अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाड्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे.

म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत. अनेक सोपे आणि चपखल पारिभाषिक शब्द हेही त्यांचं मराठी भाषेसाठीचं एक महत्त्वाचं योगदान ठरावं. केळकरांचा आंतरक्षेत्रीय व्यासंग आणि उदार, अभिनिवेशरहित भूमिका समकालीन मराठी वाड्मयक्षेत्रात उल्लेखनीय मानली जाते. उपक्रमींना ही बातमी वाचून आनंद होईल अशी आशा आहे. त्या निमित्तानं लोकसत्तेत आलेल्या दोन लेखांचे दुवे देत आहे.

आस्वादमीमांसेचा भाषाविद् - प्र. ना. परांजपे
भाषेचे सर्वस्पर्शित्व जाणणारा विचारवंत - नीलिमा गुंडी

त्यांचं इंग्रजीतलं लेखन या दुव्यावर उपलब्ध आहे.

Comments

वा!

वा! अत्यंत चांगले पुस्तक आहे. संग्रहणीय, विचारप्रवर्तक.

आनंदाची बातमी

हा तर साहित्य अकादमी पुरस्काराचा सन्मान आहे.

आणखी काही दुवे
स्तिमित करणारा बौद्धिक आवाका सीताराम रायकर (पुस्तक-परीक्षण)
शब्दांचे शिल्पकार - डॉ. अशोक केळकर सुमन बेलवलकर
पहिल्या अंकाचे संपादकीय : भाषा आणि जीवन डॉ. अशोक केळकर

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

सहमत

यानिमित्ताने पुरस्काराचाच सन्मान झाला आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अभिनंदन

प्रा. डॉ. केळकर यांचे हार्दिक अभिनंदन. उपरोल्लेखित संस्थांव्यतिरिक्त पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील सेंटर ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीज इन लिंग्विस्टिक्स (CASL) या संस्थेमध्येही त्यांनी अनेक वर्षे संशोधन केले.

--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/

 
^ वर