राज पुरोहीताची पाणीपुरी

पाणीपुरीवाल्याचे लघुशंका करताना एका मुलीने चित्रण केले म्हणून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा गलिच्छ प्रकार नुकताच भाजपचे मुंबई अध्यक्ष राज पुरोहीत ह्यांनी केला;

बातमी:
http://www.mid-day.com/news/2011/may/060511--Ankita-Rane-paanipuriwallah...

हिंदूत्वाच्या मुद्यावर उभा असलेला हा पक्ष किती टाकाऊ आहे हे ह्यातुन दिसुन येते. मागेही मुंबईत एका मुलीवर पोलीसाने बलात्कार केल्याच्या घटनेवर, ' आमच्या काळी मुली अश्या चौपाटीवर फिरायच्या नाहीत' असे वक्त्यव्य भाजपा नेत्याने केले होते. वरील घटनेने मात्र कहर केला आहे.

भाजपासारख्या पक्षांची ही गंज लागलेली विचारसरणी भारताच्या प्रगतीतील मोठा अडसर आहे.

भाजपाचा महिला मोर्चा झोपला आहे का? कोल्हापूरच्या गाभाऱ्यात प्रवेशासाठी आंदोलने करणार्‍या नीता केळकर कुठे आहेत?

Comments

स्टार माझा

कालपासून यावर टीव्हीवर जोरदार कार्यक्रम सुरू आहेत. स्टार माझा वर मनसेचे बाळा नांदगावकर शिवसेना स्टाइल बोलले. लेखिका कविता महाजन यांनी आणि राजीव खांडेकर यांनी जबर विखारी टीका केली. महाजनबाईंनी तर पुरोहितांनी लाज असेल तर स्वतःहून राजीनामा द्यावा असे म्हटले. त्यानंतर भाजपने कारवाई करावी असे म्हणणार्‍यांनी महाजनबाईंना मम म्हटले. आज भाजप महिला आघाडीने हे पुरोहितांचे 'व्यक्तिगत मत' आहे असे म्हटले. ( मग उद्या त्यांनी बलात्कार केला तर तोही व्यक्तिगत ठरेल का म्हणे!) नंतर निलम गोरे काहीतरी थातूरमातूर बोलल्या. बाकी कोणतीही महिला संघटना काही बोलली नाही. ( अस्तित्वातच नाही तर काय बोलणार म्हणे.) ठाणे आणि नगरमध्ये पुरोहितांना प्रवेशबंदी झाली. पाहूया आता उद्या काय होते ते. स्टार माझा च्या व्हीडीओ क्लीप ऑनलाईन पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्या सोयीच्या वेळेनुसार पाहता येते हे चांगले आहे. खांडेकर फारच जबरी बोलले. ते ऐकलेच पाहिजे.

पाणीपुरीवाल्याचे गिर्‍हाईक

राज पुरोहित पाणीपुरीवाल्याचे गिर्‍हाईक असण्याची शक्यता आहे. आता पोटशूळ झाला असेल. ;-)

http://starmajha.starnews.in/videos/mumbai/5006-2011-05-05-12-38-51

हा विडिओ आताच मिपावरील एका लेखात मिळाला.

:)

'त्या' पाणीपुरीवाल्याचे गिर्‍हाईक??? :)

अतिशय बेजबाबदार विधान, राज पुरोहीतानांच 'ती' पाणीपुरी खायला घालायला हवी होती.

बाकी अभिव्यक्तीवाले ह्याच्याविरोधात काय म्हणतात हे बघुयात. ;)

खाई त्याला खवखवे

आता यात काय बेजबाबदार बरे? :-(

राज पुरोहित हे पाणीपुरीवाल्याचे गिर्‍हाईक असतील म्हणजे पाणीपुरी विकत घेऊन खाणारे, म्हणजेच ती पाणीपुरी त्यांनी आधीच खाल्ल्याची शक्यता असल्याने "खाई त्याला खवखवे" होत असावे. ;-)

तुमचे नाही पुरोहितांचे बेजबाबदार विधान.

अहो, तुमचे नाही पुरोहितांचे बेजबाबदार विधान.

>>राज पुरोहित हे पाणीपुरीवाल्याचे गिर्‍हाईक असतील म्हणजे पाणीपुरी विकत घेऊन खाणारे, म्हणजेच ती पाणीपुरी त्यांनी आधीच खाल्ल्याची शक्यता असल्याने "खाई त्याला खवखवे" होत असावे. ;-)

हॅहॅहॅ...बरोबर.

