणवले होते, हे येथे उगाच आठवले. ) हे वाक्य कां टाकले? श्री. ठाकरे हे त्यांनाच शिव्या देतात, हिणवतात - जे पलटवार करत नाहीत किंवा इतर कारणांमुळे करू शकत नाहीत. जेंव्हा श्री. अजित पवार यांनी 'श्री. ठाकरे यांनी महाराश्ट्रासाठी भरीव असे काय केले?' असे जाहिरपणे विचारले तेंव्हा ह्याच शिवसेनेने ढेंगात शेपूट घातले होते, प्रत्युत्तर केले नव्हते.
आत्ता मुळ विशयाविशयी-
अण्णांच्या आंदोलनाविशयी संशय घेण्याचे काम करणे मुर्खपणाचे वाटते. शंभर दिवसात महागाई कमी करू! असे आश्वासन देत ह्या कॉंग्रेसने दोन वेळा सत्तेत येवून काय काम केले आहे?
'तुम्ही काय काम केले आहे?, करत आहात?' असे प्रश्न विधिवत संसदेत विचारून देखील विरोधी पक्श थकला आहे. पण त्या विधिवत पद्धतीने काय फरक पडला आहे?
उलट -
'आम्हाला पाच वर्शासाठी सत्ता मिळाली आहे तेंव्हा आम्ही ती पाच वर्शासाठी उपभोगू तेही आम्हाला हवी तशी! तुम्हाला जेंव्हा मिळेल तेंव्हा तुम्ही उपभोगा!' हा संदेश सद्याचे सत्ताधारी पक्श विरोधी पक्शांनाच अप्रत्यक्शपणे देत आहे. हे लोकशाही साठी धोकादायक नाही आहे कां?
सत्तेच्या (कमीत-कमी) पाच वर्शाच्या काळात जे झोल-झाल होत राहतील त्याला चाप बसायला नको कां?
ह्या घटनेकडे मी अश्या नजरेने पहात आहे.-
'साम, दाम, भेद, दंड इत्यादी पद्धतीने आपल्याला हवे ते मिळवणे!' ह्या विचारांना अनुसरून रहाणारा एक गट जो आज 'यशस्वी झालेला आहे'
विरुद्ध
'प्रामाणिक कश्ट, त्यासाठी उचलावे लागणारा त्रास, अहवेलना व ते सहन करीत नीतीमत्ता पाळणे' इत्यादी गोश्टींना अनुसरून जो गट आहे जो आज अपयशी आहे त्यांचा एक आवाज.
भविश्यात जे जसे चालले आहे ते तसेच चालू राहू नये यासाठी मधला मार्ग सरकारने स्विकारायला हवा. संसद हे जनतेपासूनच उत्पन्न झालेली यंत्रणा आहे. त्यामुळे ती जनतेपेक्शा मोठी, उच्च असूच शकत नाही. आणी म्हणून,
१) 'कायद्याचा मसुदा कसा असावा?' ह्या कायद्यासंबंधित मुद्द्यांवर (इथुन पुढे ) लोकशाही पद्धतीने संसदेच्या बाहेर चर्चा-संवाद घडवून त्यावर एकमत होवून ते 'आउटपूट' संसद नावाच्या संस्थेने 'इनपूट' म्हणून कसे स्विकारावे? हे आधी ठरवले जायला हवे. ते नियम प्रत्यक्शात आणून अण्णा व त्यांच्या गटाने तयार केलेला मसुदा राश्ट्रीय स्तरावर चर्चेसाठी घेतला जायला हवा.
२) अगोदर देशपातळीवर एखाद्या मुद्द्यावर चर्चा कशी व्हावी? लोकांनी आपआपली मते, विचार कसे मांडावेत?, कुठे मांडावेत? विचारांचे खंडन कसे केले जावे? एकमतावर पोहचलेल्या मुद्द्यांचे नोंदीकरण कसे व्हावे? हे ठरवले जायला हवे.
वैयक्तिक स्तरावर आपली बौद्धीक रग जिरवण्यासाठी, आपण देशाचा विचार करतो हे इतरांना देखिल ठळकपणे दाखवून देण्यासाठी, ह्या अशा चर्चा होणे गरजेचे आहे. ह्या भावनिक गरजांचा निचरा झाला नाही तर वेगवेगळ्या विचारांच्या थेअरीज निर्माण होवून त्या कृतीशील झाल्या तर देशात, समाजात बंडाळी माजतील.
अभ्यास करून विचार मांडणे, अयोग्य मतांचे खंडन करणे, आपला मुद्धा पटवून देणे, त्यास पूरक अशी वेगवेगळी उदाहरणे, दाखले, प्रात्यक्शिके सादर करणे, हा सामाजिक स्तरावरील लोकव्यवहार वाटतो. व हा लोकव्यवहार निर्माण करणारी संस्कृती रुजवणे, वाढवणे हे शुद्रयुगात सुशिक्शीत व सुसंस्कृत समाजाने सुखाने नांदण्याचा मार्ग वाटतो.
(ह्या तील काही प्रतिसाद माझ्याकडूनच लिहीलेल्या इतर चर्चेतील प्रतिसादातून घेतला गेला आहे.)
बदल
अण्णांच्या बाबतीत पडलेले काही प्रश्न काही अंशी कधी काळी गांधींच्या बाबतीत देखील पडले असावे, त्या वेळच्या किंवा आजच्या सरकारला तक्रार मसुद्या-बाबत आहे कि अण्णांच्या(गांधींच्या) वाढणाऱ्या ताकदी-बाबत आहे ह्यावर विचार केल्यास लक्षात येते की त्रास महत्वेकरून अण्णांच्या वाढणाऱ्या ताकदीचा आहे.
त्यांचा अजेंडा योग्य की अयोग्य हे मी आत्ताच सांगणे कठीण आहे, पण वरकरणी तरी त्यांचा स्वार्थ (नियंत्रणात्मक सत्ता वगळता) काही दिसत नाही, आणि त्यांच्या मागण्या मला तरी रास्त वाटतात. सरकारने कसे वागावे ह्यापेक्षा कसे वागू नये ह्याचे उदाहरण सरकार सगळ्यांसमोर ठेवत आहे .
एकूण- जर अण्णा बदल घडवू शकत असतील तर तो त्यांनी नक्कीच घडवावा हे माझे मत आहे,
Any people anywhere, being inclined and having the power, have the right to rise up, and shake off the existing government, and form a new one that suits them better. This is a most valuable - a most sacred right - a right, which we hope and believe, is to liberate the world. - एब्राहम लिंकन.
भाउ तो सिर्फ अपना फायदा देखता है - सत्या.भाउ तो सिर्फ अपना फायदा देखता है - सत्या.भाउ तो सिर्फ अपना फायदा देखता है - सत्या.भाउ तो सिर्फ अपना फायदा देखता है - सत्या.भाउ तो सिर्फ अपना फायदा देखता है - सत्या.भाउ तो सिर्फ अपना फायदा देखता है - सत्या.भाउ तो सिर्फ अपना फायदा देखता है - सत्या.भाउ तो सिर्फ अपना फायदा देखता है - सत्या.भाउ तो सिर्फ अपना फायदा देखता है - सत्या.भाउ तो सिर्फ अपना फायदा देखता है - सत्या.
