सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे

सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र

मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कीं आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिनला आता आपल्या देशाचा सर्वोच्च मुलकी सन्मान "भारतरत्न" देऊन आपण गौरविले पाहिजे.
त्याचे चकित करणारे विक्रम सर्वांनाच माहीत आहेत. पण त्याचे सहकारी खेळाडू त्याला किती मानतात आणि त्याच्यावर प्रेम करतात हे आपणही काल पाहिलेले आहेच. आपल्या संघाची विजयी सलामी सार्‍या वानखेडे मैदानाला देत असताना त्याला त्याच्या सवंगड्यांनी खांद्यावर घेऊन जी फेरी मारली तसा सन्मान क्वचितच कुठल्या खेळाडूला मिळाला असेल.
माझ्यासारखे सामान्य लोक त्याच्यावर प्रेम करतातच पण ही भावना सामान्य जनतेला त्याच्याबद्दल वाटणार्‍या प्रेमाचे आणि आदराचे द्योतक आहे. पण जेंव्हां त्या क्षेत्रातल्या बारकाया जाणणारे त्याचे सवंगडी त्याच्याबद्दलचे प्रेम, आदर आणि जवळीक व्यक्त करतात त्याची पातळी वेगळीच. हे दृश्य पाहून तिथे असलेल्या प्रत्येक प्रेक्षकाच्या आणि दूरचित्रवाणीवर ते दृश्य पहाणार्‍या कोट्यावधी लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असेल यात शंका नाहीं. हा प्रसंग सर्वांना सचिनला त्याचे सहकारी किती मान देतात हे दाखवून गेला आणि हे पहाणार्‍यांची हृदये गर्वाने फुगलीअसतील याची मला खात्री आहे. त्याच्या कित्येक सहकार्‍यांनी "आम्ही हा चषक सचिनसाठी जिंकला" असेही ठासून सांगितले.
भारताच्या राष्ट्रपती या नात्याने आपण पुढाकार घेऊन हा आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान सर्वांच्या लाडक्या सचिनला मिळवून देण्यासाठी भारत सरकारवर वजन व दबाव आणावा अशी मी आपल्याला विनंती करतो.
नमस्कार!
सुधीर काळे, जकार्ता
===================================

To:
Mrs Pratibhatai Patil
President of India
(President_of_India ; )
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as the Head of the State should become proactive & strongly press the Government to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

To:
Mr Man Mohan Singh,
Prime Minister of India
(Prime_Minister India ; )
Your Excellency,
I once again request you to consider very strongly to honour our Darling of the Nation Sachin Tendulkar awarding him our Highest Civil Honour "Bharat Ratna".
His legendary achievements are known to every Indian, but what you must have noticed personally yesterday on the TV screen (& at Mohali earlier) is the special place he has in the heart of his teammates who literally carried him on their shoulders around Wankhede for the team's Victory Lap!
Common people like me adoring him is one thing. It is just the love & respect the masses have for him. But when his fellow professionals (who know his greatness thanks to their own expertise in the said field) adore him as we all saw yesterday, it is totally another level of respect. It was really overwhelming feeling & I am sure no person in Wankhede & millions watching him must have missed the underlying professional respect they feel for Sachin and their love & affection for him. There were many team members who declared that they won the cup for him!
I think you as our Prime Minister should take lead to award this Highest Civic Honour of India to Sachin.
Warmest regards,
K B Kale
Jakarta

(ज्यांना मनापासून सचिनला भारतरत्न हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांनीही अशीच साकड 'ममो' आणि 'प्रपा' यांना घालावी म्हणूनच वर त्यांचे ई-मेल पत्ते मी दिलेले आहेत.)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् |युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् || युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् |युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |मी वानरसैनिक साचार | रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् |

लेखनविषय: दुवे:

Comments

का?

मागणी करायला विरोध नाही परंतु ही मागणी तुम्हाला आजच का सुचली असावी त्याचे कुतूहल आहे. त्याची कालची कामगिरी तुम्हाला खूपखूप आवडली काय?

+१

अजुन एक शंका:-

भारतरत्नाबद्दलची मागणी विश्वनाथन् आनंद ह्याच्यबद्दल का होत नाही
किंवा खाशाबा जाधव्, ध्यानचंद ह्यांच्याबद्दल कधीच इतक्या आग्रहानं का झाली नाही
हे कुणी सांगेल का?

--मनोबा

मी बुद्धीबळ, कुस्ती किंवा हॉकी या खेळात रस घेत नाहीं म्हणून!

केवळ मी बुद्धीबळ, कुस्ती किंवा हॉकी या खेळात रस घेत नाहीं म्हणून! जे घेतात त्यांनी केली असेलच.
___________
जकार्तावाले काळे

उत्तम !

