दगड आणि तरंग

पाण्यावर टिचकी मारली वा दगड टाकला तर वर्तुळाकार तरंग तयार होतात. असे दोन भिन्नकेंद्री तरंग एकमेकावर आदळतात तेंव्हा त्यांच्या छेदन बिंदूतून एक छानशी नक्षी तयार होते. असेच काही तरंग. सिक्कीम मधल्या तीस्ता नदीत (लाचुंग जवळील युमथँग वॅलीमधे) मला दिसले. पाणी स्वच्छ, खालील दगड चमकदार आणि रंगीत. त्यात जरासे जपून घेतलेले प्रकाशचित्र. पाणी जवळपास दिसत नाही. पण तरंगांची नक्षी दगडांवर उमटली आहे.

lachung stones2

प्रमोद

Comments

सुंदर चित्र

लाटांमुळे दगडांना सापाच्या कातडीसारखा पोत आला आहे. छान.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

असेच म्हणते

>>लाटांमुळे दगडांना सापाच्या कातडीसारखा पोत आला आहे.

फार सुंदर फोटो. इतके नितळ पाणी.

अवांतर: माया, माया, म्हणतात ती हीच का? ;)

+१

लाटांमुळे दगडांना सापाच्या कातडीसारखा पोत आला आहे.

+१. सापाची कातच जशी.

फारच सुरेख.

असेच

म्हणतो. सुरेख फोटो. तीस्ता नदीचे सौंदर्य अवर्णनीय आहे.

अवांतर : आम्हाला ही माया आठवली. :)

--
अनुदिनी : मै और मेरे पाहुणे..
http://rbk137.blogspot.com/

:)


तीस्ता.

छान

उभीआडवी जाळी तयार होण्यासाठी भिन्नकेंद्री असणे आवश्यक.

मात्र मुळात रेषा दिसण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट : पाण्याची खोली.

नेमके तळावरच रेषा-केंद्रीभवन झाले पाहिजे. (थोडे कमी-अधिक चालेल.)

तरंगांची "वेव्हलेंग्थ" आणि उंची किती त्यावर केंद्रीभवन कुठल्या कोलीवर होईल ते अवलंबून असते. मात्र वेव्हलेंग्थ आणि उंची या गोष्टी खोलीवरती अवलंबून असतात. याचे गणित थोडे लांब आणि गुंतागुंतीचे आहे असे दिसते. म्हणून ते करायचे मी सोडून दिले :-)

खोलीचा हिशोब

पाण्याच्या खोली मुळे तरंगांच्या लांबीवर (वेवलेन्थ) परिणाम होतो. जेवढी खोली अधिक तेवढी लांबी अधिक.
इ़कडे तरंगांची लांबी अगदी कमी वाटते एक दोन सेंटीमीटर. या कॅलक्युलेटरवर आकडे मोड करता येते. (टाईमपिरियड ०.१ - ०.२ सेकंद दिला, पाण्याची खोली ०.१५ मी दिली तर लांबी एक दोन सेंटीमीटर येते.)

प्रमोद

धन्यवाद

केंद्रीभवन झाल्यामुळे छायाचित्र छान झाले आहे.
पाण्याच्या खोलीचा प्रश्न मलाही पडला पण पर्स्पेक्टिव नसल्यामुळे मुळात या दगडांच्या आकाराचाही अंदाज (पाण्याशेजारी उभे राहून छायाचित्र घेतले की पुलावरून, इ.) घेता आला नाही.

छान

छान फोटो.

सुंदर

फोटो फारच छान आला आहे. वास्तवीक हा नुसता देऊन वाचकांना "हे काय असेल?", म्हणून विचारायला हवे होते.

फार छान

मस्त फोटो.

पाण्याचा भिंग

पाण्याचा भिंग तयार होतो की काय? जेथे पाण्याच्या तरंगाची कड वर येते तेथे अधिक दाट प्रकाश दिसतोय.

 
^ वर