बृस्केता टोस्टमधील क्यालरी

'सामना' या सुमार दैनिकातील 'फुलोरा' या पुरवणीतील एक लेख वाचनात आला. लेखिकेने स्वतःला डाएट कन्सल्टंट म्हणवून घेतले आहे.

लेखाचा दुवाः http://www.saamana.com/2011/March/12/Link/FULORA6.HTM

लेखिकेने त्या विवक्षित पाककृतीमध्ये 4 स्लाईस मल्टिग्रेन किंवा व्होल व्हीट ब्रेडपासून बनवलेल्या ऑलिव्ह ऑईल व 'थोडेसे चीज' युक्त पाककृतीमध्ये केवळ 200 क्यालरीज असतात असा धादांत खोटा दावा केला आहे.

एका व्होल व्हीट किंवा मल्टिग्रेन ब्रेडमध्ये 65 ते 75 क्यालरी असतात. पाककृतीत उल्लेख केलेल्या चमचाभर ऑलिव्ह ऑईलमध्ये 40 ते 50 क्यालरीज असतात. 'हवे असल्यास चीज घाला' असे म्हटले असल्याने चीज बाजूला ठेवले तरी एकंदर क्यालरीज या 350 पर्यंत जातात.

अशा खोट्या माहितीचा सर्वांनी निषेध करायला हवा असे मला वाटते.

Comments

मिसळपाववर जाऊन निषेध नोंदवा

अमिता गद्रे या मिसळपावावर खादाड अमिता या नावाने लिहितात. त्यांची ही पाककृती त्यांच्या ब्लॉगवरही आहे. आपण मिसळपावावर जाऊन किंवा त्यांच्या ब्लॉगवर जाऊन तेथे अवश्य निषेध नोंदवा.

बायदवे, बृस्केटा ब्रेडला ब्रशेटा ब्रेडही म्हणतात.

धन्यवाद

अमिता गद्रे या मिसळपावावर

धादांत चुकीची माहिती असल्याने असा संशय आलाच होता. मात्र वाचकांना अशा चुकीची जाणीव करून देणे महत्त्वाचे असल्याने उपक्रमाचा तुलनेने समंजस व मोठा वाचकवर्ग लक्षात घेऊन उपक्रमावर ही माहिती टाकणे मला योग्य वाटले..

?

>>उपक्रमाचा तुलनेने समंजस

ह्म्म्म्

>>व मोठा वाचकवर्ग लक्षात घेऊन

हॅ हॅ हॅ

असो. त्या खादाड असल्याने २०० काय आणि ५०० काय. :-)

(सदर प्रतिसाद दोन्ही हातांनी मिळून टंकला आहे)

नितिन थत्ते

सल्ला

पुढच्या वेळेस बोटे वापरा असा सल्ला देतो.

सुपरसेट

बोटे ही हातामध्येच अंतर्भूत होतात.

खालील श्रेणी योग्य असावी.

थत्ते यांनी लिहिलेला प्रतिसाद > थत्ते यांच्या हाताने लिहिलेला प्रतिसाद > थत्ते यांच्या बोटांनी लिहिलेला प्रतिसाद > थत्ते यांच्या बोटांच्या पेरांनी लिहिलेला प्रतिसाद

खादाड असल्या तरी

मराठी समाजातील 'पेपरात छापून येणाऱ्या गोष्टींना प्रमाण मानण्याची' प्रवृत्ती लक्षात घेता त्यांची ही कृती गंभीर आहे. 'डॉ.
बालाजी तांबे हे मधुमेहींना साखर खाण्याचा किंवा हृदरोगींना तेल-तूप खाण्याचा सल्ला देतात. त्या स्वरुपाचाच हा प्रकार वाटतो.

तुमचा प्रतिसाद दोन्ही हातांनी टंकला असला तरी हम्म्म् साठी उजवा व हॅ हॅ साठी डावा हात वापरला असावा असे वाटते.

