हिवाळ्यात घरांची काळजी कशी घ्यावी?

सदस्यांच्या आग्रहानिमित्त गेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५ या लेखातील ही अवांतर चर्चा येथे स्थानांतरित केली आहे याची कृपया नोंद घ्यावी.

अमेरिकेत, निदान मोठ्या घरां*मधेतरी प्रत्येक खोलीत एयर कंडीशनरचे कंट्रोल्स असतात का? साधारणपणे दिवसभर बेडरूम्स आणि रात्री स्वयंपाकघर आणि दिवाणखाना या खोल्या रिकाम्या असतानाही तिथलं तापमानसुद्धा नियंत्रित करावं लागतं. इंग्लंडमधली काही घरं पाहिली तिथे प्रत्येक खोलीत हीटींग सुरू-बंद करण्याची सोय होती असं आढळलं.

*२ किंवा जास्त बेडरूम्स असणारी घरं, अपार्टमेंट्स, इ.

Comments

कित्येक घरांत वेगळे नियंत्रण असते

मी बघितलेल्या कित्येक घरांत वेगळे नियंत्रण असते. प्रत्येक खोलीला नसले, तर दोन-तीन खोल्यांच्या एककांसाठी, किंवा अनेक मजल्यांचे सिंगल-फॅमिली घर असेल, तर प्रत्येक मजल्यासाठी वेगळे.

मी अतिशय काटकसरी (किंवा कंजूष) व्यक्ती असल्यामुळे एक-बेडरूमच्या फ्लॅटमध्येसुद्धा "नियंत्रण" करीत असे. प्रत्येक खोलीत गरम/थंड हवेच्या नळांची (डक्ट् ची) विवरे असत, त्यांना झापड-दारे असतात. दिवसाच्या वेळी मी झोपायच्या खोलीतला हवेचा झोत बंद करत असे. हा चिक्कूपणाचा (किंवा पर्यावरणवादाचा) थोडा अतिरेक होत होता - वेगवेगळ्या खोल्यांत तापमानात फरक राखता येतो, पण थर्मोस्टॅट नसल्यामुळे हा प्रकार अतिशय ढोबळ असतो.

चिक्कूपणा :-)

मी अतिशय काटकसरी (किंवा कंजूष) व्यक्ती असल्यामुळे एक-बेडरूमच्या फ्लॅटमध्येसुद्धा "नियंत्रण" करीत असे. प्रत्येक खोलीत गरम/थंड हवेच्या नळांची (डक्ट् ची) विवरे असत, त्यांना झापड-दारे असतात. दिवसाच्या वेळी मी झोपायच्या खोलीतला हवेचा झोत बंद करत असे.

असा कंजूषपणा आम्हीही करतो पण दर दिवशी नाही. घरातील काही खोल्या आम्ही वापरत नाही. तिथली झापडे पूर्णतः उघडत नाही. तळघराचेही असेच. बाथरूमचेही असेच. (बाथरूमात गरम पाण्याने उबदारपणा लगेच येतो.) पाहुणे वगैरे असतील तर उघडझाप करायची.

तसेही उत्तर आणि मिडवेस्ट अमेरिकेत एसीची गरज खूप नसते. एकतर आमच्याकडे भरपूर वारा असतो. वर्षातले १५-२० दिवस एसी लावला तरी पुरेसे असते. इथे लोकांना जरा देखील उन्हाळा सहन होत नाही त्यामुळे एसी लागतो इतकेच. अन्यथा, पंख्यांनी काम चालण्यासारखे असते.

ऑक्युपन्सी सेन्सर्स

असा कंजूषपणा आम्हीही करतो पण दर दिवशी नाही. घरातील काही खोल्या आम्ही वापरत नाही. तिथली झापडे पूर्णतः उघडत नाही.

आता त्या संदर्भात ऑक्युपन्सी/मोशन सेन्सर्स असलेले कंट्रोलर्सपण येतात. जसे दिवे आपोआप चालू अथवा बंद होतात. तसेच एखाद्या खोलीतले तापमान तिथे माणसे आहेत यावर कमी-जास्त होऊ शकते. फक्त ते प्रॉडक्ट्स अजून सहज उपलब्ध नाहीत आणि त्यासाठी अजून एचव्हीएसीचे काम काढावे लागू शकते. म्हणजे सुरवातीला अधिक खर्च करायला लागू शकतो. :(

बचत

तिथली झापडे पूर्णतः उघडत नाही. तळघराचेही असेच.

तुमच्या तळघरातही झापडे आहेत?

आम्ही तर दिवसा घरी नसताना आक्ख्या घराचेच हिटिंग बंद करुन ठेवतो. त्याने भरपूर बचत होते (एखाद्या खोलीतली झापडे बंद केल्याने फारशी बचत होत नाही) असे दिसून आले.

असे करू नका

तुमच्या तळघरातही झापडे आहेत?

हो. तिथेही एसी आणि हिटर लागतोच ना. :-)

आम्ही तर दिवसा घरी नसताना आक्ख्या घराचेच हिटिंग बंद करुन ठेवतो. त्याने भरपूर बचत होते (एखाद्या खोलीतली झापडे बंद केल्याने फारशी बचत होत नाही) असे दिसून आले.

माझ्यामते असे करू नये. इतरांना याबाबत अधिक मुद्दे माहित असतील त्यांनी सुधारून द्यावे पण घरातले तापमान नियंत्रित राहणे महत्त्वाचे असते. तसे केले नाही आणि थंडीत घरातले तापमान खूप खाली उतरले तर भिंती (ड्राय वॉल्स) आणि लाकडी जमीन यांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. लाकूड थंडीत आकुंचन पावते आणि उन्हाळ्यात प्रसरण पावते. तापमान कमी ठेवले तर लाकडी प्लँक्सना भेगा पडू शकतात. हेच भिंतींसाठी. अगदी, भारतवारीला गेलात तरी तापमान सुरू ठेवा. पूर्ण बंद करू नका. तसेच, घरात जर झाडे असतील तर त्यांनाही एक विशिष्ट तापमान लागते. हिटर बंद केला तर घर थंड होते. ते पुन्हा संध्याकाळी हिटर सुरू केला तर विशिष्ट तापमानापर्यंत पोहोचण्यास वीज/ शक्ती अधिक वापरली जात असावी.

