हिवाळ्यात घरांची काळजी कशी घ्यावी?

सदस्यांच्या आग्रहानिमित्त गेल्या शतकातील अमेरिकन घरे - ५ या लेखातील ही अवांतर चर्चा येथे स्थानांतरित केली आहे याची कृपया नोंद घ्यावी.

अमेरिकेत, निदान मोठ्या घरां*मधेतरी प्रत्येक खोलीत एयर कंडीशनरचे कंट्रोल्स असतात का? साधारणपणे दिवसभर बेडरूम्स आणि रात्री स्वयंपाकघर आणि दिवाणखाना या खोल्या रिकाम्या असतानाही तिथलं तापमानसुद्धा नियंत्रित करावं लागतं. इंग्लंडमधली काही घरं पाहिली तिथे प्रत्येक खोलीत हीटींग सुरू-बंद करण्याची सोय होती असं आढळलं.

*२ किंवा जास्त बेडरूम्स असणारी घरं, अपार्टमेंट्स, इ.

Comments

अमेरिकेत प्लग्जना बटणं का नसतात?

अदिती यांना पडलेला हा प्रश्न भारतातून अमेरिकेत जाणार्‍याला प्रत्येकाला प्रथम पडतो. नंतर हे असेच असते म्हणून त्याची सवय होते. माझ्या मते 200 किंवा जी काय वर्षे झाली असतील त्यापूर्वीपासून हे असे स्टॅंडर्ड का वापरात आले याची एकदोन कारणे आहेत.
अमेरिकेत विद्युत पुरवठा 110 व्होल्टस दाबाने केला जातो. यामुळे आपणे जेंव्हा एखादे उपकरण वीज पुरवठा करणार्‍या सॉकेटला जोडतो तेंव्हा ते उपकरण भारतात जेवढा प्रवाह (करंट) खेचील त्याच्या दुपटीहून जास्त खेचते. उदाहरणार्थ 100 वॉटचा दिवा भारतात अर्ध्या ऍम्पीअर पेक्षा कमी प्रवाह खेचतो तर अमेरिकेत तो जवळ जवळ 1 ऍम्पीअर खेचेल. या कारणामुळे सर्व पुरवठा सॉकेट्स व स्विचेस हे जास्त करंट कपॅसिटीचे बसवावे लागतात. कोणत्याही विद्युत पुरवठा स्विचचे डिझाइन करताना तो काय करंट साठी बनवायचा आहे यावर त्याची किंमत अवलंबून राहते. भारतातील 5 ऍम्पीअर कपॅसिटीचे स्विच अमेरिकेत चालणार नाहीत. असा प्रत्येक स्विच 10 ऍम्पीअर चा लागेल. याचप्रमाणे भारतात 15 ऍम्पीअर चे स्विच वापरतात. त्या ऐवजी अमेरिकेत 30 ऍम्पीअरचे लागतील.
हे मोठ्या कपॅसिटीचे स्विचेस किमतीला खूपच महाग पडतात. अमेरिकेत प्रत्येक भिंतीवर सॉकेट्स असतात. इतक्या सॉकेट्सबरोबर स्विच बसवायचे ठरवले तर वायरिंगची कॉस्ट प्रचंड प्रमाणात वाढेल. यासाठी सोपा उपाय म्हणून स्विच बसवत नाहीत. आपण जे उपकरण जोडणार असतो ते बंद करून प्लग काढून घेतल्यास स्पार्किंगसारखी कोणतीच अडचण येत नाही. दिव्यासारख्या ठिकाणी जेथे विद्युतप्रवाह चालू बंद करण्याची आवश्यकता भासते तिथे स्विचेस ठेवलेले असतातच. इंजिनीअरिंग प्रॅक्टीस म्हणून जरी ही पद्धत अयोग्य व धोकादायक असली तरी अमेरिकेत ती वर्षानुवर्षे वापरात आहे. अमेरिकेतील मंडळी अत्यंत रूढीप्रिय आहेत. त्यांना आपल्या कोणत्याही पारंपारिक स्टॅन्डर्ड मधे बदल आवडत नाही हे सत्य आहे. म्हणूनच अमेरिकेत अजूनही पौंड, फूट, मैल अशी परिमाणे वापरली जातात. तसेच हे ही आहे. बाकी त्याला फारसे महत्व नाही.
ज्या देशांच्यात 220 किंवा 240 व्होल्टचा सप्लाय असतो तिथे सगळीकडे स्विचेस बसवणे अनिवार्य ठरते कारण या ठिकाणी विजेचा झटका जास्त धोकादायक असू शकतो.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सांभाळा हो,

