काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण

काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण असा सामान्य वाचकांचा ग्रह होणे स्वाभाविक आहे.

तथापि, हैयो हैयैयो हे भारतीय व परदेशी भाषातज्ञ तर आहेतच शिवाय ७० पेक्षा जास्त प्राचीन ग्रंथम पासून ते फारसी, अरबी लिपींचे तज्ञ अभ्यासक आहेत. त्यांच्या अभ्यासपुर्ण या लेखनानंतर नाडी ग्रंथांकडे पहायची लोकांची मनोवृत्ती बदलेली आहे असे जाणवते.
ताडपट्यात खरोखरीच तमिळ भाषा असते का व अन्य मुळभूत शंका पुर्वी पासून उपस्थित केल्या गेल्या त्याचे निराकरण हैयोंच्या लेखातील जन्मदिनांकाचे व नवग्रहस्थितीचे वर्णन वाचून करणे आगत्याचे ठरले आहे.
खोलवर विचार केल्यावर नाडी ग्रंथांची पर्यायाने ओकांची टिंगल टवाळी करून चेष्टेवारी नेण्याचा हा विषय नाही, ही बाब वाटते तितकी हलकी फुलकी किंवा टाळून विचारावेगळी करायला येत नाही असे हैयोहैयैयोंनी नाडी ग्रंथावर तमिळभाषेच्या अनुशंगाने अभ्यासकार्य चालू केल्यापासून लक्षात येते. ते कसे ते पहा तर -
आता विविध आक्षेपांच्या संदर्भात विचार नीट वाचल्यावर त्यातून काय काय परिस्थिती उपस्थित होते याची झलक खाली मिळेल.

