उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
११-१२ वर्षांच्या मुलांसाठी पुस्तके सुचवा
चिंतातुर जंतू
July 27, 2011 - 3:04 pm
११-१२ वर्षांच्या किंवा किंचित वरच्या वयाच्या मुलांसाठी दर्जेदार पुस्तकं कुणी सचवू शकेल का? गरज काहीशी अशी आहे:
- पुस्तकं इंग्रजी भाषेत उपलब्ध असावीत. (पण इतर भाषांतून केलेली भाषांतरं चालतील.)
- अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.
- रंजनमूल्य आणि साहित्यमूल्य यांचा संगम असावा. उदा: रोल्ड डाल या निकषात बसेल, पण बहुधा वयाच्या निकषात बसणार नाही. म्हणजे त्याची पुस्तकं बहुधा ११-१२ वर्षांपर्यंत पोहोचण्याच्या आधीच वाचून झालेली असतील.
- समकालीन लेखक अधिक आवडतील. यात जुन्या पिढीचा अवमान नाही, पण नवीन लेखकांची असोशी आहे. उदा. ज्यूडी ब्लूम उत्तम लेखिका आहे आणि इतर निकषांवर नक्की उतरेल, पण त्यानंतरच्या पिढीच्या लिखाणाशी फारसा परिचय नाही. तो करून घ्यायला आवडेल.
पुस्तकं/लेखक यांच्या शिफारशीसह त्यामागची कारणमीमांसा थोडी विशद केलेली आवडेल. अभ्यासू उपक्रमींच्या शिफारशी आणि प्रतिक्रियांच्या अपेक्षेत.
(असा धागा आधी येऊन गेलेला असेल किंवा एखाद्या विषयाच्या अनुषंगानं अशी यादी पूर्वी कुणी बनवली असेल तर तिचाही दुवा द्यावा.) धन्यवाद.
दुवे:
Comments
हॅरी पॉटर
पहिले दोन भाग प्रचंड सुंदर. त्या विश्वाचं वर्णन मोहून टाकणारं आहे. नंतरचे भाग फापटपसारा वाढल्यामुळे हळुहळू दर्जा घसरलेले आहेत.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
पहिले साडेतीन भाग
माझ्या दृष्टीने पहिले साडेतीन भाग चांगले आहेत. चवथ्या भागाच्या मध्ये कुठेतरी तिच्या लिखाणाची धार जाते.
माझ्या मते
माझ्या मते ८-९ वर्षांचे असतानाच मुले पॉटरच्या पहिल्या दोन भागांचा फडशा पाडतात. १२ वर्षांपर्यंत सर्व भाग वाचून होतात.
फिलिप पुलमन् ची "डार्क मटीरियल्स ट्रिलजी"
फिलिप पुलमन् ची "डार्क मटीरियल्स ट्रिलजी
फारच सुरस कथा - किशोरवयाच्या उंबरठ्यावर असलेल्या दोन मुलांची गोष्ट. पॉटर मालिकेसारखीच काल्पनिक जग, गुड् वर्सस ईविलचा सामना इ इ, पण नैतिक विश्व अधिक गुंतागुंतीचे, आणि भयानक. नास्तिकाच्या दृष्टीकोनातून क्रिष्चन उगमकथेचा फेरविचार असे काहींनी या मालिकेकडे पाहिले आहे, पण हा तात्त्विक भाग सोडला तरी पात्र आणि एकूण काल्पनिक जग फारच सुंदर आखले आहे. आत्मा/"सोल" या कल्पनेची मस्त हाताळणी.
रोल्ड् डाल् आवडणार्या मुलांना आवडेल असे वाटते.
मुलं काय वाचतात?
वेळेअभावी जे मांडायचं आहे ते थोडक्यात मांडते. चर्चा वाचून एक प्रश्न पडला.
