इकार, उकार आणि वेलांट्या

फक्त इकार, उकार बदलून एकच शब्द किती प्रकारे अशुद्ध लिहीता येईल? त्याचे काही गुणोत्तर आहे का?
उदा. कितीदातरी हा शब्द खालील प्रकारे अशुद्ध लिहीता येईल.

कितीदातरी कितिदातरि, कितिदातरी, कितीदातरि, कीतिदातरी,कीतीदातरि,कीतीदातरी,
कीतिदातरि

यात तीन इकार आहेत. म्हणजे जास्तीत जास्त ९ प्रकारे हा शब्द लिहीणे शक्य आहे असे मानायचे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला विषय

गणिताप्रमाणे हा शब्द मूळाक्षरांचा क्रम एकच ठेवून 9 प्रकारे लिहिणे शक्य आहे. त्यातला 1 प्रकार प्रमाणित आहे असे म्हणता येईल. म्हणजे 8 प्रकारांनी तो अशुद्ध रित्या लिहिणे शक्य व्हावे.
माझा या विषयाचा अभ्यास नाही. उपक्रमवर अशुद्ध लेखन या विषयाचे खूप तज्ञ आहेत ते तुम्हाला योग्य ते उत्तर देतीलच.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

नौट् नेसेसरी

दिन दीन is a simple example
there can be more complicated cases

sometimes i do not find the suggestions in some software

फक्त इकार घ्यायचा आहे का अशुद्धलेखनात ?

कितीदतरी , कितीदातारी हे अशुद्धच ना?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

काही विचार

तज्ञ नाही तरीही काहि विचारः
क त द त र ही व्यंजने याच क्रमात आल्यावर व फक्त र्‍हस्व ते दिर्घ हीच चुक धरल्यास ३ ईकारांना ८ (२ --> ४, ३ --> ८, ४ --> १६, ट्रुथ टेबल काढावे)
मात्र, इकार-उकार विसरल्यास झालेल्या चुका काढायच्या तर अजून ८ चुका करता येतील.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चाराचे सोळा की पंधरा

४ स्वरांचे खरच १६ व्हेरिएशन्स बनतात का? मला "कितीदातरीडु" या शब्दासाठी १५ शब्द मिळाले. इंटरनेटवर ट्रुथ टेबल शोधले, मिळाले. पण त्यातले काही कळले नाही.

कीतीदातरिडू, कितीदातरिडू, कितीदातरिडु, कीतीदातरिडु, कीतिदातरिडु, कीतीदातरीडु, कीतिदातरीडू, कितीदातरीडू, कितीदातरीडु, कितिदातरिडु, कीतिदातरीडु, कितिदातरिडू ,कीतीदातरीडू, कितिदातरीडु, कितिदातरीडू

सोळावा

कीतिदातरिडू?

धन्यवाद

आपले नाव सार्थ केलेत. (हलकेच घ्या)
अवांतर : ५ अथवा ६ असा आकडा वाढवत नेला तर किती शब्द मिळतील? मला २ ते ९ स्वरांची विविध कॉम्बिनेशन्स बनवून बघायची आहेत.

उत्तर

:)
--
आकडा

न ह्रस्व-दीर्घ-शक्य स्वर असल्यास २^न

बरोबर.
शब्दात 'न' ह्रस्वदीर्घभिन्न स्वर असल्यास, ह्रस्वदीर्घांच्या फरकाने २ इतके विविध प्रकार बनू शकतात.

१,२,...'म' अशी भेदस्थाने असल्यास, आणि कुठल्याही 'अ'व्या स्थानावरती 'न' संख्येने पर्याय असले, तर वेगवेगळी रूपे पुढील गुणाकाराने मिळतील. (Π म्हणजे "अशा सर्व पदांचा गुणाकार करा")

Πअ =१...म {न}

इकार आणी वेलांटी मधे फरक काय म्हणे ?

म्हणजे तुमच्या शिर्षकात तुम्ही इकार, उकार आणि वेलांट्या असं म्हणलं आहे म्हणूण विचारतो.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

हा उपद्व्याप

हा उपद्व्याप कशासाठी चालला आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर पुस्तकविश्व वरील हा संवाद वाचावा...
http://tinyurl.com/3czpxwo

सभासदः पुस्तके आणि लेखक मधील सर्चमधे प्रॉब्लेम आहे. उदा. लेखक मधे तेंडुलकर विजय असे लिहीले असता काहीच येत नाही. (केवढा तो विनोद!). तेंडुलकर म्हणून सर्च केल्यास विजय तेंडुलकर सोडून सगळे लेखक दिसतात.

