निमंत्रण

उपक्रमावरील लोकांना वादविवाद घालायला अथवा काथ्याकूट करायला फार आवडते. अशांसाठी आज एक कार्यक्रम आहे
आज दि. ९ एप्रिल २०११ रोजी राजीव साने यांची पहिली मांडणी खालील विषयावर असेल.

युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!” (वादविवादातील हमखास भरकटवणारे प्रकार, फॅलसीज)

वेळ: संध्याकाळी ६.०० वाजता मांडणीला सुरुवात होईल. त्यापूर्वी पोचावे ही विनंती.

स्थळ: पुणे, मनीषा सोसायटीचे सभागृह, नवसह्याद्री जवळील अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर `देवेश, (चितळे बंधू अधिकृत विक्रेते)” या दुकानाच्या रस्त्याला वळावे. व त्यानंतर लगेच उजव्या रस्त्याला वळून लगेचच्या डाव्या गल्लीत सभागृह आहे.

पार्किंग : अलंकार पोलीस चौकीकडून प्रतिज्ञा मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्किंग करणे सोयीचे ठरेल.

येणार असल्याची सूचना व्यनी अथवा खरड वही तुन दिल्यास संयोजकास सोयीचे जाईल.

लेखनविषय: दुवे:

Comments

परिचय

राजीव साने हे मुक्त विचारवंत आहेत. ते कामगार चळवळीचे विश्लेषक असुन तत्वज्ञान व समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत. पुण्यात ज्ञानप्रबोधिनीत चालणार्‍या जनतंत्र - उद्बोधन मंच ( राषट्रवाद अभ्यास मंडळ) हे विचारव्यासपीठाचे संयोजक आहेत. आजचा सुधारक तसेच अन्य वैचारिक विषयांना वाहिलेल्या नियतकालिके. वर्तमानपत्र यात सामाजिक विषयावर सातत्याने लेखन करतात
प्रकाश घाटपांडे

शुभेच्छा

कार्यक्रमासाठी शुभेच्छा. पण सवाल असा आहे की असे कार्यक्रम बघून समर्थपणे वादविवाद घालणे आणि काथ्याकूट करणे शिकता येते का? आणखी एक. ह्या कार्यक्रमाचे निमंत्रण लहान मुलांना देता येईल काय किंवा त्यांना सोबत आणता येईल काय?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद

पण सवाल असा आहे की असे कार्यक्रम बघून समर्थपणे वादविवाद घालणे आणि काथ्याकूट करणे शिकता येते का?

सांगता येत नाही पण असे कार्यक्रम मार्गदर्शक ठरतात.

ह्या कार्यक्रमाचे निमंत्रण लहान मुलांना देता येईल काय किंवा त्यांना सोबत आणता येईल काय?

कार्यक्रमाला आणुन कशाला लहान मुलांवर अन्याय करायाचा?
प्रकाश घाटपांडे

फक्त वयस्कांसाठी?

कार्यक्रमाला आणुन कशाला लहान मुलांवर अन्याय करायाचा?

का? लहान मुलांना मोठं नाही व्हायचं का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आधीचा लेख

राजीव साने यांचा एक लेख आपण इथे पूर्वी उद्धृत केला होता. त्यावरच्या प्रतिसादांवर साने यांची प्रतिक्रिया अजून कळली नाही.

नितिन थत्ते

प्रतिक्रिया

झुंडशाही म्हणजे देशद्रोहच
च्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्याचा उपयोग ते इतर मांडणीत करतात. उपक्रमावर लिहिणे त्यांना शक्य होत नाही
प्रकाश घाटपांडे

कार्यक्रमास शुभेच्छा....

--मनोबा

शुभेच्छा......!!!

कार्यक्रमासाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा.....!!!

-दिलीप बिरुटे

अरे वा! विशयाच्या नावातच किती पूणेरीपणा चूकलो, 'चतूरपणा' आहे!

चर्चेचा विशय - “युक्तिवाद म्हणजे क्लुप्तिचातुर्य नव्हे!” (वादविवादातील हमखास भरकटवणारे प्रकार, फॅलसीज)
चूकीचा आहे. किंवा एकाच अंगाचा विचार करून मांडलेला आहे. उदा. एखाद्याने चर्चेचा विशय ठेवला - 'पूणे हे मुंबईपेक्शा (किंवा जगातील इतर कोणत्याही भौगोलिक स्थानापेक्शा) चांगले शहर आहे.'
चर्चेचा प्रकार असा असेल तर चर्चा काय कप्पाळ करता येईल?