1. पहिला आक्षेप असा असतो की या ताडपट्ट्यात काहीही लिखाण कुठल्याही भाषेत केलेले नसते. त्या कोऱ्याच असतात. भासवले असे जाते की नाडीवाचक त्यात पाहून त्यातील मजकूर वाचतो आहे.
उत्तर - आता त्या ताडपट्टया कोऱ्या असतात की कि काहीतरी का होईना लिहिलेल्या असतात हे शोधणे हे काम केले पाहिजे. ते काम नाडी भविष्य केंद्रातजाऊन प्रत्यक्ष शोधकरून त्यांच्याकडील उपलब्ध ताडपट्टया पडताळाव्या लागतील. हैयोंनी व प्रस्तूत लेखकाने विविध केंद्रात जाऊन नाडीपट्यांचे फोटो सादर करून असे अभ्यासकार्य केले आहे. तसे केले असता त्या संपूर्णतः कोऱ्या नसतात. त्यावर मजकूर लिहिलेला असतो. हे लक्षात येते. त्यामुळे या आक्षेपातील खोटेपणा सिद्ध होतो.
2. दुसरा आक्षेप असा असतो की चर्चेसाठी जरी त्या ताडपट्ट्यात मजकूर असतो असे मानले तरी त्यातून नेमकी कुठली भाषा असते याचा अर्थबोध होत नाही.
उत्तर - यावर सोपे उत्तर असे की सध्या जे नाडी ग्रंथ पट्टीवाचनाचे काम करतात ते सर्व तमिळभाषी आहेत. ते यातील मजकूर वाचून दाखवतात अणि तो मजकूर परत एका ४० पानी वहीत सध्याच्या प्रचलित तमिळ लिपित पुन्हा लिहून काढतात. यावरून त्या मजकुराची भाषा तमिळ का अन्य कोणती असावी याची खात्री करता येते. या उलट ताडपट्ट्यांचे वाचन करणारे तमिळभाषिक सोडून अन्य भाषिकांतर्फे होते वा केले जाते असा पुरावा उपलब्ध करावा लागेल. तो तसा होत नाही. आक्षेप असा खोडून निघतो. शिवाय हैयोंनी नुकत्याच प्रकाशित लेखात नाडी पट्टीतील काही श्लोकांचे तमिल व देवनागरीतून केलेले कथन नाडी पट्टीतील भाषा प्रत्यक्ष तमिलच आहे असे निर्णायकपणे सिद्ध करते,
3. तिसरा आक्षेप असा की जरी मानले की ताडपट्टी मजकूर लिहिलेला असतो. त्याची भाषा तमिळ असते तर ती सामान्य तमिळ भाषिकाला का वाचायला येत नाही? त्या अर्थी नाडीपट्टी वाचन हा एक तमिळ नाडीवाचकांचा देखावा असतो.
उत्तर – असे लक्षात येते की सामान्य तमिळभाषिकांना या ताडपट्ट्यांवरील मजकूर वाचायला येत नाही किंवा आला तरी अर्थबोध होत नाही. याचे मराठी भाषिकांना पटेल असे स्पष्टीकरण असे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला गेला आहे. तरीही त्यातील छापील मराठीतील ओव्यांचा अर्थ सर्वसामान्य मराठी समजणाऱ्याला समजायला कठीण जाते. आता तीच ज्ञानेश्वरी जर मोडी भाषेत लिहून सध्याच्या मराठी वाचकाला दिली तर त्याची काय अवस्था होईल? त्याला नेमके काय लिहिलेले आहे याचा अर्थ बोध होणार नाही पण कोणी ती मोडी लिपि-भाषातज्ञ वाचायला लागले तर थोडा थोडा अर्थ कळेल. तोच अर्थ ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेल्या जाणकार मंडळींनी फोडकरून सांगितला की 'ओहो, असा अर्थ आहे!' असे उद्गार ओठी येतील. नेमके तेच सामान्य तमिळ भाषिकांचे होते असे हैयोंनी नाडी ग्रंथातील ओळी ओळींचा अर्थ फोड करून सादर केलेल्या पुराव्यावरून सिद्ध होते. त्यामुळे या आक्षेपात बिलकुल तथ्य नाही. हे लक्षात येते.
4. आक्षेप चौथा असा की सामान्य तमिळांना जरी ती वाचता आली नाही तरी ती तमिळ भाषातज्ञांनी तरी वाचून कुठे मान्य केली आहे?
उत्तर – या तऱ्हेचे अभ्यासकार्य अनेक वेगवेगळ्या पुर्वी पासून तमिळ भाषा तज्ञांकडून विविध ठिकाणी झाले आहे. तथापि अजूनही त्यांच्याकडून ते आणखी पद्धतशीरपणे व्हावे यासाठी हैयोहैयैयोंच्या बाजूने प्रयत्न करणे जारी आहे. श्री लंकेतील डॉ. अरसे कुलरत्ने अणि लंडनस्थित डॉ. एस. संबंधम या दोघांनी अत्यंत परिश्रमपुर्वक दोन भागांचा एका अभ्यास निबंध सन २००२ मधे लिहून प्रकाशित केला. त्यात त्यांच्या शोधाचा महत्वाचा निष्कर्ष होता की खरोखरच नाडीच्या ताडपट्ट्यात त्यांच्या संबंधातील नावे कोरलेली होती. त्यांनी तो शोध निबंध आभिप्रायार्थ पुनर्जन्मावर आयुष्यभर काम केलेल्या स्व. डॉ. आयन स्टीव्हन्सन यांना अमेरिकेत पाठवला होता. त्यात त्यांनी असे म्हटले होते की मी यावर तत्वतः विश्वास ठेऊ शकत नाही. तरीही असा नाडी ग्रंथांचा पुरावा खरोखर असल्यास तो अविश्वसनीयच नव्हे तर सध्याचे प्रस्थापित शास्त्राचे नियम उलथुन टाकणारा आहे असे सिद्ध होईल. तथापि यावर आणखी अभ्यास कार्य करावे लागेल. तेच काम हैयोंनीआता हाती घेतले आहे.
