ह्या डूप्लिकेट आयडींचं काय कराव?

आंतरजालावरचा एक सदोदित ज्वलंत विषय म्हणजे डू.आयडी. (एकाच सदस्याने काढलेले एकाहून अधिक आयडी). असे डूप्लिकेट आयडी सोशल साइट्सना घातक असतात का? समजा कुणी अश्या डूप्लिकेट आयडीतून आपली खरी ओळख लपवून (तसेही व्हर्चुअल जगात प्रत्येक आयडीला 'खरी' ओळख असणे जरुरी आहे का?) मुद्दाम कुणाला टारगेट करु पाहत असेल तर ते चुकिचे आहे का? ह्याचे उत्तर हो असेल तर ह्यामधे ऑब्जेक्शन नक्की कशाला आहे टारगेट करण्याला? की ओळख लपवणे ह्याला?

मूळात एखाद्याला टारगेट करणे किंवा मुद्दाम त्रास देणे हे बरेच सापेक्ष आहे. जर कुणी खरंच मर्यादा सोडून तसे करत असेल तर त्यासाठी योग्य ती कारवाई करायला संपादक मंडळ असतेच (अधिक गंभीर असेल तर पोलीस खाते, सायबर सेल इ.इ, आहेच) पण ह्याचा एखाद्याने ओळख लपवून ठेवण्याशी किंवा उघड न करण्याशी काय संबंध आहे? सार्वजनिक स्थळावरचे वर्तन कसे असावे ह्याविषयीचे सामान्य सामाजिक नियम सगळीकडेच पाळले जातात. ह्या नियमांमधे, एका व्यक्तिने एकच आयडी उघडावा दोन आयडी उघडू नयेत असाही नियम असणे गरजेचे आहे का?

दुसरा एक मुद्दा म्हणजे आमचे काही मित्र म्हणतात की असे आयडी उघडणारे मग आपल्याच चर्चेत आपणच प्रतिसाद देतात (टीआरपी वाढवतात) वगैरे. माझ्या दृष्टीने ही चांगलीच गोष्ट आहे. संकेतस्थळंवरचा टीआरपी वगैरे फालतू निकष वापरुन गुणात्मक मुल्यांकन करणार्‍या मूर्खांची धूळफेक झाली तर मला त्यात काही गैर वाटत नाही.

उपक्रमींना ह्याविषयी काय वाटते?

Comments

"टारगेट" म्हणजे काय?

समजा कुणी अश्या डूप्लिकेट आयडीतून आपली खरी ओळख लपवून (तसेही व्हर्चुअल जगात प्रत्येक आयडीला 'खरी' ओळख असणे जरुरी आहे का?) मुद्दाम कुणाला टारगेट करु पाहत असेल...

"टारगेट" म्हणजे काय? नेमकी समस्या काय आहे, ते समजून घेण्याबद्दल कुतूहल आहे.
सुचणारे पर्याय
(१) हा प्रतिसाद लिहिणार्‍या मनुष्यव्यक्तीला दुसर्‍याच कोण्या "धनंजय" नावाच्या व्यक्तीला बदनाम करायचे आहे, म्हणून हा प्रतिसाद लिहिणार्‍या मनुष्यव्यक्तीने "धनंजय" हे नाव घेऊन अश्लाघ्य लेखन प्रसिद्ध करणे.
१अ. अश्लाघ्य खरडी/व्यक्तिगत निरोप पाठवणे.
(२) हा प्रतिसाद लिहिणार्‍या मनुष्यव्यक्तीचे नाव "धनंजय" नाही, आणि अन्य नावाने सभ्य वागणुकीचा व्यक्ती म्हणून ओळख आहे. कुण्या विवक्षित व्यक्तीला किंवा आयडीला उद्देशून असभ्य प्रतिसाद लिहिण्याकरिता "धनंजय" हे असंबद्ध-काल्पनिक नाव धारण करणे.

- - -

मुद्दाम कुणाला टारगेट करु पाहत असेल तर ते चुकिचे आहे का? ह्याचे उत्तर हो असेल तर ह्यामधे ऑब्जेक्शन नक्की कशाला आहे टारगेट करण्याला? की ओळख लपवणे ह्याला?

ओळख लपवण्याबाबत आंतरजालीय समाजात विधिनिषेध नाही.

- - -

या ज्वलंत चर्चाप्रस्तावासाठी काही ताजी प्रासंगिकता आहे काय? संदर्भ/दुवे देऊ शकाल काय?

