जिमी कार्टर यांना मेडिकल नीतीमत्तेचे आणि इतर नीतीमत्तेचे पुस्तक

अमेरिकेच्या गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग
उपक्रमावर अभय बंग यांच्या उपचार पद्धतीस न्यायवैद्यकीय अनुमति नाही. आदिवासींना फसवून त्यांच्यावर उपचार केले जातात हे वैद्यकीय एथिक्स च्या विरुद्ध आहे म्हणून जोरजोरात चर्चा चालू आहे. वादविवाद आणि त्यात चांगली बाजू हिरहिरीने मांडणे हे ठणठणपाळ याची मजबुरी यामुळे ठणठणपाळ यानेही मोठ्या उत्साहाने भाग घेतला .कारण भारतात ज्या कांही चांगल्या गोष्टी आहेत त्यात श्री आणि सों अभय बंग , आमटे कुटुंबीय यांचा पहिला नंबर आहे. आणि या चांगल्या कार्यास जर कोणी अपशकून करत असेल तर विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे यामुळे वादविवाद . हे चालत असतानाच आज लोकसत्तात पुढील बातमी वाचली . डॉरी स्ट्रॉम्र्स पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. अभय बंग अमेरिकेला रवाना. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=100... त्या निमित्ताने वॉशिंग्टनमध्ये आयोजित संमेलनात ते व्याख्यान देतील.अॅटलांटामध्ये ‘कार्टर फाऊंडेशन’द्वारा आयोजित ‘जागतिक आरोग्यसेवेत करुणेचे स्थान’ या बैठकीत ते भाग घेतील. बैठकीत दोन नियोजित सत्राचे अध्यक्ष डॉ. बंग असतील. संयुक्त राष्ट्राने न्यूयॉर्कमध्ये आयोजित या संमेलनात अनेक राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख व आरोग्यमंत्री सहभागी होत असून सहस्रकाच्या विकास ध्येयामध्ये मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण कमी करणे यांचा समावेश आहे. त्यात प्रगती करण्यासाठी जागतिक निर्धार व कृतीला प्रबळ कसे करता येईल, हा डॉ. बंग यांच्या मांडणीचा प्रमुख मुद्दा असणार आहे. डॉ. बंग यांच्या नेतृत्वात ‘सर्च’ संस्थेने गडचिरोली जिल्ह्य़ात शोधून विकसित केलेल्या ‘घरोघरी नवजात बालसेवा’ या पद्धतीने बालमृत्यू कमी करता येतात, हे सिद्ध झाल्याने यू.एन. संघटनांनी जागतिक वक्तव्य काढून या पद्धतीची शिफारस अविकसित देशांसाठी केली आहे. भारताच्या ११ व्या पंचवार्षिक योजनेत तसेच आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात याचा अंतर्भाव होऊन विविध प्रांतातील ४ लाख आशांना या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इथिओपिया, बांगलादेश, नेपाळ या देशांनीही ही पद्धत वापरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही पद्धत जागतिक पातळीवर पसरत आहे.
वरील बातमी वाचून मला भारतातील अस्तित्वात असलेल्या नसलेल्या मेडिकल एथिक्स ची आठवण झाली. मेडिकल एथिक्स मुळे भारतात टीकेचे धनी झालेल्या भारतातील डॉक्टर बंग यांचा सत्कार करून अमेरिका आपल्या अपराधी भावनांचे आउटसोर्सिंग करून स्वत:पापक्षालन तर करत नाही ना अशी शंका, कुशंका माझ्या मनात आली. आता मेडिकल एथिक्स न पाळणाऱ्या बंग यांनी अमेरिकेच्या स्वत:च्या पापक्षालना करता त्यांचा सत्कार