या पुराव्यांच्या संदर्भात विशेष उल्लेख करावा लागेल की नाडी ग्रंथ भविष्याच्या दि १४ ऑक्टोबर २००७ साली पुण्यात झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद चेन्नईच्या इन्स्टिट्युट ऑफ एशियन स्टडीज या तमिळ भाषेतील इंडॉलॉजीवर काम करणाऱ्या व विशेषतः ताडपत्रांच्या ग्रंथांवर शोधकाम व त्यांचे संरक्षण करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक, चालक डॉ. जी जॉन सॅम्युएल यांनी स्वीकारले होते. त्यांच्या सोबत त्याच संस्थेच्या ताडपत्रशोध विभागाच्या प्रमुख तमिळतज्ञ श्रीमती लक्ष्मी यांनाही बोलावले गेले होते. त्यांनी उपस्थितांसमोर त्या पट्टीतील अणि अन्य एका नाडीपट्टीतील मजकूर व विशेषतः नावे वाचून ती खरोखरीच ताडपट्टीत कूट तमिळ भाषेत कोरून लिहिलेली आहेत असा असल्याचा निर्वाळा दिला.
जर्मनीत थॉमस रिटर नावाच्या एका नाडी भविष्यावर जर्मन भाषेत पुस्तके लिहिलेल्या व्यक्तीने तेथील तमिळ भाषेतील तज्ञाकडून नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्टीतील मजकूर वाचून तो भविष्य कथन सोडून अन्य धार्मिक लेखन नसल्याचा निर्वाळा दिला असा उल्लेख त्यांच्या ''द सीक्रेट ऑफ इंडियन पामलीफ लायब्ररीज्" पुस्तकात केलेला आहे.
यापुढे जाऊन हैयहैयैयो त्या ताडपट्ट्यात व्यक्तीच्या बाबत अन्य तपशीलाचे उल्लेख, कसे असतात याचा अभ्यास करून या ताडपट्यांचे फोटो मिळवून यावर आणखी कार्य होणे अपेक्षित आहे.
5. आक्षेप पाचवा असा की नाडी ग्रंथ भविष्य सध्याच्या प्रचलित विज्ञानाच्या विरोधात जात असल्याने त्याला कितीही पुराव्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न निष्फळ आहे.
उत्तर - नुकताच एका सदस्याने हैयोंच्या लेखातील वर्णित एका व्यक्तीच्या जन्मतारखेला हैयोंनी नव्हे नाडी महर्षींनी कथन केलेला वार चुकीचा होता असे म्हणून आक्षेप घेतला होता. सध्याच्या प्रचलित कॅलेंडर प्रमाणे तो वार बरोबरच होता. मात्र जेंव्हा हैयोंनी त्यांचे ध्यान भारतीस परंपरेतील पंचांगानुसार वाराची गणना करून पहावी असे विनम्रपणे सुचवले त्यानंतर त्या सदस्याने हैयोंच्या विधानाची म्हणजेच पर्यायाने नाडी महर्षिंच्या कथनाला योग्य असल्याचे प्रांजळपणे मान्य केले. हैयोंनी सादर केलेल्या लेखातील जुळ्या बहिणींच्या जन्मवेळेची, दिनांकाची व नवग्रहांच्या स्थितीची नोंद फारच विचार करायला लावणारी आहे.
यापुढे जाऊन हैयोंनी व्यक्तीच्या नावाची नाडी पट्टयातून उकल करून दाखवावी म्हणजे व्यक्तीचे नाव त्याचे आईवडील किंवा वरिष्ठ नातलग ठरवतात व विधिपुर्वक ठेवतात अशी सामान्यपणे मान्यता आहे. या पेक्षा त्यांना तीच नावे ठेवायची प्रेरणा आपोआप घडते की काय यावर विचार करून मते व्यक्त करता येईल.
जर या ताडपट्याच्या मजकुरात व्यक्तीचे नाव व अन्य माहिती त्याने ती न पुरवलेली असता, त्याच्या जन्माच्या आधीपासून केंव्हातरी लिहून तयार असेल तर त्याला काय म्हणायचे? त्याची संगती कशी लावायची? ती संगती मानवी बुद्धीच्या स्तरावर लावता येत नसेल तर त्याला मानवी विज्ञानाच्या कक्षेबाहेरील म्हणजेच इंद्रीयगम्य ज्ञानाने ज्ञात न होणाऱ्या अदभूत शक्तीचा विलास किंवा लीला मानावे लागेल. कदाचित त्रिमितीच्या पलिकडे सध्या अज्ञात अन्य मितींच्या ज्ञानात त्या गूढाचे उत्तर सामावलेले असेल. भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ असा आपण करतो तसा भेद न करता काही गोष्टी घटना ज्ञात करता येऊ शकतात याचा शोध घ्यावा लागेल. मात्र नाडी भविष्य थोतांड मानून त्याच्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून असे म्हणत बसायचे की जर आम्हा विज्ञानवाद्यांनी नाडी ग्रंथांच्या या सत्यतेला तत्वतः मान्यता दिली तर आमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पायाच निखळून पडतो म्हणून आम्हाला नाडी ग्रंथांच्या अस्तित्वाची दखल घेणे मान्य नाही. ही तर वैज्ञानिक विचारांशी प्रतारणा नव्हे काय?

