पेंच अभयारण्य आणि आसपास
अभयारण्यातील रस्ते हे दुहेरी कामे करतात. एक म्हणजे माणसांची जा ये. तर दुसरेही तितकेच महत्वाचे. ते म्हणजे आग पसरण्यास रोख. पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेले गवत कामगार साफ करताना दिसत होते. एका विशिष्ट रुंदीच्या पट्यात ज्वलनशील मिळता कामा नये यासाठी ही खबरदारी. (थोडे अवांतर: आग लागली की त्यातून ज्वलनशील वायु निघतात कार्बन मोनोऑक्साईड सारखे. प्राणवायुची कमी असल्याने आग असेल तिथे ते जळू शकत नाहीत. पण थोड्या दूरपर्यंत ते गेल्यास परत प्राणवायु मिळाल्याने पेटु शकतात. अशा रितीने आग काही अंतर उडी मारू शकते.)
कुठल्याच वाहनात, वा कामकर्यांकडे शस्त्रे नव्हती. कुणाला काही त्यामुळे अपाय झाला नसावा. जंगलाच्या सीमेवर कुठलेच नैसर्गिक वा मनुष्यनिर्मित कुंपण नव्हते. वाघ राखायचे म्हणजे हरणे राखायची. ती कमी पडली तर ना कामकर्यांची ना आसपासच्या खेड्यातील माणसांची खैर नाही. हरणांनी सर्वच गवत खाऊन टाकू नये म्हणून जंगलात विशेष खबरदारी घेतली होती. कित्येक चराऊ भागाला कुंपणे टाकून ती वेगळी ठेवली होती.
जंगलातील एकमेव पाळीव प्राणी म्हणजे हत्ती. आम्ही गेलो तेंव्हा सहा हत्ती होते. हत्ती जंगलात स्वत:चा मार्ग काढत (फांद्यांना तोडत) कुठूनही कुठेही जाऊ शकतो. त्याच्या पाठीवरचा माहुताने सांगितले. हत्ती साठाव्या वर्षी काबुत येतो. (तोस्तोवर तो आपल्या जवानीत धुंद असावा.) मोटारगाड्या जशा आपण पायाने चालवतो तसा हत्ती पायाने चालवला जातो. माहुताचे डावे उजवे पाय हत्तीच्या मस्तकावरील वेगवेगळ्या ठिकाणी आपटले की हत्ती त्याला हवे तसे करतो (डावे उजवे, खाली बसणे, सोंडेकडून काम करून घेणे.) हत्ती तसा माणसाच्या ताब्यात नेहमीच नसतो. रात्री त्याला बांधून वगैरे ठेवता येत नसावे. सहा हत्तींचा एक तळ होता. तिथे जंगलातल्या रपेटीची मधली सुटी होत असे. प्रसाधनांची सोय (खाद्य पदार्थ नाही) या तळावर होती. तळाच्या आसपास कित्येक वृक्ष पडलेले होते. तिकडे कळले की हत्तींचे हे रात्रीचे प्रताप.
जंगल बहुतांशी सागवानाच्या झाडांचे. त्यात काही झाडे पांढर्या खोडांची उठून दिसतात. जिकडे खडक तिकडे ही झाडे असे आमच्या गाईडने सांगितले. (अशीच झाडे मी मुरबाड/शहापूर आसपास पाहिली आहेत.)
या झाडाची साल गळून पडते मग ते पांढरे होते. खोडाचे रंग तीनदा बदलतात अशी त्याची माहिती. ही खोडे रात्री विशेष चमकतात (बहुतेक फॉस्फरसन्स असावे). तेंदू (विड्या वळताना लागतो तो.) काही प्रमाणात दिसतो.
पांढर्या खोडाच्या झाडाचे नाव घोस्ट ट्री.
" alt=""> |
खडकावर उगवलेले हे झाड. (अंगकोर मधील मंदीरावर असलेले विशालकाय झाड यावरून आठवले.)
" alt=""> |
तेंदूला फळे लागली होती. (छायाचित्र घेतले पण फ्लिकरवर चढवले नाही.) तर सागाच्या पानांना (काही) जाळी लागली होती. एक मोडून पडलेले झाड वाटेवर आले.
" alt=""> |
वुडपेकर, आउलेट (लहान घुबड ?), दिसले. नीलकंठ पक्षी दिसला. प्रकाश फारसा सुखकर नसल्याने त्याचे पंख दिसले तसे आले नाहीत.
