विकी लिक्स विरूद्ध अमेरिकन सरकारः तुम्ही कोणत्या बाजुला?

विकी लिक्सने उघडलेल्या २५०,००० गोपनीय कागदपत्रांमुळे उठलेले वादळ शमण्याचे लक्षण दिसत नाही. यात केवळ अमेरिकाच नाही तर जगातील अनेक राष्ट्रांची/त्यांच्याबद्दलची माहिती थेट/संदर्भाने उघड होते आहे / झाली आहे. त्याच बरोबर अमेरिकेचे दुटप्पी धोरणही दिसत आहे. मात्र अमेरिकेनेआशी कागदपत्रे उघड करणे राष्ट्रीय सुरक्षेच्या विरुद्ध मानले आहे.

विकी लिक्स मुळे अमेरिकन सरकारचे दुटप्पी धोरण, "ग्राहक राष्ट्रांसाठी" गुंडाळलेले/बदललेले/वाकवलेले नियम, त्रयस्थ राष्ट्रांबरोबरचे गुप्त समझौते / व्यापार / व्यवहार, प्रसंगी शत्रु राष्ट्राबरोबरचे व्यावारी संबंध वगैरे माहिती उघड झाली आहे. अमेरिकन सरकारचे अधिकृत धोरण आणि प्रत्यक्षातली कृती / व्यवहार यांतील तफावत विकि लिक्सने जनतेच्यासमोर आणली आहे. त्यामुळे काहि मंडळी विकी लिक्स ला पाठींबा देताहेत.

तर दुसरीकडे अमेरिकन सरकारच्या मते उघड झालेल्या माहितीमुळे अमेरिकेचे परदेशांत असलेले नागरीक व सौनिक यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच अमेरिकेचे परराष्ट्रसंबंध तसेच नेत्यांची, नागरीकांची व पर्यायाने देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे.

हा चर्चा प्रस्ताव "विकी लिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार" यांत तुम्ही कोणाची बाजु घ्याल आणि का? याची चर्चा करण्यासाठी मांडत आहे. काहि मुद्दे/प्रश्न चर्चेला दिशा देण्यासाठी देत आहे. मात्र चर्चा या विषयाशी संबंधीत अन्य दृष्टीकोनातून करण्यास हरकत नाहि.

  • तुम्हाला विकी लिक्सने अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करणे योग्य वाटते का?
  • तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
  • तुम्हाला एखाद्याने पाकिस्तानमधील अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
  • जर निवडून दिलेले सरकार जनतेला जे सांगते त्यापेक्षा वेगळे प्रसंगी विरुद्ध व्यवहार/कृती करत असेल व ते एखाद्याने उघड केले तर तो राष्ट्रद्रोह आहे असे तुम्हाला वाटते का?
  • सध्या चाललेल्या विकीलिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार यांपैकी कोणाची बाजु तुम्ही योग्य समजता व का?

प्रतिसाद बर्‍यापैकी अवांतर असल्यास वेगळा चर्चाविषय उघडावा. वैयक्तीक गप्पा / वाद / चर्चांसाठी खरडवही / व्यनि चा वापर करावा.

विदा व चर्चाविषय ह्या बातमीवर बेतला आहे.

Comments

चांगला विषय, धन्यवाद

होय
होय
होय
नाही
विकीलीक्स. अशी धोरणात्मक माहिती गुप्त ठेवण्याचा नियमच मुळी लबाडी करण्याच्या इच्छेतून येतो. त्याविरुद्ध "बाय एनी मीन्स" लढा आवश्यक आहे.

माझे मत

चर्चा वाचण्यास उत्सूक आहेच तुर्तास माझे मतः

* तुम्हाला विकी लिक्सने अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करणे योग्य वाटते का?
* तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
* तुम्हाला एखाद्याने पाकिस्तानमधील अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?

होय.
मुळातच माहिती आणि गोपनीयता हे एकत्र असणे मला मान्य नाही. सरकार जे काही करते त्याची माहिती नागरीकांना हवीच. पारदर्शक कारभार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकार म्हणजे राजे नव्हेत. ते केवळ आमचे प्रतिनिधी आहेत. सुरक्षा व्यवस्था, व्यापार, देवघेवी, परराष्ट्र धोरण ह्या गोष्टी देखील गोपनीय असता कामा नयेत. आणि होणारे व्यवहारही त्या अनुशंगाने होताहेत की नाही हे ही जनतेला माहित असणं मला अत्यावश्यक वाटतं.