या बाबींवर विचार हैयोंच्या लेखाच्या संदर्भात पुनर्जागृत व्हावा म्हणून हा धागा पुन्हा पुनर्जिवित करावासा वाटला.
य़ाशिवाय नाडी ग्रंथांच्या पट्या नाडी शास्त्री ज्या त्या व्यक्तीला का सुपूर्त करत नाहीत? इतक्या संख्येने लिखाण ठेवायची सोय ते कशी करतात? आदिचा खुलासा नाडीशास्त्रींच्या अखत्यारीतील विषय असल्याने त्याचे शंका समाधान उत्सुकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन करत असताना त्यांच्याशी चर्चा करून समजाऊन घ्यावे असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.

Comments

मी स्वतः

माझा अनुभव येथे देऊ इच्छीतो,

मी २००५ साली एकदा बंगळुरला आलो होतो, तेव्हा होसुरला (२० किमी दुर) कोण्या परिचीतांकडे गेलो होतो (ते तमिळ आहेत). त्यांच्या बरोबर जाता जाता मला नाडी ज्योतीष ची पाटी दिसली. काय आहे ते बघावे म्हणून मी त्याच्या कडे गेलो. त्याने आंगठ्याचा ठसा घेतला व काही वेळात काही पत्त्या घेऊन आला. त्याने मला फक्त हो - नाही हे म्हणायला सांगीतले विचारलेल्या प्रश्नांना. (तो तमिळ मधून बोलत होता व मी इंग्लीश मधून माझे स्नेही भाषांतर करत होते). पत्त्यांवर काही तही कोरलेले मला दिसत होते.

त्याने पहीली पत्ती काढली - म्हणाला - आपली आई आपल्या लहानपणीच वारली.
मी - हो.
तो - आईचे नाव अमुक होते.
मी - नाही.

त्याने ती पत्ती ठेवून दुसरी काढली.

तो - वडील सरकारी खात्यातून निवृत्त झाले.
मी - नाही.

त्याते ती पत्ती ठेवून तिसरी काढली.

वडीलांचे नाव अमुक आहे.
मी - हो.

भाऊ सरकारी नोकरीत आहे.
मी - हो.

बायको अमुक अमुक नावाची आहे.
मी - हो.

आता तो म्हणाला की पत्ती मीळाली. पुढे त्याने ती तामीळ मधुन वाचली व त्याचा माझ्या स्नेह्याने भाषांतर केले.

माझ्या बद्दल चे सगळे आराखडे बरोबर होते. माझे जे व्यक्ती चित्र ते बरोबर निघाले.

काही गोष्टी आता कळते बरोबर पण झाल्या आहेत. आता पुढे बघू.

मला कोणी तरी सांगीतले की ती लोकं आपले मन वाचू शकतात बाकी नाडात काही नाही - हे जरी बरोबर मानले तरी कोणी तरी आपले मन ओळखतो हा चमत्कार नव्हे का.

शंका

आपली पट्टी नेमक्या कुठल्या नाडीकेंद्रात आहे हे कसे समजते? की सगळ्या केंद्रांवर प्रत्येक पट्टीची झेरॉक्स ठेवली आहे?

ज्योतिष, साधना

मी अनेक ज्योतिष, साधना ह्या विषयावरील पुस्तके एका दमात वाचून काढली आहे. त्यात दिलेली कित्येक वर्णने आजही माझ्या लक्षात आहेत व अनेकदा त्याप्रमाणे घडले आहे.

अनेक् का ब्वॉ?

अरे वा! पण मग 'अनेक पुस्तकांची' का गरज पडली? एकच पुस्तक नाही सापडलं वाटतं? नाड्या शोधा कदाचित् सापडेल एखादं.

-Nile

स्मरणपत्र

याचे काय?

सहमत!

ओकांनी आपल्या वार्षिक उत्पन्नाचा साधारण किती वाटा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या नाडी माध्यामातून येतो हे प्रामाणिकपणे कळवावे.
(उपक्रम व्यवस्थापनास जाहिरातींचा दर ठरवणे सोपे जाईल.)

शाखा

सांगा, लवकर सांगा म्हणजे आम्हालाही शाखा उघडता येतील.

नाडीच्या जाहीराती घेतल्यानंतर, उपक्रमावर बंगाली बाबाच्या जाहीराती येणार काय्????

अजूनही खुलासा नाही

ओकांचा अजूनही खुलासा नाही. म्हणजे नाडीतून त्यांना भक्कम कमाई होत असावी असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.