उत्तरे

टारगेट करणे ह्यामधे 'मुद्दाम त्रास देणे' असे अपेक्षीत आहे. म्हणजे आमोद ह्या सदस्याने सतत धनंजय ह्या सदस्यनामाच्या लिखाणातील विसंगती दाखवल्या, किंवा धनंजयच्या लिखाणावर बर्‍याचदा टीकात्मक सुर लावला तर धनंजय ह्या सदस्याला (किंवा धनंजय ह्या आयडीच्या पंख्यांना) धनंजयला मुद्दाम टारगेट केले जात आहे असे वाटायची शक्यता आहे. टारगेट करणे ह्यामधे कसलाही असभ्य/अश्लाघ्य प्रतिसाद अपेक्षीत नाही. तुम्ही दिलेल्या दोन्हीही शक्यता ह्या आंतरजालीय वावराच्या सर्वसामान्य नियमांचे उल्लघंन करणार्‍या असून अशा आयडींवर कारवाई झालीच पाहिजे असे माझे मत आहे.

या ज्वलंत चर्चाप्रस्तावासाठी काही ताजी प्रासंगिकता आहे काय? संदर्भ/दुवे देऊ शकाल काय?

आमोद शिंदे हा आयडी नुकताच एका स्वस्तखाद्यनामधारी संकेतस्थळावरुन प्रतिबंधीत केला गेला. तो प्रतिबंधीत का केला गेला ह्याचे काहीही कारण न देता प्रतिबंधीत केला गेला. संकेतस्थळ चालकाने हा आयडी डूप्लिकेट असल्याने उडवला अशी खाजगीत सांगितल्याचे ऐकण्यास मिळाले (नक्की खात्री नाही.)

आश्चर्यकारक

डुप्लिकेट आयडी आहे म्हणून प्रतिबंधित आहे ही माहिती आमोद शिंदे यांना कशी मिळाली?

http://www.misalpav.com/node/16599 येथे अधिकृत माहिती मिळेल.

बाकी स्वस्तखाद्यनामधारी असे उल्लेख न आले तर उपक्रमाला शोभून दिसेल नाही का?

माहिती कशी मिळाली?

डुप्लिकेट आयडी आहे म्हणून प्रतिबंधित आहे ही माहिती आमोद शिंदे यांना कशी मिळाली?

माहिती ऐकिव आहे असे वरती नमूद केले आहे. अधिकृत निवेदनात खाते का प्रतिबंधीत केले ह्याचा उल्लेख नाही.

बाकी स्वस्तखाद्यनामधारी असे उल्लेख न आले तर उपक्रमाला शोभून दिसेल नाही का?

का बरं?

मोघम

तेथील अधिकृत घोषणेत आमोद शिंदे या आयडीवरील प्रतिबंधाचे कारण दिलेले नाही. 'संपादकांवर ताशेरे' हे कारण केवळ अन्वयार्थाने शोधता येते. परंतु तो उल्लेख (तसेच अन्य सदस्यांनासुध्दा असे आवाहन करण्यात येते की त्यांनी मिसळपावच्या रोजच्या घडामोडींत संपादकांवर ताशेरे ओढू नयेत.) केवळ सर्वांच्या माहितीसाठी असून आमोद शिंदे या आयडीवरील प्रतिबंधाचे कारण काही निराळेच आहे असे म्हणण्याचा मार्ग अजूनही खुला आहे.

महागाई बघता

बाकी स्वस्तखाद्यनामधारी असे उल्लेख न आले तर उपक्रमाला शोभून दिसेल नाही का?
वाढलेली महागाई बघता असे उल्लेख करू नये असे तुम्हाला म्हणायचे आहे का? बाय द वे, रिटे आणि वसुली एकच आहेत असे म्हणणेही उपक्रमाला शोभून दिसत नाही असे मला वाटते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हाहा!

वाढलेल्या महागाईला बरी ना मिसळ! कांद्याचे काय तेवढे पहा.
बाकी रिटे आणि वसुलि एकच आहेत असा माझा कधीही समज नव्हता, हे आपले रेकॉर्डसाठी.

शिवाय एखाद्या संकेतस्थळाचा ते स्वस्त (खाद्यनामधारी) ('चीप') आहे असा सूचक उल्लेख दुसर्‍या संकेतस्थळावर करणे आणि सदस्य १ ची बाजू स. २ सातत्याने घेताना दिसतो, तेही प्रश्न स. १ ला विचारला असताना, तेव्हा केलेली स. २ ची (निर्विष) थट्टा, या दोन्हीत फरक आहे. हा ज्यांना समजून घेण्याची इच्छा असते त्यांना समजेल असे वाटते.

म्हणजे?

