झुंडशाही, अभिव्यक्ती स्वांतत्र्य, विचार आणि भावना

प्रस्तावना -

मुद्दा होता भारताने विश्वचषक जिंकल्या नंतरच्या पुण्यातील उधाणाचा, काही/बहुतांश लोकांना हि एक आनंदाची गोष्ट वाटली आणि त्यांनी तो आनंद वयक्तिक आणि सार्वजनिकरित्या साजरा केला, आनंद खूप होता म्हणून उत्साह किंवा उन्माद देखील जास्त होता, हे असे क्वचित घडते (निदान पुण्यात) म्हणून ते सर्वाना आश्चर्यकारक वाटले.

काहीना त्या सार्वजनिक उन्मादाचा त्रास झाला म्हणजेच आवाजाचा त्रास, झोप न लागणे वगैरे शारीरिक/मानसिक त्रास झाले, तर काहीना झालेला त्रास थोडा वैचारिक होता, जसे कुठलीतरी खासगी टीम भारतीय असल्याचा दावा करीत लोकांच्या वयक्तिक अथवा सांघिक भावनेशी खेळत आहे, किंवा या देशातील बहुतांश लोक कुठल्यातरी खासगी टीमसाठी आपला वेळ, शक्ती वाया घालवीत आहेत, इतकेच नव्हे तर असे वागून ते इतर लोकांना देखील त्रास देत आहेत. आणि हे सर्व होताना ती खासगी टीम मात्र अफाट पैसे कमवत आहे. छे! हा तर निव्वळ मुर्खपणा आहे.

कदाचित काही लोकांना असे देखील वाटले असेल कि आनंद झाला हे ठीक, थोडाफार साजरा केला हे पण ठीक, पण एकदम एवढे स्तोम माजवण्याचे आणि आरडा-ओरडा करण्याचे कारण नाही. विश्वचषक जिंकला म्हणजे काही "मुंग्यान् मेरू पर्वत तर नाही गिळला न?" एकूण काय तर जिंकल्याचे समाधान आहे पण अतिरेकी उन्माद नको.

उन्माद आवडला नाही म्हणजे नक्की काय झालं? तर माझ्यामते ह्या उन्मादात जी सांघिक भावना दिसली, म्हणजे लोकांनी गाडीवर किंवा एकत्र जमून आरडा-ओरडा करत आनंद साजरा केला, ती सांघिक भावना थोडीशी झुंडशाही कडे झुकणारी वाटली. झुंडशाही म्हणजे "आम्ही" "करतो"/म्हणतो "तेच" खरं हि भावना. थोडं वेगळ्या पद्धतीने सांगायचं झाला तर "गाव करील ते राव काय करील" हा प्रकार वयस्क आणि बुद्धिवाद्यांना आवडत नाही. मी मुद्दाम हे उदाहरण घेतलं, ह्यात गाव चांगलं वागो व झुंडशाही करो त्यामागे विचार नसून भावनाच कार्यरत असते. माणसांचा कुठलाही कळप एखादे काम एकत्र येऊन करतो (कुठल्याही प्रत्यक्ष दबावाखाली नाही) त्याला कारणीभूत असते ती भावनाच, त्या भावनेचा स्त्रोत विचारात असू शकेल हे मान्य. पण एकूण हि झुंडशाही बुद्धिवाद्यांना मान्य नाही. कारण, बहुदा ती कळप-भावना माणसाचे स्वतंत्र/वयक्तिक वैचारिक अस्तित्व नाकारते!!

झुंडशाही -

हि झुंडशाही कुठे कुठे दिसून येते? तर साधारणपणे मनसे किंवा शिवसेना सार्वजनिकरित्या जो विरोध दर्शवितात त्यात ती प्रामुख्याने आढळते, कोणत्या प्रसंगी आढळते? तर, जेम्स लेन, शिवरायांबद्दल काय विनोद केला जातो ह्याचे आपल्या माहितीपर पुस्तकात स्मरण करून देतो, धर्माने मुसलमान असलेला एम.एफ.हुसेन भारतात सरस्वती, भारतमाता, द्रौपदी ह्यांची नग्न चित्रे काढतो, पुण्यात दादोजींचा पुतळा सत्ताधाऱ्यांकडून लाल महालातून हलविला जातो, कुठला तरी पाणीपुरीवाला शौचाचे भांडे पाणीपुरी साठी वापरतो किंवा अजून अशी बरीच उदाहरणे आहेत/असतील. अश्या प्रकारांमध्ये शिवसेना किंवा मनसे त्यांच्या संघटनेच्या ताकदीचा वापर करून विरोध दर्शवितात, त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते किंवा जाहीरपणे दहशत बसावी असे कृत्य दिसते, किंवा क्वचित मारहाण देखील होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य -

प्रत्येक व्यक्तीला त्याचे मत बोलून/लिहून व्यक्त करण्याचा जन्मसिद्ध अधिकार म्हणजे अभिव्यक्ती स्वांतत्र्य. घटना देखील असे काहीसे स्वातंत्र्य देते, हा मुलभूत हक्क आहे असे मानले जाते.

वाद -

अभिव्यक्ती स्वातंत्र्यात, जे मत प्रदर्शन होते ते चांगले किंवा वाईट नसतेच ते फक्त मत असते आणि ते व्यक्त करण्याचा हक्क सर्वांचा आहे असा

प्रतिवाद बुद्धिवादी करतात. त्या मतांमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात, त्यातील काही लोक भावना दुखावली म्हणून निषेध दर्शवितात, निषेधाचे स्वरूप वैचारिक किंवा कृत्य असते, आता ह्यातील वैचारिक प्रतिक्रियेला आक्षेप नाही, पण कृत्य प्रतिक्रिया जर सावर्जनिक असेल तर त्याला आक्षेप असण्याची शक्यता अधिक, जेवढी प्रतिक्रिया तीव्र (चढती क्रमवारी - काम-बंद, रास्तारोको, तोडफोड, हिंसा) तेवढा आक्षेप जास्त. एकूण काय तर शब्द मांडताना विचार(सदसद्विवेक बुद्धीने) नाही केला तरी चालेल पण कृती करताना विचार(सदसद्विवेक बुद्धीने) करा हि मागणी.

बहुतांश लोक कुठल्यातरी गोष्टीशी भावनिकरीत्या जोडले गेलेले असतात, धर्म, देश, समुदाय, परिवार, मित्र वगैरे किंवा अजून इतर गोष्टींशी एक भावनिक बंध असतो, ह्या गोष्टींशी निगडीत काहीही सकारात्मक/नकारात्मक घडल्यास त्या भावनेतून तसा प्रतिसाद उमटतो, हि सहज-क्रिया आहे. प्रतिक्रियेची तीव्रता हि भावनिक-बंधाच्या तीव्रतेशी आणि बौद्धिक जडणघडणीशी निगडीत असते.

साधारण पणे तोडफोड/हिंसा आक्षेपार्ह मानली जाते हे मान्य, पण हिंसेपेक्षा त्यामागची भावना/हेतू आक्षेपार्ह मानली/मानला जावी/जावा. पण हेच गणित माझ्यामते सार्वजनिक अभिव्यक्तीला/मत व्यक्त(शाब्दिकरित्या) करण्याला लागू पडते.

ज्या भावना आणि विचार मिश्रित समाजात आपण राहतो तेथे आपले वयक्तिक मत व्यक्त करताना जबाबदारी पाळली पाहिजे असे माझे मत आहे.

जे शब्द हिंसेचे सुतोवाच करतात किंवा विचार व्यक्त करणाराच कृती करेल हि शंका निर्माण होते असे शब्द(आज्ञार्थी,विध्यर्थी) देखील आक्षेपार्ह आहेत हे सर्वमान्य आहे. म्हणजे स्त्रियांना छेडणे, कृती करण्याची धमकी देणे वगैरे आक्षेपार्ह आहे हे सर्वमान्य आहे.

पण काही शब्द हे तत्कालीन सामाजिक चौकटी मोडणारे असतील पण ते वर दिल्याप्रमाणे आज्ञार्थी/विध्यर्थी नसतील तर त्यांना आक्षेपार्ह ठरवायचे का? जसे कर्व्यांनी स्त्रीशिक्षणाला पाठींबा देणारी काही वक्तव्ये आधी केली असतील, मग कृती केली असेल, हि गोष्ट त्याकाळी कदाचित आक्षेपार्ह मानली गेली असेल, किंवा दलितांच्या हक्कांसाठी सवर्णांच्या विरोधात केली गेलेली विधाने/कृती, बालविवाह किंवा सतीप्रथे विरुद्ध विधाने, पाकिस्तानात ब्लास्फेमी वर व्यक्त केलेले सार्वजनिक मत, किंवा जेम्स लेनने सांगितलेला विनोद, महंमदचे कार्टून किंवा, मुंबई स्वतंत्र प्रांत किंवा गुजरात मध्ये विलीन करण्याची घोषणा, दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण ह्या सगळ्याच गोष्टीना पूर्ण-स्वातंत्र्य असायला हवे काय? शाब्दिक लिबर्टी आणि फ्रीडम ह्यामध्ये फरक करणे गरजेचे नाही काय?

काहीवेळेस शब्द हे कृतीला पर्याय म्हणून वापरले जातात, भावना एकच असते, मग कृती आक्षेपार्ह असेल तर शब्द देखील आक्षेपार्ह ठरायला हवेत, मुळात भावनाच आक्षेपार्ह ठरायला हवी. विनोद हा कृती करण्याचे धाडस नाही म्हणून केला जातो, त्यामुळे असा विनोद देखील आक्षेपार्ह ठरायला हवा जो कृतीला पर्याय म्हणून केला जातो.

कृत्य हिंसा असू शकते, त्याचप्रमाणे शाब्दिक हिंसा पण असू शकते. दीपक चोप्रा लांच्छनास्पद/लबाड आहे हि शाब्दिक हिंसा आहे, हेच दीपक चोप्रा अवैज्ञानिक पद्धतीचे आचरण करतात हि विवेकी टीका/समीक्षा आहे. भावनेचा कोणता अविष्कार चालतो ह्यापेक्षा भावना आहे हे मान्य केल्यास वेग-वेगळ्या स्तरातून त्या भावनेचे वेग-वेगळे अविष्कार दिसणार हेही मान्य करायला हवे.

शब्द भावनिक/मानसिक इजा करतात, छेडण्यामध्ये/व्यंगांवर केल्या जाणाऱ्या विनोदांमध्ये देखील पुढे कृती केली जाऊ शकते ह्या भीतीपेक्षा वापरले गेलेले शब्द अधिक त्रासदायक असतात, अशा छेडणाऱ्या लोकांना जिची/ज्याची छेड काढली जात आहे त्यांनी शारीरिक इजा केल्यास ते आक्षेपार्ह नसावे असे माझे मत आहे.

सकारात्मक कृतीचे समर्थन/सुतोवाच करणारी जबाबदार विधाने जरी समाजाची चौकात मोडणारी असेल तर ती मान्य असायला हवी. सतीप्रथा किंवा बालविवाह ह्याविरोधातील विधाने जरी तत्कालीन समाज-विरोधी असली तरी त्यामध्ये पुरुष-प्रधान संस्कृतीच्या स्वार्थी वागण्याला लगाम घालणे आणि स्त्री वर्गास माणुसकीची वागणूक मिळणे हि सकारात्मक भावना होती, म्हणून अशा प्रकारची विधाने मान्य असायला हवीत.

बेजाबदार शब्द/मते चालत असतील तर, तशीच बेजाबदार/भडक भावनेतून आलेली कृती पण चालायलाच हवी. बेजाबदार आणि जबाबदार काय हे ठरवायला हवे हे मान्य, पण, "शब्द चालतील पण कृती चालणार नाही" हे अमान्य.

बेजाबदार शब्द चालत नाहीत म्हणूनच कदाचित उपक्रम वर देखील काही बंधने आहेत, तसेच घटनेने देखील १५३ अ कलम सांगितले असावे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या विषयावर माझी आणि श्री.रिकामटेकडा ह्यांचाशी चर्चा झाली, पण एकंदरीत दुसऱ्या पानावरची चर्चा करणे तसे आवघड जाते आणि मला उपक्रमिंची ह्या विषयावरची मते जाणून घ्याची इच्छां झाली म्हणून हा चर्चा-प्रस्ताव.

व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका असतील तर त्या देखील सांगाव्यात, पुढील वेळेस सुधारणा केल्या जातील.

लेखनविषय: दुवे:

Comments

:)

"एखाद्याला मानसिक त्रास झाल्यास तो मोजण्याचे साधन सध्या तरी अस्तित्वात नाही. त्यामुळे मानसिक या शब्दाचा गैरवापर होऊन अनेक जण केवळ त्रास देण्यासाठी या शब्दाचा आधार घेतील" -- संदर्भ.

शक्य.