अधिक उकल

ओकांनी आपल्या वार्षिक उत्पन्नाचा साधारण किती वाटा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या नाडी माध्यामातून येतो हे प्रामाणिकपणे कळवावे.

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष याची उकल करावी लागेल. कारण त्यांची पुस्तके वाचुन नाडी केंद्रात उत्सुकता म्हणुन जाणारे हे रंजकतेचे व रोचकतेचे मुल्य नाडी च्या दक्षिणारुपाने देतात. पुस्तक विक्रिच्या माध्यमातुन आलेला पैसा हे मुल्य कदाचित मोजता येईल पण प्रसिद्धी मुल्य आपण कसे मोजणार?
ओकांनी नाडीपुराण फुकटात सांगुन आपली करमणुक केली त्याचे काय?
तसेही आपण आपल्याला मिळालेल्या रुपया आन् रुपयाचा हिशोब आपण आयकर खात्याला प्रामाणीकपणे देतो का? हा प्रश्नही उपस्थित होतो.
प्रकाश घाटपांडे

थोडाच भाग

नाडीशास्त्रा(?)बाबत प्रश्न असे आहेत.

१. नाडीपट्टीवर काही कोरले असते का? असेल तर ते कोणत्या लिपीत असते?

२. विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरावरून योग्य ती पट्टी कशी शोधली ते दाखवून देतात का? उदा. आईचे नाव स अक्षरावरून सुरू होते + वडीलांचे नाव क ने सुरू होते + जन्मस्थान अमुक होते + क्ष् + य् +झ् इतकी माहिती जुळली आहे म्हणून हीच पट्टी आहे असे दाखवून देतात का/देतील का/ द्यायची तयारी आहे का? ते जे काही लिहिलेले/कोरलेले असते ते व्यक्तीचे भविष्य असते का?

३. तोंडाने जे बोलत आहे तेच पट्टीत आहे याची खात्री करून घेता येईल का?

४. ते सांगितलेले भविष्य नंतर खरे ठरण्याबाबत (कुंडली सिस्टिमची घेतली तशी) सांख्यिकी चाचणी घेतली आहे का? घेण्याची तयारी आहे का?

५. ज्या पदार्थावर ते लेखन कोरलेले आहे त्याचे वय तपासले आहे का? हजारो (म्हणजे नक्की किती?) वर्षांपूर्वीच लिहून ठेवलेल्या आहेत का?

या प्रश्नांपैकी हैयो हैयैयो यांनी फक्त क्र १ च्या बाबत लेख लिहिला आहे. त्यावरही अजून चर्चा प्रश्नोत्तरे व्हायची आहेत. त्यामुळे हैयो यांनी अभ्यास करून लेख लिहून ती लिपी तामीळ आहे असे प्रमाणित केले म्हनजे जणू संपूर्ण नाडीशास्त्रावरच शिक्कामोर्तब झाल्याप्रमाणे ओकसाहेब लेखन करीत आहेत.

(मागे कोठेतरी नाडी म्हणजे तांब्याच्या पट्ट्या असतात असे वाचले होते). पण इथे त्याचा खुलासा अजून झाला नाही.

वर चितळे यांनी जो "अनुभव" सांगितला आहे त्यात अत्यंत संदिग्ध आणि असंबद्ध प्रश्नांच्या आधारे तिसर्‍याच प्रयत्नात पट्टी मिळाली असे दिसते. हा जरा जास्तच योगायोग वाटतो. :)

उदा. माझे वडील विदेश संचार निगम मध्ये कामाला असते तर वडील सरकारी नोकरीत होते का? याचे उत्तर १९९० मध्ये हो असे असते तर २००० मध्ये नाही असे असते.

नितिन थत्ते

खुलेपणा हवा, संदर्भ हवेत

तथापि, हैयो हैयैयो हे भारतीय व परदेशी भाषातज्ञ तर आहेतच शिवाय ७० पेक्षा जास्त प्राचीन ग्रंथम पासून ते फारसी, अरबी लिपींचे तज्ञ अभ्यासक आहेत.

त्यांच्याबद्दलची अधिक माहिती व संदर्भ मिळाले (त्यांनी लिहिलेले शोधनिबंध वगैरे) तर यावर विश्वास ठेवता येईल.