नीट वाचा :)

चमचाभर नाही, एक-दोन थेंब ऑलिव्ह ऑईल घाला असे पाककृतीत म्हटले आहे. तेही वगळले तरी चालेल असे दिसते आहे.
त्यांनी सामनातील फोटॉत दाखवलेला स्लाईस अतिशय पातळ आहे.

हे त्यांच्या डीफेन्समध्ये नाही तेव्हा ते बाकी चालू दे :)

पस्तीस

ऑलिव्ह ऑईलच्या 35 क्यालरी वजा केल्या तरी वजाबाकी 200 पर्यंत येत नाही. पाककृतीच्या साधनांमध्ये (2 x 4 =) 8 थेंब ऑलिव्ह ऑईल म्हटले नसून 1 चमचा म्हटले आहे. उरलेले महागडे ऑलिव्ह ऑईल फेकून द्यायचे का याचे उत्तर लेखिकेने दिलेले नाही.

:)

आमच्याकडचा Elegantly slim slice असलेला पेपरिज फार्मचा ब्रेड (http://www.pepperidgefarm.com/ProductDetail.aspx?catID=755) घेऊन ही पाककृती करता येईल का असा विचार करते आहे. (प्रत्येक स्लाईसच्या 45 calories अशा ४ स्लायसांच्या मिळून १८० कॅ. + टोमॅटो, ऑलिव्ह ऑईलचा १ थेंब.. असे करून साधारण क्यालरी २०० च्या आजूबाजूला आणू शकेन असे वाटत.

हेल्दी लाइफ - ३५ कॅ.

हेल्दी लाइफचे ब्रेड हे ३५ कॅलरीचे असतात. थिन स्लाइसेस वगैरे न करता. करून बघायला हरकत नाही.

हम्म

हे नाव दिले तर आमच्या भागात जवळपास कुठे मिळत नाहीत असे दिसते. पोस्टल कोड देऊन पाहिला.

ब्रेड स्लाइसचा आकार

लेखात ब्रेड स्लाइसचा आकार दिलेला दिसत नाही. माझ्या नातीला सॅन्डविच खायचे असले तर तिची आजी तिला साधारण 1 इंच बाय 1 इंच आकाराचे सॅ न्डविचचे तुकडे खायला सोपे जावे म्हणून करून देते. अमिता ताई खादाड असल्याने याच आकाराचे सॅ न्डविच खात असाव्यात. मग कॅलरीचा हिशोब बरोबर जुळतो.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

थोडी गडबड आहे खरी

मोजण्यात थोडी गडबड झालेली दिसते खरी. दोन स्लाईसचा हिशोब चुकून चार स्लाईससाठी दिलेला दिसतो.

माझा हात सढळ आहे म्हणा, एका चहाच्या चमचाभर तेलातून ब्रेडच्या चार तुकड्यांवर शिडकाव करणे कठिण जाऊ शकेल. (आमची एक आजी छोटेसे गडूभर तूप अगद्या छोट्या पळीने वाढून कित्येक दिवस टिकवत असे, तेही आठवले.)

दोन स्लाईस : ~७०*२ किकॅ
एक चमचा तेल : ~४५ किकॅ
टोमॅटोमधील : ~१५ किकॅ
एकूण : ~२०० किकॅ

धनंजय यांचे आभार

धनंजय यांनी योग्य प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. माझ्या आकडेमोडीशी त्यांचा विदा जुळतो.

बाकीच्यांनी मात्र चर्चेला फाटे फोडण्याचा प्रयत्न केला आहे.