माझं निदान ठळक बातम्यांवर तरी व्यवस्थित् लक्ष असतं निदान् गेल्या दहाएक वर्षांपासुन्. मला कधीही अशी मागणी दिसली नाही. हे खेळ खेळणार्‍यांच्या डोक्यात आपल्यासारख्या कल्पना कशा आणता येतील ह्याचा विचार करतोय.
अजुन् एकः-

दुसर्‍या ठिकाणी प्रतिसाद् दिलाय् तोच् इथे पेष्टवतोयः-

सचिनला भारत रत्न द्यायला हरकत कुणीच घेणार नाही हो पण बाबा आमटे, अभय बंग ह्यांना द्यावा असं कुणाला कधीच वाटत नाही का? समाजाच्या दृष्टीनं अधिक उपयुक्त/सामजिक मूल्य कुणाचं आहे? (मनोरंजक आणि आदरणीय/स्फूर्तिदायक मूल्य कुणाचही असलं तरीही. )

अक्षरधाम मंदीरावर घुसखोरांनी हल्ला केल्यावर थेट जीवावरचा सामना देणार्‍या जवानांना भारत रत्न द्यावा किंवा त्यानुसार त्याच्या अटिंमध्ये दुरुस्ती करावी असं कुणालाच का वाटत नाही?
भारताच्या अणुकार्यक्रमाचा भक्कम पाठपुरावा करणारे, त्याच्या साठी आवश्यक् ते मूलभूत सुविधा उभारणारे अगदि एका अर्थानं आख्ख्या जगाशी झगडुन् भारताला अणु कार्यक्रमात स्वयंपूर्ण् बनवणारे होमी भाभा ह्यांच्याबद्द्ल एवढी जोरदार मागणी ( निदान तुमच्याकडुन) का होत् नाही?

भारतात परम् नामक देशी बनावटीचा महासंगणक बनवुन महासत्तांच्या नाकावर् टिच्चुन् स्वतःचं स्थान निर्माण् करणार्‍या आणि भारतीय संशोधन् क्षेत्रात दूरगामी योगदान देणार्‍या, आख्ख्या भारताला एक अस्मिता दाखवणार्‍या संशोधकाचं नाव आपल्याला कसं काय् आठवलं नाही?
असो. अवांतर् वाटत् असेल दुर्लक्ष करावं. अवांतराबद्दल दिलगीर. भावना बर्‍याचदा अनावर् होतात आणि मनातली कळ कळलाव्या कळफलकातुन स्क्रीनवर उतरते.

--मनोबा

इतर कुणाला हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांच्याबद्दल आपण लिहावे

मनसाहेब,
मी सचिनला हा सन्मान मिळावा असे लिहिले म्हणजे इतरांना मिळू नये असे माझे मत थोडेच आहे? मी माझे सचिनबद्दलचे मत मांडले इतकेच.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा नंबर मी आपण होऊनच दिला आहे. तेंव्हां तुम्हाला कुणाला हा सन्मान मिळावा असे वाटते त्यांच्याबद्दल आपणही त्यांना जरूर लिहावे.
दुसर्‍या एका संस्थळावर बुद्धिबळपटू श्री आनंद यांनी स्वतःच सचिनला हा मान मिळावा असे सरकारला सांगितले आहे अशी माहिती मला मिळाली आहे.
(पण इतरांची तरफदारी करताना सचिनच्या रस्त्यात अडथळे आणू नयेत ही नम्र विनंती!)
___________
जकार्तावाले काळे

अवाजवी महत्व

+ १ सहमत.

भारतात कला-क्रिडा (क्रिकेट) क्षेत्राला अवाजवी महत्व दिले जाते. एखाद्या कलाकाराने १००० प्रयोग रंगभूमीवर केले की त्याच्याबद्द्ल पानभर बातमी दिली जाते, हरभजनने संथ डोक्याच्या श्रीसंथला झापड मारली की, इन्स्याटची झेपही झाकोळली जाते.

जाकार्ताचे काळे साहेब क्रिकेटप्रेमी आहेत हे नक्कीच पण ते अतिरेकीप्रेम वाटते. तसेच उपक्रमावर वरील प्रकारचे लेखन कसे चालते हे ही कुतूहल आहेच.

+१

कालची कामगिरी पाहून मागणी करयाची होती तर धोनीची करा. सचिन क्रंच टाइमला विकेट फेकून पॅवेलियनमधे जाऊन बसला होता. धोनीमुळे शेवटी सचिनला वर्ल्डकप दिसला.

आक्षेप!

--सचिन क्रंच टाइमला विकेट फेकून पॅवेलियनमधे जाऊन बसला होता-- फेकुन ह्या शब्दाला आक्षेप!

सचिनने भारताला सातासमुद्रापलीकडेपर्यंत सन्मान मिळवून दिला.....

