प्रतिसाद वाचून कोण आठवतं?
उपक्रमावर ठणठणपाळ काकांचे उच्चरवात लिहिलेले प्रतिसाद अतिशय मनोरंजक असतात. (ते काही अत्यंत उत्तम मुद्दे मांडतात हेदेखील इथे नमूद करायला हवे. पण तो चर्चेचा विषय नाही.) तर त्यांचे प्रतिसाद वाचून मला नेहमीच सन्नी देवलची आठवण येते. फक्त साठी उलटून गेल्यावर सनी देवल कसा तारीख-पे-तारीख छाप किंवा ये-ढाई-किलो-का-हाथ टाइप' डायलॉग मारेल ह्याची थोडी कल्पना करा. माझ्यासारखीच उपक्रमावरील सदस्यांच्या प्रतिसाद वाचून तुम्हाला कुण्या अभिनेत्याची, नटाची, कलाकाराची आठवण येते का? म्हणजे अगदी उपक्रमावरचेच सदस्य नसले तरी चालतील. तुमच्या ओळखीतल्या इतर संकेतस्थळांवरील सदस्यांचे प्रतिसाद वाचून तुम्हाला कुठला अभिनेता, नट किंवा कलाकार आठवतो हे सांगितल्यासही चालेल. कार्टूनमधले क्यारेक्टरही चालतील. उदा. डोनाल्ड डक. अगदी रामायणा-महाभारतातली पात्रेही चालतील. झाडे चालतील. मात्र कुठल्याही प्राण्याशी तुलना केलेली चालणार नाही. ( इथे हा स्पष्ट करावेसे वाटते की 'जर रेडा दूध देतो तर म्हैस दूध देते' हा धागा वाचून हा निर्णय घेण्यात आलेला नाही. इतर कुठल्याही प्राण्यांचा किंवा जंतूंचा कुठल्याही प्रकारचा अपमान करू नये हीच सदिच्छा आहे.)
फक्त एक लक्षात ठेवावे की हे प्रतिसाद देताना-घेताना खेळीमेळी असू द्यावी. पातळी सोडू नये. उदा. एखाद्याची/एखादीची प्रतिसादातून सगळ्यांना खुश करण्याची प्रवृत्ती बघितली की पांचालीच आठवते किंवा एखाद्याचे/एखादीचे बुळे प्रतिसाद वाचून गणपत पाटील ह्यांची आठवण येते किंवा एखाद्याची/एखादीची प्रतिसादलोलुपता बघून राखी सावंतच आठवते, असे प्रतिसाद चालणार नाहीत. असे प्रतिसाद आल्यास ते लगेच संपादित करावे ही संपादकांना विनंती.
कधी कधी अतिरूक्ष होणाऱ्या उपक्रमाला अशा चर्चा अधूनमधून मनोरंजक चालून जातात हे लक्षात घेऊन ही चर्चा टाकली आहे. ह्या चर्चेचा उद्देश मनोरंजन आणि एकमेकांना अधिक चांगले ओळखणे हा आहे. पण ह्याशिवाय अभिनेत्यांची, कार्टूनक्यारेक्टरांची, मायथॉलजीतल्या पात्रांची, झाडांची आणि त्यांच्या गुणधर्मांची ओळख होईल/माहिती मिळेल ती वेगळीच. (त्यामुळे एखादे पात्र, अभिनेता, झाड वगैरे वगैरेच का आठवते हेही सांगितल्यास उत्तमच.)
असो.
चला. व्हा सुरू . हो आणि खेळीमेळीचे तेवढे लक्षात असू द्या बरं का?
Comments
कृपा करा
चर्चा प्रस्ताव वाचून खोखो हसण्याची उर्मी आवरत नाही. कृपा करावी, आम्ही यावेळी हापिसात असतो. ;-)
बाकी, प्रस्ताव मस्त आहे. सवडीने उत्तर देते.
मी सुरू करतो...
धम्मकलाडू हे नाव वाचून व लेखन वाचून मला ठणठणपाळ (घाबरलात ना... तोच उद्देश होता) वरच्या चित्राची आठवण येते. लांबलचक मिशा, डोक्याला टक्कल, मोठ्ठे मिष्किल डोळे व हातात हातोडा.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
गुंडोपंत
याचा अर्थ ठणठणपाळ, धम्मकलाडू आणि गुंडोपंत एकच आहेत असा अर्थ निघेल. ;-)
गुंडोपंतांचे वर्णनही असेच असेल.
