पेंच अभयारण्य आणि आसपास १
पेंचचे अभयारण्याला गेल्या आठवड्यात भेट देता आली.
पेंचचे अभयारण्य मध्यप्रदेशात आहे. जवळचे मुख्य शहर नागपूर (८०-९० कि.मि.). पेंच नदीवर तोतलाडोह येथे धरण बांधण्यात आले (महाराष्ट्रात). त्याच्या मागच्या अंगाला धरणाचे पाणी नदीत साचते, पेंच अभयारण्य त्यावरच वसलेले आहे. एकंदर क्षेत्रफळ ४५० चौ. कि.मि. (मुंबई शहराएवढे ?). ३३ मोठे वाघ आणि १८ बछडे, १५-२० हजार हरणे असे साधारण स्वरूप. (याचा एक पर्यावरणीय आलेख करता येतो.) बाघ बघायला जायचे असले तर सोयीचे महिने मे-जून. (पण उन्हाळा सहन करावा लागेल.). आम्ही ना खूप उन्हाळा ना हिवाळा असे साधून कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास बेत ठरवला. यावेळच्या उशीराच्या पावसाने आपली उपस्थिती दाखवली. तरी हवा एकदम छान मिळाली. (वाघ बघण्याची माझी फारशी अपेक्षा नव्हती त्यामुळे भ्रमनिरास झाला नाही.) मुंबईतून ही सहल दोन दिवसात (तीन रात्री) आटोपता येते. एके दिवशी पोचायचे दुसर्या दिवशी जंगल आणि परत असे करता येते.
नागपूरला सकाळी उतरलो अजनी स्थानकाबाहेर शाळेला जाणार्या मुलांची लगबग चालली होती. सायकल रिक्षावर मुले खचाखच भरली होती.
सायकल रिक्षा हे हळू हळू नामशेष होणारे वाहन.
" alt=""> |
" alt=""> |
प्रवासात कन्हान नदी लागते. त्यानंतरचे एक तळे कमळांनी भरलेले होते.
" alt=""> |
अभयारण्यापाशी पोचल्यावर वेळ होता. म्हणून जवळच्या गावात, तळ्यावर गेलो. जाताना सागाची पाने ओढलेल्या गुराख्याने लक्ष वेधले. या भागात सागाची झाडे नैसर्गिकरित्या येतात.
" alt=""> |
एक मोठा पाईप घेऊन जाणारी बैलगाडी तलावाच्या बांधावरून जात होती.
" alt=""> |
गाव नीटनेटके होते. घरांनी, मुलांनी आणि गुरांनी लक्ष वेधले. गरीबी असली तरी अशक्तता कुठे दिसला नाही. गावात वीज होती. (कपातीत)
" alt=""> |
संध्याकाळची वेळ होती, माणसे गुरे परतत होती.
" alt=""> |
बैल थोडेसे लहानखुरे पण कामाचे दिसत होते. बहुतेक घरी दोन बैलांची जोडी दिसली. कोंबड्या आणि कुत्रे ही इतर पाळीव प्राणी. घराशेजारी थोडीशी भाजीची बाग.
" alt=""> |
" alt=""> |
" alt=""> |
अधिक छायाचित्रांसाठी हा दुवा बघु शकता.
जंगलातील आणि परतीच्या प्रवासातील भाग पुढच्या वेळी.
प्रमोद
Comments
छायाचित्रे
छायाचित्रे छान आहेत. Flickr वरील अभयारण्यातली छायाचित्रे येथे ठेवली तर बरे झाले असते. तसेच तिथे इतर कुठले प्राणी/पक्षी पाहू शकतो हे देखील समजून घेयला आवडेल...
भोपळा
पाहून चक्क गहिवरून आले!
छान फोटो. गुराख्याचे पत्रावळींचे द्रोण केल्यासारखे पानाचे आच्छादन घेतलेले फोटो आवडले. कमळेही छान.
छान!
सचित्र वर्णन आवडलं.
पेंच अभयारण्यावरील हा लेखही जमल्यास वाचा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
छान
पेंच अभयारण्यातल्या बाघवन बद्दल येथे माहिती आहे.