:)

'सामना' या सुमार दैनिकातील 'फुलोरा' या पुरवणीतील एक लेख वाचनात आला.
सर्वप्रथम 'सामना' दैनिकाला सुमार म्हटल्याबद्दल 'सदस्य' आयडीचा मी स्पष्ट शब्दात स्पष्ट निषेध व्यक्त करतो. सामनातील संजय राऊत यांचे लेखन मला एक वाचक म्हणून आवडते. द्वारकानाथ संझगिरीचा सध्याचा 'पॉवर प्ले' मला आवडतो. मा.शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखती कधीतरी मी मन लावून वाचल्या आहेत. सामनाचा संबंध हा मराठी माणसाशी असल्यामुळे मला दैनिकाला नव्हे तर मराठी माणसाला सुमार म्हटल्याचे वाटत आहे. संपादकांनी 'सुमार' या शब्दाची संपादकीय नोंद घेऊन कार्यवाही करावी ही नम्र विनंती.
उपक्रमाचा तुलनेने समंजस व मोठा वाचकवर्ग
अग्ग माय गं. आत्ता कुठे मला शांत झोप येईल. :)

-दिलीप बिरुटे

रूपककोडे

छोट्या रेषाखंडाला मोठा कसा बनवावा? त्याशेजारी अजून छोटा रेषाखंड आखावा!

सामना

सामना आणि संध्यानंद या दैनिकांच्या दर्जामध्ये काहीही फरक नाही. संजय राऊत यांचे प्रक्षोभक लिखाण तुम्हाला आवडत असले तरी त्याचा त्यांच्या लेखनाचा दर्जा सुमारच आहे. कालच भीमशक्ती आणि शिवशक्तीची युती करण्याच्या गप्पा मारताना मराठवाडा नामांतर चळवळीच्या वेळी शिवसैनिकांनी दलितांवर केलेल्या अत्याचाराचे सोयीस्कर विस्मरण राऊत यांना झालेच आहे. सामनाचा संबंध मराठी माणसांशी कसा? घर तेथे शौचालय योजनेनुसार आजकाल कोणत्याच मराठी वर्तमानपत्राचा मराठी माणसांशी संबंध येईनासा झाला आहे असे वाटते.

वर्गवारी

ह्या चर्चेची वर्गवारी ही * विज्ञान * वैद्यकशास्त्र * प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे * मनोरंजन * विरंगुळा अशी केलेली दिसते. त्यातील प्रत्येक परीच्छेदाचा संदर्भ लावायचा प्रयत्न करत आहे:

'सामना' या सुमार दैनिकातील 'फुलोरा' या पुरवणीतील एक लेख वाचनात आला. लेखिकेने स्वतःला डाएट कन्सल्टंट म्हणवून घेतले आहे. - प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

लेखाचा दुवाः http://www.saamana.com/2011/March/12/Link/FULORA6.HTM - मनोरंजन

लेखिकेने त्या विवक्षित पाककृतीमध्ये 4 स्लाईस मल्टिग्रेन किंवा व्होल व्हीट ब्रेडपासून बनवलेल्या ऑलिव्ह ऑईल व 'थोडेसे चीज' युक्त पाककृतीमध्ये केवळ 200 क्यालरीज असतात असा धादांत खोटा दावा केला आहे. - विज्ञान

एका व्होल व्हीट किंवा मल्टिग्रेन ब्रेडमध्ये 65 ते 75 क्यालरी असतात. पाककृतीत उल्लेख केलेल्या चमचाभर ऑलिव्ह ऑईलमध्ये 40 ते 50 क्यालरीज असतात. 'हवे असल्यास चीज घाला' असे म्हटले असल्याने चीज बाजूला ठेवले तरी एकंदर क्यालरीज या 350 पर्यंत जातात. - वैद्यकशास्त्र

अशा खोट्या माहितीचा सर्वांनी निषेध करायला हवा असे मला वाटते. - विरंगुळा

:-)

शिंपल आहे राव्

अहो दिड-दोनशे कॅलरी तो ओव्हन् नाय् खाणार् का?

-Nile

झटपट

अहो दिड-दोनशे कॅलरी तो ओव्हन् नाय् खाणार् का?

हा झटपट बारीक होण्याचा मार्ग आहे का? ज्यांना व्हायचे आहे त्यांनी स्वतः ओव्हनमध्ये बसून पाहावे.