बारीक फरक
गुंडोपंताच्या टकलावर अजून रुळते अदृश्य लांबसी शेंडी* असेल असे वाटते.
(श्रेय: संदिप खरे)
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
शेंडीला गाठ
त्या शेंडीला गाठ मारलेली नसेल तर चाणक्यही दिसतील का? ;-)
बोसॉन्स आणि फर्मियॉन्स
तुम्हाला ते बोसॉन्स आणि फर्मियॉन्स वगैरे माहीत आहेत का? कधीकधी तसलेच प्रकार असावेत असंही वाटतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
असे दिसतात
हे पाहा गुंडोपंत असे दिसतात!
आपला चित्रांकीत
गुंड्याभाऊ
रावसाहेब
आम्हाला गुंडोपंत पुलंच्या रावसाहेब सारखे वाटतात.
प्रकाश घाटपांडे
शंका
मागे घेतलेल्या हातात दणकट् दांडा आहे का हो???
मस्त प्रस्ताव
मला विकास ह्यांचे प्रतिसद वाचून दिपक चोप्राची आठवण होते. परदेशात राहूनही आयुर्वेदाचा प्रचार आणि अध्यात्माचा पुरस्कार करणारे दिपक चोप्रा उत्तम वादविवादपटू आहे. स्वतः उच्चाशिक्षीत डॉक्टर असून त्यांनी क्वांटम फिजिक्स आणि आध्यात्माची सांगड घातली आहे.
प्रियाली ह्यांचे प्रतिसाद वाचून अळूवडीची आठवणे येते. खाऊन संपले तरी घशात खवखवणारी पण चविष्ट अळूवडी.
चित्रा ह्यांचे प्रतिसाद मला लाजाळूच्या झाडासारखे वाटतात. जसे नुसत्या स्पर्शानेही पान मिटून घेणारे लाजाळूचे झाड तसेच थोडेही परखड बोलले की कान मिटून घेणारे कानकोंडे श्रद्धावान.(इथे घासकडवींच्या शैलीत लिहाण्याचा प्रयत्न केला आहे गोड मानून घेणे)
सध्या इतकेच. बाकी धागा कहर आहे!
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
~”It is impossible to defeat an ignorant man in argument.” -William G. McAdoo
रिकामटेकडा - जुदाईतील परेश रावल
रिकामटेकडा हा आयडी मला जुदाई चित्रपटातील परेश रावलची आठवण करून देतो. यांच्या प्रतिसादांत स्पष्टीकरणे, उत्तरे कमी आणि (प्रति)प्रश्नच जास्त असतात.
माझे प्रतिसाद मीच पुन्हा कधी वळून वाचले तर मला ललिता पवार आठवते. ;-)
मनकवडी
हॅहॅहॅ! मला इथे 'सतीच वाण' पिक्चर मधील ललिता पवार आठवते. गुळाची ढेप बत्त्याने फोडुन शेंगदाणे व गुळाचा तुकडा तोंडात टाकतानाचे दृश्य. ( फक्त मी मनातल्या मनात हा शाकाहारी पदार्थ बदलतो व तो विवक्षित सामिष पदार्थ डोळ्यासमोर आणतो)
त्या दिवशी ट्रॅडिशनल डे आहे व प्रियालीने नउवारी साडी नेसली आहे असे दृष्याची पार्श्वभुमी आहे.
प्रकाश घाटपांडे
अंधश्रद्धा निर्मूलन
यांना कुणीतरी नकळत बोंबलाचं भुजणं पाठवा रे! ते मटकावल्यावर पकांचे अंधश्रद्धा निर्मूलन होईलच अशी खात्री आहे.
कृपा करा आणि हा अत्याचार थांबवा - नऊवारीसाडीवर.
डॉ. माधवी गाडगीळ
माधवी गाडगीळ यांच्याबाबत सर्वांनाच कल्पना असल्याने अधिक रेफरन्सेस दिलेले नाहीत.
[संपादित]
- टाईमपास
हा धागा
हा धागा दशावतार उघड करण्यासाठी असेल तर मजा येइल. :)
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
उपक्रमाचे संपादक
उपक्रमाचे संपादक पाहून आम्हाला हे आठवतं.
मुंडकी न दाखवणार्या काही व्यक्ती सपासप प्रतिसाद कापतात. या चर्चेतले प्रतिसादही गेल्याचं दिसलं.
