नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली.....

प्रिय वाचक,
अंनिसवाले पळपुटे आहेत असे आपणास वाटत असेल तर आपण वर्तमानपत्रातून वाचा फोडा. एक सल्ला.
अहो, मी कशाला वर्तमानपत्रांकडे धाव घेऊ, जे लाखो रुपयांचे वर्तमानपत्रातून जाहीर आव्हान देतात त्यांची कशी केविलवाणी अवस्था होते ते आपण नुसते एक पत्रातून वाचलेत. तर हे लिखाण अत्यंत जहरी वाटले.
अंनिसवाले याहीपेक्षा अत्यंत हीन शब्दात नाडीग्रंथांवर व अनुषंगाने माझ्यावर व अन्य नाडी ग्रंथप्रेमींवर टीका टिप्पणी करतात. त्यांची एकएक पत्रे व लेख आपण वाचावेत.
आपण माझ्या चिकाटीचे कौतुक केलेत, ठीक आहे. मात्र नाडी ग्रंथकर्त्या महर्षींची असीम कृपा असल्याने मला त्या लोकांच्या विकृत विचारांवर भाष्य करायला संकोच वा दडपण येत नाही. असे मी मानतो. एरव्ही माझ्या सारख्या शिपाईगड्याला या फंदात पडायचे कारण काय?
कारण अंनिस वा तत्सम विचारकांचा निर्णायक पराभव महर्षींच्या या ग्रंथांतून झालेला आहे. मी त्याला निमित्तमात्र आहे. आता आपणांस तो हळू हळू कळतोय म्हणून असे अवस्थ वाटते इतकेच.
मला सांगा की आपणही, म्हणजे वाचन करणाऱ्या सर्वच लोकांना उद्देशून मी म्हणतोय, नाडी ग्रंथांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला का नाकारता आहात?
एकांनी उदाहरण दिले आहे की गॅलिलीओने त्याने बनवलेल्या दुर्बिणीतून पहायला, त्यावेळच्या तथाकथित धार्मिक नेत्यांना आग्रह केला गेला होता. त्यांनी अनुभव घ्यायला दिलेला नकार नंतर प्रतिगामीपणाचे लक्षण मानते गेले. आता नेमके या उलटे घडते आहे. नाडीग्रंथप्रेमीजन, जे या नाडीभविष्यावर विश्वास ठेवतात (मी फक्त नाडी ग्रंथांबद्दल बोलतोय सरसकट फलज्योतिषाबद्दल मला सांगायचे नाही) त्यांना पुरोगामी विचारधारेचे लोक प्रतिगामी मानतात. असे “प्रतिगामी” असा शिक्का बसलेले लोक “पुरोगामी म्हणून गौरवल्या गेलेत्या व्यक्तींना” आवर्जून भेटून सांगताहेत, “आपण याचा अनुभव घ्या व आम्हा सामान्यांना न उलगडले गेलेले कोडे सोडवायच्यासाठी मार्गदर्शन करा”. अशा वेळी त्यांनी नाडीग्रंथांच्याकडे कुत्सितपणे दुर्ल्क्षून तोंड वळवणे म्हणजे पुर्वीच्या धार्मिक नेत्यांनी केलेली चूकच ते परत उगाळत नाहीत काय? याच लोकांचा अन्य केसेसमधे अनुभव, पुन्हा अनुभव असा वारंवारितेचा नियम म्हणून अनुभवावर जोर असतो. मात्र नाडी ग्रंथाचा वारंवार अनुभव घेण्याची वेळ आली की त्यांचे पाय जड होतात. ‘काही गोष्टी फक्त तर्काने वा शाब्दिक वादाने सुटू शकत नाही. त्याला अनुभवाचे पाठबळ लागते’. असे आम्ही म्हणतोय तर ते आम्ही अनुभव घेणार नाही व घ्यायची गरजही नाही असे समर्थन करत हटून बसले आहेत. वर आम्हालाच हट्टी हा खिताब ते देतात.
प्रत्येकाला माझ्यासारखेच अनुभव यावेत असे मी कधीच म्हणणार नाही. मला हे मान्य आहे की काहींना जास्त प्रभावी तर काहींना अत्यंत सामान्य अनुभव मिळतील. ते तसे का मिळतात याचा ही विचार करावा लागेल.
नाडीग्रंथांच्या ताडपट्टीत व्यक्तीची नावे व अन्य माहिती जरी कोरून येत नसेल तरीही ती येते असे मी म्हणत असेन तर ते जितके खोटे असेल तितकेच नाडीताडपट्टीत ती माहिती येत असूनही ती ताडपट्टीत लिहिलेली नाही किंवा नसतेच असे मी म्हटले तर ते खोटे असेल. अशा परिस्थितीत मला जे सत्य आहे त्याबाजूने उभे राहायला लागणार. नाही तर मी माझ्या अनुभवाशीच प्रतारणा केल्यासारखे होईल. मात्र ती प्रतारणा मी कुठल्याही वैचारिक बांधिलकीशी केलेली नसल्याने खऱ्या अर्थाने मी पुरोगामी ठरतो. भले याठिकाणी लोक मला काही का समजेनात.
अंनिसवाल्यांचे सोडा. ते काही नाही करत तर नाही. कोणाच्या उगाच मागेलागून काही उपयोग नाही. पण आपण म्हणजे आपणांसारख्या सर्व जागृत विज्ञानवादी पुरोगामी विचारवंतांना, विरोधकांना नाडी ग्रंथ प्रेमी अशी विनंती करताहेत की आपले भविष्य कथन म्हणून नको तर एका सुहृदाने एक पत्र आपणाला लिहिले आहे. ते वाचा. आग्रह नाही विनंती. पहा तर मग का घडते ते..
आता तर आपल्या सभासद परिवारातील एक मराठीभाषी सभासद नाडीपट्टीतील कूट तमिल वाचनासाठी प्रयत्नशील आहे. त्याने नाडी ग्रंथांचा अनुभव घेतला आहे असे त्याने आपणहून अन्य ठिकाणी नमूद केले आहे. त्यामुळे भाषेचा वा लिपीच्या अडथळ्याचा प्रश्न फार गहन राहिलेला नाही. त्यामुळे अंनिसवाले पुढे करतात ती नेहमीची लंगडी सबब की ‘तमिल जाणकार मिळत नाही हो नाही तर नाडीग्रंथवाल्यांची तेंव्हाच खोड मोडली असती’ आता पुढे करता येणार नाही

Comments

करमणुक

करमणुक म्हणून का होईना पण नाडी पहाच एकदा ब्वॉ! मल्टिप्लेक्स ला पिच्चरला गेलो तरी हजार पाचशे सहज उडतात. मग एखादे वेळी नाडीत पैसे गेले म्हणुन उपक्रमींच्या खिशाला मोठे भोक पडुन उपक्रमी काय गरीब होणार आहेत का?
प्रकाश घाटपांडे

प्रकाशकाकांचे सर्टिफिकेट मिळाल्यावर.....

