नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली.....
प्रिय वाचक,
अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला.
अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले.
अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत.
आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे. मात्र नाडी ग्रंथकर्त्या महर्षींची असीम कृपा असल्याने मला त्या लोकांच्या विकृत विचारांवर भाष्य करायला संकोच वा दडपण येत नाही. असे मी मानतो. एरव्ही माझ्या सारख्या शिपाईगड्याला या फंदात पडायचे कारण काय?
कारण अंनिस वा तत्सम विचारकांचा निर्णायक पराभव महर्षींच्या या ग्रंथांतून झालेला आहे. मी त्याला निमित्तमात्र आहे. आता आपणांस तो हळू हळू कळतोय म्हणून असे अवस्थ वाटते इतकेच.
मला सांगा की आपणही, म्हणजे वाचन करणाऱ्या सर्वच लोकांना उद्देशून मी म्हणतोय, नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला का नाकारता आहात?
एकांनी उदाहरण दिले आहे की गॅलिलीओने त्याने बनवलेल्या दुर्बिणीतून पहायला, त्यावेळच्या तथाकथित धार्मिक नेत्यांना आग्रह केला गेला होता. त्यांनी अनुभव घ्यायला दिलेला नकार नंतर प्रतिगामीपणाचे लक्षण मानते गेले. आता नेमके या उलटे घडते आहे. नाडीग्रंथप्रेमीजन, जे या नाडीभविष्यावर विश्वास ठेवतात (मी फक्त नाडी ग्रंथांबद्दल बोलतोय सरसकट फलज्योतिषाबद्दल मला सांगायचे नाही) त्यांना पुरोगामी विचारधारेचे लोक प्रतिगामी मानतात. असे “प्रतिगामी” असा शिक्का बसलेले लोक “पुरोगामी म्हणून गौरवल्या गेलेत्या व्यक्तींना” आवर्जून भेटून सांगताहेत, “आपण याचा अनुभव घ्या व आम्हा सामान्यांना न उलगडले गेलेले कोडे सोडवायच्यासाठी मार्गदर्शन करा”. अशा वेळी त्यांनी नाडीग्रंथांच्याकडे कुत्सितपणे दुर्ल्क्षून तोंड वळवणे म्हणजे पुर्वीच्या धार्मिक नेत्यांनी केलेली चूकच ते परत उगाळत नाहीत काय? याच लोकांचा अन्य केसेसमधे अनुभव, पुन्हा अनुभव असा वारंवारितेचा नियम म्हणून अनुभवावर जोर असतो. मात्र नाडी ग्रंथाचा वारंवार अनुभव घेण्याची वेळ आली की त्यांचे पाय जड होतात. ‘काही गोष्टी फक्त तर्काने वा शाब्दिक वादाने सुटू शकत नाही. त्याला अनुभवाचे पाठबळ लागते’. असे आम्ही म्हणतोय तर ते आम्ही अनुभव घेणार नाही व घ्यायची गरजही नाही असे समर्थन करत हटून बसले आहेत. वर आम्हालाच हट्टी हा खिताब ते देतात.
प्रत्येकाला माझ्यासारखेच अनुभव यावेत असे मी कधीच म्हणणार नाही. मला हे मान्य आहे की काहींना जास्त प्रभावी तर काहींना अत्यंत सामान्य अनुभव मिळतील. ते तसे का मिळतात याचा ही विचार करावा लागेल.
नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत व्यक्तीची नावे व अन्य माहिती जरी कोरून येत नसेल तरीही ती येते असे मी म्हणत असेन तर ते जितके खोटे असेल तितकेच नाडीताडपट्टीत ती माहिती येत असूनही ती ताडपट्टीत लिहिलेली नाही किंवा नसतेच असे मी म्हटले तर ते खोटे असेल. अशा परिस्थितीत मला जे सत्य आहे त्याबाजूने उभे राहायला लागणार. नाही तर मी माझ्या अनुभवाशीच प्रतारणा केल्यासारखे होईल. मात्र ती प्रतारणा मी कुठल्याही वैचारिक बांधिलकीशी केलेली नसल्याने खऱ्या अर्थाने मी पुरोगामी ठरतो. भले याठिकाणी लोक मला काही का समजेनात.
