उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
गूढप्रश्न
हैयो हैयैयो
April 3, 2011 - 5:58 am
गूढप्रश्न
वाचकमित्रहो, नमस्कार. उपक्रम दिवाळी अंक २०१० मध्ये मी लिहिलेला नाडिग्रंथांतील जन्मदिनांकाची नोंद - एक अभ्यास हा लेख आपण वाचला असेलच. नाडिग्रंथांमधून जन्मदिनांकाची नोंद कशी येते हे मी त्या लेखामध्ये वाचकांच्या अभ्यासार्थ संक्षेपामध्ये दिलेले आहे. दिलेल्या श्लोकाच्या विवेचनामध्ये श्लोकांतील शब्दांतून माहिती मिळवून जन्मदिनांक कसा काढावयाचा हेही सांगितलेले आहे. त्या सार्या माहितीच्या सहाय्याने वाचकास स्वत: प्रयत्न करून गूढप्रश्न उकलण्याचा आनंद मिळावा म्हणून पुढे एक श्लोक मराठीभाषेमध्ये रूपांतरीत करून देतो आहे. खालील श्लोक येथील एका सदस्याने अभ्यासासाठी पुरविलेल्या वहीतून घेतला असून हा मूळ तमिळभाषेतील असलेला श्लोक खास उपक्रमच्या वाचकांसाठी जसा च्या तसा मराठीभाषेमध्ये भाषांतरीत केला आहे.
-
-
|
श्लोक: मराठी भाषांतरित
त्या संवत्सरी नलनाम कुंभमासी |
श्लोक: देवनागरीमध्ये लिप्यंतरित
ताऩाण्डु नळवाह कलसत्तिङ्गळ् |
|
श्लोक: मूळ तमिळ लिपीमधून
தானாண்டு நளவாக கலசத்திங்கள் |
श्लोक: ISO 15919 मध्ये लिप्यंतरित
tāṉāṇṭu naḷavāka kalacattiṅkaḷ |
-
वाचकांनी स्वत: श्लोकाचा अभ्यास करून आंग्लभाषेमध्ये जन्मदिनांक काढून द्यावा. त्यासंबंधी आपणास हवी ती माहिती सहजगत्या गूगल् येथे उपलब्ध आहे. शक्य झाल्यास जन्मरास, नक्षत्र आणि कोणते ग्रह कोण्या राशीत आहेत ह्यापैकी जे काही शक्य होईल तेही काढून द्यावे. गूढप्रश्नाचे उत्तर म्हणून येथे चर्चा करतां येईल.
विशेष सूचना :
- गूढप्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करणार्यावर 'विज्ञानविरोधी' असा शिक्का बसणार नाही. घाबरू नये. ;-)
- गूढप्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करणार्यावर ' त्याने नाडिग्रंथांस मान्यता दिली' असा आरोप लावला जाणार नाही. घाबरू नये. ;-)
विश्वचषक जिंकल्या निमित्ते तुम्हांस हार्दिक शुभेच्छा!
-
दुवे:

Comments
हा तिथीचा आकडा आहे काय ??
त्याकूणिसा तिथीवरी
हा तिथीचा आकडा आहे काय ??
होय.
होय.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
हा घ्या दिनांक
३ मार्च १९१७ :)
चंद्र् मिथुन राशित, पुनर्वसु नक्षत्र , गुरु मेषेत अश्विनी नक्षत्र, वार शुक्रवार
वार
की शनिवार
प्रकाश घाटपांडे
अभिनंदन!
श्री. ईश, आपले उत्तर जवळ-जवळ मूळ उत्तराजवळ आलेले आहे. श्री. घाटपांडे ह्यांच्या प्रश्नाचे उत्तर देता गूढप्रश्नाचे अचूक मूळ उत्तर आपणांस अवश्य मिळावे!