ज्यांनी नाडी ग्रंथांवर विचार करत करत आपले पुर्व आयुष्यातील अनमोल क्षण कै. रिसबुडांच्या समावेत घालवले व नाडी ग्रंथांना 'थोतांड' असा अंनिसतर्फे परस्पर शिक्कामारून पुस्तक लिहिले....
.... तेच आता 'उपक्रमींच्या खिशाला भोक पडले तरी मनरंजनासाठी' नाडीकेंद्रांवर होण्याचा सल्ला देतात हे पाहून ऐतिहासिक कल्पना सुचली.....
..... वाटले जणू काही जावळीच्या जंगलात प्रतापगडाच्या पायथ्याशी तंबू ठोकून शिवाजी महाराजांना भेटायला आलेले अफजल खान शिवबांना कडकडून मिठी मारून म्हणतात, 'आमच्या साहेबांच्या दरबारात यावे. काय होईल थोडा खर्च येईल. पण आम्ही मनरंजनावर दौलत जादा किती करतो. ते अनुभवून तर होईल.'
.... 'त्यासाठी जातीने आम्ही आपणाला प्रत्यक्ष भेटून हा निरोप द्यायला आलो होतो.'
....'उगाच वणवण करत रिकामपणी तलवारबाजी करण्यापेक्षा ते बरं. असा आमचा वडीलकीचा सल्ला आहे.'
...... "माँ भवानीकी कसम, आम्ही शत्रूच्या गोटात तलवार म्यान करून जाणार? ते शक्य नाही. नाही, ते होणे नाही.
.... प्रत्यक्ष दाभोळीचेसाहेब सरदार जरी आम्हाला म्हणाले तरी आमची प्रतिज्ञा मोडणार नाही." ......

नाड़ी ग्रंथ नव सल्लागार
पका काका

मनरंजन... हळूच घ्यावे .... आता तुम्हीच असं म्हनल्यावर आम्ही कुनाकुनाच्या त्वोंडा कडं पहायचं राव?
.... आतल्या गोटातील खलबतं...
.... प्रियाली व धनंजयांचे आणि अन्य प्रवीण सेनांचे काय म्हणणं पडतं ते पाहून मग ठरवावे लागेल. विरजण लागून श्रीखंड व्हायच्या आत...
.... पण त्यांनी तर या विषयावर प्रतिसाद न देण्याची कसम खाल्ली म्हनत्यात....

एक सल्ला...

ही अशी पिवळी जांभळी लिपस्टीक कशाला लावता कळत नाही. अशाने गिर्‍हाइके येणे कमी होईल.

पिकप जॉइंट

ही अशी पिवळी जांभळी लिपस्टीक कशाला लावता कळत नाही. अशाने गिर्‍हाइके येणे कमी होईल.

उपक्रम पिकप जॉइंट आहे असे म्हणायचे आहे का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बीडीएसएम

येथे नाडीशास्त्राला मिळणारे प्रतिसाद बघता 'बिझिनेस डेवलपमेंट, सेल्स अँड मार्केटिंग' या 'सेवांना' चलती आहे असे दिसते.

एक प्रश्न

एक उत्सुकतेपोटी प्रश्नः

आपण (म्हणजे, श्री. शशीओक यांचे जे काही खरे नाव नाडीपट्टीवर असेल त्यांनी), नाडी ग्रंथाबाबत प्रचार (कुठे, कसा) करावात आणि त्याला फळ कसे येईल, या संदर्भात आपल्याला नाडीग्रंथात काही माहिती आढळली आहे का?

असल्यास तसे आणि नसल्यास तसे, येथे सांगावेत ही विनंती.

होय तशी नाडी महर्षींची आज्ञा आहे म्हणून आपल्याशी जवळीक घडते आहे.

म्हणून तर हे लिहून या विषयावर अधिक माहिती जाणून घ्याची उर्मी आपणास येतेय. आपली तहान वाढावी असे ही कारण असेल.....
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

स्पष्टीकरण

म्हणून तर हे लिहून या विषयावर अधिक माहिती जाणून घ्याची उर्मी आपणास येतेय.

या विषयासंदर्भात नाहीतर आपल्या अनुभवासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणून स्पष्टीकरण विचारले आहे.

"होय तशी नाडी महर्षींची आज्ञा आहे म्हणून आपल्याशी जवळीक घडते आहे."

या वाक्यात आपले (फलीतासहीत) भविष्य दिसण्याऐवजी, आपल्याला मिळालेली आज्ञा दिसते आहे. आपले या संदर्भातील (आपण सतत मांडत असलेल्या चर्चांसदर्भातील) नाडीभविष्य जर आपण स्पष्टपणे सांगितले तर कुणालाच वाद घालायला वाव रहाणार नाही.

मात्र तसे स्पष्टीकरण मिळाले नाही तर आपण, आपली ज्या नाडीपट्टीवर श्रद्धा आहे/विश्वास आहे त्या विषयाला आणि ज्ञानाला विनाकारण संशयाच्या भोवर्‍यात अडकवून त्यावर अन्याय करत आहात असे वाटते. अर्थात आपले भविष्यच तसे असले तर गोष्ट वेगळी.

असो.

+१

ओक यांनी स्पष्टपणे लेखन करणेच उचित ठरेल. अन्यथा, जवळीक इ. शब्दांमुळे बाविसाव्या शतकात आणखी एखादे 'ग्रेट सोल' पुस्तक निघायचे!

+२

मात्र तसे स्पष्टीकरण मिळाले नाही तर आपण, आपली ज्या नाडीपट्टीवर श्रद्धा आहे/विश्वास आहे त्या विषयाला आणि ज्ञानाला विनाकारण संशयाच्या भोवर्‍यात अडकवून त्यावर अन्याय करत आहात असे वाटते. अर्थात आपले भविष्यच तसे असले तर गोष्ट वेगळी.

यावरुन असे ऐकल्याचे आठवले की म्हणे गांधीजींना स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जीत करायची होती. बहुदा महर्षींना नाडीशास्त्र विसर्जीत करायचे असावे म्हणून योग्य व्यक्तीची निवड केली असेल. बोलून चालून आपले ऋषीमुनी(पूर्वज) लै भारी होतेच!

१) बिझनेस मॉडेल भारी - नाडी पट्टीचे पैसे शिष्याला व भविष्य खोटे ठरले तर खुलासा - हे भविष्य मी लिहले नाहीच ते हजारो वर्षापूर्वी अन्य कोणीतरी लिहले आहे मला तर ती भाषा पण येते नाही. मी कधी कोणाची फसवणूक केली नाही. सगळे स्पष्ट सांगीतले आहे. ही सगळी आपल्या इच्छेने अनुभव घ्यायला आलेली जनता आहे.
२) ‘सुखवर्षारानी’ इतके लांबलचक, किंवा ‘मे शूई’ सारखे चिनी, ‘तो मे ऊ इवाजावा, जोबु ए मात्सु’, ‘नोरिहितो ओकाडा’ अशी जपानी, ‘स्टेलामेरी, झुबैदाबेगम’ अशी परधर्मियांची नावे जर जशीच्या तशी पट्टीत लिहून येत असतील तर त्याच्या मुलीचे जे नाव आहे ते तो पाहील तेंव्हा येणारच अशी त्याचीही आता खात्री झाली आहे.