म्हणजे? मिसळपाव हे संकेतस्थळ 'चीप' नाही असे तुमचे म्हणणे आहे काय?

अहो

कुठचेही संकेतस्थळ चीप होण्यासाठी तेथे चीप डुप्लिकेट आयडींनी हळूच येऊन धुमाकूळ घालण्याची आवश्यकता असते.

असो. या विषयावरील हा शेवटचा प्रतिसाद.

सफिशंट बट नॉट नेसेसरी

कुठचेही संकेतस्थळ चीप होण्यासाठी तेथे चीप डुप्लिकेट आयडींनी हळूच येऊन धुमाकूळ घालण्याची आवश्यकता असते.

त्याखेरीजही, काही खर्‍या आयडींच्या धुमाकुळासाठी पक्षपात केला तरी संस्थळ चीप ठरू शकेल.

निषेध

हा ज्यांना समजून घेण्याची इच्छा असते त्यांना समजेल असे वाटते.

हेत्वारोप.

नाही

बाकी स्वस्तखाद्यनामधारी असे उल्लेख न आले तर उपक्रमाला शोभून दिसेल नाही का?

नाही. तसे झाले तरच आश्चर्य वाटेल. शोभा इथे तसे उल्लेख होण्यातच आहे. आता ही शोभा, 'पुरे झाली ही शोभा' यातली की आणखी कसली हे ज्याने त्याने ठरवायचे.
हे माझे मत आहे. ते संपादित झाले तर मूळ प्रतिसाद, मग चित्राताईचा प्रतिसादही संपादित होईल का, असला भलताच प्रश्न निर्माण झाला आहे.
मी इथे असतो.

विवक्षित प्रसंगावर अवलंबून असेल

कितपत पिच्छा म्हणजे संकेतस्थळातील संवादाला पोषक, आणि कितपत पिच्छा केला तर घातक? असे काहीसे संकेतस्थळाचे चालक-संपादक तोलत-मोलत असावेत.

मिसळपावावरील त्या बाबतीतल्या घोषणेत अशी वाक्ये आहेत :

(सदस्य आमोद शिंदे यांचे)शी संपादन मंडळाने सातत्याने संपर्क साधला आहे. मात्र त्यांनी सहकार्य करायचे नाकारले आहे. त्यांना याबाबत अधीक काही म्हणायचे असल्यास (संकेतस्थळ मालकां)ना मेल करावा.
तसेच अन्य सदस्यांनासुध्दा असे आवाहन करण्यात येते की त्यांनी मिसळपावच्या रोजच्या घडामोडींत संपादकांवर ताशेरे ओढू नयेत. संपादक व व्यवस्थापनाविषयी कुठल्याही जाहीर चेष्टेसाठी सदस्यांना प्रतिबंधित करण्यात येईल.

उद्धृत पहिल्या परिच्छेदाप्रमाणे मिसळपाव व्यवस्थापनाने तेथील "आमोद शिंदे" आयडीशी संपर्क साधला. तेव्हा त्या संदेशांत काही तपशील दिले असतील, असे मला वाटते. ते तपशील उपक्रमावरील बहुतेक वाचकांना माहीत नाहीत. उपक्रमावरील "आमोद शिंदे" आयडीपाशी मिसळपावावरील "आमोद शिंदे" आयडीचा पत्रव्यवहार खात्रीलायक असेलच असे काही सांगता येत नाही - त्यामुळे येथील चर्चाप्रस्तावकाकडे अधिक तपशील मी मागू इच्छीत नाही.
उद्धृत दुसरा परिच्छेद त्या संकेतस्थळाच्या आचारसंहितेतला तपशील सांगतो. ती जी काय आचारसंहिता आहे, ती संकेतस्थळचालकांनी ठरवणे आणि सांगणे ठीकच आहे. बहुधा उपक्रमाच्या आचारसंहितेतही असाच कुठला तपशील आहे. मागच्या वर्षी एखाद-दोन सदस्यांना प्रतिबंधित केले होते, तेव्हा असेच काही जाहीर-चेष्टेचे प्रसंग घडले होते. पण उपक्रमपंतांनी घोषणा वगैरे केली नव्हती, म्हणून निश्चित सांगता येत नाही. मात्र नेमक्या कितपत "जाहीर चेष्टे"ला कारवाई करण्यालायक मानले जाईल, ती लक्ष्मणरेखा वेगवेगळी संकेतस्थळे थोडीबहुत मागे-पुढे आखत असतील. असा फरक अपेक्षितच आहे. उद्धृत घोषणेच्या वाक्य-साखळीमुळे असा कयास साहजिक आहे : आचारसंहितेतल्या या तपशिलाचा मिसळपावावरील "आमोद शिंदे" आयडीवर प्रतिबंध आणण्याशी काही संबंध आहे.