मानसिक त्रास मोजण्यासंबंधी अधिक सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. :)

बातमीच्या लेखनाची शैली तुमच्या लेखनाशी मिळती जुळती वाटली, एक निरीक्षण.

शुद्धलेखन

व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका असतील तर त्या देखील सांगाव्यात, पुढील वेळेस सुधारणा केल्या जातील.

हे लिहिलेत म्हणून काही सुधारणा सुचवतो आहे.

हि - ही (सर्वत्र), वयक्तिक - वैयक्तिक (सर्वत्र), सार्वजनिकरित्या - सार्वजनिकरीत्या, मुर्खपणा - मूर्खपणा, मुंग्यान् - मुंग्यांनी, न - ना, झालं - झाले (लिहिताना झाले लिहावे, बोलताना झालं चालेल), घेतलं - घेतले, चांगलं - चांगले, मुलभूत - मूलभूत, सुतोवाच - सूतोवाच, बेजाबदार - बेजबाबदार (सर्वत्र), उपक्रम वर - उपक्रमावर

वाक्यरचनेमध्येही सुधारणेला वाव आहे.

धन्यवाद

धन्यवाद, हे शब्द पुढील वेळेस लिहिताना प्रयत्न करेन.

वाक्यरचनेमध्येही सुधारणेला वाव आहे.

कृपया, हे देखील सांगावे, इथे फार अवांतर होत असल्यास खरड वहीतून सांगावे.

मानसिक त्रास

लेख चांगला वाटला. पण पटणारा नाही.

सार्वजनिक ठिकाणी बोलताना असभ्य शब्दांचा वापर करू नये हे योग्यच आहे. पण असभ्य शब्दांना योग्य सभ्य शब्द मिळाला नाही तर काय? तुमच्याच उदाहरणात दीपक चोप्रा लबाड आहे याला पर्याय 'दीपक चोप्रा अवैज्ञानिक पद्धतीचे आचरण करतात' हे तोच अर्थ पुढे आणत नाही. (दीपक चोप्रा हे या इथे उदाहरण आहे. त्यांच्या लबाडीबद्दल मला काही माहिती नाही.) एखाद्याला लबाड आहे असे म्हणायचे असेल, चोर आहे म्हणायचे असेल तर नेमके पार्लमेंटरी शब्द सापडणार नाही. सापडलेत तर तेच शब्द काही वर्षांनी परत अन्पार्लमेंटरी होतील.

असे शब्द वापरू नये असे म्हणणे हे म्हणून बरेचदा अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर मर्यादा घालतात.

पण याचा अर्थ खोटे बोलायला/पुरावा नसताना बोलायला परवानगी असावी असे नाही. उदा. दीपक चोप्रांचेच. दीपक चोप्रा हे अवैज्ञानिक पद्धती आचरण करत आहेत. पण ते समजा लबाड नाहीत तर त्यांना त्यांच्या अवैज्ञानिक पद्धतीवर विश्वास आहे. (अविश्वास असून आपल्या फायद्यासाठी त्याचा प्रसार करणे याला लबाडी म्हणू या.) अशा वेळी त्यांना लबाड म्हणणे चुकीचे ठरेल. असे म्हणणार्‍याविरुद्ध कायदेशीर इलाज करता येतो.

बहुतेक 'शिव्या' या अशा पुराव्याशिवायच्या असतात. (मी लैंगिक संबंधावर आधारित शब्दप्रयोगाबद्दल बोलत आहे.) आणि म्हणून त्या गुन्हा ठरतात. 'सत्यकाम जाबाली ' ह्याला आपल्या वडलांचे नाव माहित नव्हते (आईलाही माहित नव्हते.) म्हणून तो 'बास्टर्ड' वा 'शिंदाळलेला' ठरतो. (स्वत: सत्यकामाने हे मोकळेपणाने सांगितले.) अशावेळी स्वत: सत्यकामाची अशा शब्दाला हरकत नसावी. आणि ती त्यासाठी शिवी नसावी.
मात्र असेच उद्गार इतर कुणाबद्दल (हल्लीच्या काळी गांधींबद्दल) काढले तर त्याला पुराव्याची अपेक्षा असेल.

नुसता मानसिक त्रास हा सहसा दखलपात्र गुन्हा नसतो. तर या त्रासामुळे जे हिंसक कृत्य घडते त्यामुळे मानसिक त्रासाच्या कृत्याला गुन्हा ठरविले जाते. ही हिंसक कृत्ये थांबली तर मानसिक त्रास देणे हा गुन्हा ठरू शकत नाही.

प्रमोद

शंका

प्रतिसादासाठी धन्यवाद.

पण असभ्य शब्दांना योग्य सभ्य शब्द मिळाला नाही तर काय?

दोन मुद्दे आहेत, एक असभ्य शब्द वापरण्याचा आणि, दोन, तो शब्द वापरावा वाटतो ह्यामागील भावना, शब्द शक्यतो सापडतीलही पण त्यामध्ये "ती भावना" व्यक्त होणार नाही हे दुख: असू शकेल. "दीपक चोप्रा अवैज्ञानिक पद्धतीचे आचरण करून लोकांची दिशाभूल/नुकसान करण्याचा प्रयत्न करीत आहेत" असे मत नक्कीच कमी आक्षेपार्ह वाटते.

असे शब्द वापरू नये असे म्हणणे हे म्हणून बरेचदा अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर मर्यादा घालतात.

पार्लमेंटरी शब्द वापरावेत हि साधारण परिभाषा मानल्यास इतर शब्द वापरणे गैर ठरते, पार्लमेंटरी शब्द मिळत नाही हा कांगावा/सबब सांगितली जाऊ शकते.

अशावेळी स्वत: सत्यकामाची अशा शब्दाला हरकत नसावी. आणि ती त्यासाठी शिवी नसावी.

असहमत, तुम्ही सांगितलेला प्रकार "लंगड्या/आंधळ्या/डूचक्या/मंद/तिरळ्या" ह्या शब्दांना पण लागू पडेल काय?

नुसता मानसिक त्रास हा सहसा दखलपात्र गुन्हा नसतो. तर या त्रासामुळे जे हिंसक कृत्य घडते त्यामुळे मानसिक त्रासाच्या कृत्याला गुन्हा ठरविले जाते. ही हिंसक कृत्ये थांबली तर मानसिक त्रास देणे हा गुन्हा ठरू शकत नाही

ह्यातील अधोरेखित विधानाबद्दल मला शंका आहे, तज्ञांनी अधिक मार्गदर्शन करावे.

शिष्ट शब्दप्रयोग.

दीपक चोप्रा अवैज्ञानिक पद्धतीचे आचरण करून लोकांची दिशाभूल/नुकसान करण्याचा प्रयत्न करीत आहेत
हा चांगला पर्याय आहे. त्यात स्वत:ची तुंबडी भरत आहेत (लबाड साठी पूर्ण प्रयोग.)
मग वाक्य होते. .... लोकांची दिशाभूल/नुकसान करण्याचा प्रयत्न करून स्वतःचा फायदा करू बघत आहेत.' असे काहीसे होते. एवढे म्हटल्यावर 'लबाड' शब्दाचा अर्थ पोचतो.

लंगड्या/आंधळ्या/डूचक्या/मंद/तिरळ्या

आजकाल फिजिकली चॅलेंज्ड असा शब्द प्रयोग करतात. त्याची आठवण आली. हाच शब्द (उदा. मेंटली चॅलेंज्ड) कुणा मोठ्या व्यक्तिच्या बाबतीत करा त्यावर तेवढेच आक्षेप निघतील. जेवढेच बुद्दु शब्दाने निघतील.
असे कित्येक शब्दांच्या बाबतीत होते. माझ्या आठवणीतलेशब्द म्हणजे 'देसी', 'भैया','अन्ना' हे आदरार्थी शब्द होते आज त्यांना अनपार्लमेंटरी गणले जाते. (देसी अमेरिकेत अनपार्लमेंटरी आहे असे ऐकतो.)

मानसिक त्रासाबद्दल तुम्ही लिहिलेल्या मुद्यासाठी अधिक माहिती.

नुसती मारहाण हा देखील दखलपात्र गुन्हा नाही. तर मारहाणीमुळे इजा झाली तर तो दखलपात्र गुन्हा होतो.

प्रमोद

शंका

नुसती मारहाण हा देखील दखलपात्र गुन्हा नाही. तर मारहाणीमुळे इजा झाली तर तो दखलपात्र गुन्हा होतो.

४९८ अ च्या अंतर्गत बऱ्यापैकी मानसिक छळाबद्दल तक्रार करता येते असे वाचले आहे, तसेच दबाव आणणे, त्रास देणे ह्यासंदर्भात देखील अनेक तक्रारी नोंदविल्याचे वाचले आहे.

धमकी देणे, ४९८अ

४९८अ नुकताच पाहिला. त्यातही मी म्हणतो तसा उल्लेख असावा. (हा उल्लेख समजाऊन सांगतानाचा आहे.)

प्रमोद

थोडेफार..

म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की "हातापायांची कृती आणि बोलण्याची(मुख) कृती ह्या सारख्याच संबोधल्या जाव्यात कारण दोन्हाकडून होणारी हानी ही सारखीच असू शकते.".

हे थोड्याफार प्रमाणात मान्य आहे.

बोलण्याने सर्वांनाच हानी होते असे नाही परंतू कृतीने सर्वांचीच हानी होते.

उदा. ५० जणांना जाउन तुम्ही शिव्या द्या. ४० जणांना राग येयील. १० जणांना त्याचे काहीच वाटाणार नाही (बुद्धीवंतांना शक्यतो...)
परंतू जर ५० जणांचे तुम्ही हात मोडले तर सर्वांना तेवढीच इजा होइल.

म्हणजेच कुणाचे बोलणे आक्षेपार्ह्य आहे की नाही हे ऐकणार्‍यावर अवलंबून आहे पण कृती आक्षेपार्ह्य आहे की नाही हे
कृतीवर अवलंबून आहे.

---------------------
-धनंजय कुलकर्णी

ह्म्मम

म्हणजेच कुणाचे बोलणे आक्षेपार्ह्य आहे की नाही हे ऐकणार्‍यावर अवलंबून आहे पण कृती आक्षेपार्ह्य आहे की नाही हे
कृतीवर अवलंबून आहे.

वैयक्तिक पातळीवर हे नक्कीच बरोबर ठरते, पण समाजामध्ये सांघिक भावनेचा उपयोग कसा करून घेतला जातो हे 'कलामांच्या' उदाहरणावरून दिसते, त्यांना जोकर म्हणाल्याने अनेकांची 'मने' दुखावली. त्यावर निषेध व्यक्त झाला, हा निषेध शाब्दिक होता कारण कलाम ह्यांच्याविषयी असलेली भावना तेवढी तीव्र नसावी "किंवा" निषेध करणारा वर्ग सुशिक्षित होता. पण हि परिस्थिती कायमच असेल असे नाही, जास्त भावनिक स्तरातील लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता जास्त असू शकते. त्यामुळे सामाजिक परिस्थितीमध्ये बोलणे देखील काही वेळा आक्षेपार्ह ठरते.

होय

उदा. एकदम बरोबर.

इथे जेंव्हा निषेध व्यक्त केला गेला होता तो एका व्यक्तीवर होता. तसेच हा निषेध शाब्दीक होता (अभीव्यक्ती स्वातंत्र्य).
त्या व्यक्तीने हा निषेध जर निषेध नाहीच असं मानलं किंवा त्याच्याकडे असे काही प्रमाण आहेत जे की कलामांना तसे सिद्ध करतील
जेणेकरून त्या व्यक्तीला हा निषेध फोल आहे असं वाटत असेल आणि म्हणून तो ह्याला दुर्लक्षीत करत असेल तर खर तर हा निषेध नोंदवनार्‍याला काहीच मिळत नाही तसे करून आणि निषेध खरच फोल ठरतो.

परंतू जर त्या व्यक्तीच्या घरात जाउन त्याच्याशी मारहान केली असती तर वेगळीच परिस्थीती निर्माण झाली असती.

इथे मारहान करण्याची कृती आक्षेपार्ह्य नक्कीच आहे. परंतू शाब्दीक निषेध हा आक्षेपार्ह्य नाही (त्याने काहीच झाले नाही.. नो इजा)

---------------------
-धनंजय कुलकर्णी

चांगला लेख

--पण काही शब्द हे ----शाब्दिक लिबर्टी आणि फ्रीडम ह्यामध्ये फरक करणे गरजेचे नाही काय?

ह्या परीच्छेदात सवर्णांनी सवर्णांच्याच काही कालबाह्य रीतीभाती, विचार, मोडायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्रास दिला गेला अशा स्वरुपाची उदाहरणेही द्यायला हवी होती.

विचारवंताच्या पायाखालची जमीन फार पटकन् खचवता येते. बळी तो कान पिळी हेच खरे...कसले आलेय अभिव्यक्ति स्वातंत्र्य, वगैरे.

