पिंडदानाचे वेळी कावळ्याचे महत्व

आजची सुजाण पिढी कावळा ह्या पक्षाला व त्याच्या पिंडाला शिवण्याच्या प्रक्रिये बद्दल कितपत मान देते याबद्दल मी साशंक आहे. पण नुकताच मला जो अनुभव आला तो वाचकांसोबत शेअर करावासा वाटल्याने येथे देत आहे.

आपल्या हातुन थोडीफार समाज सेवा व्हावी या हेतुने मी ईशान्य भारतातील राज्यांना दरवर्षी भेट देत असतो. तेथील परिस्थीतीची चांगली कल्पना असल्याने जाण्यापुर्वी मी नागपुरला माझ्या भावाला भेटुन मग पुढे जात असतो. असाच फेब्रुवारी २०१० मध्ये नागपुरला गेलो असताना माझा भाउ मला खुप अस्वस्थ जाणवला. तो माझ्या पेक्षा ६ वर्षांनी वडिल आहे.

२००२ मध्ये तो ५८ वर्षी निव्रुत्त् झाला. त्याच वर्षी मी नागपुर ला थ्रोम्बोसीस च्या मुळे होस्पिटल मध्ये दाखल होतो. मला भेटण्यासाठी तो मुलासोबत आला होता. त्याचा मुलगा टैक्सी व्यवसाय करण्यास इछुक होता व त्या साठी माझा सल्ला घेण्यासाठी आला होता. मी स्वतः बैंकेत मैनेजर होतो. मैनेजर म्हणुन या व्यवसायासाठी कर्ज दिलेल्या युवकांचे भविष्य मी बघितले होते व ते चांगले नव्हते त्यामुळे मी त्यास तु कोणत्याही व्यवसायात जा पण हा व्यवसाय करु नको असा सल्ला दिला होता. कर्ज घेतल्यास त्या कर्जासाठी दिलेले तारण म्हणुन वडीलाची गैरंटी बैंक मागेल आणी हा व्यवसाय न जमल्याने बैंकेचे थकित कर्ज भरमसाट वाढुन शेवटी तारण म्हणुन दिलेले वडिलांचे घर विकावे लागेल व वडिल रस्त्यावर येतील हे मी बघितले आहे. पण त्याने आपला हट्ट सोडला नाही. कालांतराने वडीलांचे निवृत्ती चे पैसे ही त्यात लागले. दर वर्षी त्याच्या कोणत्या ना कोणत्या गाडी चा अपघात व्हायचा आणी त्याचा भुर्दंड शेवटी त्याला भरावा लागायचा पर्यायाने वडिलांना. नागपुरला त्यांचा एक फ्लैट व एक स्वताचे दुकानाची जागा भावाने आपल्या आयुष्याची कमाई म्हणुन ठेवली होती. रहात्या फ्लेट च्या खालीच एक दुकान ते चालवित असत. मुलाने याच दरम्यान लग्न केले व त्यास एक मुलगाही झाला.

टैक्सीचा व्यवसाय बंद होता.एकच टैक्सी राहीली होती मुलाचा संसाराचा व्याप वाढला होता. भावाच्या पेन्शनमधुन व दुकानाती तुटपुंज्या कमाईत त्याचा व मुलाचा संसार चालत होता. मुलगा हातभार कमी व खर्चाची मागणी करित असे. माझ्या या भेटित त्याने ही हकिकत सांगितली. मी त्यावेळी दिलेला सल्ला न मानत त्याने मुलाच्या मायेमुळे आपली सर्व पुंजी घालविली याचे अतोनात दु:ख त्यास झाले होते. व या जंजाळातुन काही काळासाठी दोघांनी माझेकडे येण्याचा व २-३ महिने इकडे रहाण्याचा मानस मला बोलुन दाखविला. मी २ महिन्यासाठी इशान्येस जात आहे तेंव्हा तु माझ्या फ्लैटची किल्ली घे व खुशाल आरामात माझे घरी रहा हे सागुन त्यास धिर दिला. कालांतराने मी जुन् १० ला मी गुवाहाटी ला गेलो. त्याच्याकडुन तोपर्यंत मला त्याचे येण्याबद्दल काहीच कळले नाही.

