वर्ल्ड कप आणि नंतरचा गोंधळ

अखेरीस वर्ल्ड कपचा चकवा काल रात्री एकदाचा संपला. गेले काही दिवस माध्यमांनी नुसता उच्छाद आणला होता. बातम्यांच्या मधे वर्ल्ड कप, चर्चा सत्रे सुद्धा फक्त वर्ल्ड कप बद्दलची. एका क्रीडास्पर्धेला किती महत्व द्यायचे? टीव्ही वाहिन्यांनी तर ताळ तंत्र सोडूनच दिले होते. ही स्पर्धा खूप रंगली बीसीसीआय (BCCI) या संस्थेकडून पगार घेत असलेल्या व अंगावरच्या कपड्यांवर सहारा असे नाव छापून घेऊन खेळणार्‍या संघाने, शेवटच्या तीन सामन्यात उत्कृष्ट खेळ केला व ही स्पर्धा जिंकली. हे सामने बघायला खूप मजा आली. वगैरे बाबतीत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. आज सकाळी सहज बीसीसीआय हा खरोखर काय प्रकार आहे हे बघावे म्हणून जालावर जरा शोध घेतला. जी माहिती कळली ती मोठी रोचक निघाली.

The Board of Control for Cricket in India (BCCI), headquartered at Mumbai, is the national governing body for all cricket in India. It's not the apex governing body in India. The board was formed in December 1928 as BCCI replaced Calcutta Cricket Club. BCCI is a society, registered under the Tamil Nadu Societies Registration Act. It often uses government-owned stadiums across the country at a nominal annual rent. It is a "private club consortium". Basically to become a member of a state-level association, one needs to be introduced by another member and also pay an annual fee. The state-level clubs select their representatives (secretaries) who in turn select the BCCI officials. BCCI are not required to make their balance sheets public. In the past, tax exemptions were granted to BCCI on the grounds as promoting cricket was a charitable activity but for the last three years the IPL has questioned this.
As a member of the International Cricket Council (ICC), it has the authority to select players, umpires and officials to participate in international events and exercises total control over them. Without its recognition, no competitive cricket involving BCCI-contracted Indian players can be hosted within or outside the country.

कलकत्ता क्रिकेट क्लबचा उत्तराधिकारी असलेले हे बोर्ड म्हणजे तामिळ नाडू सोसायटीज रजिस्ट्रेशन कायद्याच्या अंतर्गत पंजीकरण झालेली एक सोसायटी आहे. नाममात्र भाड्याने ही सोसायटी सरकारी मैदाने भाड्याने घेऊन त्यावर सामने भरवत असते. प्रत्यक्षात ही सोसायटी अनेक खाजगी क्लबांनी मिळून बनवलेली आहे. आपला जमाखर्चाचा अहवाल सार्वजनिक करण्याचे कोणतेही बंधन या सोसायटीवर नाही, ही संस्था धर्मादाय संस्था आहे या कारणासाठी. या संस्थेला आयकर भरावा लागत नाही. परंतु गेली 3 वर्षे चालू असलेली आयपील स्पर्धा ही संस्था धर्मादाय असून कशी भरवते? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

ही सर्व माहिती येथे बारकाईने देण्याचे कारण म्हणजे वरील सर्व माहितीनुसार बीसीसीआय ही संस्था भारत सरकारने पुरस्कृत केलेली किंवा शासकीय संस्था असल्याचे दिसत नाही. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की बीसीसीआय च्या संघाला भारताचा अधिकृत संघ या नावाने का ओळखले जाते? मला तरी उत्तर सापडले नाही.
अर्थात हा वरील मुद्दा हा माझ्या लेखाचा विषय नाही. मला सांगायचे आहे हे कालचा सामना संपल्यावर जे काय घडले त्या बद्दल. रात्री 10-45 च्या सुमारास सामना संपला. काल दिवसभर रस्त्यावर सामसूमच होती. संध्याकाळी रस्त्यवरून चारचाकी चालवताना आपण 1950 किंवा 1960 सालच्या पुण्यात वाहन चालवतो आहोत की काय असा भास होण्यासारखी एकूण परिस्थिती होती. नंतर सुद्धा वाहनांचे, त्यांच्या भोंग्यांचे, कसलेच आवाज येते नव्हते. एकूण संध्याकाळ मोठी शांत व आल्हादकारक होती यात शंकाच नाही.
बीसीसीआय च्या संघाने रात्री 10.45 च्या सुमारास सामना जिंकला व काही मिनिटात परिस्थिती पालटली. रस्ते अचानक तुडूंब भरून वाहू लागले. दुचाक्या, चारचाक्या यामधून प्रामुख्याने तरूण वर्ग बाहेर पडू लागला व चित्र विचित्र आवाज, शिट्या यांनी आसमंत दुमदुमून गेले. हजारो फटाके वाजू लागले. वर आकाशात आतशबाजी सुरू झाली. मधून मधून काही घोषणा ऐकू येत होत्या. जरा लक्ष देऊन ऐकल्यावर या घोषणा " जय शिवाजी! जय भवानी!" किंवा " शिवाजी महाराज की जय!" या आहेत हे लक्षात आले. मला जरा गोंधळ्यासारखे झाले. क्रिकेट सामना व शिवाजी महाराज किंवा भवानी देवी यांचा काय बरे संबंध असावा! असा विचार केला. परंतु तसे काही कारण दिसले नाही.
अर्धा तास हा गोंधळ कमी होईल म्हणून वाट बघितली. गोंधळ कमी होण्याचे काही नामनिशाण दिसले नाही. वरच्या मजल्यावर जाऊन खिडकीतून डोकावून बघितले. दुचाकी, चारचाकी मधली मंडळी, नुसती ओरडाआरड करत गोल गोल फिरत होती. हा प्रकार रात्री एक दीड पर्यंत बहुदा चालू असावा. मला नक्की कळले नाही कारण सुदैवाने मला झोप लागली.

सकाळी जाग आल्यावरही, "ही मंडळी असे का करत होती?” हा विचार काही मनातून जाईना. माणसाच्या भावना जेंव्हा पराकोटीच्या होतात त्याच वेळी तो असे वर्तन करतो. मग एका क्रीडा सामन्याने भावना अशा टोकाला कशा जाऊ शकतात? हे कोडे मोठे अभ्यास करण्याजोगे आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे टीव्ही आणि माध्यमे आहेत याबद्दल शंकाच नाही. या माध्यमांनी गेला महिना दीड महिना ताळतंत्र सोडून जे महत्व या सामन्यांना दिले आहे त्या मुळेच दर्शकांच्या भावना एवढ्या टोकाला जाऊ शकत असल्या पाहिजेत. जो संघ देशाचा अधिकृत संघ सुद्धा नाही त्या संघाच्या चांगल्या प्रदर्शनाचा आणि देशाबद्दलच्या अभिमानाचा खरे म्हणजे संबंध सुद्धा येऊ नये. परंतु प्रत्यक्षात मात्र हा क्रिकेटचा सामना म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्या सारखे तरूण वर्गाला का वाटावे? कालच्या सामन्यात हा सामना मुंबईला म्हणजे महाराष्ट्रात खेळला गेला व इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू असे ज्याच्याबद्दल म्हटले जाते तो सचिन तेंडुलकर, महाराष्ट्रीय आहे एवढाच खरे म्हणजे महाराष्ट्राचा संबंध होता. तरी सुद्धा, तरूण वर्ग शिवाजी आणि भवानी संबंधित घोषणा का बरे करत असावा? बीसीसीआय संघाचा सामना व देशप्रेम यांचा कसा संबंध जोडता येतो? प्रश्नच प्रश्न! उत्तरे मला तरी न मिळणारी! न सापडणारी!
3 एप्रिल 2011

लेखकांना सूचना - कृपया दोन परिच्छेदांमध्ये एक ओळीचे अंतर सोडावे त्यामुळे वाचन सुलभ होते. सध्या अशी सोय करून दिली आहे. हीच सूचना इतर सर्व लेखकांसाठीही येथेच देण्यात येत आहे. - संपादक मंडळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

गोळ्या घालण्याचे स्वांतंत्र्य?

विना-जबाबदारी प्रक्षोभक मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हवे असल्यास, त्यावर विना-जबाबदारी क्षोभयुक्त कृती करण्याचे
स्वातंत्र्य देखील असावे.

म्हणजे एखाद्याने प्रक्षोभक मत व्यक्त केल्यावर त्याला गोळ्या घालण्याचे स्वांतंत्र्य म्हणता की काय. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानातल्या पंजाबचा राज्यपाल सलमान तासीरला ब्लासफेमी कायद्याच्या विरोधात बोलण्यावरून गोळ्या घालण्यात आल्या. तसेच प्रकार भारतात सुरू व्हायला हवेत असे सुचवत नाही आहात ना?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

खुलासा

मी म्हणूनच बेजबाबदारपणे केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यांबद्दल बोललो, सलमान ह्यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदार नव्हते, त्यांना मारणारा माथेफिरूच होता. पण म्हणून दादोजींचा पुतळा हलविणे हे किंवा शिवरायांच्या संदर्भात हीन वक्तव्य करणे ह्या गोष्टींमधून कोणतेही सकारात्मक कार्य घडणार नव्हते हे आधीच माहित असताना ती कृती किंवा वक्तव्य करणे आणि त्यावर क्षोभ ओढवून घेणे, सारखेच नव्हे काय?