येथले दुसरे सदस्य श्री. रिकामराव ह्यांनी मंगळवार २३ नोवेम्बर् २०१० रोजी (त्याच आठवड्यातील) रविवारपूर्वी कूटप्रश्नासाठी "नक्की प्रयत्न करेन" असे आश्वासन माझ्या खरडवहीमध्ये दिले होते, परंतु नंतर त्यांनीही प्रयत्न सोडून दिले. असो. विज्ञानाभ्यासकांस आपण 'अमुकतमुक अभ्युपगमावर विश्वास ठेवत नाही' अशी भूमिका publicly maintain करणे आवश्यक असते असे मी ऐकून आहो. ह्या पार्श्वभूमिवर श्री. ईश, आपला प्रयत्न निश्चितच स्तुत्य मानावा! छान! उत्तम! साधु साधु!! ब्राsव्हो!! अभिनंदन! एकच विनंती: आपण ह्या दिनांकापर्यंत कसेकाय येवून पोहोंचलात ह्याचे इतर वाचकांकरिता थोडक्यात विश्लेषण करता येईल कां? मूळ प्रश्नांत विचारलेप्रमाणे, शक्य झाल्यास जन्मरास, नक्षत्र आणि कोणते ग्रह कोण्या राशीत आहेत ह्यापैकी जे काही शक्य होईल तेही काढून द्यावे. धन्यवाद.
अवांतरः श्री. घाटपांडे ह्यांचे ह्या धाग्यानिमित्ते झालेले पुनरागमन सार्यांस स्फूर्तीदायी ठरावे.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
प्रयत्न सोडून दिले
तुम्ही नाडीचे फिरते विक्रेते असल्याने तुमच्या नाडीसंबंधी लेखनास प्रतिसाद देणे त्यांनी थांबवले असावे का?
:)
कोडे सोडवण्याचा प्रकार दिसतो आहे हा, त्यामागे कोणता मुत्सदीपणा आहे, आहे किंवा नाही ह्यात मला काही रस नाही ;).
पण मला कोडे कसे सोडवले हे जाणून घ्यायची इच्छा आहे, कृपया त्यावर अधिक सांगावे.
उकल
लहानपणी शब्दचातुर्य कोड्यांचे एक वेड असायचे. त्यातील शब्दांना नेहमीपेक्षा वेगळे अर्थ लावून ती सुटायची. तमाशातले वा कव्वालीतले सवाल जबाब, शब्दकोडी ज्यात ऍनाग्राम असायचे असाच हा प्रकार वाटला.
संवत्सरांना नावे असतात. महिन्यांना राशीनुसार नावे देता येतात (सध्या ती नक्षत्रांवरून दिली आहेत.) इत्यादी करित हे कोडे सुटेल असे वाटते. त्यात मला फारसे गम्य वाटले नाही. पहिल्यांदा मी कुंडली शिकलो तेंव्हा नुसती कुंडली पाहून वर्ष (शनी आणि गुरु ची रास पाहून), तिथी चंद्र-सूर्याचा कोन पाहून, वेळ, महिना सूर्याची रास पाहून सांगत असे. त्याची आठवण झाली.
कोड्याची उकल केली तर बरे होईल. एवीतेवी उत्तर मिळालेच आहे.
या निमित्ताने दिवाळीनंतर लिखाणात आला हे वाचून बरे वाटले. दरम्यान आपण नाडी या विषयावर काही संशोधन केले आहे असे वाचनात आले होते. त्याच वेळी मी हे संशोधन कुठे प्रसिद्ध झाले असे विचारले होते. पण अजून उत्तर मिळाले नाही. कोड्याची उकल मिळाली नाही तरी चालेल, पण या प्रश्नाच्या उत्तराची मी अजून वाट पाहतो आहे.