बदल घडताहेत
गांधींनी स्वतःची मागणी मान्य करवून घेण्यासाठी उपोषणे केली असे वाटत नाही. माझ्या माहितीप्रमाणे गांधींनी कधी आमरण उपोषण केले नाही. त्यांची उपोषणे ठरावीक मुदतीची असत. उदा. हिंसाचार थांबावा म्हणून (चौरीचौराची हिंसा आणि कलकत्त्यात फाळणीनंतरच्या दंगली) त्यांना उपोषणे केली. पारतंत्र्यात असताना 'तू कोणत्या तोंडाने यूनियन ज्याक फडकवतो आहेस,' असेही त्यांनी कधी जुलमी ब्रिटीश राज्याच्या प्रमुखाला म्हटल्याचे आठवत नाही. चूभूद्याघ्या.
बदल घडतीलही. ह्या दबावामुळेच चार मंत्री काही नेते गजाआड गेले आहेत हे विसरून चालणार नाही. पण वर अशोकरावांनी म्हटल्याप्रमाणे 'तुटेपर्यंत ताणू नये'!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
तरिही
बॅरिस्टर होऊन रेल्वेच्या प्रवासात मानहानी होईपर्यंत सामाजिक विषमतेची जाणीव नसणे, आणि त्यानंतर त्यांच्या उत्तुंग आणि अफाट कर्तुत्वाचे श्रेय त्यांच्या सामाजिक जाणीवेला द्यायचे का त्यांच्या वयक्तिक जाणीवेला (अपमानाची बोचणी) द्यायचे हा मोठा प्रश्न आहे.
माफ करा, पण कदाचित काही गोष्टी तुटल्यानंतरच ठीक होतात असा अनुभव आहे, सामोपचाराने बोलल्याने इंग्रज देश सोडून गेले नसते, आणि हे तुटणे आहेच कुठे, थोडासा पीळ बसला आहे, लाख-करोडो रुपयांचे अपहार झाल्यावर एवढासा पीळ फार नाही हो, बसू द्यात की, अण्णांच्या निदान काही मागण्या मान्य केल्याने नक्की काय नुकसान होणार आहे हे "खरेच" कळलेले नाही. घडणारा बदल दिखावा आहे की राजकारण आहे हे कळणे थोडे अवघड आहे, तरी देखील ताण बसलाच पाहिजे असे माझे मत आहे.
विधेयक
"काही गोष्टी तुटल्यानंतरच ठीक होतात असा अनुभव आहे, सामोपचाराने बोलल्याने इंग्रज देश सोडून गेले नसते"
~ नक्कीच गेले नसते, पण निदान तिथे इंग्रज हे 'परके' आहेत त्यामुळे तुटले तरी चालेल पण त्याना हाकललेच पाहिजे अशी भावना चेतावली गेली. "करेंगे या मरेंगे" हे स्वातंत्र्यपूर्व काळात ठीक होते. अण्णा जसे परके नाहीत तसेच दिल्लीत संसद भवनात बसलले प्रतिनिधीही परके नाहीतच, म्हणून इथे तोडण्याची भाषा कितपत स्वीकारणे योग्य आहे असा प्रश्न पडतो. शिवाय लोकशाही प्रणालीमध्ये संसदेने मंजूर केल्याशिवाय कोणत्याही बिलाचे कायद्यात रूपांतर होऊच शकत नाही हे केजरीवाल, किरण बेदी, शांती भूषण प्रभृतीना माहीत असणारच आणि आपला इतिहास पाहता कुठल्याच काळातील संसदेने "आले आहे बिल पटलावर, मग करा जसेच्या तसे पास" ही भूमिका कधीच घेतल्याचा दाखला नाही.
१९४८ चे हिंदू कोड बिल तयार करताना झालेला गदारोळ तज्ज्ञांनी आठवून पहावा. त्या एका बिलावर [आताच्या भाषेत 'विधेयक'] संसदेत तब्बल ५ वर्षे प्रदीर्घ चर्चा होऊन ती विधेयके ४ भागात संमत झाली. एक विधेयक इतक्या प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिल्याचे कुठल्याही देशाच्या संसदीय इतिहासात आढळणार नाही; आणि तेही पं.नेहरू यांच्यासह सर्व ज्येष्ठ, खर्या अर्थाने जनतेच्या दृष्टीने आदरणीय असे स्वातंत्र्यलढ्यातील नेते संसदेत कार्यरत असताना. हा इतिहास पाहता अण्णा हजारे आणि आंदोलनकर्ते यांच्या व्याख्येनुसार (च) ते विधेयक कानामात्राच्या बदलाशिवाय मंजूर होईल असे स्वप्नातही वाटणार नाही.
एवढ्यासाठीच ते तुटेपर्यंत ताणू नये याचे प्रयोजन.
अ/सहमत
सहमत, ह्या प्रभूतीना हे नक्कीच माहित असणार हे हि तितकेच खरे, पण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नसेल तर तसे करायला काहीच हरकत नसावी, नागरी समाज व्यवस्थेने सुचविलेल्या मसुद्यातील किती आणि कोणत्या अटी वगळण्यात आल्या हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणूनच हे आंदोलन, आज आहे तो मसुदा स्वीकारला तर त्यात परत बदल होण्यासाठी आंदोलनच करावे लागेल, तेंव्हा आज सुचविले गेलेले बदल काही प्रमाणात तरी मान्य झाले पाहिजेत निदान त्यावर द्विपक्षीय चर्चा व्हायला हवी असे मत आहे. ह्या प्रभूतिनी आपल्या पूर्वायुष्यात स्वार्थ सोडून खरेच लोकोपयोगी कामे केली आहेत त्यामुळे हे लोक काही वयक्तिक स्वार्थासाठी हे सर्व करत असतील असे वाटत नाही.
१. ह्याचा ताणण्याशी काय संबंध? संसदेत ह्यावर काहीच चर्चा होत नाहीये, ताण बाहेरूनच बसतोय.
२. हिंदू कोड बिल हे धार्मिक गोष्टींशी निगडीत होते त्यामुळे त्याचाशी निगडीत भावना,राजकारण ह्यामुळे ते बिल पास होणे कठीण होते, पण इथे जनतेच्या भावना असताना देखील केवळ स्वार्थी राजकारणासाठी मसुद्यात बदल केला जातो आहे असे चित्र दिसते आहे. हिंदू कोड बिल मसुदा जशास तसा त्याकाळी मान्य झाला असता तर कदाचित धार्मिक+/सामाजिक तणाव निर्माण झाला असता.
सगळे जसेच्या तसे मान्य करा हि अट हट्टीपणाची असू शकते पण सरकारचा पवित्रा आणि वर्तन नुसते हट्टीपणाचे नसून मूर्ख आणि स्वार्थी वाटते आहे.
आमरण उपोषण
गांधींची काही उपोषणे मरेपर्यंतची होती असे मला वाटते. विशेषतः पुणे करारापूर्वीचे उपोषण. अजून काही केली असतील तर त्याबद्दल वाचायला आवडेल.
'तू कोणत्या तोंडाने यूनियन ज्याक फडकवतो आहेस,' असेही त्यांनी कधी जुलमी ब्रिटीश राज्याच्या प्रमुखाला म्हटल्याचे आठवत नाही.
अगदी असे नाही तरी आता तुम्ही निघून जा (चले जाव) असे म्हटले आहेच. त्याविरुद्धचे शस्त्र देखिल सत्याग्रह (जाणून बुजून अटक होईपर्यंत कायदेभंग, जामीन वा केस लढवायची नाही, अधिकतम शिक्षेची मागणी करायची) हेच होते.
प्रमोद
असभ्य भाषा
मुद्दा गांधींनी विरोधकांविरुद्ध असभ्य भाषा वापरली का हा आहे. खाली लिहिल्याप्रमाणे (क्वालिफाय केल्याप्रमाणे) ब्रिटिशांविरुद्ध गांधींनी आमरण उपोषण केल्याचे मला माहीत नाही. माहीत असल्यास सांगावे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हीन् दर्जाच्या टीकेतून् मिळणारा आनंद ?