स्वीकारावा का? बंग यांनी हा सत्कार स्वीकारून अमेरिकेच्या पापात सामील व्हावे का? हा मुलभूत प्रश्न जालावरील रिकामटेकड्या ब्लोगेर्स ना पडला आहे. आता बंग यांनी काय करावे, अमेरिकेने त्यांचा सत्कार केला यामागे कांही षड्यंत्र असू शकते. या निमित्य मेडिकल एथिक्स पाळणाऱ्या भारतीयांचा जाणूनबुजून अपमान करून अनैतिक कार्य करणाऱ्या लोकांना ( बंग ) प्रोहत्सान देवून भारतात अनैतिक्त्ता माजवून नैतिक भारतीयांचे खच्चीकरण करणे हा छुपा हेतू सुद्धा अमेरिकेचा असू शकतो. यामुळे जालावरील नैतिक उपक्रमिनी त्वरित बंग यांना मेल करून सत्कार स्वीकारून नैतिक भारतीयांचा अपमान करू नका अशी जाहीर विनंती करावी.
त्याच प्रमाणे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यानाही मेल करून, बंग आमटे हे भारतात मेडिकल एथिक्स पाळत नाही, रुग्णांना देवीच्या नावाखाली फसवून उपचार करतात , दानशूर व्यक्तींना दान देण्याचे भावनिक आवाहन करून त्यांच्या पापाच्या कमाई वर डॉक्टरी करतात, आणि या पापाच्या पैश्यावर समाजसेवक म्हणून स्वतः मिरवतात. या पापाच्या पैश्या तूनच ते ठणठणपाळ आणि इतर ब्लोगेर्स , प्रसार माध्यमांना , TV वाल्यांना आपल्या हाताशी धरून स्वतः:चा उदो उदो करून घेतात. याला पुरावा म्हणून राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांना मेडिकल नीतीमत्तेचे आणि इतर नीतीमत्तेचे पुस्तक आणि जाल वरील बंग आमटे यांची बाजू घेणाऱ्या ब्लोगेर्स च्या प्रतिक्रिया त्वरित मेल कराव्यात आणि भारताच्या नैतिकतेचा झेंडा जगात उंच उंच फडकत ठेवावा असे मी जाहीर आवाहन करतो. हा धागा मुद्दाम नवीन काढला . करण बंग यांच्या वरील अनेतिक्तेच्या धाग्यावर नेतिकतेवाल्यांच्या प्रतिसाद धोधो पडत होता. हा धागा ठेवायचा का नाही याचे नेतिक अधिकार संपादकांना , मालकांना आहेत.
जाता जाता :- तिथे डॉ. राणी व अभय बंग या दोघांच्यावतीने डॉ. अभय बंग हा पुरस्कार स्वीकारतील. बंग यांना त्यांच्या अनैतिक कामात सावली सारखी साथ देणाऱ्या राणी बंग. मात्र डॉक्टर बंग (पुरुषाने) यांनी सत्कार समारंभाला स्वत: च्या बायकोला मात्र नेले नाही. स्र्त्री मुक्ती संघटना लक्षात घ्या तुम्ही पण याचा जरूर निषेध करून राणी यांना न्याय मिळवून द्या . आणि भारतीय स्त्रियान वर असा अन्याय या पुढे खपवून घेतला जाणार नाही हे दाखवून द्या.

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Comments

चर्चेला महत्व देऊ नका.

ज्यांना अभय बंग ह्यांच्या उपचार पद्धतीमुळे फायदा झाला ते त्यांच्याबद्दल चांगलेच बोलतील. तसेच त्यांच्या कार्याची महती मानणारे महाराष्ट्रात लाखो लोक आहेत. तुम्ही उपक्रमावरील "त्या" चर्चेला महत्व देऊ नका.

लेख आवडला...

तिरकसपणा छान आला आहे, तेसुद्धा काहीतरी चांगलं आहे हे सांगताना. असंच लिहीत राहा.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

ठणठणपाळ ष्टाईल

लेख अगदी ठणठणपाळ ष्टाईल!
प्रकाश घाटपांडे

 
^ वर