वरील हे सर्वच कयास होत. मी वरील कुठल्याही संकेतस्थळांच्या संपादकमंडळात नाही की चालक-मालक नाही.

ऐकण्यात कशाला?

हा आयडी ज्यांचा आहे असे कळले त्यांना मी स्वतः विचारून पाहिन असे तेथे सर्वांसमक्ष कळवले होते. तेव्हा मी विचारले होते पण उत्तर नकारार्थी मिळाले आणि तो आयडी त्यांचा नसावा अशी मलाही शंका होती/आहे.

टारगेट करणे ह्यामधे कसलाही असभ्य/अश्लाघ्य प्रतिसाद अपेक्षीत नाही.

असभ्य/ अश्लाघ्य नसेल पण खोटे असेल तर? खरे-खोटेपणा सापेक्ष असतो.

म्हणून ऐकण्यात

ऐकण्यात कशाला?

मी काही हे समक्ष अनुभवलेले नाही म्हणून ऐकण्यात आला असे लिहिले आहे.

हा आयडी ज्यांचा आहे असे कळले त्यांना मी स्वतः विचारून पाहिन असे तेथे सर्वांसमक्ष कळवले होते. तेव्हा मी विचारले होते पण उत्तर नकारार्थी मिळाले आणि तो आयडी त्यांचा नसावा अशी मलाही शंका होती/आहे.

तो आयडी कुणाचाही असावा, इथे मुद्दा हा आहे की निव्वळ डुप्लिकेट आहे ह्या कारणास्तव प्रतिबंधीत व्हावा का?

असभ्य/ अश्लाघ्य नसेल पण खोटे असेल तर? खरे-खोटेपणा सापेक्ष असतो.

खोटारडेपणा खोडून काढावा. किंवा सत्य उघड करावे.

कयास

हा आयडी ज्यांचा आहे असे कळले त्यांना मी स्वतः विचारून पाहिन असे तेथे सर्वांसमक्ष कळवले होते. तेव्हा मी विचारले होते पण उत्तर नकारार्थी मिळाले आणि तो आयडी त्यांचा नसावा अशी मलाही शंका होती/आहे.
असे मलाही उडत-उडत कळले आहे. तुमची शंका खरी आहे असे वाटते. मी केलेल्या झाडीनुसार ज्यांचा आयडी आहे असे तुम्हाला वाटते आहे त्यांच्या मित्राचा असू शकतो फारफार तर. आणि त्या मित्राने त्या आयडीचा पासवर्ड त्यांना दिलेला (शेअर केलेला) असू शकतो. पण किमान प्रतिसादशैलीवरून तरी तुम्ही म्हणता आहात तो त्यांचा आयडी नसून वसुलीपंथाचा आयडी आहे असे वाटते आहे. आंतरजालावर बऱ्यापैकी नियमितपणे वावरणाऱ्या चाणाक्ष सदस्यांच्या, संपादकांच्या हे एव्हाना ध्यानात आले असावेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

टोपणनावे व डुप्लिकेट आयडी

या विषयावरील माझे काही विचार या ब्लॉगपोस्टवर आहेत. ज्यांना रूची असेल ते वाचू शकतात.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अंशतः सहमत

आपल्या ब्लॉगवरील

जालावरील मराठी लेखन अभिजात व सशक्त होण्यासाठी हे टोपणनामधारक लिखाण व ब्लॉग्स यांची संख्या कमी झाली पाहिजे असे मला वाटते. असे झाले नाही तर पीत पत्रकारितेच्या दिशेनेच जालावरील मराठी ब्लॉग्स व चर्चा वाटचाल करू लागतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.

या मताशी सहमत नाही.
'कोण' लिहितो या पेक्षा 'काय' लिहितो अधिक महत्वाचे मी मानतो.
प्रकाश घाटपांडे

माझे मत

कुणाचे किती व कुठले आयडी आहेत इज़ नन ऑफ़ माय बिज़नस. कायद्याच्या चौकटीत राहून एखाद्यावर टीका करणे किंवा त्याला टारगेट करणे गैर नाही. माझ्यामते किंबहुना असे करता येणे म्हणजे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे.