अण्णा ह्यांचे लोकपाल विधेयक संसदेत पास न होता लागू करता येण्यासारखे आहे का?
अण्णा हजारे किंवा आंदोलनकर्ते यांची तशी मागणी नाही. त्यांची तशी मागणी आहे असे तुम्हाला वाटते काय् ? आणि तसे वाटण्यासाठी काही आधार् आहे काय ?
२. 'मी म्हणतो तसे मी म्हणतो तेच विधेयक पास व्हायला' हवे ही मागणी योग्य आहे का?
अमुक् एक् विधेयक संसदेत यावे अशी मागणी आहे. ते पास् व्हायलाच् हवे अशी मागणी नाही.
३. सर्व पक्षांशी संवाद साधून पुढे सरकायला हवे का? सरकता येणार नाही का?
अण्णा हजारे आणि सहकारी या बिलामध्ये काय् आहे हे सांगण्याकरिता सगळ्याच् पक्षप्रमुखांना भेटले होते.
४. ह्या सगळ्या आंदोलनाचे टार्गेट काँग्रेस सरकार आहे असे दिसते आहे. भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष धुतल्या तांदळाचा आहे का?
जे बहुमतात आहेत त्यांचे सरकार आहे. म्हणून् त्यांनी हे विधेयक आणावे अशी मागणी आहे.
'वाकड्या तोंडाचा गांधी' पद्धतीने बाळ ठाकरेने अण्णांची टिंगल केली तीचा पुनरुल्लेख तुम्ही मुद्दाम केला आहे काय असा मूलभूत् प्रश्न मलाही पडला.
उपक्रम सारख्या सुसंस्कॄत संस्थळावर सुद्धा हीन दर्जाच्या टीकेमधून् आनंद घेणारे लोक आहेत की काय असाही एक मूलभूत प्रश्न पडला.
बरेच जण् अण्णांची मागणी अलोकशाहीवादी आहे असे म्हणत् आहेत्. एखादी मागणी अलोकशाही वादी असेल् तरी ती करण्यासाठी शांततामय मार्गाचा आधार् घेणे हे लोकशाहीस धरुन् आहे पण ती मागणी करण्याचा अधिकार दडपशाहीने चिरडणे हे लोकशाहीस् धरुन् नाही.
मागणी
हे विधेयक संसदेत आणण्यास सरकारही तयार आहे. पण आण्णांचा असा आग्रह आहे की ते जसेच्या तसे त्यांनी मांडलेल्या एकुणएक मुद्यांसहित यावे. सरकारने बनवलेल्या विधेयकाला आण्णा 'सरकारी लोकपाल' म्हणतात आणि ते आम्हाला मंजूर नाही असा हेका त्यांनी धरला आहे. जो दुराग्रहच वाटतो. टिम आण्णा ह्यांना हे विधेयक जसे लिहिले आहे तसेच्या तसे विधेयल चर्चेला यावे असे वाटत असेल तर त्यांनी रितसर निवडणुक लढवुन संसदेत प्रवेश घ्यावा. निवडणुक लढवण्यापासुन त्यांना कुणी अडवले आहे? संसदेत अमुक एक विधेयक आमच्याच पद्धतीने चर्चेला यावे असा हट्ट धरणारे आण्णा कोण? लोकांनी निवडून न दिलेल्या ह्या लोकांनी आपले मुद्दे रेटणे लोकशाहीस पोषक नाही.
आई शप्पथ..
हेच लिहिणार होतो... माझे कष्ट वाचले. सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस नकोच नको आणि ज्यांना भाजपा स्वच्छ नाही असे म्हणायचे आहे त्या सर्वांसाठी अण्णांनी नवा पक्ष काढला तर हवे असेलच. किंबहुना भारतीयांना सध्या नेता नाहीये तर अण्णा कदाचित चांगले नेतृत्व देऊ शकतील :). अनेक चांगले कायदे बनवू शकतील. कदाचित निवडणुका लढताना भ्रष्टाचाराचा उगम प्रत्यक्ष हाताळता येईल. उगाचच असे वाटते कि काँग्रेस राजवटीत जे प्रशासक/न्यायसंस्थेमधले लोक पिचले ते अप्रत्यक्षपणे राजकारण हाताळत आहेत.
उत्तरे-प्रश्न
१. अण्णा ह्यांचे लोकपाल विधेयक संसदेत पास न होता लागू करता येण्यासारखे आहे का?
नाही. म्हणजे तसे करू नये. पण अण्णांनी तसे म्हणले आहे का? (संसदेत पास न करता लागू करा म्हणून)
२. 'मी म्हणतो तसे मी म्हणतो तेच विधेयक पास व्हायला' हवे ही मागणी योग्य आहे का?
तशी कोणी करत असेल तर ते अयोग्य आहे. मात्र जे काही आधीच्या आंदोलनाच्या वेळेस सरकारने अण्णांशी अधिकृत समझौता करून ठरवले होते, ते सरकारने मधल्या काळात पाळले होते का? नसले पाळले तर ते योग्य आहे का?
३. सर्व पक्षांशी संवाद साधून पुढे सरकायला हवे का? सरकता येणार नाही का?
तसेच घडायला हवे. पण सरकारने देखील तसे केले होते का?
४. ह्या सगळ्या आंदोलनाचे टार्गेट काँग्रेस सरकार आहे असे दिसते आहे. भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष धुतल्या तांदळाचा आहे का?
आत्ताच्या परीस्थितीच्या १८० अंशाने उलट: १९९८ साली जेंव्हा अण्णांनी महाराष्ट्रात आंदोलन केले होते तेंव्हा सेना-भाजपा युतीच्या सरकारने त्यांना तुरूंगात टाकले होते आणि काँग्रेस सकट सर्व विरोधी पक्षांनी त्यांना (अण्णांना) पाठींबा दिला होता... तेंव्हा कोण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते? सगळेच राजकारण आहे, हे वेगळे सांगण्याची गरज आहे का?
आता वरील प्रतिसादांमध्ये आलेल्या काही मुद्यांबाबतः
इराणच्या उदाहरणासंदर्भात: अजून तरी तसे काही अण्णा वागले आहेत असे वाटत नाही. तसेच जर होते तर सरकारने त्यांना का शब्द दिला आणि नंतर का पाळला नाही? हे काही पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत येण्यापुरतेच मर्यादीत नाही. तर जो काही समझौता झाला होता तो न पाळण्याबाबत आहे.
'तुटेपर्यंत ताणू नये' असे जे वचन आहे तिचा विसर अण्णासारख्या ज्येष्ठांनी पडू देऊ नये इतपतच एक नागरिक या नात्याने म्हणेन. - सहमत
तो परंपरागत प्रिव्हिलेज्ड क्लास आहे. - यात नक्की नितिनरावांना कोण अभिप्रेत आहे?
त्या आंदोलनाकडे मुस्लिम कसे बघतात हे बघायला हवे.
तरी देखील मुसलमान त्यांच्या विरोधात आहेत असे अट्टहासाने दाखवायचेच असेल तर ही विनोदी चित्रफीत पहा. या मधे अण्णांना फ्रीमेसनचे* एजंट म्हणले आहे. (*ज्यूंची संघटना, ज्यांना इस्त्रायलमधून मुसलमानांना बाहेर काढायचे आहे वगैरे).
माझ्या माहितीप्रमाणे गांधींनी कधी आमरण उपोषण केले नाही.