प्रमोद
जाम्बुद्वीपक शास्त्राभ्याससंस्था
जाम्बुद्वीपक शास्त्राभ्याससंस्था
"लिपीशास्त्रानुषंगाने नाडिग्रंथांतील लेखनपद्धतीवर स्वतंत्ररीत्या अभ्यास" ह्या प्रकारातील एक विस्तृत शोधनिबंध उदाहरणांसह 'जाम्बुद्वीपक शास्त्राभ्याससंस्था, चेन्नै' येथे सादर केला आहे. अधिक माहिती 'जाम्बुद्वीपक शास्त्राभ्याससंस्था, सोळिङ्गनल्लूर्, चेन्नै ६००११९ भारत' ह्या पत्त्यावर समक्ष (आणि फुकट) मिळेल. हा शोधनिबंध ह्यापूर्वी उपक्रम दिवाळी २००९ अंकामध्ये संक्षिप्तस्वरूपांत प्रसिद्ध झालेला असून विविध आंतरराष्ट्रीय भाषा-लिपीविषयक कार्यशालांमध्ये ध्वनिमुद्रीत चित्रफीतींसह चर्चिला गेला आहे.
उपक्रम संकेतदळावर मी वरचेवर येत नाही; एखाद्या महत्त्वांच्या विषयांस उत्तर मिळण्यास विलंब होत असेल, तर haiyohaiyaiyo@gmail.com येथे संपर्क साधावा.
संशोधनाबद्दल जिज्ञासा दाखविणेसाठी धन्यवाद.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
वरील श्लोकात, काही ज्योतिषशास्त्रीय माहिती आहे
त्या संवत्सरी नलनाम कुंभमासी
त्याकूणिसा तिथीवरी उशनावारी
वसुपुन: नक्षत्र गुरुमेषधडी
मिथुनमनी पुढे निळ्या सर्पधन्वी
धन्वेतरी न सांगे सारे ते कलशी
वरील श्लोकात, काही ज्योतिषशास्त्रीय माहिती आहे. जशी संवत्सर नाव- नल, महिना -कुंभ, तिथी-१९, वार-शुक्रवार
नक्षत्र-पुनर्वसु इ.
नल वगैरे संवत्सर ६० वर्षातुन एकदा येत असते. सध्या खर नामक संवत्सर आहे, त्याच्या ३४ वर्षापूर्वी १९७७ ला नल हे संवत्सर होते, तसेच ६० वर्षे आधि १९१७ ला हि होते.
तमिळ कुम्भ महिना १४ फेब्. ते १५ मार्च असा असतो. १४ + १९ तिथी = ३/४ मार्च
श्लोकात शुक्रवार सांगितला आहे, ३ मार्च ला शुक्रवार आहे , तसेच पुनर्वसु नक्षत्र ही आहे...
म्हणुन श्लोकातील तारिख ३ मार्च १९१७ आहे...
ग्रह स्थिति अशी
गुरु- मेष , रवि-कुंभ, चन्द्र-मिथुन ,मंगळ-कुंभ,बुध-मकर,शुक्र-कुंभ, शनी-कर्क,राहु-धनु
@इश उशनावारी = शनीवारी
फक्त् 'उ' काढावा म्हणजे तो वार हा शनीवार आहे असे दीसते, ३ मार्च १९१७ या दीवशी पहीले महायूध्द सूरू झाले होते.
एक सुधारणा ...
एक सुधारणा ...
अपेक्षित दिनांक, २ मार्च १९१७ असा आहे.... २ तारखेला शुक्रवार होता, ३ ला शनिवार होता.
२ मार्च् १९१७, शुक्रवार - अभिनंदन!
२ मार्च् १९१७, शुक्रवार - अभिनंदन!