वादविवादात एखादी व्यक्ती, एकाच बोलण्याच्या संधीत समोरच्या व्यक्तीचे विचार बदलून टाकेल असे होत नसते. तसेच व त्याहून महत्वाचे असे की, 'दुसर्‍याचे विचार बदलून टा़कण्यासाठी बोलणे' असा विचार करणे हे त्याहून ही मोठी चूक आहे.

बोलावे, चर्चा करावी पण ते दुसर्‍याला समजून घेण्यासाठी, स्वतःला उमजून घेता येण्यासाठी.

'एखाद्याचा युक्तीवाद' ह्या शब्दाचा अर्थ माझ्या साठी तरी - 'एखाद्या व्यक्तीची जगाकडे पहाण्याची दृश्टी व त्यातून निर्माणा झालेली तर्कसूत्र मांडणी त्या व्यक्तीच्या वकूबानुसार मांडण्याची पद्धत!' (समवनस् इंटर्प्रीटेशन ऑफ हिज ऑर हर पर्सेप्शन ऍंड प्रेसेंटेशन इन हिज ऑर हर लॉजिकल फॉरमॅट)

क्लूप्तिचातुर्य हा शब्द फसवा आहे. ह्या शब्दाचा अर्थ काय? हा 'कृत्रीम शब्द' समोरच्या व्यक्तीचा युक्तीवाद मांडण्याचा हक्कच हिरावून घेणारा वाटतो. (आणी असा शब्द पूण्यातच निर्माण होवू शकतो. :^) )

इंटरेस्टिंग विषय.

विषय नक्कीच आवडीचा आहे. यावर प्रकाशकाकांनी एखादा लेख वगैरे लिहला तर आम्हाला वाचायला फार आवडेल. व्हिडिओ इ. नंतर उपलब्ध होणार असेल तरी कृपया जरुर सांगावे.

-Nile

शुभेच्छा!

कार्यक्रमाचा वृत्तांत आमच्या पर्यंत पोचवावात ही विनंती! :-)

बाकी या लेख-चर्चेत वाद घालत नाही! ;)

नव्हे -

(हा प्रतीसाद रावले यांच्या ह्या प्रतीसादाला आहे)

>>उदा. एखाद्याने चर्चेचा विशय ठेवला - 'पूणे हे मुंबईपेक्शा (किंवा जगातील इतर कोणत्याही भौगोलिक स्थानापेक्शा) चांगले शहर आहे.'
>>चर्चेचा प्रकार असा असेल तर चर्चा काय कप्पाळ करता येईल?

चर्चा करताना तुमचा मुद्दा चूक/बरोबर असू शकतो. तुम्हाला तो पटवून देता यायला हवा.

वरील वाक्यात पुणे हे चांगले शहर आहे हे मुद्यासगट पटवून देता यायला हवे. जर आले तर नक्कीच पुणे हे बाकी शहरांपेक्षा चांगले
शहर आहे हे मान्य करू कारण आत्तापर्यंत आम्हाला हे पटवून दिले आहे कि बाकी शहरे पुण्यापेक्षा कशी चांगली आहेत.

आणि तसेही तुम्ही कुठल्या बेसीसवर म्हणता की पुणे हे बाकी शहरांपेक्शा चांगले नाही ते ? काय आहे तुमचा स्त्रोत ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

अरेरे

चांगला विषय हुकला.
कृपया पुढील भाषणांबाबत अधिक कालावधीची पूर्वसूचना द्यावी.

प्रयत्न

पुढील वेळी नक्की प्रयत्न करेन.

पुढचा कार्यक्रम

पुढील कार्यक्रम १४ मे रोजी शनिवारी त्याच सभागृहात त्याच वेळेस होईल. तेव्हाचा विषय दैव प्रारब्ध पुर्वसंचित वगैरे कल्पना
प्रकाश घाटपांडे

नक्की येईन. धन्यवाद.

नक्की येईन. धन्यवाद.

वृत्तांत

अशा कार्यक्रमांचे थोडक्यात का होईना पण वृत्तांत लिहिणे शक्य आहे का?

 
^ वर