अमेरिकेतील मंडळी अत्यंत रूढीप्रिय आहेत. त्यांना आपल्या कोणत्याही पारंपारिक स्टॅन्डर्ड मधे बदल आवडत नाही हे सत्य आहे. म्हणूनच अमेरिकेत अजूनही पौंड, फूट, मैल अशी परिमाणे वापरली जातात. तसेच हे ही आहे. बाकी त्याला फारसे महत्व नाही.

ते नाईल येतील तुम्ही अमेरिकनांना रुढीप्रिय का समजता म्हणून विचारायला :)

बाकी प्रतिसाद अगदी थोडक्यात पण माहितीपूर्ण आहे. वर म्हटल्याप्रमाणे आमच्याकडे जेव्हा इलेक्ट्रिशियन आला तेव्हा त्याने घरात काही नवीन स्विच बसबण्याचे इतके पैसे लावले की थक्क व्हायला झाले.

कमॉडीटी

कमॉडीटी बाजाराबद्दल जे म्हणताय ते बरोबर् आहे. या जुगारी ट्रेडर्सला लगाम घातलाजाईल तो सुदीन. भारतातही हा खेळ नुकताच सुरु झालाय आणि जोरात चाल्लाय. मध्यंतरी सरकारने (इन्फ्लेशनला आवरण्यात अपयश आल्यावर) काही कमॉडीटीज जीवनावश्यक म्हणुन बाजारातुन डीलिस्ट केल्या (गहु, तांदुळ, तुर आणि उडद). पण बाकीचा सट्टा जोरात चाल्लाय. यातसुधा एनर्जी प्रॉडक्ट्स (क्रुड, कोल) मेटल्स आणि बुलियन हे जुगार्र्यांचे खास आवड्ते. शिवाय काहि शेतकी कमॉडीटी काळ्याबाजारासाठी कुप्रसिध्ध आहेतच, (मिरची, मीरे, जीरे, हळद ई.)

आँ

विषय काय? प्रतिसाद काय?

काही उत्तरे

अमेरिकेत जिथे साधारणतः घर थंड करावं लागत नाही अशा भागांमधे डक्ट्स उंचावरच आहेत का? न्यू मेक्सिको, ऍरिझोना वगैरे भागांमधे कशी रचना आहे?

आम्ही राहत असलेल्या घरांच्या बांधणीचा विचार केला तर वरती डक्ट हे बांधकामदृष्ट्या सोयीचे आहे.(खाली स्लॅब, दोन सिमेंटच्या भिंती आणि उरलेल्या ४५ इंची लाकडी भिंती असा थाट असल्याने भिंतींमध्ये डक्ट अवघड. उलट चार चौकोनाचे चार् कोपरे प्रत्येकी एका खोलीत असे बांधकाम केले तर मध्यभागी हीटर बसवुन् डक्टची लांबी कमी होतेच शिवाय त्यासाठी वेगळे असे काम फारसे करावे लागत नाही).

(अर्धा सिव्हील विंजीनीअर.)

अमेरिकेत प्लग्जना बटणं का नसतात? (अमेरिकेतच विकत घेतलेला) मोबाईल फोन चार्ज झाला की डिस्प्लेवर येतं 'वीजबचतीसाठी चार्जर प्लगमधून काढून ठेवा'. पण बटण वापरून वीज वाचवणं आणि सोय पहाणं या दोन्ही गोष्टी साध्य होत नाहीत का?

