हिंदू-नास्तिक

हिंदू धर्म हा कसा इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे (होलीअर दॅन दाऊ) हे पटवून देताना काही स्यूडो विचारवंत हिंदू धर्मात नास्तिक विचारसरणीलाही स्थान आहे असा दाखला देतात. (सावरकरांसारख्याच्या विचारसरणीतून ते नास्तिक होते असे जाणवते पण त्याचवेळेस ते कट्टर हिंदुही होते.) एखादी व्यक्ती नास्तिक असूनही हिंदू असू शकते असे हिंदू धर्मात नक्की कुठे लिहिले आहे?

नास्तिक विचारसरणीला खरंच हिंदू धर्मात स्थान आहे का?

'हिंदू व्यक्ति आस्तिकच असली पाहिजे असेही कुठे लिहिलेले नाही' असा एक टिपीकल प्रतिवाद ह्यावर येऊ शकतो पण त्याच न्यायाने मग जगातील कोणत्याही विचाराला आचाराला हिंदू धर्माची मान्यता दाखवता येऊ शकते.

हिंदू धर्म जर खराच इतक सर्वसमावेशक असेल, काहीही केलंत/मानलंत तरी तुम्ही हिंदू राहू शकत असाल तर मग हे अनावश्यक लेबल कशाला?

लेखनविषय: दुवे:

Comments

विनंती

मला वाटते की प्रस्तावकांना 'नास्तिक' या शब्दाचा 'निधर्मी' असा अर्थ अपेक्षित असावा. सर्वांना विनंती आहे की 'वेदप्रामाण्य न मानणे' हा अर्थ कृपया या चर्चेत दुर्लक्षावा.

प्रचलित अर्थ

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"नास्तिकता" शब्दाचा मूळ अर्थ जरी "वेदप्रामाण्य नाकारणे" असा असला तरी "देव, धर्म न मानणे" हाच अर्थ रूढ आणि बहुप्रचलित आहे. तोच अर्थ मानला पाहिजे असे श्री.रिकामटेकडा म्हणतात ते योग्यच आहे.

मला वाटत नाहि

आपण एक गोश्त विसर्तोय् ....\
गीतेनुसार ..
हिन्दू मध्ये .. २ प्रकार आहेत
१) धर्म
२) कर्म
काहीही केले तरी .. हिन्दुच राहणार आपण ..
यार काय वैताग आहे ... मराठी टाइपिंग खुप अवघड आहे

प्रतिसाद

हिंदू धर्मातील एका पंथाचे उदाहरण :

http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%...

दुव्यातली वाक्ये :
"चार्वाक एक भौतिकवादी दर्शन है। यह मात्र प्रत्यक्ष प्रमाण को मानता है तथा पारलौकिक सत्ताओं को यह सिद्धांत स्वीकार नहीं करता है ।"
"चार्वाक का मतलब नास्तिक से लिया जाता है, वेदबाह्य भी कहा जाता है"

चार्वाक

चार्वाक पंथ हा हिंदू धर्मातील पंथ नव्हे.

सौजन्य विकिपीडिया:
It is characterized as a materialistic and atheistic school of thought.
While this branch of Indian philosophy is not considered to be part of the six orthodox schools of Hindu philosophy,
it is noteworthy as evidence of a materialistic movement within Hinduism.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

इंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्व
इंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीब
द्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्व
इंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइं
ग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्व
इंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीब
द्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्द
लक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइंग्रजीबद्दलक्षमस्वइं
बद्दलक्षमस्व

?

समजले नाही. materialistic movement within Hinduism म्हणजे वेगळे काय?

शिवाय काहींनी षट्दर्शनात चार्वाकाचाही समावेश केलेला आढळतो. (संदर्भ मिळवून सांगतो.)