हे माझे प्रतिनभाताईंना लिहिलेले तिसरे पत्र आहे. पहिले लिहिले होते त्याच्या एकदिवशीय सामन्यातल्या पहिल्या द्विशतकानंतर तर दुसरे होते त्याचे पन्नासावे कसोटी शतक झाल्यावर.
खरे तर आजवरच्या ६९ वर्षांच्या माझ्या आयुष्यातल्या मताधिकार मिळाल्यानंतरच्या ५०+ वर्षांच्या आयुष्यात संघातील सहकार्‍यांनी कुणाला असे खांद्यावर घेऊन मैदानाला प्रदक्षिणा घातल्याचेही मी पाहिलेले नाहीं किंवा "हा चषक आम्ही सचिनसाठी जिंकण्याचा चंग बांधला होता" असे स्पर्धेच्या आधीच नव्हे तर विजयानंदाच्या क्षणीही जवळ-जवळ प्रत्येकाने म्हटले. त्याला त्याच्याच क्षेत्रातले लोक किती मान देतात ते यावरून दिसते. युवराजसिंगचा पुनर्जन्म त्याच्यामुळेच कसा झाला हे खुद्द त्याच्या वडिलांनीच एका मुलाखतीत अलीकडेच सांगितले. अशी तरुणांना त्याने मार्गदर्शन केल्याची किती तरी उदाहरणे आहेत.
याआधी पाँटिंगनेही "माझा सचिनप्रमाणे पुनर्जन्म होऊ दे" असे उद्गार काढले होते.
असा क्रिकेटपटू भारतात जन्मला व आपल्या जन्मभूमीला त्याने इतका सातासमुद्रापलीकडेपर्यंत सन्मान मिळवून दिला त्याला भारतरत्न मिळावे हा मूळ मुद्दा आहे हे ध्यानात घ्यावे.
माझे म्हणणे मान्य असल्यास क्षुल्लक वाद उकरून न काढता मी दिलेल्या पत्त्यावर आपणही निरोप लिहावेत आणि मान्य नसल्यास सोडून द्यावे!
धन्यवाद
___________
जकार्तावाले काळे

आवाहन

जाहिररित्या इथं संस्थळांवर् केलेलं आहे. त्यामुळं आवाहनाबद्दलच्या शंकाही जाहिररित्या विचारणं सयुक्तिक वाटत. त्यामुळं:-
माझे म्हणणे मान्य असल्यास क्षुल्लक वाद उकरून न काढता मी दिलेल्या पत्त्यावर आपणही निरोप लिहावेत आणि मान्य नसल्यास सोडून द्यावे!
हे वाक्याबद्द्ल एकच म्हणेन. हा एक क्षुल्लक वाद उकरुन काढला जातोय( पाठिंबा देण्याऐवजी) असं तुमचं मत आहे. आपल्या मला मताचा आदर आहे. तसाच आदर माझ्या स्वतःच्याही मताचा आहे. आपण न्युल्किअर डीसेप्शन बद्दल सांगोपांग् लिहिणारे काळे आहेत ह्यचही आम्हाला कौतुक आहे.

--मनोबा

आपल्या मताची मी नोंद घेतली आहे.

आपल्या मताची मी नोंद घेतली आहे. क्षमस्व.
खरे तर हे मी इथे 'आता' कां लिहिले त्याची कारणे दिली होती. आपण पुन्हा एकदा माझी पोस्ट वाचावी ही विनंती. (विजयाची सलामी देताना त्याचे सहकारी त्याला खांद्यावर घेऊन कसे गेले, कसा बर्‍याच खेळाडूंनी आपण कप त्याच्यासाठी जिंकला असे सांगितले वगैरे)
'भारतरत्न' एक सिनेमा हिट झाला अशा कारणाने मिळत नाहीं. सातत्याने केलेल्या कामगिरीबद्दल मिळतो. उदा. लतादीदी, पै. उ. बिस्मिल्ला खान, कै. पं. भीमसेन जोशी इ.
धोनीचीही वेळ येईलच. पण "आजचा क्षण सचिनचाच" असे वाटले म्हणून मी वरील कारणांचा उल्लेख केला होता. लाराच्या ४०० (कसोटी)/५०० (प्रथम श्रेणी) धावांखेरीज कुठला विक्रम मोडायचा सोडलाय् सचिनने? शिवाय खांदादुखीच्या त्रासामुळे त्याने हल्ली गोलंदाजी करणे बंद केले होते, पण त्या आधी त्याने एकदिवशीय सामन्यात १५० बळीही घेतले आहेत हेही विसरू नये! तो एक थोर खेळाडूच नव्हे तर एक थोर व्यक्तीही आहे.
आणि त्याचे कौतुक केल्याने इतरांना कमी लेखले जाते असे नाहींच.
('न्यूक्लियर डिसेप्शन' ही मालिका लिहिलेला काळे मीच!)
___________
जकार्तावाले काळे

सचिनचे मोडायचे राहिलेले विक्रम

१. अजून एकही त्रिशतक काढले नाही. वीरूने दोन काढली आहेत.
२. रॉय डायस आणि नंतर गस लोगी यांच्यासारख्या १२ चौकार मारून ५० धावा काढणे.
३. जावेद मियांदादसारखे ७ वर्ल्डकप खेळणे. सचिनचे आता ६ झालेत. २०१५ चा सातवा बरोबरीचा आणि २०१९चा ८ वा विक्रमाचा.

त्यामुळे २०१९च्या वर्ल्डकपनंतर भारतरत्न द्यावे.

तूर्त इतकेच. आठवले की भर घालीन.

मियांदादने सहा विश्वचषक खेळलेत मालक.

६ विश्वचषक.

--मनोबा

फुली-फुली-फुली हे तर नक्कीच!