बृस्केता??

बृस्केता??त्यांना ब्रुशेटा म्हणायचे आहे बहुदा. ब्रुशेटा हा ईटालियन पदार्थ खाल्ला आहे. बृस्केता म्हणजे काय माहित नाही बुवा. बाकी 'डाएट कन्सल्टंट' असे कुणीही म्हणून घेऊ शकतो. त्यासाठी कसल्याही डिग्रीची गरज नाही.

काही मजकूर संपादित.

ब्रुस्केत्ताच

इतालियनमध्ये Bruschetta याचा उच्चार ब्रुस्केत्ता असा होतो. ब्रुशेटा हा अमेरिकनाळलेला उच्चार असावा. (त्यातही इतालियन शब्दांमध्ये ट असा उच्चार ऐकल्यावर अंगावर पाल पडल्यासारखे वाटते.)
तुम्हीच दिलेल्या विकीच्या पानावर उच्चारही दिला आहे. गूगल पांडित्य करताना वाचन ऑप्शनल असावे बहुधा.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

हेहेहे

गूगल पांडित्य करताना वाचन ऑप्शनल असावे बहुधा

.

हेहेहे.. गुगल पांडित्य नाही विकीपांडित्य! इटलीला कधी गेलो नसल्याने 'बृस्केता म्हणजे काय माहित नाही बुवा' असे प्रतिसादात दिलेच होते. मी ज्या ज्या इटालियन खानावळीत खाल्ले तिथे ब्रुशेटाच म्हंटले होते. (बाकी खाली धनंजय ह्यांनी योग्य स्पष्टीकरण दिलेले आहे)

वैयक्तिक रोखाचा अनावश्यक मजकूर संपादित केला आहे.

अहो

अहो जो दुवा देता आहात तो एकदा बघायचा म्हणजे ही वेळच आली नसती.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

मजकूर संपादित.

अहो

तुम्हीही धनंजय ह्यांचा प्रतिसाद वाचला असतात तर खरंच ही वेळ आली नसती.

ब्रुस्केता/ब्रुशेता

इतालियनमध्ये उच्चार ब्रुस्केता आहे असे कळते. त्या अनुषंगाने इंग्रजीत काही लोक ब्रुस्केता उच्चार करतात. अमेरिकेत ब्रुशेता/ब्रुशेटा असे उच्चारही रूढ आहेत.
स्रोत : वर डार्क मॅटर यांनी दिलेले विकीपान

इंग्रजीमध्ये अन्यभाषेतून आलेले शब्द कधी मूळ भाषेतल्यासारखे, कधी अर्धवट आंग्लावून, तर कधी पुरते आंग्लावून उच्चारायच्या लकबी दिसतात.

चर्चेला पूर्णविराम

धनंजय वगळता इतरांनी स्लाईसचा आकार, ब्रेडचा प्रकार, लाईटवेट-हेवीवेट वगैरे मुद्दे काढून लेखिकेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. लेखिकेने मूळ लेखात स्लाईसचे विशिष्ट गुणधर्म सांगितलेले नाहीत. जे चूक आहे त्याला चूक म्हणण्यात चुकीचे काय आहे हे मला समजत नाही.

लेखिकेचा ब्लॉगही पाहिला. एकच लेख वाचण्याचे धैर्य केले. सोया प्रॉडक्टच्या अतिरेकाबाबत लेखिकेने केवळ फ्याटचा उल्लेख केला आहे. सोया प्रॉडक्टच्या अतिरेकाने पुरूषांमध्ये स्त्री-हार्मोनची वाढ होऊ शकते हा महत्त्वाचा धोका कोणत्याही डाएटिशिअनला माहीत असणे आवश्यक आहे असे मला वाटते.

कसं काय पूर्णविराम ?

लेखिकेने मूळ लेखात स्लाईसचे विशिष्ट गुणधर्म सांगितलेले नाहीत. जे चूक आहे त्याला चूक म्हणण्यात चुकीचे काय आहे हे मला समजत नाही.