कर्व्यांनी स्त्री शिक्षणासाठी त्याकाळी केलेले कार्य कदाचित प्रक्षोभक मानले गेले असेल, पण त्या कृतीत किंवा वक्तव्यात कृतीशील/प्रगतीशील वैचारिक जबाबदारपणा होता, त्यास समर्थन आहेच/असेल.

असहमत

पण म्हणून दादोजींचा पुतळा हलविणे हे किंवा शिवरायांच्या संदर्भात हीन वक्तव्य करणे ह्या गोष्टींमधून कोणतेही सकारात्मक कार्य घडणार नव्हते हे आधीच माहित असताना ती कृती किंवा वक्तव्य करणे आणि त्यावर क्षोभ ओढवून घेणे, सारखेच नव्हे काय?

असहमत. शब्दांनी प्रचंड हिंसा होऊ शकते हे खरे आहे. जिवानिशी मारणे सोडून द्या पण मारहाण करणे, दहशत घालणे ह्या प्रकारांना पाठिंबा देता येत नाही किंवा दुर्लक्ष करता येत नाही. विशेषतः शासनाने अशा घटनांना कंडोन करणे किंवा त्यांचे छुपे समर्थन करणे तुम्हाला चुकीचे वाटत नाही का?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

समर्थन करू नये

शब्दांनी प्रचंड हिंसा होऊ शकते हे खरे आहे. जिवानिशी मारणे सोडून द्या पण मारहाण करणे, दहशत घालणे ह्या प्रकारांना पाठिंबा देता येत नाही किंवा दुर्लक्ष करता येत नाही. विशेषतः शासनाने अशा घटनांना कंडोन करणे किंवा त्यांचे छुपे समर्थन करणे तुम्हाला चुकीचे वाटत नाही का?

असे शब्द आणि अशी कृती दोघांचे समर्थन करू नये असे मला वाटते, स्वातंत्र्याच्या नावाखाली अशी वक्तव्य/कृती करणे चुकीचेच आहे. पण एका अविवेकी गोष्टीचे स्वातंत्र्य असल्यास दुसर्या अविवेकी गोष्टीस पण स्वातंत्र्य मिळावे हा आग्रह आहे.

चुकीचा आग्रह

एका अविवेकी गोष्टीचे स्वातंत्र्य असल्यास दुसर्या अविवेकी गोष्टीस पण स्वातंत्र्य मिळावे हा आग्रह आहे.

कुणी अपशब्द बोलल्यास त्याचा खून करण्याचे स्वातंत्र्य मिळावे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन बरोबर (इज ईक्वलटू) हीन, हिणकस वक्तव्यांचे समर्थन असे गृहीत धरणेही चुकीचे आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

खुलासा

कुणी अपशब्द बोलल्यास त्याचा खून करण्याचे स्वातंत्र्य मिळावे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

नाही, स्वातंत्र्य नसावे. पण अपशब्द बोलण्याचे स्वातंत्र्य मागितल्यास हे स्वातंत्र्य सुद्धा असावे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन बरोबर (इज ईक्वलटू) हीन, हिणकस वक्तव्यांचे समर्थन असे गृहीत धरणेही चुकीचे आहे.

सहमत. पण ते बऱ्याचदा इम्प्लाइड असते म्हणून आक्षेप, तसेच वर दादोजी प्रकरण/जेम्स लेन प्रकरण देखील तसेच आहे म्हणून आक्षेप.

असहमत

  1. अपशब्द ही मानीव इजा आहे, कोणाला कोणत्या शब्दाने वाईट वाटेल त्याची खात्री नसते. शारिरीक इजा नियमबद्ध असते.
  2. कायदे गेम थिअरीने बनलेले नसतील तर ते अग्राह्य आहेत. do unto others as you have them do unto you हा सोनेरी नियम पाळला जाणे अपेक्षित आहे ('बळी तो कान पिळी' या तत्त्वापेक्षा हे तत्त्व अधिक फायद्याचे आहे कारण कितीही बलिष्ठ व्यक्ती असली तरीही कधी-ना-कधी तिच्यापेक्षा बलवान व्यक्ती सापडू शकतो). एखाद्या समाजात निअँडरथल आणि होमो सेपियन्स एकत्र असतील आणि निअँडरथलना होमो सेपियनपेक्षा कमकुवत असतील तर त्यांच्या कमकुवतपणाला संरक्षण देणारे हक्क बनणार नाहीत. 'आमच्या' भावना कधीच क्षतिग्रस्त होत नसल्यामुळे भावनांचे संरक्षण हा मूलभूत हक्क होऊ नये. 'शारिरीक इजेपासून संरक्षण' ही परिस्थिती सर्वांनाच आवश्यक असल्याने त्याची खात्री हा नक्कीच मूलभूत हक्क रहावा.

खुलासा.

अपशब्द ही मानीव इजा आहे, कोणाला कोणत्या शब्दाने वाईट वाटेल त्याची खात्री नसते.

म्हणूनच अधिक जबाबदारीने शब्द वापरणे गरजेचे असते. तरी अपशब्द म्हणजे रूढ अर्थी काय(जातीवाचक/वयक्तिक/धार्मिक/राष्ट्रीय/वर्णभेदी वगैरे) हे साधारणतः सर्वमान्य आहे. ज्ञात संदर्भात कोणते वक्तव्य अपशब्द ठरू शकते हे माहित असते, ते करताना जबाबदारीचे भान असले तर त्याचे समर्थन करता येऊ शकते.

do unto others as you have them do unto you हा सोनेरी नियम पाळला जाणे अपेक्षित आहे

विवेकवाद ह्याच अर्थी होता.

'आमच्या' भावना कधीच क्षतिग्रस्त होत नसल्यामुळे भावनांचे संरक्षण हा मूलभूत हक्क होऊ नये. 'शारिरीक इजेपासून संरक्षण' ही परिस्थिती सर्वांनाच आवश्यक असल्याने त्याची खात्री हा नक्कीच मूलभूत हक्क रहावा.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्यास भावनाच क्षतिग्रस्त होतात न? कि शाररीक इजा होते?

फरक

अपशब्द म्हणजे रूढ अर्थी काय(जातीवाचक/वयक्तिक/धार्मिक/राष्ट्रीय/वर्णभेदी वगैरे) हे साधारणतः सर्वमान्य आहे. ज्ञात संदर्भात कोणते वक्तव्य अपशब्द ठरू शकते हे माहित असते

असहमत, धार्मिकांच्या अनेक आचरट कृतींमुळे/श्रद्धांमुळे/कथांमुळे (उदा., चिलया बाळ) आमच्या भावना दुखावतात.

विवेकवाद ह्याच अर्थी होता.

do unto others as you have them do unto you तत्त्वाचा अर्थ असा की स्वतःच्या घरी इतरांनी केलेली चोरी तुम्हाला मान्य होणार असेल तर तुम्हीही इतरांकडे चोर्‍या करा, चोरीविरुद्ध कायदा काढून टाकू. आमच्याविषयी त्यांनी वाट्टेल ते शब्द वापरल्यास आम्हाला चालणार आहे या कारणास्तव आम्हालाही त्यांच्याविषयी वाट्टेल ते शब्द वापरण्याचा हक्क आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्यास भावनाच क्षतिग्रस्त होतात न? कि शाररीक इजा होते?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याच्या परिस्थितीत अभिव्यक्ती केल्यास शारिरीक क्षति होईल. उलट, भावना दुखावण्यापासून संरक्षणाचा हक्क नसल्याच्या परिस्थितीत भावना बाळगल्यास केवळ मानसिक क्षति होईल.

मग..

असहमत, धार्मिकांच्या अनेक आचरट कृतींमुळे/श्रद्धांमुळे/कथांमुळे (उदा., चिलया बाळ) आमच्या भावना दुखावतात

मग तुमच्या प्रतिक्रिया भावनेतून (विचारातून नाही) येतात हे स्वीकाराल?

आम्हालाही त्यांच्याविषयी वाट्टेल ते शब्द वापरण्याचा हक्क आहे.

शब्द-शब्द तुलना न करता भावना व्यक्त करण्याचे साधन असे म्हणूयात? शब्द काय किंवा शारीरिक इजा न करता तोड-फोड काय, स्थावर नुकसान खुशाल भरून घ्यावे.

केवळ मानसिक क्षति होईल.

बहुतांश वेळी इतिहास 'केवळ' मानसिक क्षतितुनच घडल्याचे दिसते. मार लागल्याचा त्रास नसतो, मानसिक क्षति झाल्याचा त्रास असतो.

नाही

मग तुमच्या प्रतिक्रिया भावनेतून (विचारातून नाही) येतात हे स्वीकाराल?

छे! मुद्दा उलट असा आहे की भावना दुखविल्याचे विचारांमध्ये दिसू देण्याची किंवा भावनांनी विचारांवर नियंत्रण मिळविण्याची अपेक्षा आहे. चिलया बाळाच्या कथेने आमच्या भावना दुखविल्या असल्या तरीही त्या कथेवर आम्ही बंदीची मागणी केलेली नाही.

शब्द-शब्द तुलना न करता भावना व्यक्त करण्याचे साधन असे म्हणूयात? शब्द काय किंवा शारीरिक इजा न करता तोड-फोड काय, स्थावर नुकसान खुशाल भरून घ्यावे.