धन्यवाद.

ह्या परीच्छेदात सवर्णांनी सवर्णांच्याच काही कालबाह्य रीतीभाती, विचार, मोडायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्रास दिला गेला अशा स्वरुपाची उदाहरणेही द्यायला हवी होती

तुमचे बरोबर आहे, पण तसे केले असता ते "सवर्णांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला" असे वाटण्याची शक्यता आहे म्हणून मी ते टाळले. तरी आपणास काही उदाहरणे माहित असल्यास अवश्य पुरवावीत.

बळी तो कान पिळी हेच खरे...कसले आलेय अभिव्यक्ति स्वातंत्र्य, वगैरे.

:) असहमत.

सेन्टर फ्रेश

"सेन्टर फ्रेश सिर्फ जुबान पे लगाम लगाता है, हाथों पे नही" ही जाहिरात आठवली. उगाचच. ;)

पण एकूण हि झुंडशाही बुद्धिवाद्यांना मान्य नाही. कारण, बहुदा ती कळप-भावना माणसाचे स्वतंत्र/वयक्तिक वैचारिक अस्तित्व नाकारते!!

कथित बुद्धीवादी जे काही स्वीकारतात/नाकारतात ते बरेचदा सोयीस्कर असते. 'झुंडशाही' ही एक सापेक्ष संज्ञा आहे. एकासाठीची झुंड हा दुसर्‍यासाठी काफिला असू शकतो. कुणाचे तरी क्रांतिकारी कुणासाठी तरी दहशतवादी असू शकतात. समाज किंवा देश हीसुद्धा झुंडीची विस्तारीत रुपे म्हणता येतात, त्यामुळे बर्‍याच बुद्धीवाद्यांना 'एकंदरच राष्ट्रभावनेचे वावडे' असल्याचे कळते.
मात्र असे असले तरी 'कळपाचा फायदा' सगळ्यांनाच होत असतो हेही तितकेच खरे. कळप-भावना नाकारणारेसुद्धा त्यापासून होणार्‍या फायद्याचे वाटेदार असतात. निर्जन बेटावर कोणी राहू शकत नाही. आणि '..ईक ऐसे गगन के तले' वगैरे कल्पना फॅन्टसाईझ करणे विरंगुळा म्हणून ठीक असले तरी त्याला काही अर्थ आहे असे वाटत नाहीच.
असो. (जरा विस्कळीत झालंय त्याबद्दल सॉरी.)

सहमत

--कथित बुद्धीवादी जे काही स्वीकारतात/नाकारतात ते बरेचदा सोयीस्कर असते. --

१००% सहमत

काहीसा अ/सहमत

कथित बुद्धीवादी जे काही स्वीकारतात/नाकारतात ते बरेचदा सोयीस्कर असते.

काहीसा सहमत, बुद्धीने अहिंसा करता येते तोपर्यंत ते मान्य असते, शारीरिक प्रकार आल्यास त्यावर आक्षेप असतो.

मात्र असे असले तरी 'कळपाचा फायदा' सगळ्यांनाच होत असतो हेही तितकेच खरे. कळप-भावना नाकारणारेसुद्धा त्यापासून होणार्‍या फायद्याचे वाटेदार असतात.

सहसा बुद्धिवाद्यांना कळपापासून मिळणारे फायदे/तोटे काहीच नको असते, अभिव्यक्ती मारली गेली कि तोटाच होतो त्यामुळे बाकीचे फायदे गौण मानले जातात, जे फायदे घेतात ते बुद्धिवादी नव्हे.

परिणाम

आदर्श समाजात अभिव्यक्तीस्वातंत्र्य अमर्यादित देता येईल पण आदर्श समाज आजतरी अस्तित्त्वात नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा जयघोष करणार्‍या अमेरिकेत लोकांच्या वागण्यावर किती कडक निर्बंध आहेत हे पडताळणे हा वेगळ्या चर्चेचा विषय ठरावा.

शाब्दिक किंवा शारीरिक हिंसेचे परिणाम काय होतील हे जोखणे हा येथे आवश्यक मुद्दा वाटतो. बर्‍याचदा अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरेंपेक्षा परिणाम पाहून निर्णय घेतले जातात. "वर्डस् डोन्ट ब्रेक बोन्स बट दे ऑफ्टन ब्रेक हार्टस्"जहाल शब्द, अनावश्यक आरोप, शिवीगाळ हे अनेकांच्या भावना, अहंभाव, आत्मसम्मान दुखावणारे असू शकते. विनयभंगाच्या तक्रारीत केवळ शाब्दिक/ मानसिक त्रास असू शकतो आणि त्या तक्रारी ग्राह्य समजल्या जातात असे वाटते.

पण याचबरोबर,

बेजाबदार शब्द/मते चालत असतील तर, तशीच बेजाबदार/भडक भावनेतून आलेली कृती पण चालायलाच हवी.

हे 'जशास तसे'चे उदाहरण अयोग्य वाटते. वरच्या म्हणीप्रमाणे आणखी एक प्रसिद्ध म्हण आहे "स्टीक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स बट वर्डस् विल नेवर हर्ट मी" यातला नेवर हा भाग योग्य नसला तरी शब्दिक हिंसा आणि शारिरीक हिंसा यांची तीव्रता नक्कीच समप्रमाणात नाही.

सहमत

शाब्दिक किंवा शारीरिक हिंसेचे परिणाम काय होतील हे जोखणे हा येथे आवश्यक मुद्दा वाटतो. बर्‍याचदा अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरेंपेक्षा परिणाम पाहून निर्णय घेतले जातात. "वर्डस् डोन्ट ब्रेक बोन्स बट दे ऑफ्टन ब्रेक हार्टस्"जहाल शब्द, अनावश्यक आरोप, शिवीगाळ हे अनेकांच्या भावना, अहंभाव, आत्मसम्मान दुखावणारे असू शकते. विनयभंगाच्या तक्रारीत केवळ शाब्दिक/ मानसिक त्रास असू शकतो आणि त्या तक्रारी ग्राह्य समजल्या जातात असे वाटते.

सहमत, परिणाम पाहून निर्णय घेणेच योग्य आहे. अभिव्यक्ती वर राजकीय बंधन नको पण विवेकाचे बंधन हवे ही अपेक्षा आहे.

हे 'जशास तसे'चे उदाहरण अयोग्य वाटते. वरच्या म्हणीप्रमाणे आणखी एक प्रसिद्ध म्हण आहे "स्टीक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स बट वर्डस् विल नेवर हर्ट मी" यातला नेवर हा भाग योग्य नसला तरी शब्दिक हिंसा आणि शारिरीक हिंसा यांची तीव्रता नक्कीच समप्रमाणात नाही.

सहमत आहे पण, काही प्रकारात/परिस्थितींमध्ये शाब्दिक हिंसेविरुद्ध घटनात्मक न्याय मिळविणे अवघड असते (स्त्रियांची छेड/व्यंगांवर टीका) अशा वेळेस रेट्रीब्युटीव्ह जस्टीस योग्य ठरतो, तो अशा प्रकारांना आळा घालण्यास देखील उपयोगी ठरू शकतो.

उत्तम चर्चा

माझ्या मते, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमर्यादित असावे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बेजबाबदार लोकांनी बजावला की ते कोणालाही वेठीस धरू शकतात. पण अमूक लोकांनी वाटेल ते बोलून लोकांना वेठीस धरले आहे हे म्हणण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही शिल्लक असले म्हणजे झाले. प्रत्येक काळातील समाज हा आपल्यासाठी योग्य अभिव्यक्ती आणि मर्यादा ओळखत असतो. एखाद्याची अभिव्यक्ती त्याच्याबाहेर गेल्यास आपोआप आवाज उठत असतो. जर अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य असले तर हा आवाज उठणेही मान्य असले पाहिजे. त्यासाठी लोकांच्या परीघाची मर्यादाही समजली पाहिजे. हा परीघ विस्तारण्याचे काम जरूर करावे मात्र हा परीघ विस्तृत नाही कारण लोक मंद आहेत असे म्हणणे ह्याला माझा विरोध आहे आणि राहील. अशा विचारांनी आपण एका मोठ्या वर्गाचे नुकसान करून ठेवलेले आहे असे मला वाटते. with great power comes great responsibility असे स्पायडरमॅन चित्रपटातले वाक्य आठवले.

एखाद्या व्यक्तीला बास्टर्ड म्हणण्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा वापर अत्यंत गरजेच्या ठिकाणी आणि इतर शब्द न मिळाल्यास करावा असे मी समजते. सत्यकाम जाबालीसारखी व्यक्ती समोर आल्यास आपण त्याची ओळख करून देताना - "हे श्री. अमूक. हे बास्टर्ड/शिंदळीचे आहेत" अशी करून देऊ असे वाटत नाही. करून दिल्यास काय होईल हे कल्पना करू शकते. तरी साहित्यिकांना ललित लेखनात या शब्दांचा वापर करू द्यावा असे वाटते.

उत्तम प्रतिसाद

माझ्या मते, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अमर्यादित असावे.

आदर्श समाजात हे नक्कीच असावे हे माझे देखील मत असेल.

त्यासाठी लोकांच्या परीघाची मर्यादाही समजली पाहिजे. हा परीघ विस्तारण्याचे काम जरूर करावे मात्र हा परीघ विस्तृत नाही कारण लोक मंद आहेत असे म्हणणे ह्याला माझा विरोध आहे आणि राहील. अशा विचारांनी आपण एका मोठ्या वर्गाचे नुकसान करून ठेवलेले आहे असे मला वाटते.

पूर्ण सहमत.

दुर्गा भागवतांनी किंवा इरावती कर्व्यांनी द्रौपदी बद्दल लिहिले आहे (किंवा इतर महाभारतातील पात्रे), दुर्गाबाईना तत्कालीन समाजाचा बऱ्यापैकी विरोध झाला असल्याचे आढळते, काहीना त्यांचे द्रौपदी बद्दलचे विधान आक्षेपार्ह देखील वाटते, पण ते विधान अभ्यासू आणि विचारी दुर्गाबाईंनी केले आहे हे लक्षात घेतल्यास विरोध करताना थोडा विचार केला जातो (राजकीय विरोध बाजूला ठेवल्यास). पण त्याच द्रौपदीचे नग्न चित्र(असा इतिहास नसताना देखील) एम.एफ. हुसेन काढतात तेव्हा त्यास विरोध करताना सकारात्मक किंवा चिंतनात्मक विचार करावा असे वाटत नाही. दुर्गाबाईंच्या बाबत हा विचार केल्यास तो परीघ नक्कीच विस्तृत होईल असे वाटते.

विषयाला धरून नाही होणार पण

दुर्गाबाई आणि हुसेन यांच्यात फरक करू नये. हुसेन वेगळ्या धर्माचे म्हणून ते असे वागतात असे समजून प्रतिक्रिया दिल्यास एक प्रकारची होईल नाहीतर चित्रांकडे दुसर्‍या प्रकारेही बघता येईल. माझ्या मते त्यांच्या चित्रांमध्ये अर्थ लपलेले असतात, म्हणून नुसती नग्नता दिसते म्हणून चित्रे झिडकारणे ठीक होणार नाही.

मागे मिसळपाववर हुसेन यांच्या चित्रांवरून एक चांगली चर्चा झाली होती, दुवा सापडत नाही.

http://www.mfhussain.com/images/phocagallery/thumbs/phoca_thumb_l_normal...

हे चित्र पहा. ही देखील सरस्वतीच आहे.

हा भाग वाचा - http://www.tehelka.com/story_main37.asp?filename=Ne020208in_hindu_cultur...

I’ve painted hundreds of Ganeshas in my lifetime — it is such a delightful form. I always paint a Ganesha before I begin on any large work. ...When my daughter, Raeesa wanted to get married, she did not want any ceremonies, so I drew a card announcing her marriage and sent it to relatives across the world. On the card, I had painted Parvati sitting on Shiva’s thigh, with his hand on her breast — the first marriage in the cosmos. Nudity, in Hindu culture, is a metaphor for purity. Would I insult that which I feel so close to?

समाज आदर्श कधीच नसतो, तो फक्त जगत असतो. त्यामुळे असा समाज आदर्श होईपर्यंत वाट पहावी असे नाही. ही वाट पाहत राहावी लागणे याचा अर्थ काहींना आपली कला, काहींना आपली काव्ये, लेख लिहीताच न येणे असा होईल. आणि हे योग्य ठरणार नाही. यादृष्टीने लोकांची अशा प्रकारे मानसिक उन्नती होत राहील यासाठी प्रयत्नशील असावे. (तो कसा करायचा यावरून मतभेद असू शकतात).

