मराठीतून शिक्षण: काही समस्या

नमस्कार,

एक प्रश्न गेले बरेच दिवस डोक्यात रेंगाळतो आहे तो येथे मांडत आहे. मातृभाषेतून शिक्षण घ्यावे या मुद्द्यावर अनेक तज्ज्ञांची सहमती दिसते. परंतु दिवसेंदिवस प्रमाणभाषा, शुद्धलेखन यांना योग्य महत्त्व न देण्याची प्रवृत्ती बोकाळते आहे. यात मराठीचे शिक्षक, प्राध्यापकच मराठीची वाट लावताना दिसतात. अशुद्ध बोल, अशुद्ध लेखन यासोबत प्रमाणलेखनाची (किंवा शुद्धलेखनाची) बाजू कुणी मांडली की ह्यांना अभिजन विरुद्ध बहुजन असा वाद रंगवावासा वाटतो.

प्रमाणलेखनाचा बाऊ करू नये हे ठीकच आहे. पण म्हणून अशुद्धलेखनाला खतपाणी घालावे असेही नाही. १००% शुद्ध लिहिणे हे अनेकांना जमण्यासारखे नसते परंतु शिक्षकांकाडून, विशेषतः भाषा हा विषय शिकवणारे, शिकणारे, यांच्याकडून जास्तीतजास्त शुद्धलेखनाची अपेक्षा करणे योग्य नाही का? अशा लोकांचा शुद्धलेखनाला विरोध समजत नाही. किंबहुना आपल्यांतले न्यून झाकण्यासाठी तर ही मंडळी प्रमाणलेखनाला विरोध करीत नाहीत ना?

आपलाच,
बंडलबोर

Comments

उत्तम चर्चा

चुकून चूक होणे वेगळे पण अशुद्धलेखनास पाठीशी घालणार्‍यांची तिडीक येते. "सब कुछ चलता है" ही वृत्ती कुठे घेऊन जाणार कोणास ठाऊक. आज माय मराठी आहे उद्या ....

+१

उत्तम चर्चा. प्राध्यापकच काय एका मराठी संकेतस्थळाचे चालकही 'अजाणूकर्न' वगैरे अशूद्ध शब्दांनी भरलेली निवदने देतात तेव्हा तिडीक येते इतके नक्की. असो सविस्तर प्रतिसाद देणारच आहे.

विशेषनाम

मला माहीत नाही आपण कोणत्या संस्थळाविषयी बोलत आहात पण -
(१) अजानूकर्न हे विशेषनाम आहे त्यामुळे शुद्धलेखनाचे नियम त्याबाबत शिथिल असावेत
(२) अशूद्ध की अशुद्ध? मला वाटतं र्‍हस्व "शु" हवा.

विशेषनाम

अजानूकर्न हे विशेषनाम आहे त्यामुळे शुद्धलेखनाचे नियम त्याबाबत शिथिल असावेत

असे का बरं? तुमचे नाव 'शुचि' च्या ऐवजी भलतेच काही लिहिले तर तुम्हाला आवडेल का?

अशूद्ध की अशुद्ध? मला वाटतं र्‍हस्व "शु" हवा.

चुकून झालेली चूक आहे. तुम्ही असेच लक्षात आणुन देत जा.

चुकून झालेली चूक

चुकून झालेली चूक आहे. तुम्ही असेच लक्षात आणुन देत जा.
णून दिली तर चालेल का?
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

एक नाही अनेक समस्या!

तुमचं नांव मला आवडले नाही. असो!

बरेच दिवस रेंगाळणार्‍या प्रश्नाला अशा प्रकारे वाट मिळू दिलीत हे बाकी चांगले केले. आता तो प्रश्न यापुढे तुमच्या डोक्यात यायचा नाही. पण जी जागा रीकामी झाली त्या जागेत दुसरं काही तरी रेंगाळायला हवेच की. मग हे घ्या!

मातृभाशा म्हणजे कोणती भाशा? भाशेला अधिकृततेचे अधिश्ठान एखाद्या राज्याच्या सरकारकडून मिळालेले असते. तेंव्हाच त्या भाशेचा उपयोग व्यवहारासाठी होवू शकतो. राज्याच्या अधिकृत भाशेतून शिकायचे म्हणजे मातृभाशेचा क्रम दुय्यमच ठेवायला हवा. हे मान्य आहे कां?
ज्या भाशेतून एखाद्या राज्याचा रहिवाशी शिकतो, ज्यामधून तो स्वतःला भाशिक व्यवहारासाठी व्यक्त होवू शकतो, त्या भाशेला काय म्हणायचे?
भाशा जर व्यवहारासाठी असते, तर ते नियम काळाशी सुसंगत असायला नकोत कां?
भाशेचे नियम व लिपीचे नियम हे वेगवेगळे असतात हे मान्य कां नाही करायचे?
जे नियम एखाद्या जुन्या, प्राचिन भाशेसाठी होते तेच नियम, आजच्या काळातील भाशेसाठी कां लावायचे? हे नियम म्हणजे धर्म आहेत कां? कि जे बदलताच येवू शकत नाहीत? मग 'नियमांचे पावीत्र्य' श्‍रेश्ठ? की 'उपयोगिता' महत्वाची?