नाही, शब्दांनी फारतर केवळ ध्वनिप्रदूषण प्रकारची हानी शक्य असते, ती टाळली की पुरे. तोडफोड आमच्या/सार्वजनिक मालमत्तेची नको.

बहुतांश वेळी इतिहास 'केवळ' मानसिक क्षतितुनच घडल्याचे दिसते. मार लागल्याचा त्रास नसतो, मानसिक क्षति झाल्याचा त्रास असतो.

नॉट माय प्रॉब्लेम. प्रिसीडंट हे समर्थन ठरू शकतेच असे नाही.

प्रति:

छे! मुद्दा उलट असा आहे की भावना दुखविल्याचे विचारांमध्ये दिसू न देण्याची किंवा भावनांनी विचारांवर नियंत्रण न मिळविण्याची अपेक्षा आहे. चिलया बाळाच्या कथेने आमच्या भावना दुखविल्या असल्या तरीही त्या कथेवर आम्ही बंदीची मागणी केलेली नाही.

म्हणजे वैचारिक, शाब्दिक किंवा कृत्य हिंसा टाळावी असे आपले म्हणणे आहे काय?

नाही, शब्दांनी फारतर केवळ ध्वनिप्रदूषण प्रकारची हानी शक्य असते, ती टाळली की पुरे. तोडफोड आमच्या/सार्वजनिक मालमत्तेची नको

नुकसान सापेक्ष आहे, शब्दांमुळे ताण येऊन मानसिक आजार होऊ शकतात, मानसिक ताकद कमी असणे किंवा मालमत्ता कमी असणे साधारणपणे सारखेच.

प्रिसीडंट हे समर्थन ठरू शकतेच असे नाही.

विदा बघता एक कारण म्हणून ते पात्र आहेच.

नाही

म्हणजे वैचारिक, शाब्दिक किंवा कृत्य हिंसा टाळावी असे आपले म्हणणे आहे काय?

कृत्य हिंसा टाळावी असे मत आहे.
मुख्य आक्षेप कथेतील हिंसेला नाही, स्वार्थीपणाला आहे. शिवाय, मुद्दा असा आहे की कथा आम्हाला वाईट वाटली तरीही, "कथेला तुम्हीही नाकारावेच" अशी मागणी आम्ही करीत नाही.

नुकसान सापेक्ष आहे, शब्दांमुळे ताण येऊन मानसिक आजार होऊ शकतात, मानसिक ताकद कमी असणे किंवा मालमत्ता कमी असणे साधारणपणे सारखेच.

मालमत्ता खूप अधिक असलेल्यांच्या मालमत्तेचे नुकसानही चूकच आहे. कमी/अधिक हा मुद्दाच नाही.
मानसिक ताकद कमी असलेल्यांना आमच्या समान हक्कही नसतील तर त्यांच्या भावनांचा आम्ही विशेष आदर करू, त्यांना प्राणीसंग्रहालयात जपूनही ठेवू. आमच्याइतके हक्क हवे असलेल्यांनी आमच्याइतकी कणखरताही दाखवावी.

विदा बघता एक कारण म्हणून ते पात्र आहेच.

इतिहासातील बहुतेक वर्तन बुद्धिप्रामाण्यवादी नव्हते, "त्यांनी भावनांना महत्व दिले तसे आपणही द्यावे" हा युक्तिवाद अमान्य आहे.

नाही.

कृत्य हिंसा टाळावी असे मत आहे.

कोणत्याही प्रकारच्या हिंसेमागे विचार/भावना एकच असते, मग 'त्या' विचारांवर बंदी घातल्यास 'तशी' हिंसा बंद होण्याची शक्यता अधिक. (शेवटी अधिक स्पष्टीकरण)

मुख्य आक्षेप कथेतील हिंसेला नाही, स्वार्थीपणाला आहे. शिवाय, मुद्दा असा आहे की कथा आम्हाला वाईट वाटली तरीही, "कथेला तुम्हीही नाकारावेच" अशी मागणी आम्ही करीत नाही

हे ह्या धाग्यातील अवांतर आहे, तरी - मागणी असतेच, सतीप्रथा/बालविवाह अशा गोष्टी(चूक/बरोबर अलाहिदा) बंद व्हाव्यात ह्या मागण्या झाल्या, सत्तेचा उपयोग करून/दडपून बंद पण करण्यात आल्या. स्वार्थीपणा परत सापेक्ष आहे, दादोजींचा पुतळा हलविण्यात कोणते सामाजिक कार्य होते?

मालमत्ता खूप अधिक असलेल्यांच्या मालमत्तेचे नुकसानही चूकच आहे. कमी/अधिक हा मुद्दाच नाही.
मानसिक ताकद कमी असलेल्यांना आमच्या समान हक्कही नसतील तर त्यांच्या भावनांचा आम्ही विशेष आदर करू

दोन्ही प्रकारचे नुकसान चूकच आहे, मानसिक नुकसान होऊ शकते हे विज्ञाने सिद्ध केले आहे, मग मालमत्तेचे रक्षण करणारा कायदा असू शकतो तर मानसिक संरक्षण करणारा कायदा पण असायला हवा. नुकसान मोजमाप नीट करता येत नाही म्हणून संरक्षणच नको हे म्हणणे अयोग्य. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे तत्व सगळीकडेच लागू करावे, फक्त मानसिक पातळीवर नको.

इतिहासातील बहुतेक वर्तन बुद्धिप्रामाण्यवादी नव्हते, "त्यांनी भावनांना महत्व दिले तसे आपणही द्यावे" हा युक्तिवाद अमान्य आहे.

बुद्धीप्रामाण्यातून आलेल्या शब्दांना (जबाबदार विधानांना कर्वे/फुले वगैरे) समर्थन आहेच, पण भावनेतून आलेल्या बेजबाबदार आणि बुद्धीप्रामाण्याचा आसरा घेतलेल्या विधानांना समर्थन मिळाल्यास झुंडशाहीला देखील समर्थन असेल.

असहमत

कोणत्याही प्रकारच्या हिंसेमागे विचार/भावना एकच असते, मग 'त्या' विचारांवर बंदी घातल्यास 'तशी' हिंसा बंद होण्याची शक्यता अधिक. (शेवटी अधिक स्पष्टीकरण)

भावनेतून आलेल्या बेजबाबदार आणि बुद्धीप्रामाण्याचा आसरा घेतलेल्या विधानांना समर्थन मिळाल्यास झुंडशाहीला देखील समर्थन असेल.

विध्यर्थी/आज्ञार्थी विधानांवर नियंत्रण हवेच. मात्र स्वतःचे मत/भावना/कल्पना व्यक्त करणार्‍या विधानांना पूर्ण सूट हवी.
आम्ही आमच्या भावनांचा आमच्या विधानांवर परिणाम होऊ देत नाही असे सांगूनही तुम्ही "भावनेतून आलेल्या ...बुद्धीप्रामाण्याचा आसरा घेतलेल्या" असा शब्दप्रयोग का करीत आहात?

मागणी असतेच, सतीप्रथा/बालविवाह अशा गोष्टी(चूक/बरोबर अलाहिदा) बंद व्हाव्यात ह्या मागण्या झाल्या, सत्तेचा उपयोग करून/दडपून बंद पण करण्यात आल्या. स्वार्थीपणा परत सापेक्ष आहे, दादोजींचा पुतळा हलविण्यात कोणते सामाजिक कार्य होते?

असंबद्ध विधाने.

दोन्ही प्रकारचे नुकसान चूकच आहे, मानसिक नुकसान होऊ शकते हे विज्ञाने सिद्ध केले आहे, मग मालमत्तेचे रक्षण करणारा कायदा असू शकतो तर मानसिक संरक्षण करणारा कायदा पण असायला हवा. नुकसान मोजमाप नीट करता येत नाही म्हणून संरक्षणच नको हे म्हणणे अयोग्य.

ज्यांना संरक्षण लागते त्यांना पिंजर्‍यात ठेवावे म्हणजे इतरांचा त्यांना त्रास नको आणि त्यांना त्रास होण्याची भीती इतरांना नको! पूर्वी कधीतरी दिलेले उदाहरण - अपंगांसाठीचा रेल्वेतील राखीव डबा - येथे समर्पक ठरेल.

सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हे तत्व सगळीकडेच लागू करावे, फक्त मानसिक पातळीवर नको.

शारिरीक हानीच्या बाबतीत सर्वजण बहुतांशी सारखेच आहेत. त्वचांच्या जाड्या आणि कवट्यांच्या काठिण्यतांमध्ये पूर्ण मानव प्रजातीत फारशी उच्चनीचता नसते, त्यामुळे कोणीच अधिक फिट/अनफिट नाही आणि शारिरीक इजेपासून संरक्षण देणार्‍या कायद्यांची सर्वांनाच आवश्यकता आहे.

आटपा आता

अरे झालं नाही का अजून तुमचं?

नितिन थत्ते

नाही.