बाकी डुप्लिकेट आयडी आहे म्हणून घाला बंदी हा प्रकार बालिशपणाचाच आहे. ह्या अशा लोकांच्या हाती सत्ता आली तर ही मंडळी मीडियावरही बंदी घालतील. वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यनिर्मितीसाठी किंवा प्रतिसादनिर्मितीसाठी वेगवेगळे आयडी घेणे अनेकदा सोयीचे असते. असो. तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असे वाचतो

कायद्याच्या चौकटीत राहून एखाद्यावर टीका करणे किंवा त्याला टारगेट करणे गैर नाही. माझ्यामते किंबहुना असे करता येणे म्हणजे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे

मी हे असे वाचतो
कायद्याच्या चौकटीत राहून एखाद्याशी मतभिन्नता दाखवणे गैर नाही. माझ्यामते किंबहुना असे करता येणे म्हणजे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे,

प्रकाश घाटपांडे

राइट टु ऑफेन्ड

केवळ मतभिन्नता नव्हे तर इतरांच्या भावना दुखाविण्याचे स्वातंत्र्यही अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यात समाविष्ट असायला हवे.
हे वाचा: डिफेन्डिन्ग राइट टु ऑफेन्ड

'George Orwell took up arms to fight fascism in Spain, then picked up the pen to defend British fascist leader Oswald Mos­ley against wartime detention. In other words, we don’t get to choose our allies in the fight for free speech.'

वरील लेखातून.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?""तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूळ उद्देशच आहे!

धागाप्रवर्तक आणि प्रतिबंधित सदस्य यांचे नाते?

  • प्रस्तुत धागाप्रवर्तक (उपक्रम सदस्य क्र. ३५४६) आणि उपरोल्लेखित संकेतस्थळावरील प्रतिबंधित सदस्य यांचे सदस्यनाम एकच दिसते आहे (आमोद शिंदे).
  • प्रस्तुत धागाप्रवर्तक असा दावा करतात की डुप्लिकेट आय.डी. हे प्रतिबंधाचे कारण ऐकीव आहे.
  • प्रस्तुत धागाप्रवर्तक प्रस्तुत संस्थळाचे पाच दिवसांपासून सदस्य आहेत.

येथे एक प्रश्न पडतो:

प्रस्तुत धागाप्रवर्तक आणि उपरोल्लेखित प्रतिबंधित सदस्य ही एकाच व्यक्तीची खाती आहेत का? असल्यास त्यांचा खालील दावा:

तो प्रतिबंधीत का केला गेला ह्याचे काहीही कारण न देता प्रतिबंधीत केला गेला.

आणि उपरोल्लेखित संकेतस्थळावरील घोषणा या धाग्यात केलेला खालील उल्लेख:

त्यांचेशी संपादन मंडळाने सातत्याने संपर्क साधला आहे. मात्र त्यांनी सहकार्य करायचे नाकारले आहे.

यांत तफावत आढळते. प्रतिबंधाचे खरे कारण अधिकृत कारणापेक्षा काही निराळेच आहे असे म्हणण्याचा मार्ग जसा अजूनही खुला आहे तसेच असेही म्हणण्यास मग जागा आहे की प्रस्तुत धागाप्रवर्तक सत्यकथन करीत नाही आहेत.

आणि ही जर एकाच व्यक्तीची खाती नसतील तर असेही म्हणण्याचा मार्ग खुला आहे की उपरोल्लेखित संकेतस्थळावर एका वेगळ्याच व्यक्तीस झालेल्या प्रतिबंधामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची जी गळचेपी झाली त्यामुळे एका तिर्‍हाईत सदस्यास क्षोभ झाला; झालेल्या या क्षोभास इतरेजनांसमोर व्यक्त करण्याच्या कळकळीपोटी उपक्रमावरील कुणीतरी सदस्याने मग प्रतिबंधित सदस्याच्या नावाने एक डुप्लिकेट आय.डी. खाते प्रस्तुत संस्थळावर उघडले आहे.

आता या ज्वलंत प्रस्तावामागची ताजी प्रासंगिकता जर इतक्या वेगवेगळ्या खुल्या मार्गांनी जाऊ शकत असेल तर ती धूसर आहे असे म्हणण्याचा मार्ग खुला आहे. शिवाय प्रस्तुत धाग्यात मांडले जाऊ शकतील असे मुद्दे हे जुनेपुराणेच असून त्यांचे चर्वितचर्वण केले जात आहे असे म्हणण्यासदेखील जागा आहे का? तसे असेल तर प्रस्तुत संकेतस्थळाच्या प्रतिष्ठेत प्रस्तुत धाग्याने काही भर पडते आहे का असा प्रश्न विचारण्याचा मार्ग देखील मग खुला आहे.

