उपक्रमी सदस्य

मराठी विकीवरही अनेक उपक्रमी सदस्य आहेत. त्यांना आपल्या सदस्य पानावर लावण्यासाठी आता उपक्रम चिन्ह मराठी विकीवर तयार करण्यात आले आहे.
{{सदस्य चौकट उपक्रम सदस्य|टोपणनाव=अमुक}} हा साचा अमुक ऐवजी स्वत:चे उपक्रम संकेतस्थळावरील टोपणनाव भरून विकिपीडियावरील तुमच्या सदस्य पानावर चढवावा म्हणजे उपक्रमचिन्ह चौकट तुमच्या सदस्य पानावर दिसू लागेल.

माझ्या सदस्य पानावर पाहा.

From 12 August 2011

चला तर मग, या तुमच्या विकिपानावर!
आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अ ब पाहायला विसरू नका!
अ ब = अलीकडील बदल

लेखनविषय: दुवे:

Comments

असे का?

प्रतिसाद थोडासा अवांतर असावा... तरीही,

मी पूर्वी मराठी विकीवर सातत्याने लिहित असे. आता तसे करणे जमत नाही. माझ्या तेथे लिहिण्याचा मुख्य उद्देश असा होता की एखादी माहिती वाचली तर कालांतराने तिचा विसर पडतो. पुस्तके विकत घेण्यासारखी नसली आणि माहिती उतरवून ठेवली तर टिप्पणे जवळ राहतात आणि भविष्यात तिचा वापर करता येतो. झेरॉक्स करून ठेवली तर पाने कधीतरी गहाळ होतात किंवा कुठे ठेवली ते विसरायला होते. तसेच एखाद्या गोष्टीचा शोध घेणेही कठीण पडते. तेच जर नेटावर उतरवून ठेवले तर गूगल सर्च, कंट्रोल-एफ वगैरेने हवे ते क्षणात शोधता येते.

परंतु असे दिसून येते की गूगल शोध घेतला असता मराठी विकीच्या लिन्क्स फारशा मिळत नाहीत. सर्वात पहिला दुवा सहसा उपक्रमाचा असतो. नंतर ब्लॉग्ज, मिपा, मायबोली वगैरे. विकी आणि मनोगत यांचे दुवे सहसा नसतातच.

असे का बरे?

अरे?

मला तर विकी सर्वात आधी दिसतो!

मी मराठी गुगल हे डिफॉल्ट वापरतो. त्यामुळे मला हे हल्ली जाणवत नसावे.
हे घ्या मराठी गुगल - http://www.google.com/webhp?hl=mr

आता मराठी विकी सर्वात वर दिसेल अशी खात्री आहे मला... :) असो,
टॅग्ज लवा पानावर... :)
-निनाद

मराठी गुगल

हे घ्या मराठी गुगल - http://www.google.com/webhp?hl=mr

ह्यात मराठी काय आहे? इथल्या देवनागरी कळफलकात 'ण', 'ळ' वगैरे मराठीतली व्यंजने दिसली नाहीत. तसेच शोध घेतला असता हिंदी पानेही दिसतात. मराठी गुगलमधे हिंदी पाने कशी काय?
तसेही देवनागरी शब्द टाकून इंग्रजी गुगल मधे सर्च केल्यासही ही पाने सापडतातच. मग 'मराठी गुगल' असे म्हंटण्यासारखे ह्यात काय आहे?

अगदी सहमत

मी पूर्वी मराठी विकीवर सातत्याने लिहित असे. आता तसे करणे जमत नाही. माझ्या तेथे लिहिण्याचा मुख्य उद्देश असा होता की एखादी माहिती वाचली तर कालांतराने तिचा विसर पडतो. पुस्तके विकत घेण्यासारखी नसली आणि माहिती उतरवून ठेवली तर टिप्पणे जवळ राहतात आणि भविष्यात तिचा वापर करता येतो. झेरॉक्स करून ठेवली तर पाने कधीतरी गहाळ होतात किंवा कुठे ठेवली ते विसरायला होते. तसेच एखाद्या गोष्टीचा शोध घेणेही कठीण पडते. तेच जर नेटावर उतरवून ठेवले तर गूगल सर्च, कंट्रोल-एफ वगैरेने हवे ते क्षणात शोधता येते.

पुर्ण सहमत आहे. मी ही असाच विकीवर लिहू लागलो आणि मग त्याची चटकच लागली.... ;)
-निनाद

पर्सनलाइज्ड सर्च ?

परंतु असे दिसून येते की गूगल शोध घेतला असता मराठी विकीच्या लिन्क्स फारशा मिळत नाहीत. सर्वात पहिला दुवा सहसा उपक्रमाचा असतो. नंतर ब्लॉग्ज, मिपा, मायबोली वगैरे. विकी आणि मनोगत यांचे दुवे सहसा नसतातच.
असे का बरे?

कदाचित तुम्ही गूगल पर्सनलाइज्ड सर्च वापरत असाल म्हणून असेल.

^ वर