मर्यादीत प्रमाणातच करतो

हो. तिथेही एसी आणि हिटर लागतोच ना. :-)

तळघर हे जमिनीच्याखाली असल्याने तिथे नैसर्गिकरीत्या थंडीत उब आणि उन्हाळ्यात गार तापमान राखले जाते त्यामूळे बहुतेक घरांमधे तळघराला थंड/गरम हवेचा पुरवठा केलेला नसतो. (तुमचे बहुदा फिनिश्ड बेसमेंट असावे, त्यात डक्ट आहे का?)

माझ्यामते असे करू नये.

हे फक्त काही तासांसाठी केले जाते, (साधारण् ८ तास) तितक्या वेळेत घराचे तापमान साधारण ५५-६० फॅरनहाईट पर्यंत उतरते कारण आम्ही घरी असताना थोडे जास्त ठेवतो (थंडीची सवय नाही) आणि घराचे इन्सुलेशन सुदैवाने खूप चांगले आहे. सुट्टीला वगैरे बाहेर जातो तेव्हा थर्मोस्टॅट ६० वर ठेवून जातो.

तसे केले नाही आणि थंडीत घरातले तापमान खूप खाली उतरले तर भिंती (ड्राय वॉल्स) आणि लाकडी जमीन यांना हानी पोहोचण्याची शक्यता असते.

बरोबर. आणि त्याहीपेक्षा पाण्याच्या पाईप्स वगैरे ना धोका संभवतो. तापमान शून्याच्या खाली बराच वेळ गेले तर ह्या पाईप्स फुटू शकतात आणि निव्वळ प्लंबींगचाच खर्च सगळी बचत सहज वाय घालवू शकतो :)

चांगला विषय

चांगला विषय आहे, मला चर्चेत रस आहे.

(मागे अनेक वर्षांपूर्वी हिवाळ्यात असे केले होते, आणि भिंती बर्फाळ गार झाल्या होत्या. "बर्फाळ" ही अतिशयोक्ती आहे, नळ थिजले नाहीत. पण तरी खूपच गार. त्यानंतर भट्टी काही तास अव्याहत चालू होती. नाहीतर थोडा वेळ चालून बहुतेक वेळ बंद असते. भिंतींसकट घर कमालीचे थंड होऊ दिले तर ऊर्जा वाचते का?)

तुमच्या उपयोगाचा नाही

मागे अनेक वर्षांपूर्वी हिवाळ्यात असे केले होते, आणि भिंती बर्फाळ गार झाल्या होत्या.

मग हा तुमच्या उपयोगाचा नाही. आमच्याइथे तापमान ५५च्या खाली गेलेले मी पाहिलेले नाही (घराचे इन्सुलेशन सुदैवाने खरंच चांगले आहे), म्हणून सरळ हिटींग बंद करुन कामाला जातो. तुमच्या केस मधे थर्मोस्टॅटचे तापमान ५५वर आणून घरी आल्यावर पुन्हा हवे तितके वाढवणे हा उत्तम उपाय वाटतो. (किंवा प्रोग्रॅमेबल थर्मोसटॅटचा पर्यायही चांगला आहे, साधारणा $५ ० पर्यंत किंमतीत चांगले मिळतात)

पाइप्स

तळघर हे जमिनीच्याखाली असल्याने तिथे नैसर्गिकरीत्या थंडीत उब आणि उन्हाळ्यात गार तापमान राखले जाते त्यामूळे बहुतेक घरांमधे तळघराला थंड/गरम हवेचा पुरवठा केलेला नसतो. (तुमचे बहुदा फिनिश्ड बेसमेंट असावे, त्यात डक्ट आहे का?)

हो डक्ट्स आहेत. पहिल्या मजल्यापेक्षा १-२ कमी आहेत आणि सध्या बंद करून ठेवलेले आहेत.

हे फक्त काही तासांसाठी केले जाते, (साधारण् ८ तास) तितक्या वेळेत घराचे तापमान साधारण ५५-६० फॅरनहाईट पर्यंत उतरते कारण आम्ही घरी असताना थोडे जास्त ठेवतो (थंडीची सवय नाही) आणि घराचे इन्सुलेशन सुदैवाने खूप चांगले आहे. सुट्टीला वगैरे बाहेर जातो तेव्हा थर्मोस्टॅट ६० वर ठेवून जातो.

मला वाटतं की जेव्हा बाहेर तापमान १-९ डी. मध्ये असते तेव्हा ते नक्कीच ५५ च्या खाली उतरत असेल. घरातले तापमान बाहेर असताना ५८-६० च्या आसपास ठेवणे बरे असावे. (मी अगदी तक्ते तपासलेले नाहीत पण तपासता येतील.) रात्री झोपताना तापमान ६७-६९ पर्यंत राखता येईल आणि इतरवेळेस ७०-७२.

जेव्हा हिटर बंद केल्याने तापमान खाली उतरते तेव्हा ते पुन्हा ७०-७२ पर्यंत येण्यासाठी हिटर खूप चालतो. (धनंजयनी म्हटल्याप्रमाणे)

त्याहीपेक्षा पाण्याच्या पाईप्स वगैरे ना धोका संभवतो. तापमान शून्याच्या खाली बराच वेळ गेले तर ह्या पाईप्स फुटू शकतात आणि निव्वळ प्लंबींगचाच खर्च सगळी बचत सहज वाय घालवू शकतो :)

हो हे खरे आहे आणि यात मलाही इंटरेस्ट आहे. पीवीसी पाइपही फुटतात का? कुठले पाइप चांगले? कॉपर की पीवीसी?

उलट

रात्री झोपताना तापमान ६७-६९ पर्यंत राखता येईल आणि इतरवेळेस ७०-७२

उलट करावे, दिवसा ७०-७१ रात्री ६५-६७(झेपेल तसे). झोपताना आपण नाहीतरी उबदार पांघरुणं घेउनच् झोपतो. त्यामुळे पांघरुणातले तापमान घरातल्या तापमानापेक्षा अधिकच असते.

-Nile

तेच म्हटले

उलट करावे, दिवसा ७०-७१ रात्री ६५-६७(झेपेल तसे). झोपताना आपण नाहीतरी उबदार पांघरुणं घेउनच् झोपतो. त्यामुळे पांघरुणातले तापमान घरातल्या तापमानापेक्षा अधिकच असते.

निळूभाऊ अहो तेच म्हटले आहे. :-) रात्री झोपताना तापमान ६७-६९ आणि इतरवेळेस (म्हणजे दिवसा) ७०-७२ :-)

स्वारी!

अरेच्चा. स्वारी हं! कन्फुजन झाले. :)

-Nile

उलट

माझा अनुभव असा की दिवसभर सतत काहीना काही हालचाली होत असल्यामुळे थंडी कमी वाजते. रात्री पांघरुणे घेऊनही थंडी जास्त वाजते. तेव्हा आम्ही दिवसा ६५ आणि रात्री ७०-७२ असे तापमान ठेवतो.