असो.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

असेही असू शकते

प्रस्तुत धागाप्रवर्तक आणि उपरोल्लेखित प्रतिबंधित सदस्य ही एकाच व्यक्तीची खाती आहेत का? असल्यास त्यांचा खालील दावा:

प्रतीबंधीत का केला गेला ह्याचे काहीही कारण न देता प्रतिबंधीत केला गेला.
बहुधा प्रतिबंधित केल्यावर कारणांची घोषणा करण्यात आली आहे असे वाटते.

आणि उपरोल्लेखित संकेतस्थळावरील घोषणा या धाग्यात केलेला खालील उल्लेख:
त्यांचेशी संपादन मंडळाने सातत्याने संपर्क साधला आहे. मात्र त्यांनी सहकार्य करायचे नाकारले आहे.

संपादन मंडळांशी सहकार्य करणे म्हणजे त्यांचे तळवे चाटणे असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी संपर्क केलेला नसावा असा आपला आणखी एक कयास आहे.

आणि ही जर एकाच व्यक्तीची खाती नसतील तर असेही म्हणण्याचा मार्ग खुला आहे की उपरोल्लेखित संकेतस्थळावर एका वेगळ्याच व्यक्तीस झालेल्या प्रतिबंधामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची जी गळचेपी झाली त्यामुळे एका तिर्‍हाईत सदस्यास क्षोभ झाला; झालेल्या या क्षोभास इतरेजनांसमोर व्यक्त करण्याच्या कळकळीपोटी उपक्रमावरील कुणीतरी सदस्याने मग प्रतिबंधित सदस्याच्या नावाने एक डुप्लिकेट आय.डी. खाते प्रस्तुत संस्थळावर उघडले आहे.

असेही असू शकते. पण माझ्यामते खालील दोन शक्यतादेखील आहेत:
१. ह्या सदस्यनामामागील व्यक्तीला प्रस्तुत संकेतस्थळावरील एखाद्या सदस्याने उपक्रमावर आमंत्रित केले असावे.
२. ह्या सदस्यनामामागील व्यक्ती उपक्रमावर दुसऱ्या सदस्यनामांनीदेखील वावरत असावी.

आमोद शिंदे ह्यांच्या आणि प्रस्तुत धागाप्रवर्तकाची लेखनशैलींत फार समानता दिसते आहे.

आता या ज्वलंत प्रस्तावामागची ताजी प्रासंगिकता जर इतक्या वेगवेगळ्या खुल्या मार्गांनी जाऊ शकत असेल तर ती धूसर आहे असे म्हणण्याचा मार्ग खुला आहे. शिवाय प्रस्तुत धाग्यात मांडले जाऊ शकतील असे मुद्दे हे जुनेपुराणेच असून त्यांचे चर्वितचर्वण केले जात आहे असे म्हणण्यासदेखील जागा आहे का? तसे असेल तर प्रस्तुत संकेतस्थळाच्या प्रतिष्ठेत प्रस्तुत धाग्याने काही भर पडते आहे का असा प्रश्न विचारण्याचा मार्ग देखील मग खुला आहे.

हा विषय सनातन आहे आणि राहील असे वाटते. म्हणूनच बहुधा चक्क चिंतातुर जंतू ह्यांनी भाग घेतलेला दिसतो आहे. तर प्रस्तुत धाग्याच्या अनुषंगाने प्रस्तुत विषयांवर उत्तम चर्चा घडल्यास प्रतिष्ठेत भर पडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

डुप्लिकेट आयडींमध्ये डुप्लिकेट असे काय असते? माझ्यामते काहीच असत नाही. सदस्यनामामागे कोण वावरतो आहे हे बहुधा काहीच जणांना माहीत असते. उदाहरणार्थ: चिंतातुर जंतू हे कुठल्या कंपनीत काम करतात, ते डावखोरे की कसे, पुरुष की स्त्री ह्याच्याशी मला काय करायचे. त्यांच्या लेखनावरून मी त्यांच्याबद्दल चांगलेवाईट मत बनवायला हवे ना. (उद्या माधुरी दीक्षित ह्या नावाने वावरते आहे असे कळल्यास माझे मत बदलवीन का? बदलायला हवे का?)

आणि काही जण खऱ्या नावाने इतके वाईट लिहितात, इतका पाद्रेपणा करतात की बाप रे त्यांच्यापेक्षा हे तथाकथित डुप्लिकेट आयडी अतिशय बरे. असो "अंअं, अंअं, डुप्लिकेट आयडी आम्हाला त्रास देतात" असा रडकेपणा मात्र काही जण उगाच का करत असतात कळत नाही. किंबहुना त्यामुळे ह्या डुआयपीडितांना काही वडिलधाऱ्यांची काही अंशी सहानुभूतीही मिळत असावी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

संशयाचा फायदा

'घोषणा' या धाग्यात प्रतिबंधाच्या कारणाचा टाळण्यात आला. तेथे आमोद शिंदे यांना मत व्यक्त करण्यास वाव नाही. त्यामुळे "प्रस्तुत धागाप्रवर्तक सत्यकथन करीत नाही आहेत. " हा आरोप अन्यायकारक वाटतो.