नै पण तुम्ही ' सामना आणि संध्यानंद' या दैनिकांच्या दर्जामध्ये काहीही फरक नाही हे जे म्हणालात ते मला जास्त चूक वाटत आहे. दै. सामनाच्या मुख्य पानावरील बातमी उदाहरणार्थ अशी असते ''मुस्लिम मतांसाठीच कॉंगेसने अफझलची फाशी लांबवली'' आणि दै. संध्यानंदबद्दल काही प्रतिक्रिया इथे पाहा. त्यातल्या योगप्रभूची प्रतिक्रिया उत्तम आहे. असो, खूप फरक आहे राव या दोन दैनिकात. काय म्हणता ?

-दिलीप बिरुटे

उपरोध

श्री सदस्य यांना 'उपरोधिक लेखन' म्हणजे काय ते ज्ञात नाही असे दिसते. त्यामुळे त्यांना इतर प्रतिसाद देणारे लेखिकेला पाठीशी घालत आहेत असे भासणे स्वाभाविकच आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

बृस्केता टोस्टबद्दल उत्तर/खुलासा

अमिताताईंनी येथे बृस्केता टोस्टबद्दल उत्तर/खुलासा केल्याचे वाचले. सदस्य यांनी ज्याप्रमाणे मिपावर जाऊन किंवा त्यांच्या ब्लॉगवर जाऊन त्यांचा निषेध नोंदवला नाही त्याच धर्तीवर अमिताताईंनी उपक्रमावर न येता मिपावरच खुलासा देणे अपेक्षित होते.

वेगळ्या शब्दात आम्ही याला "आपापल्या पॅवेलियनमध्ये सेंच्युरी ठोकणे" म्हणतो.

बाकी चालू द्या. :-)

का?

सदस्य यांनी सामनाकडे तक्रार करण्याची अपेक्षा उचित ठरू शकली असती. उपक्रमवर टीका करणे हे मिसळपाववर किंवा लेखिकेच्या ब्लॉगवर जाऊन टीका करण्यापेक्षा अधिक वाईट का ठरावे?
लेखिकेचा आयडी मिपावर आहे हे सदस्य यांना माहिती नसण्याची (त्यांना ही माहिती येथे या धाग्यातच मिळाली असण्याची) शक्यता आहे, त्यांना मिसळपाववर प्रवेश नसण्याचीसुद्धा शक्यता आहे.

बॅडमिंटन

खरेतर मला उपक्रम आणि मिपा यांच्यामध्ये एक अदृष्य नेट (बॅडमिंटनप्रमाणे) असावे का काय असे वाटू लागले आहे :)
एकजण इकडून फूल टोलवतो, दुसरा तिकडून फटका मारतो. :)

अजून एका स्पष्टीकरणासाठी -मी वर दिलेला प्रतिसाद हा उपरोधिक नव्हता. २०० कॅ. मध्ये बसवता येईल का याचा खरेच विचार मी केला. थोडी अडचण झाली तरी बसवता येईल असे वाटले. विशेषतः भारतातील ब्रेडच्या स्लाईसचा साईझ अलिकडेच (परत) पाहिल्यामुळे मला हे सहज शक्य आहे असे वाटले. अमिता यांनीही बहुदा हेच लिहीले आहे.

:)

एकजण इकडून फूल टोलवतो

गर्ली रूपक.

२०० कॅ. मध्ये बसवता येईल का याचा खरेच विचार मी केला. थोडी अडचण झाली तरी बसवता येईल असे वाटले. विशेषतः भारतातील ब्रेडच्या स्लाईसचा साईझ अलिकडेच (परत) पाहिल्यामुळे मला हे सहज शक्य आहे असे वाटले.