"नल नामक संवत्सर, कुंभमास, एकूणिसावी तिथी" इतकी माहिती दिनांक काढण्यास वर-वर पुरेशी ठरावी. परंतु नल संवत्सर हे ... १८५६-१८५७ / १९१६-१९१७ / १९७६-१९७७ / २०३६-२०३७ ... असे प्रति ६० वर्षांनंतर अनंतकालाकरिता पुनःपुन्हा येते, त्यामुळे, "नल संवत्सर, कुंभमास, एकूणिसावी तिथी" म्हणजे नेमके केंव्हा असा संभ्रम निर्माण होण्यास जागा आहे; तो होवू नये ह्याकारणे, नाडिग्रंथलेखक पडताळणीची सोय करून ठेवतो असे सांगतात. श्लोकांतील पुढील ओळींमध्ये नल नामक त्या विवक्षित संवत्सरामध्ये सूर्य कुंभ महिन्यात प्रवेशून १९ वी तिथी असतांना अवकाशामध्ये जी काही ग्रहस्थिती होणार असेल, तिची नोंद आढळते; वरील श्लोकांत ही नोंद पुढीलप्रमाणे आलेली आहे:- शुक्रवार, पुनःवसु नक्षत्र, गुरु मेषमध्ये लग्नीं, मिथुनमध्ये चंद्र, त्याच्यापुढे (एक घर?) शनि, राहु धनुमध्ये, आणि न उल्लेखिलेले इतर सारे कुंभमध्ये. ही ग्रहस्थिती २ मार्च् १८५७ मध्येही येणार नाही, अन् २ मार्च् १९७७ मध्येही येणार नाही. १९१७ मध्ये मार्च् महिन्यातील २ र्या दिवशी असलेली ही ग्रहस्थिती ही खरेतर त्या दिनी जन्मलेल्या जातकाच्या आयुष्याला ’साक्ष’ देणारी ग्रहस्थिती आहे असे वर्णन नाडिग्रंथांतून येते, तर 'हीच तुमची पत्रिका होय' असे प्रचलित भाषेमध्ये त्या जातकास सांगितले जाते.
श्री. ईश आपले पुनः एकदा अभिनंदन!
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!
नाडी ग्रंथांना वादावादीपासून दूर ठेऊन
श्री. ईश आपटे आणि अन्य मित्रहो,
हैयोंनी दिवाळी अंकात नाडी ग्रंथात तमिळ कूट श्लोक कसे असतात याचा नमुना म्हणून एका तमिळ कूट श्लोकाची मराठीतून बांधणीयुक्त फोड करून गूढ श्लोक म्हणून ओळख करून दिली होती. आपल्या वाचनात ती आली असेल. आपणातील अनेकांना असे शाब्दिक कूट सोडवण्यात रस असल्यास त्या कूटाची ज्योतिष विज्ञानाद्वारा पूर्ण फोड करून देता आली तर वाचायला आवडेल. श्री. आपट्यांनी यात छानच सुरवात केली आहे.
नाडी ग्रंथ तमिळ काव्यात आहेत त्यांचा तितक्याच सुलभरित्या मराठीतून त्याच काव्यवृत्तात मांडणी करण्याचे कसब हैयोंनी दाखवले आहे, त्यावरून मूळ नाडी ग्रंथांतील श्लोकांची रचना करताना महर्षींनी किती काटेकोर रचना केली आहे याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळाल्याचा आनंद आपणांस घेता यावा. नाडी ग्रंथांना टपल्या-टिचक्यांच्या प्रतिक्रिया देण्यापेक्षा अभ्यासपुर्ण विवेचन केले तर या विषयाला ज्योतिष शास्त्र आहे किंवा नाही या वादावादीपासून दूर ठेऊन काव्यरस ग्रहण करता येईल. या कूट वर्णनावरून जातकाने जन्मस्थल व जन्मवेळ दिलेली नसतादेखील केवळ पट्टीतील माहितीवरुन नवग्रहयुक्त पत्रिका मांडणे शक्य आहे काय? असल्यास ती पत्रिका कशी असेल याची फोड वा उकल केली गेली तर फार चांगले होईल, असे म्हणावेसे वाटते. त्यात जिज्ञासुंनी सहभाग घ्यावा ही विनंती.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९
पूर्ण उतारा द्या....