...

मी सुद्धा एक् चिक्कु माणुस असल्याने डक्टवरती पुष्कळ कंट्रोल करतो.

कीचनमध्ये फक्त स्वयंपाक करतानाच मुख्यत्वे वापर असल्याने कीचनचे डक्ट बंदच ठेवतो. बेडरुम/हॉलच्या वापरानुसार त्याचे डक्ट उघडे बंद ठेवतो. दुपारनंतर सहसा बाथरुमचे डक्ट बंद ठेवतो. (माझ्या अश्या वापरामुळे वीजेचे बील् निम्म्याहुन कमी झाले आहे.) (एसी वा हिटर)

हिवाळ्यात (थंड प्रदेशात) हीटर पुर्णबंद करुन् ठेवणे आणि एका तापमानावर सतत चालु ठेवणे यात् कशात् वीज् वाचेल हे ठरवणे कठिण् आहे. भिंती, लाकुड खराब होईल का? ह्यावर् विचार् करायला हवा.

पण् फक्त विजेचे गणित करायचे तर खालील् मुद्दे लक्षात् घ्यायला हवेत.

घरातले तापमान आणि बाहेरचे तापमान यातला फरक.
घराचे इन्सुलेशन.
घराचा आकार इ.

अतिथंड प्रदेशात घराचे इन्सुलेशन चांगले असावेच लागते. दारे खिडक्यांच्या चौकटीतुन् थंड हवेचे झोत् घरात् येत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागते.

कुठलेही पाईप पाण्याच्या बर्फ झाल्याने फुटु शकतात. त्यामुळे जर तापमान शुन्याच्या खाली असेल तर घरातले नळ किंचीत् चालु ठेवुन पाणी वाहते ठेवावे.

-Nile

अर्धा वेळ भट्टी बंद : गणित

थोडे सुलभीकृत केले तर एकमिती ताप-समीकरणाने हे आपण सोडवू शकू काय? शिवाय अनेक आनुषंगिक सुलभीकरणे लागतील. बाहेरील तापमान फारसे बदलत नाही, भिंत एकाच पदार्थाने बनवली आहे, वगैरे.

मला हवा तो ढोबळ हिशोब असा :
जर क्ष% समय (उदाहरणार्थ, दिवसातले ८ तास = ३३.३३...%) भिंतीचा आतील पृष्ठभाग २५ डिग्री सेल्सियस इतका असला, आणि उरलेला वेळ भट्टी बंद आहे, बाहेरील पृष्ठभाग दिवसरात्र ० डिग्री सेल्सियस आहे, भिंतीचे क्षेत्रफळ "य" इतके आहे, भिंत बनवलेल्या पदार्थाची थर्मल कंडक्टिव्हिटी "र" इतकी आहे... तर दिवसभरात ऊर्जा किती खर्च होते?
क्ष चलसंख्या आहे, तर बाकीच्या संख्या अचल आहेत.

ऊर्जाव्यय = f(क्ष)
हे फलन शोधायचे आहे.

"सुलभीकृत" सुद्धा जरा जडच जाते आहे मला.

अधिक सुलभीकरण करता येईल असे वाटते.

(हे गणित प्राथमिक हीट इंजिनच्या तत्वानुसार सोडवता येईल, काही गृहीतके वापरुन)

हीट लिक= क/सेकंद (किंवा तास् वगैरे)
तीतकीच उष्णता प्रतिसेकंद देण्यास लागनारी वीज= क+य/सेकंद

८ तासाकरीता= ८*(क+य्)/सेकंद*३६००

त्याउलट

समजा तापमानातील् फरक=४५
तर लागणारी उर्जा पहिल्या नियमाने मिळेल. त्यात लागणारा वेळ हीटरच्या क्षमतेनुसार काढुन, त्या वेळात् होणार्‍या लीकचे प्रमाण मिळवले की झाले.

एक्स्ट्रीमकेसेसचा विचार केला तर

१. एकदा घराचे तापमान बाहेरच्या तापमानाइतके झाले की त्यापेक्षा कीतीही अधिक वेळ ठेवलेत तर पुन्हा ७० पर्यंत आणण्यास लागण्यार्‍या उष्णतेत काही फरक नाही.
२. एखादा तासच बंद केल्याने तापमानात समजा १० डिग्री फरक झाला तर (कदाचित) एक तास हीटर चालु ठेवण्यापे़शा बंद करुन चालु केलेले स्वस्त असेल्.

मी म्हणेन, अंदाजे, थंड भागात राहणार्‍यांचा अनुभव काय् आहे? नीट इन्सुलेटेड् असेल् तर घर कीती वेळात थंड होईल? हा वेळ जर २-३ तास असेल तर ८ तासांचे गणित कठिण आहे.

-Nile

एनर्जी ऑडीट

मोफत एनर्जी ऑडीट सगळीकडे करून मिळते का ते माहीत नाही, पण बर्‍याच ठिकाणी असते. आमच्या येथे आहे. तुमची वीज अथवा गॅसची जी कुठली कंपनी आहे ते या साठी अनुदान देतात आणि आपल्या खिशातून प्रत्यक्ष पैसे घालवावे लागत नाहीत. प्रत्यक्ष अशा साठी कारण बिलं भरत असताना अत्यल्प किंमत ही आपल्याकडून त्यासाठी (उर्जाबचत शिक्षण/प्रसार वगैरे) घेतलेली असते. आपण ती वापरली नाही तर ते पैसे त्यांच्या खिशात जातात.

तर अशा एनर्जी ऑडीट मधे तुमच्या घरात नक्की कुठे हिट लॉस होत आहे, पाणी कसे वाचवावे, वीज कशी वाचवावी यावर घराचा सर्वे करून माहीती दिली जाते. जर घरात सीएफएल दिवे नसले तर ते मोफत बसवले जातात. स्वैपांकघरातील सिंकमधील नळास एक छोटेसे कनेक्षन लावून पाण्याचा वेग कमी जास्त करण्याची व्यवस्था करतात. थोडक्यात ज्याला "लो हँगिग फ्रूट्स" म्हणतात ते मोफत करतात. मग काही अधिक उपाय सुचवले जातात ज्यात पैसे द्यावे लागतात पण त्याच बरोबर सबसिडी पण भरपूर मिळते. तसेच ऑईल हिटींग असले आणि गॅस उपलब्ध असला तर त्यासाठी देखील सात-आठ वर्षांसाठी इन्टरेस्टफ्री लोन देतात. तसेच हॉट वॉटरसाठीचे सोलार पॅनेल वगैरे लावण्यासाठी....