त्यांनी चार टोमॅटोच्या ४० कॅलरी मोजल्या आहेत (सामान्य आकाराचे चार टोमॅटो वापरले तर ~ ६० कॅलरी मिळतील पण तो मुद्दा सोडून देऊ). त्यातून २-३ ग्रॅम तंतुमय पदार्थ मिळतील. त्यांनी त्याचा उल्लेख 'भरपूर फायबर' असा केला आहे.

गर्ली?!

बरं. पण मी "मॅनली" कसे लिहू?
आणि हो, बॅडमिंटन पुरुषही खेळतात ना?

खुलासा

तुम्ही स्वतः तसे लिहावे अशी अपेक्षा नाहीच. परंतु, उपक्रम-मिपा प्रतिसादांना 'बॅडमिंटन खेळणे' संबोधू नका अशी विनंती आहे.

अरेरे

अशा नम्र विनंत्या करून लोक सहजी कोणाचे ऐकायला लागले तर कसे व्हायचे उपक्रमाचे आणि मिसळपावाचे?

बरे, पण ऐकते. बॅडमिंटनची उपमा नाही देणार.

(बाकी खरडीमधून!).

हा हा

>>>सदस्य यांनी सामनाकडे तक्रार करण्याची अपेक्षा उचित ठरू शकली असती.
सहमत आहे. :)
>>>उपक्रमवर टीका करणे हे मिसळपाववर किंवा लेखिकेच्या ब्लॉगवर जाऊन टीका करण्यापेक्षा अधिक वाईट का ठरावे ?
सहमत आहे. संस्थळच नव्हे तर कोणत्याही टीकात्मक लेखनासाठी उपक्रमाचा वापर (आता हा वापर एकतर्फीच होतो असे कोणी म्हणू नये)
होत असेल तर एक वाचक म्हणून मला त्यात (हल्ली तरी) काही वावगे वाटत नाही.

-दिलीप बिरुटे

त्याचे असे आहे ;-)

सदस्य यांनी सामनाकडे तक्रार करण्याची अपेक्षा उचित ठरू शकली असती.

'अशा खोट्या माहितीचा सर्वांनी निषेध करायला हवा असे मला वाटते' असे सदस्य यांनी म्हटले आहे. तो निषेध त्यांनी सामनाकडे किंवा त्या लेखिकेकडे करणे आवश्यक आहे. जाहीर बातमीबद्दल उपक्रमावर लेख टाकण्यात काहीच गैर नाही परंतु सदस्य यांना मार्ग दाखवला असतानाही येथील सदस्यांनी या "उपक्रमात" मदत केली नाही असा सूर काढला.

उपक्रमवर टीका करणे हे मिसळपाववर किंवा लेखिकेच्या ब्लॉगवर जाऊन टीका करण्यापेक्षा अधिक वाईट का ठरावे?

उपक्रमावर टीका करण्यात गैर काहीच नाही. लेखिकेच्या ब्लॉगवर फोन नंबरही आहे. सदस्य यांनी निषेध करण्यासाठी कोणती पावले उचलली हे जाणून घ्यायला आवडेल.

लेखिकेचा आयडी मिपावर आहे हे सदस्य यांना माहिती नसण्याची (त्यांना ही माहिती येथे या धाग्यातच मिळाली असण्याची) शक्यता आहे, त्यांना मिसळपाववर प्रवेश नसण्याचीसुद्धा शक्यता आहे.

लेखिकेची आयडी आणि ब्लॉगचा पत्ता सगळ्यात पहिल्या प्रतिसादातच दिला आहे. त्यातून सदस्य यांनी पुढचे पाऊल उचलणे आवश्यक होते. "सदस्य" नावाची कोणतीही आयडी प्रतिबंधित असल्याची घोषणा ऐकली तर नाही बॉ! पण खात्रीलायक सांगता येत नाही. ;-)

बाकी राहिले आपल्या पॅवेलियनमध्ये सेंच्युरी ठोकण्याचे - त्याचे श्रेय सदस्य आणि अमिता गद्रे यांना मी सारखेच देईन. कसें? ;-)

बायदवे, अमिता गद्र्यांच्या ब्लॉगवर त्यांच्या फोन नंबर आणि इमेल आहे. सदस्य यांना त्यांचा ब्लॉग पाहणेही शक्य नाही असा सूर त्यांनी नक्को काढायला तेव्हा तो इथे देते. सदस्य यांनी काँटॅक्ट केला की उपक्रमींना अवश्य कळवावे. तेव्हाच चर्चेची खरी सांगता होईल.