मी शिलांग मध्ये असताना अचानक जुन मध्ये मला त्याच्या मुलाचा फोन आला व मला कळाले की माझा भाउ आजारी आहे व मला बोलावत आहे. मी नुकताच येथे आलो असल्याने मी २ महिने जाउ शकत नव्हतो. मी माझ्या नागपुरच्या मित्रांना त्याच्या घरी जाउन सद्य परिस्थीती काय आहे याची माहिती घेण्यास सांगितले. त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होती. भाउ हॉस्पीटल मध्ये एडमीट होता व त्याच्या दोन्ही किडनी फेल झाल्याचे निदान झाले होते. मी माझे काम लवकरात लवकर संपवण्याच्या उद्योगाला लागलो. दरम्यान मी फोनवर त्यास धीर् देत होतो. तो फोनवर केवळ रडत असे. व मुलाला शिव्या शाप देत असे. मी जुलाइ मध्ये रिझर्वेशन च्या मागे लागुन पुण्यास २६ जुलाई ला परतलो व लगेच मिळेल त्या रिझर्वेशन ने नागपुरला १० ऑगष्ट ला पोचलो. घरी गेल्यावर फेब्रुवारी मध्ये धडधाकट सोडलेला भाउ अस्थिपंजर होउन बेडवर् पडलेला होता व शेवटचे श्वास घेत होता. त्याला घरी येवुन १ महिना झाला होता. एकच दिवस मी त्याचे सोबत होतो मी केवळ धिराचा हात फिरवण्याशिवाय काहीच करु शकत नव्हतो. त्याचे बोलणे अस्पष्ट होते आणी डोळ्यात पाणी. मध्येच तो मुलाच्या नावाने शिव्याशाप देत होता. दुसर्‍या दिवशी दुपारी त्याने जगाचा निरोप घेतला.

संध्याकाळी त्याचे दहन करण्यात आले. यानंतर मला जे अनुभव आले ते मला बुचकळ्यात टाकणारे होते. त्याच रात्री त्याच्या मुलाचा स्मशानातुन येतांना स्कुटर चा अपघात झाला व त्याचा डावा पाय फ्रैक्चर झाला. अस्थि विसर्जन करण्याचे भाग्य त्या एकुलत्या एक मुलाचे हातुन होणे भावाला मंजुर नसावे. ते सर्व मी केले. त्यानंतर ९ तो १३ दिवसांचे सर्व कार्य मीच केले. मुलगा हा प्लास्टर लावुन बसला होता. त्याच्या आत्म्याला त्याने हे करु नये असे होते काय. ३ महिने जो बेडवर होता तो मी आल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी जावा हे विधिलिखीत होते काय्? मी अजुन १ आठवडा गेलो नसतो तर तो तग धरुन मला भेटण्यासाठी थांबला असता काय? त्याचे अंतिम कार्य माझे हातुन व्हावे व मुलाचा त्यात सहभाग असु नये अशी नियती असावी काय?

स्मशानातील विधी करित असतांना. माझ्या आधी एक विधी उरकला होता. त्यांचे पिंड कावळ्याने शिवावे यासाठी ते कुटूंबीय ३ तास ताटकळत होते. माझा विधी झाल्यानंतर मी ठेवलेला पिंड एक डोंबकावळा येउन लगेच खाउन गेला पण माझ्या आधीचे कुटुंब तरिही ताटकळत असल्याचे मी पाहात होतो. तेथील गुरुजी म्हणाले येथे कुठेही डोंब कावळा आम्हाला दिसला नाही तुमच्या भावाचे पिंडाला शिवलेला डोंब कावळा आला आणी खाउन गेला हे देखील आश्चर्य आहे.

२५ आगष्ट ला परत आल्यानंतर हे सर्व प्रश्न भुंग्यासारखे मला कधि कधी अगम्य शक्ती बद्दल विचार करायला प्रव्रुत्त करतात्. म्हणुन हा लेखन प्रपंच

लेखनविषय: दुवे:

Comments

अगम्य शक्ती

आपले बंधु व त्यांचे कुटुंबीय व पर्यायाने आपण यांच्या आयुष्यात घडलेल्या या प्रसंग मालिकेने आपल्याला वैयक्तिक धक्का बसलेला असणे स्वाभाविक आहे व त्या परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन आपण शक्य ती मदत आपल्या बंधूना केलीत याबद्दल आपला आदर वाटतो.
त्रयस्थाच्या नजतेरून हीच प्रसंग मालिका बघत असता यात ओढवून घेतलेली संकटे किती? योगायोग किती? आणि अगम्य शक्तीचा यात काही हातभार आहे का? याबद्दल साशंकता वाटते. दुसर्‍याच्या भावनांना कधी हसू नये असे म्हणतात. आपण हा विषय आपल्या मनातच ठेवला असता तर जास्त योग्य ठरले असते. परंतु उपक्रमच्या माध्यमातून तो चार लोकांच्या समोर ठेवल्यानंतर. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण एका विषयावरील चर्चा म्हणून मान्य कराल व यात आपल्या वैयक्तिक भावनांना धक्का लावण्याचा कोणताच विचार नाही हे आपण मान्य कराल अशी आशा करून माझी निरिक्षणे नोंदवतो.