* जर निवडून दिलेले सरकार जनतेला जे सांगते त्यापेक्षा वेगळे प्रसंगी विरुद्ध व्यवहार/कृती करत असेल व ते एखाद्याने उघड केले तर तो राष्ट्रद्रोह आहे असे तुम्हाला वाटते का?

अर्थातच नाही

* सध्या चाललेल्या विकीलिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार यांपैकी कोणाची बाजु तुम्ही योग्य समजता व का?

विकिलिक्स

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

उत्क्रांती

ऋषिकेश यांनी आणि मी दिलेल्या उत्तरांप्रमाणे वागणार्‍या सरकारचा 'इव्होल्यूशनरी डिसऍडवांटेज'मुळे र्‍हास होईल असे वाटते. उत्क्रांती ग्रीडी असते याचे हे चांगले उदाहरण आहे. अन्यथा राष्ट्रव्रत आहेच ;)
अवांतराबद्दल क्षमस्व.

काही उत्तरे

होय
होय
होय
नाही
दोन्ही (!)
- - -

जागतिक लोकशाही शासन नाही. तोवर मुत्सद्देगिरीमध्ये गोपनीयता येणारच. कुठल्याही वाटाघाटीत "कमीतकमी काय घेऊ" ही बाब गोपनीय असणार. वाटाघाटीमध्ये त्या "कमीतकमी"पेक्षा अधिक काही मिळाले, तर हवेच असते. मात्र "काही प्रमाणात गोपनीयता नागरिक-हिताची आहे" इतकेच म्हटले तर चालायचे नाही. शासने तेच कारण सांगून नागरिक-हिताची नसलेली गोपनीयताही गळी घालतात. म्हणून अधूनमधून गोपनीयता भंग करणारे कोणी हवे.

आणि कालांतराने सर्वच शासकीय गोपनीयता उघड व्हावी. (१०-५० वर्षांनी? काय तो आकडा मी सांगू शकत नाही.)

सहमत

बरोबर हा मुद्दा लक्षात आला होता. आणि मी लोकशाही देशांतील माहितीबद्दल बोलत आहे अस डिस्लेमर टाकणार होतो. पण प्रस्ताव/ प्रतिसाद दोन्ही लिहिताना विसरलो. तो दिल्याबद्दल आभार.
दुसरे असे की जर काहि परिस्थितीमुळे (जसे युद्धप्रसंगी) काहि माहिती गोपनीय ठेवली तरी ती परिस्थिती निवळल्यावर काहि काळात प्रकाशित व्हावी या मताशी सहमत आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+१ आणि पुढे अजून

वरील प्रतिसादाशी सहमत! मात्र मूळ प्रश्नांसंदर्भात अजून काही मते कारण नुसते "होय/नाही" मधे त्याला न्याय मिळेल असे वाटत नाही. :

* तुम्हाला विकी लिक्सने अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करणे योग्य वाटते का?

काळ-वेळ पाहून आणि नक्की काय साध्य होणार आहे याचा विचार करून करावे इतकेच वाटते.

* तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?

वर जे अमेरिकेच्या बाबतीत म्हणले आहे तेच भारताच्या बाबतीतही. मात्र भारतात आपले राजकारणी मुरलेले असल्याने इतके लेखी पुरावे ठेवतील असे वाटत नाही. शिवाय असे उघडकीस येणार म्हणल्यावर पुरावे म्हणण्यापेक्षा जाळावे म्हणण्याचा "आदर्श" आपण ठेवू शकतोच. ;) आपली वृत्तपत्रे साधे बरखागेट बाहेर येऊन देत नाहीत अर्थात लपवत आहेत. आज रतन टाटांनी सुप्रिम कोर्टात जाऊन माहीती वाचवण्याची विनंती केली आहे. त्या बातमीत देखील बरखा दत्त/वीर सिंघवीचा साधा उल्लेख करायची हिंमत टाईम्स ऑफ इंडीया मधे दिसत नाही. :(

* तुम्हाला एखाद्याने पाकिस्तानमधील अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?