अंनिसवाल्यांचे सोडा. ते काही नाही करत तर नाही. कोणाच्या उगाच मागेलागून काही उपयोग नाही. पण आपण म्हणजे आपणांसारख्या सर्व जागृत विज्ञानवादी पुरोगामी विचारवंतांना, विरोधकांना नाडी ग्रंथ प्रेमी अशी विनंती करताहेत की आपले भविष्य कथन म्हणून नको तर एका सुहृदाने एक पत्र आपणाला लिहिले आहे. ते वाचा. आग्रह नाही विनंती. पहा तर मग का घडते ते..
आता तर आपल्या सभासद परिवारातील एक मराठीभाषी सभासद नाडीपट्टीतील कूट तमिल वाचनासाठी प्रयत्नशील आहे. त्याने नाडी ग्रंथांचा अनुभव घेतला आहे असे त्याने आपणहून अन्य ठिकाणी नमूद केले आहे. त्यामुळे भाषेचा वा लिपीच्या अडथळ्याचा प्रश्न फार गहन राहिलेला नाही. त्यामुळे अंनिसवाले पुढे करतात ती नेहमीची लंगडी सबब की ‘तमिल जाणकार मिळत नाही हो नाही तर नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती’ आता पुढे करता येणार नाही
Comments
हय्योंची वेगळी ओळख आवडली.
प्रियालींना ओळख आवडली...
चला. हे ही नसे थोडके!
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९
ग्यानबाचे तर्कट
सिद्ध करा: क > १०००
उपलब्ध माहिती: क > ख
गृहीतकः ख ≡ ० (mod ७)
∴ क > १०००, QED
--
बाकी, भारतीय ज्ञानाची आणि तिच्या अभ्यासाचा दावा करणार्या हैयो हैयैयो यांची महती बाटग्यांच्या प्रमाणपत्रामुळे मान्य करतील अशा सुडोसेक्युलर मनोवृत्तीचे कोणीही उपक्रमींमध्ये नसावेत असा माझा अंदाज आहे.
वा!
अभिप्राय महत्त्वाचा वाटला!
बाकी वर श्री. राही म्हणतात त्याप्रमाणे "हैयो हैयैयो यांची विद्वत्ता त्यांच्या जालीय लिखाणावरून लक्षात आली होतीच" त्याला बळकटी मिळाली. श्री. हैयो हैयैयो यांची ओळख करून देण्याची 'इश्टाईल' आवडली! :)
श्री. हैयो हैयैयो यांना 'वस्तुनिष्ठ' संशोधनासाठी शुभेच्छा!
एक शंका मनात आली: पुढे कालांतराने, श्री. हैयो हैयैयो यांना अभ्यासाअंती समजले (सिद्ध झाले) की नाडीमधे पुरातन तमि़ळ असली तरी त्या आधारे चाललेला भविष्य कथनाचा धंदा ही मिथ्या असून तो एक लोकांना लुबाडण्याचा धंदा आहे तर श्री ओकांची भुमिका काय असेल?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
अभ्यासविषय
>>एक शंका मनात आली: पुढे कालांतराने, श्री. हैयो हैयैयो यांना अभ्यासाअंती समजले (सिद्ध झाले) की नाडीमधे पुरातन तमि़ळ असली तरी त्या आधारे चाललेला भविष्य कथनाचा धंदा ही मिथ्या असून तो एक लोकांना लुबाडण्याचा धंदा आहे तर श्री ओकांची भुमिका काय असेल?
नाडी आधारे चाललेले भविष्यकथन हे हैयो हैय्यैयो यांच्या अभ्यासाचा विषय आहे याविषयी साशंक आहे. हैयो हे बहुधा फक्त लिपीविषयीच अभ्यास करीत आहेत.