चिंजंना ही पुस्तके भेट म्हणून द्यायची आहेत का आणि द्यायची असल्यास ११-१२ वर्षांचं हे मूल/मुले कुठे आहे/त? (भारतात/ अमेरिकेत)
मुलांसाठी कोणती पुस्तके निवडावी हा प्रश्न अनेकदा पडतो. त्यांची स्वतःची अशी आवड असते, त्यांच्या आसपासची इतर मुले जे वाचतात ते त्यांना वाचायचे असते (गप्पा मारण्यात, वादविवादांत सहभाग हवा म्हणून) आणि जे प्रचलित आहे ते वाचायचे असते. याच बरोबर, इथे आपली आवड असते म्हणजे पुस्तके खरेदी करून देणार्याची, आवडीबरोबरच आपले निकषही असतात. (जसे, ११-१२ वर्षाच्या मुलाने ट्वायलाइट सिरिजचे पहिल्या भागापुढले भाग इतक्यातच वाचू नयेत.)
याशिवाय, ११-१२ वर्षांची मुले स्वतःला टिनएजर्स समजू लागत असतात (निदान मनातल्या मनात ;-) ) त्यांची आवड किंचित वरचढ झालेली असते असा अनुभव आहे.
पुस्तकांची निवड हे सर्व पाहून करावी असे मला वाटते.
११-१२ वर्षांच्या मुलांना आवडतील अशी मी सुचवलेली काही पुस्तके (वेळ मिळेल तशी यादी वाढवेन)
माझ्या अनुभवाप्रमाणे या वयातील मुलांना साय-फाय, ऍडवेंचर आणि थ्रिलर वर्गातली पुस्तके अधिक आवडतात. खालील पुस्तके अमेरिकन मुलांमध्ये विशेष प्रसिद्ध आहेत. शाळेतूनही ती वाचण्यास प्रोत्साहन दिले जाते.
द गिवर
द हंगर गेम, कॅचिंग फायर, मॉकिंग जे (ट्रिलजी)
द आउटसाइडर्स
बर्याचदा नवीन/ प्रचलित पुस्तके घेताना सोबत मी क्लासिक पुस्तकेही घेते. घरातच असली की वाचायची इच्छा आपसूक होते.
ऍलिस इन द वंडरलँड
तूर्तास
१. लुइ कॅरलचे (चार्ल्ज लुटविज डॉसन) च 'ऍलिसेज़ ऍडवेन्चर्ज़ इन द वंडरलँड'.
२. हान्ज़ क्रिश्चन अँडरसनच्या परिकथा.
३. ग्रेट एक्सपेक्टेशन्ज़
४. अरेबियन नाइट्स (सॅनिटाइज़्ड)
कारणीमीमांसा नंतर.
क्लासिक पुस्तकांची आवड | हा धागाही उपयोगी आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अतिशय उत्तम पुस्तक
हू मूव्हड माय चीझ - फॉर किडस
मोठ्यांचे हे "चेंज मॅनेजमेंट" वरचे पुस्तक गाजलेच आहे. पण लहानांच्या या आवृत्तीमध्ये तीच शिकवण खूप सोपी विशद करून सांगीतली आहे. पुस्तक मस्त आहे. ११-१२ वर्षाच्या वयासाठी योग्य आहे.
_________________________
लाफेटेरिआ हे विनोदी कवितांचे पुस्तक मुलांना खूप आवडते. माझ्या मुलीचे खूप आवडीचे पुस्तक आहे. तिला कवितांची गोडी या पुस्तकामुळे लागली म्हणायला हरकत नाही.
_________________________________________
अतिशय सुंदर आणि माहीतीपूर्ण पुस्तक - गिफ्ट ऑफ ऍन ईगल. मी हे पुस्तक खाली ठेवू शकले नाही. गरुडाचे पिल्लू पाळण्याचे खरे कथानक .... अतिशय रोमांचक.
एक आठवलेले
मुलीला आवडलेले - The Mysterious Benedict Society हे एक पुस्तक आहे (खरी तीन पुस्तके आहेत).
http://www.barnesandnoble.com/s/mysterious-benedict-society-series?store...
मुलीने शाळेत वाचलेले -
The Devil's Arithmetic
by Jane Yolen
तिसरे डायरी ऑफ दी विम्पी किड - मजेशीर आहे. http://www.wimpykid.com/
कदाचित माहिती असेल.
अजून विस्तृत नंतर लिहीन.
अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.अमेरिकेत इंटरनेटवरून सहज मागवता येतील अशी असावीत.
हा हा
डायरी ऑफ दी विम्पी किड - माझ्या मुलीला आवडते.