हिंदू नास्तिकता

अमुक माणसाला हिंदू धर्मात मानावे या करिता लिखित निकष नाहीत. (इतर काही धर्मांबाबतही तसे असेल.)
नास्तिक म्हणजे सृष्टीचा 'कर्ता करविता' कोणी असणे हे न मानणारा अशी मी व्याख्या करतो. (चूक असल्यास कळवा.)
श्रुती स्मृती पुराणोक्त त्या क्रमाने मानणारा अशी हिंदू धर्मियाची व्याख्या केली तर फारशी चुकीची ठरू नये.
यातील श्रुतीतील 'नासदीय सूक्त' (ऋग्वेद) हे अज्ञेयवादी सूक्त आहे. मात्र कित्येक इतरत्र ठिकाणी आस्तिकता दिसते.
मनुस्मृतीत सुरुवात सोडल्यास फारसे आस्तिक नास्तिकावर नसावे (आठवणीतून सांगतो.)
पुराणात मात्र नास्तिकता कुठेच दिसत नाही.
गीता हा चौथा महत्वाचा स्रोत त्यात आस्तिकताच आहे.

माझ्या आठवणीत नासदीय सूक्ताशिवाय कुठलेच नास्तिकवादी सूक्त हिंदूंच्या प्रमाण ग्रंथात नाही.

एकंदर पुरावा पाहता नास्तिकतेला हिंदू धर्मात ओढणे चुकीचे ठरेल.
प्रमोद

व्याख्या

अशी व्याख्या करता येत नाही म्हणूनतर जो मुसलमान ख्रिश्चन आणि शीख नाही तो हिंदू अशी व्याख्या घटनेला करावी लागली.

हिंदू म्हणवून घ्यायला अजून एक वेगळीच व्याख्या....

जी व्यक्ती जन्मताना कोणत्यातरी जातीत जन्मते अशा सर्व व्यक्तींना हिंदू म्हणावे. जन्मत: ज्या व्यक्तीला जात प्राप्त होत नाही ती व्यक्ती अहिंदू. बाकी त्याव्यक्तीच्या रूढी, परंपरा, देव, श्रद्धा, उपासनापद्धती सगळं सगळं कसंही असलं तरी चालेल.

(ही व्याख्या अगदीच भयंकर आहे. पण हिंदू म्हणवणार्‍या समाजाचा मसावि काढला तर प्रत्येकाला जात असते हा एकच निघतो).

बाकी कोणतीही बाब घेतली तर ती सर्व हिंदूंच्यात असते असे म्हणता येत नाही.

नितिन थत्ते

पटणारी व्याख्या

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"जी व्यक्ती जन्मताना कोणत्यातरी जातीत जन्मते अशा व्यक्तीला हिंदू म्हणावे. जन्मत: ज्या व्यक्तीला जात प्राप्त होत नाही ती व्यक्ती अहिंदू......."

श्री.थत्ते यांनी दिलेली ही व्याख्या पटण्यासारखी आहे.जात हे हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

अहिंदू आणि जाती

अहिंदूंमधे (मुसलमान आणि ख्रिश्चनांमधे) जाती किंवा जातीसदृश वर्गवारी नाही हे नक्की का? कारण एका मल्याळी ख्रिश्चन बाईकडून असं कळलं की त्यांच्यातही भेदाभेद आहेत आणि ते बेटी व्यवहाराच्या बाबतीत इतके कडेकोट आहेत की भिन्नवर्गीय लग्नबंधनातून निर्माण झालेली संतती कोणत्याच वर्गात विवाहासाठी लायक म्हणून स्वीकारली जात नाही. कदाचित आता ही बंधनं थोडी शिथिल झाली असतील. पण तशी ती हिंदू समाजातही शिथिल झाली आहेत.

अडचण

'समाजाला बांधणारे/धरून ठेवणारे तत्त्व' असा धर्म या शब्दाचा अर्थ घेतल्यास, धर्माच्या वर्णनात विवेक किंवा स्वयंप्रज्ञा यांना विरोधी मते (आणि कमांडमेंटस) यांची आवश्यकता वाटते. केवळ वेदांमध्ये एखादे मत लिहिले गेले म्हणून त्याला हिंदू धर्माचा भाग म्हणता येणार नाही, त्यासोबत काही आज्ञा, निर्बंध आहेत काय ते तपासावे लागेल.