(उलट हैयोंच्या अभ्यासातून "अ" ही गोष्ट सिद्ध झाली तर "ब" ही आपोआप सिद्ध समजण्याचा ओक यांचा हेतू असावा. नाडीमधली लिपी कोणती हा खरेतर एकूण नाडी या विषयावर असलेल्या आक्षेपांपैकी क्षुल्लक आक्षेप आहे. त्या आक्षेपाला अवास्तव महत्व देऊन आणि त्याबाबत वारंवार लिहून ओक मोठ्या/मूळ आक्षेपांना बगल देऊ पहात आहेत).
नितिन थत्ते
+१
सहमत आहे.
खुद्द हैयो हैयैयो यांनीच दिवाळी अंकात लेख लिहून असली काहीशी सुरवात केली होती असे वाटते.
यानिमित्ताने धनंजय यांचा हस्तलिखित साखळीपत्रांतील लिपी आणि आकड्यांची कूट-नोंद - लेख पुन्हा वाचायला मजा आली.
अरेरे
असे असल्यास हैयो हैय्यैयो यांना विनंती आहे की याद्वारे सत्यासत्याचा शोध घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून किमान लोकांची चाललेली लुबाडणूक थांबवावी.
श्री हैय्यैय्यो,
सदर अभ्यास हा प्रताधिकाराच्या अधिन असेल का? नसल्यास तो तसा ठेवावा ही विनंती जेणेकरून त्याचा भविष्यातील असा दुरूपयोग / परवानगीवाचून केलेल्या उपयोगावर काहितरी करता येईल. शिवाय तुमच्यावर असा लेख लिहिण्याची / तुमचा अभ्यासविषय उघड करण्याची परवानगी तुम्ही श्री ओक यांना दिली नसल्यास हे त्यांनी परस्पर जाहिर करणे हेच मुळात अशिष्ट आहे असे मला वाटते.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
लेख कळला नाही
मला हा लेख कळलाच नाही. ह्या लेखात जन्माने भारतीय नसलेल्या एका भाशा अभ्यासकाने भारतातील एका भाशेचा अभ्यासक म्हणून मोठे वलय प्राप्त केले आहे. पण त्या व्यक्तीच्या अभ्यासाचे क्शेत्र 'प्रांतिय अस्मिते' मुळे संकुचित आहे. ह्याला बहुदा कारण त्या व्यक्तीला सुरवातीला (विद्यार्थी दशेत असताना) ज्या व्यक्तीकडून (शिक्शकाकडून) शिक्शण मिळाले ती व्यक्ती 'प्रांतिय अस्मिते' मुळे संकुचित दृश्टीची होती, असे वाटते.
पण ह्या गोश्टीचा श्री. हैयैयो ह्यांच्या काय संबंध कसा लावला गेला? तर, त्या परदेशी व्यक्तीने त्यांना कमांडर म्हटले, कॉफी पाजली, आत्मियतेने संभाशण केले.
श्री. हैयैयो यांचा ब्राह्मी लिपीवरील लेख माझ्या वाचनात अजून तरी आलेला नाही. उपक्रमवर असेल तर तो कृपया त्याचा दुवा द्यावा. नसेल तर, त्यावर त्यांनी लवकरच लेख लिहावेत, अशी मी त्यांना विनंती करतो. 'इंद्राचे व्याकरण' हे काय लफडे आहे? ते मला कळलेले नाही आहे. तसेच, त्याचा तमिळ भाशेशी काय? व कसा संबंध आहे? तेही कृपया समजवावे.
'इंद्राचे व्याकरण' हे काय लफडे आहे?
सतीशजी,
१) आपण लिहिल्यापासून मी तेच लेखात शोधतोय !
२) हैयोंनी ब्राह्मीवर उपक्रमसाठी पुढील दिपावली अंकासाठी लेख लिहिवा अशी मी त्यांना विनंती करतो.