भारताला परकीय चलन मिळवून देणारी, आता परदेशातही शाखा काढून आखील विश्वाची सेवा करणारी धर्मादाय संस्था म्हणून आता बीसीसीआय प्रमाणे नाडीकेंद्रांना विविध करामधे सवलती मिळाव्यात.

३) ओक साहेब अश्याच भरार्‍या घ्या, आम्ही आपले उड्डाण / एयर शो बघत आहोत.

४) आगामी भागाच्या (नाडीकेंद्राची एजन्सी कशी मिळवाल!) च्या प्रतिक्षेत!

-------------------------------------------------
कोण म्हणते मराठी माणूस धंद्यात, मार्केटींगमधे कमी पडतो?

आभार!

यावेळेस लेखासाठी काळसर निळा रंग वापरल्याबद्दल मनःपूर्वक आभार. तसेही नाडीग्रंथावरचे लेख वाचत नाही पण उघडून बघितले तरी ते बटबटीत भडक लाल, निळे, हिरवे रंग डोक्यात जातात ते आज गेले नाहीत.

आपली आवड

आपली आवड आली लक्षात.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

चॅलेंज?

विकासरावांच्या प्रश्नाला अनुसरून एक प्रश्न. श्री शशीओक यांच्या नाडीत, ते(म्हणजे ओक) नाडीविषयावर किती आणि कुठे लेख लिहतील, त्याला कुठल्या संस्थळांवर् किती प्रतिसाद येतील इ. माहिती आहे काय? असल्यास स्पष्टपणे संस्थळांचा उल्लेख व आकडा द्यावा. म्हणजे नाडीचे महात्म्य पड्ताळणे सोपे होईल. नसल्यास नाडी हे थोतांड आहे हे सिद्ध होईल.

-Nile

हे हे हे हे

असल्या अवघड प्रश्नांच्या वाटेला ते जात नाहीत. तुमच्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर मिळालं तर आपणपण आपली नाडी सोडायला/पहायला तयार आहोत. बाकी ओकांनी जर कमिशन शेअर केलं तर मी पण नाडीचा प्रसार आणि प्रचार करीन म्हणतो. एका गिर्‍हाईकामागे किती सुटतात हो ओक? कमीतकमी या तरी प्रश्नाचे उत्तर द्या की हा पण आऊट ऑफ् सिलॅबस प्रश्न आहे? नाडी महर्षीनी कमीशनपण लिहून ठेवलं असेलच की. ती पट्टी एकदा स्कॅन करून टाका बुवा. नुस्तं तुमचं नाव असलेली पट्टी मागे पाहीली आहे. बाकिच्या पट्ट्या पण टाका की. अजून लिहून तयार नसतील तर तसं सांगा. आम्ही वाट बघतो.

हे असेच चालायचे काय?

हे असेच चालायचे काय ?....

ओक ओकांच्या तालावर... "अनुभव घ्या" चा राग आळवणार... अन्य़ आम्हाला आपण पडताळा इथल्या इथे द्या तर मानतो असे म्हणत राहणार...यावर उपाय काय?

मी एक नाडी ग्रंथ प्रेमी म्हणून विचारतो की नाडीग्रंथाना कसेही करून खोटे ठरवण्यासाठी चंग बांधलेल्यांना सोडून
काही उत्सुक व्यक्ती जर एकत्र येऊन नाडीग्रंथ प्रेमींनी केलेल्या अभ्यासकार्यावर विचार करायला राजी असतील तर मला त्यांच्याशी संभाषण करायला आवडेल. कुठे, कधी, केंव्हा सर्वांच्या सोईने एकत्र यायचे याबाबत उत्सुक व्यक्तींनी पुढाकार घ्यावा.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

स्वखर्चाने सहल

काही उत्सुक व्यक्ती जर एकत्र येऊन नाडीग्रंथ प्रेमींनी केलेल्या अभ्यासकार्यावर विचार करायला राजी असतील तर मला त्यांच्याशी संभाषण करायला आवडेल. कुठे, कधी, केंव्हा सर्वांच्या सोईने एकत्र यायचे याबाबत उत्सुक व्यक्तींनी पुढाकार घ्यावा

.

त्यापेक्षा पुणेकर मंडळींची स्वखर्चाने सहल का नाही काढत तुम्ही नाडीकेंद्रात? त्याला थोडाफार प्रतिसाद लाभेल असे वाटते.

नाडीकट्टा आणि सहभोजन अशी काही कल्पनाही लोकांना आवडेल.

छान कल्पना

नाडीकट्टा आणि सहभोजन अशी काही कल्पनाही लोकांना आवडेल.

नक्कीच! आणि भोजनात उसळपाव ठेवला तर कट्ट्यासाठी रिकाम्या डोक्यांची कमतरता भासणार नाही. सुपरहिट कट्टा!

हा प्रयत्न तुम्हाला करणे शक्य आहे.

अनुभव घेऊन बघा. या धर्तीचा व्यनि आल्यावर तुम्हाला मी व्यनि पाठिविला होता. त्याचा काही भाग पुढे देत आहे. यावर तुमचे उत्तर आले नव्हते. तुमचे पुस्तक एवढे खपते आहे तेव्हा तुम्हाला १० जाणारे मिळाले पाहिजेत.

पदरमोड करायला हरकत नाही. वेळ मोड करणे जिवावर येते.
कृतिशीलता मला ज्यात मजा येते अशा विषयात असते. इतर विषयात आळस बळावतो.

नाडी या प्रकारात मला वेळ मोड करणे कार्यबाहुल्याने शक्य होणार नाही. अगदीच कुठे गेलो आणि शेजारीच ते असले तर ठीक. त्यातही एका फेरीत काम झाले तर. नाहीतर दुसर्‍या फेरीची वेळमोड करणे आजतरी कठीण वाटते. तुम्ही पत्ते देऊन ठेवा. मी चेन्नई भागात फारसा जात नाही. एके काळी वर्षातून दोनदा वगैरे गेलो होतो. पण तेव्हा सकाळी जाऊन संध्याकाळी परत असा कार्यक्रम असायचा. फिरायला म्हणून त्या भागात जाणे सध्यातरी नाही. (एकदा जाऊन आल्यामुळे).

दुसर्‍यांचा अनुभव खरा धरायचा का स्वतःचा यात मला फारशी विभागणी करता येणार नाही. फक्त ज्याने अनुभव घेतला त्याने नेमके कसे कसे झाले याबद्दल इतिवृत्त दिले पाहिजे.
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वैज्ञानिक प्रयोगात सातत्याने यश हवे. यात यशाचे प्रमाण अनमानधक्यापेक्षा जास्त आले तर चालते. असे हवे असल्यास अनेकांनी तिथे जाऊन सादंत्य वृत्त लिहिले पाहिजे. त्यांच्या एकत्रित प्रयोगाच्या यशावर चोखंदळ पणे निष्कर्ष काढता येतो. असे घडण्यासाठी मी एकट्याने जाण्यात फारसे महत्वाचे ठरत नाही. माझ्या मते किमान १० जणे गेली पाहिजेत. त्यांनी जी माहिती द्यायची ती लिखित स्वरुपात दिली पाहिजे. (म्हणजे वेळेवर हे आठवले नाही असे व्हायला नको.) आलेली पट्टी आपल्या हाती लागते असे कळते. तिचे कार्बन डेटिंग झाले पाहिजे. म्हणजे ती पूर्वी लिहिलेली आहे का आत्ता बनवून दिली याचा थोडाफार निचरा होईल. माझ्यामते या सगळ्या प्रयोगाचा खर्च एक लाखाच्या घरात जाईल. एवढे पैसे खर्च करण्यात मला कुठलेच कारण दिसत नाही.