सॉरी चित्रा पण मी तुझ्या प्रतिसादाला चुकून पायबंद घातला :(. विस्तृत माहीती अन्य प्रतिसादात लिही आता :(
आता वाचतो आहे : वानरराजाचा पश्चिमेकडे प्रवास
आता गंमत म्हणून वाचतो आहे ते पुस्तक :
जर्नी टु द वेस्ट : द मंकी किंग्ज् अमेझिंग ऍडव्हेन्चर्स् (ऍमॅझॉन दुवा)
भारतात प्रवास केलेला चिनी भिक्खू श्युआन् चा़न्ग (ह्युएन् सांग) यांने जे प्रवासवर्णन लिहिले आहे (पश्चिमेकडील प्रदेशांबाबत आलेख) त्याचे नुसते निमित्त करून या "पश्चिमेकडील प्रवास"मध्ये भन्नाट कपोलकल्पित कथा आहेत.
यातील प्रमुख पात्र भिक्खू श्युआन् चा़न्ग नसून त्यास प्रवासात मदत करणारा शिष्य "माकडांचा राजा" हा आहे. प्रवासातील ठिकाणे निव्वळ कल्पनेतली आहेत. त्यात राक्षस-चेटकिणी-मायावी वादळे वगैरे आहेत.
वरील दुव्यावर मी वाचत आहे ती आवृत्ती/ते भाषांतर आहे. प्रचंड ग्रंथामधून या भाषांतरकाराने निवडलेला भाग तसा संकुचित आहे. अधिक मोठ्या भाषांतराचा ऍमॅझॉन दुवा येथे बघावा. यातील भाषासुद्धा ११-१२ वर्षांच्या मुलामुलींना समजण्यासारखी आहे.
धन्यवाद आणि थोडं स्पष्टीकरण
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. काही पृच्छांची उत्तरं:
भेट द्यायची आहेत. ज्यांना द्यायची ती मुलं पुण्यात आहेत. पिढ्यानपिढ्या (पेशवाईपासून म्हणायला हरकत नाही!) पुण्यात स्थायिक असणार्या घरातल्या उच्चविद्याविभूषित उच्चमध्यमवर्गीय आईवडलांची ही मुलं आहेत. आजी-आजोबा साधी रहाणी - उच्च विचारसरणीच्या पिढीचे, आई-वडील ज्ञानप्रबोधिनीचे आणि मुलं आर्थिक-सामाजिक परिस्थितीनुसार आणि जागतिकीकरणोत्तर परिसरानुसार खूप अमेरिकनाळलेली आहेत.
सर्व तंतोतंत लागू होत आहे. भेट देणार्या माझी आवड म्हणायची तर ती एवढीच की रंजनमूल्याबरोबर साहित्यमूल्य असावं आणि समकालीन असावं.
हॅरी पॉटर - वाचलेले आहेत. प्रतिक्रिया तळ्यात-मळ्यात होती. म्हणजे आजूबाजूच्या मुलांइतकी हरखून गेलेली नाही पण हॅरी पॉटर अगदी टाकाऊ नाही अशी होती.
जुनी/क्लासिक पुस्तकं - आईवडलांकडून त्यांचाच मारा होतो आहे म्हणून मला ती टाळायची आहेत.
धम्मकलाडूंनी शिफारस केलेली पुस्तकं वाचलेली आहेत.
डायरी ऑफ अ विम्पी किड - मला वाटलं होतं की याचा वयोगट थोडा लहान आहे, पण माहिती वाचून ठरवेन. (मला डिस्फन्क्शनल कुटुंबं आवडतात!) बाकीच्या शिफारशीही रोचक वाटत आहेत. पुन्हा एकदा आभार आणि अजून शिफारशी असतील तर येऊ द्या.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
डायरी
विम्पी किड हे पुस्तक लेखकाने आधी मोठ्यांसाठी लिहीले होते असे अलिकडेच त्याच्या टाईममधील एका लेखात वाचले. प्रकाशकांनी ते मुलांसाठी लिहीले आहे असे म्हटल्याने ते मुलांचे पुस्तक म्हणून विकले गेले :)
बाकी दी मिस्टिरीयस बेनेडिक्ट सोसायटी या मुलांना आवडेल असे वाटते. थोडे भय, थोडी अनुकंपा अशा भावना चाळवणारे असे हे चार अनाथ मुलांच्या धाडसाबद्दलचे पुस्तक आहे. देण्याआधी आधी हवे तर तुम्हीच वाचून बघा असे सुचवेन. बहुतेक नक्की आवडावे.