ऊंझा जोडणी

जे नियम एखाद्या जुन्या, प्राचिन भाशेसाठी होते तेच नियम, आजच्या काळातील भाशेसाठी कां लावायचे? हे नियम म्हणजे धर्म आहेत कां? कि जे बदलताच येवू शकत नाहीत? मग 'नियमांचे पावीत्र्य' श्‍रेश्ठ? की 'उपयोगिता' महत्वाची?
नियम बदलतील की. तुमचे म्हणणे सगळे ठीक आहे. पण तुमच्या ह्या मराठीच्या ऊंझा जोडणीला थांबवा हो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

तू गंदी अच्छी लगती है

वॉल्टेअर च्या स्मरणार्थ सादर आहे, मराठी ऊंझा जोडणी बुकमार्कलेट:

(प्रेरणा: ऍ ऐवजी अ‍ॅ बुकमार्कलेट)
जुजबीच टेस्टिंग केले आहे.
बाय द वे, त्यांनी स्वत:ला 'उंझा जोडणी' म्हटले पाहिजे ना?

बॅबेलचा टॉवर

दुवा दिलेला लेख आवडला. मुद्दे पटले. एक प्रमाण असताना त्याला विरोध कशासाठी करायचा हे समजत नाही. मग सगळ्याच क्षेत्रातील प्रमाणे धुडकाऊन लावूया. काही ठिकाणी प्रमाण हवे, आणि काही ठिकाणी नको, असे का? जर प्रचलित असलेले प्रमाणलेखनाचे नियम पाळायचे नसतील, तर मग रावलेप्रणीत किंवा तत्सम नियम तरी का पाळावेत? रावलेंना "ष" चे वावडे आहे. त्यांना तो उच्चार जमत नाही, (किंवा चुकून जमला तरी जाणवत नसावा) ठीक आहे. पण ज्यांना तो जमतो, त्यांची अडचण ते का करतात? तो उच्चारच अस्तित्वात नाही असा दावा जर असेल, तर केवीलवाणा दावा आहे. शब्दांची मोडतोड कशासाठी? त्यांच्या मते हा "अभिजनांचा" (म्हणजे कोण कुणास ठाऊक! हे लोक साडेतीन टक्के अशा विशिष्ट प्रमाणात आढळतात म्हणे) हट्ट असेल, आणि, त्यांचा "हट्ट" या प्रकाराला आक्षेप असेल, तर पुन्हा स्वतःचा हट्ट कशासाठी लादतात?

कुणीच कुठलेच प्रमाण मानायचे नसेल, तर मग आपापल्या सोयीनुसार बडबडत बसायचे. बायबलमधील बॅबेल टॉवरची गोष्ट आठवली.

'प्रेम आहे', पण तरीही मी या चर्चेतून वेगळा होत आहे.

मला मराठी भाशा व त्या संबंधित विशयांबाबत प्रेम आहे, आस्था आहे. कारण मी महाराश्ट्रातच राहातो व राहायचे आहे. आय ऍम नॉट अ ग्लोबल सीटीझन हु लाइक्स् गुड थींग्ज ऑफ बोथ वर्ल्डस् बट डोन्ट वॉन्ट टू ऑर कान्ट शेअर अदर सायडस्!

मुखवटा लावून चर्चा करणार्‍यांशी चर्चा करणे खूप कठीण वाटते. मुळात हा चर्चा प्रस्ताव एक विचित्र आहे. विशयाचे नांव - 'मराठीतून शिक्शण : काही समस्या' शिक्शणाचा विशय तेही मराठी भाशेतून देण्याचा असेल तर चर्चा-विशय खूप व्यापक होतो. पण मुळातच चर्चा प्रस्तावकाने चूकीच्या पद्धतीने विशय हाताळून त्यात 'शुद्धलेखन' हा एक छोटा विशय अगदीच मोठा करून ठेवला आहे. प्रस्ताव टाकून ही मुखवटाधारी व्यक्ती गायब आहे. या कारणास्तव मी येथे चर्चा-प्रस्तावकाचा निशेध करत चर्चेतून माघार घेत आहे.

वरील प्रतिसाद ज्या लेखाच्या अनुशंगाने आला आहे त्या लेखात अनेक मंडळी शुद्धलेखनाचे नियम दूर व्हावेत हे सांगत असताना देखील त्या लेखाची लेखिका, 'पूण्याची लेखिका' फालतू युक्तीवाद करत आहे. धम्मकलाडू यांनीही त्या लेखाचा दुवा देताना ते 'तळ्यात की मळ्यात' हे सांगितले नाही.

मजकूर संपादित. उपक्रमावर इतर सदस्यांवरील अनावश्यक आरोप आणि असभ्य शब्द यांचा वापर करू नये.