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

अस्मिता आणि अभिव्यक्ती

दुर्गाबाई आणि हुसेन यांच्यात फरक करू नये. हुसेन वेगळ्या धर्माचे म्हणून ते असे वागतात असे समजून प्रतिक्रिया दिल्यास एक प्रकारची होईल नाहीतर चित्रांकडे दुसर्‍या प्रकारेही बघता येईल. माझ्या मते त्यांच्या चित्रांमध्ये अर्थ लपलेले असतात, म्हणून नुसती नग्नता दिसते म्हणून चित्रे झिडकारणे ठीक होणार नाही.

करू नये हे ठीक, फक्त अभिव्यक्ती किती उथळ आहे किंवा किती चिंतनात्मक आहे हे तपासले पाहिजे असे वाटते.

Nudity, in Hindu culture, is a metaphor for purity. Would I insult that which I feel so close to?

कृतीला तर्क मागाहून देता येतातच, कदाचित त्यांना खरेच तसे वाटत असेल पण स्वातंत्र्य हवे असे म्हणताना जबाबदारी देखिल हवी, ह्या प्रकाराला समजा आक्षेप घेतला नाही, आणि जर हे चालते हे समजून ह्याच सरस्वतीला किंवा अजून कोणाला रूढ अर्थी अधिक अश्लील प्रसंगात चितारले आणि ते दादर स्टेशन किंवा पुणे मंडई च्या बाहेर विकावयास काढले, एकूण काय तर त्याचे व्यावसायिकीकरण झाले, असे सर्वच देवतांचे झाले तर? तुम्ही दिलेला "तर्क' अजूनही लागू पडतोच, देवतांचा अपमान करण्याची इच्छा कोणाचीच नाही फक्त गोष्टी घडत गेल्या. मुद्दा ब्रेकपॉइंटचा आहे, अमर्यादित अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल तर भावना नकोच असे काहीसे वाटते.

सरस्वती किंवा द्रौपदी ह्यांच्याबद्दल आपल्याला भावनिक ओढ कदाचित कमी असेल, पण असा प्रकार आपल्या प्रिया व्यक्तींबाबत घडल्यास देखील आपण अशीच प्रतिक्रिया देऊ काय? आपला भावनिक बंध जेथे अधिक दृढ आहे तेथे आपण इतक्या कोरडेपणाने कोणताही तर्क स्वीकारू का?

त्याचबरोबर अस्मिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एकमेकांना मारक ठरत नाहीत ना, हे बघणे गरजेचे वाटते. अस्मितेचा संबंध भावनेशी आहे म्हणूनच तो अस्तित्वाशी देखील आहे, पण त्याचे प्रमाण अधिक झाले कि अभिव्यक्ती मारली जाते पण अमर्यादित अभिव्यक्ती आल्यास अस्मितेची हानी होते, त्यामुळे त्यांची योग्य सांगड घालणे गरजेचे वाटते?

स्वातंत्र्य

स्वातंत्र्य हवे असे म्हणताना जबाबदारी देखिल हवी, ह्या प्रकाराला समजा आक्षेप घेतला नाही, आणि जर हे चालते हे समजून ह्याच सरस्वतीला किंवा अजून कोणाला रूढ अर्थी अधिक अश्लील प्रसंगात चितारले आणि ते दादर स्टेशन किंवा पुणे मंडई च्या बाहेर विकावयास काढले, एकूण काय तर त्याचे व्यावसायिकीकरण झाले, असे सर्वच देवतांचे झाले तर?

आक्षेप जरूर घ्यावा. पण तारतम्याने विचार करून.
उदा. गणपती टॉयलेटच्या भांड्यावर काढणे ही एक अभिव्यक्ती आहे. आता ह्याला आपण कदाचित आक्षेप घेऊ शकतो.
http://hinduism.about.com/library/weekly/extra/bl-toilet.htm

ही भांडी मुद्दाम कोणी विकत घेऊन घरात लावेल असे मला वाटत नाही, असे कोणाच्या घरात दारात किंवा सार्वजनिक ठिकाणी काही दिसलेले नाही. याचा अर्थ हा एक स्टंट आहे. चुकूनमाकून पब्लिसिटी झाली तर बरे असा डाव त्यात आहे. आता ह्याला महत्व देऊन पब्लिसिटी करायची का दुर्लक्षाने मारायचे ह्यातील काय अधिक श्रेयस्कर हे ठरवायचे हा चॉईस आपल्यापुढे असतो.

पूनम पांडे ही कोण भवानी हे काही चिश्वचषकाच्या सामन्यांपर्यंत आपल्याला माहिती असण्याचे कारण नव्हते. ते का कळले? कारण सवंग पब्लिसिटीचा तिचा स्टंट. म्हणून पूनम पांडेला पुढची कामे देऊ नका असे म्हणणे जितके अन्यायकारक आहे तितकेच हुसेन यांना जगणे हराम करणे अन्यायकारक आहे.

हुसेन यांनी केवळ सवंग पब्लिसिटीसाठी अशी न्यूड काढली असे म्हणणे कदाचित शक्य आहे हे मला समजते. पण आपली हिंदू देवदेवतांची चित्रे, शिल्पे सगळीच न्यूड नाहीत का? ती आपण ठेवा म्हणून जपतो. गेल्या काही काळात राजा रविवर्म्यांनी केवळ अमूक पद्धतीची सरस्वती बघायची सवय डोळ्यांना लावल्याने बाकीची अभिव्यक्ती नामंजूर करता येणार नाही असे मला वाटते. केवळ मुस्लिम धर्मियाने काढली यासाठी ती चित्रे मग कशी बाद ठरतात?

आणि जर हे चालते हे समजून ह्याच सरस्वतीला किंवा अजून कोणाला रूढ अर्थी अधिक अश्लील प्रसंगात चितारले आणि ते दादर स्टेशन किंवा पुणे मंडई च्या बाहेर विकावयास काढले, एकूण काय तर त्याचे व्यावसायिकीकरण झाले, असे सर्वच देवतांचे झाले तर?

अधिक अश्लील म्हणजे कदाचित समागमाच्या स्थितीत वगैरे? तसेही चित्रीकरण होतच असते. कुमारसंभव लिहीताना पार्वतीचे वर्णन करताना कालिदासाने खूपच लेखनस्वातंत्र्य घेतले आहे असे ऐकून आहे. तुम्ही जालावर शोध घेतला तर अशी हजारोंनी चित्रे सापडतील. दुवा

पण असा प्रकार आपल्या प्रिय व्यक्तींबाबत घडल्यास देखील आपण अशीच प्रतिक्रिया देऊ काय? आपला भावनिक बंध जेथे अधिक दृढ आहे तेथे आपण इतक्या कोरडेपणाने कोणताही तर्क स्वीकारू का?
चित्रकार न्यूड काढतो तेव्हा ते कोणा व्यक्तीवरून स्फुरलेले असू शकतेच. जर ते लक्षात येईल अशा पद्धतीने काढले गेले असले आणि अशा व्यक्तीची मंजुरी नसेल तर तिला खटला भरण्याची मुभा असेल असे मला वाटते. पण तसे नसल्यास (मंजुरी असल्यास किंवा लक्षात येण्याजोगे नसल्यास) हे स्विकारणे किंवा दुर्लक्ष करणे अवघड नसावे.

सहमत

आक्षेप जरूर घ्यावा. पण तारतम्याने विचार करून.

नक्कीच, आक्षेप आणि अभिव्यक्ती दोनिही तारतम्याने असावे हेच माझे मत आहे.

आता ह्याला महत्व देऊन पब्लिसिटी करायची का दुर्लक्षाने मारायचे ह्यातील काय अधिक श्रेयस्कर हे ठरवायचे हा चॉईस आपल्यापुढे असतो.

बरोबर, आपल्याला टॉयलेटच्या बाबतीत आक्षेप घ्यावा वाटला तसाच तो इतरांना इतर गोष्टीत घ्यावा वाटेल, आक्षेपाची तीव्रता वैचारिक जडण घडणीवर आणि भावनिक बंधावर अवलंबून आहे, इथेच काही लोकांना असे टॉयलेट देखील आक्षेपार्ह वाटणार नाही, तरी "बऱ्याच" बाबतीत दुर्लक्ष करणे श्रेयस्कर असते हे मान्य.

चित्रकार न्यूड काढतो तेव्हा ते कोणा व्यक्तीवरून स्फुरलेले असू शकतेच. जर ते लक्षात येईल अशा पद्धतीने काढले गेले असले आणि अशा व्यक्तीची मंजुरी नसेल तर तिला खटला भरण्याची मुभा असेल असे मला वाटते.

मंजुरी नसणे/खटला भरण्याची मुभा असणे म्हणजे मानसिक त्रास होणे हेच असणार नाही का? मग ती प्रिय व्यक्ती जवळची आहे कि कोणी ऐतिहासिक आहे ह्याने कसा फरक पडतो? भावना निखळ असेल हे सुस्पष्ट झाल्यास दोन्हीकडे एकच तर्क लावावा असे वाटते, तरीदेखील अशा अभिव्यक्तीसाठी कायद्याने बंदी नसावीच पण केस-बाय-केस त्याची चौकशी व्हावी जेणेकरून स्वातंत्र्याचा दुरुपयोग होणार नाही.

स्पष्टीकरण

आपल्याला टॉयलेटच्या बाबतीत आक्षेप घ्यावा वाटला तसाच तो इतरांना इतर गोष्टीत घ्यावा वाटेल,

मला आक्षेप घ्यावासा वाटला असे नाही, असे कदाचित करू शकू असे मी म्हटले आहे. कारण एवढेच की तुम्हीच म्हटल्याप्रमाणे आपल्या पौराणिक साहित्यामध्ये गणपतीचा आणि टॉयलेटचा काहीही संबंध नाही, तेव्हा असा मुद्दाम संबंध तयार केल्याबद्दल शंका घेऊन आक्षेप घेता येईल. पण मी त्याकडे दुर्लक्ष करेन कारण ही पब्लिसिटी मला त्या कंपनीला मिळू द्यायची नाही आहे.

अशा अभिव्यक्तीसाठी कायद्याने बंदी नसावीच पण केस-बाय-केस त्याची चौकशी व्हावी जेणेकरून स्वातंत्र्याचा दुरुपयोग होणार नाही.

सहमत. फक्त हेतूंची "चौकशी" ही इन्फॉर्मल असावी, जशी आपण आत्ता करत आहोत, कायद्याने असू नये.

व्यक्ती की संस्था?

एकूण काय तर शब्द मांडताना विचार(सदसद्विवेक बुद्धीने) नाही केला तरी चालेल पण कृती करताना विचार(सदसद्विवेक बुद्धीने) करा हि मागणी.

या मताशी कितीजण सहमत होतील माहीत नाही, पण त्याला न्यायव्यवस्थेत पुरेसा आधार दिसत नाही. व्यक्तिगत निंदा केली तर त्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करता येण्याची सोय कायदे देतात. हानीची धमकी देणे यालाही शिक्षा होते. विशिष्ट धार्मिक/वांशिक/लैंगिक वगैरे गटाच्या लोकांविषयी (निव्वळ ते त्या गटात आहेत म्हणून) द्वेषमूलक विचार मांडणे अनेक पाश्चात्य देशांतही बेकायदेशीर मानले जाते. थोडक्यात, शब्द मांडताना व्यक्तींविषयी सदसद्विवेकबुद्धी वापरावी लागते.

मग मुद्दा हा रहातो की एखाद्या अभिव्यक्तीमुळे धर्मसंस्था, कुटुंबसंस्था किंवा शासनसंस्था अशा संस्थांची नालस्ती (किंवा हानी) होऊ शकते का? पाश्चात्य देशांमध्ये या प्रश्नाचा प्रवास हा अशा अभिव्यक्तीला कडक शासन देण्यापासून तो तिला लोकशाही प्रक्रियेत बसणाऱ्या टीका किंवा मतभिन्नतेच्या चौकटीत पुरेसा अवकाश देण्यापर्यंत झालेला दिसतो. पण आपल्याकडे अजूनही 'देवतांची नग्न चित्रे काढून धर्माचा अपमान होतो' किंवा 'राष्ट्रध्वजाला नाटक/चित्रपटात विशिष्ट प्रकारे दाखवले नाही तर राष्ट्राचा अपमान होतो' वगैरे मुद्दे अहमहमिकेने मांडले जाताना दिसतात (पण कोर्टात फारसे टिकताना बहुधा दिसत नाहीत; ही प्रगल्भतेच्या दिशेने काही पावले मानता येतील). आपल्याहून मागे कितीतरी आहेतः

उदा: कम्युनिस्ट पार्टीला शिव्या दिल्या म्हणून चीनमध्ये एका कलाकाराचा छळ चालू आहे. धर्माच्या अपमानाला आंतरराष्ट्रीय मानवी हक्कविषयक कायद्यात समाविष्ट करण्यासंबंधी इस्लामी राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रांत गेली काही वर्षे जे प्रयत्न केले ते अखेर अपयशी ठरले अशी एक बातमी काही दिवसांपूर्वी वाचली होती. तुमचे म्हणणे हे काहीसे त्या दिशेने जाताना दिसते. व्यक्तींवर संस्थात्मक चौकटी (कम्युनिस्ट पार्टी, धर्मसंस्था) काही जोर-जबरदस्ती करतात तेव्हा अशा प्रकारच्या अभिव्यक्तीची गळचेपी होताना अनेकदा दिसते. त्यामुळे प्रगल्भ न्याय/शासनव्यवस्था व्यक्तींना आणि व्यक्तिगत अभिव्यक्तींना अशा संस्थात्मक गळचेपीपासून संरक्षण देण्याला कटीबद्ध असतात. या कटीबद्धतेच्या अभावापोटी अनेकदा मोठे मानवसंहार झाल्याची उदाहरणे ताजी आहेत. त्यामुळे ‘संस्थेपेक्षा व्यक्ती अधिक नाजूक आणि म्हणून त्यांना अधिक संरक्षण’ असे सर्वसाधारणत: आधुनिक लोकशाहीत होताना दिसते.