अजून माझ्या मुलीला आवडलेले पण तुमच्या समकालीन असण्याच्या अटीत न बसणारे पुस्तक म्हणजे दी फँटम टोलबूथ. बरेच जुने आहे - म्हणजे ५० वर्षे जुने. http://www.amazon.com/Phantom-Tollbooth-Norton-Juster/dp/0394820371
'लॉर्ड ऑफ द रींग'
'लॉर्ड ऑफ द रींग' देखील उत्तम आहे.
माझ्या लहानपणी टोलस्टोय च्या एका पुस्तकातील कथा आठवते 'little match girl', अतिशय उत्तम कथा. (तुम्हाला जुने लेखक नको आहेत हे माहित आहे, तरी एक आठवण म्हणून सांगत आहे)
होय
'little match girl', अतिशय उत्तम कथा आहे. मी जेव्हा वाचली तेव्हा अंतर्बाह्य हेलावले. मला ती कथा खूपदा आठवते. चिरंतन मूल्य असलेली अतोनात करूण कथा आहे.
अँडरसन
द लिटल मॅच गर्ल ही हान्स ख्रिस्तिअन अँडरसनची कथा आहे.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
खरेच की
खरेच की, बहुदा माझ्याकडे हे पुस्तक होते म्हणून मला टॉलस्टॉय हा लेखक वाटला.
मर्यादा उघडी पडली
धाग्यात काहिच मदत करता येत नसल्याने (खरंतर उगाचंच) खट्टु झालो आहे.
माझं वाचन दांडगं नसलं तरी मला नेहमी वाचायला कहितरी लागतं.. त्यामुळे वाचनाशी संबंधित धागा बघुन आनंदाने उघडला.
मात्र अचानक जाणवले की लहान मुलांनी वाचावे असे हॅरी पॉटर सोडल्यास एकही इंग्रजी पुस्तक डोळ्यासमोर येत नाहि :(
या धाग्याच्या निमित्ताने माझ्या वाचनाची एक फार मोठी मर्यादा उघडी पडली. (त्याबद्दल आभार :) )
या वयोगटासाठी मराठी पुस्तकं बरीच माहित आहेत.. मात्र तो चर्चाविषय नाही :(
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
आणखी काही
ही पुस्तके कोणत्या वयोगटासाठी चालतील, ते मला सांगता येणार नाही. पण फँटसी जॉर मधली मला आवडलेली पुस्तके पुढीलप्रमाणे-
१- द नेव्हरएंडिंग स्टोरी- मायकेल एंडं (मूळ भाषा जर्मन पण इंग्रजी अनुवाद उपलब्ध)- एक्झॉटिक वाटतील अशा यातल्या कल्पना.
२- इंकवर्ल्ड ट्रिलजी- कॉर्निलिया फुंकं (मूळ भाषा जर्मन पण इंग्रजी अनुवाद उपलब्ध)- पुस्तकातली पात्रे खर्या जगात येतात अशी भन्नाट कल्पना.
३- द नेम ऑफ धिस बुक इज सिक्रेट- स्युडोनिमस बॉश- नॅरेशन अप्रतिम, हे पुस्तक माझ्या लहानपणी मला वाचायला मिळालं असतं तर, असं वाटून गेलं.
४- बॅटल ऑफ द सन- जिऍनेट विंटरसन. 'टँगलरेक' याचा हा दुसरा भाग आहे, पण ते वाचलेले नाही. या पुस्तकातही फारच वेगळ्या कल्पना आहेत.
५- इन्हेरिटन्स सायकल- क्रिस्टोफर पाओलिनी. ह्या ड्रॅगन्स बद्दलच्या पुस्तकमालिकेतलं पहिलं पुस्तक लिहिताना त्याचा लेखकच खुद्द १५ वर्षांचा होता.
शेरलॉक होम्स, हॅरी पॉटर ही पुस्तके काही वेगळी सुचवायला नकोत.
अर्चना
इंक्वर्ल्ड ट्रिलजी वरून आठवलं...