मुखवटा

इथे सगळेच मुखवटे आहेत. रावले सतीश हादेखील एक मुखवटाच आहे. स्वतः रावले इथे येणे शक्य नाही, म्हणून आयडी रुपाने इथे व्यक्त होतात. तसेच आळश्यांच्या राजाचे आहे. तेंव्हा मुखवटा हा उल्लेख/ शब्दप्रयोग अनावश्यक वाटतो. शेंबडे हे विशेषण केवळ अनावश्यकच नाही, तर असभ्यही वाटते. थत्त्यांशी केलेली तुलना अनाठायी असून मुद्दे संपल्याची जाणीव करून देतात.

मराठीवरचे आपले प्रेम समजू शकतो. इंग्लिश वाक्यही आवर्जून देवनागरीत टंकलेत त्यावरूनच लक्षात आले.

ज्या मराठी भाषेविषयी आपल्याला प्रेम आहे असे म्हणता, त्याच भाषेला मोडता आहात त्याचे काय? एक नवीनच भाषा तयार करायची, त्याला म्हणायचे मराठी भाशा. ज्ञान न म्हणता म्हणायचे द्न्यान. आपण केवळ लेखनातच फरक करत नसून उच्चारांतही फरक पाडत आहोत हे ध्यानात घ्यायचे नाही. मग म्हणायचे, ही जी नवीन झालीय, तीच खरी. अगोदर होती ती चुकीची. मागे एकदा तिवारी आणि अर्जुनसिंगांनी आपली "खरी" काँग्रेस काढली होती, तसं. असेच प्रयोग सर्व भाषांमध्ये करता येतील. बट् चे स्पेलिंग बी ए टी करावे असे प्रस्तावही मांडता येतील. तेही मांडावेत. आग्रहाने आणि हट्टाने मांडावेत.

भाषेत बदल अवश्य होत असतात. पण ते असे उगाचच्या उगाच प्रतिक्रियावादी विचारांनी होत नाहीत. ज्ञानेश्वरीतील मराठी आणि आजची मराठी निश्चितच वेगळी आहे. समाज हळूहळू स्वीकारत जातो, आणि बदल होत जातात. चला आता बदलू या ही भाषा, ही पूण्याच्या/ पुन्याच्या/ पून्याच्या ब्राह्मणांनी लादलेली भाशा/ भाषा धुडकाऊन लावूया असे म्हणून बदल होत नसतात. तसे बदल केले तर पुन्हा कुणीतरी उठून म्हणाले, 'हे भाशेला भाशा का म्हणायचे? भासा का नाही? आम्ही तर लहानपणापासून भासाच म्हणतो. फेकून द्या ही भाशा' तर मग तेही स्वीकारता आले पाहिजे.

थोडक्यात, "आम्हाला नियमांची मनमानी नको आहे, म्हणून प्रमाण/ शुद्धलेखन नको आहे" असे म्हणायचे असले, तरी "आम्हाला तुमच्या नियमांची मनमानी नको आहे" असा हा टिपीकल ऍण्टी-एस्टॅब्लिशमेंट आणि तर्कविसंगत पवित्रा आहे.

चर्चेत भाग घेणे न घेणे हा आपापल्या मर्जीचा भाग आहे.

नियम आणि धर्म

हे नियम म्हणजे धर्म आहेत कां? कि जे बदलताच येवू शकत नाहीत?

धर्म बदलता येत नाही असे कुणी सांगितले तुम्हाला?
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

बोलायाचे आहे पण बोलणार नाही

चावून चोथा झालेला विषय आहे हो. मात्र रावले साहेबांना फुल स्कोप आहे. रावले साहेब आगे बढो
चन्द्रशेखर

मार्क

परीक्षेतील प्रश्नांच्या उत्तराला ज्या कसोटींवरुन मार्क दिले जातात ती भाषा त्यावेळी बोलली की झाले.

पास

प्रमाणलेखनाचा आग्रह धरायला हरकत नाही. पण प्रमाणलेखन हे 'शुद्ध'लेखन असल्याचा समज पसरवू नये.

नितिन थत्ते

+१००

--पण प्रमाणलेखन हे 'शुद्ध'लेखन असल्याचा समज पसरवू नये.--

१००% सहमत!

प्रमाणलेखन आणि शुद्धलेखन

प्रमाणलेखनाच्या नियमांना अनुसरून केलेले लेखन म्हणजेच शुद्धलेखन नाही काय?

उद्या ष हा वर्ण असू नये असे प्रमाण सर्वांनी मान्य केले तर ष लिहीणे (म्हणजे भाषा, शिक्षण, क्षत्रिय, इ.) अशुद्धलेखन होईल, नाही का?

मला वाटतं शासनाने प्रमाणलेखनाच्या नियमांमध्ये पडून (आणि मोडतोड करून) गोंधळ वाढवलेला आहे.