यापेक्षा जास्त सोपा मार्ग होता. तो म्हणजे या नाडीवाल्यांचे सहकार्य मिळवायचे. ते जेंव्हा आपली पट्टीशोधतात तेव्हा दुभाषा सकट तेथे हजर असणे. (म्हणजे कार्बन डेटींगचा खर्च कदाचित वाचेल.) इत्यादी अनेक रितीने करता येतो. अर्थात यात पट्टीव्यावसायिकाचे सहकार्य अपेक्षित आहे. ते मिळणे अशक्य वाटते. तेंव्हा मी वर सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे.

तुम्हाला यात रस असल्याने तुम्ही यावर विचार करून काही ठरवू शकता. एवीतेवी जाणारे १० जण तुम्हाला माहित असतील तर बराचसा खर्च वाचेल. पण अशा मंडळींचा वृत्तांत नीट असायला हवा. मला अशी मंडळी मिळणे दुरापास्त आहे. तुम्ही पुस्तक लिहिल्यामुळे तुम्हाला काही लोक विचारून जात असतील. त्यांना वृत्तांत लिहायला सांगू शकतो. अशा मंडळींच्या वृत्तांतानंतर मुलाखती घेण्यास मी मदत करू शकीन. प्रयोगा साठी तरी निदान एकच केंद्र निवडावे लागेल. हा भाग कमी खर्चाचा असला तरी त्याची रिलायबिलिटी कमी होणार. (कारण जाणारे श्रद्धेने जाणारे असणार व भोळसटपणे जास्त माहिती देऊ शकणारे असण्याची शक्यता जास्त आहे.) तरी करण्यासारखा आहे.

प्रमोद

मी पुण्यात यायला तयार आहे.

मी पुण्यात यायला तयार आहे. दोन्ही बाजुची मंडळी सोबत येतील का? मी विरोधक अथवा सर्मथक नाही. माझ्या जवळ सोनी कं चा केमेरा आहे तो पुरेसा होईल्? वेळ सहमतीने ठरवण्यात यावी.

मजकुराची शहानिशा करायच्या पोकळ डरकाळ्या

शैलेशजी,
आपल्या उत्साही प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
आणखी कोणाला आपल्या समावेत सामिल करता आले तर फार छान.
नाक मुरडणाऱ्या अनेकांपेक्षा आपल्यासारखे निष्पक्षपाती मोजके लोक किती तरी पटीने चांगले.
नाडीविरोधक स्वतः काहीही करत नाहीत, पण अभ्यासकार्यात आडवे जाण्यात आसुरी आनंद मानतात.
अंनिसने किंवा येथील प्रतिष्ठित सदस्यांनी नाडीग्रंथ पुस्तकात प्रकाशित केलेले फोटो व त्यातील मजकुराची शहानिशा करायची सोडून पोकळ डरकाळ्या फोडून मला टरकावण्यात धन्यता मानली.
कॅमेरा व अन्य साहित्यामुळे आपल्या अभ्यासाला ते सोईचे होईल.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

अभ्यास

शशिओक, समजा खरंच असा अभ्यास केला तर त्यात हे नाडी प्रकरण थोतांड निघण्याचीही शक्यता आहे हे तुम्हाला मान्य आहे का? (कृपया प्रश्नाला धरुन संक्षीप्त उत्तर द्यावे)

हॅ हॅ हॅ

गेली दोन दशके, नाडीभविष्याबद्दल आक्षेप घेणारे /सांगणारे लोक भेटून /सांगूनही, ओकसाहेबांना ते अमान्य आहे तर आज एकदम [जेव्हा आता खर तर भारतीयांची 'क्रयशक्ती' वाढली असताना, परदेशात ब्रँचेस निघत / निघायची शक्यता असताना] ते मान्य करतील असे तुम्हाला वाटते?

आक्षेप घेणार्‍यांना ते विविक्षीत जागी मारतात व भोळ्या भाबड्या लोकांना 'या रे या. सारे या' करतात. नव्या लोकांच्या नव्या(जुन्या) आक्षेपांना उत्तरे देणे सोडाच, घेतलेल्या आक्षेपांना आम्ही आमच्या परीने सर्व संधी दिली तरी यांचे समाधान होत नाही, यांचा हेतू मार्गात आडवे येणे इतकाच होता म्हणुन कांगावा करणार. शिवाय या नव्या चाचणीतून 'सश्रद्ध भावीक' जे भविष्याला खरे मानतील त्यांच्या मदतीने अजुन 'समाजकार्य' वाढवणार.

ओक, हैय्ययोंना प्रश्न करणे विफल आहे. आपले आक्षेप लोकांपुढेच मांडायचे, ते वाचूनही लोकांना हा शौक करायचा असेल तर काय म्हणणार? झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीये!!

अर्थात,

डार्क मॅटर साहेब,
हे काय विचारणं झालं.
माझा नाडीग्रंथांच्या अभ्यासाचा प्रवास 'नाडीच्या थोतांडाला उघड करतो' म्हणूनच सुरु आहे. अगदी सुरवातील मी डॉ. जयंत नारळीकरांना लेखी विनंती करताना आपल्या सारख्या विज्ञानकाने यात लक्ष घालून नाडी ग्रंथांची सत्यता पहायचे काम हाती घ्यावे. त्यात मला सहभागी होता आले तर मला आनंद वाटेल असे मी पु्वीच म्हटले होते.
आजही तसेच म्हणतो. कारण नाडीग्रंथांच्या विरोधात किंवा बाजूने असे दोन तट आपण आपल्या वैचारिक धारेच्या भूमिकेमुळे पाडून आपापसात फूट पाडतोय. जे अभ्यासकार्य हाती घ्यावे अशी दोन्ही बाजूंची इच्छा असून ते मात्र दुर्लक्षित होतेय. याचा पुरावा म्हणजे एकंदर आत्तापर्यंतचे इतरांचे विविध तर्हेने केलेले निंदात्मक मतप्रदर्शन वा लेखन 'ओक सेंट्रिक' करायचा कल असल्याचे जाणवते. तसे नसावे अशी किमान अपेक्षा आहे.
सत्यशोधनाला तट पाडून काय उपयोगाचे. मात्र असे सत्यशोधक आपापले पुर्वग्रह थोंबाळण्यासाठी नाडी ग्रंथांचा वापर करणार असे लक्षात आले तर मात्र माझा मार्ग वेगळा आहे असे खुशाल समजावे.
आताआपल्याला वरील तोच प्रश्न मी विचारतो की व्यक्तिशः आपण यात जर नाडीग्रंथ थोतांड नाहीत असे सिद्ध झाले तर उघडपणे मान्य करणार काय? याचे उत्तर आपणाकडून अपेक्षित आहे. मी डॉ. जयंत नारळाकरांना लेखी आश्वासन (पुस्तकात ते सविस्तर वाचायला मिळेल) दिले आहे. तसे आपणही द्याल अशी अपेक्षा करतो.
-----------------------------------------

ते मान्य करतील असे तुम्हाला वाटते?