पीडित?

'घोषणा' या धाग्यात प्रतिबंधाच्या कारणाचा टाळण्यात आला. तेथे आमोद शिंदे यांना मत व्यक्त करण्यास वाव नाही. त्यामुळे "प्रस्तुत धागाप्रवर्तक सत्यकथन करीत नाही आहेत. " हा आरोप अन्यायकारक वाटतो.

उपरोल्लेखित संकेतस्थळावर धागे/प्रतिसाद संपादित होणे किंवा खाते प्रतिबंधित होणे याचा अनुभव प्रस्तुत प्रतिसादक आणि माननीय उपक्रमी श्री. रिटे यांना असल्यामुळे त्यांचे प्रस्तुत धाग्यावरील प्रतिसाद पूर्वग्रहदूषित असतील अशीही शक्यता नाकारता येत नाही. (कृ. ह. घ्या.)

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

सहमत आहे.

उपरोल्लेखित संकेतस्थळावर धागे/प्रतिसाद संपादित होणे किंवा खाते प्रतिबंधित होणे याचा अनुभव प्रस्तुत प्रतिसादक आणि माननीय उपक्रमी श्री. रिटे यांना असल्यामुळे त्यांचे प्रस्तुत धाग्यावरील प्रतिसाद पूर्वग्रहदूषित असतील अशीही शक्यता नाकारता येत नाही.

सहमत आहे. :)

बाकी, आयडी कितीही असले तरी आयडी लिहिते काय हे मला महत्त्वाचे वाटते. मग एक आयडी असू दे नै तर दहा आयडी असू दे. फक्त ती आयडी संस्थळावर 'बदले की आग' घेऊन वावरु नये म्हणजे झालं असं माझं प्रामाणिक मत आहे.

-दिलीप बिरुटे

सोयीनुसार

फक्त ती आयडी संस्थळावर 'बदले की आग' घेऊन वावरु नये म्हणजे झालं असं माझं प्रामाणिक मत आहे.
हेदेखील काहींना सोयीनुसार ठरवता येते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पंचायत

अचानक आठवले की मिसळपावावर "पंचायत" नावाचा विभाग आहे. तो प्रतिबंधित आयडी, संपादक आणि मालकांना दिसतो. (तो कितपत चालतो याची माहिती नाही पण बहुतेक चालत असावा असे वाटते.)

आमोद शिंदे यांना त्यांचे सर्व आक्षेप तेथे मांडता येतील. किंबहुना, त्यांनी ते तेथे मांडावेत आणि तेथील संपादक-चालक मंडळाशी चर्चा करावी असे वाटते.

-------

बाकी, ड्यु आयडी असण्याबाबत माझी हरकत नाही परंतु त्या आयडीने सतत दुसर्‍यांना टारगेट करत राहण्याबद्दल संपादक आणि संकेतस्थळ चालकांचे आक्षेप असू शकतात. अनेकदा अतिशय वाह्यात प्रतिसाद देत राहिल्याने किंवा उगीचच अनावश्यक/ अवांतर प्रतिसादांचा मारा करत राहिल्याने संपादक आणि चालकांवर अतिरिक्त भार येऊ शकतो. अशा परिस्थितीत नियंत्रण आणले जाऊ शकते.

राहिला प्रश्न ड्युप्लिकेट आयडीचा तर संकेतस्थळांवर एकापेक्षा अधिक आयडी असू नयेत असा कायदा नाही (उपक्रमावरही नाही आणि मिपावरही नाही) तेव्हा सदस्य एकापेक्षा अधिक आयडी घेऊ शकतात. अशा आयडी ते जालावर इतरत्रही घेऊ शकतात. मनोगतावर माझ्यामते एकापेक्षा अधिक आयडी घेण्यास प्रशासकीय परवानगी लागते. इतर स्थळांचे मला माहित नाही.

कसे?

आमोद शिंदे यांना त्यांचे सर्व आक्षेप तेथे मांडता येतील.

सदस्यत्व नसताना?

हो

हो तशीच योजना आहे असे वाटते. चालते किंवा नाही हे मला प्रतिबंधित केलेले नसल्याने माहित नाही. :-(

दुर्लक्ष

ह्या डूप्लिकेट आयडींचं काय कराव?