माझे मत

प्रमाणलेखनाचे नियमांचे पालन विद्याप्रसारासाठी गरजेचे आहे. प्रमाणलेखनाचे नियम पुढेमागे सुलभ-सोपे करता येतील. किंबहुना सोपीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण हे सोपीकरण लादताही कामा नये. सध्या प्रमाणलेखनाला बराचसा भावनिक पातळीवर विरोध होतो आहे, असे मला वाटते. ऱ्हस्व-दीर्घाचा धसका घेतलेल्या शिक्षकांनी असा विरोध करणे म्हणजे विनोदी प्रकार आहे. त्यांचे जाऊ द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मास्तरांनाच

मास्तरांनाच येत नाई तर पोरान्ना कुटुन येनार?
आपला
अण्णा

वाह् हुजुर ताज बोलिये

शुद्ध आणि अशुद्ध मराठी "लिहील्या" मुळे नक्की काय काय आपत्ती येते हे कोणी मुद्देसुद पणे लिहुन दाखवेल काय ? म्हणजे मुद्दे खोडायला सोप्पे जाईल :)
बाकी अलिकडे लोकांमध्ये "मी फार शुद्ध लिहीतो " आणि "दुसरे फार अशुद्ध लिहीतात " असं बोंबलण्याची फारंच फॅशन आलेली आहे.

- (वांझोटी चर्चा प्रेमी) गद्दाफी

फोकस वेगळा

शुद्ध आणि अशुद्ध मराठी "लिहील्या" मुळे नक्की काय काय आपत्ती येते हे कोणी मुद्देसुद पणे लिहुन दाखवेल काय ? म्हणजे मुद्दे खोडायला सोप्पे जाईल :)

जाणकार अधिक माहिती देऊ शकतील. पण इथे फोकस मराठीतून शिक्षण आणि शिक्षकांची प्रमाणलेखनाविषयीची अनास्था ह्या दोन गोष्टींवर आहे. (थोडक्यात तुमच्या कम्पाउन्डवर हल्ला झालेला नाही. आणि त्सुनामीही येणार नाही)

बाकी अलिकडे लोकांमध्ये "मी फार शुद्ध लिहीतो " आणि "दुसरे फार अशुद्ध लिहीतात " असं बोंबलण्याची फारंच फॅशन आलेली आहे.

हे आधीपासूनच असावे. आणि अशा लोकांना आपण फाट्यावर मारतोच की :) पण मराठीतून शिक्षण घेत असताना सगळी पाठ्यपुस्तके प्रमाणलेखनाचे नियम न पाळता लिहिली गेली तर किती गोंधळ माजेल ह्याचा विचार करवत नाही.

अवांतर:
आजकाल अनेक जण टारझणी भाषेत लेखन करताना दिसतात. टारझणी भाषेचे लेखनसंकेत धुडकावलेले चालतील का? थोडक्यात टारझणी भाषेच्या प्रमाणलेखनाचे नियमही ठरवायला हवेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

समस्यांचे प्रकार, त्यांच्या तर्‍हा किती व कोणत्या आहेत?

अजून काही समस्या!

भाशेचे शिक्शण त्या भाशेच्या लिपीपासून सुरू होते.
इंग्रजांचे या देशावर राज्य येण्यापूर्वी क्शत्रियवुत्तीच्या मराठ्यांनी या भारतावर अधिराज्य गाजवले होते. या मराठ्यांच्याची राज्यकारभारासाठी स्विकारलेली लिपी होती - 'मोडी'.
क्शात्रवृत्तीच्या मराठ्यांचा कर्तुत्वाचा अस्त झाल्यानंतर इंग्रजांनी या भारत देशावर राज्य केले. या काळात आपल्या राज्याचा कारभार सुरळीत पणे चालण्यासाठी व त्याकरीता देशी लोकांनांचा आपल्या यंत्रणेत रुजू करून घेण्यासाठी (इं.: फॉर किपींग देम 'अटॅच्ड अँड अंडरकंट्रोल') इंग्रजांनी या देशात शिक्शणाचा प्रसार केला. बहुतेक प्रांतात इंग्रजांनी त्या-त्या सुभ्यातील (राज्यातील) भाशेला व त्यांच्या लिपीला त्यांच्या शिक्शणाचे माध्यम म्हणून घेतले. परंतु महाराश्ट्रातील मरहाठ्यांच्या भूमीतील प्रचलित असलेली 'मोडी लिपी' न घेता 'ब्राह्मण बाळबोध लिपी' उर्फ - देवनागरी स्विकारली. असे इंग्रजांनी कां केले असावे?

इंग्रजांनी आपल्याला शिकवले की ब्राह्मी लिपीतून सगळ्या भारतीय भाशांच्या लिपी विकसित झाल्या. त्यात काही तथ्य ही आहे. परंतु ब्राह्मी लिपीच्या आधीही अनेक लिप्या होत्याच. ब्राह्मी लिपी ही स्वत: 'महेश्वरी संकेतपद्धतीतून' विकसित झाली हि बाब नंतर स्पश्ट झाली. वैश्यवृत्तीच्या गुजराथ्यांची लिपी व लढवैया मराठ्यांची मोडी लिपी या महेश्वरी संकेतपद्धतीशी बरीचशी मिळती जुळती आहे. लिपी ही जर एखाद्या भाशेच्या भाशिकांचा चेहरा आहे असे मानले तर, मराठी माणसांचा आत्ताच चेहरा -ब्राह्मण बाळबोध लिपी उर्फ देवनागरीतून व्यक्त होतो कां?