हिंसेपेक्षा त्यामागची भावना/हेतू आक्षेपार्ह मानली/मानला जावी/जावा.
मुळात भावनाच आक्षेपार्ह ठरायला हवी.

यामागचे तर्कशास्त्र कोणत्याच लोकाभिमुख न्यायशासनव्यवस्थेत बसणारे नाही. कारण त्याची परिणती अखेर Thoughtcrime मध्ये होते.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

वैयक्तिक हानी

या मताशी कितीजण सहमत होतील माहीत नाही, पण त्याला न्यायव्यवस्थेत पुरेसा आधार दिसत नाही. व्यक्तिगत निंदा केली तर त्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा करता येण्याची सोय कायदे देतात. हानीची धमकी देणे यालाही शिक्षा होते. विशिष्ट धार्मिक/वांशिक/लैंगिक वगैरे गटाच्या लोकांविषयी (निव्वळ ते त्या गटात आहेत म्हणून) द्वेषमूलक विचार मांडणे अनेक पाश्चात्य देशांतही बेकायदेशीर मानले जाते. थोडक्यात, शब्द मांडताना व्यक्तींविषयी सदसद्विवेकबुद्धी वापरावी लागते.

सहमत, माझे मत देखील हेच आहे, शब्द वापरताना सद्सद्विवेक बुद्धी वापरणे गरजेचे ठरते. कायदे प्रक्रियेमुळे व्यक्तींविषयी अधिक विचार करावा लागत असावा.

मग मुद्दा हा रहातो की एखाद्या अभिव्यक्तीमुळे धर्मसंस्था, कुटुंबसंस्था किंवा शासनसंस्था अशा संस्थांची नालस्ती (किंवा हानी) होऊ शकते का? पाश्चात्य देशांमध्ये या प्रश्नाचा प्रवास हा अशा अभिव्यक्तीला कडक शासन देण्यापासून तो तिला लोकशाही प्रक्रियेत बसणाऱ्या टीका किंवा मतभिन्नतेच्या चौकटीत पुरेसा अवकाश देण्यापर्यंत झालेला दिसतो

संस्था जरी असल्या तरी शेवटी हानी वैयक्तिकच होत असते बहुदा, त्यामुळेच मी संस्थांशी/समुदायाशी निगडीत भावनांचे उदाहरण घेतले, शिवरायाविषयी काहीही बोलल्यास त्यांची हानी होत नाही पण त्यांचाशी निगडीत वैयक्तिक भावनेची हानी होते/नालस्ती होते. इथे देखील त्यांचाविषयी कोण आणि का बोलत आहे हा विचार करणे गरजेचे आहे, केवळ शिवाजीच्या विरोधात बोलल्यामुळे त्रागा केल्यास तो निंदनीयच असेल, पण कुरुंदकरांनी शिवाजी अवतारी पुरुष नसून मनुष्यच होते, त्यांना भवानीने कोणतीही तलवार वगैरे दिली नाही, वगैरे म्हणणे हि एकार्थी टीकाच आहे पण ते आक्षेपार्ह वाटत नाही, पण जेम्स लेन मात्र कोणत्याही सकारात्मक कारणाभावी/अभ्यासाअभावी 'सहजपणे' अस्मितेशी निगडीत गोष्टींसंदर्भात विनोद सांगतो हे आक्षेपार्ह वाटत नाही काय? पण बहुदा आपण व्यक्तींविषयी शब्द मांडताना सद्सद्विवेकबुद्धी वापरावी लागते असे आधीच म्हंटले आहे ते इथे देखील लागू पडते काय?

उदा: कम्युनिस्ट पार्टीला शिव्या दिल्या म्हणून चीनमध्ये एका कलाकाराचा छळ चालू आहे. धर्माच्या अपमानाला आंतरराष्ट्रीय मानवी हक्कविषयक कायद्यात समाविष्ट करण्यासंबंधी इस्लामी राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रांत गेली काही वर्षे जे प्रयत्न केले ते अखेर अपयशी ठरले अशी एक बातमी काही दिवसांपूर्वी वाचली होती. तुमचे म्हणणे हे काहीसे त्या दिशेने जाताना दिसते

नाही, मी परत सांगतो, जी विधाने सकारात्मक किंवा चिंतनात्मक असतात अशा विधानांना आक्षेपार्ह मानू नये पण जी विधाने विनाकारण/विना अभ्यास आणि कोणत्याही सकारात्मक दृष्टीने केलेली नसतात आणि ज्यामध्ये सामान्य माणसाच्या अस्मितेला धक्का पोचतो अशी विधाने आक्षेपार्ह असू शकतात. पार्टीचे वर्तन स्वार्थीपणाचे किंवा राजकीय फायद्याचे असू शकते ते निंदनीय आहे.

यामागचे तर्कशास्त्र कोणत्याच लोकाभिमुख न्यायशासनव्यवस्थेत बसणारे नाही. कारण त्याची परिणती अखेर Thoughtcrime मध्ये होते.

मान्य, म्हणूनच कोणत्याही बेजबाबदार वर्तनास किंवा विधानास आक्षेपार्ह मानले गेले पाहिजे हे माझे मत आहे, आता कृतीचा बेजाबदारपणा मोजता येतो पण विधानांचा मोजता येत नाही हि सबब ठीक आहे काय?

थॉट क्राइम आणि मेन्स रिआ

हिंसेपेक्षा त्यामागची भावना/हेतू आक्षेपार्ह मानली/मानला जावी/जावा.
मुळात भावनाच आक्षेपार्ह ठरायला हवी.

यामागचे तर्कशास्त्र कोणत्याच लोकाभिमुख न्यायशासनव्यवस्थेत बसणारे नाही. कारण त्याची परिणती अखेर Thoughtcrime मध्ये होते.

आजूनकोणमी यांना बहुदा मेन्स रिआ म्हणायचे असावे. (असे मला वाटले होते. नेट कनेक्शन नव्हते तेंव्हा त्या काळात त्यांचा प्रतिसाद पाहिला. त्यांना असे म्हणायचे नसावे असे आता दिसते.)

मेन्स रिआ हा गुन्हेगारी कायद्याचा अविभाज्य घटक आहे. गुन्हा कृतीतून करण्याइकीच गुन्ह्यामागची भावना/ हेतू महत्त्वाचा मानला जातो. (मानला जावा असे नाही. मानला जातो.)

थॉट क्राइम म्हणजे गुन्ह्याचा केवळ विचार; कृती नाही. जगात कुठला कायदा (अजून तरी) ही संकल्पना मानतो असे माझ्या तरी माहितीत नाही.

कृती घडल्यास केवळ कृती न पाहता त्या कृतीमागील हेतू विचारात घेणे आवश्यक आहे. (असे कायदा मानतो.)

पण कोर्टात फारसे टिकताना बहुधा दिसत नाहीत; ही प्रगल्भतेच्या दिशेने काही पावले मानता येतील

अंशतः सहमत आहे. म्हणजे प्रगल्भतेच्या दिशेने वाटचाल याविषयी काही म्हणायचे नाही; परंतु "कोर्टाने असा असा निर्णय दिला म्हणून" ते प्रगल्भतेच्या दिशेने पाऊल आहे असे मानले, तर कोर्टाने चुकीचा (पक्षी आपल्याला मान्य नसलेला) निर्णय दिला तर ते अप्रगल्भतेच्या दिशेने पाऊल ठरेल काय? कोर्टाला प्रगल्भतेचे कस्टोडियन म्हणावे काय? श्री जयंत कुलकर्णींच्या एका लेखात नुकतेच वाचनात आले, की कोर्टाने* निकाल दिला - दैवी शक्तीने (ससाबांनी) निर्माण केलेले सोने हे अवैध सोने ठरत नाही, अर्थात कोर्टाने एका अर्थाने दैवी शक्तीला मान्यता दिली. याला प्रगल्भतेच्या दिशेने झालेली वाटचाल म्हणावी काय?

(*मी हा निकाल वाचलेला नाही. श्री जयंत कुलकर्णींच्या लेखात ही माहिती मिळालेली आहे. असा निर्णय खरेच कोर्टाने दिलेला असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही; वाईट वाटण्यात अजून थोडी भर पडेल.)

सहमत

कृती घडल्यास केवळ कृती न पाहता त्या कृतीमागील हेतू विचारात घेणे आवश्यक आहे.

बरोबर, पण हे फक्त कृतीला न लागू पडता अभिव्यक्तीला देखील लागू पडले पाहिजे असा आग्रह आहे. त्याची अंमलबजावणी कदाचित काटेकोर हवी पण अभिव्यक्तीला अमर्यादित स्वातंत्र्य दिल्यास ते अस्मितेला हानिकारक असू शकते.

कोर्ट आणि प्रगल्भता

परंतु "कोर्टाने असा असा निर्णय दिला म्हणून" ते प्रगल्भतेच्या दिशेने पाऊल आहे असे मानले, तर कोर्टाने चुकीचा (पक्षी आपल्याला मान्य नसलेला) निर्णय दिला तर ते अप्रगल्भतेच्या दिशेने पाऊल ठरेल काय? कोर्टाला प्रगल्भतेचे कस्टोडियन म्हणावे काय?

इथे कोर्टाचा निर्णय मला मान्य असणारा आहे की नाही यापेक्षा ज्या अभिव्यक्तीमुळे धर्मसंस्था, कुटुंबसंस्था किंवा शासनसंस्था अशा संस्थांची नालस्ती (किंवा हानी) होऊ शकते अशा अभिव्यक्तीला कडक शासन देण्याऐवजी तो निर्णय तिला लोकशाही प्रक्रियेत बसणाऱ्या टीका किंवा मतभिन्नतेच्या चौकटीत पुरेसा अवकाश देणारा झालेला दिसतो, म्हणून ते प्रगल्भतेच्या दिशेने टाकलेले पाऊल ठरते, असा मुद्दा आहे. कोर्ट हे त्या शासनव्यवस्थेच्या प्रगल्भतेचे (किंवा तिच्या अभावाचे) निदर्शक ठरते; कस्टोडिअन नव्हे.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

थोडे अवांतर

कोर्ट हे त्या शासनव्यवस्थेच्या प्रगल्भतेचे (किंवा तिच्या अभावाचे) निदर्शक ठरते; कस्टोडिअन नव्हे कोर्ट हे शासनव्यवस्थेचा भाग नसल्यामुळे ते शासनव्यवस्थेच्या प्रगल्भतेचे (किंवा तिच्या अभावाचे) प्रतिनिधित्व करू शकत नाही. फार फार तर "स्टेट" च्या प्रगल्भतेचे/ लोकांच्या प्रगल्भतेचे निदर्शक ठरेल असे म्हणता येईल.

मुळात हे निदर्शक वगैरे शब्दप्रयोग फसवे आहेत. कशाला कशाचे निदर्शक मानायचे? झुंडशाहीला समाजाच्या अप्रगल्भतेचे, शासनाच्या बंदीला शासनाच्या अप्रगल्भतेचे, की न्यायालयाच्या बंदीवेरोधातील निर्णयाला पुन्हा शासनाच्या प्रगल्भतेचे? असो. अवांतर आहे. चर्चेत फरक पडत नाही.

शारीरिक हिंसेचे समर्थन

बेजाबदार शब्द/मते चालत असतील तर, तशीच बेजाबदार/भडक भावनेतून आलेली कृती पण चालायलाच हवी. बेजाबदार आणि जबाबदार काय हे ठरवायला हवे हे मान्य, पण, "शब्द चालतील पण कृती चालणार नाही" हे अमान्य.