त्यांच अस्तित्व आपल्या इच्छेवर अवलंबुन नाही. पण त्रासदायक वाटत असेल तर दुर्लक्ष करणे, अनुल्लेखाने मारणे, प्रतिसाद न देणे या गोष्टी आपल्या इच्छेवर करु शकतो.
राजा भिकारी माझी टोपी चोरली.
राजा घाबरला माझी टोपी दिली.
प्रकाश घाटपांडे

साधू साधू

त्यांच अस्तित्व आपल्या इच्छेवर अवलंबुन नाही. पण त्रासदायक वाटत असेल तर दुर्लक्ष करणे, अनुल्लेखाने मारणे, प्रतिसाद न देणे या गोष्टी आपल्या इच्छेवर करु शकतो

.

करु शकतो पण करता आले असते तर आपण सर्व साधू-संत-महात्मे झालो नसतो का? ;-) त्यामुळे फिरून प्रश्न तेथेच राहतो.

जेव्हा मी इतरांना टारगेट करतो तेव्हा त्यांनी प्रत्युत्तर करण्याची हिम्मत करू नये आणि जेव्हा मला टारगेट केले जाते तेव्हा सर्व ड्युआयडींचा खात्मा करावा अशी इच्छा सर्वसामान्य मनुष्य करतो. - इति मा प्रियाली उवाच. ;-)

-१

जेव्हा मी इतरांना टारगेट करतो तेव्हा त्यांनी प्रत्युत्तर करण्याची हिम्मत करू नये

असहमत. उलट आम्ही तर म्हणतो प्रत्युत्तर करा. प्रत्युत्तरच केले नाही तर काय मजा?

+१

सहमत!

ह. घ्या

निरिक्षणे
येथे ज्यांनी डुप्लीकेट आयडी असण्यात काही गैर नाही असा पवित्रा घेतला आहे त्यांचे डूप्लिकेट आयडी "इथे किंवा तिथे" आहेत.
ज्यांनी डूप्लिकेट आयडी हे नकोच असा पवित्रा घेतला आहे त्यांना डु. आयडींनी छळलेले आहे.
ज्यांनी डु. आयडींना असे-तसे करता येईल असे म्हणले आहे त्यांना डु. आयडींची भीती नाही (पक्षी "इथे किंवा तिथे" संपादक असावेत).
ज्यांनी नक्की समस्या काय् आहे हे विचारले आहे, ते ह्या डू. आयडींना चांगले ओळखतात.
ज्यांनी ह्या विषयी तिसरीकडेच (जिथे डु. आयडींना रस नसतो तिथे) काही म्हणले आहे त्यांना डु. आयडींची खरी गंमत माहितच नाही.
ज्यांना डु. आयडींविषयी खरेच कुतुहल वाटते ते मराठी संस्थळावर नवे आहेत.

तर अशा सर्वांनी ही निरिक्षणे ह. घेणे. ;-)

-Nile

छान

वर्गीकरण आवडले.

छान

चान चान! निरीक्षण जबरा आहे. :-)

काही सर्वद्वेष्ट्यांना ड्यु आयडी नसली तरी प्रतिबंधित करावे असे माझे स्पष्ट मत आहे. ;-)

छान

छान चर्चाविषय. मराठी संकेतस्थळे प्रगल्भ होण्यासाठी महत्त्वाचाच.
डूआयडी ही काही साधी गोष्ट नव्हे तर प्रगल्भता, वाचन आणि विचाराच्या रवीने अनेकपेडी लिखाणाचे ताक घुसळून मिळालेले नवनीत वाटण्यासाठी घेतलेला तो एक अवतार आहे. असे अवतार पुराणातही चुकलेले नाहीत. अवतारांनी केलेले कार्य तर थोरच. या थोरवीची खूण पटण्यासाठी आपणां मर्त्य मानवांनादेखील मनाची कवाडे उघडून समतोल विचारांना प्रवेश देऊन प्रगल्भ व्हावे लागते. त्यानंतरच या डूआयडींचे महात्म्य कळू शकते.
आता या डूआयडीने काही इतर लाभही होत असतात असे किमान एकाचे म्हणणे आहे, हे इथंच वाचल्यानंतर मला कळलं होतं. पण ते असो.
मुळात डुप्लीकेट आयडी की पेननेम असाही एक भेद करता येईल म्हणा.
वर नाईल यांनी मांडलेले निरिक्षण अत्यंत मोलाचे. तेही प्रगल्भ करून गेले. धन्यवाद नाईल.
मी इथे असतो.

 
^ वर