वरील माझा प्रतिसाद सहज व अन्य यांचे बोल ऐकायच्या आधीचा होता. त्यामुळे अर्थात वरील लिखाण सहज यांच्या अपेक्षेच्या अगदी विपरीत आहे असे आपल्याला व इतर वाचकांना लक्षात आणू द्यायला हा संपादित प्रतिसाद.

दाभोलकर नाडी शब्द तोंडातुन उच्चारताहेत अशी ओकांना घाई

अशी घाई मला झाली असती तर मी त्यांच्या चेल्यांना मनघरणी नसती का केली. असो.
मला काय म्हणायचे आहे ते मी आत्तापर्यंत स्पष्ट लिहिलेले आहे. त्यातील अनेकांची विचारणा ही व्यक्तीगतरित्या माझ्या किंवा हैयोंवरील राग किंवा असूया अशी असल्याने असल्याने त्या मी मनावर घेत नाही.
सार्वजनिक ठिकाणी मते-मतांतरे असतात त्यातलाच तो एक भाग आहे. याउप्पर नाडीग्रंथांवर या ठिकाणी य़ोग्य व मानाचे स्थान मिळायला हवे ते आत्तापर्यंत उपक्रम कडून मिळालेले आहे व ते पुढेही मिळत जाईल, काऱण आम्ही दोघांनी 'नाडी ग्रंथ सेंट्रिक' लेखन करण्याचे प्रयत्न केले आहेत. तरीही कधी कधी लेखनाच्या भरात गैरलागू भाषेचा किंवा शब्दांचा वापर ही तात्कालिक बाब म्हणून मी सोडून देत असतो. हे माझ्या अन्य लेखनाच्या बाजावरून वाचकांना वेळोवेळी जाणवल्याचे त्यांच्या प्रतिसादातून जाणवते.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

खोटारडेपणा

माझा नाडीग्रंथांच्या अभ्यासाचा प्रवास 'नाडीच्या थोतांडाला उघड करतो' म्हणूनच सुरु आहे...... आजही तसेच म्हणतो.

विषय संपला! आजपर्यंत तुम्ही नाडी समर्थनात जेजे लिहिले आहे त्यातुन हाच आशय पहायला मिळाला आहे नाही?

इतरांनी काय करावे ते, ते ठरवतील.

प्रमोदजी,

मला वेळ मोड करणे कार्यबाहुल्याने शक्य होणार नाही.

ठीक आहे. आपल्याला वेळ मिळाला की सवडीने काम झाले तरी मला आवडेल. आपल्या उत्तर न देण्याचे तेही कारण होते.
इतरांनी काय करावे ते, ते ठरवतील.
जे घडेल त्याचा इतिवृतांत निरुत्साह सोडून आपण प्रकाशित करालच.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

प्रतिसाद

तुमच्या प्रतिसादावरून हे कळत नाही की मी लिहिलेला मार्ग तुम्ही चोखाळणार आहात की नाही. कृपया खुलासा द्यावा.

प्रमोद

अरे अरे शशी म्हणत... नाडीकट्ट्याला हजेरी

नाडीग्रंथाना कसेही करून खोटे ठरवण्यासाठी चंग बांधलेल्यांनाच कट्टा व प्रितीभोज कल्पनेत जास्त रस आहे असे दिसते....
हरकत नाही. त्यांनी मस्तपैकी हवेत वायबार काढत चर्चेची गुऱ्हाळे चालू ठेवावीत....
पुणे व आसपासच्या भागातील उत्सुक नाडी प्रेमींनी अग अग म्हशी या धर्तीवर अरे अरे शशी म्हणत नाडीकट्ट्याला हजेरी लावली तर मला व्यक्तीशः आवडेल. कोणी पुढाकार घेत असेल तर फार छान.... .
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

आता बॉल

आता बॉल पुणेकरांच्या कोर्टात आहे. त्यांनी आणि तुम्ही बघून घ्यावे. ;-) आम्ही कट्ट्याचा वृत्तांत वाचण्यास उत्सुक आहोत.

अरेरे

ओक यांच्या लेखनाला क्रीडन्स मिळालेला पाहून दु:ख झाले. त्यांच्या आवाहनाला मान देऊन सोबत जाणार्‍यांना विनंती आहे की कट्ट्याच्या नेमक्या शर्ती आधी ठरवून घ्याव्या.

कभी खुशी... कभी गम...

दु:ख झाले

कभी खुशी... कभी गम...
चालाय़चेच. नुकतेच एकांच्या विळख्यातून बाहेर पडल्यावर...
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

विरोध

मागच्या वेळी अंनिसने विरोध केला परिणामी नाडी केंद्रे महाराष्ट्रात फोफावली. एखाद्या पिक्चरवर / नाटकावर / पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी झाली की जसे त्याचा खप वाढतो तसा प्रकार आहे. त्यामुळे अंनिसने केलेला विरोध हा नाडी समर्थकांच्या पथ्थ्यावरच जातो. त्यामुळे कधी एकदा दाभोलकर नाडी शब्द तोंडातुन उच्चारताहेत अशी घाई ओकांना झाली आहे.
अवांतर- हा विषय अंनिसला घेण्याची गरज पडून परस्परांची प्रसिद्धी वाढवण्यात यश येईल असो भाकित वर्तवतो.
प्रकाश घाटपांडे

शक्य

वृंदा करात यांच्यामुळे रामदेवबाबाला प्रसिद्धीच मिळाली.
--
चर्चासंस्थळाच्या मूलभूत स्वरूपातच सदस्यांकडून अशी अपेक्षा असते की आक्षेपांना, प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत तर पुन्हा तेच मत उपस्थित करू नये.
यनावाला, नानावटी, इ. सदस्यांनी उत्तरे द्यावीत म्हणून आग्रह धरला जाई.
ओक या नियमाचा भंग करीत असल्यामुळे त्यांच्या आयडीवर बंदी घालावी अशी माझी व्यवस्थापनाला विनंती आहे.

Headless opponents never agree, beheaded opponents seldom disagree ;)

असहमत

यनावाला, नानावटी, इ. सदस्यांनी उत्तरे द्यावीत म्हणून आग्रह धरला जाई.
ओक या नियमाचा भंग करीत असल्यामुळे त्यांच्या आयडीवर बंदी घालावी अशी माझी व्यवस्थापनाला विनंती आहे.

असहमत. या हिशेबाने यनावाला आणि नानावटी यांच्यावरही बंदी घालावी लागेल. तेही सिलेक्टीव रिडींग करतात.