जॅस्पर फोर्ड ची थर्स्डे नेक्स्ट् मालिकावाचली आहे का? यातही पुस्तकातील पात्रं "खर्या" जगात येतात, या जगातल्या काही लोकांना "बुक् जंपिंग्" करून पुस्तकांच्या जगात जाता येतं. सगळं काही व्यवस्थित ठेवायला "लिटररी डिटेक्टिव्" असतात. थर्स्डे नेक्स्ट् ही अशीच एक साहित्यिक गुप्तहेर असते. नवीन उघडकीला आलेल्या शेक्स्पियर नाटकांच्या प्रती अस्सल आहेत की नाही, या पासून वेगवेगळ्या पुस्तकांतली पात्रं त्यांच्या रेखाटणी प्रमाणेच चालत-बोलत आहेत की नाही हे सगळे पाहत असते.
पुस्तकं खरंच भन्नाट आहेत्, पण भयानक मजेदार आणि विनोदी. इंग्रजी साहित्याला, एकूणच साहित्य या कल्पनेला, त्याच्यातल्या तन्मय करणार्या शक्तीला लिहीलेले एक सुंदर प्रेमपत्र. ज्यांना शेक्स्पियर किंवा १९व्या शतकातले विक्टोरियन साहित्य आवडते त्यांच्यासाठी तर खास् ट्रीट, पण निव्व्ळ विनोदी रहस्यकथा वा फॅन्टसी म्हणून ११-१२ वर्षांच्या मुलांनाही ती आवडण्या सारखी आहेत.
फोर्ड् यांची अजून अनेक पुस्तके आहेत्, पण मी (अद्याप) वाचलेली नाही.
द नेम ऑफ दिस बूक इज सिक्रेट
द नेम ऑफ दिस बूक इज सिक्रेट ही सुद्धा ट्रिलजी आहे वाटतं. चांगली आहे, १०-१२ वयोगटातील मुलांना आवडेल अशी. माझ्या घरी आहेत हे भाग. नक्की घ्यावेत असे. विसरूनच गेले होते.
घेते आहे
"द नेम ऑफ दिस बूक इज सिक्रेट " ऍमेझॉनवरून घेते आहे. मुलीने पहीला धडा वाचला (बार्नस अँड नोबल्स) मध्ये आणि तिला आवडला.
शेरलॉक
शेरलॉक होम्स
जस्ट विलियम सिरीजची पुस्तकं
धन्यवाद आणि अजून काही प्रश्न
सुचवलेली काही पुस्तकं कोपर्यावरच्या 'इंडी' दुकानात सापडली. काही मागवली आहेत. याशिवाय इतर काही लेखकांची नावं मिळाली आहेत. त्यांविषयी काही माहिती/मतं मिळाली तर आवडेल.
Noughts & Crosses - Malorie Blackman
Postcards From No Man's Land - Aidan Chambers
The Curious Incident of the Dog in the Night-Time - Mark Haddon
Skellig - David Almond
इतर काही लेखकः
Christine Nöstlinger
Tomi Ungerer
M. E. Kerr (Marijane Meaker)
Beverly Cleary
Nina Bawden
आता मला पडलेला एक मूलभूत प्रश्नः
मंकी किंग आणि विम्पी किड असे एखाददुसरे अपवाद सोडता बाकी बरीचशी पुस्तकं ही फार गडद छटेतली वाटतात ('डार्क'). आनंदी, गंमतशीर, गोड असं फारसं काही आढळत नाही. 'आउटसायडर्स', 'हंगर गेम' किंवा वर माझ्या यादीत असलेली काही पुस्तकं तर ३०-३५ वर्षांपूर्वी प्रौढांसाठीच्या पुस्तकांत गणली गेली असती. याबद्दल हरकत अर्थात नाही (कारण मुलांना ती आवडतात हे वास्तव आहे), पण मग मला असा प्रश्न पडला की मुलांचं जग आता अधिक गडद झालं आहे म्हणून अशी पुस्तकं त्यांना आवडतात का? की त्यांच्या आवडी पूर्वीहून अधिक प्रौढ झाल्या आहेत? की यामागे काही वेगळं कारण आहे? जर वयोगट किंचित खालपर्यंत नेला (८ ते १२ वर्षं) तर काही फरक पडेल का?
