भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.

आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी मुख्य जवाहरलाल नेहरु स्टेडियमबाहेर उभारण्यात आलेला पादचारी पूल कोसळल्यानंतर तो पुन्हा उभा करण्यासाठी दिल्ली सरकारने लष्कराला विनंती केली आहे. नुकतेच मुख्य स्टेडियमबाहेर असलेला पादचारी पूल कोसळल्याने स्टेडियमच्या बांधकामाबाबत प्रश्न निर्माण झाले होते. त्यामुळे आता हे काम लष्कराकडे देण्याचे सरकारने ठरविले आहे.
बांधकाम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ''कोसळलेल्या पादचारी पूलाचे काम लष्कराचे जवान शनिवारी सुरु करणार आहेत. या पूलाचे काम पाच दिवसांत होणे अपेक्षित आहे.'' जवान हे काम पूर्ण करतीलच यात वाद नाही. तसे आपले सैनिक सरकारला काश्मीर पासून ते नक्षलवाद आणि नैसर्गिक संकटात नेहमीच मदतीला धावून येते. आंणी काम झाले की कामाचा कोणताही गाजावाजा न करता शांतपणे बराकीत निघून जातात. या बद्दल कोतूक करावे तेव्हढे कमीच आहे.
भारताची ढासळलेली राजकीय परिस्थिती, राजकीय लोकनेत्यांची नाकामी आणि यामुळे निर्माण झालेली काश्मीर पासून कन्याकुमारी आणि कच्छ पासून दूर ईशान्येकडील सात राज्यांची अशांतता पाहता हा संपूर्ण देशच लष्कराच्या जवानांच्या ताब्यात सर्व सुधारणेसाठी, खड्डे विरहित रस्ते बांधकाम, शिस्त पालन या साठी द्यावा असे माझे मत झाले आहे. पण यात एक धोका आहे. पाकीस्थानी लष्करा प्रमाणे आपले लष्कर लोकप्रतिनिधी पेक्षा अति महत्वाकांक्षी झाले तर देशात पाक प्रमाणेच अशांतता माजेल. पण आजच्या बजबजपुरी पेक्षा धोका पत्करून आणि संसदेचे कठोर नियंत्रण ठेवून हा प्रयोग करण्यास काय हरकत आहे. तसा भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा नाही किंवा सत्ताधीश होण्या करता कटकपट कारस्थान करण्याचा नाही. आपल्या विचारांचे स्वागत आहे.
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

लष्कर

लष्करात भ्रष्टाचार नाही असे आपल्याला कशावरून वाटते?

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

?

चिथावणी देणारे लेखन उडवावे.

(वटवटफार) नितिन थत्ते

बातमी कुठे संपते आणि मत कुठे सुरू होते?

भारताची ढासळलेली राजकीय परिस्थिती.... पाहता हा संपूर्ण देशच लष्कराच्या जवानांच्या ताब्यात सर्व सुधारणेसाठी... द्यावा असे माझे मत झाले आहे.

हे मत श्री. ठणठणपाळ यांचे आहे, की त्यांनी वाचलेल्या बातमीतले?

(शिवाय हा लेख उलट्या अर्थाने घ्यायचा आहे, की सुलट्या अर्थाने घ्यायचा आहे? हे माझ्यासाठी हवे तितके स्पष्ट होत नाही, क्षमस्व.)

फायदा नक्की काय?

धनंजयशी सहमत. सुलट्या अर्थाने घेऊन खालील प्रश्न येतो.
देश लष्कराच्या ताब्यात द्यायचा म्हणजे काय करायचं ते कळलं नाही. ११० कोटी लोकांचा देश चालवण्यासाठी जी यंत्रणा लागते ती विस्थापून तिथे सैन्यातले लोक टाकणे असा अर्थ असेल तर त्यासाठी पंधरा लाख लोक पुरेसे नाहीत. कित्येक कोटी हवेत. त्यात त्या विशिष्ट क्षेत्रातलं ज्ञान, अनुभव नसल्यामुळे सावळा गोंधळ होईल तो वेगळाच.
मला वाटतं तुम्हाला असं म्हणायचं आहे की लष्कराशी जी शिस्त व एफिशियन्सी आपण जोडतो त्या पद्धतीने सर्वच कामं युद्धपातळीवर व्हायला हवी. त्याबद्दल दुमत नसावं. पण एक लक्षात घ्यायला हवं की लष्कराला जवानांचे प्राण बाजीला लावण्याचे अधिकार असतात. तसं सरकार ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात अत्यंत छळवादी होऊ शकतं. दुसरं असं की लष्कराची शिस्त व कार्यक्षमता ही लष्कराने निर्माण केलेली प्रतिमा आहे. यात जो अनागोंदी कारभार होतो तो सोयीस्करपणे प्रतिमा डागाळू नये म्हणून राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली झाकला जातो. सध्या निदान तो दिसतो तरी, व लोकांच्या आवाज उठवण्यातून सुधारण्याचा तरी प्रयत्न होतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

जर मोक्याच्या जागी, अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर जर स्वच्छ सैनिक ...