तुमची विधानेही अजबच...

<<हिंदूत्वाच्या मुद्यावर उभा असलेला हा पक्ष किती टाकाऊ आहे हे ह्यातुन दिसुन येते. मागेही मुंबईत एका मुलीवर पोलीसाने बलात्कार केल्याच्या घटनेवर, ' आमच्या काळी मुली अश्या चौपाटीवर फिरायच्या नाहीत' असे वक्त्यव्य भाजपा नेत्याने केले होते. >>

सर्वप्रथम मी भाजपचा समर्थक/प्रशंसक/कैवारी नाही, हे नमूद करतो.
पण पक्षाचा एखादा नेता किंवा कार्यकर्ता अर्वाच्च बोलला म्हणजे पक्ष कसा टाकाऊ ठरु शकतो, हे मला समजले नाही.

राजीव खांडेकरचा माझा परिचय आहे, पण तरीही मी म्हणेन, की 'स्टार माझा'च्या संपादकाकडून भाजप पक्षाला शिव्या देण्याची अपेक्षा नव्हती. पुरोहित तर बोलून चालून महामूर्ख आहे. आपण काय बोलतोय, याचेही त्याला भान नव्हते. पण राजीवला विनाकारण भाजपवर घसरायचे काही कारण नव्हते.

आज प्रत्येक पक्षाचेच नेते/आमदार/कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्यातरी प्रकरणात बदनाम होताना दिसतात. त्यावरुन एकदम तो पक्ष टाकाऊ ठरतो का? एकीकडे याच भाजपचे खडसे विरोधी पक्षनेत्याची भूमिका आक्रमकतेने निभावताहेत, देवेंद्र फडणवीससारखे आमदार मुद्देसूद बोलताहेत, नीता केळकरसारखी महिला आक्रमक कृतीचे निदर्शक आहे. अशा वेळी एका मूर्खाच्या बेताल बडबडीचे पातक त्याच्या पक्षाला का चिकटवायचे?

बंगारु लक्ष्मण पैसे घेताना सापडल्यावर कुणीतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना विचारले असता ते म्हणाले, की शाळेतील सगळेच विद्यार्थी पास होत नाहीत. पण काही नापास विद्यार्थ्यांचा दोष शाळेला देऊन चालत नाही. आमचाही विद्यार्थी नापास झाला त्याला काय करणार?'

असो. राज पुरोहितही नापास विद्यार्थ्यांमधील एक आहे. असे लोक पक्षाला अडचणीत आणत असतात. भाजपने अशा बेताल वाचाळांना पाठीशी घालू नये, ही माझी अपेक्षा.

सहमत

--पण पक्षाचा एखादा नेता किंवा कार्यकर्ता अर्वाच्च बोलला म्हणजे पक्ष कसा टाकाऊ ठरु शकतो, हे मला समजले नाही.
+ १ सहमत आहे.

सहमत

मीही सर्वप्रथम मी भाजपचा समर्थक/प्रशंसक/कैवारी नाही, हे नमूद करतो.

बंगारु लक्ष्मण पैसे घेताना सापडल्यावर कुणीतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना विचारले असता ते म्हणाले, की शाळेतील सगळेच विद्यार्थी पास होत नाहीत. पण काही नापास विद्यार्थ्यांचा दोष शाळेला देऊन चालत नाही. आमचाही विद्यार्थी नापास झाला त्याला काय करणार?'

सहमत आहे.

हमाल मुलगा
(हो मला झुरळ असण्याचा अभीमान आहे.)

राज-पाणी पुरी

राजकारण करतांना तरी जाहीरपणे आपल्या लोकांची बाजू घ्यायची असते हे राज-पाणी पुरी वरुन दिसते. मराठी लोकांची बाजू घ्यायला गेलेल्या पक्षांना हिंदी च्यानेलवाल्यांनी गुंडगिरी म्हणून दाखवले आहे.

वेगळा मुद्दा

राज पुरोहितांचे वक्तव्य मूर्खपणाचे आणि गैर आहे. मात्र या दरम्यानची पार्श्वभूमी समजली पाहिजे. पण ते अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या बाहेरचे आहे की नाही हे मला नक्की सांगता येत नाही. (नीटसे ऐकले नाही)

एके दिवशी ठाण्यातील रस्त्यावरील भेपुपापु वाल्यांवर मनसेने हल्ला चढवला. बर्‍याच ठिकाणी त्यांचा धंदा बंद करवला. निमित्त एकजण लघुशंका करताना चित्रीत झाला याचे. या हल्ल्यात सर्व जण आणि मुद्दाम असे करतात असा भास घडविला होता. फक्त ठाण्याचे इतर गावातले नाही असे ही होते. या आंदोलनाविरुद्ध पोलिस कारवाई झाल्याचे मला माहित नाही.