निरीश्वरवादी धर्म असू शकतो - एखाद्या खेळाडू/गायक/अभिनेत्यामागे भुललेला समाज किंवा कम्युनिझम ही उदाहरणे देता येतील.

घटनेतली व्याख्या

घटनेत अशी कुठलीच व्याख्या नाही. (चु.भु.द्या.घ्या.)

प्रमोद

व्याख्या

The Hindu Marriage Act of 1955 goes in greater detail to define this “legal Hindu”, by stipulating in Section 2 that the Act applies:

“(a) to any person who is a Hindu by religion in any of its forms and developments, including a Virashaiva, a Lingayat or a follower of the Brahmo, Prarthana or Arya Samaj,

“(b) to any person who is a Buddhist, Jain or Sikh by religion, and

“(c) to any other person domiciled in the territories to which this Act extends who is not a Muslim, Christian, Parsi or Jew by religion”

दुरुस्ती : प्रमोद सहस्रबुद्धे यांनी म्हटल्याप्रमाणे ही घटनेतली व्याख्या नाही. हिंदू विवाह कायदा कोणाला लागू आहे हे ठरवण्यासाठी केलेली व्याख्या आहे. माझ्या वरील प्रतिसादात चूक झाली आहे.

उपकलम ए आणि बी मधील व्याख्येत न बसणारे हिंदू सापडतील म्हणून उपकलम सी मधली व्याख्या. :)
.

प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

नितिन थत्ते

चांगली माहिती.

फार छान माहिती दिलीत.

हिंदू, ब्राह्मो, प्रार्थना, आर्य हे वैदिक, बौद्ध, जैन आणि शीख अवैदिक तर तिसरा गट आदिवासींसाठी असावा.
हा कायदा काही बंधने टाकतो. त्यातून सुटून जाऊ नये म्हणून इतरांना त्यात गोवले असणार. नाही तर पहिल्यातच हिंदू धर्माचा असा स्पष्ट उल्लेख केला नसता.

प्रमोद

शिवाय घटना कलम २५ अंतर्गत टीप

कलम २५ : (धर्म/पंथ स्वातंत्र्य आहे)
यातील उपकलम २ब म्हणते की समाजकल्याण, समाजसुधारणा, आणि सार्वजनिक प्रकारच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व हिंदूंच्या सर्व वर्गांना खुल्या करण्याबाबत शासन कायदे करू शकते, आणि कायद्यांवर अमल करू शकते. त्या कायद्यांच्या आणि अमलाच्या आड धर्मस्वातंत्र्याचे कलम येत नाही.

उपकलमापुरती तळटीप म्हणून स्पष्टीकरण आहे, की "हिंदू"चा संदर्भ सिक्ख, जैन आणि बौद्ध धर्म पाळणार्‍या व्यक्तींनाही लागू आहे.

- - -
कलम २६ धर्मसंस्था उभारण्याचे स्वातंत्र्य देते. (मात्र नवे धर्म प्रस्थापित करण्याचे स्वातंत्र्य देते की नाही, हे माहीत नाही. असा कुठला धर्म स्थापला, तर त्याला हिंदू धर्माचा पंथ मानले जाईल काय?)

- - -
या दुव्यावर सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर केलेल्या ऊहापोहाचा इतिहास बघावा : (दुवा) पान ५१+

हिंदू धर्म

हिंदू नास्तिक असू शकतो. पण, हिंदूंचे धर्मग्रंथ हे भगवंताच्या मुखातून निघालेली थेट रचना असल्याची मान्यता असल्यामुळे भगवंताने सांगितलेले विचार [वेद] हे हिंदू धर्माचे आधार आहेत त्यामुळे धर्मग्रंथातील विचार मानणारा तो हिंदू असे म्हणता येईल.