बायदवे, उत्तरे द्यावीत असा आग्रह आहे. नियम नाही त्यामुळे बंदी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

फरक

उत्तरे देण्याची टक्केवारी समानच आहे काय? यनावाला, नानावटी यांची टक्केवारी आता वाढली नाहीए काय? त्यांच्या समर्थनार्थ इतरांनी दिलेली उत्तरे ही त्यांच्या टक्केवारीतच गणली जाऊ नये काय?

आम्हाला फळाची अपेक्षा आहे.

आत्तापर्यंतच्या प्रतिसादांवरून वाटते, की निकाल काय लागेल याच आम्हाला काही घेणदेण नाही, आम्ही फक्त चेंडू टोलवण्यात धन्यता मानत आहोत.

द्राविड भाषाभ्यासक पंडित डॉ. जी. जॉन सॅम्युएल यांची भेट ..

"सध्या सर तमिळभाषेला जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा मान मिळवून देण्यासाठी संशोधन कार्य करतायत, त्यात अत्यंत व्यस्त आहेत. तुमची अपॉईंटमेंट आहे का? काहीही झाले तरी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काही मिळणार नाहीए." आम्हाला रिसेप्शनवरच कडकडत्या तमिळमिश्रीत इंग्रजी उच्चारांमधून समज दिली जाते. "हो हो, तेवढी मिळाली तरी चालेल ना." असे म्हणून आम्ही इकडे तिकडे पहात, ह्या ठिकाणाहून चाललेल्या कामाचा आवाका समजावून घेण्याचा प्रयत्न करतो....

चेन्नईहून साधारण २० किमी दूर, सोलिंगनल्लूर जवळच्या चेम्मणचेरी नावाच्या उपनगरातली एक भव्य आणि आधुनिक वास्तू. इन्स्टिट्यूट ऑफ़् एशियन स्टडीज असा भलामोठा बोर्ड आपले स्वागत करतोय. वास्तूच्या चोहोबाजूंनी झाडी लावलेली असल्याने मधे शिरताच उत्साहवर्धक थंडावा आपल्याला प्रफुल्लित करून जातो... ह्या इमारतीत पहिल्या मजल्यावर तिचे मालक आणि संचालक डॉ. जी. जॉन सॅम्युएल बसतात... एक द्राविड भाषाभ्यासक पंडीत म्हणून जॉन सॅम्युएल आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त आहेत. विशेषत: द्राविड भाषा, त्यांच्या लिपी ह्यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी प्रसिद्ध केलेले भलेमोठे प्रबंध नुसते अभ्यासायचे म्हटले तरी काही वर्षे जातील. त्यांचे अनेक शोधग्रंथ आत्तापर्यत प्रकाशित झालेले आहेत. भिंतीवरती सगळीकडे जॉन सॅम्युएल यांनी विविध देशात गाजवलेल्या सेमिनार्स मधले फोटो टांगले आहेत. अमेरिका, जर्मनी, कॅनडा, मलेशिया, इंग्लंड, कोरिया, ऑस्ट्रेलिया, जपान, सिंगापूर, श्रीलंका अशा विविध देशातल्या भाषाभ्यासकांशी चर्चा करताना, तेथील सभा संमेलने गाजवतानाचे त्यांचे ते फोटो तमिळ घरातील देवघराची आठवण करून देतील इतक्या दाटीवाटीने सगळीकडे लावलेले दिसतात. पदका-पारितोषिकांचे तर पेवच फुटले आहे, ज्यावरून अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील सभा-संमेलनात त्यांचा गौरव झाल्याचे सहज कळावे.

भव्य काचेच्या खोलीमधे भल्या मोठ्या चकचकीत एग्झिक्युटीव्ह टेबलामागे डॉ. जी. जॉन सॅम्युएल विराजमान असतात. एका बाजूला ते जागतिक महत्त्वाच्या कामात गढलेत, दुसर्या बाजूला त्यांचा स्टाफ विविध कामाचे आदेश घेण्यास येरझार्याम मारतोय. त्यांचे पी.ए. मधूनच त्यांच्या मोबाईलवर ऍपोंईंटमेंट्स फिक्स करतायत. आपल्या सरांना काय हवे, काय नको याची सेवाभावाने यथोचित काळजी घेतली जातेय. त्याच वेळेला, आगंतुक पाहुण्यांनी त्यांना डिस्टर्ब करू नये म्हणून हटकले जातेय, बाहेरच थांबवून आत साहेबांचा मूड कसा आहे ते पाहून थोडा वेळ भेटीकरता आत सोडले जातेय. "काय आहे, कित्येक नवखे अभ्यासक सरांच्याकडे स्वत:चे निबंध वगैरे आणून देतात. त्यांच्या टेबलावर अनेक तमिळ, इंग्लिश, जपानी व अन्य भाषेतील प्रकाशित - अप्रकाशित ग्रंथांच्या चवडीच्या चवडी सरांची नजर पडावी म्हणून खोळंबलेल्या असतात. ते तमिळ भाषेचे तज्ज्ञ मान्यवर आहेत ना, ते म्हणतील ती पूर्व दिशा". त्यांच्या कार्याची प्रारंभिक ओळख करून द्यायला त्यांचे शिष्य तत्पर असतात.

मी डॉ. सॅम्युएल आणि माझ्यासोबत असलेल्या एका व्यक्तीची एकमेकांशी ओळख करून देतो. हळूहळू त्या दोघांचे संभाषण इंग्रजीऐवजी तमिळमधून होऊ लागते. तमिळमधून बोलणे साधल्याने संभाषणात आणखी रंग भरतोय असे वाटते. शब्दांवरून मी अंदाज लावतोय, बहुतेक प्राचीन तमिळ वाङ्मयापासून सुरुवात करून तिरुकुरल, संगम तमिळ, चोळा तमिळ, अशी विविध काळांमधे घडलेली भाषेची स्थित्यंतरे चर्चिली जाताएत. तमिळ भाषेचा दक्षिण पूर्व आशियाई देशांतील प्रचलित भाषा आणि त्यांचा इतिहास, लिपीवर पडलेला प्रभाव, तमिळ देशाच्या इतिहासाचे भारताच्या इतिहासातील महत्त्व, द्राविड देशांची भौगोलिक रचना आणि संस्कृती आदि त्यांच्या आवडत्या विषयांवर आधारित चर्चा रंगलीए. एकमेकांना विविध भाषेतील उदाहरणे वगैरे दिली चालली आहेत.. एकमेकांच्या मतांचे यथेच्छ खंडन-मंडन चालल्यासारखेही वाटते, एकमेकांशी संदर्भांची देवाणघेवाण चाललीए. एकूणात डॉ. जी. सॅम्युएल आणि ती व्यक्ती दोघेही रंगलेली दिसतात.