तुम्ही ज्या विधानांची भलावण करीत आहात त्यास माझा पाठींबा आहेच, पण केवळ ठराविक राजकीय फायद्यासाठी विधाने करणे/कृती करणे आयोग्य आहे. उदा. - पुतळ्याची विटम्बना/जेम्स लेन/दादोजी पुतळा/हुसेन चित्रे ह्या प्रकरणातून काहीही विधायक कार्य होणार नाही ह्याची खात्री होती, असे असताना केवळ सूट आहे ह्या सबबीखाली निरर्थक विधाने/कृती करणे सामाजिक रित्या गैर ठरते, त्यामुळे त्यावर कारवाई करावी हे मत आहे.

तरी माझा प्रतिसाद.

विध्यर्थी/आज्ञार्थी विधानांवर नियंत्रण हवेच. मात्र स्वतःचे मत/भावना/कल्पना व्यक्त करणार्‍या विधानांना पूर्ण सूट हवी.

होय, जबादारीने आलेल्या विधानांना सूट हवीच.

आम्ही आमच्या भावनांचा आमच्या विधानांवर परिणाम होऊ देत नाही असे सांगूनही तुम्ही "भावनेतून आलेल्या ...बुद्धीप्रामाण्याचा आसरा घेतलेल्या" असा शब्दप्रयोग का करीत आहात?

"आम्ही" मध्ये जेम्स लेन/दादोजी पुतळा हलविणारे पण आहेत काय? जरी भावनेतून आलेले नसले आणि केवळ एका सामाजिक गटाच्या फायद्यासाठी केले असेल तर ते अयोग्य आहे, त्यातही स्वार्थ -भावना आलीच.

असंबद्ध विधाने.

(छे! पूर्ण संदर्भ द्यावा लागतो.).."कथा नाकारावी हि मागणी करत नाही"....ह्या विधानावर - "अशा कथा/प्रथा नाकारण्याची मागणी होते, नव्हे दडपशाही होते" हे विधान होते. आता त्यात तुमचे "आम्ही" मागणी करणारे नसतील तर गोष्ट वेगळी. :)

ज्यांना संरक्षण लागते त्यांना पिंजर्‍यात ठेवावे म्हणजे इतरांचा त्यांना त्रास नको आणि त्यांना त्रास होण्याची भीती इतरांना नको! पूर्वी कधीतरी दिलेले उदाहरण - अपंगांसाठीचा रेल्वेतील राखीव डबा - येथे समर्पक ठरेल.

शारिरीक हानीच्या बाबतीत सर्वजण बहुतांशी सारखेच आहेत. त्वचांच्या जाड्या आणि कवट्यांच्या काठिण्यतांमध्ये पूर्ण मानव प्रजातीत फारशी उच्चनीचता नसते, त्यामुळे कोणीच अधिक फिट/अनफिट नाही आणि शारिरीक इजेपासून संरक्षण देणार्‍या कायद्यांची सर्वांनाच आवश्यकता आहे.

स्त्रियांना संरक्षण लागते म्हणून त्यांना पिंजऱ्यात ठेवावे असे आपले मत आहे काय? त्यांचासाठी डबा वेगळ असतोच की. धुम्रपानामुळे (पॅसिव) शारीरक हानी झाली तरी मी त्यामुळे निश्चित मरण येईल ह्याची खात्री देता येत नाही तरीदेखील त्यापासून संरक्षण देणारे कायदे बनविले जातात, पॅसिव धुम्रपानाला माझी हरकत नाही, म्हणून तसा कायदाच नको किंवा ज्यांना त्याचा त्रास होतो त्यांनी पिंजऱ्यात राहावे हि मागणी देखील नाही. कदाचित त्यांची फुफुस्से आणि माझ्या फुफुस्साच्या आरोग्यामध्ये उच्चनीचता असावी.

खुलासा

केवळ ठराविक राजकीय फायद्यासाठी विधाने करणे/कृती करणे आयोग्य आहे. उदा. - पुतळ्याची विटम्बना/जेम्स लेन/दादोजी पुतळा/हुसेन चित्रे ह्या प्रकरणातून काहीही विधायक कार्य होणार नाही ह्याची खात्री होती, असे असताना केवळ सूट आहे ह्या सबबीखाली निरर्थक विधाने/कृती करणे सामाजिक रित्या गैर ठरते, त्यामुळे त्यावर कारवाई करावी हे मत आहे.

"आम्ही" मध्ये जेम्स लेन/दादोजी पुतळा हलविणारे पण आहेत काय? जरी भावनेतून आलेले नसले आणि केवळ एका सामाजिक गटाच्या फायद्यासाठी केले असेल तर ते अयोग्य आहे, त्यातही स्वार्थ -भावना आलीच.

पुतळ्याची विटंबना आणि दादोजी पुतळा कापणे ही सार्वजनिक मालमत्तेची नासाडी आहे आणि तिच्यावरील कारवाई अभिव्यक्तीस्वातंत्र्याला बाधक नाही. मात्र, स्वतःच्या खर्चाने कोणी अभिव्यक्ती केली, उदा. पैतृत्वाविषयीचा विनोद/हुसेन चित्रे, इ. तर तिला सूट आवश्यक आहे. मुळात, लैंगिक चित्रीकरणाची पारंपारिक उदाहरणे असताना हुसेनवर अश्लीलतेचा आरोप करण्याचाही कोणाला अधिकार नाही, परंतु जरी तो आरोप मान्य केला तरी अभिव्यक्तीस्वातंत्र्याची खरी कसोटी तीच आहे. लेनने तर 'पैतृत्वाविषयी विनोद घडतो' इतके रिपोर्टिंगच केवळ केले होते, त्याला अडथळा करण्याचा मुद्दाच नाही, परंतु मुळात विनोद करण्यावरही निर्बंध येऊ नयेत ("तुम्ही आमचे कोणी नाही मी तुमचा कोणी नाही" (तुम्ही=शिवाजीप्रेमी/सरस्वतीप्रेमी/भारतमाताप्रेमी) असे विधान करण्याचा हक्क खूपच मूलभूत आहे).

"कथा नाकारावी हि मागणी करत नाही"....ह्या विधानावर - "अशा कथा/प्रथा नाकारण्याची मागणी होते, नव्हे दडपशाही होते" हे विधान होते. आता त्यात तुमचे "आम्ही" मागणी करणारे नसतील तर गोष्ट वेगळी. :)

कथा नाकारण्याची विनंती करू, फारतर, कथेला थोर मानणार्‍यांशी मैत्री करणार नाही परंतु केवळ कथा आवडते या कारणास्तव दडपशाही केली तर ती अयोग्यच ठरेल.

स्त्रियांना संरक्षण लागते म्हणून त्यांना पिंजऱ्यात ठेवावे असे आपले मत आहे काय?

त्यांना जी विशेष वागणूक मिळते (रेल्वेत डबे, स्वतंत्र प्रसाधनगृहे, कंपनीतून घरी जाण्यासाठी कंपनीच्याच वाहनाने जाण्याचा आग्रह, इ.) ते सारे पिंजर्‍यात ठेवण्यासारखेच आहे.

धुम्रपानामुळे (पॅसिव) शारीरक हानी झाली तरी मी त्यामुळे निश्चित मरण येईल ह्याची खात्री देता येत नाही तरीदेखील त्यापासून संरक्षण देणारे कायदे बनविले जातात, पॅसिव धुम्रपानाला माझी हरकत नाही, म्हणून तसा कायदाच नको किंवा ज्यांना त्याचा त्रास होतो त्यांनी पिंजऱ्यात राहावे हि मागणी देखील नाही. कदाचित त्यांची फुफुस्से आणि माझ्या फुफुस्साच्या आरोग्यामध्ये उच्चनीचता असावी.

हे उदाहरण माझाच मुद्दा सिद्ध करते. धूम्रपानाने सर्वांनाच साधारण समान त्रास होतो (काही जनुकीय त्रास काहींना अधिक होतात ते वगळता आरोग्यांमध्ये उच्चनीचता नसते) म्हणून सार्वजनिक स्थळी धूम्रपानावर बंदी असणे सर्वांच्याच फायद्याचे आहे. उलट, कोणाच्याही मोकाट अभिव्यक्तीचा आम्हाला काहीच त्रास होत नाही.

नाही.

पुतळ्याची विटंबना आणि दादोजी पुतळा कापणे ही सार्वजनिक मालमत्तेची नासाडी आहे आणि तिच्यावरील कारवाई अभिव्यक्तीस्वातंत्र्याला बाधक नाही.

असहमत, पुतळा हलविण्यात नासाडी झाली नाही, तो अगदी नीट हलविला असता तरी टीका झालीच असती, तो हलविण्यामागची भावना/विचार गैर होता. कर्वेंचा पुतळा देखील हलविला पण त्याचे कारण वाहतूक सुरळीत व्हावी असे होते आणि त्या पुतळ्याला चांगल्या पद्धतीने बसविले गेले, त्यामध्ये आक्षेप नाही.

आरोप मान्य केला तरी अभिव्यक्तीस्वातंत्र्याची खरी कसोटी तीच आहे.

मान्य, पण 'कोणीपण' उठून स्वातंत्र्याच्या नावाखाली सांघिक भावनेशी खेळू नये हा मुद्दा आहे. स्वातंत्र्याचा उपयोग कोण कसा करतो हे काटेकोरपणे बघणे गरजेचे आहे.
ह्या दुव्यावर दिलेल्या निकालातील पान ९ आणि १० वरील पॉईंट ९ आणि १० बघावा. ९ व्या पॉईंटबाबत तुम्हाला आक्षेप असेल, पण १० व्या पॉईंट बद्दल आक्षेप घेण्यासारखे नसावे असे वाटते.