ह्यापूर्वीही ह्याबाबतीत आपली कुठल्याश्या धाग्यावर चर्चा झाली होती. "शब्द चालतील पण कृती चालणार" हे तुम्हाला अमान्य आहे हे तुमचे मत आहे. आता एखाद्याचे मत ऐकून, ते आवडत नाही म्हणून कुणी त्याला कुणी शारीरिक इजा पोचवली तर ते तुम्हाला चालेल असे दिसते आहे. शारीरिक हिंसेचे समर्थन निंदनीयच आहे.

तुमच्यात आणि सलमान तासीरच्या मारेकऱ्याचे समर्थन करणाऱ्या ब्लासफेमी कायद्याच्या समर्थकांत काही फरक आहे का? भारतातही एक ब्लासफेमी कायदा आणावा असे तुमचे आहे का?

तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बर्‍यापैकी सहमत

:)

---------------------
-धनंजय कुलकर्णी

???

आता एखाद्याचे मत ऐकून, ते आवडत नाही म्हणून कुणी त्याला कुणी शारीरिक इजा पोचवली तर ते तुम्हाला चालेल असे दिसते आहे. शारीरिक हिंसेचे समर्थन निंदनीयच आहे.

१. शाब्दिक हिंसा तुम्हाला कितपत मान्य असेल? तुमच्या श्रद्धास्थानाला/प्रिय व्यक्तींबद्दल सार्वजनिकरित्या गैर बोलल्यास, (ज्यामुळे इतरही तसेच गैर बोलण्याची शक्यता वाढते) तर तुम्ही काय कराल? व तसे का कराल?

२. चालताना/गाडीमध्ये/गर्दीत स्त्रियांना छेडल्यास त्यांनी काय करावे असे आपले मत आहे? त्या स्त्रीने अशा गर्दीत/वेळेत त्या छेडणाऱ्या माणसाला घेऊन योग्य ठिकाणी जाऊन तक्रार करावी असे काहीसे आहे काय?

मान्य

१. शाब्दिक हिंसा तुम्हाला कितपत मान्य असेल?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सीमारेषांच्या आत, अशा सीमारेषा आखल्या असल्या तर, होणारी कुठलीही शाब्दिक हिंसा मान्य आहे.

तुमच्या श्रद्धास्थानाला/प्रिय व्यक्तींबद्दल सार्वजनिकरित्या गैर बोलल्यास, (ज्यामुळे इतरही तसेच गैर बोलण्याची शक्यता वाढते) तर तुम्ही काय कराल?

मारामारी करणार नाही. कुणालाही शारीरिक इजा पोचेल असे कृत्य करणार नाही. मुद्द्यांचा समाचार मुद्दे मांडून करीन. थोडक्यात कायद्यात बसणाऱ्या सगळ्या गोष्टी करीन.

व तसे का कराल?

कारण मला तालिबान्यांप्रमाणे मुंडकी छाटावीशी वाटत नाहीत. आणि ब्रिगेडवाल्यांप्रमाणे तोडफोड करावीशी वाटत नाही.

आता तुम्ही काय कराल व तसे का कराल ते सांगा बरे आजूनकोणमी.

चालताना/गाडीमध्ये/गर्दीत स्त्रियांना छेडल्यास त्यांनी काय करावे असे आपले मत आहे? त्या स्त्रीने अशा गर्दीत/वेळेत त्या छेडणाऱ्या माणसाला घेऊन योग्य ठिकाणी जाऊन तक्रार करावी असे काहीसे आहे काय?

छेडखानी आणि विनयभंग ह्यावर वेगळी चर्चा सुरू करावी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१ सहमत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सीमारेषांच्या आत, अशा सीमारेषा आखल्या असल्या तर, होणारी कुठलीही शाब्दिक हिंसा मान्य आहे.

म्हणजे अमर्यादित अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको, मला देखील हेच म्हणावयाचे आहे.

चुकीचा अर्थ

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सीमारेषांच्या आत, अशा सीमारेषा आखल्या असल्या तर, होणारी कुठलीही शाब्दिक हिंसा मान्य आहे.

म्हणजे अमर्यादित अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको, मला देखील हेच म्हणावयाचे आहे.

"अशा सीमारेषा आखल्या असल्या तर" हा भाग तिथे महत्त्वाचा. अशा सीमा आखलेल्या असतात. म्हणजे कुणी कुणाची बदनामी केल्यास अब्रुनुकसानीचा दावा करता येतो. वगैरे वगैरे. अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको असे अजिबात म्हटलेले नाही किंवा सुचवायचे नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

क्षमस्व

आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याबद्दल क्षमस्व.

-अशा सीमा आखलेल्या असतात.
-अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको असे अजिबात म्हटलेले नाही किंवा सुचवायचे नाही.

ही विधाने थोडी परस्परविरोधी वाटतात, कायद्याने/घटनेने निर्बंधित केलेली अभिव्यक्ती आपणास मान्य आहे(बदनामी/अब्रुनुकसानी वगैरे) असे दिसते, पण कायद्याने निर्बंधित करताना केला गेलेला विचार हा भावनेशी निगडित आहे आणि त्यामुळे भावना दुखावणारी विधाने कायदेशीर दृष्ट्या आक्षेपार्ह ठरतात, आता भावना दुखावण्याचे मोजमाप काटेकोर पणे केले पाहिजे हे मला मान्य आहे, पण प्रत्येक वेळेसच घटनात्मक न्याय मिळेल ह्याची खात्री नसते(छेड/व्यंगात्मक विनोद), मग अशा वेळेस काय करावे असे आपले मत आहे?

वेगळा धागा काढावा असे मत असल्यास माझ्यामते हाच अभिव्यक्तीशी संदर्भित वेगळा धागा आहे, यावर आपल्यास अजून वेगळा धागा काढायचा असल्यास माझी हरकत नाही.

गल्लत

-अशा सीमा आखलेल्या असतात.
-अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको असे अजिबात म्हटलेले नाही किंवा सुचवायचे नाही.

ही विधाने थोडी परस्परविरोधी वाटतात

हं. तुम्ही भरकटता आहात की भरकटवत आहात? 'अशा सीमा आखलेल्या असतात' हे वाक्य कुठल्या संदर्भात आले आहे, का आले आहे बघायला हवे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबत कुठलीही कायदेशीर चौकट मान्य नसणे आणि चौकटी असतात ही गोष्ट सांगणे वेगळी गोष्ट आहे. निर्बंधित केलेली अभिव्यक्ती मान्य आहे असा त्याचा अर्थ निघत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आता?

तुम्ही भरकटता आहात की भरकटवत आहात?

मी निदान तसा प्रयत्न करीत नाहीये.

मी लिहिलेले आपल्याला काहीच मान्य नाही, तेव्हा स्पष्टच विचारतो कि आपल्याला कोणती अभिव्यक्ती मान्य आहे आणि कोणती अमान्य आहे? कुठल्या अभिव्यक्तीबाबत सीमारेखा असायला हवी असे आपले मत आहे? किंवा सीमारेखा कशाबाबत असायला हवी असे आपण म्हणत आहात?

तूर्तास एवढेच

मी ह्या धाग्याला प्रतिसादांत माझे मत शक्य तितक्या स्पष्टपणे मांडले आहे. तेच मत आधीही मांडले होते.

दुर्दैवाने "आमच्या आदरस्थानाबद्दल काही गैर बोलाल ( आणि गैर काय ते ठरवणारेही आम्हीच बरं का) तर याद राखा. नडगी फोडू! मुंडकी छाटू!" असे कुणी म्हटले आणि करून दाखवले तर तुम्हाला त्यात काही गैर वाटणार नाही असे एकंदर दिसते आहे. ती तुमच्यासाठी एक स्वाभाविक, नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्यामुळे तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

समाजगट = संस्थात्मक चौकट

संस्था जरी असल्या तरी शेवटी हानी वैयक्तिकच होत असते बहुदा, त्यामुळेच मी संस्थांशी/समुदायाशी निगडीत भावनांचे उदाहरण घेतले, शिवरायाविषयी काहीही बोलल्यास त्यांची हानी होत नाही पण त्यांचाशी निगडीत वैयक्तिक भावनेची हानी होते/नालस्ती होते.

शिवाजीला वंदनीय मानणाऱ्या समाजगटापैकी काहींच्या मते त्यांच्या भावना दुखावतात. म्हणजे 'शिवाजीला वंदनीय मानणारा समाजगट' ही संस्थात्मक चौकट इथे लागू पडते. वर उल्लेखलेल्या धर्म, शासनसंस्था इ. संस्थात्मक चौकटी जशा व्यक्तीची गळचेपी करतात तद्वत ‘शिवाजीला वंदनीय मानणारा समाजगट’ ही संस्थात्मक चौकट मग इथे एका व्यक्तीची गळचेपी करू लागते. प्रगल्भ लोकशाहीत हे निंदनीय आहे.

जेम्स लेन मात्र कोणत्याही सकारात्मक कारणाभावी/अभ्यासाअभावी 'सहजपणे' अस्मितेशी निगडीत गोष्टींसंदर्भात विनोद सांगतो हे आक्षेपार्ह वाटत नाही काय?

या विधानात इतिहास या ज्ञानशाखेविषयी मूलभूत अज्ञान दिसते. अधिक माहितीसाठी हे पहा.

नाही, मी परत सांगतो, जी विधाने सकारात्मक किंवा चिंतनात्मक असतात अशा विधानांना आक्षेपार्ह मानू नये पण जी विधाने विनाकारण/विना अभ्यास आणि कोणत्याही सकारात्मक दृष्टीने केलेली नसतात आणि ज्यामध्ये सामान्य माणसाच्या अस्मितेला धक्का पोचतो अशी विधाने आक्षेपार्ह असू शकतात. पार्टीचे वर्तन स्वार्थीपणाचे किंवा राजकीय फायद्याचे असू शकते ते निंदनीय आहे.

त्या कलाकाराने चक्क "F . . k your mother, the party central committee." असे म्हणत स्वत:चे नग्न छायाचित्र छापले आहे. कम्युनिस्ट पार्टीला आईवरून शिवी हासडली तर पार्टीवर निष्ठा असणाऱ्या समाजगटाला निश्चितच तुमच्या मतानुसार हानी पोहोचेल.

कोणत्याही बेजबाबदार वर्तनास किंवा विधानास आक्षेपार्ह मानले गेले पाहिजे हे माझे मत आहे.

यासाठी स्टालिनची किंवा ऑरवेलच्या ‘१९८४’तली राजवट हवी. ‘पुरेशी लोकाभिमुखता नाही तद्वत अनेक व्यक्तींच्या संहारासाठी अशी राजवट जबाबदार ठरते’ या कारणास्तव तिला आज प्रगल्भ लोकशाहीत प्रतिष्ठेचे स्थान नाही.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

अस्मिता(भावना) आणि अभिव्यक्ती

शिवाजीला वंदनीय मानणाऱ्या समाजगटापैकी काहींच्या मते त्यांच्या भावना दुखावतात. म्हणजे 'शिवाजीला वंदनीय मानणारा समाजगट' ही संस्थात्मक चौकट इथे लागू पडते. वर उल्लेखलेल्या धर्म, शासनसंस्था इ. संस्थात्मक चौकटी जशा व्यक्तीची गळचेपी करतात तद्वत ‘शिवाजीला वंदनीय मानणारा समाजगट’ ही संस्थात्मक चौकट मग इथे एका व्यक्तीची गळचेपी करू लागते. प्रगल्भ लोकशाहीत हे निंदनीय आहे.

मग हीच शासकीय चौकट दुसऱ्या सामाजिक गटाची भावनिक-गळचेपी दादोजींचा पुतळा हलवून करू लागल्यास ते देखील निंदनीय असेल? लेनच्या प्रकरणानंतरच पुतळा हलविण्याचे प्रकरण घडले, ह्याला (निरोप्या) लेन अप्रत्यक्षरित्या जबाबदार नाही काय? (हा योगायोग होता असे आपण म्हणाल असे वाटत नाही). पण पुतळा हलविला गेला म्हणून लेन वर बंदी आल्यास ती शासकीय संस्थेने केलेली अभिव्यक्तीची देखील(लेनची) गळचेपी असेल हे मान्य.

या विधानात इतिहास या ज्ञानशाखेविषयी मूलभूत अज्ञान दिसते. अधिक माहितीसाठी हे पहा.

आपला लेख वाचला. (तिकडचा मजकूर इथे विना-परवानगी देऊ शकतो कि नाही माहित नाही.)लेखातील राजकीय स्वार्थाचा मुद्दा मला पटतो तो सर्वांच पटतो म्हणून तो थोडा बाजूला ठेवूयात.
लेन निरोप्या असला तरी असे अनेक निरोपे किंवा पाहिजे तो अर्थ अभ्यासातून काढणारे विचारवंत अनेक असतील, अभिव्यक्तीच्या नावाखाली सगळ्यांनाच सूट हवी काय? कि केस-बाय-केस विचार केला जावा?