उगाच खर्च+ स्टँडर्डायजेशनचा प्रॉब्लेम(तर्क)

भारतात ह्या बटनांच्या बोर्डांमुळे(त्यांचे आकार, वायरींग् इ.) मुळे फार प्रॉब्लेम्स होतात.
पुर्वीच्या फॅनचा रेग्युलेटर बदलायची वेळ आली की पुन्हा नवीन रेग्युलेटरच्या फिक्सींग प्लेट प्रमाणे बोर्डावर् भोकं पाडा. बोर्डावर बटने खाचा करुन केलेले असल्याने एखादे बटन खराब झाल्यास तसेच बटन भारतात् मिळणे अवघड असतेच पण हे जर् काही वर्षांनी झाले तर मात्र खाचांचे आकारही बदलावे लागतात. पुन्हा बोर्डाचे वायरींग करणारे आपापले डोके लावुन करत असतात्. अमेरीकेतली कुठली गोष्ट मला आवडली असेल तर ते स्टँडर्ड्स पाळणे("वैविध्याची आवड: असलेल्या महिला मंडळाला ह्याचा त्रास् होत असेल पण् हा खुप चांगला गुण आहे)

ह्याउलट, भिंतीपासुन फार वर न् येणारे सॉकेट्स+ स्टँडर्ड डिझाईन मला खुप आवडते.

(अनेक बटन-बोर्डं आणी घरांचं वायरींग जाळुन बनलेला)अर्धा इलेक्ट्रीकल इंजिनीअर.

घरात जी काही तुटपुंजी बटणं पाहिली त्यावर एकाच वेळी अनेक ठिकाणचे (उदा: डायनिंग, स्वयंपाकघर एकत्र) दिवे लागतात. कदाचित या अपार्टमेंट्स जुन्या असल्यामुळेही असू शकेल. पण तेव्हासुद्धा बटणांच्या बाबतीत एवढी का बचत करत असावेत?

हे सरसकट खरे नाही,घर बांधणार्‍याचा निर्णय असतो, सहज बदलताही येते. अपार्टमेंटमध्ये बर्‍याचदा बाथरुमचा दिवा आणि एक्झॉस्ट फॅन एकाच बटनावर असतात. ही सोयही उत्तम आहे असे माझे मत आहे.

(डिसाईनर).

प्रतिसादांची हुनमानशेपटी पाहुन् मुद्दाम् उत्तर वेगळे दिले आहे.

-Nile

बहुतांशी सहमत

बराचसा प्रतिसाद मान्य.

पण जिथे दोन प्लग्जचं स्टँडर्ड आहे तिथे दोन प्लग+दोन बटणं (जसं युकेत दिसतं) हे स्टँडर्ड बनवणं किती कठीण होतं (आता बदलणं कठीण आहे हे मान्य!)?

हे युकेतलं (मला दिसलेलं) स्टँडर्ड
हे अमेरिकेतलं

अवांतरः घरातच दोघांनाही वायरिंग वगैरेंची पुरेशी माहिती नसल्यामुळे जास्तीची (चीनी बनावटीची, म्हणून स्वस्त आणि मस्त) बटणं टाकायला त्रास होणार नाही, पण सगळ्यांनीच घरात जाऊन बटणं लावत बसावीत हा प्रकार हास्यास्पद वाटतो.

मिळतात

अमेरीकेतही मिळतात पण पापिलवार नाहीत. कारण बहुतेक पन्नास् ठिकाणी सॉकेट्स असणे (कुठेही कधीही वापरता यावे म्हणुन) असेल. बसवायला सोपे हा भागही असावा.

-Nile

कीती उर्जा खर्च होते?

उर्जा बचत करणार्‍यांनी (आणि आमच्या सारख्या चिक्कु लोकांनी) किल अ वॉट् मीटर विकत् आणावे. याने तुम्हाला कीती वीज् खर्च होते ते कळेलच् शिवाय कुठले उपकरण रेटिंगपेक्षा जास्त वापरत असेल् तर् तेही कळेल्.

-Nile

झापड,ढापण्या इ.