प्रशासकः तेंडूलकर मधला डू दीर्घ आहे (म्हणजे इथे विजय तेंडूलकर हे लेखकनाव दीर्घ डू असे लिहिलेले आहे. बरोबर-चूक माहिती नाही). त्यामुळे 'तेंडुलकर विजय' असे शोधल्यास काहीच येत नाही पण 'तेंडूलकर विजय' असे शोधल्यास त्यांची इथे यादीत असलेली सर्व पुस्तके येत आहेत.
_____

सभासद नेहमीच प्रमाण भाषाच वापरेल असे सांगता येत नाही. म्हणून सभासदाने दिलेल्या शब्दातील इकार, उकार उलटे, सुलटे करून त्यातील एखादा शब्द डेटाबेसशी जुळतो का ते पाहायला हवे. यासाठी मी खाली दिलेल्या पानावर क्वेरी दिली आहे.

http://code.google.com/p/hunspell-marathi-dictionary/wiki/automatic_Word...

प्रशासकांनी शक्य असल्यास त्याचा उपयोग सभासदांना गुगल टाईप शार्प-सर्च करून देण्यासाठी करावा.

धन्यु

पुविवर पुस्तके शोधताना हा प्रश्न नेहमी यायचा.. धन्यु.. तिथल्या प्रशासकांना हा दुवा व्यनी करतो
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

पुस्तकविश्व आणि ट्यूनिशिया

पुस्तकविश्वावर तेंडूलकर विचारल्यावर तेंडुल आणि तेंडूल दोन्ही आले. विजय तेंडुलकरांची सर्व पुस्तके आली नसावीत. काही तेंडु्लकर या नावाने असू शकतील.

ट्यूनिशिया हा शब्द मराठीत असाच लिहितात हे भूगोलांच्या, प्रवासवर्णनांच्या आणि मराठी नकाशा-पुस्तकांवरून नक्की माहीत होते. वर्तमानपत्रांतही तो बहुधा तसाच वाचला होता. असे असले तरी एके ठिकाणी मी लिहिलेला ट्यूनिशिया बदलून दुसर्‍याने तो ट्युनिसिया केला. मग गूगलवर शोध घेतला. निकाल असा:
Tunisia २१,४०,००,००० पाने
ट्यूनिशिया २०,१०० पाने
ट्युनिशिया ५०७० पाने
ट्युनिसिया ३४,६०० पाने.
निष्कर्ष : ट्युनिसिया सर्वात लोकमान्य; याचा अर्थ ते लिखाण बरोबर असेलच असे नाही. लेखनाची शुद्धता बहुमताने ठरवता येत नाही!
शेवटी उच्चारकोश पाहिला. खालील उच्चार मिळाले; पहिला प्रायमरी बाकीचे दुय्यम.
ट्यूनिझिया, ट्युनिझिया, ट्युनिझ्यिया, ट्युनिसिया, ट्युनिस्यिया. या पाचही उच्चारांचे स्पेलिंग सारखेच आहे, त्यामुळे उच्चार कसाही केला तरी गूगलवर रोमन लिपीत शोध करताना अडचण येत नाही.
आता मराठीसाठी, जर (१) र्‍हस्व-दीर्घांत, (२)श-ष-स मध्ये, (३)व-ब मध्ये, (४)अनुस्वार किंवा परसवर्ण जोडून केलेल्या लिखाणांत, किंवा (५)अनुस्वार, चंद्र, चंद्रबिंदू, विसर्ग असलेली वा नसलेल्या स्वर-व्यंजनांत काहीही भेद न करता "शोध" घेता आला तर आपल्यालाही ट्यूनिशियाला २०,१००+५०७०+३४,६००=५९७७० पानी निकाल मिळू शकेल. --वाचक्‍नवी

गुगल शोध

गुगलवर सध्याही असा शोध घेणे शक्य आहे. उदा. खाली दिल्याप्रमाणे OR वापरला तर आपल्याला अपेक्षित ५९,००० रिझल्ट्स मिळतातच.

ट्यूनिशिया OR ट्युनिशिया OR ट्युनिसिया

माझे म्हणणे असे आहे की उकार, इकार अशी अदलाबदल करून शब्द शोधण्याची जबाबदारी गुगलने किंवा त्या त्या संकेतस्थळाने घ्यावी. विंग्रजीत tonisia असं शोधलं की कसं आपोआप tunisia होतं? आता अशा सोयी उपलब्ध करून देण्याइतपत "मार्केट" नाही असा त्यांचा दावा असला तर त्यात तथ्य आहे हे मान्य करावे लागेल. पण मग त्यांच्यावर अवलंबून न राहता, जे भारतीय प्रोग्रामर आपल्या मातृभाषेसाठी काही वेळ देण्यास तयार असतील त्यांनी जावास्क्रीप्ट मध्ये अशी काही प्रणाली मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने का विकसित करू नये. मला त्यातील ज्ञान असते तर हा प्रतिसाद लिहिलाच नसता. माझ्या माहितीत गमभनकार ओंकार जोशी आहे, पण माझी गणना तिथेच संपते. है कोई ...?