सचिनने यंदा जावेद मियाँदादच्या सहा विश्वचषक स्पर्धांत खेळल्याच्या विक्रमाची बरोबरी केलेली आहे! २०१५ सालीही तो खेळेल असा रंग आता तरी दिसत आहे. तसे झाल्यास तोही एक विक्रम होईल! नाही तर sharing the top honour हे तर नक्कीच! (वर फुली-फुली-फुली म्हणजे sharing the top honour असे समजून घ्यावे. कारण 'उपक्रम'च्या नियमानुसार विषय लिहिताना रोमन मुळाक्षरे चालत नाहींत!)
___________
जकार्तावाले काळे

तुलना नसावी

सचिन तेंडुलकरला भारतरत्न द्यावे की नाही हा स्वतंत्र विषय आहे. इतर कुणाला का दिले नाही/ दिले जात नाही हा वेगळा. सचिनची कालची कामगिरी हे त्याला भारतरत्न मिळावे यासाठी कारण होऊ शकत नाही,( ती सामान्यच होती) पण गेली एकवीस वर्षे तो ज्या निष्ठेने कामगिरी करत आहे, त्यासाठी त्याचा या सन्मानासाठी विचार व्हावा असे वाटते. कोट्यवधी लोकांना त्याने जो निर्भेळ आनंद दिला आहे त्यासाठी त्याला हा सन्मान दिला जावा. भारताने विश्वकरंडक जिंकला आणि सचिनचा हा शेवटचा विश्वकरंडक होता म्हणून नाही. कोणताही सन्मान वेळेवर दिला तर त्याचे वेगळे महत्त्व असते.

सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

सहमत

सचिनला भारतरत्न मिळावे ही मनापासुन इच्छा.

-Nile

दम नै

छ्या ह्यात काय दम नै...सच्याला काय मिळायचा ते सगळा मिळाला आहेच कि, उगा भारतरत्न वगैरे ची गरज नाही.

बाकी लिवनार असाल तर मनमोहनसिंगला आमचा बी नमस्कार लिवा. :)

आणखी

सचिनचे माहीत नाही पण काही उपक्रमी सदस्यांना त्यांच्या प्रतिसादाबद्दल भारतरत्न देण्यात यावे असे वाटते. एका मॅचवर भारतरत्न ठरू शकते तर एका प्रतिसादावर का नाही? ;)

काळेकाका, हा प्रतिसाद गंभीर नाही. कृहघ्या.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

:)

इग्नोबलच्या धर्तीवर भारतकोळसा पुरस्कारही सुरू करता येतील.

हिरा हा स्फटिकीकरण झालेला कोळसाच असतो!

होय. हिरा हा स्फटिकीकरण झालेला कोळसाच असतो!
___________
जकार्तावाले काळे

अगदी हेच

हिरा हा स्फटिकीकरण झालेला कोळसाच असतो!

अगदी हेच म्हणणार होतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

रत्न म्हणजे दगड

रत्न म्हणजे स्फटीकीकरण झालेला दगड. फक्त कोळसाच नाही.
त्याचबरोबर काय 'रत्न ' आहे! असे उपरोधिक म्हणण्याची पद्धत आहे. भारतकोळसा ऐवजी भारतदगड हे जास्त शोभून दिसेल. किंवा भारत'रत्न' देखिल.

प्रमोद

भारत'रत्न'

रत्न म्हणजे स्फटीकीकरण झालेला दगड. फक्त कोळसाच नाही.

हे माहीत नव्हते. पण काय गंमत आहे. भारतदगड हेदेखील माझ्या मनात आले होते. भारतनग हा आणखी एक पर्याय.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हिरा झालेल्या कोळशाला दगड म्हणतात

चूभूद्याघ्या, पण माझ्या मते स्फटिकीकरण झाल्यानंतर हिरा झालेल्या कोळशाला दगड (पत्थर) म्हणतात.
___________
जकार्तावाले काळे

सचिनला भारतरत्न

सचिनला भारतरत्न निश्चितच मिळावे. :-)

थोड्याच बिगर-राजकारण्यांना मिळालेला दिसतो हा पुरस्कार

थोड्याच बिगर-राजकारण्यांना मिळालेला दिसतो हा पुरस्कार.
सर्वच खूप "ज्येष्ठ" (मानाने, तसे वयानेही) आहेत :
- - -
सी. व्ही. रामन्
एम्. विश्वेश्वरैया
धोंडो केशव कर्वे
पांडुरंग वामन काणे
मदर तेरेसा
विनोबा भावे
जे. आर. डी टाटा
सत्यजित राय
एम्. एस्. सुब्बलक्ष्मी
रवि शंकर
अमर्त्य सेन
लता मंगेशकर
बिस्मिल्ला खान
भीमसेन जोशी
- - -(यादी विकिपेडियावरून. राजकीय पद असलेले लोक मी वगळलेले आहेत.) - - -

असे दिसते की यांत एकही क्रीडापटू नाही. एखाद्या ज्येष्ठ क्रिकेटपटूला हा सन्मान मिळाल्यास बरे होईल.

एकूण ४१

अत्तापर्यंत ४१ भारतरत्न दिली गेली आहेत (दुवा)
त्यापैकी १४ बिगर-राजकारण्यांना मिळाली आहेत.

एक प्रश्न :

भारतरत्न निवड समिती मधे राष्ट्रपती आणि पंतप्रधान असतात काय ? त्यांना पत्र पाठवून उपयोग होणार हाये काय ?