हे सर्व केवळ अंदाज आहेत; हेच अंतिम सत्य आहे असा लेखकाचा अजिबात दावा नाही. मात्र, विशिष्ट काळात समाजात घडणाऱ्या काही गोष्टींना एका सुसंगत धाग्यात बांधणं शक्य होतं आहे असं जाणवतं, एवढंच

मान्य...पण अमर्यादित स्वातंत्र्य दिल्यास असे अनेक विनोद/तर्क निर्माण होतील आणि ते त्या काळात समाजात घडणाऱ्या गोष्टींशी सुसंगत देखील असतील, ते देखील चालेलच का? विनोद किंवा तर्क हे इतिहासाचा किंवा संशोधनाचा भाग असणे हे दुर्दैवी वाटते, ४०० वर्षापूर्वीच्या एका वंदनीय माणसाविषयी काहीही तर्क/विनोद(संदर्भहीन) तत्कालीन समाज लाऊ शकतो पण त्याला इतिहासाचा भाग केल्यास अजून ८०० वर्षानंतर तो माणूस वंदनीय राहील का? आपले इतिहासाबद्दलचे ज्ञान (माझ्या मूलभूत अज्ञानापेक्षा) जास्त आहे असे समजूयात, असे असल्यास तुम्ही वाचलेल्या बखरी/ऐतिहासिक पुस्तके ह्यामध्ये असे किती विनोद आपणास आढळले ह्याबद्दल थोडा प्रकाश टाकावा.

माझ्यामते वाद हा अस्मिता(भावना) आणि अभिव्यक्तीचा आहे, संशोधन/अभिव्यक्तीच्या/अभ्यासाच्या नावाखाली वंदनीय गोष्टींबद्दल/व्यक्तींबद्दल कुठलाही तर्क/विनोद दिला जाऊ शकतो, अमर्यादित अभिव्यक्ती हवी असल्यास अस्मितेचा त्याग करावा लागेल, पण अस्मितेचा संबंध भावनेशी/अस्तित्वाशी आहे, अस्मितेची किंवा अभिव्यक्तीची डिग्री किती असावी ह्याबद्दल चर्चा होऊ शकेल पण "अस्मिता नकोच" असे म्हणल्यास त्याला विरोध असेल.

कम्युनिस्ट पार्टीला आईवरून शिवी हासडली तर पार्टीवर निष्ठा असणाऱ्या समाजगटाला निश्चितच तुमच्या मतानुसार हानी पोहोचेल.

त्या कलाकारावर झालेली कारवाई हा राजकीय भाग होता, पण निषेधाबद्दल बोलायचे झाल्यास -
समाज-गटास हानी पोचणे शक्य आहे, पण शिव्या घालतो कारण हिंसा करण्याची ताकद नाही असे काहीसे असते, शिष्ठ शब्दात निषेध व्यक्त केल्यास तो समाजगट ती हानी पचवेलही पण शिव्या देणे हा भावनांचा अविष्कार आहे, त्याला प्रतिसाद म्हणून भावनांचा दुसरा अविष्कार देखील मान्य असावा.

यासाठी स्टालिनची किंवा ऑरवेलच्या ‘१९८४’तली राजवट हवी. ‘पुरेशी लोकाभिमुखता नाही तद्वत अनेक व्यक्तींच्या संहारासाठी अशी राजवट जबाबदार ठरते’ या कारणास्तव तिला आज प्रगल्भ लोकशाहीत प्रतिष्ठेचे स्थान नाही.

बेजाबदार वर्तने/विधाने लोकांच्या भावनेशी खेळणारी असतात, भावनाहीन राजवटीला प्रगल्भ आणि लोकाभिमुख म्हणायचे का? हा मुद्दा आहेच.

लेखाची धाटणी आवडली, मथितार्थ पटला नाही

लेखाची धाटणी आवडली, मथितार्थ पटला नाही.

वर अनेकांनी चर्चा केलीच आहे, त्यावेगळे मुद्दे माझ्यापाशी फारसे नाहीत.

बेजाबदार शब्द/मते चालत असतील तर, तशीच बेजाबदार/भडक भावनेतून आलेली कृती पण चालायलाच हवी. बेजाबदार आणि जबाबदार काय हे ठरवायला हवे हे मान्य, पण, "शब्द चालतील पण कृती चालणार नाही" हे अमान्य.

येथे बहुधा शब्द आणि कृती या तुल्य आहेत, अशी जोडी गृहीत धरलेली आहे. असे उदाहरण मला माहीत नाही. लेखक असे उदाहरण देतात :

साधारण पणे तोडफोड/हिंसा आक्षेपार्ह मानली जाते हे मान्य, पण हिंसेपेक्षा त्यामागची भावना/हेतू आक्षेपार्ह मानली/मानला जावी/जावा. पण हेच गणित माझ्यामते सार्वजनिक अभिव्यक्तीला/मत व्यक्त(शाब्दिकरित्या) करण्याला लागू पडते. ...विनोद हा कृती करण्याचे धाडस नाही म्हणून केला जातो, त्यामुळे असा विनोद देखील आक्षेपार्ह ठरायला हवा जो कृतीला पर्याय म्हणून केला जातो.

हे नीट कळले नाही, किंवा पटले नाही. "आक्षेपार्ह" म्हणजे काय? "भावना/हेतू असल्यास त्यास शासकीय-सामाजिक बळजबरीने प्रतिरोध करण्यालायक" असा अर्थ होतो काय? हा तर कठिण प्रकार आहे. की "आक्षेप स्पष्ट आवाजात - अभिव्यक्तीने - नोंदवण्यालायक" असा अर्थ घ्यायचा आहे? आक्षेप तर नोंदवता येतोच. त्यात युक्तिवाद म्हणून नवे काय?
हिंसक कृती करायचे धाडस नाही, म्हणून काही लोक विनोद करतात, अशी उदाहरणे दिसतात खरी. माझ्या मते, पर्याय म्हणून हे त्यातल्या त्यात बरे आहे. प्रथम बाबतीत हिंसा रोखण्याची शासकीय-सामाजिक यंत्रणा हवी, तर दुसर्‍या बाबतीत आक्षेप तितक्याच तिखट विनोदी अभिव्यक्तीने नोंदवता येतो.

काही (ऐतिहासिक दृष्ट्या) दुर्बळ व्यक्तींच्या हालचालीवर मर्यादा घालण्याकरिता शब्द वापरले जातात. या शब्दांना पाठबळ म्हणून झालेल्या शारिरिक हिंसेची बातमी चांगली कर्णोपकर्णी असते. अशा परिस्थितींमध्ये दुर्बळ व्यक्ती शब्दांना घाबरून स्वतःच्या वर्तणुकीवर मर्यादा घालतात, असे आपल्याला दिसते. ज्या समाजात स्त्रिया ऐतिहासिक दृष्ट्या दुर्बळ असतात, त्या समाजांत स्त्रियांची छेडछाड ही अशा प्रकारची असते. अशा बाबतीत काही समाजांत "दुर्बळांच्या सुरक्षेसाठी हिंसक कृतीचे पाठबळ असलेल्या अभिव्यक्तीवर बंधन" अशा काही मर्यादा असतात. (प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन.) मात्र अशा परिस्थितीत ऐतिहासिक दुबळेपणा अतिशय सुस्पष्ट आणि सिद्ध असावा लागतो.

उदाहरणार्थ यू.एस.अमेरिकेत "गर्भपात करून घेण्यास जाणारी स्त्री" हिच्या सुरक्षेसाठी काही मर्यादा आहेत. क्लिनिकपर्यंत चालताना आडथळा होणार नाही, इतके अंतर ठेवून तिच्याविरुद्ध घोषणाबाजी करता येते, त्यापेक्षा जवळ जाऊन बोलता येत नाही. हल्लीच कोर्टाने निकाल दिला की मेलेल्या व्यक्तीविरुद्ध घोषणाबाजी करताना प्रेतयात्रेच्या मार्गापासून अमुक-इतके-शे यार्ड दूरून घोषणाबाजी करावी लागते. वगैरे.

अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हिंसक कृतीच्या साठी पर्याय असलेल्या शब्दांवर पूर्ण बंदी नसते. फक्त दुर्बळ व्यक्तीचे कृतिस्वातंत्र्य काही प्रमाणात शाबूत राहील, इतपत कमीतकमी मर्यादा घालायच्या असतात.

अपमान वाटून घेणार्‍या व्यक्तीकडे ऐतिहासिक दुबळेपणा नसेल, तर धाडस नसलेल्या दुबळ्याने केलेल्या विनोदी "पर्यायी शब्दां"च्या धमकीने त्याच्या कृतींवर फारसे बंधन येत नाही. ("कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही" या म्हणीचा असाच काही अर्थ लागतो.) अशा परिस्थितीत धाडस-नसलेल्या-दुबळ्याच्या विनोदावर बंदी घालण्याचे काय प्रयोजन आहे ते कळत नाही.

मला तरी वाटते, की "स्त्रियांची छेडछाड रोखावी" या विषयी "दुबळेपणा सिद्ध असलेल्या व्यक्तींबाबत कृतिस्वातंत्र्य राखण्यासाठी प्रोटेक्टिव्ह डिस्क्र्मिनेशन" होत आहे, आणि ही बाब वरील लेखातील बर्‍याच उदाहरणांपेक्षा वेगळी आहे. "मुंबई गुजरातेत विलीन करावी" असे नारे देणारी व्यक्ती अखंड महाराष्ट्र चाहणार्‍या व्यक्तीचे कुठलेच कृतिस्वातंत्र्य मर्यादित करत नाही. "मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे" असे उलट नारे अगदी सहज देता येतात, हे तर आपल्याला माहीतच आहे.

फरक

प्रतिसादासाठी धन्यवाद.

अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हिंसक कृतीच्या साठी पर्याय असलेल्या शब्दांवर पूर्ण बंदी नसते. फक्त दुर्बळ व्यक्तीचे कृतिस्वातंत्र्य काही प्रमाणात शाबूत राहील, इतपत कमीतकमी मर्यादा घालायच्या असतात.

(हा मुद्दा आपल्या प्रतिसादाचा गर्भितार्थ आहे असे गृहीत धरून)
व्यक्ती/समाजगट दुर्बल असू शकतो हे स्वीकारल्यास मर्यादा घालणे गरजेचे असते, त्या कमीत-कमी असाव्यात ह्यास सहमत. पण अस्मितेला भावनिक दुर्बलता म्हणणे थोडे अयोग्य वाटते, अस्मितेचे नाते अस्तित्वाशी असते, समाजात असलेल्या आदर्शांबद्दल सकारात्मक भावना असणे हे दुर्बलतेचे लक्षण नाही, ते आदर्श टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा त्याबद्दल असणाऱ्या भावनेचे संरक्षण करण्याचा हक्क देखील असायला हवा असे वाटते. अभिव्यक्ती चिंतनात्मक अभ्यासातून त्या आदर्शांबद्दल काही नकारात्मक बोलत असतील तर त्याला देखील संरक्षण हवे, पण विनोद नालस्ती ह्यार्थी चालवून घेतले पाहिजेत काय असा प्रश्न निर्माण होतो?

समाजांत स्त्रियांची छेडछाड ही अशा प्रकारची असते. अशा बाबतीत काही समाजांत "दुर्बळांच्या सुरक्षेसाठी हिंसक कृतीचे पाठबळ असलेल्या अभिव्यक्तीवर बंधन" अशा काही मर्यादा असतात. (प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन.) मात्र अशा परिस्थितीत ऐतिहासिक दुबळेपणा अतिशय सुस्पष्ट आणि सिद्ध असावा लागतो.

छेडछाड आणि व्यंगांवर टीका ह्या दोन्ही बाबतीत आपण म्हणता त्याप्रमाणे मर्यादा असणे गरजेचे असते. छेडछाड आणि व्यंग हा दुबळेपणा सिद्ध आहे. पण इथे मुद्दा असा आहे कि ह्या प्रकारांमध्ये प्रत्येक वेळेसच न्यायालयीन मार्ग अवलंबणे शक्य नसते(गर्दीत/घाईमध्ये/वेळ आणि परिस्थितीअभावी), त्यावेळेस त्या दुर्बलाला छेड काढणाऱ्या माणसाच्या शारीरिक दुर्बलतेचा फायदा घेऊन इजा करण्याचा हक्क हवा असे मत आहे, छेड काढली गेली/मानसिक त्रास झाला हे मात्र अतिशय सुस्पष्ट आणि सिद्ध असावे लागेल.

"मुंबई गुजरातेत विलीन करावी" असे नारे देणारी व्यक्ती अखंड महाराष्ट्र चाहणार्‍या व्यक्तीचे कुठलेच कृतिस्वातंत्र्य मर्यादित करत नाही. "मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे" असे उलट नारे अगदी सहज देता येतात

शक्य, पण, सत्ताधारी लोकांनी केलेल्या विधानांमध्ये कृतिस्वातंत्र्य मर्यादित होण्याचा धोका असतो, म्हणून त्यास संरक्षण हवे असे वाटते.