" alt=""> |
मोर खूप संख्येने होते. एका ठिकाणी त्यांची शाळा चालू असावी. (रांगेत बसलेले तिनही मोर झोपल्या सारखे वाटतात. )मोरांचा पिसारा पावसाळ्या पूर्वी झडतो.
" alt=""> |
" alt=""> |
याशिवाय मोठ्या संख्येने पोपट, स्पॉटेड डोव, पॅराकीट (पोपटांची एक जात.) दिसले.
जंगल सोडताना परत कधी जावे. आणि पुढच्या वेळी हत्तीचे बुकिंग, थोडा उन्हाळा गाठणे असे मनात आले.
परतीच्या प्रवासात. रामटेक नावाचे तीर्थस्थान लागते. लहानपणी पाहुणे आले की त्यांच्या बरोबर रामटेकची सैर व्हायची. विदर्भ मुख्यत्वेकरून सपाट. उत्तरेकडे सातपुडा विंध्यच्या रांगा महाराष्ट्र मध्यप्रदेशाची सीमा दाखवतात. रामटेक ही सपाट भागातली एक उंच टेकडी. तिकडे जायला खूप पायर्या असत. जाताना वराहाची मूर्ती लागते. विष्णूचा हा तिसरा अवतार पण त्याची देवळे (मूर्त्या) फक्त मध्यभारतात आहेत. या वराहाच्या मूर्तीखालून जायचे असते. जो गेला तो पुण्यवान जो अडकला तो पापी असे तिकडे म्हटले जायचे. लहानपणी आम्ही लिलया त्याखालून जायचो. आता मोठेपणी जमते का ही मला उत्सुकता होती. दुसरे म्हणजे रामाची सेना रामटेकात मुक्त पणे वावरते. लोकांच्या हातातली खाद्य पदार्थ हिसकावून घेऊन जाण्यात ती तरबेज असतात. त्यांनाही पाहण्याची उत्सुकता होती. कालीदासाने इथेच बसून मेघदूत लिहिले असे म्हटले जाते. त्यासाठी सरकारने एक स्मारक केले आहे. हल्ली त्याशेजारीच भारत सरकारने 'संस्कृत विद्यापीठ' तिथे स्थापन केले. रामटेकला जायला आता पायर्या चढाव्या लागत नाहीत. नागपूरला पोचण्याआधी काही वेळ होता पण सगळे बघायला वेळ नव्हता. म्हणून मी वराहमूर्ती आणि वानरसेना पाहिली. इतर उत्साही राममंदीरावर चढून गेले. (हा भाग दुसर्या-तिसर्या शतकातला असे काहीसे तिथे लिहिले होते.)
वराहाची मूर्ती उघड्यावर आणि भली थोरली आहे. बहुतेकांना त्याखालून जाता येईल असे वाटले.
" alt=""> |
मी अजून काही पाप केले नाही हे मला कळून चुकले. कसे खालून जातात याचा हा एक नमूना.
" alt=""> |
थोडीवर वानरसेना विहंगावलोकन करत होती. (रामटेकवरून खरेच दूरदूरचे दिसते.)
" alt=""> |
जाणार्या येणार्याचे पायधरून आजर्व केले जायचे.
" alt=""> |
इकडे एक गोष्ट घडली. (छायाचित्र घडायच्या आत.) एक माकडीण आजर्व करत होती. ज्याचे करत होती त्याने जवळच्या दुकानातून चण्याचे पाकीट आणवले. आजर्व करणार्या माकडाच्या हातात देताक्षणी वरच्या अंगाने एक हुप्या आला. ची ची करत तो ओरडला. या माकडिणीला ते पाकीट सोडावे लागले. तो पाकिट घेऊन निघून गेला. या माकडीणीला त्याचे वाईट वाटले. ती आपल्या गटात गेली. तिकडे तिचे तेवड्याच आकाराच्या दोन तरी माकडिणींनी सांत्वन केले. अगदी गळ्यात गळे घालून. एकमेकीच्या कानाशी लागून.
संध्याकाळी नागपूरात परत्लो. तिकडे दीक्षाभूमी, पाणीपुरी, हल्दिराम वगैरे करत लोकांनी स्टेशन गाठले तर मी घर.
प्रमोद
Comments
छान
तीनही भागांतील कथनशैली आवडली. फोटोही केवळ सौंदर्य म्हणून दिलेले नसून त्यांमागे कथा आहेत हेही विशेष आवडले.
रामटेक
आर्वाचिन कवि चित्त यांच्या "...पटा तो टेक" सहीत स्थान लाभलेले - रामटेक.
प्राचिन कवि कालिदासाचा उल्लेख मी केला नाही काय? ;)