- राजीव.
चित्र
चित्र आवडले. आम्हाला या तलवारीचा अनुभव अनेकदा आला आहे.
--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै
जुळे
मला रीकमटेकडा व वसुलि हे जुळे वाटतात
चूक
जर तुम्ही लोकलने प्रवास करत असाल तर (अप किंवा डाऊन) तर लक्षात येईल की जेंव्हा जेंव्हा वसुलिंचे लेख येतात त्यानंतर लगेचच (एक-दोन) दिवसांच्या फरकाने यनावाला यांचे लेख येतात. जणू काही दादर नंतर माटूंगा.
(अवांतर : या धाग्याचा रोख काहिसा वैयक्तिक अंगाने जात आहे तेव्हा वसुलि आणी यनावाला यांनी राग मानू नये हि सार्वजनिक जागी केलेली जाहिर विनंती.)
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
जजमेंट
"चूक" किंवा "बरोबर्" असे जजमेंट देणा-या व्यक्तिंबद्दल मला नेहमीच प्रचंड आदर वाटतो.
आठवलं...
मला श्री. यनावालांचे लेख वाचल्यावर, "छडी लागे छमछम विद्या येई घम घम" आणि त्यातलेही, "मोर्या मुर्खा, गोप्या गध्या देती सर्वा दम" हे आठवते ;)
ऑरॉगॉर्न यांचे काही प्रतिसाद वाचताना, "बरबादीयों का सोग मनाना फिजूल था, बरबादीयों का जश्न मनाता चला गया...मै जिंदगी का साथ निभाता चला गया" असे म्हणत लिहीत असावेत असे वाटते. ;)
प्रकाशराव काही (व्हेज-नॉनव्हेज) प्रतिसादात, दिवाळीतील बाँब अथवा लक्ष्मीबारच्या वातीला उदबत्ती लावून दूर पळत जाऊन कानावर हात ठेवून डोळे मिटलेल्या मुलासारखे दिसतात. ;)
रिकामटेकडांचे प्रतिसाद पाहून, शेक्सपिअरचे "नावात काय आहे?" हा प्रश्न चुकीचा वाटतो. ;)
वसुलींचे चर्चा लेख वाचताना, मला ८०च्या दशकातील व्हिक्सची जाहीरात आठवते: "अरे वो पडोसकी औरत हैना..." (मग खाकरण्याचे नाटक आणि मग गाणे), "गले मे खिच खिच, गले मे खिच खिच क्या करू?" असे वाटते. आता कळले की त्या खिचखिचला अळूवडीदेखील कारणीभूत आहे. ;)
उपक्रमकारांचा नुसता विचार करताना (कारण ते चर्चा/प्रतिसादात नसतात म्हणून नुसताच ईच्चार!): मला ईश्वरी संकल्पनेचा साक्षात्कार होतो! देवाने जसे विश्व तयार केले आणि स्वतःला त्यातून दूर करून या विश्वाचा खेळ पहात बसला, तसेच काहीसे वाटते. ;)
बाकी माझ्यावरून दिपक चोप्रांची आठवण केली गेल्यामुळे दोन डिसक्लेमर्सः मी स्वतःला हिंदूच समजतो (दिपक चोप्रा समजत नाहीत) आणि माझ्या कुठल्याही साधनेमुळे कुठेही भुकंप वगैरे झालेला नाही त्यामुळे त्याची जबाबदारी घेत मी माफी मागणार नाही. :-)
प्रतिमा
प्रत्येक आयडीची एक प्रतिमा डोक्यात आहे. मात्र त्याचे कोणत्याही प्रसिद्ध व्यक्ती/पात्राशी साधर्म्य नाही. मला कोणाचेही प्रतिसाद वाचून कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीची आठवण येत नाही.
मात्र ज्यांचे फोटो पाहिले आहेत / ज्यांना प्रत्यक्ष भेटलो / बोललो आहे त्यांचे प्रतिसाद वाचले की त्यांचा चेहरा / बोलण्याची ढब वगैरे डोळ्यासमोर येते. (प्रत्यक्ष भेटल्यावर किंवा फोटो पाहिल्यावर कल्पलेली प्रतिमा कधीच जुळलेली नाही. अपवाद सहज, यांची जी प्रतिमा डोक्यात होती तसे बरेचसे दिसतात :) )
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?