खोलवर विचार केल्यावर नाडी ग्रंथांची पर्यायाने ओकांची टिंगल टवाळी करून चेष्टेवारी नेण्याचा हा विषय नाही,

हा विषय निश्चितपणे टिंगल टवाळी करण्याचा नाही तर या पक्षाचे वा त्या पक्षाचे मतपरिवर्तन झाले पाहिजे.
तुमचे पुस्तक अद्याप वाचले नाही. (नुकताच दुकानात जाऊन आलो. मिळाले नाही.)

श्री लंकेतील डॉ. अरसे कुलरत्ने अणि लंडनस्थित डॉ. एस. संबंधम या दोघांनी अत्यंत परिश्रमपुर्वक दोन भागांचा एका अभ्यास निबंध सन २००२ मधे लिहून प्रकाशित केला.

पुस्तकाचे नाव प्रकाशकाचे नाव कळेल का?

जर्मनीत थॉमस रिटर नावाच्या एका नाडी भविष्यावर जर्मन भाषेत पुस्तके लिहिलेल्या व्यक्तीने तेथील तमिळ भाषेतील तज्ञाकडून नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्टीतील मजकूर वाचून तो भविष्य कथन सोडून अन्य धार्मिक लेखन नसल्याचा निर्वाळा दिला असा उल्लेख त्यांच्या ''द सीक्रेट ऑफ इंडियन पामलीफ लायब्ररीज्" पुस्तकात केलेला आहे.

आता हे पुस्तक मी गुगलले तर. शशी ओकांचे एक पुस्तक येथे मिळते.

युरोपमधे काय घडणार हे येथे नाडीपट्टीवरून लिहून ठेवले आहे.

येथे तुम्हाला घर बसल्या (६७ डॉलरमधे) आपली नाडी पट्टी (१४ कंदम का काय) मिळतात.

पण हे पुस्तक कुठे मिळते त्याचा शोध लागत नाही. याचा संदर्भ मिळेल का?

नाडी ग्रंथांच्या पट्या नाडी शास्त्री ज्या त्या व्यक्तीला का सुपूर्त करत नाहीत? इतक्या संख्येने लिखाण ठेवायची सोय ते कशी करतात? आदिचा खुलासा नाडीशास्त्रींच्या अखत्यारीतील विषय असल्याने त्याचे शंका समाधान उत्सुकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन करत असताना त्यांच्याशी चर्चा करून समजाऊन घ्यावे असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.

असे का? या प्रश्नांची उत्तरे नाडीग्रंथांचे प्रसारक देऊ शकत नाहीत का?

प्रमोद

बोंबला!

येथे तुम्हाला घर बसल्या (६७ डॉलरमधे) आपली नाडी पट्टी (१४ कंदम का काय) मिळतात.

ही आहे त्या नाडीवाल्यांनी विचारलेल्या प्रश्नांची यादी (ठसे तर हवेतच, हेही हवे!):

  1. NAME GIVEN AT BIRTH (in full and in block letters).
  2. NAME AT PRESENT (if changed from marriage).
  3. Sex
  4. Email Address
  5. Mailing Address
  6. Birth Place: Country
  7. State
  8. City
  9. Hemisphere
  10. Date of Birth(year-month-day): dd
  11. mm
  12. yyyy
  13. TIME OF BIRTH
  14. Were you born as twins?
  15. Are you handicapped?
  16. Were you adopted?
  17. Mother's name (in full)
  18. Is your mother still alive?
  19. How many times was your mother married?
  20. Your mother work Status
  21. Does your mother live with you?
  22. Father's name (in full)
  23. Is your father still alive?
  24. How many times was your father married?
  25. Does your father live with you?
  26. Your father work Status
  27. Number of brothers and sisters. List them in order of birth and state their gender and names.
  28. Give details of marriage status of brothers/sisters.
  29. Your relationship with siblings. Good Bad Normal
  30. Are you still unmarried, married, divorced or widowed?
  31. Unmarried Married Divorced Widowed
  32. Was your marriage: Love Arranged Intercast
  33. Date of marriage/s dd
  34. mm
  35. yyyy
  36. Name of wife/husband (in full)
  37. Age of husband/wife
  38. Is your wife/husband still alive?
  39. If unmarried do you intend, or want to be married
  40. What is the relationship with your life-partner?
  41. Do you have children? If so, list them in order of birth and state their gender
  42. Have your children left school? If so, give details of education attained
  43. Your Education Qualifications
  44. Are you or any one from your from family is suffering from any heath problem? If so, give details
  45. Do you have any debts or loans due? If so, give details
  46. Are you involved in any litigation? If so, give details
  47. Do you own any property, residential / investment
  48. Is the property fully owned or mortgaged with any bank, if so, give details
  49. If doing business, give details of your business at present?
  50. If Job holder Private or Government?
  51. Your Job Status?
  52. Give details of Employment/ Business (work status)

कितने सवाल थे?
बावन, सरदार!
और तुम कितने जवाब पाये?