खरा संघर्ष उ.प्र.-बिहार मधून आलेले आणि मनसे (त्यातही मनसे-शिवसेना हा मूळ संघर्ष) हा आहे. राज पुरोहित त्यांची कॉन्स्टिट्युअन्सी सांभाळित होते. बोलताना ज्या भेळवाल्याविरुद्ध तक्रार आली त्याच्या बद्दल ते बोलत होते. हा माणूस एक रस्त्यावर काम करणारा आहे. वयस्क (७०). वगैरे गोष्टी ऐकल्या. वादग्रस्त विधान यानंतरचे.

मला जी गोष्ट जाणवली ती म्हणजे ठाण्यात जवळपास कित्येक कि.मि. परिसरात सार्वजनिक मुतारी नाही. वाढत्या शहरामुळे रस्त्यावरचे आडोसे कमी होत चालले. अशा वेळी रस्त्यावर काम करणार्‍यांची मोठी पंचाईत होत असते. भेळवाल्यांची तर जास्त होतच असणार. रिक्षेवाले मुद्दाम मुतारी/आडोश्यांपर्यंत रिक्षा घेऊन जातात.

हे इतर प्रश्न, राज पुरोहितांच्या वाक्याएवढेच वा त्याहून जास्त, गंभीर आहेत.

प्रमोद

योग्य खंडन

--मला जी गोष्ट जाणवली ती म्हणजे ठाण्यात जवळपास कित्येक कि.मि. परिसरात सार्वजनिक मुतारी नाही. वाढत्या शहरामुळे रस्त्यावरचे आडोसे कमी होत चालले. अशा वेळी रस्त्यावर काम करणार्‍यांची मोठी पंचाईत होत असते. भेळवाल्यांची तर जास्त होतच असणार. रिक्षेवाले मुद्दाम मुतारी/आडोश्यांपर्यंत रिक्षा घेऊन जातात.

अगदी योग्य खंडन, प्रमोदजी.

पण दुखरा मुद्दा तोच आहे. - भारतीयांची संशोधक वृत्तीशी घेतलेली फारकत. रस्त्यावरील धंदेवाल्यांना त्यांचा स्टॉल सोडून जाता येत नाही अशा वेळेस त्यांना बायोब्रेक घेता येत नाही. ह्यावर एकमेव उपाय मुता-या होऊ शकत नाही. हाच प्रश्न मेरीकेत आला असता तर तेथील गो-या लोकांनी लगेच काहीतरी शक्कल काढून मुता-यां व्यतिरीक्त पर्याय दिला असता.

अमेरिकेतील मुतार्‍या

ज्या ठिकाणी स्थायी स्वरूपाची स्वच्छतागृहे बांधणे शक्य नसते अशा अनेक ठिकाणी हलवता येण्यासारखी स्वच्छतागृहे ठेवलेली मी अमेरिकेत बर्‍याच ठिकाणी बघितलेली आहेत. या क्षणी चटकन स्मरणात येते आहे ते यॉसेमिटी नॅशनल पार्क मधल्या ग्लेशियर पॉइंट वरचे स्वच्छतागृह. फायबर ग्लासच्या केबिन सारखी ही स्वच्छतागृहे असतात. पुणे महानगरपालिकेकडे अशी स्वच्छतागृहे आहेत. मंबई महानगरपालिका अशी स्वच्छतागृहे सहज रित्या विकत घेऊन चौपाटी सारख्या ठिकाणी ठेवू शकते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अमेरिकेची तुलना

अमेरिकेची तुलना इथे करता येणार नाही. इथे पुण्यात मंडईत घाणेरड्या स्वच्छतागृहातील नळाचे पाणी पाईप लाउन भाजीवर मारले जाते. इथे महापालिकेकडे मोबाईल टॉयलेटस् आहेत पण तिचे व्यवस्थापन कायमस्वरुपी ठेवणे अत्यंत अवघड. कारण तीन दिवसांच्या कार्यक्रमापुरती व्यवस्था केली तरी ती कशी बोंबलते हे मी पहातो.
मोबाईल टॉयलेटचे पाणी इथे पाणीपुरी साठी वापरले जाईल.
प्रकाश घाटपांडे