(कोण निवड करतं बाय द वे ?)

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

बरोबर आहे

त्यांना पत्र पाठवून उपयोग काय.
पाठवायचेच आहे तर मॅडमना पाठवा.

||वाछितो विजयी होईबा||

महाराष्ट्र सरकारची शिफारस

"सचिनला भारतरत्न द्यावे". सहमत आहे.
आताच हाती आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्राच्या राज्य सरकारानेही केंद्रशासनाला तशी शिफारस केल्याचे समजते.
धन्यवाद.

रजनीकांतला भारतरत्न

खरे तर आधी रजनीकांतला भारतरत्न द्यायला हवे. तो तिथे नसता तर मॅच जिंकणे कठीण होते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

रजनीकांतलाच का?

खरे तर आधी रजनीकांतला भारतरत्न द्यायला हवे. तो तिथे नसता तर मॅच जिंकणे कठीण होते.

सहमत आहे पण रजनीकांतलाच का? त्याच्या फ्यान्सनाही भारतरत्न द्या. ;-)

अशा कोणत्यातरी फ्यानच्या वाहवाला बळी पडून मी रोबोट पाहिला होता.

तो

अशा कोणत्यातरी फ्यानच्या वाहवाला बळी पडून मी रोबोट पाहिला होता.

तो फ्यान मी असेन तर दिलगीर आहे. वाटल्यास तिकीटाचे पैसे पाठवू शकतो. ;)

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

हाहाहा!

नाही तुम्ही तो फ्यान नाही. माझ्या काही दक्षिणात्य मैत्रिणी आहेत त्यांनी भयंकर स्तुती वगैरे केली होती त्यानंतर मी कधीतरी तो अर्धवट यूट्यूबवर पाहिला आणि बाकीचा परवा टीव्हीवर पाहिला.

अरे बापरे! काय भयंकर प्रकार आहे. टीव्ही चालू असतो आणि त्यावेळात बाकीची कामेही सुरू असतात म्हणून बरं आहे. तरीही, पैसे खर्चून तिकीटे काढून हा चित्रपट बघणार्‍या सर्व रत्नांना माझा प्रणाम. ;-)

बाकी, तिकीटाचे पैशे पाठवत असाल तर तशी माझी ना नाही. ;-)

अवांतरः हे रजनीकांतचे प्रतिसाद अवांतर नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी. जेथे रजनीकांत असतो ते सर्व विषयाला धरून असते. तिथे काही अवांतर नसते. ;-)

हा हा हा.

हा हा हा.

रोबोट बघण्याची तीव्र इच्छा होते आहे. :)

रूढ रजनीकांत-स्तोत्राच्या आधारे रजनीकांतला काही देणे(भारत-रत्न) म्हणजे त्याच्याकडचे घेऊन त्यालाच देण्यासारखे आहे (हा अपमान समजला जातो :P)
माहिती - रंजनीकांत-स्तुती-स्तोत्र हे texas ranger फेम "चक नॉरिस-स्तुती-स्तोत्रावर" आधारित आहे असे जाणकारांचे मत आहे.
हो आणि रजनीकांतच्या बाबत काहीच अवांतर नसते, सगळे स्कोप मधे असते.

भारताचा गौरव

रूढ रजनीकांत-स्तोत्राच्या आधारे रजनीकांतला काही देणे(भारत-रत्न) म्हणजे त्याच्याकडचे घेऊन त्यालाच देण्यासारखे आहे (हा अपमान समजला जातो :P)

सहमत! किंबहुना रजनीकांतला भारतरत्न देणे हा भारताचा गौरव आहे.

रजनीकांतच्या बाबत काहीच अवांतर नसते, सगळे स्कोप मधे असते.

हेच आणि असेच!

रजनीकांतची महती...

हे रजनीकांतचे प्रतिसाद अवांतर नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी. जेथे रजनीकांत असतो ते सर्व विषयाला धरून असते. तिथे काही अवांतर नसते. ;-)

रजनीकांतचा मुद्दा एखाद्या चर्चेत आला की मूळ विषयच अवांतर बनतो!
रजनीकांतचा गुद्दा एखाद्या चर्चेवर आला तर काय होत असावं असा प्रश्न पडला आहे. :)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

रजनीरत्न ?

तुम्हाला "भारताला रजनीरत्न बहाल करा" असं म्हणायच आहे काय ?
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

सचिनरत्न

तुम्हाला "भारताला रजनीरत्न बहाल करा" असं म्हणायच आहे काय ?

हाहाहाहा. रजनीचे माहीत नाही, मात्र काळेकाकांचे सचिनप्रेम बघता त्यांना सचिनरत्न हा पुरस्कार नक्कीच द्यायला हवा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

नक्कीच

मला पण हेच वाटते!

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

इंग्रजीवर मराठीची छाया

जाकार्तावाले काळेसाहेब, तुमच्या इंग्रजीवर मराठीची छाया आहे- अनेक सुधारणा होऊ शकतात.

हे जरा नवीनच ऐकले!