फारच विनोदी! याला इतिहासाची माहिती नसणे म्हणावे का दिशाभूल? :-) आंबेडकरांनी पुणेकरारावर सह्या केल्याचे कारण काय आहे ते आठवत नाही का माहीत नाही? तेच १२ जानेवारी १९४८ ला चालू केलेले आमरण उपोषणासंदर्भात देखील. टाईमच्या या लेखाप्रमाणे गांधीजींनी १९३९ पर्यंत पाच वेळेस आमरण उपोषण केले होते. यात गांधीजींना कमी-जास्त करण्याचा प्रश्न नाही. उपोषण हे त्यांच्या लेखी अहींसक शस्त्र होते ज्याने परीवर्तन आणणे शक्य होते. त्यांनी ते वेळोवेळी वापरले. कधी लाक्षणिक तर कधी आमरण उपोषणाने - परतंत्र आणि स्वतंत्र भारतात.
---------------
चर्चाप्रस्तावासंदर्भात अजून काही प्रश्न पडतातः
भ्रष्टाचाराने देशाला-समाजाला पोखरले आहे का? त्याचा समूळ नाश करण्यासाठी लागणारी जनजागृती करण्याचा हक्क हा राजकारण्यांप्रमाणे कुठल्याही नागरीकाला आहे का? का केवळ सत्ताधारी जे काही करत आहेत त्यात ढवळाढवळ करू नये, पक्षी: ते लोकशाहीच्या विरोधात आहे असे वाटते?
शेवटी थोड्या हलक्या मुद्यावरः
बाकी काही नाही तरी या निमित्ताने, anna म्हणजे केवळ ऍनाच नाही तर अण्णा असा पण उच्चार होऊ शकतो, असे अनेक उच्चभ्रूंच्या लक्षात आले आहे तसे अण्णा म्हणजे मराठी पण असू शकतो हे दाक्षिणात्यांच्या आणि सर्व दाक्षिणात्यांना सरसकट अण्णा म्हणणार्यांच्या लक्षात आले आहे. हे ही नसे थोडके. :-)
मुस्लिम दूर जातील
अण्णांच्या विरोधात मुसलमान आहेत असे नाही. पण संघ, मोदी, भाजपा अण्णांजवळ गेल्यास मात्र दूर जातील. तसेच घटनेचे मूलभूत स्वरूप बदलण्याची कुणी भाषा केल्यास आंबेडकरी जनताही जवळ जाणार नाही. (आता असे स्वरूप बदलावे की नाही ही वेगळी गोष्ट आहे. पण जेहेत्ते असे आहे.)
ह्यात कसली आली आहे दिशाभूल किंवा विनोद? गांधींनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध कधी आमरण किंवा बेमुदत उपोषण केले ते सांगा?
नक्कीच. उद्या आपण चौकात जाऊन बोंबललो किंवा मेणबत्त्या लावल्या तर त्यात चुकीचे काही नाही. पण ब्लॅकमेलचा प्रकार रुचणारा नाही. ज्यूडिश्यल सुप्रीमसी आणि पार्लमंट्री सॉवरेन्टी ची तत्त्वे डावलून अण्णा बिल पास करू शकतात का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
आधी-नंतर
आपण आता म्हणता, "अण्णांच्या विरोधात मुसलमान आहेत असे नाही. पण संघ, मोदी, भाजपा अण्णांजवळ गेल्यास मात्र दूर जातील." आणि त्याआधी शंकेच्या सुरात प्रश्न विचारता, "ह्याचा अर्थ ह्या आंदोलनाला मुस्लिमांचा, ओबीसींचा आणि अनुसूचित जातींचा फारसा पाठिंबा नाही असे म्हणता येईल का?" असो. आणि बाय द वे: संघ, मोदी, भाजपा आणि त्यांना मानणारे भारतीय नागरीक यांना घटनेने दिलेले हक्क नाहीत असे म्हणायचे आहे का?
गांधींनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध कधी आमरण किंवा बेमुदत उपोषण केले ते सांगा?
परत तेच.. आधी म्हणालात, "माझ्या माहितीप्रमाणे गांधींनी कधी आमरण उपोषण केले नाही. " आता त्याचे उत्तर मिळाले तर ब्रिटीशांच्या विरोधात कुठे केले म्हणून विचारत आहात. तरी देखील हे एक उत्तरः १९३२ साली गांधीजींनी जे उपोषण केले ते काय आंबेडकरांच्या विरुद्ध होते का? ते ब्रिटीशांनी घेतलेल्या निर्णयाच्या, पक्षी: ब्रिटीशांच्याच विरोधात होते. गांधीजींच्याच भाषेत, “I am certain that the question of separate electorates for the Untouchables is the modern manufacture of satanic government. I will resist it with my life.” असे म्हणत त्यांनी आमरण उपोषणास सुरवात केली. त्यात ब्रिटीशांनी पाचर मारण्यासाठी म्हणले की डिप्रेस्ड क्लास (आंबेडकर नेते) आणि सवर्ण हिंदू (गांधीजी नेते) यांच्यात जे काही ठरेल ते आम्ही मान्य करू म्हणून.. असो. त्या व्यतिरीक्त स्वतंत्र भारतातील आमरण उपोषण हे कुणाला त्रासदायक ठरत होते, स्वतंत्र भारताच्या सरकारलाच ना? (आता, "आपलं वाचन किती, आपण प्रश्न विचारता किती" असे म्हणायला हवे! ;) )
तुम्हालाही आहेत ना हक्क
नाकारणार मी कोण. अगदी तुम्हीदेखील मानत असल्यास तुम्हालाही आहेत ना हक्क. तुम्ही मानता का संघाला, मोदींना आणि भाजपाला? तुम्ही लावू शकता ना मेणबत्त्या.
मला जे मला म्हणायचे ते म्हणून झाले आहे. पण वाचा:
Another method he used was fasting. It had been much criticised, but it should be remembered that he used it not against the British but against his own side. He used it against the British only once in a slightly different context, not in order to get something from them but because he felt they had been spreading malicious rumours about him. He thought fasting was justified because it was part of dying. Just as violence specialised in the art of killing, so nonviolence specialised in the art of dying. And through death and suffering love you could trigger off certain processes in others and develop the technology of nonviolence. His fast unto death was basically the crucifixion of Christ worked out in a certain context. When he embarked on a fast unto death, the British said this was blackmail, but Gandhi responded, 'It is not blackmail, it is voluntary crucifixion of the flesh.' In other words, I torture myself, crucify myself, because I love my fellow-Indians and cannot bear the thought that they would stoop so low as to use violence and kill each other. I want to bring them back to sanity. I know they love me, and because I know they love me, I want to evoke their love and mobilise it by saying to them that if they continue to behave in this way they will not have me any more.' That was the meaning of fasting unto death, and it could only be used in relation to those you loved, and who loved you - people to whom you were closely bonded, and solely for the purpose of evoking the best in them. It should not be a kind of moral blackmail in which you said, 'Unless you do this for me - give me this house free or whatever - I will fast unto death.'
बाकी तुमच्या गोलगप्पांत मला रस नाही. चालू द्या.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
:)
तुम्हालाही आहेत ना हक्क
थँक्यू थँक्यू!
तुम्ही मानता का संघाला, मोदींना आणि भाजपाला?
मी संघाला संघ म्हणून, मोदींना मोदी म्हणून, भाजपाला भाजपा म्हणून, अहो इतकेच काय धम्मकलाडूंना धम्मकलाडू म्हणूनच मानतो.
मला जे मला म्हणायचे ते म्हणून झाले आहे. पण वाचा: Another method he used was fasting. It had been much criticised, but it should be remembered that he used it not against the British but against his own side. He used it against the British only once in a slightly different context, not in order to get something from them but because he felt they had been spreading malicious rumours about him.