>>>नास्तिक विचारसरणीला खरंच हिंदू धर्मात स्थान आहे का?
नसावे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

निधर्मी?

यावरून एक जुनी शंका आठवली.. भारतात प्रत्येक व्यक्तीला "धर्म" असणे सक्तीचे आहे का? जनगणनेच्यावेळी जात नसते (नसायची) मात्र धर्म असतो आणि जनगणना करणार्‍यांना तो रकाना भरणे वैकल्पिक नसते

कायद्याच्या दृष्टीकोनातून कोणी सांगेल काय?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

नाही

प्रत्येक व्यक्तीला धर्म असण्याची भारतात सक्ती नाही. धर्म या रकान्यात 'काही नाही' असे उत्तर भरता येईल.

मानवता/माणुसकी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
ऋषिकेश म्हणतात,"जनगणनेच्यावेळी जात नसते (नसायची) मात्र धर्म असतो आणि जनगणना करणार्‍यांना तो रकाना भरणे वैकल्पिक नसते"

धर्माचा रकाना भरणे आवश्यक असते हे खरे. पण" माझा धर्म मानवता अथवा भारतीय " असे सांगितले तर गणना कर्मचार्‍यास त्या रकान्यात तसे लिहावेच लागेल.

लहान मुलांनाही "धर्म" का बरे चिकटवावा?

भारतात प्रत्येक व्यक्तीला "धर्म" असणे सक्तीचे आहे का?

तसेच लहान मुलांनाही एखादा धर्म का बरे चिकटवावा? लहान मुलांवर धर्म लादण्यावर कायद्याने बंदी आणायला हवी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अत्यंत महत्वाचा मुद्दा

"जन्मतःच व्यक्ती बाय डीफॉल्ट हिंदू असते" हा दावा नाकारून नवजात बाळाला बाय डीफॉल्ट निधर्मी ठरविणे आवश्यक आहे. १८ वर्षांचे होईपर्यंत त्याला निर्णयस्वातंत्र्य नसते त्यामुळे त्यावर धार्मिक विधी करणे ही सक्तीच आहे. कोणता धर्म स्वीकारावा ते ठरविण्याचा हक्क त्याला सज्ञान झाल्यावरच मिळेल!

हिंदू धर्म खरोखरच महान आहे !

जगातले यच्चयावत चर्चेचे विषय संपले आहेत. केवळ हिंदू धर्म जगाच्या आदिपासून अंतापर्यंत राहणार आहे हे फक्त धार्मिक लोकांच्या तोंडून ऐकले होते. मी स्वत: धार्मिक आणि बर्‍याच प्रमाणात (अंध)श्रद्धाळू असूनदेखील खात्री पटत नव्हती. मात्र त्याच त्याच विषयावर वारंवार निघणारे धागे पाहून ते खरेच आहे याची खात्री पटते.
खरोखरच हिंदू धर्म हा इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे ही निष्ठा पक्की झाली. मी चर्चाप्रस्तावकांचा अतिशय आभारी आहे.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