1. वृद्धावस्थेत स्वत:जवळची पुंजी मुलाच्या हवाली करण्याने त्या व्यक्तीवर केवढे दुर्धर प्रसंग ओढवतात हे काही नवीन नाही. आपल्या प्रत्येकाला अशी अनेक उदाहरणे माहित असतील. आपल्या बंधूंनी तरी ती सुद्धा तीच चूक केली व त्याची फळे त्यांना भोगावी लागली यात अगम्य शक्तीचा हात कोठे दिसला नाही.
2. हलाखीची आर्थिक परिस्थिती, मुलाचे व त्याच्या कुटुंबियांचे धंदा करताना होणारे हाल या सर्व परिस्थितीतून जात असताना आपल्या बंधूंकडून तब्येतीची हेळसांड त्यातून अखेरीस किडनी फेल्युअर व त्यांचा अंत या सर्व गोष्टी अतिशय दुर्दैवी आणि दु:खद असल्या तरी याला प्रपंचाची एक तर्‍हा एवढेच म्हणणे त्रयस्थाच्या भूमिकेतून शक्य वाटते. यात अगम्य शक्तीचा हात कोठे जाणवला नाही.
3. आपले बंधू कालवश झाल्यावर त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यासाठी त्यांचे चिरंजीव उपस्थित होतेच. यानंतर मनाच्या नाजुक अवस्थेत त्यांनी स्कूटर चालवत यावे व इतर नातेवाईकांनी त्यांना प्रतिबंध करू नये हे मला तरी जरा निष्काळजीपणाचेच कृत्य वाटले. अशा प्रसंगी जवळच्या नातेवाईकांना सहसा कोणी वाहन वगैरे चालवू देत नाहीत. असो आता त्या वेळी स्कूटरचा अपघात होणे हा केवळ योगायोग समजता येईल.
4.कावळा आणि पिंडदान या बद्दल लॉजिक, कार्यकारणभाव किंवा कोणत्याही शास्त्रीय भूमिकेवरून काहीही लिहिणे शक्य नाही. आपण हा विधी केलाच नसतात तरी काहीच फरक पडला नसता.

थोडक्यात सांगायचे तर आपण सांगितलेल्या गोष्टीत मला तरी कोणत्याही अगम्य शक्तीचे अस्तित्व किंवा हात दिसला नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सहमत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चन्द्रशेखर यांनी अगदी योग्य आणि हळुवार शब्दांत सर्व काही लिहिले आहे. आणखी काही लिहावे असे नाही. श्री.चन्द्रशेखर यांच्या प्रतिसादाशी शत प्रतिशत सहमत.

चंद्रशेखर यांच्याशी सहमती पण..

आपण हा विषय आपल्या मनातच ठेवला असता तर जास्त योग्य ठरले असते.

मनातच हा विषय ठेवल्याने विश्वास कल्याणकर अस्वस्थ झाले होते म्हणुन त्यांना हा विषय मांडावासा वाटल्याचे त्यांनी नमुद केले आहे.
माझ्या वडिलांचे १९८९ साली कर्करोगाने निधन झाले. त्यांना कुठलेही व्यसन नव्हते. मी त्यांचा धाकटा व एकुलता एक मुलगा. माझे त्यावेळी लग्न झाले नव्हते. त्यांच्या शेवटच्या काळात ग्लानित ते " मला मांडवात का जाउ देत नाही. माझ्याच मुलाचे लग्न आणि मला कशाला अडवता?......." असे पुटपुटत होते.
माझा कर्मकांडावर विश्वास नसल्याने मी विधी न करण्याबद्दल आग्रही होतो. पण नातेवाईकांच्या इच्छेपुढे माघार घ्यावी लागली. पिंडदानाच्या दिवशी पिंड ठेवल्या ठेवल्या कावळा टोच मारुन गेला. वास्तविक त्यांना मला पुण्यात घर घेउन द्यायच होत. माझे लग्न करायच होते. या त्यांच्या इच्छा अतृप्त होत्या. पण कावळा कसा काय शिवला पटकन? पिंडदान फक्त हिंदु धर्मात आहे बाकीच्या धर्मातील माणसांच्या आत्म्याचे काय होते? मी तर कट्टर धार्मिक व सनातनी वातावरणात वाढलेलो होतो.
शेवटी ही आपल्या मनाची स्पंदन आहेत इतकेच म्हणावेसे वाटते.
प्रकाश घाटपांडे

समाधान

कल्याणकर, इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि आजच्या पिढीनेही लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे आपण आपल्या भावाला त्याच्या पडत्या काळात केलेली मदत ही आहे आणि ती स्पृहणीय आहे.