हैयों
वरील तमिळ उतार्यात पत्रिका मांडण्याएवढी पुरेशी माहिती दिली आहे. ह्या उतार्या बरोबर जर एखाद्याच्या नाडी पट्टीच्या काही भागाचा (नाव व्यवसाय शि़क्षण इ. आधुनिक शब्द असल्यास अधिक उत्तम्) तमिळ व मराठी भाषांतरित फोटो इथे टाकता आला, तर प्रचलित ज्योतिष पध्दतिनुसार त्याचे विश्लेषण करता येईल . व नाडि पट्टित पूर्वीच ही माहिती लिहून ठेवलेली आहे, ह्याचा पुरावा ही वाचकांना उपलब्ध होईल.
चला..
फिरत्या विक्रेत्यांना नविन गिर्हाइक मिळालेले दिसते. यशस्वी पुनरागमन!
"प्रत्यक्ष प्रमाणाचा अतिरेक"
"प्रत्यक्ष प्रमाणाचा अतिरेक" हा श्री. ईश आपटे यांनी मांडलेला चालू शतकोत्तरी चर्चाप्रस्ताव आहे. त्याची आठवण झाली. लालनिळ्या शाईतील श्री. शशिकांत ओक यांचा प्रतिसाद बघून प्रत्यक्षाच्या अपरिहार्यतेबद्दल (श्री. ईश आपटे उपक्रमावर रुजू होण्यापूर्वी) झालेल्या चर्चेची आठवणही अनायासे झाली.
या सदस्यांची सौहार्द्यपूर्ण आणि फलदायी चर्चा होऊ शकते असे वाटते. आम्ही आनंदाने वाचू. नाडीबद्दल/प्रत्यक्षाबद्दल चर्चा "प्रत्यक्ष प्रमाणाचा अतिरेक" चर्चेच्या संदर्भात अवांतर होणार नाही. सर्वांची अनुमती असल्यास हा उपधागा वेगळा काढावा असे सुचवतो.
जर एखाद्या मजकूराचा व्यवस्थीतपणे...
जर एखाद्या मजकूराचा व्यवस्थीतपणे अचूक अर्थ नीघत असेल तर तसा तो नीघाला असे मानण्यात काय चूक आहे ?
मि माझी पट्टी बघायला गेलो होतो (३ महीन्यापूर्वी), माझी पट्टी सापडली खानदान, नाव, जन्मदीनांक वगैरे व्यवस्थीत मॅच झालं, मी अवीवाहीत आहेच. पण साहेब म्हणत् होते की नाही तूमच ४-५ वर्षां पूर्वीच लग्न झालेलं आहे, मी म्हणालो हे शक्य नाही, तरी त्याचा तोच हेका, मग मीच म्हटलं तूमची पट्टी चूकीची माहीती सांगत असेल ? त्याने थोडा वीचार् केला व मग वीचारलं की कोणाशी अफेअर झालं होतं काय ? अर्थात नंतर् मी काय म्हणालो हे महत्वाच नाही पण त्यावेळी जो मनात संशय आला होता की समोरील माणूस (नाडीपट्टी) खोट बोलला तो मात्र आज नक्कीच् कमी झाला अशी चूक इंटरप्रीट करताना झाली असेल असे वाटते. ह्यूमन एरर ही गोश्ट नक्कीच सर्व ठीकाणी लागू होते. बाकी माझं भवीश्य कीती खरं ठरतं हे काळच ठरवेल मी मात्र कॅसेट सोबत माझ्या मोबाइल् मधेसूधा ते रेकॉर्ड करून् घेतलं होतं आणी आता 'टॅली' करायच्या प्रतीक्षेत आहे कीती योग्य आणी अयोग्य होते ते. मला नाडीग्रंथांबाबत आश्चर्यमीश्रीत कूतूहल आजही आहे.