असो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि अजून थोडी हलकीफुलकी पुस्तकं सुचवता आली तर कृपया सुचवावी, ही विनंती.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
आउटसायडर्स आणि हंगर गेम्स
आय ऍम नं ४, ट्वायलाइट या पेक्षा कमी गडद आहेत ही पुस्तके असे आपले मला वाटते. :-)
मला जेव्हा माझ्या मुलीने हंगर गेम्सची रूपरेषा सांगितली तेव्हा मला ती फारशी आवडली नव्हती. ("कै च्या कै काय वाचता तुम्ही पोरं?" असा प्रश्न मी विचारला होता.) आउटसायडर्स तर तिला शाळेतून वाचायला लावले होते. त्याचा गोषवारा तर आणखीच "बोल्ड" वाटला. म्हणूनच मी म्हटले की मुले ११-१२ वर्षांची असली तरी त्यांना आपण टीनएजर्स झालो आहोत असे वाटते; वाचन १४-१५ वर्षांच्या मुलांचे चालते. तसेच आपली आवड आणि त्यांची आवड (किंवा निकष) हे सारखे नाहीत.
त्यांच्या आवडी आपण आपल्या त्या वेळच्या आवडींशी मॅच करू शकत नाही. त्यांना मिळणारे एक्सपोजर (मराठी गंडलंय, माफ करा) इतकं अधिक आहे की त्यांच्या आवडी वेगळ्या असणे अगदी शक्य आहे.* एक उदा. म्हणून आपल्या लहानपणी येणारे चित्रपट आठवा, आता येणारे आठवा. हेच गाण्यांबाबत. दृकश्राव्य माध्यमे अधिक प्रौढ झाली आहेत हे नाकारता येत नाही.
एकंदरीत माझा अनुभव असा आहे की मुले सर्वसाधारणतः आपल्या वयापेक्षा २-३ (कदाचित ३-४) वर्षांनी अधिक असणार्या साहित्यात अधिक रूची घेतात. एखाद्या १३-१४ वर्षांच्या मुला/ मुलीला विचारा की "तुला हॅना मॉन्टॅना (पात्र किंवा शो; जे ट्वीनेजर्ससाठी बनवलं गेलं आहे.) आवडते का?" ते तुमच्याकडे तिरस्काराने पाहून "आर यू किडींग मी?" असे नक्की विचारतील पण हाच प्रश्न एखाद्या ८-९ वर्षांच्या मुलाला हाच प्रश्न विचारा; उत्तर "हो" किंवा "नाही" असे येण्याची शक्यता अधिक आहे.
नक्कीच पडेल. :-)
द नेम ऑफ दिस बूक इज सिक्रेट हे माझ्यामते हलके फुलके पुस्तक आहे. (नक्की आठवत नाही, घरी विचारून सांगेन किंवा अर्चना सांगू शकतील.) मला त्या पुस्तकाची आठवण झाली नाही कारण बहुधा वयाच्या १० वर्षी ते आमच्याकडे वाचले गेले होते.
----------
* खरेतर मुले वाचतात का हाच एक मोठा प्रश्न आहे. (वाचते बॉ माझी लेक कधीतरी, काहीतरी) पण टीव्ही, आयपॉड, आय पॅड, वी, एक्सबॉक्स, डीएस आणि हो ते टकाटक टकाटक एसएमएस पाठवणे वगैरे करून वाचायला वेळ उरतोच कधी?
सहमत
हे खरंच आहे आणि म्हणूनच अशी पुस्तकं यादीत येण्याविषयी हरकत नाहीच (उलट तसं न करणं वास्तवाशी फारकत घेणं होईल) म्हणून मी 'हंगर गेम्स' आणि 'आऊटसायडर्स' काल घेऊनही टाकली. पण मग हलक्या-फुलक्यातलं मुलांना काय आवडतं असा प्रश्न पडला, हे मात्र खरं.