बाकी सर्व गोष्टी योगायोगाच्या आहेत आणि आजकाल घराघरांतून दिसून येणार्‍या आहेत. चंद्रशेखर यांनी म्हटल्याप्रमाणे तुमच्या पुतण्याने अशा प्रसंगात स्कूटर चालवायला नको होती कारण अशावेळी मनःस्थिती ठीक नसल्याने अपघातांची शक्यता अधिक आहे. पिंडदानाविषयी म्हणाल तर घाटपांडे म्हणाले तसे इतर धर्मीयांत पिंडदान वगैरे होत नाही परंतु त्यांचे आत्मे (असलेच तर) त्यांना मुक्ती वगैरे मिळत असेलच ना. तेव्हा या सर्व मानण्या न मानण्याच्या गोष्टी आहेत.

पण हे सर्व सोडून द्या. त्या महत्त्वाच्या नाहीत. तुम्ही केलेली मदत महत्त्वाची आहे. भावाच्या मृत्यूपूर्वी तुम्ही त्याची भेट घेऊ शकलात हे महत्त्वाचे आहे. अनेकांना हे भाग्य लाभत नाही आणि मग टोचणी लागते. त्यांच्या पिंडाला कावळा शिवला याचे समाधान तुम्हाला लाभले असेल तर ते महत्त्वाचे आहे. नियतीने असा अपघात घडवून तुमच्या पुतण्याला धडा शिकवला असे तुम्हाला वाटत असल्यास आणि या सर्व गोष्टींतून तुमच्या मनाला कुठेतरी समाधान लाभले असल्यास ते महत्त्वाचे आहे.

बाकी गोष्टींवर विचार करू नका.

चंद्रशेखर यांचे म्हणणे की हा प्रसंग तुम्ही उपक्रमावर मांडायला नको होता हे मला अमान्य आहे. तुम्ही प्रामाणिक कथन केले आहे आणि कदाचित लोकांच्या प्रतिसादांतून तुमचे मतपरिवर्तन झाले तर ते महत्त्वाचे आहे. :-)

हिंदू

यासारखा प्रसंग हिंदू कादंबरीत आहे. वडील अत्यवस्थ असल्याचे कळल्यावर मुलगा (कथानायक) पाकिस्तानातून मजल-दरमजल करत खानदेशातील आपल्या गावी येतो. वडिलांची भेट होते आणि वडील प्राण सोडतात.

कदाचित असेच प्रसंग जगात घडत असावेत. आपली प्रिय व्यक्ति आपल्याला भेटावी म्हणून आपले त्राण एकत्र करून मनुष्य जगत असावा. ते झाल्यावर मात्र मरण-इच्छा बळावत असणार.
(डेथ विश वर पूर्वी कधी वाचले होते.) जाणकार यावर अधिक खुलासा करू शकतील.

तुमच्या भावाचे मुलावर उत्कट प्रेम (चडफड असली तरी) या प्रसंगातून जास्त दिसले. आत्मा असलाच (तुमच्या दृष्टिकोनातून) तरी तो आपल्या मुलाला अपघात करवेल हे पटत नाही.

कावळा शिवायच्या बद्दल मला एकदा भटजींनी सांगितले होते की सकाळी लवकर जायचे. (कावळे भुकेले असतात.) कावळा पटकन शिवतो.

प्रमोद

घडले ते वाईट घडले!

घडले ते वाईट घडले! असो!
अगम्य शक्ती असते पण तरीही झाले गेले विसरून जा!


कार्यकारण भाव शोधण्याबद्दल म्हणायचं झालं तर, जेंव्हा तुमचा भाऊ 'तुमच्या पुतण्या' सोबत तुमच्या कडे कर्ज मागण्यासाठी आला होता, तेंव्हा, 'तु ('तुमचा पुतण्या') कोणत्याही व्यवसायात जा पण हा व्यवसाय करु नको असा सल्ला दिला होता.' ही अशी नकारात्मक उर्जा पेरल्यापासून तुम्हाला 'तुमच्या पुतण्याबद्दल' नकारात्मक बोचणी सुरू झाली असावी.

तुमच्या भावाने त्यांच्या मुलाला त्याच्या लग्नानंतर वेगळं घर घेवून रहायला सांगायला हवे होते. माझ्या वडिलांनी माझ्या लग्नानंतर मला वेगळे रहाण्याचा लकडाच लावला होता. व मी तसे केले देखील, भाड्याचे घर घेवून.

क्लोजर

जाणार्‍या व्यक्तीचा प्राण कधी कधी हळू जाऊ शकेल अथवा कधी कधी एखादे दिव्याचे बटण बंद केल्यावर जसा दिवा तात्काळ बंद होतो तसे होऊ शकेल. पण मागे उरणार्‍या जीवलगांना त्या कायमस्वरूपी बदललेल्या वास्तवास मान्य करायला वेळ द्यावा लागतो. भावनांना नुसतेच अश्रू ढाळून नाही तर खर्‍या अर्थाने मोकळे करण्यासाठी वाट द्यावी लागते. ते दिव्याच्या बटणासारखे "स्वीच ऑन/ऑफ" इतके सोपे नसते. तसे कोणी करू शकत नाही आणि जर तसे कोणी त्यावेळेस हृदयावर दगड ठेवून वागले तर नंतर कधीतरी ते विक्षिप्तपणे बाहेरपण येऊ शकते.