धंदा बसणार

तिकडे काहीही असो, पाणिपूरीवाल्याचा धंदा बसणार हे नक्की. बाकी चालू द्या.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

तारतम्य

अतिशयोक्ती केली नाही तर आपला मुद्दा गांभीर्याने घेतला जाणार नाही असे दोन्ही पक्षांना वाटत असावे असे मला वाटते.
पाणीपुरीवाल्याने पाणीपुरीच्या पाण्यासाठी मुद्दाम मूत्र वापरले असावे असे मला वाटत नाही. मुतारी उपलब्ध नसल्यामुळे (गाडीकडे लक्ष देण्यास कोणीही नसताना मुतारीत जाणे शक्य नसल्याने) त्याने लोट्यात मूत्रविसर्जन केले असावे आणि तो लोटा पुरेसा* स्वच्छ न करताच त्याने ग्राहकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरला असावा असे मला वाटते. (किंबहुना, जर ही त्याची नेहमीचीच अडचण असेल तर त्याने वेगळ्या बाटलीची सोय ठेवणेच उचित होते.) मात्र, त्या मुलीने (किंवा, तिने ज्यांना चित्रफीत दिली त्यांनी) संयत चित्र न उभारता, विकृत रंग दिला/येऊ दिला. पूर्वनियोजित चित्रीकरण करताना, तो लोट्याचे पुढे काय करतो त्याचेही चित्रण करण्याची काळजी घेणे आवश्यक होते (तशी चित्रफीत प्रथमपासूनच उपलब्ध असल्यास हा प्रतिसाद रद्द समजावा). तरीही, तांत्रिकदृष्ट्या त्यांनी कोणताही सत्यापलाप केलेला नसल्यामुळे, फारतर, 'पुरेशा पुराव्याअभावी, संशयाच्या फायद्याने पाणीपुरीवाल्याला कायदेशीर कारवाईतून सोडून देणे' इतकीच 'शिक्षा' मनसेला देता येईल.
दुसरीकडे, पुरोहित यांनीही त्या मुलीवर/मनसेवर 'संपूर्ण सत्य प्रसिद्ध करण्यात हलगर्जी करणे' इतकाच आरोप न करता बेलगाम वक्तव्ये केली. पुरोहित यांच्यावर एक करोड रुपये नुकसानभरपाईची आणि/किंवा फौजदारी गुन्ह्याची तक्रार आहे ती योग्यच वाटते. 'शिप गोज डाऊन विथ कॅप्टन' या न्यायाने, भाजपही काही प्रमाणात दोषी आहे ;)

* Everytime you drink a glass of water, the odds are good that you imbibe at least one molecule that passed through the bladder of Oliver Cromwell. - रिचर्ड डॉकिन्स

सहमत

सहमत.

>>(तशी चित्रफीत प्रथमपासूनच उपलब्ध असल्यास हा प्रतिसाद रद्द समजावा).
तशी चित्रफीत मात्र उपलब्ध आहे, लोटा न धुताच लोकाना पाणी पिण्यासाठी ठेवला आहे असे फितीमध्ये दिसते आहे (त्यात कोणी पाणी कसे पिउ शकेल ह्याचे आश्चर्य वाटते).

"राज"कारण्यांच्या तावडीत

मुलीने (किंवा, तिने ज्यांना चित्रफीत दिली त्यांनी) संयत चित्र न उभारता, विकृत रंग दिला/येऊ दिला. पूर्वनियोजित चित्रीकरण करताना, तो लोट्याचे पुढे काय करतो त्याचेही चित्रण करण्याची काळजी घेणे आवश्यक होते (तशी चित्रफीत प्रथमपासूनच उपलब्ध असल्यास हा प्रतिसाद रद्द समजावा)

त्या मुलीचे वय बघता, माझ्यामते तिने जसे तिला सुचले आणि जसे शक्य झाले तसे चित्रण केले. त्या मागे तिचा हेतू चांगला असावा असे वाटते. वैयक्तिक फायद्यासाठी तिने असे केले असावे असे वाटत नाही. लहान मुलीकडून इतक्या दूरदर्शीपणाची अपेक्षा करणे पटत नाही. बहुधा तिच्या इमारतीतील काही लोक किंवा ओळखीचे लोक तेथे खात असावे आणि तिने त्या पाणीपुरीवाल्याचे कृत्य अनेकदा पाहिल्याने पुराव्यासाठी ती क्लिप घेतली असावी. त्याचे तो पुढे काय करतो हा प्रश्न गौण आहे कारण तो तांब्या त्याच्या रोजच्या वापरातला आणि ठेल्यावर ठेवलेला असल्यास तो इतर कामांसाठी त्याचा वापर करतो ही गोष्ट पटण्यासारखी आहे.