लेनने तर 'पैतृत्वाविषयी विनोद घडतो' इतके रिपोर्टिंगच केवळ केले होते, त्याला अडथळा करण्याचा मुद्दाच नाही

शिवाजी बद्दल 'कसला' विनोद केला जातो ह्याचे स्मरण महाराष्ट्रामध्ये करून देणे/सांगणे हे सामाजिक शांततेला धरून गैरच आहे, आज विनोद सांगितला, उद्या त्याचा कीस पडेल, परवा त्याचे रजनीकांत सारखे विनोद तयार होतील. ह्या सगळ्यामध्ये स्वातंत्र्य हवेच काय? आणि माहितीम्हणून संदर्भ सहित अशा गोष्टी सांगणे एकवेळ पचले असते पण 'विनोद'च्या आड असे लेखन करणे नक्कीच खपणार नाही हे सत्य माहित असताना केलेल्या कृतीवर तोडफोड केल्यास ती गैर नाही.

कथा नाकारण्याची विनंती करू, फारतर, कथेला थोर मानणार्‍यांशी मैत्री करणार नाही परंतु केवळ कथा आवडते या कारणास्तव दडपशाही केली तर ती अयोग्यच ठरेल.

वैचारिक दृष्ट्या विरोध करून कथा/प्रथा बंद केल्यास/विरोध केल्यास ते मान्य असेल.

त्यांना जी विशेष वागणूक मिळते (रेल्वेत डबे, स्वतंत्र प्रसाधनगृहे, कंपनीतून घरी जाण्यासाठी कंपनीच्याच वाहनाने जाण्याचा आग्रह, इ.) ते सारे पिंजर्‍यात ठेवण्यासारखेच आहे.

सहमत, पण त्यामध्ये स्त्रिया कमजोर आहेत ह्यापेक्षा पुरुषवर्गाची मानसिकता हीन आहे हा मुद्दा आहे. तरीपण वेगळा डबा असू नये असे मत आहे, कोणी छेडल्यास त्याला गोळी घालण्याचा हक्क स्त्रियांना हवा अशी मागणी मी करेन.

हे उदाहरण माझाच मुद्दा सिद्ध करते. धूम्रपानाने सर्वांनाच साधारण समान त्रास होतो (काही जनुकीय त्रास काहींना अधिक होतात ते वगळता आरोग्यांमध्ये उच्चनीचता नसते) म्हणून सार्वजनिक स्थळी धूम्रपानावर बंदी असणे सर्वांच्याच फायद्याचे आहे.

म्हणूनच मी ते उदाहरण घेतले, त्यामध्ये तुमचा आणि माझा दोघांचा मुद्दा येतो - मला त्रास होत नाही पण माझ्या मित्राला त्रास होतो हा माझा अनुभव आहे, त्यामुळे केवळ तो कमजोर आहे ह्या कारणास्तव मी त्याला दूर/पिंजऱ्यात ठेवण्यापेक्षा दुर्बलांच्या हिताचे असे कायदे बनविणे योग्य ठरते.

उलट, कोणाच्याही मोकाट अभिव्यक्तीचा आम्हाला काहीच त्रास होत नाही.

होतो, तुमच्या बरोबर दुर्बल स्त्रिया असतील तर तुम्हाला त्रास होईलच, मग त्या मोकाट अभिव्यक्तीचा बंदोबस्त व्हावा हि मागणी कराल, किंवा स्वतःच बंदोबस्त कराल. का स्त्रिया दुर्बल आहेत हे सत्य मानून, अशी ठिकाणे टाळाल? त्रास सहन कराल?

असहमत

पुतळा हलविण्यात नासाडी झाली नाही, तो अगदी नीट हलविला असता तरी टीका झालीच असती, तो हलविण्यामागची भावना/विचार गैर होता.

त्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संबंध नाही.

'कोणीपण' उठून स्वातंत्र्याच्या नावाखाली सांघिक भावनेशी खेळू नये हा मुद्दा आहे. स्वातंत्र्याचा उपयोग कोण कसा करतो हे काटेकोरपणे बघणे गरजेचे आहे.
ह्या दुव्यावर दिलेल्या निकालातील पान ९ आणि १० वरील पॉईंट ९ आणि १० बघावा. ९ व्या पॉईंटबाबत तुम्हाला आक्षेप असेल, पण १० व्या पॉईंट बद्दल आक्षेप घेण्यासारखे नसावे असे वाटते.

पण का? सांघिक भावना हा व्यक्तीचा खूप मोठा शत्रू आहे.
मला ९ आणि १० हे दोन्ही मुद्दे मान्य नाहीत.

शिवाजी बद्दल 'कसला' विनोद केला जातो ह्याचे स्मरण महाराष्ट्रामध्ये करून देणे/सांगणे हे सामाजिक शांततेला धरून गैरच आहे,

अमान्य.

आज विनोद सांगितला, उद्या त्याचा कीस पडेल, परवा त्याचे रजनीकांत सारखे विनोद तयार होतील. ह्या सगळ्यामध्ये स्वातंत्र्य हवेच काय?

होय.

माहितीम्हणून संदर्भ सहित अशा गोष्टी सांगणे एकवेळ पचले असते पण 'विनोद'च्या आड असे लेखन करणे नक्कीच खपणार नाही हे सत्य माहित असताना केलेल्या कृतीवर तोडफोड केल्यास ती गैर नाही.

तोडफोड करण्यावर बंदी हवी, त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणे आवश्यक आहे.

तरीपण वेगळा डबा असू नये असे मत आहे, कोणी छेडल्यास त्याला गोळी घालण्याचा हक्क स्त्रियांना हवा अशी मागणी मी करेन.

मुंबईच्या लोकलमधील गर्दीत प्रत्येक क्षणाला एक अभावित धक्का लागू शकतो, किती धक्क्यांचे वर्गीकरण निरागस/खोडसाळ असे करून ती गोळ्या मारेल? शिवाय, छेडणे ही शारिरीक कृती आहे, अभिव्यक्तीस्वातंत्र्य ही शाब्दिक कृती आहे.
मुद्दा तो नाही, एखादी स्त्री पुरुषांच्या प्रसाधनगृहात स्वेच्छेने शिरली तर तिचा दृष्य (=अशारिरीक) विनयरक्षणाचा हक्क कमकुवत होतो की नाही?

केवळ तो कमजोर आहे ह्या कारणास्तव मी त्याला दूर/पिंजऱ्यात ठेवण्यापेक्षा दुर्बलांच्या हिताचे असे कायदे बनविणे योग्य ठरते.

हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे. कोणीही दुर्बल होऊ शकतो (उदा., कितीही शक्तिमान व्यक्तीस शारिरीक इजा होऊ शकते म्हणून शारिरीक हल्ल्यापासून संरक्षण) अशा परिस्थितीत दुर्बलांच्या हिताचे कायदे मान्य आहेत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत तसे नाही.

स्त्रिया दुर्बल आहेत हे सत्य मानून, अशी ठिकाणे टाळाल? त्रास सहन कराल?

मोकाट अभिव्यक्तीतही विध्यर्थी/आज्ञार्थी विधाने अनुमत नाहीत हे मी आधीच सांगितले आहे.

अमान्य

त्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संबंध नाही.

म्हणजे त्या प्रकारात तोडफोड केल्यास तुम्हाला आक्षेप नसावा.

पण का? सांघिक भावना हा व्यक्तीचा खूप मोठा शत्रू आहे.

काही परिस्थितींमध्ये असेलही तसेच बेजाबदार सार्वजनिक वक्तव्ये/कृती देखील शत्रूच आहे.

मला ९ आणि १० हे दोन्ही मुद्दे मान्य नाहीत.

निदान सद्य परिस्थितील कायद्याला ते मान्य आहे.

अमान्य.
होय.

असहमतीला सहमती.

तोडफोड करण्यावर बंदी हवी, त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणे आवश्यक आहे.

अमान्य.

मुंबईच्या लोकलमधील गर्दीत प्रत्येक क्षणाला एक अभावित धक्का लागू शकतो, किती धक्क्यांचे वर्गीकरण निरागस/खोडसाळ असे करून ती गोळ्या मारेल? शिवाय, छेडणे ही शारिरीक कृती आहे, अभिव्यक्तीस्वातंत्र्य ही शाब्दिक कृती आहे.

त्या गर्दीत कोणी शब्दांनी छेडल्यास काय करावे असे आपले मत आहे?

एखादी स्त्री पुरुषांच्या प्रसाधनगृहात स्वेच्छेने शिरली तर तिचा दृष्य (=अशारिरीक) विनयरक्षणाचा हक्क कमकुवत होतो की नाही?

स्वेच्छेने शिरल्यास पुरुषांचा विनयभंग करण्याचा हेतू असावा, तिचा होण्याची शक्यता कमीच. (तिच्याकडे विनय आहे हे गृहीतक सर्वच केस मध्ये लागू पडेल असे वाटत नाही)

हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे. कोणीही दुर्बल होऊ शकतो (उदा., कितीही शक्तिमान व्यक्तीस शारिरीक इजा होऊ शकते म्हणून शारिरीक हल्ल्यापासून संरक्षण) अशा परिस्थितीत दुर्बलांच्या हिताचे कायदे मान्य आहेत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाबतीत तसे नाही.