प्रत्येक धर्मात/संस्कृतीत/समाजात यासंदर्भात काही पद्धती/रुढी तयार झाल्या आहेत, ज्यांचा उपयोग भावनांना पद्धतशीरपणे मोकळे करण्यासाठी होतो. अमेरिकेत (कदाचीत सर्वच पाश्चात्य संस्कृतीत) वेक हा प्रकार असतो, सर्व्हीस हा प्रकार असतो, ज्यावेळेस आप्तस्वकीय गेलेल्याच्या स्मरणासाठी आणि मागे राहीलेल्याच्या सांत्वनासाठी एकत्र येतात. अंत्यविधीनंतर मोठे जेवण देतात... हिंदू पद्धतीमधे त्याच अर्थाने तेरा दिवस हे भावनांना "फेज आउट" करण्यासाठी दिले गेले असावे असे वाटते. इंग्रजीत त्याला एक चांगला शब्द आहे: "Closure".

कालाच्या ओघात पद्धतींच्या रुढी होतात, त्यातून डोक्यात वेगळे अर्थ/तर्क-कुतर्क निर्माण होऊ शकतात अथवा इतरांच्या डोक्यात, कोणी तसे कळत-नकळत भरू शकते. मात्र, त्यातील महत्वाचा भाग काय हे लक्षात ठेवताना आपणच आपल्याला प्रश्न विचारावा की हे सर्व कशासाठी आहे? तर मागे राहीलेल्याच्या समाधानासाठी. इतकेच त्याचे महत्व, जरी त्या रुढींवर विश्वास असला तरी ठेवावे, असे वाटते.

गणिताच्या / आलेखाच्या भाषेत बोलायचे झाले तर गेलेल्या व्यक्तीबद्दलचे दु:ख आणि आठवणी यांनी एकत्रीत असलेला आलेख हा काळाच्या ओघात "डिकेइंग कर्व" सारखा असतो. त्यातील पहीला भाग पटकन विरण्यासाठी अशा पद्धतींचा/रुढींचा जर कुणाला भयाने नाही पण भावनेपोटी वापर झाला तर त्यात काहीच गैर मला तरी वाटत नाही. पण नंतरचा जो दु:खद आठवणींचा भाग असतो तो तात्काळ विरणे अवघड असते. ते चालूच रहाते. अशा वेळेस विविध प्रकारे त्या भावनांना मोकळीक करून देणे तसेच ते विरत असताना स्वतःला (ते विरते आहे म्हणून) अपराधी न समजणे हे महत्वाचे वाटते. म्हणूनच तुम्ही येथे जे लिहीलेत ते नक्कीच योग्य आहे.

अन्वयार्थ

हिंदू पद्धतीमधे त्याच अर्थाने तेरा दिवस हे भावनांना "फेज आउट" करण्यासाठी दिले गेले असावे असे वाटते.

विकास यांनी काढलेला अन्वयार्थ मला सुसंगत वाटतो.
प्रकाश घाटपांडे

छान प्रतिसाद पण..

हिंदू पद्धतीमधे त्याच अर्थाने तेरा दिवस हे भावनांना "फेज आउट" करण्यासाठी दिले गेले असावे असे वाटते. इंग्रजीत त्याला एक चांगला शब्द आहे: "Closure".

हिंदू पद्धत म्हणजे काय? माझ्या इथल्या वाचनावरुन विकास हे सावरकरांची हिंदू व्याख्या वापरतात असे दिसले. त्या व्याख्येप्रमाणे भारताला पुण्यभू, मातृभू इ.इ. मानणारा हिंदू असे आहे. त्यात तेरा दिवस वगैरे कुठे आले?

चांगला प्रश्न

छान प्रतिसाद पण..

धन्यवाद

हिंदू पद्धत म्हणजे काय? माझ्या इथल्या वाचनावरुन विकास हे सावरकरांची हिंदू व्याख्या वापरतात असे दिसले. त्या व्याख्येप्रमाणे भारताला पुण्यभू, मातृभू इ.इ. मानणारा हिंदू असे आहे. त्यात तेरा दिवस वगैरे कुठे आले?

चांगला प्रश्न फक्त विषयांतर टाळण्यासाठी येथे प्रतिसाद देत नाही. आपण येथे या संदर्भात वाचू शकता. अधिक चर्चा हवी असल्यास नवीन चर्चा सुरू करावीत ही विनंती...