आपण दिलेल्या गांधीजींच्या संदर्भावरून आपल्याला गांधीजींचे विचार आणि आचार मान्य नाहीत असे दिसते, तसेच ते (नेतृत्व सांभाळत असताना) खोटे बोलत होते असे आपल्याला म्हणायचे आहे असे देखील वाटते. "सत्याचे प्रयोग" जगासमोर उघडपणे बोलण्याचे धाडस करणार्या गांधीजींनी, ब्रिटीश गैरसमज पसरवत असल्याने आमरण उपोषण केले असे म्हणणे मला अमान्य आहे, चुकीचे वाटते. असे म्हणायचे कारण इतकेच की, कुठल्यातरी ब्रिटीश प्राध्यापकाचे गांधीजींच्या अहिंसेबद्दलच्या (किंबहुना त्याच्या विरोधातील) विचारांना आपण खरा संदर्भ देत असताना, स्वतः गांधीजी काय म्हणाले हे http://www.mkgandhi.org वरील संदर्भातून, “I am certain that the question of separate electorates for the Untouchables is the modern manufacture of satanic government. I will resist it with my life.” मी सांगितले असताना, आपल्यास गांधीजींच्या विधानापेक्षा भिकू पारेख यांचे विश्लेषण खरे वाटत आहे.
त्या शिवाय आधीच्या प्रतिसादात आपणच आपल्या गोलगप्पा दाखवल्या त्याकडे दुर्लक्ष केलेत ते वेगळेच. असो.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
फुगड्या
तुम्ही मूळ पानाचा दुवा न देता दिलेल्या एका एकुलत्या एक वाक्यात उपोषणाबाबत गांधीजींची भूमिका दिसत नाही. गांधीजींची उपोषणाविषयीची भूमिका तुम्हाला माहीत नव्हती असेच म्हणायला हवे. ती भूमिका माझ्यामते सर्वविदित आहे. मी आधी दिलेल्या परिच्छेदातली शेवटची काही वाक्ये आधी नीट वाचा बरे. बाकी भिकू पारेख ह्यांना कुठलातरी ब्रिटीश प्राध्यापक म्हणणे म्हणजे.. जाऊ द्या. गांधीजींच्या विधानापेक्षा भिकू पारेख ह्यांचे विश्लेषण वगैरे वगैरे चालू द्या. मला तुमच्यासोबत फुगड्या घालण्यात काही इंटरेस नाही. :)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
संदर्भ
श्रावणातील मंगळवार असल्याने फुगड्यांची आठवण झालेली दिसते... पण ह्याला फुगड्यांपेक्षा झिम्मा अथवा त्याही पेक्षा, "नखुल्या बाई नखुल्या" म्हणले तर ते जास्त योग्य ठरेल असे वाटते. पण जाउंदेत ते अवांतर आहे.
तुम्ही मूळ पानाचा दुवा न देता दिलेल्या एका एकुलत्या एक वाक्यात उपोषणाबाबत गांधीजींची भूमिका दिसत नाही.
संकेतस्थळाचा दिला पण त्या पानाचा दुवा द्यायचा राहीला होता का? हा घ्या. ते संदर्भ वाक्य चौथ्या परीच्छेदात पहील्या-दुसर्या ओळीत आहे. त्यावर नेहरूंनी “I felt annoyed with him for choosing a side issue for his final sacrifice.” जे म्हणले आहे, ते त्याच परीच्छेदात शेवटी आहे.
मी आधी दिलेल्या परिच्छेदातली शेवटची काही वाक्ये आधी नीट वाचा बरे.
अहो. खात्री बाळगा. मी ती वाक्ये अथवा परीच्छेदच काय, आपण दिलेल्या दुव्यातील भिकूजींचा १० पानी पेपर पण वाचला. त्यात गंमत अशी आहे की त्यांनी ते दलीतांसंदर्भातील, अथवा १९३२ सालचे अथवा आंबेडकरांच्या विरोधातील वगैरे म्हणलेले नाही. शिवाय इतका विद्वान प्राध्यापक असताना तळटीप म्हणून एक संदर्भ देखील दिलेला नाही. आता "बाबा वाक्य प्रमाणम्" म्हणून घ्यावे असे आपल्याला म्हणायचे असेल तर तो वेगळा मुद्दा आहे.
बाकी भिकू पारेख ह्यांना कुठलातरी ब्रिटीश प्राध्यापक म्हणणे म्हणजे..
आपल्या श्रद्धास्थानास चुकून धक्का लागला गेला असल्यास क्षमस्व. माझ्या मनात असे दुखवायचे नव्हते, कारण मी कुणाच्या श्रद्धास्थानाची टिंगळ-टवाळी करत नाही. तेंव्हा प्रा. भिकू पारेख यांना उद्देशून मी प्रश्न विचारले ते वर म्हणल्याप्रमाणे केवळ मोकळ्या मनाने आणि उघड्या डोळ्यांनी त्यांनी केलेल्या विश्लेषणाचे विश्लेषण होते. त्यात माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी गांधींजींचे स्वतःचे काय म्हणणे होते, त्यावर भाष्य केले नव्हते. त्याचा अर्थ त्यांनी ते स्वतःचा मुद्दा पुढे करण्यासाठी टाळले तरी असावे अथवा त्यांचे वाचन कमी पडले असावे. त्याव्यतिरीक्त मला पटकन त्यांच्या म्हणण्याला साजेसा दुवा मिळाला नाही हे अजून एक कारण आहे. शिवाय गांधीजी सत्य बोलायचे म्हणून त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवणे योग्य आहे असे तुम्हाला वाटत नाही का?
ओह नो
अच्छा तर वाचूनही पालथ्या घड्यावर पाणीच पडलले दिसते आहे. ते त्यांनी दलितांसंदर्भातील किंवा आंबेडकरांच्या विरोधातील वगैरे म्हटलेले आहेत असे मी म्हटलेले नाही. एकंदरच गांधीजींची उपोषणविषयक भूमिका त्या वाक्यांतून दिसते असेच मी आधी म्हटलेले आहे. तुम्ही नको ती बिले माझ्या नावावर फाडू नका बरे. (बाकी तुम्ही एवढे गोल गोल फिरता आणि फिरवता की पुढचा माणूस यडा होऊन जावा. प्रत्येक जण काही धनंजय असू शकत नाही. ) तर भिकू पारेख ह्यांचे लेखन त्या संकेतस्थळावर भिकू पारेख ह्यांनी टाकले असण्याची शक्यता नाही. चूक असल्यास त्या संस्थळवाल्यांची असावी. तुम्ही कशाला पारेख ह्यांची लायकी काढता. कदाचित तुमच्याएवढे गाढे विद्वान नसतीलही. पण त्यांची पुस्तके वाचा. त्यातून तुम्हाला नक्कीच हवे ते संदर्भ मिळतील.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अण्णांचे आंदोलन
चर्चा विषयातील प्रश्न 'लिडींग' पद्धतीचे आहेत. तसे असू नयेत असे नाही. पण चर्चेत मोकळेपणा येत नाही.
आमरण उपोषणात ब्लॅकमेलिंगसम (माझ्या मरणाला तुम्ही जबाबदार असे भासवणे) परिस्थिती ओढवते आणि त्या कारणाने हा उपाय योग्य नाही. हल्लीची कित्येक उपोषणे पाहिली तर त्यात आमरण असे फारसे दिसत नाही. (कुणी स्वामी उत्तरांचलचे मृत्युमुखी पडले अशी फुटकळ बातमी होती ती सोडल्यास.) बाकी आंदोलन किती चालते ही गोष्ट वेगळी.