गेल्या वर्षी तरी काही विशिष्ठ प्रकारच्या एनर्जी एफिशियन्सीसाठी करसवलत होती. त्यात खिडक्या बदलणे, वॉशर-ड्रायर, डिशवॉशर वगैरे अनेक प्रकार होते.

त्याशिवाय होम डेपो अथवा इतर हार्डवेअर स्टोअर मध्ये अनेक प्रकारचे हिटलॉस कमी करायची साधी साधने मिळतात जी खिडक्या/दरवाजे इत्यादी ठिकाणी लावून उर्जाबचत करता येते.

अजून एक म्हणजे एनर्जी स्टार (इपिए) चे खालील चित्र पहा:

करसवलत

त्यात खिडक्या बदलणे, वॉशर-ड्रायर, डिशवॉशर वगैरे अनेक प्रकार होते.

खिडक्या बदलणे ठीक. पण वॉशर-ड्रायर, डिशवॉशर इ. उपकरणे 'एनर्जी क्रेडीट' ह्या करसवलतीखाली येत नाहीत असे वाचले. तुम्ही नेमक्या कोणत्या करसवलतीबाबत बोलत आहात ते कळेल काय?

रीबेट

विकास यांना काही उपकरणांवर ती एनर्जी एफिशियंट असल्याने सवलत मिळाली असे म्हणायचे असावे. गेल्या वर्षी आम्ही यापैकी काही गोष्टी खरेदी केल्या होत्या, ते बहुदा लिहायचे असावे.

बाकी हा विषय इथे हलवला ते छान.

वरच्या बोलण्यात भर घालायची तर घरी दोन झोन आहेत. बेसमेंट फिनिश्ड आहे. बेसमेंट उन्हाळ्यातही सुखद आहे आणि हिवाळ्यातही असा अनुभव आहे. वरच्या मजल्यावर खिडक्याच खिडक्या असल्याने हीट लॉसेस थोडे जास्त होत असावेत. पण घराच्या मुख्य भागातल्या बहुसंख्य खिडक्या नव्या आहेत, त्यामुळे कंट्रोलही आहे. आमच्या एका मित्राच्या घराला मोठे कॅथीड्रल सीलींग आहे. घरात निदान आठ मोठ्या (त्यापैकी काही प्रचंड मोठ्या) खोल्या आहेत. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात प्रचंड एनर्जी लागते असे कळले.

उत्तम

उत्तम चर्चाविषय , प्रतिसाद.

१. आणखी एक प्रकारचा चिक्कूपणा : बेसमेंट् फिनिश्ड् आहे. बेसमेंट् मधे एक मास्टर बेडरूम च्या आकाराची रूम आहे. एक फुल् बाथ. आणि टिव्ही रूम. बेडरूम मधे सुसज्ज बेड्. टिव्ही रूममधे मुलांचे फोल्ड् करण्यायोग्य बेड्. दर उन्हाळ्यात नेमाने राजधानी हलवावी तसे वरच्या लेव्हलवरून खाली झोपायला येता येते. उन्हाळ्याची पूर्ण रात्र एसी बंद असतो. टॉपलेव्हल भयानक तापते. उन्हाळ्यात त्याचा वापर झोपायला होत नाही. उन्हाळ्यात फक्त एंट्री लेव्हलचा एसी चालू असतो. बेसमेंट् नेहमी गारच असते.

२. एनर्जी बिल् : हल्ली युटिलिटी कंपनीज् "फ्लॅट् बिल" नावाचा प्रकार आणत आहेत. सदासर्वकाळ प्रत्येक महिन्याला एकाच रकमेचे बिल. आम्ही सुरवातीला घेतले नाही. पण एका हिवाळ्यात एका महिन्यात पाचशे डॉलर्स् बिल आल्यावर गॅस बिलाकरता हा प्लान घेतला. आता निदान बजेट् चा स्फोट होत नाही. (इलेक्ट्रिसिटीकरता हा प्लान का घ्यावा लागत नाही ते मुद्दा क्र. १ मधे आलेले आहे. )

एनर्जी कन्जम्शन हा विषय अर्थातच बराच मोठा आहे. सध्या खालील विषय माझ्या मनात रुंजी घालत आहेत :

ऑगस्ट् २००८ मधे क्रूड् ऑईल १४७ डॉलर्स् प्रति बॅरल् होते. सध्या बहुदा ४५ च्या आसपास असावे. २० डॉलर्स् प्रतिबॅरल या २००५ च्या भावाबद्दल कुणीही बोलायला तयार नाही. हा भाव परत येईल असे आता कुणालाही वाटत नाही. माझ्यामते ऊर्जेच्या किमतीच्या बाबतीत आपण सगळेच हळुहळू तापत (आणि अधून मधून निवत ) असलेल्या पाण्यात बसलेल्या बेडकाप्रमाणे आहोत. २००८ साली जे घडले ते अखेरचे नव्हते. हे परत होणार.

तेलाचा भाव

ऑगस्ट् २००८ मधे क्रूड् ऑईल १४७ डॉलर्स् प्रति बॅरल् होते. सध्या बहुदा ४५ च्या आसपास असावे. २० डॉलर्स् प्रतिबॅरल या २००५ च्या भावाबद्दल कुणीही बोलायला तयार नाही.

कमोडीटी इंडेक्स नावाचा जुगार जो पर्यंत वॉलस्ट्रीटवर चालू आहे तोपर्यंत कुणी बोलणारही नाही.

याबद्दल

कमोडीटी इंडेक्स नावाचा जुगार जो पर्यंत वॉलस्ट्रीटवर चालू आहे तोपर्यंत कुणी बोलणार ही नाही.
विषयांतराचा धोका पत्करून याबाबत लिहिता आले तर पाहावे. भारतातही कमॉडिटीज् चा जुगार जोरात चालू आहे असे ऐकतो. भारतातल्या लोकाना याबद्दल बोलता येईल.

अजून काही प्रश्न आहेत

(मी स्वतः चर्चाविषय सुरू केला असता तर धाग्याचं नाव वेगळं ठेवलं असतं.)

