संगणकाविषयी नवी जालनिशी(मराठीतून)

माधव शिरवळकर हे नाव आता संगणक क्षेत्रात असलेल्या लोकांचे परिचयाचे झालेले आहे. तर ह्याच माधवरावांनी आता http://sanganaktoday.blogspot.com ह्या नावाने जालनिशी उघडली आहे. त्यासंबधीचा परिचय 'नील वेबर' ह्यांनी ह्या वेळी महाराष्ट्र टाईम्स मधे करून दिलाय. अतिशय उपयुक्त अशी ही जालनिशी आहे असे माझे स्वतःचेही मत बनले आहे. मटा मधील लेखाचा हादुवा आहे. ह्या जालनिशीला जरुर भेट द्या.

Comments

उपक्रमावर

शिरवळकरांना त्यांच्या ब्लॉगसोबत उपक्रमावर लिखाण करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी संपादक मंडळ, उपक्रमराव वगैरे प्रयत्न करतील का?येथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.

मस्तच..

शिरवळकरशेठचा ब्लॉग मस्तच आहे. आमच्यासारख्या संगणकाची काहीच माहिती नसलेल्या लोकांकरता खूप उपयोगी वाटतो..

तात्या.

ता क - 'खूप उपयोगी वाटतो' असं म्हणण्याऐवजी 'खूप माहितीपूर्ण वाटतो' असं लिहिणार होतो. पण गोलमाल या चित्रपटात उत्पल दत्त साहेबांना जसा 'जुडवा' या शब्दाचा वीट आला होता तसा आता आम्हाला 'माहिती' या शब्दाचा वीट आला आहे! ;)

सुंदर/अभिनंदन

सुंदर आहे माधव शिरवळकरांची अनुदिनी. मटामध्ये बातमीबद्दल त्यांचे अभिनंदन!

कालच..

मी कालच या अनुदिनीला भेट दिली. त्यांचे लिखाण उत्तम आहे. त्यांना मेल सुध्दा टाकला. त्यांच्या लेखात एकाजागी एका उत्तम संकेतस्थळाचा दुवा सापडला जो मी कालच उपक्रमवर दिला आहे.

नीलकांत

सुरेख

छान दुवा आहे. इथे दिल्याबद्दल धन्यवाद. तंत्रज्ञानाशी संबंधित मराठीत इतकी सुरेख माहिती मिळणे दुर्लभ असते. तंत्रज्ञानामध्ये मराठीत लिखाण होत नाही अशी नुसती ओरड करण्यापेक्षा अशा कृतीने उत्तर देणे हाच योग्य उपाय आहे.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

 
^ वर