३) डॉ. सॅम्युएल विदेशी नाहीत. आनंद व विजय अमृतराज प्रमाणे तमिळ ख्रिश्चन आहेत.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९
चुकलेच! ते लफडे माझेच होते.
अर्ध मनात राहिले व अर्धे लिखाणात उतरले. याबद्दल माफि असावी. मी स्वत: ब्राह्मी लिपी काय आहे?, तिची पार्श्वभूमी काय आहे? तीचे व्याकरण कसे होते? इत्यादी गोश्टी सध्या समजून घेण्याचा इटुकला-पिटुकला प्रयत्न करीत आहे.
काही ठिकाणी महेश्वराचे व्याकरण, ब्रह्स्पतिचे व्याकरण, 'इंद्राचे व्याकरण', बोपदेवाचे व्याकरण असे उल्लेख वाचायला मिळाले होते. त्या विशयीची माहिती शोधत आहे. श्री. हैयैयो यांना ब्राह्मी लिपीची सखोल माहिती आहे, असे तुमच्या लेखातून व्यक्त होत आहे. हे कळताच मी वरील सगळी माहिती मनात गृहित धरली व थेट (आयतेच मिळतेय म्हणून हावरटासारखे, मॅनर्स न पाळताच, ) विचारले, 'इंद्राचे व्याकरण' काय आहे? कारण ते मला कळले कि, त्यानंतर ब्रह्स्पतीचे व त्यानंतर महेश्वराचे व्याकरण समजून घेण्याची माझी मनिशा आहे. पाणिनीला नंतर बघून घेईन.
Graamatic kaartika या ग्रंथात खालील पदे आहेत असे एका इंग्रजी लेखात आढळले. मी माझ्या परीने त्याचे मराठिकरण केले आहे.
समुद्रवत् व्याकरणं महेश्वरे। - समुद्रासमान व्याकरण महेश्वराचे।
तदर्ध कुंभौद्धरणं बृहस्पतौ। - त्याचा अर्थ मडक्यात मावेत इतका केला बृहस्पतीने
तद्भागाच्चशतं पुरंदरे। - त्याचे (ही) एक शतांश केले पुरंदराने (इंद्राने)
कुशाग्र बिंदुत्पतितौ हि पाणिनौ।। - त्याचे गवताच्या पात्याच्या अग्रावर मावेल इतके (सुक्श्म) केले पाणिनीने
या सार्यांचा ब्राह्मी व त्याआधीच्या लिपी, दक्शिणेतल्या लिपींशी संबंध आहे हे जाणून होतो. महेश्वरी संकेतपद्धतीतून ब्राह्मी व दक्शिणेच्या लिपी विकसित होत गेल्या. तमिळ मला कळत नाही. तिचे व्याकरण, लिपीचा पूर्व-इतिहास याबद्दल माहिती हवी आहे. श्री. हैयैयो यांकडून ती मिळाली तर माझा खूप वेळ व परिश्रम वाचतील, असे वाटले होते.
-आळशीराम
पांघरुणे
लेख जरा उशीराने वाचला. सहसा तुमचे लेख वाचल्यावर हाती तथ्य बरेच कमी लागते. याचे कारण अनेक गोष्टींवर पांघरुणे घातली असतात.
हैयो हैयेयो यांच्या परिचयाचा लेख वेगळ्या शीर्षकाखाली देणे हा त्यातीलच प्रकार. (एखाद्याचा परिचय त्याच्या चरित्राने, नावाने न देण्याचा प्रकारही त्यातलाच असावा.)
श.ओ., है.है. आणि जॉनसाहेबांची भेट कधीची ? इन्स्टिट्युट ऑफ् एशियन स्ट्डीज नामक संस्था सरकारी का खाजगी? त्यांचे कार्य काय? ब्राह्मी लिपीशी काही संबंध असावा का?
इन्स्टिट्युट आणि जॉन यांचे पूर्ण नाव दिल्याने थोडे तथ्य हाती लागले. धम्मकलाडूंनी दुवा दिल्यावर काम अधिक सोपे झाले. पण अधिक माहिती मिळायला हवी असे वाटले.