ठीक आहे

तिकडे प्रतिसाद दिला आहे. चर्चा तिकडेच कंटिन्यू करुया.

:(

तेथे चर्चा होणार नाही ही भीती होतीच.
हा धागाही गुंडाळण्यात आलेला दिसतो म्हणून थोडे अवांतरः हिंदू धर्म आणि क्लोजर या शब्दांमुळे (रोमन स्पेलिंग वाचण्यापूर्वी) ज्युलिया रॉबर्ट आठवली होती.

नवीन चर्चा

माझ्या वरील प्रतिसादात, "अधिक चर्चा हवी असल्यास नवीन चर्चा सुरू करावीत ही विनंती... " नवीन प्रतिसाद असे म्हणलेले नव्हते. :-) बाकी या चर्चेत अतिअवांतर नको.

विषयांतर

माझा अनुभव सांगण्याचा मुद्दा वेगळा होता. आपण मेल्यानंतर पुढे काय होते? याविषयावर खुप चिंतन झाले आहे. डिस्कवरी वर या आत्म्याचा शोध घेण्याचा पाश्चात्यांद्वारे देखील प्रयत्न झाला आहे. देह सोडल्यावर जे चैतन्य निघुन जाते ते आपले अस्तित्व कशा पध्दतीने दाखविते. ज्या लोकांत तो आत्मा ५०-६० वर्षे रहात असतो तो देह निष्प्राण झाल्यानंतर लगेच तुटतो कि तेथे वेगळ्या पध्दतीने ते दाखवित असतो? येथे धर्माचा किंवा संप्रदायाचा विषय नसुन एकंदरीत हे जिवन संपल्यानंतर देखील त्यावर आपले प्राबल्या दाखविण्याचा प्रयत्न हे चैतन्य करित असते काय? हे प्रश्न अनुत्तरित आहेत्. हे सर्व खोटे आहे असे आधुनिक लोक म्हणत असले तरी ते पटविण्याजोगे भरिव असे काहि ते देत नाहीत. पाश्चात्यांमधेही पवित्र पाणी शिंपडुन जागा श्बुध्द करणे प्रकार होत असतात. तेंव्हा पारलौकिक असे काहिच नसते हे ठाम पणे म्हणणे हे धारिष्टाचे च आहे. यात अंधश्रध्दा, भावना याच्या पलिकडे जाउन विचार करणे जरुरेचे आहे असे मला वाटते. माझ्यासारखे अनुभव बर्‍याच लोकांना आलेही असतील परंतु शहाण्या आधुनिक लोकांत आपले म्हणणे मुर्खपणा ठरेल म्हणुन सुज्ञ लोक गप रहाणे पसंत करत्तात. एवढेच.

विश्वास कल्याणकर

:(

हे सर्व खोटे आहे असे आधुनिक लोक म्हणत असले तरी ते पटविण्याजोगे भरिव असे काहि ते देत नाहीत.

काय 'भरीव' प्रमाणपत्र शक्य आहे? नेमकी अपेक्षा काय आहे? समजा आत्मा नसतो, आणि आपण सगळे जर "जैवरासायनिक यंत्रमानव" आहोत, तर जगात नेमके काय वेगळे घडताना दिसले असते?

पाश्चात्यांमधेही पवित्र पाणी शिंपडुन जागा श्बुध्द करणे प्रकार होत असतात.

किंवा

डिस्कवरी वर या आत्म्याचा शोध घेण्याचा पाश्चात्यांद्वारे देखील प्रयत्न झाला आहे.

या वाक्यावरून

पारलौकिक असे काहिच नसते हे ठाम पणे म्हणणे हे धारिष्टाचे च आहे.

असा निष्कर्ष काढणार्‍यांना मेकॉलेपुत्र म्हणतात ना?

माझ्यासारखे अनुभव बर्‍याच लोकांना आलेही असतील परंतु शहाण्या आधुनिक लोकांत आपले म्हणणे मुर्खपणा ठरेल म्हणुन सुज्ञ लोक गप रहाणे पसंत करत्तात

येथील लोक केवळ तुमच्या भावनांना जपण्यासाठी गप्प आहेत.
"शहाण्या आधुनिक लोकांत आपले म्हणणे मुर्खपणा ठरेल" म्हणून 'झाकली मूठ सव्वा लाखाची' ठेवावी लागणेसुद्धा वाईटच, स्वतःच्याच मेंदूतील एका भागाने दुसर्‍या भागाला मूर्ख म्हणणे अपेक्षित आहे.

कोण मेकॉले?

कल्किनांचा नसेल ;-) तर संदर्भ द्या. तुमचे मेकॉलेबाबा म्हणजे आम्हा "इंडियन्स"चे बाप असावे.

