मलावीचा २०१० चा राष्ट्रध्वज
भारताची राजधानी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ३ ऑक्टोबर २०१० ला एकोणीसावा राष्ट्रकुल क्रिडास्पर्धेचा स्वागत समारोह सोहळा झाला होता.
डोळे दिपवणारा, अतिशय चांगला समारंभ झाला होता.
ह्या स्पर्धेत ७१ देश सहभागी झाले होते. ह्या स्वागत समारोहाच्या वेळी प्रत्येक देशांच्या खेळांडूंनी अतिशय दिमाखात आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व केले होते.
मलावी देशाच्या संघाची ज्या वेळी ओळख करून देण्यात येत होती, त्या वेळी माझे लक्ष मारी वायाच्या (Mary Waya) हातातील राष्ट्रध्वजाकडे गेले. तो मारी वायाच्या हातातील ध्वज घेतलेला फोटो जालावर शोधण्याचा प्रयत्न केला. पण सापडला नाही. असो.
२००९ मधील उपक्रमाच्या दिवाळी अंकातील एका लेखात असलेल्या राष्ट्रध्वजाच्या माहितीपेक्षा हा ध्वज थोडा वेगळा वाटत होता.
मलावी देशाच्या राष्ट्रध्वजाची अधिक माहिती जालावर शोधली असता असे आढळलेकी २९/०७/२०१० ला ह्या राष्ट्रध्वजातील सूर्याच्या प्रतीकात बदल केला गेलेला आहे. त्याच बरोबर ध्वजावरील लाल, काळा व हिरव्या रंगाच्या पट्ट्याच्या क्रमातपण बदल केला गेला आहे. सर्वात वरती लाल , मध्यभागी काळ्या व सर्वात खाली हिरव्या रंगांच्या पट्ट्या आहेत. आधीच्या सगळ्यात वरच्या पट्टीवरील उगवत्या सूर्याचे रुपांतर मध्याभागातल्या पट्टीवर पांढर्या रंगाने 'पूर्ण सूर्यात' केले गेले आहे. हा पूर्ण उगवलेला सूर्य, आझादी नंतर देशाने केलेल्या आर्थिक प्रगतीचे द्योतक आहे.
Comments
आधी तिकडे होता की काय
रु. चे चिन्ह काढणारा आधी तिकडे होता की काय असे वाटले त्या आधीच्या झेंड्याकडे पाहून. आताचा झेंडा चांगला आहे.
वा!
उगवलेला सूर्य आता तळपणारा सूर्य झाला म्हणजे देशाची प्रगती झाली असे मलावी देशाला वाटत असेल तर आनंदच आहे. हा सूर्य उतरणीला न जावो.
पण रंगांचे पट्टे का बदलले बरे? त्यातून काय सांगायचे आहे?
रंगांचे पट्टे का बदलले बरे?
रंगांचे पट्टे का बदलले बरे?
मलावी हा एक आफ्रिकन देश आहे. आफ्रिकन देशांचे बरेचसे ध्वज पॅन् आफ्रिकन ध्वजाचा वापर, आपल्या देशांचे त्यावर प्रतीक रेखाटून करतात. १९२० पासून हा ध्वज अस्तित्वात आहे.
लाल रंगाचा वापर आफ्रिकन् लोकांच्या रक्त, जे आफ्रिकन लोकांना एकत्र येण्यासाठी कारणीभूत होतं त्याचे प्रतीक आहे.
काळया रंगाचा वापर काळ्या रंगाच्या लोकांच्या देशांच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे.
हिरवा रंग नैसर्गिक संपत्तीचे प्रतीक आहे.
मलावी देशाच्या राजकीय (Democratic Progressive Party) गटाने सरकारच्या विरोधात जावून नव्या ध्वजाचे रेखाटन केले आहे.
संदर्भ : विकि.