हे जरा नवीनच ऐकले! आतापर्यंत (म्हणजे 'न्यूक्लियर डिसेप्शन'च्या भाषांतराच्या सुरुवातीच्या प्रकरणांबद्दल लिहिताना) अनेकांनी माझ्या मराठीवर इंग्रजीची छाप असल्याचे लिहिले होते.
असो. माझे इंग्रजी सुधारून मला व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवा. उपकृत होईन!
___________
जकार्तावाले काळे

शब्दांतर

--मराठीवर इंग्रजीची छाप --
असेलही, ट्रान्सलेशन ही कलाच आहे. तुमची अनेक इंग्रजी वाक्ये मराठी वाक्यांचे सही-सही शब्दांतर आहे, भाषांतर नव्हे.
उदा- "तुम्हाला पुन्हा एकदा ठासुन सांगतो... (मनमोहनसिंग विचार करेल की, "ह्या आधी कधी लिहीले होते बुवा तुम्ही?")
किंवा, "काल तुम्ही टीव्हीवर पाहीले असेलच की,.... ह्याला "माइट ह्याव सीन (ऑर एक्स्पीरीन्सड्).." असे म्हणणे योग्य होइल तुम्ही मस्ट ह्याव ... असे लिहीले आहे. वगैरे/

या विषयावर मनमोहनसिंगना केलेले हे तिसरे आवाहन आहे

इथे उपक्रमवर पहिल्यांदाच लिहिले असले तरी या विषयावर मनमोहनसिंगना केलेले हे तिसरे आवाहन आहे. पहिले होते त्याने ग्वाल्हेरला २०० धावा काढल्यावर आणि दुसरे होते त्याच्या कसोटीतील ५० शतके झाल्यावर. त्यामुळे आपल्याला "once again" हा शब्द खटकला असला तरी ममोसिं यांच्या स्टाफला खटकू नये
___________
जकार्तावाले काळे

दुर्लक्ष करा

दोन्ही उदाहरणांमधे मराठीची छाप असल्याचा काय संबंध? काहीही
काळेकाका तुम्ही लक्ष देऊ नका. उपक्रमी गिरीश हे (बीफ घातलेल्या चॉकलेटसारखे) कुजकट प्रतिसाद देत असतात आजकाल. त्याकडे कुणी फारसे लक्ष देत नाही.

बिघडत नाही

--त्याकडे कुणी फारसे लक्ष देत नाही.
ओके. काही बिघडत नाही. :-)

भारतरत्न

सचिनला भारतरत्न मिळाले तर मला आनंदच होईल. पण काळेसाहेबांसारखे मला त्याला अगदी मिळालेच पाहीजे असे काही वाटत नाही. यात सचिनला कमी करायचा प्रश्न नाही. तो माझा देखील आवडता आहे आणि खेळाडू म्हणून, भारतीय म्हणून तसेच एक व्यक्तीम्हणून आदर्श देखील आहे.

पण एकूणच भारतरत्न किताब फार पातळ झाला आहे. भिमसेन, लता, सुब्बालक्ष्मी वगैरेंसारखी खरी रत्ने सोडली तर तो किताब फारच कमी जणांचे प्रतिनिधित्व करतो ज्यांना (चांगल्या अर्थाने) "रत्ने" म्हणता येईल.

आता महाराष्ट्र असेंब्लीने सचिनला भारतरत्न द्या म्हणायचे म्हणजे त्याच्या नावाचा वास्तवीक वापर करण्यातला प्रकार आहे. मग अशा राजकारणात सचिनचा बळी कशासाठी?

बरं ज्या खेळात आता स्वतःचा लिलाव केला जातो कोणी तरी विकत घेते, पैसे मिळतील त्याच्या तर्फे खेळले जाते, अशा खेळातील खेळाडूंना भारतरत्न का म्हणायचे, जे कधीकाळी धोंडो केशव कर्व्यांसारख्या असामान्य व्यक्तीस मिळाले होते, हा प्रश्न पडतो.

थोडक्यात पुढचे "भारतरत्न" कुणाला देयचे असेल त्या व्यक्तीस देण्याआधी, त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे आणि निवडपद्धती ही अधिक सुस्पष्ट, अधिक पारदर्शक आणि त्याहूनही पूर्णपणे "राजकारणविरहीत" आधी करावे असे वाटते.

एक शंका

सध्याच्या मसुद्यानुसार भारतरत्न हे कला, समाजसेवा, विज्ञान व साहित्य यांत सर्वोच्च कामगिरी केलेल्यांसाठी आहे असे समजते. यात 'क्रीडा' हे क्षेत्रच नसल्याने सचिनचा समावेश करता येईल का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

धन्यवाद

चांगली माहिती आहे (मसुद्यात बदल करण्याइतपत दम सरकारमध्ये नसावा अशी आशा करतो).

ऊठसूट भारतरत्न : शनिवार, ९ एप्रिल २०११

ऊठसूट भारतरत्न : शनिवार, ९ एप्रिल २०११

(कुमार केतकर ह्यांचे मत उपक्रमींच्या विश्लेषणासाठी.)