या उदाहरणांत सत्ताधारी कोण आणि दुबळे कोण?

तुम्ही वरील लेखांत काही उदाहरणे दिलेली आहेत :

(१) जेम्स लेन, शिवरायांबद्दल काय विनोद केला जातो ह्याचे आपल्या माहितीपर पुस्तकात स्मरण करून देतो,
(२) धर्माने मुसलमान असलेला एम.एफ.हुसेन भारतात सरस्वती, भारतमाता, द्रौपदी ह्यांची नग्न चित्रे काढतो,
(३) पुण्यात दादोजींचा पुतळा सत्ताधाऱ्यांकडून लाल महालातून हलविला जातो,
(४) कुठला तरी पाणीपुरीवाला शौचाचे भांडे पाणीपुरी साठी वापरतो किंवा अजून अशी बरीच उदाहरणे आहेत/असतील. अश्या प्रकारांमध्ये शिवसेना किंवा मनसे त्यांच्या संघटनेच्या ताकदीचा वापर करून विरोध दर्शवितात, त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते किंवा जाहीरपणे दहशत बसावी असे कृत्य दिसते, किंवा क्वचित मारहाण देखील होते.

या उदाहरणांत् सत्ताधारी कोण आणि दुबळे कोण आहे? मुद्दा ३ मध्ये कदाचित महानगरपालिकेतले अधिकारी "सत्ताधारी" आहेत. पण शिवसेना किंवा मनसे हे दुबळे कसे? पहिल्या दोन मुद्द्यांत तर अभिव्यक्ती करणारे सत्ताधारी नाहीत, आणि मालमत्तेची नासधूस करणारे त्यांच्या मानाने दुर्बळही नाहीत.

(खरे तर मुद्दा ४ तुम्ही लेखात का घातला आहे, हे मला नीट कळलेले नाही. लपून-छपून कोणास अस्वच्छ/किळसवाणी/रोगदायी अन्न खायला देणे ही "अभिव्यक्ती" नसावी, शारिरिक हानी असावी, असे मला वाटते. वाटल्यास तो मुद्दा सोडूया.)

पण अस्मितेला भावनिक दुर्बलता म्हणणे थोडे अयोग्य वाटते, अस्मितेचे नाते अस्तित्वाशी असते, समाजात असलेल्या आदर्शांबद्दल सकारात्मक भावना असणे हे दुर्बलतेचे लक्षण नाही, ते आदर्श टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा त्याबद्दल असणाऱ्या भावनेचे संरक्षण करण्याचा हक्क देखील असायला हवा असे वाटते.

हे कळले नाही. हे सर्व सापेक्ष असावे, असे वाटते. तुमच्या लेखातून फुले किंवा अंबेडकरांची वक्तव्ये "सुयोग्य स्वातंत्र्य" मानली गेली आहेत असे वाटते. ही पश्चाद्बुद्धी असावी. विधवांचा विवाह हा अनैतिक आणि घाणेरडा प्रकार आहे, आणि असा आदर्श असणे त्यांच्या अस्मितेचा भाग आहे, असे मानणारे लोक त्या काळी होते. त्यांचे चुकले होते असे तुम्हाला आता वाटत असेल, किंवा फुल्यांची मते चिंतनातून आलेली होती असे तुम्हाला आता वाटते. त्या लोकांना वाटले नसते. चवदार तळ्याचा "विटाळ" झाल्यास त्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा भंग होतो असे म्हणणारे लोक महाडात भरपूर होते.
उलट मी वर दिलेल्या विश्लेषणाने त्या काळातसुद्धा (पश्चाद्बुद्धीने नव्हे) नीरक्षीरविवेक होऊ शकतो : विधवांचा विवाह अनैतिक ते लोक त्या काळात सत्ताधारी होते, आणि खुद्द विधवा म्हणा, किंवा त्यांच्याशी विवाह करण्यास उत्सूक तरुण, हे त्या काळात दुर्बळ होते. कर्मठांच्या भावना-अस्मिता वगैरे काहीही असोत, त्यांना फुले (किंवा कुठल्या विधवेच्या) वक्तव्याने धक्का बसला तरी हिंसेचा हक्क मिळत नाही.

फरक

या उदाहरणांत् सत्ताधारी कोण आणि दुबळे कोण आहे? मुद्दा ३ मध्ये कदाचित महानगरपालिकेतले अधिकारी "सत्ताधारी" आहेत. पण शिवसेना किंवा मनसे हे दुबळे कसे? पहिल्या दोन मुद्द्यांत तर अभिव्यक्ती करणारे सत्ताधारी नाहीत, आणि मालमत्तेची नासधूस करणारे त्यांच्या मानाने दुर्बळही नाहीत.

ते मुद्दे सांगताना मी दुबळेपणा हा शब्दप्रयोग केला नव्हता, दुबळेपणा हा शब्दप्रयोग व्यंग असलेले किंवा स्त्रिया ह्यांना लागू पडतो असे नंतरच्या चर्चेत आले.

खरे तर मुद्दा ४ तुम्ही लेखात का घातला आहे, हे मला नीट कळलेले नाही.

झुंडशाही म्हणजे काय ह्याचे उदाहरण म्हणून तो मुद्दा होता, त्या परिच्छेदात सर्व झुंडशाहिचीच उदाहरणे होती.

हे कळले नाही. हे सर्व सापेक्ष असावे, असे वाटते. तुमच्या लेखातून फुले किंवा अंबेडकरांची वक्तव्ये "सुयोग्य स्वातंत्र्य" मानली गेली आहेत असे वाटते. ही पश्चाद्बुद्धी असावी. विधवांचा विवाह हा अनैतिक आणि घाणेरडा प्रकार आहे, आणि असा आदर्श असणे त्यांच्या अस्मितेचा भाग आहे, असे मानणारे लोक त्या काळी होते. त्यांचे चुकले होते असे तुम्हाला आता वाटत असेल, किंवा फुल्यांची मते चिंतनातून आलेली होती असे तुम्हाला आता वाटते. त्या लोकांना वाटले नसते. चवदार तळ्याचा "विटाळ" झाल्यास त्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा भंग होतो असे म्हणणारे लोक महाडात भरपूर होते

आपण जी उदाहरणे सांगत आहात त्यामध्ये एका समाजाचा/गटाचा/स्त्रियांचा ऱ्हास होत होता, त्यांना किमान समान वागणूक मिळावी ह्यासाठी केलेला कोणताही प्रयत्न तत्कालीन समाजाला आक्षेपार्ह वाटला असेल पण त्यामध्ये असणारा सकारात्मक दृष्टीकोन/अथवा एका गटाची उन्नती हि गोष्ट लेन अथवा हुसेन प्रकारात आढळत नाही. त्यामुळे लेन किंवा हुसेन ह्यांच्या कार्यास फुले/आंबेडकरांप्रमाणे सकारात्मक बैठक असेल असे पश्चाद्बुद्धीने देखील वाटणार नाही.

तरीदेखील सापेक्षता शक्य आहे, म्हणूनच दादोजींचा पुतळा अमुक एका समाज-गटाला खुश करण्यासाठी हलविला गेला हे निंदनीय वाटते. निरपेक्षेतेसाठी मी उदाहरण शिवरायांचे घेतले, माझ्यामते महाराष्ट्रात शिवराय हे निरपेक्ष वंदनीयतेचे उदाहरण आहे, त्यांच्याबद्दलच्या संशोधनात जे व्यक्त केले जाते(विनोद) आणि तो इतिहास म्हणून मान्यता पावण्याची शक्यता असल्यास त्या वंदनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो, हे म्हणजे घरातील ज्येष्ठ माणसाबद्दल कोणी विनोद/तर्क केल्यास आणि त्याला विरोध न झाल्यास अमुक एका काळानंतर तो तर्क माहिती म्हणून सांगितला जाऊ शकतो.

बहुतांश लोक जिला मान्यता देतात तीच अस्मिता असावी असे देखील समजण्यास मी तयार आहे, पण तुम्हाला किंवा इतर विचारवंताना मुळात अस्मिता एकूणच निरर्थक वाटते असे दिसते, असे आहे काय? आपल्या मते अस्मितेची व्याख्या काय असेल?

"अस्मिता" मायावी असावी

"अस्मिता" मायावी असावी. येथे "मायावी" शब्द शंकराचार्य वगैरे वापरतात त्या अर्थाने तांत्रिक शब्द म्हणून वापरला आहे.

मी स्वतःच्या दृष्टीने उत्त्तर देतो. "इतर विचारवंतां"चे मला काही माहीत नाही. सर्व मनुष्य विचारवंत असतात - तुम्ही देखील विचारवंत आहात. माझ्यावेगळे-इतर-विचारवंत यात तुमचा समावेश आहे. ज्याअर्थी तुम्ही मला कुतूहलाने प्रश्न विचारत आहात, त्या अर्थी जे उत्तर मी येथे देत आहे, ते "तुम्हासह-अन्य-विचारवंतां"च्या वतीने नाही, हे स्पष्टच आहे.

"अस्मि-ता" म्हणजे "मी-आहे-ही-भावना" असे काही असते खरे. पण या अस्मिता ही संदर्भानुसार असावी, असे अनुभवातून दिसते. म्हणजे एखाद्या प्रसंगात एखादा मनुष्य "मी बाप आहे" अशी पितृ-अस्मिता जाणवून वागेल. दुसर्‍या एखाद्या प्रसंगात "मी कन्नडिगा आहे, माझे कुटुंब कन्नडिगा आहे" अशी कन्नडिग-अस्मिता जाणवून वागेल. कुठला संदर्भ आहे ते काटेकोरपणे माहीत असले, तर "अस्मिता" या संकल्पनेला त्या संदर्भापुरता अर्थ देता येईल. म्हणजे अस्मिता पूर्णतः/एकूणच निरर्थक नाही. पण त्या संदर्भाबाहेर केवळ निरर्थकच नव्हे तर अनर्थकारी असू शकते. त्या माणसाचे मूल कन्नड नीट बोलत नसेल, तरी त्या माणसाची "बाप" ही अस्मिता टिकून राहू शकेल. आपल्या मुलांशी तो इंग्रजीतही बोलत असेल. अवचित भेटलेल्या कन्नडभाषक लोकांशी भडभडून शुद्ध कन्नड बोलताना त्याची कन्नडिग-अस्मिता बलवत्तर असेल. वगैरे.

दादोजींचा पुतळा अमुक एका समाज-गटाला खुश करण्यासाठी हलविला गेला हे निंदनीय वाटते.

जरूर निंदा करा. निंदा करण्याचा विरोध केलेला आहे, असे मी म्हटलेले नाही. पण ढिसाळ शब्दप्रयोगामुळे मी असे म्हटल्याचा आभास होत असेल, तर स्पष्ट करू इच्छितो - तुम्ही तशी निंदा करायला माझा विरोध नाही.

किमान समान वागणूक मिळावी ह्यासाठी केलेला कोणताही प्रयत्न तत्कालीन समाजाला आक्षेपार्ह वाटला असेल पण त्यामध्ये असणारा सकारात्मक दृष्टीकोन/अथवा एका गटाची उन्नती हि गोष्ट लेन अथवा हुसेन प्रकारात आढळत नाही.

लेन किंवा हुसेन यांना विचारा. (याबाबत चित्रा यांनी दीर्घ प्रतिसाद दिलेला आहे.) ते म्हणतील की सकारात्मक दृष्टिकोन आहे. किंवा चित्रे सुंदर वाटतात त्या लोकांची उन्नती होते. अथवा लोकप्रवादात विनोद काय आहेत, त्याची नोंद करू इच्छिणार्‍यांची उन्नती होते.

त्यामुळे लेन किंवा हुसेन ह्यांच्या कार्यास फुले/आंबेडकरांप्रमाणे सकारात्मक बैठक असेल असे पश्चाद्बुद्धीने देखील वाटणार नाही.

आता पश्चाद्बुद्धीने कोणाला काय वाटते, ते सांगणे कठिण आहे. विजय तेंडुलकर किंवा करंदीकरांच्या विरूपिका ही तर आपल्या (किंवा आदल्या) पिढीतील आपण बघितलेली उदाहरणे. त्यांच्या कलाकृती ताज्या असताना "या कलाकृतींमध्ये विकृतीशिवाय काहीही नाही" असे ठामपणे म्हणणारे पूर्वी ज्या प्रमाणात होते, त्या प्रमाणात आजकाल दिसत नाहीत.

चर्चा

झुंडशाही म्हणजे देशद्रोहच हा राजीव साने यांचा चर्चेला घेतलेला लेख आठवतो.
बाकी मानसिक छळ हे फारच सापेक्ष आहे.
प्रकाश घाटपांडे

 
^ वर