गूढ प्रश्नाची उकल
साधारणपणे अशाच एका गूढ वाटणा-या सोप्या प्रश्नाची उकल मी सामान्यज्ञान आणि अनुमान यांच्या आधारावर पण एका त्रिकालज्ञानी बाबाच्या स्टाइलमध्ये कशी केली होती याची मनोरंजक चित्तरकथा खाली दिलेल्या दुव्यांवर वाचता येईल
भूतकालनिवेदन
कुंडलीचा अर्थ
अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रॉलॉजी या भिन्न विषयावरील माझी मते आणि विचार या कथारूप लेखनात स्पष्ट दिसतात. मी त्या मतांवर ठाम आहे.
नाडीग्रंथ ताडपट्टीतील काव्यरस ग्रहण
श्लोक: मराठी भाषांतरित
त्या संवत्सरी नलनाम कुंभमासी
त्याकूणिसा तिथीवरी उशनावारी
वसुपुन: नक्षत्र गुरुमेषधडी
मिथुनमनी पुढे निळ्या सर्पधन्वी
धन्वेतरी न सांगे सारे ते कलशी
श्लोक: देवनागरीमध्ये लिप्यंतरित
ताऩाण्डु नळवाह कलसत्तिङ्गळ्
तसमॊऩ्बाऩ् तॆय्दियदिल् कवियिऩ्वारम्
मीऩदुम् कीरिडमाय् कुऱुवामैयावि
मिदुऩमदि लाऩ्सिहि विल्लिल्पाम्बु
विल्मेलुम् पिऱर्कलसम् काणुम्कालम्
श्लोक: मूळ तमिळ लिपीमधून
தானாண்டு நளவாக கலசத்திங்கள்
தசமொன்பான் தெய்தியதில் கவியின்வாரம்
மீனதும் கீரிடமாய் குருவாமையாவி
மிதுனமதி நீலான்சிகி வில்லில்பாம்பு
வில்மேலும் பிறர்கலசம் காணும்காலம்
श्लोक: ISO 15919 मध्ये लिप्यंतरित
tāṉāṇṭu naḷavāka kalacattiṅkaḷ
tacamoṉpāṉ teytiyatil kaviyiṉvāram
mīṉatum kīriṭamāy kuruvāmaiyāvi
mituṉamati nīlāṉciki villilpāmpu
vilmēlum piṟarkalacam kāṇumkālam
मित्र हो,
“गूढप्रश्न” धाग्यावर लिहिताना धनंजयांनी सुचवल्यावरून मी हा नविन धागा विणू इच्छितो.
मी जे तेथे लालनिळ्या अक्षरात सुचवले होते की याच श्लोकांचा काव्याच्या अंगाने विचार होऊ शकतो काय ते ही उपक्रमींना विचार करायला सादर करावे.
हैयोंनी उपक्रमच्या दिपावलीच्या अंकात नाडी ग्रंथांच्या श्लोकांचा आधार घेऊन नाडी ग्रंथांतील जन्मदिनांकाची व त्यावेळच्या नवग्रहांच्या स्थितीची मांडणी कशी असते असे दर्शवले होते. त्यांचा त्यावेळी भर गूढप्रश्न करून एकांच्या नाडी ताडपट्टीतून लिहून आलेल्या श्लोकांतून जन्मदिनांक शोधायला विचारकांना प्रवृत्त करावे असा असावा. ईश आपटे यांनी अचुकपणे त्या कूटाचा अन्वयार्थ लावला आणि नागशक्ती यांनी आपल्या विचारांची-अनुभवाची त्यात भर घातली.