Give up to three specific questions that you are interested in knowing from this nadi reading?

फिर भी वापस आये? वो भी खाली हाथ?
नही सरदार, हमने ६७$ भी दिये|
बहुत नाइन्साफी हय|
क्ष्

शोधनिबंध

त्यांनी लिहिलेले शोधनिबंध वगैरे

दिवाळी अंकात छापलेला लेख हा शोधनिबंधच आहे. (असे हैयोंना वाटते.)

प्रा. डॉ. हैयो?

दिवाळी अंकात शोधनिबंध लिहून प्रा.डॉ. होता येते का?

सदा तुमने ऐब देखा

मूळ मुद्दा असा आहे की मी हे विधान शास्त्रसिद्ध विधान म्हणून करण्याऐवजी 'या दृष्टिकोनातून विचार करावा' अशा स्वरूपात मांडलं होतं.
"प्रत्येक गणित तपासून बघणं योग्यच आहे. पण इतक्या प्राथमिक अभ्यासात तांत्रिक खुसपट काढून 'आलेलं उत्तर पूर्णपणे निरर्थक आहे' हे सिद्ध करण्यात काय अर्थ आहे? साप म्हणून भुई धोपटताय राव."

धासकडवींच्या एका धाग्यातील लाल अक्षरातील बोलांची भाषा नाडी ग्रंथांच्या बाबत मी करत होतो व आहे.
त्यांचेच निळ्या अक्षरातील वोल हे त्यावेळी मी त्यांना दिलेल्या माझ्या उत्तराचा मतीतार्थ होता.
म्हणून मी त्यांना व पर्यायाने इथल्या सर्वांना असे सुचवतो की "खुसपट काढून' नाडीग्रंथांना पूर्णपणे निरर्थक आहेत" असे - साप म्हणून नुसती भुई काय धोपटताय राव!"
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

खुसपट

तुम्हाला काही प्रश्न विचारले होते. त्यातील काही अगदी सोपे म्हणजे संदर्भ द्या अशा स्वरूपाचे होते. (ज्याचा उल्लेख तुम्ही केलात त्यांचा.)
यावर काही उत्तर मिळेल का?

प्रमोद

प्रचिती घ्या.

स्वतः प्रचिती घ्या. हे उत्तर.
नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

प्रचिती

स्वतः प्रचिती घेतल्यावर येथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील?

प्रमोद

उत्तरे मिळवा आणि कळवा

उत्तरे मिळवा आणि कळवा.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

शशिओक

तुमच्याशी वाद घालणे म्हणजे...

मला वादात रस नाही

मित्र हो,
मिसळपाव वर वा अन्य ठिकाणी वाद घालायला मी नाडी ग्रंथांचा विषय काढला नाही. मला वादात रस नाही. कारण कसेही करून आपल्यासारख्यांचे मत परिवर्तन करावे हा माझा उद्देश नाही. मला आलेला अनुभव इतरांसाठी शेअर करावा असा माझा दृष्टीकोण होता व आहे.
आपल्या सारख्यांनी त्याला पुरोगामी विचारांविरुद्ध असावे असे वाटून नाडीग्रंथांवर एकांगी लिखाणाला वाचून आपले मत बनवले आहेत असे वाटले म्हणून नाडीग्रंथांचे मला झालेले दर्शन सचोटीने अभ्यास करून मांडून दाखवण्याचे कार्य मी करत आहे.
नाडीग्रंथांचा विविध पद्धतीने अभ्यास करून मला झालेले आकलन मी सादर करायचे ठरवले आहे. आपल्या सारख्या विचारकांनी देखील नाडीग्रंथांचा सर्वांगांनी अभ्यास करावा असे म्हणण्यात वादाचा प्रश्न माझ्याकडून आला कुठून?
उलट विविध विचारधारांच्या व्यक्तींनी, तज्ज्ञ शोधकर्त्यांनी एकत्र येऊन नाडी ग्रंथांतील भाषेच्या, लिपीच्या मधून व अन्य अंगांनी जे काही कथन आपल्याला नाडीवाचकांकडून दिलेल्या वह्यातून दिले जाते, मिळते त्याचा एकत्रित विचार केला जावा असा मित्रत्वाचा व मदतीचा हात मी पुढे करत आहे.
असे करत असताना मला आपणासारख्यांनी जरी हिणवलेत वा बोल लावलेत तरी मला त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही. महर्षींच्या लेखनाला पहायची उचित वेळ आलेली नाही इतकेच क्षणभर वाटेल.