अवांतरः समजा आत्मा नसतो, आणि आपण सगळे जर "जैवरासायनिक यंत्रमानव" आहोत, तर जगात नेमके काय वेगळे घडताना दिसले असते? या वाक्यानंतर आयुष्याकडे गंभीरतेने बघितल्याने आयुष्यात काय फरक पडतो? असा एक प्रश्न आताच दुसरीकडे वाचला. ;-) आणि आताच मेकॉलेही वाचला. हे दोन्हीकडे सारखे संदर्भ नसतानाही हे असे समान लेखन दिसते तेव्हाही मला पारलौकिकाचा वास येतो. - ह. घेणे.

जरा जास्त...

आपल्यावरचा प्रसंग कठीण आहे.

बाकी प्रोब्लेम हा आहे न कि तुमच्या माझ्यासारख्याने हे आत्म्याबद्दल बोलायचं म्हणजे बालवाडीतील मुलाने कस्सं लाईट च्या वेगाने धावला कि माणूस गायब होतो असं सांगण्यासारखं आहे, ते पटेल असे सांगणारा आईनस्ताईन आज उपलब्ध नाही, आणि बालवाडीतील बाकीचे "हा कसा येडा बनवतोय" असंच बघणार....पिंड/कावळा.. ते किती भावनिक आहे आणि किती पारलौकिक हा वादाचा मुद्दा...

आत्मा

ज्या लोकांत तो आत्मा ५०-६० वर्षे रहात असतो तो देह निष्प्राण झाल्यानंतर लगेच तुटतो कि तेथे वेगळ्या पध्दतीने ते दाखवित असतो?

तुमच्या प्रतिसादात आत्मा (चैतन्य) हे गृहितक धरले आहे असे वाटते.
एकदा हे गृहितक धरले की त्यावरील हे प्रश्न तयार होतात. त्यांच्या उत्तरांसाठी कदाचित अधिक गृहितकांची गरज पडते. (कावळा शिवणे, पाणी शिंपडणे).

पहिल्याच गृहितकापाशी आपण अडलो, त्याचे विश्लेषण केले, गृहितकांच्या संख्येबाबतचे फायदे तोटे पाहिले. तर तेच नाकारता येते. त्यामुळे पुढचे प्रश्न पडायचा संबंधच नाही.
हे करण्याला एकच भीति असते ती म्हणजे 'मला काही फारसे कळत नाही. अमुक व्यक्ति/पुस्तके यातून मला हे कळले आहे. त्यांना नाकारायची माझ्यात पात्रता (हिंमत) नाही.'.
कदाचित पात्रता नसेल पण बहुतेक विवेकवाद्यांनी ही हिंमत मिळवली. त्यामुळे गृहितक आणि प्रश्नांच्या बाबतीत त्यांचा फायदा झाला. (पुढचे प्रश्न उरले नाहीत.)

प्रमोद

हे राम्!

आपला मूळ लेख वाचून मला असे वाटले होते की आपण आपल्याला अनुभवयाला लागलेला एक कटू प्रसंग व त्या बद्दलचे आपल्या मनातले विचार हे सांगून अशा वेळी माणसाची मन:स्थिती कशी दोलायमान होते हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहात. परंतु या प्रसंगाच्या निमित्ताने आपण काहीतरी भाकड समजुतींचा वापर करून अंधश्रद्धा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहात हे मला त्या वेळी समजले असते तर मी माझा त्या वेळचा प्रतिसाद नकीच दिला नसता. तो मी मागे घेत आहे.
आता आपल्या या लेखनाविषयी;