फोन नं.: + 91 97301 11567 .

इमेल: amitagadre@gmail.com

ठीक

उपक्रमावर टीका करण्यात गैर काहीच नाही.

धन्यवाद.

"सदस्य" नावाची कोणतीही आयडी प्रतिबंधित असल्याची घोषणा ऐकली तर नाही बॉ! पण खात्रीलायक सांगता येत नाही. ;-)

"खात्रीलायक सांगता येत नाही" हेच खरे, कारण तेथून टोपणनाव, कोलबेर, इ. आयडी प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत परंतु त्याविषयी काहीही घोषणा सापडलेली नाही.
सदस्य यांनी उपक्रमवर काही काळ प्रेषक हा आयडी घेतला होता आणि प्रेषक हा आयडीसुद्धा मिसळपाववर (घोषणेशिवायच) प्रतिबंधित आहे.

अनधिकृत

"खात्रीलायक सांगता येत नाही" हेच खरे, कारण तेथून टोपणनाव, कोलबेर, इ. आयडी प्रतिबंधित करण्यात आलेले आहेत परंतु त्याविषयी काहीही घोषणा सापडलेली नाही.

अधिकृत घोषणा नसली तरी अनधिकृतरित्या तर माहित असतेच लोकांना. हेच बघा ना, कोलबेर आयडी गेला तेव्हा तुमचा (नेटावर) जन्मही झाला नव्हता ;-) पण तुम्हाला पक्की माहिती आहे. टोपणनाव आणि प्रेषकबद्दलही माहित आहेच. तसेच सदस्यबद्दलही अनधिकृतरित्या माहित होण्याची शक्यता होती.

तेव्हा खात्रीलायक सांगता आले नाही कारण सदस्य नावाचा आयडी मिपावर आहे आणि शाबूतही आहे पण ते हेच सदस्य असे कसे म्हणणार? तसेही जर मनापासून निषेध करायचा असेल तर वेगळी आयडी घेऊनही करता येईल आणि ब्लॉगवर जाऊन करण्यास तर मनाई नाहीच.

:)

सदस्य नावाचा आयडी मिपावर आहे आणि शाबूतही आहे

'आयडी शाबूत आहे' म्हणजे तुम्हाला त्याचे खाते दिसले की संपादकीय अधिकारांमुळे अशीही खात्री आहे की त्याला लॉगिन अनुमती आहे? (टोपणनाव या आयडीचे खाते शाबूत आहे परंतु लॉगिन अनुमती नाही.)
एकूणच, त्यांचा मिपावरील खुलासा म्हणजे 'पडलो तरी बटर-साईड-अप' सारवासारवी आहे.

ढल गया दिन, हो गई शाम

'आयडी शाबूत आहे' म्हणजे तुम्हाला त्याचे खाते दिसले की संपादकीय अधिकारांमुळे अशीही खात्री आहे की त्याला लॉगिन अनुमती आहे?

असे प्रश्न विचारून गैरसमज पसरवू नका. ;-) वरील तपासणी कोणीही सामान्य सदस्य करू शकतो. आयडी शाबूत असेल तर

प्रवेश प्रतिबंधीत
तुम्हाला या पानावर पोहोचण्याची मुभा नाही

असा संदेश दिसत नाही. आयडीचा कार्यकाळ दिसतो. वरील संदेश मी टोपणनाव यांचा शोध घेतला असता दिसला. म्हणजेच टोना ही आयडी शाबूत नाही. :-)

एकूणच, त्यांचा मिपावरील खुलासा म्हणजे 'पडलो तरी बटर-साईड-अप' सारवासारवी आहे.