पहिली गोष्ट म्हणजे ही इन्स्टिट्युटा सरकारी अनुदानावर चालते. अशावेळी तिचे मालक म्हणून जॉन यांचा उल्लेख गैरलागू आहे. जॉनसाहेब हे तामिळभाषेतले जाणकार व संशोधक.
ही भेट २००७ साल पूर्वीची असायला हवी. कारण २००७ साली हेच जॉनसाहेब पुण्यातील नाडीपरिषदेसाठी आले होते.
संस्थेचा उद्देश हस्तलिखितांचे पुस्तकात तेही संगणकीय स्वरुपात (युनिकोड) आणणे. हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. याच उद्दीष्टात नाडीग्रंथाचे असे परिवर्तन हे देखिल उद्दिष्ट आहे (असावे. ज्योतिषशास्त्रविषयक ग्रंथ हे त्यांच्या उद्दीष्टांपैकी एक आहेत.) हे ग्रंथ या स्वरुपात आले तर त्यातील माहितीचा शहानिशा हा कुणा नाडीकेंद्राला पैसे न देता करता येईल असे धरतो.
हैयो हैयेयो यांनी एक शोधनिबंध लिहिला होता हे आपण ऐकतोच. हा शोधनिबंध कुठे आला असे विचारले असता त्यांनी तो जाम्बुद्वीपक शास्त्राभ्याससंस्था असा केला होता. हे दुसरे तिसरे काहीही नसून इन्स्टिट्युट ऑफ एशियन स्टडीजचे भाषांतर आहे. एखाद्या विशेष नामाचे असे चुकीचे भाषांतर करणे हे गैर आहे. हाही पांघरूण घालण्याचा प्रकार असावा असा संशय येतो.
नाडीग्रंथवाले दुकानदार आपल्या व्यावसायिक कारणासाठी नाडीग्रंथांना लोकांच्या हाती लागू देत नाही हे आपण जाणतोच. अशी पांघरुणे घालणे, नेमक्या माहितीचा उल्लेख गाळणे हे अशाच व्यावसायिकतेचा भाग असण्याची शक्यता वाटते.
प्रमोद
+१
पूर्ण सहमत.
अमक्या प्रसिद्ध व्यक्तिला भेटून तमक्या प्रकारे आवाक् केले हे सांगण्यामागे काय उद्देश आहे बरे. ना संशोधनाची ओळख ना संशोधकाचे खरे नाव.
उपक्रमाचे धोरण
हा लेख मुख्यत्वे कुठल्या ज्ञात व्यक्तीचा परिचय देत नाही. (लेख शीर्षकातील व्यक्तीबद्दल नाही. शीर्षकातील व्यक्ती काम करते, त्या संस्थेबद्दल नाही, आणि लिपिशास्त्राबद्दल नाही.)
"माहिती" म्हणून हा लेख पटत नाही. एक तर उपक्रम सदस्याबाबत व्यक्तिगत टिप्पणी तरी आहे, नाही तर हा काल्पनिक तरी आहे. बहुधा व्यक्तिगत टिप्पणी आहे.
व्यक्तिगत टिप्पणी प्रशंसा करणारी आहे, हे चांगलेच आहे. (व्यक्तिगत असूनही उपक्रमावर चालू शकते.) अधूनमधून आपण सर्वच एकमेकांची प्रशंसा करतो. पण स्वतंत्र लेख म्हणून नव्हे, तर हैय्यो हैहैय्यो यांच्या एखाद्या धाग्याखाली हा प्रशंसेचा धागा हलवण्यात यावा.
सुप्रसिद्ध (किंवा अप्रसिद्ध) व्यक्तीबद्दल वस्तुनिष्ठ माहिती देणारा लेख श्री. शशिकांत ओक यांनी जरूर लिहावा. आजकाल मराठीमधून ललित लेखन करण्यासाठी कितीतरी संकेतस्थळे उपलब्ध आहेत. अशा कुठल्या ठिकाणी श्री. ओक यांनी हे लेखन द्यावे.