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

लिव्हित राव्हा

मला आलेला अनुभव इतरांसाठी शेअर करावा असा माझा दृष्टीकोण होता व आहे.

एकदम बराब्बर. तुम्ही लिव्हित राव्हा.

नाडीग्रंथांचे मला झालेले दर्शन सचोटीने अभ्यास करून मांडून दाखवण्याचे कार्य मी करत आहे.

शाब्बास ढिले नका पडू.

मला आपणासारख्यांनी जरी हिणवलेत वा बोल लावलेत तरी मला त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही. महर्षींच्या लेखनाला पहायची उचित वेळ आलेली नाही इतकेच क्षणभर वाटेल.

हे तर एकदम भारी. सावित्रीबाईनी शिक्षण् द्याला सुरुवात केली तव्हा लोकायनी शेणाचे गोळे फेकून मारले
पर त्या काय निश्चयापासून ढळल्या नाय. त्यायची आठवण् झाली.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

सचोटी

नाडीग्रंथांचे मला झालेले दर्शन सचोटीने अभ्यास करून मांडून दाखवण्याचे कार्य मी करत आहे.

त्यातून तुम्हाला पैसे सुटतात का ह्याचे उत्तर तुम्ही टाळलेले आहे. मग त्याला सचोटी म्हणायचे का?

ओक

ओक या विषयावर पुस्तके लिहितात म्हणजे त्यांना काही ना काही पैसे सुटत असतील असे साधे गणित असावे ना?* मग वाद कुठे उद्भवतो आहे?

* हल्ली काही स्वतःच स्वतःच्या सीडी काढतात. तसेच काही आपापली पुस्तके प्रकाशित करण्यासाठी खर्च करतात असे ऐकून आहे. त्यांच्या खर्चाचे गणित आणि प्रकाशनानंतरच्या खपाचे गणित मला माहित नाही तेव्हा चू. भू. दे. घे.

नक्की फक्त पुस्तकेच का?

पुस्तकातून मिळणारी कमाई सोडून नाडी माध्यमातुन पैसे मिळवतात का ह्याचेही उत्तर त्यांनी दिलेले नाही. त्यांच्या सततच्या 'प्रचिती घ्या' (खाली स्वतःचा मोबाईल नंबर)ह्या मंत्रातून ते गळ टाकण्यासाठी उपक्रम वापरत असावेत असे वाटणे शक्य आहे.

एकत्रित विचार

आपल्या सारख्यांनी त्याला पुरोगामी विचारांविरुद्ध असावे असे वाटून नाडीग्रंथांवर एकांगी लिखाणाला वाचून आपले मत बनवले आहेत असे वाटले म्हणून नाडीग्रंथांचे मला झालेले दर्शन सचोटीने अभ्यास करून मांडून दाखवण्याचे कार्य मी करत आहे.

अर्थप्राप्ती होत असेल तर म्हणून या शब्दाचे समर्थन शक्य नाही.

उलट विविध विचारधारांच्या व्यक्तींनी, तज्ज्ञ शोधकर्त्यांनी एकत्र येऊन नाडी ग्रंथांतील भाषेच्या, लिपीच्या मधून व अन्य अंगांनी जे काही कथन आपल्याला नाडीवाचकांकडून दिलेल्या वह्यातून दिले जाते, मिळते त्याचा एकत्रित विचार केला जावा असा मित्रत्वाचा व मदतीचा हात मी पुढे करत आहे.

नाडीवाले जन्मतारीख शोधतात हा तुमचा दावा आहे की नाही? वर नमूद नाडीवाले जातकाला ५२ प्रश्न विचारतात त्यांपैकीच काही जन्मतारीख इ. आहेत. म्हणजे, ते नाडीवाले भोंदू आहेत हे तुम्हाला मान्य आहे काय?

 
^ वर