आग्रह (सत्याचा किंवा कसचाही) हा हेकेखोरपणाच असतो. त्यामुळे 'मी म्हणतो तसे मी म्हणतो तेच विधेयक पास व्हायला' हवे ही मागणी योग्य आहे का? हे हेकेखोर वाटले तरी सर्वच अशा आंदोलनाचा भाग असतो. त्यात नंतर क्लांइब डाऊन सर्वांनी अपेक्षित धरले असते. घासाघीसीत मी बधणार नाही हा पवित्रा बरेचदा योग्य किंमत मान्य करायला भाग पाडतो. तेंव्हा अण्णांच्या या मागणीकडे टॅक्टिकली बघता येते.
जेव्हा हेकेखोरपणा ही रणनिती असते तेव्हा सर्वांना सामावून घेऊन पुढे चला (प्र.क्र. ३) त्यात बसणार नाही. अशा रणनितीत सर्वपक्षांना भेटणे जरुरीचे असेल पण ते स्वमत प्रचारासाठी. दुसर्यांचे ऐकून घेण्यासाठी नाही.
या आंदोलनाचे टार्गेट कॉन्ग्रेस आहे हे सरळच आहे. भाजप काय आणि कम्युनिस्ट काय किंवा मनमोहनसिंग काय (बाकीच्यांना आम्ही धुतल्या तांदळातले असे म्हणण्यात फारसा रस नसावा.) कुणीही धुतल्या तांदळासारखे नाहीत. (प्र. ४)
माझ्या मते जनलोकपाल काय किंवा कॉन्ग्रेसी लोकपाल काय कोणीही आले तरी लगेच काही फरक पडणार नाही. पण कुणी सांगावे निवडणूक आयोग (शेषन नंतरचे), सीएजी (हल्लीचे) जसे अचानक समर्थ झाले तसे हे लोकपालही होतील. कदाचित या अण्णांच्या आंदोलनाचे हे एक यश (लाँगटर्म मधले) मानले जाईल.
प्रमोद
लोकशाही
अण्णांना अटक दिल्ली पोलीसांनी केले. दिल्ली पोलीस हे दिल्ली राज्य सरकारच्या अख्त्यारीत येतात. अटक झाल्यावर, अटकेचे समर्थन करणारे हे केंद्रीय मंत्री होते. नंतर मंत्रीमंडळात नसलेले राहूल गांधी हे पंतप्रधानांना जाऊन भेटतात. त्यानंतर आधी जे सारे अटकेचे केंद्र सरकार तर्फे समर्थन चाललेले असते ते बंद होते आणि त्यांना सोडण्याचे आदेश दिले जातात. आता मुद्दा असा आहे की पंतप्रधानांच्या वर एक राष्ट्रपती सोडल्यास अशी सत्ता कुणाची असू शकते का? शिवाय दिल्लीमधे राष्ट्रपती राजवट आहे का ज्यामुळे केंद्र सरकारने दिल्ली पोलीसांना अण्णांना सोडण्यासाठीचे आदेश दिले (किमान असे बातम्या वाचताना/ऐकताना वाटते)? जर तसे नसेल तर ही लोकशाही पद्धती आहे का?
हे प्रश्न खरेच पडले आहेत. त्याला कदाचीत लॉजिकल आणि योग्य उत्तरे असतील तशी मिळावीत ही विनंती.
आंदोलनाचे महत्त्व त्यांनाच कळेल ज्यांना भ्रश्टाचाराचा त्रास होतो
आंदोलन व उपोशण हि केवळ माध्यमं आहे ह्या ढिम्म सरकारवर दबाव टाकण्यासाठीचे.
आपल्याला जे हवं ते कसं मिळवायचं? ह्याची प्रत्येकाची वेगवेगळी गणीते असतात.
इथे मी गांधीजींच्या व अण्णांच्या आंदोलन हाताळण्याचे व त्या मागचा विचार तुलनात्मक फरक समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
गांधीजींनी वापरलेला मार्ग
- एका बाजूने ब्रिटीश राजसत्तेशी आमने-सामने बसून चर्चा करणे.
< या उलट > ती चर्चा भरकवटून, नवीन मुद्दे काढत जे भारतीय नेत्यांना हवे आहे ते न देताच 'जे घडतंय त्याची दिशा'आपल्याला हवी तशी करणे, हे ब्रिटीश राज्यकर्त्यांची 'मोडस ऑपरेंडी' होती.
- दुसर्या बाजूने भिन्न-भिन्न संस्कृती -पद्धती-भाशा यागोश्टींनी विभाजीत असलेल्या भारतीय जनतेला एकाच मुशीत घडवण्यासाठी त्यांनी त्यांना जे मुद्दे योग्य वाटेले त्या मुद्द्यावर अहिंसेचा मार्ग दाखवत उपोशणाचा मार्ग स्विकारला. असे करीत असतना त्यांनी सामान्य भारतीयांना राश्ट्रीय स्तरावरचा विचार समजून घ्यायला शिकवले.
गांधीजींचा काळ व त्याकाळातील परीस्थिती वेगळी होती.
अण्णांनी वापरलेला मार्ग व त्यामागचा विचार समजून घेवूया.
- शासकिय व प्रशासकिय कामकाजाची एक प्रोसिजर पूर्ण करणे.
उदा.- 'माहितीचा अधिकार' हा कायदा, हि अण्णांची राश्ट्रासाठीची भरीव कामगिरी आहे.
- ते एक अशी प्रोसिजर विकसित करण्याची दृश्टी आणू पाहत आहेत. ज्याने शासकिय कामकजातील 'भ्रश्टाचार' कमीत कमी होवू शकतो. जसे 'माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामुळे' आपण केलेले कोणतेही काम व त्यास लागलेला वेळ ह्या बाबी आज नाहीतर उद्या इतर कोणालाही कळू शकतात.' हा विचार काम करणार्या कर्मचार्याच्या ध्यानात कायमचा राहतो.
हेच सूत्र लोकपाल बिलमागे आहे. मंत्री व मोठे अधिकार्यांना त्यांचे काम करत असताना-'माहितीच्या अधिकाराच्या कायद्यामुळे'आपण केलेले कोणतेही काम व त्यास लागलेला वेळ ह्या बाबी आज नाहीतर उद्या इतर कोणालाही कळू शकतात.' व ते कळले व मग कोणीतरी तक्रार लोकपालाकडे केली तर आपल्याला सजा देखील होवू शकते.
भीतीची हि लक्शमण रेशा भ्रश्टाचार कमीत -कमी करण्यासाठीची आहे. ती आखणे गरजेचे आहे.
या देशातील सामान्यातील सामान्यांना ह्या लक्शमणरेशेमुळे फायदा होईल, किंवा जाच कमी होईल.
उत्तरे
१. अण्णा ह्यांचे लोकपाल विधेयक संसदेत पास न होता लागू करता येण्यासारखे आहे का?
भारतात अद्याप तरी कागदोपत्री लोकशाही असल्याने हे शक्य नाही. तसा अण्णा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा आग्रह असल्याचेही ऐकीवात नाही.
२. 'मी म्हणतो तसे मी म्हणतो तेच विधेयक पास व्हायला' हवे ही मागणी योग्य आहे का?