जर वयोगट ८ वर्षांपर्यंत खाली नेला तर कोणती पुस्तकं 'आत' घ्याल ते थोडं विस्तारानं नक्की सांगा.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
हलकीफुलकी
तुमची बॅग अजून नक्की हलकीच आहे का? :)
ऑन अ सीरीयस नोट, मुलांना सगळ्या प्रकारची पुस्तके वाचू द्यावीत. लहानपणी मी फास्टरफेणे आवडीने वाचत असे. त्याप्रकारचे धाडस मला मी सुचवलेल्या मीस्टीरीयस बेनेडिक्ट सोसायटीत सापडले. पुस्तक भलतेच पकड घेणारे आहे. ते वाचताना आपण जड, अर्थबंबाळ वाचतो आहोत असे मुलांना वाटायची वेळ येणार नाही बहुतेक. तरी मोठ्यांना आणि मुलांना अर्थ जाणवतील पण अंगावर येणार नाहीत. निदान ११-१२ वर्षाच्या भरपूर वाचायची आवड असलेल्या मुलांना तरी येणार नाहीत.
तुम्ही वयोगट ८-१० असा आणलात तरी वरील दोन पुस्तके आमच्या मुलीने ९ व्या वर्षी वाचलेली आहेत. (योलेनचे सोडून, ते दहाव्या वर्षी शाळेत वाचलेले आहे.)
Beverly Cleary ची रमोना सीरीज छान आहे.
भारतातल्या मुलांनी लहानपणी डॉ. सूस वाचलेले असते का याची मला कल्पना नाही, पण नसल्यास थोडी लहान मुलांची वाटली तरी डॉ. सूसची काही पुस्तके वाचावीत असे मला वाटते.
कवितांमध्ये हे पुस्तक आमच्याकडे आहे. फारच छान कविता आहेत.
http://www.amazon.com/Wrinkle-Time-Madeleine-LEngles-Quintet/dp/03123675... हेही एक चांगले पुस्तक आहे.
क्यूरियस इन्सिडन्ट
"द क्यूरियस इन्सिडन्ट ऑफ द डॉग इन् द नाइटटाईम" हे पुस्तक मी वाचलेले आहे.
पुस्तकात आख्यान सांगणारे पात्र म्हणजे एक ऍस्पर्गर, किंवा त्याहून अधिक गंभीर असा, ऑटिझम असलेला मुलगा आहे. अनेक बाबतीत हा मुलगा हुशार आहे. परंतु अन्य व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जगाकडे बघण्याचे त्याचे भावनिक इंद्रिय अधू असते. स्वार्थासाठी का होईना, हे कौशल्य आपापसात व्यवहार करताना जरुरीचे असते.
"पण कुत्रा भुंकला नाही, ही बाब विचित्र आहे, कळीची आहे" अशा धर्तीचा शरलॉक होल्म्सच्या एका कथेतील* संवाद आहे. तो या कादंबरीच्या नावाचा संदर्भ आहे.
कुत्रा कोणी मारला त्याच्या रहस्याचा उकल - हे आख्यान सांगणार्या पात्राच्या दृष्टीने कादंबरीचे प्रमुख कथानक आहे. पण वडील, आई आणि शेजारी यांच्या वर्तनाचा भावनाशून्य पंचनामा मुलगा देतो. त्याच्या रहस्यभेदाच्या कथानकात सुसंबद्ध असलेले हे तपशील व्यक्तीची आंतरिक प्रेरणा शोधणार्या आपल्या दृष्टीने कमालीचे गोंधळलेले वाटतात. तशा आख्यानातून ती तुटक पात्रे भावनांसकट निर्माण करणे, त्यांची आंतरिक प्रेरणा तुकड्यांच्या कोड्यासारखी स्वतःसाठी समजून घ्यायची, हे वाचकाने उकलण्यासाठीचे रहस्य आहे.
११-१२ वर्षांच्या मुलासाठी हे पुस्तक सुयोग्य आहे.
(त्या वयात मी फॉल्कनरचे "द साउंड अँड द फ्यूरी" वाचायचा प्रयत्न केला होता. सपशेल फसलो होतो. त्या अभिजात कादंबरीऐवजी ही वाचायला हवी होती. मग पुढे कधीतरी "साउंड अँड फ्यूरी" उचलायचा प्रयत्न करायला हवा होता.)
*"Is there any point to which you would wish to draw my attention?" "To the curious incident of the dog in the night-time." "The dog did nothing in the night-time." "That was the curious incident," remarked Sherlock Holmes. ("सिल्व्हर ब्लेझ" कथेमधून)
(चिंज : माझ्याकडची प्रत उद्यापर्यंत शोधायचा प्रयत्न करतो.)