संपूर्ण देशाचा कारभार हे संसदेतील ७००-८०० लोकप्रतिनिधी हे नोकरशाही मार्फत चालवत असतात. पण आज यांच्या भ्रष्ट्र युती मुळे संपूर्ण यंत्रणाच खिळखिळी झाली आहे. त्यामुळे सर्व सैन्यास पणाला लावण्याची गरज नाही.जर मोक्याच्या जागी, अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर जर स्वच्छ सैनिक शिस्तीचे अधिकारी जरी नेमले तरी कारभारात फरक नक्कीच पडेल.आणि अधिकारी जबरी असेल तर बाकी नोकरशाही सुद्धा सरळ राहते. आपण स्वतः अनुभव घेवू शकता. जर कलेक्टर सरळ IAS होवून सरळ सेवाभरातीने भरती झाला तर कारभारात खूप फरक पडतो. तोच सरकारी पद उन्नतीने ऑफिसर कलेक्टर झाला तर तो कसा कारभार करतो ते पहा.
Thanthanpal,
thanthanpal.blogspot.com

कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार

'संभवामि युगे युगे' मसिहाची आशा बघण्यामध्ये, तुम्ही पाकिस्तानचे उदाहरण दिले त्याप्रमाणे, लष्कर/हुकूमशाही येण्याची भीती असते असे मला वाटते. हुकूमशहा वाईट झाला की पुढे काहीच उपाय उरत नाही. लोकशाहीत काहीच कायम टिकत नाही त्यामुळे वाईट परिस्थिती हटण्याची शक्यतातरी असते.

The best government is a benevolent tyranny tempered by an occasional assassination. - Voltaire

Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely. - Lord Acton
क्ष्

बरं...

घटकाभर असं धरून चालू की तुम्ही जे बदल सुचवले आहेत ते खरोखरच कल्याणकारी आहेत. ते अमलात कसे आणावेत? आख्ख्या देशाची व्यवस्था बदलणं ही सोपी गोष्ट नाही. नुसतं 'हे चांगलं नाही, माझा आतला आवाज सांगतो की असं झालं पाहिजे' इतकं पुरेसं ठरत नाही. हे बदल घडवून आणण्याचा मार्ग थोडा तरी दाखवावा अशी विनंती.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

ठठपा-शिर्षक ?

भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.

ह्याचा काय अर्थ होतो ओ ? आणि हे तुम्हास शिर्षकास योग्य का वाटते ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

सहमत आहे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धक्का यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे. लेखाचे शीर्षक निरर्थक वाटते.
"भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे."


यात कोण कोणाच्या कोणत्या विचारांचे स्वागत करीत आहे तेच समजत नाही.
तसेच भारतीय सेनेचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा.... या वाक्यांशाच्या पुढे "इतिहास आहे" असे दोन शब्द अध्याहृत मानले तरी वाक्य सार्थ वाटत नाहीच.

शिर्षक

>>भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...

शिर्षक पुर्ण चुकीचे आहे गैरसमज पसरवणारे देखील.
फक्त शिर्षकामुळे तरी लेख वाचतील अश्या अट्टाहासातून लिहले गेले असावे असे वाटत आहे.

'कॉपी-पेस्ट' करणं हेच द्न्यान आहे.

फक्त शिर्षकामुळे तरी लेख वाचतील अश्या अट्टाहासातून लिहले गेले असावे असे वाटत आहे.

मुळीच नाही. ठणठणपाळ ह्यांना 'कॉपी-पेस्ट' करण्याचे द्न्यान प्राप्त झालेले आहे. आणि हो! त्यांच्या ह्या द्न्यानाचा इतरांना हेवा वाटतो असे देखील त्यांचे म्हणणे आहे. ते त्या द्न्यानानेच तशा प्रकारचे शिर्शक लिहीतात.

अतिशय

This comment has been moved here.

सहमत नाही

आपल्या विचारांशी अजिबात सहमत नाही

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

भीक नको, कुत्रा आवर अशी स्थिती होईल

१९७५-७७च्या एमर्जन्सीच्या काळातील सैनिकी शिस्तीचा अनुभव अनेकांच्या स्मरणात असेलच. त्या काळी गाड्या वेळेवर धावण्याचा व इंदिरा गांधींचा वीस कलमी कार्यक्रम राबवण्यासाठी सगळी शासन यंत्रणा राबत असल्याचा भास निर्माण केला होता. गरीबी हटवण्याच्या घोषणा हवेतच विरून गेल्या व अजूनही गरिबी हटतच आहे.
सैन्याने त्यांना नेमून दिलेली कामे नीटपणे, प्रामाणिकपणे, वेळेवर, व कुठलाही भ्रष्टाचार न करता केले तरी पुरेसे आहे. त्यांची यापेक्षा जास्त लुडबुड नको. वादळ, महापूर यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला मदत करणे हे त्यांचे कर्तव्य आहे व ते अनेक वर्षे करतही आहेत.
आफ्रिकन देशातील मिलिटरी सत्तेचा काळाकुट्ट इतिहास समोर असताना असले विचार सुचतातच कसे? शेजारच्या पाकिस्तानची, म्यानमारची जिवंत उदाहरणसुद्धा आपल्यासमोर आहेत.
शहाण्यास जास्त सांगण्याची गरज नाही.