आत्ता लिपीच्या पुढे जावू- व्याकरणाकडे पाहू.
आपण काय शिकतोय, का शिकतोय त्याचा उगम कुठुन झाला हे आधि कळायला नको कां?
मराठीचे व्याकरण हे इंग्रजीच्या व्याकरणाची भ्रश्ट नक्कल आहे. ही भ्रश्ट नक्कल 'पूण्याच्या' बुद्धिमंतांनी (बहुदा दक्शिणेच्या वा बिदागीच्या मोबदल्यात) - संस्कृत पंडितांनी इंग्रजांसाठी केला. 'ब्राह्मण लिपी व भ्रश्ट व्याकरणाच्या उगमकर्ते असण्या मुळे ' पुण्याच्या बुहुतांशी मंडीळींमध्ये जो अती अहंकार भरला आहे, जो पूण्याला 'महाराश्ट्रापेक्शाही मोठा' वाटतो तो तापदायक होत आहे. असे असताना 'मराठीतून शिक्शण' हा विचार तरी योग्य आहे कां?

पाश्चात्यांनी आभ्यास करून जे नियम जे सिद्धांत प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर लिहीले, तेच जर 'द्न्यान' म्हणून स्विकारत आपल्याला शिकायचे असेल, तर मग इंग्रजी काय वाईट आहे. मराठीची गरजच काय? पाश्च्यात्यांची आभ्यासू वृत्ती आपल्यात आणायची नसेल तर मराठी ही केवळ 'चकाट्या माराणार्‍यांची भाशा' म्हणूनच चालू ठेवण्यात गैर काय? तीला शिक्शणाची भाशा कशाला बनवायची? गरज काय?

आठवलेजींना प्रतिसाद:
शुद्र युगात नाहीतरी मनोरंजनासाठी चकाट्याच माराव्या लागतील. श्री. चंद्रशेखर आठवलेजी वर म्हणत आहेत कि हा चर्चा विशय चावून-चावून चोथा झालाय. पण जर चोथारूपी 'मल' तयार झालाच आहे तर मग आधिच्या चर्चा-संवाद होण्यातून जे विचार मंथन झाले होते त्यातील अमृतरूपी 'रस' कोठे आहे? असेल तर तो रस कृपया मला द्या. तो रस मी 'पद्धतशीरमांडणीतून शब्दबद्ध करीत त्यातून नियम, शास्त्र विकसित करून' जगापुढे सादर करू इच्छितो. तेवढे टॅलेण्ट माझ्यात, तेवढी धमक माझ्यात आहे. ते सगळे मी मराठीत करू शकतो. कारण तसे झाले तरच मराठी 'द्न्यान भाशा' होवू शकते. आणि 'द्न्यान भाशाच' ही 'शिक्शणाची भाशा' होवू शकते.

प्रकाटाआ

प्रकाटाआ

मराठी 'द्न्यान भाशा'

रावले साहेब धन्यवाद. माझी आपल्याला नम्र सूचना आहे की आपण जर काही कामानिमित्त किंवा पर्यटन म्हणून दिल्लीला कधी गेलात तर तिथल्या राष्ट्रीय संग्रहालयाला जरूर भेट द्या. या संग्रहालयात सर्व भारतीय भाषा व लिप्या सम्राट अशोकाच्या कालापासून कशा विकसित होत गेल्या याची फार उद बोधक अशी माहिती मांडून ठेवलेली आहे. त्यापैकी आपल्यासाठी महत्वाची लिपी म्हणजे नागरी लिपी. ही नागरी लिपी गेली हजार वर्षे कोणत्या स्वरूपात लिहिली जात होती? त्याच्यात मूळाक्षरे कोणती होती? ती कशी बदलत गेली? ष, श, ज्ञ ही मूळाक्षरे गेली किती शतके वापरात आहेत? ती कशी लिहिली जात होती? हे सर्व माहिती करून घेण्यासारखे आहे. आपण हे संग्रहालय बघून आल्यानंतरच भाषाशुद्धीची आपली मोहीम सुरू केलीत तर ती जास्त प्रभावी होईल.
माझ्याजवळ एका स्लाइड्चा फोटो आहे तो तितकासा स्पष्ट नसल्याने मी येथे टाकू शकत नाही. आपणास हवा असला तर मला आपला ई-पत्ता व्यनि वरून कळवलात तर मी तो आपल्याला पाठवू शकतो.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चर्चेचा विशय काय बरं आहे?

श्री. चंद्रशेखर,
कोणाचाही स्वभाव, कोणाचेही विचार फक्त ती व्यक्तीच काही प्रमाणात बदलू शकते किंवा त्यात नियतीच 'परीस्थितीच्या माध्यमातून' बराच बदल घडवू शकते. इतर कोणीही कितीही प्रयत्न करणे म्हणजे स्वतःला त्रास करून घेण्यासारखे असते.

संकेतस्थळावर चर्चा करणे ही एक कला आहे. असे मी मानतो. इथले फड जिंकून आपल्याला कोणतेही पदक मिळायचे नसते. इथे दुसर्‍याशी संवाद साधताना स्वतः शी देखील संवाद साधायचा असतो. ते कळण्यासाठी संवादात कोण-कसा- कुठल्या परीस्थिती चूकतो हे समजून घेत शिकायचे असते. हे मी तुम्हाला शिकवत नाही आहे. तर मी उपक्रमवर काय शिकलो आहे ते सांगत आहे.
हे सगळे कशासाठी लिहीले?
कारण या चर्चेचा विशयच आहे - 'मराठीतून शिक्शणः काही समस्या'! आहे ना गंमत!