इकारादी

रोमन कळफलक वापरून मराठी लिहिताना एकाच स्मॉल-कॅपिटल कळीवर ‍इ-ई, उ-ऊ, ए-ऎ, ओ-ऒ, क-ख, च-छ, त-ट, द-ड, ल-ळ, स-श-ष, न-ण, म-ं ही अक्षरे असतात. गूगलवर शोध घेताना किंवा ई-मेलचा पत्ता लिहिताना स्मॉल अक्षराऐवजी कॅपिटल लिहिले तरी चालते. मराठीतही असे स्वातंत्र्य घेऊन तेंडुलकरचा शोध घेताना टॆम्दू्ळखर अशी मागणी केली तरी सर्व तेंडुलकर यावेत. असे का होत नाही हे सांगायचीमात्र, माझी कुवत नाही. तरीसुद्धा मराठी लेखनाचा कळफलक एकदा कायमस्वरूपी सिद्ध झाला की हे शक्य होईल असे वाटते. --वाचक्‍नवी

नव्या कळफलकाची संकल्पना घडवुया कां?

मराठी लेखनाचा कळफलक एकदा कायमस्वरूपी सिद्ध झाला की हे शक्य होईल असे वाटते.

ज्या स्तरावर समस्या निर्माण होतात, त्या समस्येच्या वरच्या (वा पुढच्या) स्तरावर त्या सोडवता येतात.

'मराठीचा कळफलक' म्हणजे 'देवनागरीसाठीचा कळफलक'!
फिझीकल कळफलक तयार करायला कोणतीही अडचण यायची नाही.
अडचण आहे ती कळफलकाची 'संकल्पना' अगोदर कागदावर शब्दबद्ध करीत प्रत्यक्शात आणण्याची.
१)- आपल्याला युनिकोडच हवे.
- तर पर्यायी विचार कोणकोणते असू शकतात?
२) - आपल्याला युनिकोडच्या ही पुढे एखादी डाटा एन्कोडींग प्रणाली आली तर कळफलकाची नवी संकल्पना टिकू शकेल अशी हवी. मग कोणकोणत्या पर्यांचा विचार करावा लागेल?
३) - देवनागरीमध्ये काही त्रूटी आहेत. त्या दूर करीत नवी विकसित लिपीचाच विचार करावा कां? लिपीतील चिन्हे ह्यांना देवाच्या मुर्त्या समजून त्यांमध्येच 'देव आहे' असे मानायचे? की 'भावार्थ रूपातील' देव जाणून घेत 'चिन्हे व त्यांमधील सांगड' ह्यांमध्ये सुधारणा स्विकारायची?

(मुर्त्यांमध्ये देव असतो असे ज्या काळात मानले गेले त्या काळात बाहेरील आक्रमकांकडून येथे येवून मुर्त्यां फोडल्या गेल्या. पोथ्यांमध्ये देव असतो असे जेंव्हा मानले गेले तेंव्हा अनेक पोथी-पुराणे जाळली गेली, भस्मसात झाली. ज्या लढावू वृत्तीने मराठ्यांनी भारतावर आपले कर्तुत्व गाजवले, त्या मराठ्यांची 'मोडी लिपी' बाजूला सारून तो पराक्रम निरक्शरतेमुळे बखरींमध्ये धूळ खात ठेवायला लावत, शिक्शकाच्या भुमिकेतील इंग्रजांनी देवनागरी लिपी आपल्यालाला शिकवून कारकुंडे बनवले. अर्थात सांगायचा मुद्दा हाच की, आपलं आपलं म्हणायला या जगात आपलं काहीच उरत नसतं.)

४) संगणकाचा विकास अमेरीकेने 'संरक्शण क्शेत्रात उपयोग व्हावा' म्हणून केला होता, पण संगणकात 'वर्णांच्या वापराचा' शोध नकळतपणे लागला. प्राचिन काळी भारतात शब्दांचा वापर मंत्रांच्या रुपात शक्ती प्राप्त करण्यासाठी, युद्धात विजय प्राप्त करण्यासाठी केला जायचा. शब्द-वर्ण यांमधील तंत्र व संगणक विद्न्यानाचे तंत्र यांचा मिलाफ पुढील काळातील लिपींमध्ये, कळफलकांमध्ये झाला तर....?

 
^ वर