१. अमेरिकेत जिथे साधारणतः घर थंड करावं लागत नाही अशा भागांमधे डक्ट्स उंचावरच आहेत का? न्यू मेक्सिको, ऍरिझोना वगैरे भागांमधे कशी रचना आहे?
मी टेक्ससमधल्या ज्या दोन अपार्टमेंट्समधे राहिले तिथल्या डक्ट्स छताच्या खूपच जवळ आहेत. माझ्या उंचीच्या (खरंतर बुटक्याच) लोकांना (कॉकेशन्स आणि आफ्रीकन लोकं खूप उंच असतीलही, पण आम्ही सामान्य आशियायी लोकांनी काय करावं?) या डक्ट्ससाठी मुद्दाम घोडे आणून ठेवायचे का? हा खूपच त्रासदायक प्रकार आहे.

२. अमेरिकेत प्लग्जना बटणं का नसतात? (अमेरिकेतच विकत घेतलेला) मोबाईल फोन चार्ज झाला की डिस्प्लेवर येतं 'वीजबचतीसाठी चार्जर प्लगमधून काढून ठेवा'. पण बटण वापरून वीज वाचवणं आणि सोय पहाणं या दोन्ही गोष्टी साध्य होत नाहीत का?

३. घरात जी काही तुटपुंजी बटणं पाहिली त्यावर एकाच वेळी अनेक ठिकाणचे (उदा: डायनिंग, स्वयंपाकघर एकत्र) दिवे लागतात. कदाचित या अपार्टमेंट्स जुन्या असल्यामुळेही असू शकेल. पण तेव्हासुद्धा बटणांच्या बाबतीत एवढी का बचत करत असावेत?

:) चांगले प्रश्न

चांगले प्रश्न अदिती, कारण मला उत्तरे माहिती नाहीत. :)

>आम्ही सामान्य आशियायी लोकांनी काय करावं?

सामान्य आशियायी लोकांनी घोडे आणून ठेवावेत. (आम्ही राहिलो त्या घरांपैकी निदान दोन घरांची फडताळे इतकी उंच राहिली आहेत की वरच्या कप्प्यातील वस्तू काढण्यासाठी घोडे लागतातच)

>अमेरिकेत प्लग्जना बटणं का नसतात?
अमेरिकेत कुठचेही बदल न होणे हे परंपरेशी निगडित असते. या परंपरा सोडणे त्यांना अवघड जाते असा अनुभव आहे. शिवाय एक मला असे वाटते की जुन्या भिंतींच्या आतून जुन्या पद्धतीचे वायरिंग असल्याने ते पटकन बदलणे त्यांना अवघड जात असावे.

>कदाचित या अपार्टमेंट्स जुन्या असल्यामुळेही असू शकेल. पण तेव्हासुद्धा बटणांच्या बाबतीत एवढी का बचत करत असावेत?

माझ्या ओळखीच्या काही लोकांना विचारून बघते.

:-)

तुला उत्तरं मिळण्याची वाट पहाते. पण बटनांच्या बाबतीत काय? तिथे फक्त फ्रंट एण्डलाच बदल करायचा आहे, दोन प्लग्ज एकत्र आहेत त्याजागी दोन प्लग्ज आणि दोन बटणं एकत्र द्यायला कितीसा बदल, खर्च, वेळ लागणार आहे?

आपल्याकडे (भारतात) कधीकधी बटण सुरू-बंद करताना आत छोटीशी ठिणगी दिसते, पण त्यामुळे कोणत्याही फिटींग आणि/किंवा वस्तूचं नुकसान झालेलं मी तरी पाहिलेलं नाही. पण तसं असेल तर आख्खा प्लगच काढता-घालतानाही ठिणगी उडू शकते. त्यामुळे हे कारणही मला पटत नाही.
ब्रिटीश प्लगांची पद्धत मला सगळ्यात जास्त आवडली. मेकॅनिकली ते प्लग्ज खूप स्थिर वाटले आणि प्रत्येक प्लगमधे फ्यूज असतो. त्यामुळे प्लगचा आकार मोठा होतो, पण आख्ख्या घरातले स्विचेस ट्रिप होण्याचे प्रकार, मी तीन वर्ष एका जुनाट घरात राहूनही, पाहिले नाहीत.

आशियायी लोक बॅडमिंटन् खेळतात की! ;-)

सामान्य आशियायी लोकांनी घोडे आणून ठेवावेत.

बॅडमिंटन,रॅकेटबॉल किंवा टेनिस वगैरे खेळत् नाही का तुम्ही? त्याच्या रॅकेटस फार् उपयोगी पडतात. :-)

अमेरिकेत कुठचेही बदल न होणे हे परंपरेशी निगडित असते. या परंपरा सोडणे त्यांना अवघड जाते असा अनुभव आहे.

हे आख्ख्या जगात खरे असावे असे वाटते.

-Nile

रॅकेट :-)

हे बाकी बरोबर! :-)

>>हे आख्ख्या जगात खरे असावे असे वाटते.

:) इथे अमेरिका वि. भारत असे सामने खेळायचे नाहीत. पण मी वर म्हटले आहे ते या अर्थाने की झटकन रोजच्या वापरातील टेक्नॉलॉजी/पद्धती बदलत नाही. उदा. अजूनही अमेरिकेतले प्रमाण हे मुख्यत्वे एफपीएस (यूएस) सीस्टमवर आधारित आहे. हे भारतात एस आय/मेट्रिक होऊन वर्षे लोटली. (अपवाद अर्थात सॉफ्टवेअर इ.चा).

http://ts.nist.gov/WeightsAndMeasures/Metric/4858.cfm
1. Metric usage shall not be required to the extent that such use is impracticRI or is likely to cause significant inefficiencies or loss of markets to United States firms.
2. Heads of departments and agencies shall establish an effective process for a policy-level and program@level review of proposed exceptions to metric usage. Appropriate information about exceptions granted shall be included in the agency annual report along with recommendations for action's to enable future metric usage.

संदर्भ - http://ts.nist.gov/WeightsAndMeasures/Metric/pub814.cfm#president


प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

शंका

घोडे मूळचे आशियातील की युरोपातील?

मूळ?

मूळचे कुठले माहित नाही, पण इकॉनॉमिक्सशी दूरान्वयही नसणारा माणूस अमेरिकन दुकानांत फिरला तरी सांगू शकेल की घोडे शक्यतोवर चिनी बनावटीचे असतील. मी शिडी या अर्थाने घोडा हा शब्द वापरला होता.

काही उत्तरे

१. अमेरिकेत जिथे साधारणतः घर थंड करावं लागत नाही अशा भागांमधे डक्ट्स उंचावरच आहेत का? न्यू मेक्सिको, ऍरिझोना वगैरे भागांमधे कशी रचना आहे?