'इजा हि फक्त शारीरिक असते" हे गृहीतकच मान्य नाही. 'मानसिक इजा' मोजता येत नाही ह्या कारणास्तव त्यानिगडीत कायदे होऊ नये असे मत तयार होते. स्त्री ची छेड/शारीरिक व्यंग/जाडेपणा ह्यावर मारलेले टोमणे हे कोणतीही शारीरिक इजा करत नाहीत, पण त्यापासून संरक्षण असावे हा सर्वमान्य नियम आहे.

मोकाट अभिव्यक्तीतही विध्यर्थी/आज्ञार्थी विधाने अनुमत नाहीत हे मी आधीच सांगितले आहे.

ठीक.

खुलासा

त्या प्रकारात तोडफोड केल्यास तुम्हाला आक्षेप नसावा.

आक्षेप असेल परंतु तो अभिव्यक्तीस्वातंत्र्याशी संबंधित नाही.

बेजाबदार सार्वजनिक वक्तव्ये/कृती देखील शत्रूच आहे.

का?

निदान सद्य परिस्थितील कायद्याला ते मान्य आहे.

मान्य.

असहमतीला सहमती.

तोडफोड करण्यावर बंदी हवी, त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करणे आवश्यक आहे.

अमान्य.

फ्लाईंग स्पॅघेटी मॉन्स्टरला देव मानणार्‍यांनी नूडलच्या जाहिरातींच्या निषेधार्थ खून पाडले तर चालेल का?

त्या गर्दीत कोणी शब्दांनी छेडल्यास काय करावे असे आपले मत आहे?

मुद्दा असा आहे की तिला वेगळ्या डब्यात जाण्याची सोय असूनही तिने धोका पत्करला आहे, दोन पुरुष एकमेकांशी मोकळेपणे बोलताना त्यांनी वापरलेले शब्द तिने ऐकले तर तिला होणार्‍या त्रासाला ती स्वतःच जवाबदार असेल.

'मानसिक इजा' मोजता येत नाही ह्या कारणास्तव त्यानिगडीत कायदे होऊ नये असे मत तयार होते.

  1. मानसिक इजा होत नाही अशा काही व्यक्ती अस्तित्वात आहेत. चिंपांझींचे मानव म्हणून वर्गीकरण करून मग त्यांच्या हक्कांसाठी खर्‍या मानवांच्या हक्कांना मुरड घातली जात नाही.
  2. फ्लाईंग स्पॅघेटी मॉन्स्टरला देव मानणार्‍यांच्या मानसिक इजेला कसे टाळाल?

प्रति:

आक्षेप असेल परंतु तो अभिव्यक्तीस्वातंत्र्याशी संबंधित नाही.

मुद्दा झुंडशाहीच्या विरोधाचा होता, बेजाबदार विधाने आणि कृती, स्वातंत्र्याच्या नावाखाली करणार असाल तर त्याची परतफेड तशीच केली जाईल.

का?

सामाजिक शांततेचा भंग होतो, पर्यायाने व्यक्तिगत शांततेचा भंग होतो म्हणून.

फ्लाईंग स्पॅघेटी मॉन्स्टरला देव मानणार्‍यांनी नूडलच्या जाहिरातींच्या निषेधार्थ खून पाडले तर चालेल का?

"फ्लाईंग स्पॅघेटी मॉन्स्टर" हा फसवा युक्तिवाद आहे, स्पॅघेटी...हि फ्लाईंग स्पॅघेटी मॉन्स्टर च्या आधी आली असल्यास जाहिरात आधी असेल, त्यानंतर देवत्व दिले गेले असल्यास जाहिराती मान्यच असतील.

मुद्दा असा आहे की तिला वेगळ्या डब्यात जाण्याची सोय असूनही तिने धोका पत्करला आहे.

हि एक परिस्थिती आहे त्यामध्ये विनय भंग होण्याची काही अंशी स्वीकृती असतेच, तरीदेखील, गर्दी बघता नाईलाजास्तव दुसऱ्या डब्यातून प्रवास करण्याची वेळ येते/येऊ शकते, त्यावेळेस बेजाबादारपणे, ज्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो कि नाही हि जाणीव न ठेवता केलेले संभाषण अयोग्यच आहे, किंवा अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक छेड काढल्यास काय करावे?

हक्कांसाठी खर्‍या मानवांच्या हक्कांना मुरड घातली जात नाही?

"खरे मानव" अल्पसंख्यांक असतील तर त्यांच्यासाठी विशेष कायदे केले जावेत, त्यांना पिंजऱ्यात ठेवले जाऊ नये किंवा त्यांनी जगामध्ये मानसिक इजा होणारे मानव आहेत हे पाहून दुख: करून त्यांचात सामील व्हावे. बाकी सर्व मानवांसाठी १५३ अ बहुदा भावूक कायदे पंडितांनी बनविला असावा.

फरक

बेजाबदार विधाने आणि कृती, स्वातंत्र्याच्या नावाखाली करणार असाल तर त्याची परतफेड तशीच केली जाईल.

कृतीच्या बाबतीत 'हिंसा न करण्याची जवाबदारी' असे काहीतरी असते हे मान्य आहे. विधानांच्या बाबतीत (विध्यर्थी/आज्ञार्थी/असत्य सूचक वगळता) आम्हाला काही जवाबदेहीच मान्य नाही त्यामुळे 'बेजवाबदार विधान' असा काही प्रकारच नसतो.

सामाजिक शांततेचा भंग होतो, पर्यायाने व्यक्तिगत शांततेचा भंग होतो म्हणून.

भावना दुखावल्याचा ज्यांचा दावा आहे त्यांनी हिंसा केल्यामुळे शांततेचा भंग होतो, आमच्यामुळे नाही. शारिरीक कृतींनी शांततेचा भंग करणार्‍यांना शिक्षा व्हावी.

स्पॅघेटी...हि फ्लाईंग स्पॅघेटी मॉन्स्टर च्या आधी आली असल्यास जाहिरात आधी असेल, त्यानंतर देवत्व दिले गेले असल्यास जाहिराती मान्यच असतील.

आधी/नंतर हा फरकच अमान्य आहे. मुळात, किमान, नव्या उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी मान्य आहे काय?
पूर्वी गोमांसभक्षण शुभ होते म्हणून आता सरकारने गोहत्येचा पुरस्कार केल्यास चालेल काय? गणपतीची पूजा खंडणी (एक्स्टॉर्शन) म्हणून केली जाई, तो शत्रू होता. त्यामुळे, आता त्याच्यावरील प्रेमाची अभिव्यक्ती करणार्‍या 'नव्या' विधानांमुळे जुन्या, सत्य धर्माच्या भावना दुखावल्या जातात असे कारण सांगून त्या नव्या कलाकृतींवर बंदी घालणार काय? लज्जागौरी चालेल काय? बौद्ध रामायणात राम-सीता इन्सेस्ट करतात त्याविषयीच्या कलाकृती चालतील काय? पूर्वी सतीप्रथेला प्रतिष्ठा होती, आता त्या प्रथेची निंदा करणे योग्य म्हणू नये काय?

बेजाबादारपणे, ज्यामध्ये आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो कि नाही हि जाणीव न ठेवता केलेले संभाषण अयोग्यच आहे, किंवा अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक छेड काढल्यास काय करावे?

छेड काढण्यात विध्यर्थी इ. विधाने असतात, ती आक्रमणाचे सूतोवाच करतात, शारिरीक असुरक्षितता निर्माण करतात.

बाकी सर्व मानवांसाठी १५३ अ बहुदा भावूक कायदे पंडितांनी बनविला असावा.

त्यामुळे ते कलम अविवेकी ठरते.

नाही.

'बेजवाबदार विधान' असा काही प्रकारच नसतो.

ज्या विधानाने मानसिक त्रास होतो ते विधान बेजबाबदार ठरत नाही का? मानसिक त्रास कसा मोजणार हि पळवाट काय कामाची?

भावना दुखावल्याचा ज्यांचा दावा आहे त्यांनी हिंसा केल्यामुळे शांततेचा भंग होतो, आमच्यामुळे नाही. शारिरीक कृतींनी शांततेचा भंग करणार्‍यांना शिक्षा व्हावी

भावना ज्यांच्यामुळे दुखावली त्यांचे पंख आधी फडफडले(फुलपाखराच्या पंख परिणामाप्रमाणे) , त्यामुळे त्यांचा ह्या अशांततेत वाटा आहेच.

आधी/नंतर हा फरकच अमान्य आहे. मुळात, किमान, नव्या उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी मान्य आहे काय?

नाही, त्या शेवई राक्षसाचे देऊळ बांधा, साधारणपणे श्रद्धेच्या नावाखाली जे चालते ते सर्व ठराविक काळासाठी करून दाखवा मग बंदीचा विचार करायचा कि नाही हे ठरवता येईल. हे करत असताना श्रद्धा हा मुल हेतू असला पाहिजे, केवळ अभ्युपगम सिद्ध करण्यासाठी हे सर्व केल्यास ते अमान्य असेल.