याविषयावर खुप चिंतन झाले आहे. डिस्कवरी वर या आत्म्याचा शोध घेण्याचा पाश्चात्यांद्वारे देखील प्रयत्न झाला आहे., पाश्चात्यांमधेही पवित्र पाणी शिंपडुन जागा श्बुध्द करणे प्रकार होत असतात.
100 वर्षांपूर्वी भारतातल्या नेटिव्हांची जशी मनोधारणा होती तशीच आज आपली " गोरा साहेब म्हणतो म्हणजे ते बरोबरच असणार!" अशीच आहे हे बघून हसावे की रडावे हे कळेनासे झाले आहे.
ज्या लोकांत तो आत्मा ५०-६० वर्षे रहात असतो तो देह निष्प्राण झाल्यानंतर लगेच तुटतो कि तेथे वेगळ्या पध्दतीने ते दाखवित असतो? येथे धर्माचा किंवा संप्रदायाचा विषय नसुन एकंदरीत हे जिवन संपल्यानंतर देखील त्यावर आपले प्राबल्या दाखविण्याचा प्रयत्न हे चैतन्य करित असते काय?
आत्मा म्हणजे कोलन बॅक्टेरिया आहे का? की तो शरीराला धरून 50,60 वर्षे राहतो. 2000 वर्षापूर्वीचे तत्वज्ञान त्यावेळेस ठीक होते. 21व्या शतकात असले विचार करणे म्हणजे फक्त वैचारिक अडाणीपणाचे लक्षण आहे. या शिवाय दुसरे काही नाही.
अंधश्रध्दा, भावना याच्या पलिकडे जाउन विचार करणे जरुरेचे आहे असे मला वाटते याबाबतीत मी आपल्याशी पूर्ण सहमत आहे. असले अडाणी आणि बुद्धीवैभवाचा अभाव दर्शक विचार सोडून देऊन एखाद्या मानवी देहाचे मरण आणि एखाद्या मुंगीचे मरण यात काहीही मूलभूत फरक नाही हे आपण लक्षात घेतलेत तर असले विचार कोणत्याही विचारी मनुष्याला त्याजच आहेत हे आपल्या लगेच लक्षात ये ईल.
हे जिवन संपल्यानंतर देखील त्यावर आपले प्राबल्या दाखविण्याचा प्रयत्न हे चैतन्य करित असते काय? हे प्रश्न अनुत्तरित आहेत्. हे सर्व खोटे आहे असे आधुनिक लोक म्हणत असले तरी ते पटविण्याजोगे भरिव असे काहि ते देत नाहीत.
हे आपण कशावरून शोधून काढलेत? एका दु:खद प्रसंगानंतर आपल्या मनात काही विचार आले याचा अर्थ चैत्यनाने जीवन संपल्यावर त्याचे प्राबल्य दाखवण्याचा कसा काय केला? हे समजू शकत नाही. आणि मुळात मनातले विचार खरे आहेत किंवा खोटे हे इतर लोक कसे पटवू शकतील. ज्ञानेश्वर यां पासून ते रिचर्ड फेनमन या सर्व विचारवंतांनी मांडलेली चैतन्य ही संकल्पना मी पूर्णपणे मानतो. या चैतन्याबद्दल काही चर्चा आपण या प्रतिसादात केली होती. त्या चैतन्य या संकल्पनेचा माणसाच्या आयुष्यातील घटनांशी जोडणे याला एक हास्यास्पद प्रयत्न या शिवाय दुसरे काहीही म्हणणे शक्य नाही.
मला फक्त आश्चर्य एवढेच वाटते आहे की 21व्या शतकात या पद्धतीचे विचार एवढ्या गांभीर्याने सुशिक्षित मंडळी कशी करू शकतात?

घाटपांडे काका तुमच्या समोर केवढे मोठे आव्हान उभे आहे याची कल्पना आली का?

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

एकदम बराबर

माझ्यासारखे अनुभव बर्‍याच लोकांना आलेही असतील परंतु शहाण्या आधुनिक लोकांत आपले म्हणणे मुर्खपणा ठरेल म्हणुन सुज्ञ लोक गप रहाणे पसंत करत्तात. एवढेच.

बराबर बोल्ला राव. म्हून आम्हीबी काय बोलत न्हाय. :-)

अगम्य गोष्टी सिद्ध करता येत न्हाय.
आन अगम्य गोष्टीचा कार्यकारणभाव जोडता येत न्हाय.
म्हून त्य गोष्टी नाय अस्सं काय म्हणता येत न्हाय.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

कावळ्यांच्या उपक्रमवर

घाटपांडे काका तुमच्या समोर केवढे मोठे आव्हान उभे आहे याची कल्पना आली का?

कावळ्यांच्या उपक्रमवर यापुढे पिंडाला शिवायला जायचे कि नाही यावर कावकाव चालू केल्याचे वृत्त आहे.
घाटपांड्य़ांसमोर अनेक आव्हाने आहेत. हैयोंच्या दिवाळी अंकातील लेखाला तर रिटेंनी आठवण करून दिलेले आव्हान आहे. पण पैशाच्या हिशोबाचा प्रश्न काढून काढून ओकांची जिरवली म्हणण्यात त्यांना समाधान मिळते आहे ते तसेच मिळो.
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

क्रेडीट

पण पैशाच्या हिशोबाचा प्रश्न काढून काढून ओकांची जिरवली म्हणण्यात त्यांना समाधान मिळते आहे ते तसेच मिळो.

ओ शशिओक,
पैशाचा हिशोब द्या म्हणून विनंती मी केली होती. तुमची जिरवण्याचे क्रेडीट मला जाते.

शंका

ओक यांनी वीजल शब्द वापरला आहे. जिरल्याचे अजूनही मान्य नाही (पैसे मिळत नाहीत ही माहिती त्यांनी मुद्दाम धक्कातंत्रासाठी जपून ठेवली असल्याची शक्यता आहे), केवळ जिरल्याचे समाधान असा मोघम उल्लेख आहे.

 
^ वर