अपार्टमेंट्समध्ये डक्ट्स सहसा छतावर असतात परंतु स्वतंत्र घरांमध्ये डक्ट्स जमिनीवर असू शकतात. माझे बेसमेंट सोडता सर्वत्र डक्ट्स जमिनीवर आहेत. तशीही मजल्यांची उंची इथे फार नसते. फार फार तर ९ फूट. काठी हातात घेऊन डक्ट्सची झापडे हलवणे शक्य आहे. अर्थात, चित्रा म्हणते त्याप्रमाणे कॅबिनेटच्या वरच्या कप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी घोडा/ शिडी उत्तम.

हा खूपच त्रासदायक प्रकार आहे.

हे वाक्य अमेरिकेत आल्यावर विसरायचे. :-) यापेक्षा बरेच त्रासदायक प्रकार इथे राहायचे असतील तर करावे लागतात.

२. अमेरिकेत प्लग्जना बटणं का नसतात? (अमेरिकेतच विकत घेतलेला) मोबाईल फोन चार्ज झाला की डिस्प्लेवर येतं 'वीजबचतीसाठी चार्जर प्लगमधून काढून ठेवा'. पण बटण वापरून वीज वाचवणं आणि सोय पहाणं या दोन्ही गोष्टी साध्य होत नाहीत का?

इथे मलाच प्रश्न आहे. कुणा जाणकाराने सोडवावा. प्लगला चार्जर लावला पण सेलफोन लावला नसेल तर नेमका किती चार्ज ड्रॉ होतो आणि जो होतो तो बचत वगैरे करण्याइतपत मोठा असतो का?

३. घरात जी काही तुटपुंजी बटणं पाहिली त्यावर एकाच वेळी अनेक ठिकाणचे (उदा: डायनिंग, स्वयंपाकघर एकत्र) दिवे लागतात. कदाचित या अपार्टमेंट्स जुन्या असल्यामुळेही असू शकेल. पण तेव्हासुद्धा बटणांच्या बाबतीत एवढी का बचत करत असावेत?

अपार्टमेंटमध्ये दिलेल्या सोयी या त्या अपार्टमेंट मालकांना सोयीच्या असतात. प्रत्येक ठिकाणी ते पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. वीजेचे बिल भाडेकरू देणार असतो.

अवांतरः थोडीफार उर्जा अनावश्यकरित्या आपणही वाया घालवत असतो. अवांतर प्रतिसादांच्या रांगा आणि भरलेल्या खरडवह्या काही वेगळे सांगत नाहीत.

कॉमनसेन्स?

जिथे एसीचा उपयोग फक्त हीटींगसाठीच होतो तिथे डक्ट्स जमिनीलगत असणं योग्यच आहे. (गरम हवा वर जाते, वरची थंड हवा खाली येते, अभिसरणामुळे संपूर्ण खोली गरम होण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही.)

>> हे वाक्य अमेरिकेत आल्यावर विसरायचे. :-) यापेक्षा बरेच त्रासदायक प्रकार इथे राहायचे असतील तर करावे लागतात. <<
एका परदेशात राहून झाल्यामुळे विकसित जगाकडून फार अपेक्षा ठेवलेल्या नाहीतच. :-)

>> अपार्टमेंटमध्ये दिलेल्या सोयी या त्या अपार्टमेंट मालकांना सोयीच्या असतात. प्रत्येक ठिकाणी ते पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. वीजेचे बिल भाडेकरू देणार असतो. <<
हे मान्य केलं तरीही जिथे आख्खं घर उठवलं तिथे दहा बटणांनी काय मोठासा खर्च होणारे? दहा हजारापेक्षा एक खूपच लहान आहे, त्यामुळे दहा हजार एक ~ दहा हजार, हा कॉमनसेन्स असावा.

>> अवांतरः थोडीफार उर्जा अनावश्यकरित्या आपणही वाया घालवत असतो. अवांतर प्रतिसादांच्या रांगा आणि भरलेल्या खरडवह्या काही वेगळे सांगत नाहीत. <<
उर्जा खर्च करावी नाहीतर अंगावर मेद साठून रहातो, जो त्रासदायक असतो असं डॉक्टर्सच सांगतात. बाकी काही नाही.

हाहा

इलेक्ट्रिशयनचा भरपूर खर्च होतो हे मुख्य कारण. आमच्या घरी खाली बेसमेंटकडे जायला एक जिना आहे तेथे दोन्ही बाजूंना (टू वे) स्विच बसवायचा होता आणि काही ठिकाणी जीएफसीआय आउटलेट बसवायची होती, त्याचा खर्च बराच आला. प्रत्येक आउटलेटची किंमतही बरीच असते. म्हणून अशा सोयी कमीत कमी द्यायच्या याकडे अपार्टमेंट ओनरांचा कल असला तर आश्चर्य नको.

बचत

प्लगला चार्जर लावला पण सेलफोन लावला नसेल तर नेमका किती चार्ज ड्रॉ होतो आणि जो होतो तो बचत वगैरे करण्याइतपत मोठा असतो का?

चार्जर अनप्लग करायला जे सांगितले जाते अनेक उर्जा बचतीतील टप्प्यांमधे आहे. त्यातून एकटेच बघितले तर फार बचत होत असेल असे वाटत नाही. माझ्याकडे कुठेतरी त्याचे $ मधे पण नंबर होता पण आत्ता तो मिळत नाही आहे. मात्र साधारण ५% उर्जा ही आपण जर चार्ज करायला वापरत असलो तर ९५% नुसते अनप्लग न केल्यामुळे वाया जाते.

काहीसे अवांतरः उर्जा बचत ही केवळ तेलवाचवायला अथवा कार्बन एमिशन कमी करायलाच अथवा निव्वळ पैसे वाचवायला करा असे म्हणतात असे समजू नका. विशेष करून उन्हाळ्यात येथे जितका एसी काही काळ वापरला जातो, त्यामुळे एकूण वीजकपातीची पण वेळ येते. अशा वेळेस (पिक अवर्सना) उर्जेचा युनिटमागचा दर खूप केला जातो. तरी देखील उर्जा वापरणे कमी होत नाही. म्हणून आता मोठ्या उद्योगांना अथवा सरकारी इमारतींना जर त्यांनी अशा पिक अवर्सच्या वेळीस वीज कमी वापरली तर रिबेट अथवा ज्याला "रेव्हेन्यू शेअरींग" म्हणता येईल ते केले जाते. त्यात हजारो डॉलर्स मिळू शकतात!

उर्जा वापर

अशा वेळेस (पिक अवर्सना) उर्जेचा युनिटमागचा दर खूप केला जातो.तरी देखील उर्जा वापरणे कमी होत नाही.