हेही वाक्य काल्पनिक आहे. अण्णा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांनी-ज्यांमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी, कायदेतज्ज्ञ आणि अन्य सुशिक्षित लोकांचा सहभाग आहे, अशी मागणी केल्याचा पुरावा नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका नियमानुसार लोकपाल विधेयक तयार करण्यात आल्यानंतर त्यात बऱ्याच त्रुटी असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांना आढळले. त्यांनी यासंदर्भात अण्णांशी संपर्क साधला. या सामाजिक कार्यकर्त्यांच्या चर्चा-मसलतीतून जन लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला. या मसुद्याला काही किंमत देण्यास मुळात सरकार तयार नव्हते. त्याची दखल सरकारने घ्यावी, यासाठी अण्णांनी एप्रिलमध्ये उपोषण केले. त्यानंतर सरकारच्या आश्वासनानुसार वाटाघाटींसाठी दोन्ही पक्ष समोरासमोर आले. थोडीशी घासाघीस होऊन देवाण-घेवाण होण्याची शक्यता त्यावेळी निर्माण झाली.
याच काळात सरकारचे मुखंड एकामागोमाग जन लोकपाल विधेयकासाठी काम करणाऱ्या लोकांची बदनामी करत होते. अशाही परिस्थितीत मसुद्यावरील चर्चा सुरू होती. त्याच वेळेस आपला मसुदा तयार झाल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र त्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळविण्यात आली नाही. जन लोकपाल विधेयकासाठीचे कार्यकर्ते या दरम्यान सगळ्या राजकीय पक्षांशी बोलणी करत होते. मात्र आम्हालाही या विधेयकाचा मसुदा मिळाला नाही, असे या पक्षांनी कार्यकर्त्यांना सांगितले. अण्णा हजारे आणि किरण बेदी यांच्याकडून ही सगळी हकीगत मी प्रत्यक्ष ऐकली आहे.
या सगळ्या प्रकारात लोकशाही संकेतांचे पालन कुठे झाले?
३. सर्व पक्षांशी संवाद साधून पुढे सरकायला हवे का? सरकता येणार नाही का?
वरील परिच्छेदात उत्तर आले आहे. तरीही या संबंधात राजकीय पक्ष फारसे गंभीर असतील असे वाटत नाही.
४. ह्या सगळ्या आंदोलनाचे टार्गेट काँग्रेस सरकार आहे असे दिसते आहे. भाजपा हा प्रमुख विरोधी पक्ष धुतल्या तांदळाचा आहे का?
भाजपच काय, कुठलाच राजकीय पक्ष धुतल्या तांदळासारखा नाही. अण्णांना प्रकाशझोतात आणणारे सर्व आंदोलन तत्कालीन शिवसेना-भाजप सरकारच्याच काळात केले होते, असंही आठवते. (ठाकरेंचे वाक्य त्याच संदर्भात आले होते.)
बाकी, ब्रिटीशांच्या काळात कुठल्याही पंतप्रधानाने स्वातंत्र्य दिनाला झेंडावंदन करून स्वतःची हुजरेगिरी लपवित नागरिकांना लोकशाहीचे उपदेश पाजल्याचे माहित नाही. त्यामुळे कुठल्या तोंडाने त्यांनी झेंडावंदन केले, हे विचारण्याची गरज नसेल.
सहमत.. एकच मुद्दा
प्रतिसादाशी सहमतच. फक्त त्यातील एका वाक्यामुळे एक मुद्याची आठवण झाली. (ते तुम्हाला उद्देशून नाही आहे, पण अण्णा आणि तत्सम सामाजीक कार्यकर्त्यांना उद्देशून नक्की आहे).
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका नियमानुसार लोकपाल विधेयक तयार करण्यात आल्यानंतर त्यात बऱ्याच त्रुटी असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांना आढळले.
भारत हा सार्वभौम देश आहे. संयुक्त राष्ट्रसंघ काय म्हणते हे केवळ आंतर्राष्ट्रीय संबंधांपुरतेच मर्यादीत असावे. आपल्याकडे त्याला जरा जास्तच भाव दिला जातो, जो जगात इतर कोणीच देत नाही. त्रुटी दाखवायच्याच असतील तर त्या जनहीताला बाधक आहेत म्हणून दाखवाव्यात. काँग्रेस अथवा इतर कुठल्याही सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाने म्हणल्याप्रमाणे कसे केले नाही ह्याचा विरोध करण्यासाठी नसाव्यात. देशात काय करावे यावर जसा जनतेचा हक्क आहे तसाच जनतेने निवडून दिलेल्या सरकारचा हक्क आहे, संयुक्त राष्ट्रांचा नाही. नाहीतर ती घसरगुंडी ठरू शकते. असो.
आभारी आहे.
आपल्या प्रतिसादातून आपण आतल्या वर्तुळातील माहिती पुरवल्याबद्दल आभारी आहे.
'मुखंड' ह्या शब्दाचा प्रतीशब्द (इंग्रजी) नमका कोणता घ्यायचा? मी त्या शब्दाचा भावार्थ - 'सरकारातील वा (& / or) सरकारशी संबंधित राजकीय पक्शातील काही चेहरे' असा घेतला आहे.
शेवटच्या परीच्छेदातील उत्तर देखील आवडले.
मुखंड
"'मुखंड' ह्या शब्दाचा प्रतीशब्द (इंग्रजी) नमका कोणता घ्यायचा?"
~ मला वाटते त्याना Party Spokesman असा इंग्रती प्रतीशब्द आहे. अर्थात राजीव गांधींच्या कार्यकाळात विश्वनाथ प्रताप सिंग आणि संजय सिंग यानी "ऑफिशिअल पार्टी पर्सन" यानेच मिडियासमोर सरकारी धोरणाबाबत निवेदन द्यावे अशी मोहिम राबविली होती, जिला पुढे पक्षीय पातळीवरील धोरणात नियमबद्ध केले गेले [हल्ली तर यात 'प्रवक्ता' च्या शैक्षणिक क्वॉलिफिकेशनचाही उल्लेख आहे].
इंदिरा गांधींच्या राज्यात मात्र त्या 'गाय-वासरू' ची आरती ओवाळणारे असे 'मुखंड' डझनावारी होते आणि तेच सो-कॉल्ड् पक्षश्रेष्ठींना धुडकावून प्रसार माध्यमांच्या संपर्कात असत. त्यातही प्रमुख म्हणजे माखनलाल फोतेदार, आर.के.धवन आणि अर्थातच व्ही.सी.शुक्ला. यांच्या बेताल बडबडण्यामुळेच खरेतर 'पक्षाचे मुखंड' हे नाम वार्ताहरांनी प्रसिद्ध केले.
व्हिन्सेट जॉर्ज आणि परवाच कालवश झालेले पी.सी.अलेक्झांडर हे दोघेही इंदिरा गांधींचे खाजगी सचिव तसेच 'प्रवक्ते' होते पण त्यांचा संबंध फक्त परराष्ट्रीय धोरणासंदर्भीय बाबीशी असायचा.
प्रतिशब्द
पार्टी स्पोकसॆमन* हा शब्द तर आहेच, पण त्याहून अधिक दिग्विजय सिंह किंवा जयंती नटराजन यांसारखे प्रवक्तापद नसलेले परंतु बोलण्याच्या बाबतीत सर्वांना मागे टाकणारे, असेही मला अभिप्रेत आहे. हिंदीत अशा लोकांना बड़बोले म्हणतात, पण इंग्रजीत नेमका शब्द मला आता सांगता येणार नाही.
इंदिरा गांधींच्या राज्यात मात्र त्या 'गाय-वासरू' ची आरती ओवाळणारे असे 'मुखंड' डझनावारी होते आणि तेच सो-कॉल्ड् पक्षश्रेष्ठींना धुडकावून प्रसार माध्यमांच्या संपर्कात असत. त्यातही प्रमुख म्हणजे माखनलाल फोतेदार, आर.के.धवन आणि अर्थातच व्ही.सी.शुक्ला. यांच्या बेताल बडबडण्यामुळेच खरेतर 'पक्षाचे मुखंड' हे नाम वार्ताहरांनी प्रसिद्ध केले.