काही इंटरेस्ट नाही. आपल्या गुप्तचर खात्याने ती माहिती मिळवून जर सरकारने त्याच योग्य वापर केला तर जास्त योग्य वाटेल... नाहीतर अशा फुटलेल्या माहीतीचा वापर तेथील सरकारच्या विरोधात जनतेला पेटवण्यासाठी अल कायदा अथवा तालीबान सारख्या संघटना करतील आणि अधिकच अस्थिरता आपल्या सीमेलगत तयार होईल जे आपल्यासाठी चांगले नाही... एकूणच व्हिसलब्लोअर प्रकार लोकशाही राष्ट्रांसाठी योग्य आहे. जिथे लोकशाही नाही तेथे व्हिसलब्लोअरपेक्षा सशस्त्र/नि:शस्र क्रांतीच होणे महत्वाचे.

* जर निवडून दिलेले सरकार जनतेला जे सांगते त्यापेक्षा वेगळे प्रसंगी विरुद्ध व्यवहार/कृती करत असेल व ते एखाद्याने उघड केले तर तो राष्ट्रद्रोह आहे असे तुम्हाला वाटते का?

ह्याचे उत्तर देखील स्थलकालसापेक्ष असेल.

* सध्या चाललेल्या विकीलिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार यांपैकी कोणाची बाजु तुम्ही योग्य समजता व का?

अमेरिकन सरकार जे काही करत आहे त्यात अमेरिकन स्वार्थ आहे, त्यांना काय साध्य करायचे आहे ते थोड्याफार फरकाने समजू शकते. विकीलीक्स जे करत आहे त्यात नक्की त्यांचे हेतू काय आहेत हे माहीत नाहीत. ते देखील कोणी जाहीर केले तर कुणाची बाजू अधिक योग्य ते समजू शकेल.

-------------------------

अवांतरः ज्या आयडी स्वत:चे नाव लपवत गोंधळ घालतात त्यांची खरी नावे "उपक्रमलिक्स" वर जाहीर करायची का? ;)

अवांतर

अवांतरः ज्या आयडी स्वत:चे नाव लपवत गोंधळ घालतात त्यांची खरी नावे "उपक्रमलिक्स" वर जाहीर करायची का? ;)

नाही. त्यांची गोंधळ घालण्याची प्रवृत्ती अजून वाढेल. अमेरिका सुद्धा "गोपनीय" माहीती अतिगोपनीय ठेवत जाईल. आणि हिटलिस्टवर ओसामाच्यावर विकीलिक्स असेल.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

सहमत!

धनंजय ह्यांच्याशी १०० टक्के सहमत!

जगभराच्या प्रतिक्रिया वाचून, ऐकून मजा आली. वेळोवेळी असेच व्हायला हवे.

आंतर्गत हेरगिरी

या चर्चेमागे मुळात प्रश्न 'सरकारला काही विशिष्ट माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार आहे का? असावा का?' असा वाटतो. आदर्श व्यवस्थेत तसा तो नसावा असं मला वाटतं. आदर्श व्यवस्था म्हणजे जिथे युद्धं नाहीत, शत्रु राष्ट्र नाहीत, हेरगिरी नाही... मात्र जर आपले हेर परदेशात पाठवणं, अनधिकृतरीत्या इतर देशांमध्ये कारवाया करणं हे सरकारकडून जनतेला अपेक्षित असेल तर त्यांची माहिती फक्त मोजक्या लोकांना असावी ही सरकारची अपेक्षा रास्त वाटते. केक खायलाही हवा आणि जपूनही ठेवायचा हे दोन्ही साध्य कसं करणार?

प्रश्न असा येतो की या रास्त अपेक्षेतून मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर होतो आहे का? तसा तो होऊ नये यासाठी अधूनमधून काही जबाबदार प्रकाशनसंस्थांना आपल्या मार्गाने अशी माहिती मिळवून ती प्रसिद्ध करता यावी. ही एक प्रकारे आंतर्गत हेरगिरीच आहे. शत्रुवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी जनता सरकारतर्फे जशी हेरगिरी करते, तशीच सरकारवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी प्रकाशन संस्थांतर्फे हेरगिरी देखील व्हावी. इथे ती दुधारी तलवार सरकारवर उलटते. आम्ही (सरकार) करणार तीच हेरगिरी योग्य व इतरांची (जनतेची) चूक हे म्हणता येत नाही.