लष्कराच्या हाती राजकीय सत्ता सोपवणे नामंजूर

भारताची ढासळलेली राजकीय परिस्थिती, राजकीय लोकनेत्यांची नाकामी आणि यामुळे निर्माण झालेली काश्मीर पासून कन्याकुमारी आणि कच्छ पासून दूर ईशान्येकडील सात राज्यांची अशांतता पाहता हा संपूर्ण देशच लष्कराच्या जवानांच्या ताब्यात सर्व सुधारणेसाठी, खड्डे विरहित रस्ते बांधकाम, शिस्त पालन या साठी द्यावा असे माझे मत झाले आहे. पण यात एक धोका आहे. पाकीस्थानी लष्करा प्रमाणे आपले लष्कर लोकप्रतिनिधी पेक्षा अति महत्वाकांक्षी झाले तर देशात पाक प्रमाणेच अशांतता माजेल. पण आजच्या बजबजपुरी पेक्षा धोका पत्करून आणि संसदेचे कठोर नियंत्रण ठेवून हा प्रयोग करण्यास काय हरकत आहे.

सध्याच्या लोकशाही सरकार ऐवजी लष्कराच्या हाती राजकीय सत्ता सोपवणे नामंजूर!

सिमेचे संरक्षण, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यास गरज असेल तेव्हा मदत व नैसर्गीक आपत्तीत सहाय्य हे लष्कराचे काम आहे व ते त्यापुरतेच मर्यादित रहावे. सैन्याधिकार्‍यांना नागरी प्रशासन चालविण्याचा अनुभव नसतो व त्यांना ते जमेलच असे नाही आणि त्यात एखादा अधिकारी हुकुमशहा होण्याची शक्यता जास्त आहे, हे म्हणजे रोगा ऐवजी ईलाज जीवघेणा असे होईल.

जर तुम्हाला सैन्याधिकार्‍यांच्या प्रशासन कौशल्या विषयी जाणून घ्यायचे असेल तर कॅन्टोनमेंट मधे राहणार्‍यांशी एकदा बोलून पहा. पुण्याजवळ तीन (देहुरोड, खडकी व पुणे) व नाशीकजवळ एक (देवळाली) कॅन्टोनमेंट आहेत. येथील रहिवासी सैन्याधिकार्‍यांवर का खुष नाहित? ज्यांना शक्य होते व परवडते ते जवळच्या नगरपालिकांच्या हद्दीत स्थलांतर का करताहेत? कार्यक्षम व प्रामाणिक अधिकारी असूनसुद्धा रस्ते, फुटपाथ्, गटारे, शाळा, रुग्णालये, व ईतर सार्वजनीक बांधकामांचा दर्जा उत्तम का नाही? याची उत्तरे शोधा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लष्करशाही का नकोय ते.

- शिपाईगडी

खुर्चीची उब

लष्करशहा असो की लोकशाहीने निवडलेले लोकप्रतिनिधी, सत्तेच्या खुर्चीची उब मिळताच सारे एकसारखेच वागू लागतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपल्या देशातील जनतेच्या मनाची बांधणी मुळापासून नव्याने करण्याची गरज आहे. भ्रष्ट आचार हा आपल्या अंगात इतका मुरलाय की आपण भ्रष्ट आचार करतोय हे आपल्या ध्यानातही येत नाही.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

काहीही

आगीतून फुफाट्यात


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत नाही

मी सैन्यात अधिकरी आहे.
मला वाटते प्रत्येकाने आपले काम करावे. सैन्याचे काम शत्रुशी लढण्याचे आहे. तो जर राज्य करु लागला तर सैन्यातला (ब-यापैकी कमी असलेला भ्रष्टाचार वाढेल). राज्य करण्याची कोर कॉम्पिटन्सी नसण्याने त्याना ते जमणार नाही (तसे पाहीले तर पंत प्रधान होउ पहाणारे राहुल गांधीं कडेही कोर कॉम्पिटंसी नाही - हा विषय वेगळा आहे).

आदर्श सोसायटी च्या घोटाळ्यावर भरपुर सध्या लिहुन येत आहे. आज पर्यंत मला स्वतःला आभिमान होता की सैन्य हे सरकारी लाचखोर व पैसाचोरी ह्या पासुन ब-यापैकी दुर आहे. आज तो कमी झाला. जर शासन करते झाले तर काय होईल ह्याची जाणिव यावी ह्यावरुन.

एकदाका सत्तेची चटक लागली की मग जाणार नाही व सैन्याचे जे प्रथम काम (शत्रंशी लढण्याचे) ते पण करण्याच्या परिस्थीतीत राहणार नाही.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

 
^ वर