जेंव्हा एखादी व्यक्ती चर्चा प्रस्ताव ठेवते. तेंव्हा 'चर्चेच्या प्रस्तावातील विशय', त्याचे सादरीकरण, चर्चा ठेवणार्‍याचा हेतू, त्याची भुमिका, त्याचे वय- अनुभव ह्या सगळ्या गोश्टी समजून घेत तिथे प्रतिसाद द्यायचा की नाही? द्यायचा तर कसा द्यायचा? ह्या गोश्टी ध्यानात घ्यायच्या असतात. नाही ध्यानात घेतले तर काय होतंय?
असे विचारले तर उत्तर मिळते- 'अपमान होतो', 'तोंडघशी पडावे लागते.' आणी ते सगळे वैचारीक मृत्यू समान असते.
येथील चर्चेच्या प्रस्तावात बंडलबोर 'ह्या आत्मविश्वास कमी असलेल्या व्यक्तीने' घाबरत-घाबरत एक विशय मांडला आहे. तेंव्हा तिथे प्रतिसादकांची सकारात्मक भुमिका कोणती असू शकेल?
त्यांच्या चर्चा रूपी परडीत - 'मराठीतून शिक्शणः काही समस्या' ह्या विशया संबंधित 'विचारांची फुले' आपल्याला रुचतील तशी टाकायची आहेत.
हा झाला चर्चेचा पहिला टप्पा!

चर्चेच्या दुसर्‍या टप्प्यात कोणती फुले योग्य? कोणती अयोग्य? त्यांच्या रंगछटा? यावर वाद-विवाद करता येईल. इथे वैचारीक युद्ध खेळले जायला हवे.

चर्चेच्या तीसरा टप्पा हा त्या चर्चेच्या सांगतेचा असेल. इथे बंडलबोर यांनीच सगळ्यांचे आभार मानत, त्यांना जे मुद्दे योग्य वाटत आहेत त्यांची योग्य वर्गवारी करून त्या फुलांचा एक हार बनवून सादर करायचा आहे.

अडचण

रावले साहेब प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मी या विषयावर प्रतिसाद द्यायला विशेष उत्सुक नाही व नव्हतो. परंतु आपण चर्चा करणे म्हणजे काय (मग ते मराठीतून शिक्षणाबद्दल असो किंवा न्युक्लियर रिऍक्टरबद्दलचे असो) असा मुद्दा उपस्थित केला असल्याने हा प्रतिसाद देत आहे.
उपक्रमवर मी कशासाठी येतो याचे एक कारण म्हणजे या संकेतस्थळावर होणारी खुली चर्चा व त्यातून मिळालेली नवीन माहिती. कोणताही माणूस सर्वज्ञ नसतो. व आपल्याला सर्व येते अशी वृत्ती ठेवल्यास त्याला कोणतेच नवे ज्ञान प्राप्त करता येणार नाही. उदाहरणार्थ मध्यंतरी जपानमधल्या अणू भट्यांच्याबद्दल जी चर्चा झाली त्यातून माझ्या मनात असलेल्या शंका दूर होण्यास मदत झाली. असे व्हावे ही इच्छा जर चर्चेत भाग घेणार्‍याची असली तर खुल्या मनाने चर्चेत भाग घेण्याची गरज असते. आपलाच मुद्दा बरोबर आहे. आपल्याला न पटणारे मुद्दे मांडणार्‍या लोकांचे बुद्धी वैभव फार कमी दर्जाचे आहे असे समजले तर नुकसान आपलेच फक्त होते.
काही वेळा आपल्या मनात एखादा पूर्वग्रह इतका पक्का बसलेला असतो की आजूबाजूच्या अनेक लोकांनी हा पूर्वग्रह चुकीचा आहे हे आपल्याला पटवून देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते आपल्याला पटतच नाही. अशी मनोधारणा ठेवून चर्चेत भाग घेतला तर त्यातून काहीही निष्पन्न होण्याची शक्यताच रहात नाही.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

शिळ्या कढीला

शिळ्या कढीला उत आला आहे :)
असो. चालुदे!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चिंताजनक

शिळ्या कढीला उत आला आहे :)

तुम्हाला असे वाटावे ही चिंताजनक गोष्ट आहे. माझ्यामते ही हरदम ताजी राहणारी कढी आहे. शिक्षकांची प्रमाणलेखनाविषयीची अनास्था घातक आहे. ह्याचे परिणाम फार चांगले असणार नाहीत. प्रमाणलेखनाशिवाय किती गोंधळ माजेल ह्याची कल्पना करवत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

प्रेम नाही

आम्हाला शुद्धलेखनाबद्दल प्रेम नाही, आस्था नाही वगैरे टैपची वाक्ये अनेकांच्या वाचनात आली असतीलच. मराठी संकेतस्थळांवर कायम वाचनात येतात. शुद्धलेखनाच्या चुका होणे मला स्वाभाविक वाटते पण त्या चुकांवर पांघरुण घालणे किंवा त्यांची भलावण करणे स्वाभाविक वाटत नाही.