तेव्हा माझं थोडक्यात मत असं की तूर्तास तरी दोन्ही हेरगिऱ्या चालू राहाव्या. मात्र दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये. म्हणजे सरकारने आपल्याला गैरसोयीची माहिती दडपून ठेवू नये. व प्रकाशकांनी आपल्या हाती माहिती आली तर ती प्रसिद्ध करण्यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका नाही याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करावा.

मूळ बातमीत ती माहिती काय स्वरूपाची होती याचा अंदाज येत नसल्याने वरील भूमिकांच्या आधारे कुठच्याच पक्षाची बाजू घेता येत नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उत्तरे

होय
होय
होय
नाही
विकीलीक्स.

असांजला अटक आणि बरेच प्रश्न

असांजला अटक झाल्याची बातमी वाचनात आली. नको असलेल्या व्यक्तीचा काटा काढण्यात आला असावा अशी प्राथमिक प्रतिक्रिया मनात आली.

त्याने केलेल्या लैंगिक शोषणाचा तपास करत आहेत म्हणे. पण विकिलिक्स मधून केलेल्या लिक्सचे काय होणार? काही वेळा न्यायालये स्वतःच्या अखत्यारीत एखादी केस नोंदवून घेतात. आंतरराष्ट्रीय न्यायालय किंवा संघटनांची केबल लिक्सवर काय प्रतिक्रिया आहे? भारताची अधिकृत प्रतिक्रिया हा अमेरिकेचा अंतर्गत मामला आहे अशी आहे. भारत-अमेरिक सबंधाबाबतची गोपनीय माहिती भारताला समजली तर ती अमेरिकेचा अंतर्गत मामला कशी होऊ शकते? थरूरम्हणतात विकीलिक्स अनैतिक आहे. हीच माहीती गुप्तचर संस्थेने शोधली असती तर ती अनैतिक होऊ शकते का? भारताने नोबेल पारितोषिक सोहळ्याला उपस्थित राहू नये असा चीन दबाव आणत आहे. मग चीनला भारत असं का सांगत नाही ही तुमची अंतर्गत बाब आहे?

एकंदरीत जागतीक राजकारणही आपल्या "आदर्श" राजकारणाइतकंच किंवा जास्त सडेल आहे. 'विश्वची माझे घर' म्हणण्यापेक्षा 'गड्या आपलं घर बरं म्हटलं 'तर काय चुकलं? गाव पण नको.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

बॉलिवूड चित्रपट

नको असलेल्या व्यक्तीचा काटा काढण्यात आला असावा अशी प्राथमिक प्रतिक्रिया मनात आली.

माझ्या मनात युरोप आणि अमेरिकी सरकार जास्त बॉलिवूड चित्रपट बघू लागले की काय अशी शंका आली. ;-) तसेच लवकरच त्यांच्या सहकार्‍यांना अफरातफर, फसवणूक, अल्पवयीनांचे शोषण वगैरेंवरून अटकही होऊ शकेल.

राज

राज ठाकरे ह्यांना किणी खटल्यात गोवले गेले, त्यावेळी आपल्याला अशीच शंका आली होती का ?

(सिरीयस ब्लॅक ला १२ मगल्स च्या हत्येत गोवले, तेव्हा आमची खात्री झाली होती.)

- अल्बस

--
|| लव्ह, टॉम, लव्ह. ||

राज

राज ठाकरे ह्यांना किणी खटल्यात गोवले गेले, त्यावेळी आपल्याला अशीच शंका आली होती का ?

"राज"कारण्यांना* आम्ही आमच्या निकषातून आणि निष्कर्षातून वेगळे ठेवतो. त्यांच्याकडे अपवाद म्हणून पाहावे.

* देशातल्या आणि आंतरजालावरल्याही.

चीन-भारत आणि नोबेल

भारताने नोबेल पारितोषिक सोहळ्याला उपस्थित राहू नये असा चीन दबाव आणत आहे. मग चीनला भारत असं का सांगत नाही ही तुमची अंतर्गत बाब आहे?

आताच ही बातमी वाचली. माझ्या एका प्रश्नाला उत्तर मिळालं.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

 
^ वर