दिलेली १५ मिनिटांची वेळ संपूनही एखाद-तास होऊन गेला असावा. तेवढ्यात डॉ. जी. सॅम्युएल पाणी, कॉफी वगैरे आदरातिथ्याखातर मागवतात. अव्वल मद्रासी कडक्क कॉफीपान चाललेले असतानाच, स्वत:चा नुकताच प्रकाशित झालेला एक ग्रंथ पुढे करत डॉ. जी. सॅम्युएल म्हणतात, "हे बघा ह्या विषयावरचे माझे नवे पुस्तक. अशोककालीन समाजात, तमिळ लोकांचा व्यापार उद्यम सार्याय जगात पसरलेला होता असे म्हणतात ते कशावरून ते मी यात दाखवले आहे." त्या व्यक्तीने पुस्तक हातात घेतले, आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या शिलालेखाच्या चित्राला उद्देशून म्हटले, "हीच मी मगाशी सांगितली ती ब्राह्मी लिपी." असे म्हणत ती व्यक्ती एकदम त्यातील अक्षरे वाचायला सुरुवात करते.... "सम्राट अशोकाच्या सुप्रसिद्ध शिलालेखाचा हा एक भाग आहे... बहुधा कलिंग युद्धानंतर तिथले काही लोक दक्षिणेत आले त्या काळातला असावा... बघा ना, त्या अक्षरांत निव्वळ ब्राह्मीच नाही तर कल्याणी, ग्रंथ लिपींमधलीही काही वळणे आहेत... बघा मी दाखवतो..."

एव्हाना डॉ. सॅम्युएलांचे डोळे मोठ्ठे झालेले असतात. ते स्वत:च त्या पुस्तकाचे लेखक असूनही त्याचे मुखपृष्ठ जणू काही पहिल्याप्रथमच पाहत आहेत असा निरागस चेहरा करून म्हणातात, "ही लिपी ब्राह्मी असावी, पण त्यात नेमके काय म्हटले आहे, हे मला आज तुमच्यामुळे ज्ञात होत आहे." माझ्याकडे वळून डॉ. जी. सॅम्युएल म्हणतात, "येस्स, कमांडरा, यिट यिस्स् यिण्डीड भ्रामी आन्ड ग्रंतम् स्क्रिप्ट्... बट्ट वर्डींङ्स् व्यार नॉट्ट क्ळ्यार टु मी... ऐयाम् ळऽर्निंङ् यिट् फ़ार् फ़र्स्ट् टैम् टुडे...!!" असे ते म्हणत असतानाच, ती व्यक्ती "सर, देऽर यिस्स् सम्थिङ् मोऽर् वेऽयिटिङ् फ़ार् यू टुडे..." असे म्हणत, स्वत: लिहिलेला एक शोधप्रबंध त्यांच्यासमोर ठेवते. हात न उचलता केलेले लेखन तमिळभाषेतही आहे; हे दाखवणारा, तमिळ भाषेच्या आतापर्यंत माहिती नसलेल्या एका लिपीप्रकारावरचा तो विस्तृत शोधप्रबंध मग विविध उदाहरणांसह चर्चिला जातो.

डॉ. जी. सॅम्युएल आनंदलेले असतात. लगोलग त्यांच्या इंडॉलॉजीवर काम करणार्याव उपसंस्थेचे सदस्य होण्यासही सुचवतात. रीतसर कॉफीपान झाल्यावर खूष झालेले डॉ. सॅम्युएल त्यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ़् एशियन स्टडीजने विविध अंगांनी केलेल्या अभ्यासावर आधारित अनेक ग्रंथ-पुस्तके मागवतात. त्यातली काही पुस्तके सप्रेम भेट म्हणून बरोबर नेण्याचा आग्रह धरतात. पुढील आंतरराष्ट्रीय तमिळ साहित्य संमेलनाचे निमंत्रण पाठवण्यासाठी म्हणून आमचे पत्ते लिहून घेतात.

...नंतर काही काळाने ताडपट्ट्यांवरील तमिळ भाषेतील कूटलिपीलेखन - अन्वयार्थ ह्या नावाने एक थिसिस पेपर २०११ सालच्या आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी सादर करण्यासाठी पाठवला जातो. नाडीग्रंथ ह्या विषयाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करण्याकरितां 'ज्योतिष' अथवा 'भविष्य' ह्या संकल्पनांवर विश्वास असणे हे आवश्यक नसून तमिळ भाषाशास्त्राच्या दृष्टीकोनातून नाडीग्रंथातील लिपी आणि भाषा इत्यादि बाबींचा सखोल विचार होणे आवश्यक आहे... असा अभिप्राय त्यातून मांडला जातो.

...हे सर्व शोधकार्य करणारी, डॉ. जी. जॉन सॅम्युएलना भेटलेली, भारतीय राज्यघटनोपदिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या तत्त्वांचा खंदा समर्थक असलेली ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नाडीग्रंथातील भाषा-लिपींच्यावर अभ्यासकार्य करणारे.... हैयो हैयैयो होत....

चान

ही ओळख हैयो हैयैयोंची च असणार हे सुरवातीलाच लक्षात आल होत.
पुढच्या ओळख लेखाचा इंतजार आहे.

दुकान

इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीजची साइट. साइटवरून बरेच काही लक्षात येते आणि बरेच काही कळत नाही. कपिला वात्स्यायन आणि न्यायमूर्ती कृष्ण अय्यर ही नावे निगडित आहेत. असो. पण दुकान बरेच मोठे आहे. ह्या हैयो हैयैयो ह्यांच्या ह्या संशोधनाबद्दल अधिक माहिती द्यावी.

"येस्स, कमांडरा, यिट यिस्स् यिण्डीड भ्रामी आन्ड ग्रंतम् स्क्रिप्ट्... बट्ट वर्डींङ्स् व्यार नॉट्ट क्ळ्यार टु मी... ऐयाम् ळऽर्निंङ् यिट् फ़ार् फ़र्स्ट् टैम् टुडे...!!"
म्हणजे काय? कमांडर म्हणजे कोण? फार हसलो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

..... सदा तुमने ऐब देखा हुनर तो न देखा....

..... वो तो है अलबेला हजारो में अकेला ....

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

धन्यवाद

दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. कृष्ण अय्यर यांची कारकीर्द नॉटविथस्टँडिंग, त्यांना पंचवीस वर्षांपूर्वी असेही वाटे की महेश योगी उडू शके. आता तर त्यांचे वयही झाले आहे. दुकान मोठे आहे याच्याशीही सहमत.

??

...नंतर काही काळाने

म्हणजे पहीली भेट कधी झाली?
मधल्या काही काळात कितीवेळा गाठीभेटी झाल्या?
हा थिसीस पेपर स्पॉन्सर केला गेला आहे का?

वा

व्यक्तीची ओळख छानच. शोधकार्याची ओळखही द्यावी, ही विनंती.

ता. क. : शीर्षक आणि मजकूर यांच्या ताळमेळात काही तफावत आहे काय?