खुसपटे
उपक्रमवरील माहितीच्या देवाणघेवाणीचा ट्रॅफिक इतर कोणत्यातरी संस्थळाकडे वळविण्याचा हा खोडसाळ प्रयत्न आहे काय? इतरत्र याच लेखाला १७ किंवा अधिक प्रतिसाद न मिळाल्यास प्रगल्भतेच्या शर्यतीत ते 'इतर' संस्थळ मागे पडू शकेल अशी भीती धनंजय यांना असावी की काय?
तांत्रिक सबबींच्या वापराने अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या कुटिल डावाचा निषेध. त्यापेक्षा शब्दकोष लिहावा, जीमेल गॅजेट बनवावे, विकिपीडियावर मराठीच्या संवर्धनात मदत करावी!
हाहा
गमतीदार. हा धागा हलवावा, ही माझी सुचवणी गंभीरपणे केलेली आहे. म्हणून या हसर्या दादीनंतर हा गंभीर उपप्रतिसाद :
स्वतंत्र लेखांसाठी उपक्रम संकेतस्थळाचे "माहितीविषयक" निकष थोडे कडक आहेत, आणि प्रतिसाद-धाग्यांसाठी ढिले आहेत. असा अनुभव आहे. धागा स्वतंत्र न ठेवता उपधागा म्हणून हलवला, तर धोरण चांगले पाळले जाते आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्यही.
शोधून बघता असे दिसते आहे, की श्री. ओक यांनी हा लेख अन्यत्रसुद्धा दिलेला आहे. त्यामुळे माझा अनाहूत सल्ला द्यायची खरे तर गरज नव्हती - तो मार्ग श्री. ओक यांनी आधीच अंगीकारला होता.
वेगवेगळ्या संकेतस्थळांवरची रहदारी त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे वेगवेगळी असते. एखाद्या लेखाला अन्य स्थळ सुचवले तर रहदारी कमी-अधिक होणारच, पण तो प्रकार आनुषंगिक आहे.
उद्या कोणी म्हणेल की कॉलेजच्या वर्गात नाटक करणार्याला मी "रंगशाळा बरी" असा सल्ला दिल्ला, तर मी रंगशाळेतील वाहातुक वाढवायचा प्रयत्न करत आहे. आता माझा हेतूलासतो की कॉजेजच्या वर्गात अधिक शैक्षणिक प्रक्रिया व्हावी. पण हा माझा हेतू साधायच्या सल्ल्याने रंगशाळेतील वाहातुक वाढली तर मी काय करू?
धन्यवाद
कोलॅटरल डॅमेज म्हणून रहदारी घटली तर ते ठीकच आहे. तुमचा उद्देश लबाड नव्हता हे मला माहितीच आहे. उलट, ओकांचा लेख प्रकाशित होणे हेच मी डॅमेज मानतो, वर्दळ इतरत्र गेली तर ते उपक्रमसाठी कोलॅटरल रिपेअरच ठरेल.
ओकांच्या जाहिरातींना मी अभिव्यक्तीस्वातंत्र्यात गणत नाही. किंबहुना, ओकांच्या जाहिरातींची गंभीर चर्चा करताना त्यांच्या प्रचारस्वातंत्र्याचा निषेध हा एक मुद्दा अपरिहार्य असावा असेही मला वाटते.
वाहातुक वाढली तर मी काय करू?
मित्र हो,
धागा खाली पाडून त्याची रंगत वाढली आहे. नविन वाचकांना अधिक माहिती मिळेल.
धनंजय म्हणतात ते अगदी बरोबर आहे. अन्य संकेत स्थळांची वाहतूक वाढावी म्हणून त्यांनी वरील प्रतिसाद दिला असे म्हणता येणार नाही.
'हा धागा 'घालवावा'. असा त्यांचा अभिप्राय नाही.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९