अगदी सहमत. काँग्रेसने अशा मुखंडांची एक फौजच भारतीय राजकारणात उभी केली आहे आणि अन्य पक्षांतही अशा लोकांची काही कमी नाही. अमरसिंह किंवा अंबिका सोनी ही अशा लोकांची ठळक उदाहरणे.
*कळफलकाच्या गडबडीमुळे हा शब्द नीट लिहिता येत नाही.
नेमकी मागणी
अण्णांची मागणी नेमकी काय आहे ह्यावर कुणी प्रकाश टाकू शकेल का?
प्रसार माध्यमांमधील बातम्या अश्या प्रकारचा मजकुर देत आहेत,
ह्या मथळ्यांनुसार अण्णांची लढाई विधेयक कोणतेही बदल न करता मंजूर व्हावे यासाठी आहे असे दिसते. इथे काही सदस्यांनी अण्णांचा आग्रह केवळ विधेयक चर्चेला यावे इतकाच असल्याचे लिहिले आहे.
नक्की अण्णांची मागणी काय आहे?
'अण्णांची मागणी' कि 'नियतीच्या लाटेच्या दिशे' बद्दल विचारताय?
आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीवरून, 'अण्णांना स्वत:ला जनलोकपाल विधेयक जसेच्या तसे स्विकारले जावे.' असे वाटते आहे.
परंतु 'संसदेच्या बाहेरील मंडळींचे म्हणणे संसदेने जसेच्या तसे स्विकारून कायदा पारीत करून घेणे.' हि चूकीची गोश्ट होईल. ह्याच कारणास्तव अण्णांच्या म्हणण्याला विरोध होत आहे/ होत राहील.(होत रहायला हवा.)
माझ्या मते अण्णांना त्यांच्या भोवती असलेल्या मंडळींपासून वेगळे करायला हवे. अण्णांच्या विचारांवर इतर काही मंडळीच्या विचारांचा परीणाम होत आहे. त्या गटाच्या विचारांची सिनर्जीतून निर्माण होणार्या वलयाचे गुण (ज्या वलयाला सध्या 'अण्णाचे प्रतिरूप' दिले गेले आहे) केवळ संघर्श करणारे आहेत. त्या वलयाच्या गुण-अवगुणचा अण्णांना फायदा वा त्रास होवू शकतो. ह्या गटाने औपचारीकपणे संघटना स्थापून, आपल्या संघटनेला कोणतेही नांव देखील दिले नव्हते. ही चूकीची गोश्ट केली आहे. फक्त अण्णांना त्यांनी पुढे केले आहे.
नियती लैय चावट असते. नियतीमुळे आलेल्या जोराच्या लाटेवर सध्या हे आंदोलन स्वार आहे. जोवर ती लाट आहे तोवर ठिक आहे. पण ती ओसरल्यानंतर सध्या एकच दिसणार्या होडीचे अनेक तुकडे-तुकडे होवू शकतात. ह्या जगात 'औपचारीकता' म्हणूनच पाळाव्या लागतात.
नक्की मागणी
सरकारने लोकपाल विधेयक तयार करताना त्यातून पंतप्रधान आणि न्यायपालिका यांना वगळले आहे. शिवाय लोकपालांची नियुक्ती करण्याचे नियमही संदिग्ध आहेत. या तरतुदी सुधारून घ्यायला हव्यात. शिवाय सरकारी लोकपाल विधेयकानुसार, केवळ क्लास 2 च्या अधिकाऱ्यांहून वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांविरूद्ध तक्रारीची सुनावणी घेण्याचे (कारवाई करण्याचे नाही) अधिकार लोकपालांना देण्यात आले आहेत. जन लोकपाल विधेयकानुसार सर्वच थरातील सरकारी अधिकारी या कायद्याच्या कक्षेत आणायला हवेत. या त्रुटी दूर करून सुधारीत विधेयक मंजूर करण्याची मागणी अण्णांची आहे. अर्थातच् त्यांच्या काही सहकाऱ्यांची इच्छा जन लोकपाल विधेयक जशास तसे स्वीकारावी अशी आहे. मात्र ते शक्य नाही आणि याची जाणीव त्यांनाही असावी.
दुराग्रह
मंजूर करण्याची मागणी कशी काय अण्णा करू शकतात? विधेयक संसदेत (आधी स्टँडींग कमीटी समोर) चर्चेला यावे ही मागणी समजु शकतो, पण ते मंजूरच केले पाहिजे हा दुराग्रह नाही काय? भरपुर लोकांचा पाठिंबा असला तरी 'टिम अण्णा' हे काही लोकांनी निवडुन दिलेले प्रतिनिधी नाहित. भ्र
खरे आहे
खरे आहे. परंतु त्रुटी काढलेले विधेयक किमान संसदेत चर्चेला तरी यावे लागेल. त्याआधी त्रुटी असलेले विधेयक आहे तसे मांडणे चूकच आहे.
भरपुर लोकांचा पाठिंबा असला तरी 'टिम अण्णा' हे काही लोकांनी निवडुन दिलेले प्रतिनिधी नाहित
लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी नसले तरी खुद्द लोकांपैकी तरी आहेतच. आपणच निवडून दिलेल्या प्रतिनिधींना आदेश नाही तरी सल्ला देण्याचा अधिकार लोकांना आहे. तोच अधिकार अण्णांनी वापरला तर बिघडले कुठे.संसद सार्वभौम आहे हे खरे आहे. पण ती संसद निवडून देणारे मतदार, नागरिक सर्वश्रेष्ठ आहेत, हा यातला महत्त्वाचा मुद्दा. सरकारने लपवाछपवी आणि उद्दामपणा केला नसता, तर हा प्रश्न एवढा चिघळला नसता.
निलकेणींचे मत
नंदन निलकेणी ह्यांची आयबीएन वरील मुलाखत:
निलकेणी ह्यांचे सगळेच मुद्दे पटले नसले तरी त्यांनी उपस्थित केलेला स्टँडीग कमीटीचा मुद्दा नक्कीच पटणारा आहे.
एक विनंतीवजा सुचना
सरकारच्या लोकपाल विधेयक, २०११ च्या स्थायी समितीने जनतेकडून आपली मते, सुचवण्या, आक्षेप वगैरे नोंदवण्यासाठि १५ दिवसांची मुदत दिली आहे. या समितिला तुमची मते यापत्त्यावर पाठवायची आहेतः
Shri. K. P. Singh
Director, Rajya sabha secretariat,
201, second floor, Parliament house annex,
New Delhi-110001
नियमः
माझ्यामते संसदीय स्थायी समितीला आपली मते कळविणे गरजेचे आहे. स्थायी समिती ही विविध पक्षांच्या खासदारांनी बनलेली असते. या समितीपुढे आपली मते ठेवल्यानंतर समिती मसुद्यात योग्य वाटतील ते बदल घडवून आणु सहते. जर सर्व सुचना, आक्षेप वगैरे वाचुन समितीला मुळ मसुद्याच्या ढाच्यामधेच तृटी आढळल्यास ती मसुदा रद्द (रिजेक्ट) करू शकते. मात्र या सार्यासाठी तुमच्या सुचना समितीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
मी माझ्या सुचना कालच पोस्टाने पाठवल्या आहेत. असे विनंतीवजा आवाहन करतो की ज्यांना लोकपाल विधेयक २०११ मधे तृटी वाटत असतील किंवा जे काहि मत असेल त्यांनी त्यांच्या सुचना/ आक्षेप/सुचवण्या वगैरे समितीला जरूर पाठवून (निदान) आपले कर्तव्य पार पाडावे.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?