पाण्या मध्ये जसे सर्व रंग मिसळून जातात तसे हिंदू धर्माचे आहे

सावरकरांनी हिंदूची व्याख्या सगळ्यात महत्वाची आहे. या व्याख्ये मध्येच आस्तिक नास्तिक वादाचे उत्तर दडले आहे. जे या सिंधू नदीच्या परिसरातीत रहवाशी ते सगळे हिदुच आहेत. इतर धर्माला जसा संस्थापक आहेत तसे हिंदू धर्माचा कोणी एक संस्थापक नाही. हजारो वर्षाच्या चालीरीती,परंपरा, सांस्कृतिक घटना याची एकत्रित संकल्पना म्हणजे हिंदू जीवन पद्धती होय.
हिंदू हे नाव कोणत्याही धर्मग्रंथावरून, धर्मसंस्थापकावरून वा धर्ममतावरून मुख्यतः वा मुलतः निघालेले नसून आसिंधुसिंधु विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्‍या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे. आणि अनुषंगाने त्याच्या धर्मसंस्कृतींनाही.आसिंधुसिंधु भारतभुमिका ही ज्याची पितृभू नि पुण्यभू आहे तो हिंदू.आमच्या हिंदूंनी सार्‍या पृथ्वीवर जरी वसाहती स्थापिल्या तरी त्यांची प्राचीन, परंपरागत, जातीय नि राष्ट्रीय पूर्वजांची पितृभू अशी ही भारतभूमीच असणार.
हिंदू हे नाव ... आसिंधुसिंधु विस्तारलेल्या देशास नि त्यात निवसणार्‍या राष्ट्रासच मुख्यतः निर्देशणारे आहे.
पाण्या मध्ये जसे सर्व रंग मिसळून जातात तसे हिंदू धर्माचे आहे. आस्तिक नास्तिक सगळे मिसळुन्
जात्तत

अरेरे

सावरकरांनी हिंदूची व्याख्या सगळ्यात महत्वाची आहे.... जे या सिंधू नदीच्या परिसरातीत रहवाशी ते सगळे हिदुच आहेत.

अरेरे. एका हिंदूची मशीद पाडून दुसर्‍या हिंदूचे मंदिर बांधण्यासाठी ह्या हिंदू देशात तीन हिंदू न्यायाधीशांनी जो निकाल दिला त्याचा बर्‍याच हिंदूंनी विरोध केला ह्याचा काही हिंदूंना आणि काही हिंदूंना त्रास झाला. त्यासाठी काही हिंदू आणि काही हिंदू सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत म्हणे.

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

सहमत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.तथागत यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. आसिंधुसिन्धु सर्व जनतेला हिंदू म्हणावे अशी व्याख्या केली तर ती फारतर "हिंदू" या शब्दाची होऊ शकेल.हिंदुधर्मीयाची असू शकत नाही. कारण आसिंधुसिन्धु भारतात अनेक धर्मीय लोक आहेत.ते सर्वच स्वतःला हिंदुधर्मीय मानणार नाहीत हे उघड आहे. आस्तिक नास्तिक सर्व प्रश्नांची उत्तरे या व्याख्येत आहेत,ही फार महत्त्वाची आहे' असे म्हणणे अज्ञानमूलक दिसते.

हाहाहाहा.

एका हिंदूची मशीद पाडून दुसर्‍या हिंदूचे मंदिर बांधण्यासाठी ह्या हिंदू देशात तीन हिंदू न्यायाधीशांनी जो निकाल दिला त्याचा बर्‍याच हिंदूंनी विरोध केला ह्याचा काही हिंदूंना आणि काही हिंदूंना त्रास झाला. त्यासाठी काही हिंदू आणि काही हिंदू सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत म्हणे.

हाहाहाहा. सहमत आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

राजकारणी हिदू आणि हिंदू विरोधी राजकारणी आहेत.

त्यासाठी काही हिंदू आणि काही हिंदू सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत म्हणे. जे न्यायालयात भांडत आहे ते राजकारणी हिदू आणि हिंदू विरोधी राजकारणी आहेत. सर्व सामान्य हिंदू रहवाशियाना या दोन्ही राजकारण्याशी कांही संबंध नाही.
thanthanpal.blogspot.com

होय हिन्दूच!

@तर मग हे अनावश्यक लेबल कशाला?

हे सापेक्ष आहे. जोवर अहिन्दू त्यान्च्या लेबलान्चा आग्रह धरत राहनार, तोवर हिन्दू हे लेबल आवश्यकच आहे.

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

देशमुख म्हणजे....?

अं.. ते.. ऊं.. ??

'ते'च का?

म्हणजे ते 'आपल्या' पैकीच ना?...... ?

 
^ वर