पूर्वी गोमांसभक्षण शुभ होते म्हणून आता सरकारने गोहत्येचा पुरस्कार केल्यास चालेल काय? गणपतीची पूजा खंडणी (एक्स्टॉर्शन) म्हणून केली जाई, तो शत्रू होता. त्यामुळे, आता त्याच्यावरील प्रेमाची अभिव्यक्ती करणार्‍या 'नव्या' विधानांमुळे जुन्या, सत्य धर्माच्या भावना दुखावल्या जातात असे कारण सांगून त्या नव्या कलाकृतींवर बंदी घालणार काय? लज्जागौरी चालेल काय? बौद्ध रामायणात राम-सीता इन्सेस्ट करतात त्याविषयीच्या कलाकृती चालतील काय? पूर्वी सतीप्रथेला प्रतिष्ठा होती, आता त्या प्रथेची निंदा करणे योग्य म्हणू नये काय?

ज्या गोष्टी चिंतनीय आहेत आणि सकारात्मक बदल घडवितात त्या सर्व चालतील, पण तो बदल सकारात्मक आहे हे सिद्ध करावे लागेल. केवळ विरोधासाठी सिद्धता असल्यास ती निंदनीय आहे.

छेड काढण्यात विध्यर्थी इ. विधाने असतात, ती आक्रमणाचे सूतोवाच करतात, शारिरीक असुरक्षितता निर्माण करतात.

शारीरिक असुरक्षिततेमुळेच फक्त त्रास होत नाही तर शब्द देखील त्रासदायक असतात हे स्त्रियांचे अनुभव आहेत, त्यामुळे ते नुसते शब्द देखील आक्षेपार्ह आहेत.

असहमत

ज्या विधानाने मानसिक त्रास होतो ते विधान बेजबाबदार ठरत नाही का? मानसिक त्रास कसा मोजणार हि पळवाट काय कामाची?

लोक प्रार्थनास्थळांत जातात ते पाहून आमच्यापैकी अनेकांना पराकोटीचा मानसिक त्रास होतो. सर्व प्रार्थनास्थळे पाडणार का?

भावना ज्यांच्यामुळे दुखावली त्यांचे पंख आधी फडफडले(फुलपाखराच्या पंख परिणामाप्रमाणे) , त्यामुळे त्यांचा ह्या अशांततेत वाटा आहेच.

हमारा दिल दिल नहीं? आम्हाला मोरॉन्सच्या अस्तित्वानेच यातना होत असतील तर?

साधारणपणे श्रद्धेच्या नावाखाली जे चालते ते सर्व ठराविक काळासाठी करून दाखवा मग बंदीचा विचार करायचा कि नाही हे ठरवता येईल. हे करत असताना श्रद्धा हा मुल हेतू असला पाहिजे, केवळ अभ्युपगम सिद्ध करण्यासाठी हे सर्व केल्यास ते अमान्य असेल.

'दाखवा', 'ठरवता येईल',??? -> तुम्ही कोण टिक्कोजीराव?
'श्रद्धा आहे' म्हटले की आहे!

ज्या गोष्टी चिंतनीय आहेत आणि सकारात्मक बदल घडवितात त्या सर्व चालतील, पण तो बदल सकारात्मक आहे हे सिद्ध करावे लागेल. केवळ विरोधासाठी सिद्धता असल्यास ती निंदनीय आहे.

सर्व प्रार्थनास्थळे पाडणे सकारात्मक आहे असा आमचा दावा असेल तर?

शारीरिक असुरक्षिततेमुळेच फक्त त्रास होत नाही तर शब्द देखील त्रासदायक असतात हे स्त्रियांचे अनुभव आहेत, त्यामुळे ते नुसते शब्द देखील आक्षेपार्ह आहेत.

होय, मीही तेच म्हटले आहे. छेड काढण्यात आक्रमण असते, ते उदाहरण गैरलागूच आहे.
पैतृत्वाविषयीचे विनोद (उदा., लेनवरील आरोप), अश्लील चित्रे (उदा., हुसेनवरील आरोप), शारिरीक गुणधर्माचा हीन प्रकारे उल्लेख (उदा., लंगड्या/आंधळ्या/डूचक्या/मंद/तिरळ्या - संदर्भ, किंवा नायजर या साध्या शब्दापासून 'निगर' हा शब्द, इ.) यांतून आक्रमणाचा हेतू नसतो. (कदाचित, घृणा/तुच्छता व्यक्त करण्याचा हेतू असू शकतो परंतु घृणा/तुच्छता व्यक्त करणे हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा एक महत्वाचा उद्देश आहे.)
--
नव्या धाग्यात पोट भरले नाही काय?

:)

नव्या धाग्यात पोट भरले नाही काय?

तुमचे पोट दुखते आहे का बघत होतो.

तुम्ही कोण टिक्कोजीराव?

:) का फक्त तुम्हीच कंत्राट घेतले आहे काय?

बाकी आता माझे पोट भरले आहे किंवा तुमचे दुखते आहे असे एकमेकाच्या सोयीसाठी म्हणूयात.

?

तुमचे पोट दुखते आहे का बघत होतो.

huh?
मला पोटदुखी आहे की नाही ते जाणण्यासाठी तुम्ही माझ्या विधानांना असहमती दाखविणारा प्रतिसाद दिलात? तुम्ही प्रतिसाद दिल्यामुळे तुम्हाला माझ्याविषयीचे ज्ञान झाले?
मुळात, मला पोटदुखी असावी असा तुमचा संशय का बनला? तुमच्याशी सुरू असलेल्या चर्चेत तुमच्या मतांना चूक ठरविण्यात इतर उपक्रमींची काय मदत मिळते ते शोधण्याच्या उद्देशाने मी कोणताही धागा सुरू केलेला नाही आहे.

:) का फक्त तुम्हीच कंत्राट घेतले आहे काय?

मी तसा काहीच दावा केलेला नाही आहे.
आम्ही शेवई राक्षसाची भक्ती करीत असल्याचे तुमच्यापाशी सिद्ध करून तुमचे प्रमाणपत्र मिळविल्याशिवाय आमची श्रद्धा सिद्ध होत नाही असा तुमचा युक्तिवाद आहे. 'तुमची श्रद्धा आहे की नाही ते मी ठरवेन' असा काही दावा मी केलाच नाही आहे.

बाकी आता माझे पोट भरले आहे किंवा तुमचे दुखते आहे असे एकमेकाच्या सोयीसाठी म्हणूयात.

सोयीसाठी किंवा इतर काहीही कारणाने तसे काहीही म्हणण्याची मला आवश्यकता नाही, ती दोन्ही विधाने मला अमान्य आहेत. तुमच्या सर्व युक्तिवादांचा प्रतिवाद करण्यास मी तयार आहे. मात्र, तुम्हाला पळून जायचे असेल तर मला आनंदच वाटेल.

ठिक

मला पोटदुखी आहे की नाही ते जाणण्यासाठी तुम्ही माझ्या विधानांना असहमती दाखविणारा प्रतिसाद दिलात? तुम्ही प्रतिसाद दिल्यामुळे तुम्हाला माझ्याविषयीचे ज्ञान झाले?
मुळात, मला पोटदुखी असावी असा तुमचा संशय का बनला? तुमच्याशी सुरू असलेल्या चर्चेत तुमच्या मतांना चूक ठरविण्यात इतर उपक्रमींची काय मदत मिळते ते शोधण्याच्या उद्देशाने मी कोणताही धागा सुरू केलेला नाही आहे.

मी तुमच्या मतांना गैर ठरविण्यासाठी इतर उपक्रमींची काय मदत मिळते ह्या उद्देशान तो धागा सुरु केला असे तुमचे मत झालेले दिसते, असो, ते तुमचे मत आहे. मी तुम्हाला धागा काढण्यास आक्षेप आहे का विचारले असता तुम्ही नाही म्हणालात त्यामुळे तुम्ही धाग्यावर चर्चा चालू ठेवाल असे वाटले होते, तुम्हाला वाटले नाही किंवा अजून "काही कारणांमुळे" तुम्ही चर्चा केली नाही, म्हणून मी मुळ चर्चा पुन्हा चालू केली. मी नवीन धागा काढणे पोट भरण्याचा प्रकार असेल तर "इतर कारणे" तुमची पोट दुखी असू शकते.

मी तसा काहीच दावा केलेला नाही आहे.
आम्ही शेवई राक्षसाची भक्ती करीत असल्याचे तुमच्यापाशी सिद्ध करून तुमचे प्रमाणपत्र मिळविल्याशिवाय आमची श्रद्धा सिद्ध होत नाही असा तुमचा युक्तिवाद आहे. 'तुमची श्रद्धा आहे की नाही ते मी ठरवेन' असा काही दावा मी केलाच नाही आहे

१. "he originally intended it as a satirical protest" हेच सिद्ध करते कि श्रद्धा हे शेवई राक्षसाचे मूळ नाही,
२. तसेच, आता तुमची शेवई राक्षसावर श्रद्धा आहे असे मानल्यास, ("आम्ही शेवई राक्षसाचे भक्त आहोत" ह्यामध्ये तुम्ही आहात हे नाकारणार नाही असे वाटते), तसे असल्यास तुम्ही आता सश्रद्ध आहात, त्यामुळे श्रद्धा असते हे तुम्ही मान्य कराल.
मुद्दा १ मान्य असल्यास शेवईच्या जाहिरातींचा त्रास तुम्हास होणार नाही, मुद्दा २ मान्य केल्यास तुम्हास जाहिरातींचा त्रास होतो हे मी स्वीकारेन(त्यावर तुम्ही कसे व्यक्त व्हावे हा तुमचा मुद्दा असेल), पण तुम्ही श्रद्धेचा निषेध करणार नाही हे देखील तुम्हास मान्य असेल.