तिने ही क्लिप घेतल्यावर मात्र त्याचे परिणाम असे होतील असे तिला वाटले नसावे. ती क्लिप मिडियापर्यंत कशी गेली, कोणी पाठवली ते माहित नाही पण जर का त्या मुलीने ती पाठवली असेल तर तिच्यावर आणि तिच्यावर म्हणण्यापेक्षा तिच्या आई-वडिलांवर (ती सज्ञान वाटत नाही. नसल्यास तिच्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी आई-वडिलांची आहे.) बाकीची जबाबदारी येते. त्यापेक्षा सोसायटीतील लोकांच्या मदतीने हा प्रश्न सोडवता आला असता.

राजकारण्यांच्या तावडीत सामान्य माणूस सापडला की त्याची गत कशी होते हे दाखवणारे उत्तम उदाहरण मानता येईल. एकदा मनसेच्या हाती बातमी पडल्यावर त्यांनी त्याचा बागुलबुवा करणे आलेच आणि मग पुरोहीतांनी चेकाळल्यासारखे करणे.तरीही, त्यांनी त्या मुलीला यात गोवणे अक्षम्य आहे. त्यांनी मनसेवर टीका केली असती तर प्रश्न नव्हता परंतु जे काही केले त्यात ते खड्ड्यात पडले हे उत्तम झाले. माझ्या मते, त्या मुलीने आणि तिच्या पालकांनी केस चालवून किंवा कोर्टाबाहेरही माफी आणि नुकसान भरपाई घ्यावी.

पाणीपुरी व्हेंडर

अनेकांनी ती व्हीडीओ फित पाहिली नसावी असे वाटते- ही घ्या.

आवाजासकट पाहताना खूप हसू येते!

ह्या व्हिडीओत आवाज नाही आहे. हि फित पहा आवाजासकट..क्लीप

ते नेहमीचेच होते?

आवाजासकट चित्रफित पाहिली असता कु. अंकिता राणे हिने "आजी, लवकर..." असे म्हणून हे सारे दृश्य पहाण्यासाठी आपल्या आजीलाही बोलावून घेतलेले दिसते. त्याअर्थी हा पाणीपुरीवाला असे काही करतो हे त्यांना आधीच (पूर्वानुभवाने) माहित असावे. असे नेहमीच होत असले तर तो त्या पाणीपुरीवाल्याचा खोडसाळपणा होता (मानसिक विकृती?) असे म्हणावे लागेल.
या 'शूटिंगचे पुढे काय करणार?' असा प्रश्नही आजीने विचारलेला ऐकू येतो.

आजीही?

आवाजासकट चित्रफित पाहिली असता कु. अंकिता राणे हिने "आजी, लवकर..." असे म्हणून हे सारे दृश्य पहाण्यासाठी आपल्या आजीलाही बोलावून घेतलेले दिसते. त्याअर्थी हा पाणीपुरीवाला असे काही करतो हे त्यांना आधीच (पूर्वानुभवाने) माहित असावे. असे नेहमीच होत असले तर तो त्या पाणीपुरीवाल्याचा खोडसाळपणा होता (मानसिक विकृती?) असे म्हणावे लागेल.

नक्कीच. राणे कुटुंबियांनी खिडकी सर्वेयलन्स कॅमेरा बसवला नसावा असे वाटते. हा प्रकार अनेकदा नजरेस आल्याने शूटींग करायचे ठरले असावे. तरीही, राज पुरोहित यांनी आज्जीला शिव्या कशा बरे नाही घातल्या? ;-)

असो. पुढे काय झाले राज साहेबांचे? अद्यापही अधक्षपदावर विराजमान आहेत ना?

राजसाहेब

>>असो. पुढे काय झाले राज साहेबांचे? अद्यापही अधक्षपदावर विराजमान आहेत ना?
ते राजसाहेब(????) मुंडे समर्थक म्हणून ओळखले जातात. आणि गडकरी साहेबांनी 'नो कॉमेंटस्' सांगितले आहे. पण त्यांचे काही मतदार (आमच्यासारखे) कमी झाले आणि काही वाढले. :)

मूतपुरी.. :)

ठाण्यात 'राज पुरोहिताला आवडते मूतपुरी..' असे फलक असलेली मनसेची जी निदर्शने झाली त्यात काही वेळ मीही होतो..मजा आली! :)

तात्या.

 
^ वर