कलीयुग आल्यावर काय काय बदलणार आहे, याची बरीच चर्चा आजवर झालेली आहे, परंतु एक गोष्ट आजवर भल्या भल्या पंडितांच्या लक्षात कशी काय आली नाही कोणास ठाऊक! कलीयुगात घडून आलेला सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे देव आणि भक्त यांचे नाते बदलले. सत्ययुगात सगळेच काही आलबेल होते अशी गैरसमजूत करून घेण्याची आवश्यकता नाही, हे आपल्याला जरा पुराणात डोकावले तर कळतेच. परंतु क्षणभर तसे ते मान्य केले तरीही सत्ययुगानंतर झालेल्या बदलांकडे आपण गांभीर्याने पाहिलेच पाहिजे. देव म्हणजे देणारा आणि भक्त म्हणजे घेणारा असे हे ‘देव-घेव’नाते होते. कलीयुगात या नात्याचा फेरविचार झाला. म्हणजे अगदी फाशीच्या शिक्षेपासून तर लोकपाल विधेयकापर्यंत प्रत्येक गोष्टीचा फेरविचार करण्याची एक महान लोकशाही परंपरा आपल्या देशात असल्याने फेरविचार सतत सुरूच असतात. आता या फेरविचारांचाच फेरविचार करण्याची वेळ आली तरीही आपण त्याच त्याच विचारांभोवती फेर धरून नाचतो आहोत.

तर मुख्य मुद्दा असा की, देव आता देत नाहीत, भक्त मात्र त्यांना देण्यासाठी आतुर आणि उत्सुक असतात. बरे भक्तांना जे काही द्यायचे असते त्यासाठी ते स्वत:च्या पदराला खार लावायला अजिबात उत्सुक नसतात. कोणाच्या तरी काठीने साप मारावा, कोणाच्या तरी चपलेने विंचू ठेचावा, तसे परस्पर कोणाकडून काही तरी मिळवून द्यायचे अशी ही कलीयुगी भक्ती आहे. सचिन तेंडुलकर नामक देवाला भारतरत्न मिळालेच पाहिजे, असे ठासून सांगणाऱ्या भक्तांचा जत्था सध्या सर्वत्र हिंडतो आहे. त्या आधी म्हणजे अगदीच अलिकडे अलीकडे, चार वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची मागणी त्यांच्या भक्तांनी केली होती आणि अशी मागणी करणे बालीशपणाचे आहे, असे अडवाणी यांनी म्हटल्याचे अजूनपर्यंत तरी कुठे प्रसिद्ध झालेले नाही. आणि आता अण्णा हजारेंनी दिल्ली काबीज केल्यावर त्यांनाही भारतरत्न द्यावे अशी मागणी त्यांची भक्तमंडळी करू लागली आहेत. आता पुरस्कार तर एवढे झाले आहेत की, ‘गल्लीरत्न’पासून तर ‘दिल्लीरत्न’पर्यंत कोणताही पुरस्कार मिळणे, मिळविणे तसे काही फार अवघड राहिलेले नाही. या सगळ्याच पुरस्कारांच्या निवड समित्याही असतात, म्हणजे रत्नपारख्यांची संख्यासुद्धा भरपूर झाली आहे, परंतु सगळे भक्त आपापल्या देवांना थेट भारतरत्नच देण्यासाठी उत्सुक आहेत.

सचिनचे शंभरावे शतक झाले नाही हे नशीबच म्हटले पाहिजे. विश्वचषकावर कब्जा आणि सचिनचे शंभरावे शतक असा सुवर्णयोग जर जुळून आला असता, तर कदाचित भक्तांनी ‘सचिनला आता देशाचा राष्ट्रपती करावे’ अशीच थेट मागणी केली असती. सचिन महान खेळाडू आहे, त्याची खेळाप्रती असलेली निष्ठा अजोड आहे आणि एक माणूस म्हणूनही तो तेवढाच चांगला आहे. सगळे कबूल. सगळे मान्य आहे, परंतु भारतरत्न? क्रिकेट सामन्याचे समालोचन करणारे अनेकदा बोलण्याच्या ओघात, हा खेळ किती महान आहे वगैरे सांगत असतात, तो त्यांच्या व्यवसायाचा एक भाग आहे. एखादी चित्तथरारक लढत जिकंल्यावर क्रीडा समीक्षक त्याच्या स्तंभात काल सचिन देवासारखा धावून आला वगैरे लिहित असतात. ‘देवासारखा’ या शब्दातला ‘सारखा’ हा शब्द ज्यांना कळत नाही त्या लोकांच्या बुद्धीची कीव तरी का आणि किती करावी? असे समीक्षक त्या क्षणी सचिनला देव म्हणतात, तेव्हा त्यांची ती भावना खरीच असते, परंतु तो तो खेळाडू त्या त्या क्षणांचा देव असतो. त्याचे ते देवपण तिथेच सोडून देण्याचे शहाणपण भक्तांनी दाखवायला हवे. आणि लोकभावनांचे क्षणिकपण समजून घेऊन आपल्या प्रतिक्रिया देण्याचे भान राजकारण्यांनीही दाखवायला हवे.