तेव्हा, आम्हाला शुद्धलेखनाबद्दल प्रेम नाही हे वाक्य आपली चूक झाकण्याकरता म्हटले जाते की अनास्थेपोटी? दोन्हीप्रकारे नुकसान भाषेचेच आहे हे खरे.

छान चर्चा.

सतीश रावले यांच्या विचारांशी सहमत.

उपक्रमचा रंगमंच हलता राहावा यासाठी असे विषय आवश्यक आहेत.
चर्चा चालू ठेवा.

वरील विषय संपला की, सम्राट बाबर,हुमायुन, अकबर,जहाँगीर,शहाजहान व औरंगजेब चर्चेला घ्यावा.
नंतर मराठ्यांचा इतिहास चर्चेला घ्यावा. मराठ्यांचे युद्ध हे स्वातंत्र्य युद्धच नव्हते अशीही चर्चा करता येईल. असो,वरील सर्व विषयात थोडा धक्कादायक मसाला टाकून चर्चा रंगतदार करावी, ही नम्र विनंती.

-दिलीप बिरुटे
(वाचक)

तुमचे ओरिजिनल मत

सतीश रावले यांच्या विचारांशी सहमत.

श्री. रावले ह्यांच्याशी पटो न पटो, पण ते आपली अभ्यासपूर्ण मते सविस्तरपणे मांडत असतात. आणि त्यात काही ओरिजिनल आयड्याही असतात. तुम्ही तर मराठीचे शिक्षक आहात. तुमचे सविस्तर अभ्यासपूर्ण आणि ओरिजिनल मत वाचायला आवडले असते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अवांतर का बरे?

वरील विषय संपला की, सम्राट बाबर,हुमायुन, अकबर,जहाँगीर,शहाजहान व औरंगजेब चर्चेला घ्यावा.
नंतर मराठ्यांचा इतिहास चर्चेला घ्यावा. मराठ्यांचे युद्ध हे स्वातंत्र्य युद्धच नव्हते अशीही चर्चा करता येईल.

का बरे? चर्चा विषय छान आहे तर हे अवांतर का बरे? त्यापेक्षा शुद्धलेखनावरचे तुमचे मत सांगा की. मुघल राजे विषयाला घेतले की पोटात दुखते का? आणि मराठ्यांचे युद्ध हे स्वातंत्र्ययुद्ध कधीपासून झाले बॉ! कठिण आहे - इतिहासाचाही अभ्यास करा हं!

अरेरे...

का बरे ?
वाचलं नाही का ? उपक्रमचा रंगमंच हलता ठेवणे गरजेचे आहे म्हणून वरील विषय आवश्यक आहेत असे म्हटले आहे.

शुद्धलेखनावरचे तुमचे मत सांगा की
शुद्धलेखनाच्या बाबतीत उपक्रमवर अनेकदा मी माझे मत मांडले आहे. आता वेळ घालविणे सोडले आहे.
मुघल राजे विषयाला घेतले की पोटात दुखते का?

हे तर कै च्या कैच.
मराठ्यांचे युद्ध हे स्वातंत्र्ययुद्ध कधीपासून झाले बॉ! कठिण आहे

मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध हे जयसिंगराव पवारांचे पुस्तक पाठवतो. वाचल्यावर त्यांना काय म्हणायचे आहे हे कळले तर तसे जाहीर कबूल करा कारण आपलाही इतिहासाचा अभ्यास आम्हाला माहित आहे.

आणि हो, कठिण नाही कठीण.

-दिलीप बिरुटे

पुस्तक का पाठवता

मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध हे जयसिंगराव पवारांचे पुस्तक पाठवतो. वाचल्यावर त्यांना काय म्हणायचे आहे हे कळले तर तसे जाहीर कबूल करा कारण आपलाही इतिहासाचा अभ्यास आम्हाला माहित आहे.

पुस्तक का पाठवता? तेवढे कष्ट नका घेऊ हं! इथेच लिहा की स्वतंत्र लेखात. तुमचे शुद्धलेखनही तपासता येईल त्या निमित्ताने. चूक असेल तर कबूल करण्यात कधीच वाईट नसते. तुमच्यासारखे नाही आपले. कल्जी नसावी.

शुद्धलेखनाच्या बाबतीत उपक्रमवर अनेकदा मी माझे मत मांडले आहे. आता वेळ घालविणे सोडले आहे.

का बरे? तुमच्या मताला कुणी किंमत देत नाही म्हणून की मराठीचे प्राध्यापक अशी मते मांडतात त्याचे हसे होते म्हणून?

आणि हो, कठिण नाही कठीण.

धन्यवाद. चूक कबूल असतेच पण याचा अर्थ आपल्याला शुद्धलेखन माहित असूनही आपण अशुद्धलेखनाची कास धरता असा होतो. :-)

बाकी, जयसिंग पवार म्हणजे शिवधर्मीयांचे लाडके इतिहासकार ना! त्यांनी पेशव्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली असे म्हटले होते का?