कुटलिपी वरील लेख

धनंजयजी,

हैयोंच्या ह्या विषयावरच्या शोधकार्याची जुजबी ओळख उपक्रम दिवाळी अंकातील लेखनकार्यातून झालीच असेल. त्यात वेळोवेळी चर्चेत आलेले विविध मुद्दे विचारात घेऊन विविध शोधसंस्थांच्या कार्याला पुरक असे बदल करून त्यांनी त्यांचा शोधप्रबंध इंग्रजी व तमिळमधे मांडला आहे. नाडीग्रंथात आढळून येणारी लिपीच नव्हे, तर भाषाप्रकार या दोन्हीहीबद्दल शास्त्रीयरीत्या वस्तुनिष्ठ माहिती मांडण्याचा त्यांचा मानस आहे. त्यातूनच नाडीग्रंथातील काव्याचा आस्वाद वाचकांना - अभ्यासकांना घेता येईल ही झाली दुय्यम बाब.

हैयोंच्या अभ्यासकार्यावर तमिळभाषाशास्त्राच्या अंगाने आपल्या व प्रियाली यांच्या परदेशातील संपर्कातील भाषातज्ज्ञ, शरद सारख्या मराठी भाषातज्ज्ञ व येथील काही तमिळ भाषींकडून वैचारिक आदानप्रदान, अन्य भाषा-लिपीतील वाङ्मय यावर चर्चा अपेक्षित आहे.

...ओक अणि नाडी असेल तर धागा न वाचताच पुढे ढकलला जाण्याची शक्यता असते. म्हणून शीर्षकात वैचित्र्य. इतकेच.

नाडीग्रंथ काव्यातून जे कथन केले जाते त्यातून काय निष्पन्न होते याचा अभ्यास नंतर केला जावा. अभ्यास कार्यानंतर लोकांना उपरती होईल किंवा ते नाडीमहर्षींच्या कथनांकडे आकर्षित होतील असा ओकांचा समज अजिबात नाही. नाडी ग्रंथ कर्ते महर्षीच्या कथनाची फोड करून सांगण्याची कला ती भाषा अवगत असलेल्यांकडून व्यवसाय म्हणून कथनांचा वापर जुन्या काळापासून केला जात आहे. ओकांच्यामुळे त्यांचे व्यवसाय चालतात असे मुळीच नाही. ओकांनी अभ्यासून पुस्तकांतून अनुभव सांगितले म्हणून कोणी नाडीग्रंथांना पहायला जाणार किंवा जाणार नाही असे अजिबात ठरत नाही. ज्याची नाडी पट्टी लिहिली गेली आहे तो, ती वाचून घ्यायला जातो असा अनुभव येतो. ओकांची नाडीग्रथांशी ओळख होण्याआधी ही केंद्रे चालत होतीच. जसा अन्य व्यवसाय चालतो तसाच नाडी कथनाचा चालतो. व्यवसायात कालांतराने काही अपप्रवृत्ती येतात. म्हणून महर्षींच्या प्राचीन कामाला त्यामुळे हीन वा कमी लेखायचे कारण नाही.

ओकांवर नाडीतून अर्थार्जनाचे लांछन लाऊन, त्यांच्यावर व्यक्तीगत पातळीवर हीन आणि हिणकस निंदा, शक्यतो पाणउतारा करून नाडीग्रंथांना खोटे ठरवता येणार नाही. हे आपल्यासारखे विचारवंत जाणता. वैयक्तिक आकस व वैचारिक बैठक यामुळे काहींना नाडी ग्रंथांची सत्यता मान्य करायला जड जाते आहे. ठीक आहे. त्यांना मान्य नाही तर नाही. त्याची चिंता ओकांना अजिबात नाही.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

हैयो हैयैयो

हैयो हैयैयो यांची विद्वत्ता त्यांच्या जालीय लिखाणावरून लक्षात आली होतीच.मुळात लिपीशास्त्र हे अत्यंत किचकट शास्त्र आहे.त्यातून प्राचीन लिप्यांचे वाचन करताना अनेक भाषांचे आणि त्यात कालानुसार झालेल्या स्थित्यंतराचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असते.लिपीच्या वस्तुनिष्ठ चिकित्सेसाठी कोणतेही साहित्य वर्ज्य मानण्याचे काहीच कारण नाही.भारतीय प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास करताना त्यात धार्मिक वाङ्मय फार मोठ्या प्रमाणावर असल्याचे जाणवते. देव,धर्म,ज्योतिष्य, भविष्य ,तंत्र अशा विषयांनी साहित्याचा फार मोठा भाग जर व्यापलेला असेल तर प्राचीन समाजव्यवस्थेचा अभ्यास करणार्‍याला तो दुर्लक्षून चालणार नाही. हैयो हैयैयो सारखे विद्वज्जन उपक्रमावर वावरत आहेत हे आमच्यासारख्या वाचकांचे भाग्यच आहे.
जाता जाता : डॉ. जी. जॉन् सॅम्युएल् हे प्राचीन-अर्वाचीन द्राविड भाषांचे तज्ञ असूनही त्यांना ग्रंथलिपी आणि ब्राह्मी लिपी वाचता येत नव्हती हे काहीसे खटकले.

हैयो हैयैयो सारखे विद्वज्जन उपक्रमावर वावरत आहेत हे आमच्यासारख्य


डॉ. जी. जॉन् सॅम्युएल् हे प्राचीन-अर्वाचीन द्राविड भाषांचे तज्ञ असूनही त्यांना ग्रंथलिपी आणि ब्राह्मी लिपी वाचता येत नव्हती हे काहीसे खटकले.

.....तसे आम्हाला देखील खटकले.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

हैयो हैयैयो

दोनवेळा पाठवला गेल्याने प्र.का.टा.आ.

प्रकाटाआ

प्रकाटाआ

अर्धाच परिचय!

हैयो हैहैयो यांचे नाव न देता हा परिचय काहीसा अर्धवट वाटतो.
अशा प्रकारचा काहीसा नाट्यमय (पडदा उघडल्यासारखा) परिचय पूर्वी काही पाठ्यपुस्तकात काही विशिष्ट आदरणीय व्यक्तींबद्दल असे - जसे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक इ. म. गांधी आणि लो. टिळक हे सर्वांना त्यांच्या इतर कार्यामुळे माहिती आहेत, वास्तविक आयुष्यात त्यांची नावे अनुक्रमे मोहनदास करमचंद गांधी आणि बाळ गंगाधर टिळक अशी आहेत हे मुलांना व्यवस्थित माहिती असे. तरी ह्या नाट्यमयतेने अशा व्यक्तींचे एक वेगळेच दर्शन घडत असे, मनावर ठसत असे. अशा प्रकारचे दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. पण त्याचबरोबर हैयो यांचे खरे नावही (त्यांच्या संमतीने) कळवायला हवे होते असे वाटले.

नाट्यमयतेने अशा व्यक्तींचे एक वेगळेच दर्शन घडते, मनावर ठसते

नाव न देता हा परिचय
हैयोहैयैयो येथे सदस्य आहेत. आपला परिचय ते योग्य वेळी करून देतील अशी आशा करू या.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

हय्यो

हय्योंची वेगळी ओळख आवडली. अन्यथा ते उपक्रमावर नाडीप्रेमी आहेत, तमिळ भाषेचे जाणकार आहेत, फुकट वकीली बाणा दाखवून वेळ वाया घालवण्यात आणि खरडीतून भांडाभांडी करण्यात धन्यता मानतात अशी माझी कल्पना होती.

 
^ वर