दर कमी केला तर लोक जास्तंच वापरतील की. त्यामूळे उर्जा वापरणे कमी व्हावे असे का अपेक्षीत आहे?

हा प्रतिसाद अवांतर तर नाही ना?

'दर खूप केला' म्हणजे 'दर वाढवला' असं मला तरी समजलं.

धन्यवाद

'दर खूप केला' अशी वाक्यरचना माझ्या पाहण्यात नाही. त्यामुळं अनवधानानं 'दर खूप कमी केला' असं वाचलं गेलं. लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.

कुसळ

थोडं कुसळ दाखवते ... "'दर खूप केला' अशी वाक्यरचना माझ्या पाहण्यात नाही." असं नव्हे, "'दर खूप केला' अशी वाक्यरचना माझ्या पाहण्यात नव्हती." असं म्हणा. :-)

कुसळ परत पाठवत आहे

"'दर खूप केला' अशी वाक्यरचना माझ्या पाहण्यात नाही" हेच मला अधिक बरोबर वाटते. ('पाहण्यात नाही' ह्याचा अर्थ सामान्यत: आढळत नाही, किरकोळ अपवाद वगळता असा होतो)

म्हणजे

दर कमी केला तर लोक जास्तंच वापरतील की. त्यामूळे उर्जा वापरणे कमी व्हावे असे का अपेक्षीत आहे?

जरा समजून सांगाल का? नाही समजत. :(

विचित्र आकडे?

>> साधारण ५% उर्जा ही आपण जर चार्ज करायला वापरत असलो तर ९५% नुसते अनप्लग न केल्यामुळे वाया जाते. <<
विश्वास ठेवणं कठीण जातंय. मान्य आहे मोबाईल चार्ज करायला लागणारी ऊर्जा खूपच कमी असते. पण जरी आपण प्लग काढला नाही तरीही सॉकेटपर्यंत इलेक्ट्रीसिटी येणारच ना? मग प्लग सॉकेटात ठेवला काय आणि काढला काय, फरक का/कसा पडतो?

पीक अवर्सचा मुद्दा पटला. मी स्वतः शक्यतोवर गीझर, वॉशिंग मशीन, इस्त्री ही उपकरणं पीक अवर्सच्या बाहेरच चालवते. (अर्थात याने काही फार मोठा फरक पडतो असं नाही याचीही कल्पना आहे.) पुण्यात भारनियमन नगण्य असल्यामुळे ही 'चैन' शक्य आहे.

अडॅप्टरबाबत मुद्दा आहे

अडॅप्टर चालू असताना एक-एक वॉट इतकी अधिक वीज (पावर) वापरतो, असे ऐकलेले आहे.

म्हणजे फोन - दुसरे जे काय डीसीकरंट चार्जिंगचे उपकरण असेल - जोडले नसले, तरी त्यातील एसी करंट वीजमार्ग खंडित होत नाही (ओपन सर्किट नाही).

(प्लग काढला तर वीजमार्ग खंडित होतो. वीज मेनस्विचपासून सॉकेटपर्यंतदेखील वाहत नाही. अर्थात हे तुम्हाला ठाऊकच आहे. "सॉकेटपर्यंत वीज येऊन प्रियकर-प्लगाविना ताटकळत उभी असते" अशी मिष्किल कल्पना मात्र चित्रदर्शी आहे :-D )

ओहमचा नियम.

विश्वास ठेवणं कठीण जातंय. मान्य आहे मोबाईल चार्ज करायला लागणारी ऊर्जा खूपच कमी असते. पण जरी आपण प्लग काढला नाही तरीही सॉकेटपर्यंत इलेक्ट्रीसिटी येणारच ना? मग प्लग सॉकेटात ठेवला काय आणि काढला काय, फरक का/कसा पडतो?

मोबाईल किंवा इतर चार्जर्स हे एसी-डीसी कन्व्हर्टर्स असतात. (ट्रान्सफॉर्मर्स) त्यांचा रेझिस्टंस फाईनाईट असतो. सो ओहमच्या नियमाने करंट काढता येईल,

मात्र प्लग न केल्यास सर्किट ओपन=इन्फाईनाईट रेसिस्टंस=>शुन्य करंट.

-Nile

दुरुस्ती

माझ्या भ्रमणध्वनीच्या भारित्राच्या माहितीत standby power consumption: ≤30 mW असे लिहिलेले आहे.
याविषयी अनेक एकस्वेसुद्धा आहेत आणि भंपक विद्युत बचत कायद्यांमुळे असे तंत्रज्ञान आवश्यकही असावे.
--
मुळात, शुद्ध असे दिष्टकारी संयंत्रसुद्धा ओहमचा नियम पाळणार नाही कारण त्यात द्विविद्युताग्र असते.
शिवाय, हल्ली भ्रमणध्वनीचे भारित्र हे शाळेतील पूर्ण तरंग दिष्टकारी पेक्षा बरेच अधिक असते. जेव्हा भ्रमणध्वनी उर्जा खेचतो तेव्हा रोहित्राचा विद्युतप्रतिरोध (खरे तर विद्युतावरोध) कमी असतो. भ्रमणध्वनीचा संचायक पूर्ण भरला की भ्रमणध्वनीचा विद्युतप्रतिरोध वाढविला जातो. त्यानंतर भ्रमणध्वनी वेगळा केला नाही तरी विजेचा खप कमीच झालेला असतो. भ्रमणध्वनी भारित्रापासून सुटा केला तर विजेचा खप अजूनच कमी (≤30 mW) होतो.

लै भारी मर्‍हाटी

दिष्टकारी , भारित्र,रोहित्र या शब्दांचे सुद्द मर्‍हाटीतले अर्थ माहित नव्हते.
ते या प्रतिसादामुळे कळले. आभार.

पूर्ण तरंग दिष्टकारी = फुल वेव्ह रेक्टीफायर
भारित्र = चार्जर
रोहित्र= ट्रान्स्फॉर्मर

परंतु 'बरेच अधिक' हा शद्बप्रयोग आवडला नाही हे नम्रपणे नमूद करतो. पर्याय :( अधिक जटिल = अधिक गुंतागुंतीचे)

मूळ मुद्दा :
तुमचे म्हणणे खरे आहे. 'भंपक विद्युत बचत कायद्यांमुळे' हे म्हणणे अधिकच मान्य आहे. मोबाईलवरचा एक 'मिस्ड कॉल' यापेक्षा कितीतरी जास्त ऊर्जा खर्च करतो.