वा!
मला कथा आठवत नव्हती, पण पुस्तकाचं नाव वाचताच होम्सचा संदर्भ लागला होता. स्वतः होम्सला Asperger's असण्याची शक्यता पूर्वी वाचल्याची आठवते, त्यामुळेदेखील पुस्तक रोचक वाटतं आहे. एकंदरीत माझ्या निकषांत पुस्तक फिट्ट बसेल असं आता तरी वाटतं आहे.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
एक जुनेच सुचवतो
मुलांना क्रिकेटचे प्रेम असेल तर वुडहाऊसचे 'माईक' कदाचित आवडावे. मला साधारण १४-१५ च्या वेळी आवडले होते.
-Nile
वाचु आनंदे
'वाचु आनंदे' भाग १-४ ही पुस्तके मराठी साहित्याची ओळख करुन देण्यास फार छान आहेत.
एक प्रश्न
एक प्रश्न पडला:
जरी ती मुले कितीही (तथाकथित) 'अमेरिकनाळलेली' असली तरी त्यांना तुम्ही मराठी पुस्तके न देण्याचे कारण काय असावे?
त्यांना मराठी वाचताच येत नाही की त्यांनी मराठी वाचलेले त्यांना (व / किंवा) त्यांच्या घरच्यांना आवडत नाही?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
'मराठी' प्रश्नाचं सोपं उत्तर
ज्या पार्श्वभूमीच्या कुटुंबांविषयी ही मागणी आहे त्यांना मराठी पुस्तकांच्या शिफारशीसाठी माझी गरज नाही. 'वाचू आनंदे', फास्टर फेणे वगैरेंचा कधीच फडशा पाडून झालेला आहे. इंग्रजीतल्या अभिजात साहित्याविषयीही हेच म्हणेन. समकालीन परकीय साहित्याविषयी मात्र बाहेरून अशी मदत लागते. उदा. अमेरिकास्थित अनेकांनी आपापल्या मुलांच्या अनुभवांवर आधारित जी पुस्तकं धाग्यात वर सुचवलेली आहेत ती या मुला-पालकांना परिचित नाहीत.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
भारत् -भारती पुस्तक माला
काही संस्कारक्षम साहीत्य् वाचायचे असेल् तर भारत-भारती ची पुस्तके हिन्दी , इन्ग्रजी आणि मराठीत् देखिल उपलब्द्ध् आहेत्.
या पुस्तकांच्याद्वारे काही महान् भारतीयांची ओळख करुन् देण्यात् आली आहे. ( काही नावे मराठी लोकाना अपरी चीत् आहेत् जसे की.. राणी चेनम्मा, नारायण् गुरु, इत्यादी ) एकूण् ५०० महान् भारतीलय् लोकांची चरित्रे या मालिकेद्वारे उलालब्ध् आहे.
प्रकाशक् बंगळूर् चा आहे.
पुस्तके अमेरीकेत् हवी असतील् तर् - tabhaym@rediffmail.com याना मेल् करा.
धन्यवाद्
-विटेकर्
-------------
आपणांस् आहे मरण / म्हणून राखावे बरवे पण //
मुलांच्या पुस्तकांतल्या गडद छटा
याच विषयावर वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये काही महिन्यांपूर्वी एक लेख आला होता आणि त्यावर इंग्रजी आंतरजालात प्रतिक्रियांचा खच पडला, असं नुकतंच वाचनात आलं. या धाग्याच्या अनुषंगानं लोकांना ते मुळातून वाचायला कदाचित आवडेल म्हणून काही दुवे देत आहे:
मूळ लेखः डार्कनेस टू व्हिजिबल
गार्डिअनच्या पुस्तक विभागात यावर व्यक्त झालेली काही मतं इथं वाचता येतीलः
http://www.guardian.co.uk/books/2011/jun/07/teen-fiction-accused
http://www.guardian.co.uk/commentisfree/2011/jun/08/teen-fiction-dark-yo...
या संदर्भात ट्विटरवर #YASaves हा टॅग काही काळ 'ट्रेंडिंग' होता. त्यावरही शोध घेता येईल.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||