चालू ठेवा.

तुमच्या मताला कुणी किंमत देत नाही म्हणून की मराठीचे प्राध्यापक अशी मते मांडतात त्याचे हसे होते म्हणून ?

कोणी आमच्या मताची किंमत करावी. कोणी आपली वाहवा करावी
यासाठी तर आम्ही बिल्कूल लिहित नाही. बाकी, आपल्या मताची कोणी फार किंमत करतात. कोणी आपलं फार कौतुक करतात. असे कोणाला वाटत असेल तर अशांनी आपला तो गैरसमज काढून टाकला पाहिजे असे मला वाटते.

जयसिंग पवार म्हणजे शिवधर्मीयांचे लाडके इतिहासकार ना! त्यांनी पेशव्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली असे म्हटले होते का?
अभ्यास करा....!

-दिलीप बिरुटे

लिहा ना

जयसिंग पवार म्हणजे शिवधर्मीयांचे लाडके इतिहासकार ना! त्यांनी पेशव्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली असे म्हटले होते का?
अभ्यास करा....!

करू की. त्यासाठीच तुम्हाला प्रश्न विचारला. उत्तर द्या की. जयसिंग पवारांची माहिती इतरांनाही कळू द्या. चूक असतानाही उगीच कैफात जाण्याची प्रवृत्ती नाही. तुम्ही लिहा की लेख. उगीच नावे पुढे करून अभ्यास करा अशी हाकाटी नको.

बाकी, आपल्या मताची कोणी फार किंमत करतात. कोणी आपलं फार कौतुक करतात. असे कोणाला वाटत असेल तर अशांनी आपला तो गैरसमज काढून टाकला पाहिजे असे मला वाटते.

सहमत! आपण हे जाणले असल्यास उत्तम झाले. कदाचित त्यामुळेच तर नाही ना शुद्धलेखनाच्या चर्चेत इतिहासावर घसरणे झाले?

असो. आता अवांतर फार झाले, पुढे बोलणे झाल्यास ख. व. मधून.

धन्यवाद.

आता अवांतर फार झाले
सहमत. मी थांबतो.

-दिलीप बिरुटे

इतिहास काढता येईल

सहमत. मी थांबतो.

का? थांबू नका. मराठीच्या प्रमाणलेखनावर मते मांडा की मुद्देसूद. तुम्ही चर्चा इतिहासाकडे वळवलीत. आणि इतिहासाचे म्हटले तर बराच इतिहास काढता येईल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लिहीत जा

बिल्कूल लिहित नाही

बिलकुल लिहीत जा. प्रमाणलेखनावरील मते तर नक्कीच लिहा. प्राध्यापकांची प्राध्यापकी आणि डॉक्टरेटी म्हणजे मज्जाक नाही हे दाखवून द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काय हे?

मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही ना? की हा एक झक्क लेगपुलिंगचा प्रकार आहे?
ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हा सदाबहार विषय उपलब्ध असताना तथाकथित विरक्तिवीरांनी इतिहासात का घुसावे? 'मुळात ब्राह्मणद्वेषी असलेल्या प्राध्यापकांना आपल्या डिग्रीसाठी ब्राह्मण लोकांवर संशोधन करावे लागले की येणारे वैफल्य' या विषयावर एक चर्चा झडू द्या...
सन्जोप राव
आह को चाहिये, इक उम्र असर होने तक
कौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक

मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध

मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध याविषयी काही ऐकलेले नाही. अधिक वाचायला आवडेल. (इंग्रजांशी युद्ध की मुघलांशी की आणखी कुणाशी? आणि मराठे म्हणजे नेमके कोण? शहाजी, की शिवाजी, की संभाजी, की पेशवे? पेशवे असल्यास नेमके कोण - दुसर्‍या बाजीरावापर्यंतचे, की नानासाहेब?)

एक सत्ता म्हणून मराठ्यांचा उल्लेख होतो. त्यांनी दुसर्‍या सत्तांशी युद्धे केलेली आहेत. पण मराठी सत्ता पारतंत्र्यात गेल्यानंतर मग स्वातंत्र्यासाठी त्यांनी उठाव केला असा कोणता प्रसंग आहे बरे? काही लक्षात येत नाहीये. असे मला वाटतं फक्त नानासाहेब पेशवे यांच्याच बाबतीत झाले आहे. गडकर्‍यांचा उठाव, रामोश्यांचा उठाव हा काही मराठी सत्तेचा उठाव म्हणता येणार नाही. वासुदेव बळवंत फडकेंचा लढादेखील "मराठ्यांचा" लढा म्हणता येणार नाही.

मला वाटतं इंग्रजांविरुद्धच्या युद्धांसाठी सरधोपटपणे स्वातंत्र्ययुद्ध असा शब्दप्रयोग केला गेला असावा. तसे असेल तर असा शब्दप्रयोग चुकीचा आहे, असे माझे मत आहे.

असो. उत्सुकता चाळवली. अधिक लिहावे अशी विनंती.

 
^ वर