भारतीय संघाने पाकिस्तानला हरविले त्याचा आणि त्यात सचिनच्या धावांचा वाटा मोठा होता याचा, त्याच्या भक्तांना कैफ चढला. पाठोपाठ आपण चषकही जिंकला, त्यामुळे देवावर प्रसन्न होऊन त्याला काही तरी दिलेच पाहिजे, असा हट्ट धरणाऱ्या भक्तांच्या महाआरत्यांचे आवाज गल्लोगल्ली ऐकू येऊ लागले. त्या आरत्यांच्या आवाजात आवाज मिळवून आधी आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी, ‘होय सचिनला भारतरत्न दिले जावे अशी शिफारस आम्ही जरूर करू’, असे जाहीर करून टाकले. आणि पाठोपाठ भाजपाचे एक प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनीही ‘हां, सचिन को भारतरत्न जरूर मिलना चाहिये’, असे सांगत आपणही काँग्रेसपेक्षा कमी अपरिपक्व नाही, हे दाखवून दिले. काही भक्त गणंगांनी तर सचिनने राजकारणात यावे आणि भ्रष्टाचाराचा सफाया करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. देवाच्या डोक्यावर हात ठेवून भक्ताने त्यालाच भस्म करून टाकावे, तसला हा प्रकार झाला. सचिन आणि त्याच्या सहकाऱ्यांना ते विश्वचषकात खेळत असल्याबद्दल रग्गड मानधन मिळते. त्यांची कामगिरी चांगली झाली तर त्यांना बक्षीस देण्यासाठी क्रिकेट संघटनेकडेही अमाप पैसा आहे. तरीही या खेळाडूंना राज्य सरकारांकडून कोटींची बक्षिसे अणि मोफत प्रवासाच्या सवलती आणि काय काय दिले जाते. आधी म्हटल्याप्रमाने ते अर्थातच सरकारी पैशातून असते, खरे तर आपले सगळेच राजकारणी आणि मंत्री-संत्री त्यांच्या त्यांच्या गावचे-परिसराचे राजे असतात, परंतु अशा एखाद्या राजाने, आपल्या स्वत:च्या खिशात हात घालून खेळाडूंना काही तरी दिल्याचे कधी ऐकले-वाचले आहे का कोणी? आणि भारतरत्न म्हणजे तर काय, सरकारच्या गोठय़ात बांधलेली गायच आहे. कोणीही यावे आणि तिच्या दुधावर हक्क सांगावा. या पुरस्काराचे गांभीर्य काय आहे, तो कोणाला दिला जाऊ शकतो, त्यासाठी कर्तृत्वाची गुढी किती उंच हवी, याचा विचार भक्तांनी कशाला करायचा? त्यांना तर आपल्या देवाला सर्वोच्च पुरस्काराचा नैवेद्य दाखवायचा आहे.

आडवाणी यांना भारतरत्न देण्याची मागणी मोठय़ा आवाजात सुरू होती त्यामागे त्यांचे शत्रू होते, हे अडवाणींच्या भक्तांच्या फार उशिरा लक्षात आले. अडवाणींना भारतरत्न देऊन ‘आड’मार्गाने त्यांना राजकीय यार्डात ढकलण्याचे, त्यांचे राजकीय आयुष्य संपविण्याचे ते कारस्थान होते. आपल्याला खरेच भारतरत्न मिळेल असे तेव्हा बहुधा अडवाणींनाही वाटले असावे, परंतु ‘सुधिंद्र कुलकर्णी कृपे करून’ त्यांनी पाकिस्तानात जाऊन जीनांचे गोडवे गायले आणि भक्तांचे तोंड आंबट करून टाकले. त्यांना भारतरत्न दिले नाही ते बरेच झाले, असे मग भक्तांनाही वाटू लागले. आता सचिनच्या कामगिरीचा भावनोद्रेक जरा कमी झाला नाही तोच अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार मुक्ती आंदोलनाने सर्वांना झपाटून टाकले आहे. समाजात कोणी नेता उरत नाही, आदर्शाचा तुटवडा निर्माण होतो तेव्हा लोक अशा वरवरच्या आदोलनांमध्ये वाहून जातात. अशा आदर्शांकडून काही काळाने होणारा अपेक्षाभंग हा अधिक घातक असतो, हे भक्तांना कळत नाही. एखाद्या आंदोलनाचे इव्हेंटमध्ये रूपांतर कधी होते ते अनेकदा त्या आंदोलनाच्या नेत्यालाही कळत नाही.अनेकदा तर प्रसारमाध्यमे त्या आंदोलनाचा ताबा घेतात आणि नेत्याला त्यात फरपटत जावे लागते. तेव्हा पुरस्कार आणि सन्मानांची मागणी करताना, काही काळ जाऊ देणे आवश्यक आहे. आजपर्यंत मिळालेले सर्वच भारतरत्न शंभर टक्के योग्य आहेत असे नव्हे, परंतु भावनेच्या भरात ऊठसूट भारतरत्नची मागणी जर करण्यात येत असेल आणि जबाबदारीच्या पदांवर बसलेली माणसेही अविचाराने त्या मागणीची री ओढत असतील, तर हा देश रत्नांची खाण होऊन बसेल आणि खऱ्या नररत्नांचा मात्र तुटवडा कायमच राहील.

तेव्हा भक्तांनो, जरा आवरा स्वत:ला.

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

 
^ वर