अवांतर :झापड किंवा झापडद्वार या शब्दाच्या जागी 'झडप' हा शब्द कसा वाटतो?
माझ्या अल्पमतीप्रमाणे इंग्लिश् 'व्हॉल्व्ह्' साठी 'झडप' शब्द योग्य ठरेल.('झडप घालणे' या वाक्प्रचारात 'झडप' चा अर्थ अर्थात वेगळा आहे.)
'झापड' म्हणजे सर्वसाधारणपणे घोड्यांच्या डोळ्यांना जे बांधले जाते ते; एक प्रकारचे ढापण, ढापण्या,आवरण,ज्यायोगे घोडा फक्त समोरच पाहू शकतो;आजूबाजूला त्याचे लक्ष्य जात नाही. झापड हा शब्द झोप ह्याअर्थी देखील वापरला जातो .
अति अवांतर : हे प्रचलित अर्थ आहेत. शब्दकोशात काय-किती-कोणते दिलेले आहेत ते पाहिलेले नाही.
आणखी : झापड शब्द झोप वरून आला असेल तर 'झोप' सं. स्वप् वरून आलेला असल्यामुळे झापडचेही मूळ तेच (सं. स्वप्) ठरते. 'झडप' चे मूळ काय असावे?

झापड, झडप आणि ढापण

'झापड' म्हणजे सर्वसाधारणपणे घोड्यांच्या डोळ्यांना जे बांधले जाते ते; एक प्रकारचे ढापण, ढापण्या,आवरण,ज्यायोगे घोडा फक्त समोरच पाहू शकतो;आजूबाजूला त्याचे लक्ष्य जात नाही.

बंबय्या हिंदीत "झापड देना" याचा अर्थ कानशिलात वाजवणे असा होतो. बंबय्या मराठीतही "एक झापड देईन" किंवा "झापडीत देईन" असे शब्दप्रयोग ऐकले आहेत.

उघडझाप या शब्दातील झापचा अर्थ झाकणे/ घालणे अशा प्रकारे असतो. तोच झापडचाही.

ढापण्या हा शब्द आमच्या वर्गातील सर्व चष्मीश मुला/ मुलींसाठी वापरण्यात येणारा शब्द होता.

झडप म्हणजे हिंस्त्र प्राण्याची झडप वाटू शकते.

असो. बोली भाषेत झापड, झडप आणि ढापण हे सर्व शब्द मान्य आहेत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

पापण्या

झापड शब्द झोप वरून आला असेल तर

'डोळ्यांवर पापण्या ओढावून येणे' या निरीक्षणामुळे झोपेला झापड म्हणत असावेत. झापडचे मूळ झाकण्याशी संबंधित असावे.
झडप हा शब्द संस्कृतोद्भव वाटत नाही.

सहमत

सहमत.

डोळ्यांवर झापडं आली असं म्हणतात ते यावरुनच.

-Nile

बैल

झापडचे मूळ झाकण्याशी संबंधित असावे.

मला वाटते, रहाट गाडग्याला बैल अथवा रेड्याला बांधून जेंव्हा गोल गोल फिरवतात तेंव्हा त्याच्या डोळ्यांना बाजूने जे बांधतात त्याला झापड म्हणतात. त्यामुळे इतर कुठलेही न दिसता एकाच दिशेचे दिसत तो बैल प्रयत्न न करता, गोलगोल फिरत रहातो.

चांगल्या सुचवण्या

चांगल्या सुचवण्या आणि चर्चा. संदर्भग्रंथ हाताशी नसल्यामुळे व्युत्पत्तीबद्दल काही सांगता येत नाही.

या बाबतीत एखादा शब्द रूढही असावा अशी माझी अपेक्षा आहे. नळावरच्या छिद्रावर उघडझाप करणारे दार हे तर कुठेतरी वापरात असेलच. (माझ्या मनात "उघडझाप" शब्दाशी "झापड"चा संबंध लहानपणापासून लागून आहे. शिवाय "झापड" म्हणजे उघड्या हाताने मारलेली थाप, डोळ्यांना "झापडे" वगैरे शब्द मनात आहेतच.) पण रूढ शब्द असेल, तर तोच वापरणे पसंत आहे.

 
^ वर