मी तमिळ भाषा तज्ज्ञ नाही. मात्र अनेकदा नाडी ग्रंथांच्या पट्यांच्या विविध लेखनाचे नमुने पहायला मिळालेला व्यक्ती आहेत. काही नाडी वाचकांशी बोलताना विविध श्लोकांतील अक्षर व शब्द योजनेतील बारकावे मला सांगण्यात येतात. त्यातील काही मला इथे जाणवले ते असे –
१) नाडी शास्त्री ताडपत्रावरील कूट(गूढ) लिपीतील किंवा हैयो म्हणतात तसे एकाला एक जोडून लिहिण्याच्या शैलीतून जो लेखी मजकूर वहीत लिहून देतात त्याची फोड केली तर लक्षात येते की ताडपत्रावरील सलग लिहिलेला मजकूर वस्तुतः चार ओळींच्या श्लोकांच्या स्वरुपात असतो. आपल्याला नाडीकेंद्रातून दिल्याजाणाऱ्या वहीतून तो मजकूर तीन स्तंभात दिसतो. थोडक्यात एका ओळीत तीन, असे चार ओळीत एकूण १२ शब्द किंवा शब्दसमुह त्यातून एक श्लोक तयार होतो. वरील उदाहरणांत तशा पाच ओळी हैयोंनी सादर केल्या आहेत. त्यावरून त्यातील एक ओळ ही दुसऱ्या श्लोकातील पहिली ओळ असावी.
२) मराठीत किंवा संस्कृतमधे दाम यमक नावाचा एक काव्यालंकार मानतात. त्यात ओवीतील शेवटचा शब्द पुढील ओवीतील पहिला शब्द असा रचलेला असतो की त्यातून एक प्रकारची साखळी तयार होते आणि काव्यातील गेयता वाढते. अनुभवी यावर मराठीतील उदाहरणांसह आणखी भर घालतील.
३) वरील श्लोकाचा अभ्यास करताना जाणवते की पाचव्या ओळीतील पहिले “வில்மே” हे शब्द त्याच्या आधीच्या ओळीच्या शेवटच्या “வில்” या शब्दसमुहाशी साधर्म्य दर्शवतो. तमिळ लिपीचा अभ्यास नसणाऱ्यांनाही जरा सुक्ष्मपणे पाहता ते ध्यानात येईल. हैयोंनी त्याच ओळी देवनागरीतून देऊन आम्हा वाचकांची ऐतीच सोय करून ठेवली आहे. याशिवाय त्या तमिळ अक्षरांचे रोमन अक्षरात ही कसे साधर्म्य सापडते ते त्यामुळे लक्षांत येईल.
४) या सर्वावर कडी म्हणजे हैयोंची जागृत काव्यप्रतिभाशक्ती! नाडी महर्षींनी जो दामयमकाचा काव्यालंकार तमिळमधे गुंफताना साधला तसाच तो हैयोंनी त्याच श्लोकांना मराठीतून सादर करताना वापरला आहे. त्यात त्यांनी धन्वि (धनुष्य या नवव्याराशीतील स्थानात - शनि) या शब्दाला असे चपखलपणे पुढल्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत धन्वे - धनुस्थानाव्यतिरिक्त न उल्लेखलेले ग्रह कलशराशीत - बसवलेत की ज्याचे नाव ते.
नाडी ग्रंथकर्ते महर्षीं प्रत्येक व्यक्तीच्या कथनासाठी अशा काव्यरचनेचा संकेत पाळतात कि फक्त इथे एक मासला दाखवला आहे म्हणून तेवढाच तो अनुभवायला मिळतो वगैरे गोष्टींची उकल या पुढे अपेक्षित आहे. उपक्रमवर अनेकांनी आपले नाडी ग्रंथ कथन अनुभवले असेल. त्यांना त्यांच्या कथनाची वही व कॅसेट मिळाली असेल त्यांनी आपापल्या वहीतील श्लोकांची रचना वरील संकेतांना धरून केलेली असते कि नाही याचा आपल्या परीने पडताळा घ्यावा ही विनंती.
ही तर फक्त झलक आहे. असे म्हटले तर अतिशयोक्ति ठरणार नाही.