तो भाग वेगळा. माझे त्याच्याबद्दल काहीच म्हणणे नाही पण आता त्यांनी तिथे खुलासा केला मग आपण इथे आक्षेप घ्यायचे? आपण जितेंद्र का लीना चंदावरकर? हा प्रश्न आहे. :-) ह. घ्या.

धन्यवाद

त्याने दिलेल्या प्रतिसादांचा लेखक ऍनॉनिमस/नॉट वेरिफाईड असा उल्लेख न दिसता 'टोपणनाव' हाच लेखक दिसला त्यावरून मी अंदाज केला होता. माहितीबद्दल आभार.

चविष्ट पाककृतीचे एवढे कॅलरीमधले धिंडवडे

आर्र काय हे. कुणाच्या चविष्ट पाककृतीचे एवढे कॅलरीमधले धिंडवडे कधी बघीतले नाही हो. बाकी ब्रुस्केता टोस्ट मध्ये असणार्या कॅलरींशी मला काही देणे घेणे नाही.
आपलं काम एकच. फक्त दोन्ही हातांनी ओरपा आणि तोंडाचा तोबरा भरा.. :)

- पिंगू

असहमत

हा पदार्थ लो कॅल., लो सोडियम, लो फॅट पण आहे. आता अजून किती निमित्तं हवीयेत हे करून बघायला? हे घ्या- अशा ४ टोस्टमधून आपल्याला फक्त २०० कॅलरी, ५ ग्रॅम फॅट आणि साधारण ५ ग्रॅम प्रोटीन मिळतील.

ही 'माहिती' का दिली?

वजन व कॅलरीज्

'सामना' या सुमार दैनिकातील 'फुलोरा' या पुरवणीतील एक लेख वाचनात आला. लेखिकेने स्वतःला डाएट कन्सल्टंट म्हणवून घेतले आहे.

लेखाचा दुवाः http://www.saamana.com/2011/April/02/Link/FULORA13.HTM

लेखिकेने या लेखामध्ये "साधारण ५००० कॅलोरीस खाल्ल्यावर एक किलो वजन वाढतं" असे म्हटले आहे. हे धादांत खोटे आहे. साधारण ३५०० कॅलरीज् खाल्ल्यावर एक पौंडाने वजन वाढते. म्हणजेत १ किलो वजन वाढण्यासाठी साधारणतः ७७०० कॅलरीज् अतिरिक्त खाणे आवश्यक आहे.

अशा खोट्या माहितीचा सर्वांनी निषेध करायला हवा असे मला वाटते.

निषेध कशासाठी?

सामनासारखे दैनिक सदस्य नियमितपणे वाचतात होय.

असो. तुम्ही माहिती चुकीची आहे एवढे जरी सांगितले असते तरी चालले असते. आणि थेट अमिता गद्रे-केळकर ह्यांनाच का नाही सांगितले? की सांगितले आहे? ह्या आहारतज्ज्ञांशी तुमचा कॅलरिफिक स्नेह दिसतो. आता तिकडे एक लेख येईल बहुधा. पण ह्यात निषेध करण्यासारखे काय आहे कळत नाही. आणि तुमचा स्रोतही द्यावा ही विनंती.

लेखात काही युक्तीच्या चार चांगल्या गोष्टीही सांगितल्या आहेत. निषेधासोबत त्याचेही कौतुक करा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

निषेध

चुकीची माहिती ठोकून देण्याच्या प्रवृत्तीचा निषेध केला आहे. लेखिकेशी माझा वैयक्तिक स्नेह-द्वेष नाही. व्यक्तीपेक्षा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी हा प्रस्ताव टाकला आहे.

माझा स्रोतः

http://www.caloriesperhour.com/tutorial_pound.php

तपासा .

हा व्हालीड नाही हो. म्हणजे चांगला स्रोत वाटत नाही.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

का?

का?

 
^ वर