सोयीसाठी किंवा इतर काहीही कारणाने तसे काहीही म्हणण्याची मला आवश्यकता नाही, ती दोन्ही विधाने मला अमान्य आहेत. तुमच्या सर्व युक्तिवादांचा प्रतिवाद करण्यास मी तयार आहे. मात्र, तुम्हाला पळून जायचे असेल तर मला आनंदच वाटेल.

पोट भरणे हे अवांतर तुम्ही सुरु केलेत, अजून अवांतर नको म्हणून आपली सोय बघत होतो, पण आता तसा काही प्रकार नसल्याचे दिसते, तरीदेखील प्रतिवाद करावा कि न करावा हे मी तुमच्यावर सोडतो.

प्रति

मी तुम्हाला धागा काढण्यास आक्षेप आहे का विचारले असता तुम्ही नाही म्हणालात त्यामुळे तुम्ही धाग्यावर चर्चा चालू ठेवाल असे वाटले होते, तुम्हाला वाटले नाही किंवा अजून "काही कारणांमुळे" तुम्ही चर्चा केली नाही, म्हणून मी मुळ चर्चा पुन्हा चालू केली. मी नवीन धागा काढणे पोट भरण्याचा प्रकार असेल तर "इतर कारणे" तुमची पोट दुखी असू शकते.

पोटदुखी असलेली व्यक्ती मुद्दे नसताना चर्चा सुरू ठेवते आणि खंडन झालेले मुद्दे पुन्हापुन्हा मांडते, चर्चेत सहभागी न होणे हे पोटदुखीचे लक्षण नाही. नव्या धाग्यावर तुम्ही काहीच नवा मुद्दा मांडला नाहीत त्यामुळे चर्चा शक्य नव्हती. तेथे इतरांनी बहुतेक युक्तिवाद केलेच आहेत. माझा वेगळा युक्तिवाद असा की मला अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो त्याचप्रमाणे माझ्या अस्मितांना संरक्षण असल्यासही तुम्हाला त्रास होऊ शकतोच. उदा., प्रार्थनास्थळे पाहून माझे विज्ञानप्रेम दुखावते, आम्हाला मोरॉन्सच्या अस्तित्वानेच यातना होतात. काय करता? किंबहुना, मी मुद्दाम अधिक त्रास देऊ शकेन.

१. "he originally intended it as a satirical protest" हेच सिद्ध करते कि श्रद्धा हे शेवई राक्षसाचे मूळ नाही,

  1. ओरिजिनली या शब्दाचा अर्थच असा की आता विडंबनात्मक निषेध हाच उद्देश असेल असे नाही.
  2. खूप पूर्वी गणपतीही शत्रू समजला जाई आणि संतोषी माता, साईबाबा, इ. तर काही शतकांपूर्वीही अस्तित्वात नव्हते. अशा प्रक्षिप्त दैवतांची टिंगल चालेल काय? रजनीकांत, अमिताभ, इ.ची विडंबने आधीपासून होती, त्यांची मंदिरे प्रस्थापित झाल्यावरही त्यांच्या भक्तांना अस्मितारक्षणाचा हक्क मिळू नये (अभिनेते, खेळाडू, इ. ही भविष्यात मेनस्ट्रीम दैवते होऊ शकतील असे मला गांभीर्याने वाटते) हे तरी तुम्हाला मान्य आहे काय?
  3. शिवाय, तुम्ही जन्मण्याच्या आधीपासूनच एखाद्या दैवताची टिंगल होत असेल तर ती अस्मिता स्वीकारण्याची तुम्हाला काहीही आवश्यकता नव्हती. भले मग टिंगलीची परंपरा अस्मितेच्या परंपरेपेक्षा अर्वाचीन असो. तुम्ही त्या अस्मितेला विडंबनासोबतच निमूट स्वीकारावे.

श्रद्धा असते हे तुम्ही मान्य कराल.

तिचे अस्तित्व आधीच मान्य आहे, त्यासाठी माझी श्रद्धा मान्य करवून घेण्याची आवश्यकता नाही. मुद्दा असा आहे की श्रद्धा असली तरी तिला काहीही संरक्षण मिळू नये कारण ते गेम थिअरीत बसत नाही.

त्यावर तुम्ही कसे व्यक्त व्हावे हा तुमचा मुद्दा असेल

धार्मिक दंगली केल्यास तिला कायदेशीर माफी मिळावी असे तुमचे मत आहे काय?

जेम्स लेन/पुतळा हलविणे

जेम्स लेन/पुतळा हलविणे वगैरेसारख्या गोष्टी आक्षेपार्ह आहेत, नाहीत, किंवा इतराना त्या तशा वाटतात किंवा वाटत नाहीत हा प्रश्न नाही. जर एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला असा एखादा विचार किंवा कृती आक्षेपार्ह वाटत असेल तर त्या गोष्टींना प्रतिसाद त्यांनी वैधानिक मार्गाने द्यायचा की झुंडशाहीने हा खरा प्रश्न आहे असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

विवेकीपणा

प्रतिसाद त्यांनी वैधानिक मार्गाने द्यायचा की झुंडशाहीने हा खरा प्रश्न आहे असे मला वाटते.

झुंडशाहीने प्रतिसाद देऊ नये ह्यात "विवेकीपणाची" अपेक्षा केली जाते, तसे असल्यास जे विधान/कृती आधी केली जाते त्यातही "विवेकीपणाची" अपेक्षा असावी हा खरा मुद्दा आहे असे मला वाटते. मूळ विधान अविवेकी असल्यास त्याला दिला जाणारा प्रतिसाद अविवेकी असू शकतो हे गृहीत धरूनच कलम १५३ ची आखणी करण्यात आली असावी.

:)

झुंडशाहीने प्रतिसाद देऊ नये ह्यात "विवेकीपणाची" अपेक्षा केली जाते, तसे असल्यास जे विधान/कृती आधी केली जाते त्यातही "विवेकीपणाची" अपेक्षा असावी हा खरा मुद्दा आहे असे मला वाटते.

धर्मांचे जे दावे अविवेकी असतात ते करणार्‍यांवर नास्तिकांनी शारिरीक इजा करणारे हल्ले केल्यास त्या व्यक्तींना कायद्याच्या संरक्षणातून वगळणे तुम्हाला मान्य होईल काय?

मूळ विधान अविवेकी असल्यास त्याला दिला जाणारा प्रतिसाद अविवेकी असू शकतो हे गृहीत धरूनच कलम १५३ ची आखणी करण्यात आली असावी.

तुम्हाला १५३अ अभिप्रेत असावे.
१५३अ मध्ये बरीच काटछाट आवश्यक आहे.

:)

धर्मांचे जे दावे अविवेकी असतात ते करणार्‍यांवर नास्तिकांनी शारिरीक इजा करणारे हल्ले केल्यास त्या व्यक्तींना कायद्याच्या संरक्षणातून वगळणे तुम्हाला मान्य होईल काय?

नास्तिकांच्या भावना क्षतिग्रस्त होत असतील तर विचार करू.

तुम्हाला १५३अ अभिप्रेत असावे.

हो, धन्यवाद.

१५३अ मध्ये बरीच काटछाट आवश्यक आहे.

:)

प्रमेयच मुळात चुकीचे

--नास्तिकांच्या भावना क्षतिग्रस्त होत असतील तर विचार करू.

नास्तिकांना भावना असणे हे प्रमेयच मुळात चुकीचे आहे. तुम्ही नास्तिकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवता आहात.

नाही!

नास्तिकांना भावना असणे हे प्रमेयच मुळात चुकीचे आहे. तुम्ही नास्तिकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवता आहात.

आम्हाला श्रद्धा नाहीत हे सत्य आहे परंतु, आम्हाला भावना नक्कीच असतात. उदा., मोरॉननी भरलेल्या समाजात रहावे लागत असल्याचे दु:ख आहे. ;)

अरेरे

--मोरॉननी भरलेल्या समाजात रहावे लागत असल्याचे दु:ख आहे. ;)

अरेरे, तुम्हाला ते बदलता येत नाही !! काय उपयोग तुमच्याकडील शहाणपणाचा?

कसे सिद्ध करणार?

भावना खरोखरीच क्षतिग्रस्त झाल्याची खात्री कशी करता येईल असा तुमचा अंदाज आहे? उडता शेवई राक्षसच्या भक्तांच्या भावना इतरांनी नूडल खाल्ल्यामुळे दुखावणार नाहीत?

निमीत्त

ह्या निमीत्ताने मला घाशीराम कोतवालला झालेल्या विरोधाची आठवण आली.

ह्म्म्म्म्

निदान महाराष्टातील नास्तिक तरी घाशीराम कोतवाल बाबत फार हळवे आहेत..........

असहमत

नाही, मला त्या नाटकात (किंवा त्यासोबतच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या मागणीत) स्वारस्य वाटले नाही (नाटक बघितलेले नाही).

 
^ वर