शाब्बास

भ्रमणध्वनीचे भारित्र
भ्रमणध्वनीचा संचायक
दिष्टकारी

वा...! अजून येऊ द्या असेच शब्द.

-दिलीप बिरुटे

सवय

वरील सर्व प्रश्नांचे थोड्याफार फरकाने उत्तर आहे: सवय.

"लँड ऑफ प्लेंटी" असे स्वतःला म्हणत म्हणत उधळायची सवय लागली आहे. त्यात कधी काळी उर्जा हा खर्चिक प्रकारच नव्हता. मला आठवते की नव्वदच्या दशकात मी गाडीसाठी गॅसोलीनला $०.८० ते $१.०० प्रती गॅलन इतकेच देयचो. अगदी २००२ पर्यंत गॅसोलीनचे भाव तसेच एकूणच खनिज तेल उत्पादनाचे भाव कमी होते.

अगदी साधे उदाहरण पहा,आपल्याकडे रिक्षा, बाईक्स, मोपेड्स, स्कूटर वाले कधी कधी गाडीवाले पण, लाल सिग्नलपाशी गाड्या बंद करून उभे रहातात. इथे मात्र "anti-idling" चे शिक्षण द्यावे लागते आणि तरी देखील कोणी लक्ष देत नाही. अगदी १९७४ पासून आमच्या राज्यात कायदा आहे की पाच मिनिटाच्या वर गाडी उगाच चालू ठेवली तर $५०० दंड आहे वगैरे... पण तो कायदा इथल्या पोलीसांना पण माहीत नसतो आणि सांगितला तरी हसण्याव्यतिरीक्त त्यांना महत्व वाटत नाही.

तपशीलात फरक?

"लँड ऑफ प्लेंटी" का रिझर्व्ह करन्सी असण्याचा माज(!) ? माझ्या मते रिझर्व्ह करन्सीच.

जुन्या घरांचा विचार करता, वापरकर्त्याला जास्त खर्च होत नाही, ऐशी तिथे पंच्याऐशी खपून जात असेल हे स्पष्टीकरणही पटतं.

>> आपल्याकडे रिक्षा, बाईक्स, मोपेड्स, स्कूटर वाले कधी कधी गाडीवाले पण, लाल सिग्नलपाशी गाड्या बंद करून उभे रहातात. <<
विकास, किती वर्ष झाली तुम्ही पुण्यात सिग्नलला थांबलेला नाहीत? पेट्रोलचे भाव गेल्या तीन महिन्यातच साधारण २०% ने वाढले आहेत, पण बराच वेळ सिग्नलला थांबावं लागलं तरीही अगदी बटण-स्टार्टवाल्या स्कूटी आणि ऍक्टीव्हासुद्धा बंद होताना दिसत नाहीत.

अजून थोडे

"लँड ऑफ प्लेंटी" का रिझर्व्ह करन्सी असण्याचा माज(!) ? माझ्या मते रिझर्व्ह करन्सीच.

अहो सामान्य माणसाला "रिझर्व करन्सी" वगैरे समजत असेल असे वाटत नाही. मात्र "माज" या शब्दाबाबत सहमत. :-)

जुन्या घरांचा विचार करता, वापरकर्त्याला जास्त खर्च होत नाही, ऐशी तिथे पंच्याऐशी खपून जात असेल हे स्पष्टीकरणही पटतं.

बरोबर. त्यात अजून एक गोष्ट: भाड्याच्या घरात आपल्याला काही करायचे स्वातंत्र्य नसते. काही ठिकाणी अगदी भिंतीस खिळे मारताना देखील कुठे मारायचे हे सांगतात, विशेष करून जर घर फारच जुने असले तर तेथे भिंती या हॉर्सहेअर प्लॅस्टरच्या केलेल्या असतात, तेथे. मात्र तो प्रकार न्यू इंग्लंड आणि पूर्व किनार्‍यावर जास्त असावा असे वाटते. तुम्ही म्हणत असलेला भाग हा त्यामानाने नवीन आहे आणि १९५० च्या पुढेमागे ड्रायवॉल वापरायला सुरवात झाली.


पण बराच वेळ सिग्नलला थांबावं लागलं तरीही अगदी बटण-स्टार्टवाल्या स्कूटी आणि ऍक्टीव्हासुद्धा बंद होताना दिसत नाहीत.

कदाचीत तो ही माज अथवा प्रदर्शन (शो ऑफ) असेल! (आम्हाला कसे परवडते!) :-)

माहितीपुस्तक

चारचाकी गाडीच्या माहितीपुस्तकात मायलेज चांगले मिळण्यासाठी इंजिन सारखे चालू-बंद करू नये असे लिहिलेले असते. इंजिन बंद करून चालू केल्यास, स्थिर इंजिनापेक्षा जास्त पेट्रोल खर्च होते का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सापेक्ष

इंजिन बंद करून चालू केल्यास, स्थिर इंजिनापेक्षा जास्त पेट्रोल खर्च होते का?

हे इंजिन बंद करून सुरू करण्यादरम्यानच्या काळावर अवलंबून आहे.
तो काळ जर १-२ मिनिटांपेक्षा जास्त असेल तर इंजिन बंद-चालू करण्यात फायदा आहे. ( इंजिनाच्या बांधणी प्रमाणे हा काळ बदलू शकेल.)
कारण इंजिन सुरू करताना इंजिने (इंजिन सुरू असताना वापरण्यात येणार्‍या इंधन-हवा मिश्रणापेक्षा) अधिक संपृक्त इंधन-हवा मिश्रण वापरतात.
त्यामुळे इंजिन १-२ मिनिटे सुरू राहिले असता खर्च होईल त्यापेक्षा जास्त इंधन सुरू होताना खर्च करते.
इंजिनची धारण क्षमता (क्युबिक कपॅसिटी) जेवढी जास्त तेवढा हा खर्च वाढतो.
(अर्थात् भारतातील कोणत्याही ट्रॅफिक सिग्नलवर/ जॅममध्ये इंच-इंच पुढेपुढे सरकावे लागत असल्याने इंजिन बंद करताच येत नाही.)

एका रेल्वे अभियंत्याकडून असे ऐकले की रेल्वेचे इंजिन सुरू करण्यास जेवढे डिझेल खर्च होते तेवढ्यात एक सात डब्यांची रेल्वे १० किमी अंतर कापते.
त्यामुळे एखाद्या रेल्वे स्थानकावर अर्धा तास थांबून रेल्वे पुढे जाणार असेल तरी तिचे इंजिन बंद करत नाहीत.

 
^ वर